Home Blog Page 186

सिंदखेड राजा तालुक्यातील अतिवृष्टी पावसामुळे दोन मंडळा मध्ये पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या -मनसेची मागणी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

तालुक्यामध्ये दिनांक 05 व 06 जुलै रोजी दोन दुसरबीड व किनगाव राजा या मंडळा मध्ये ढग फुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याच्या शेतातील माती पूर्ण खरडून गेली आहे फळबागांचे नुकसान झाले आहे तसेच सोयाबिन, कपाशी, चे सुद्धा खूप नुकसान झाले आहे

शेतकऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने पंचनामे करून हेक्टरी 50 रु आर्थिक मदत देण्यात यावी असे ना झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल

अशी मागणी मनसे जिल्हा अध्यक्ष शिवा दादा पुरंदरे, जिल्हाउपाध्यक्ष निलेश देवरे, तालुकाध्यक्ष अभिजित देशमुख, विधानसभाअध्यक्ष सिधु गव्हाड, विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष अतिश राजे, शहर अध्यक्ष घनशाम केळकर, गव तहसिदार याना निवेदन देण्यात आले.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे थकवलेले हप्ते बँक खात्यावर वितरीत करा – स्वाभिमानीची मागणी

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे थकवलेले हप्ते बँक खात्यावर वितरीत करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. ७ ऑगस्ट रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद आहे की,

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने प्रती शेतकरी २ हजार रुपये हप्ता देण्यात येतो. आणि वर्षाला ३ हप्ते असे एकुण प्रती शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये सरकारकडून वाटप करण्यात येत असल्याचा अनेक महिन्यांपासून सरकार मोठा वाजा गाजा करत आहे.

पंरतु हकिकत वेगळीच आहे. कित्येक महिन्यापासून पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजुन २ हजार रु. खात्यावर वितरीतचा मुहूर्तही झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी कार्यालयात चकरा घालून हैराण झाले आहेत, लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या कागद पत्रासाठी क‌‌ॅम्पचे उद्घाटन करुन मोकळे झाले आहेत.

शेतकऱ्यानी के वाय सी केल्या शिवाय पी एम किसान सन्मान निधी खात्यावर जमा होणार नाही असे प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडुन वेळोवेळी सांगण्यात येत आहे

. पंरतु गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांची के वाय सी झालेली असतांना शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता खात्यावर जमा होत नाही. अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. अगोदरच महापुराने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वच बाजुचा आधार तुटल्याने पुर्णपणे शेतकरी खचुन गेला आहे.

करीता तत्काळ आपल्या स्तरावर पीएम किसान निधीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करुन निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालया समोर सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे ,

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, अजय ठाकरे,विशाल चोपडे, गोकुळ गावंडे, संजय धरमकार, प्रफुल करांगळे, राजेंद्र ठाकरे, रवी चोपडे, विठ्ठल जळमकार, मोहन चोपडे, सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..

महसुल सहायक याला लाच घेतांना अटक

0

प्रतिनिधी अर्जुन कराळे शेगांव

वडीलोपार्जित शेतीला वारसाहक्काने लागलेल्या नांवाप्रमाणे शेती तक्रारदार यांचे वडील व काका यांच्या नांवावर करण्यासाठी, तुकडेबंदी आदेशानुसार शेती नांवावर करण्यासाठी अडचण येत होती.त्यामुळे ती शेती नांवावर होण्यासाठी तक्रारदार यांनी ती शेती नांवावर होण्याकरिता उपविभागीय अधिकारी खामगांव यांचेकडे परवानगी मागण्याकरिता अर्ज केला .

त्या अर्जावरुन उपविभागीय कार्यालय खामगांव यांनी तहसिल कार्यालय शेगांव यांना अहवाल मागीतला होता. सदर अहवाल तहसिल कार्यालय शेगांव येथुन खामगांव येथे पाठविण्यासाठी संदिप अर्जुन दाभाडे ,महसुल सहायक तहसिल कार्यालय शेगांव यांने तक्रारदार यांच्याकडे तिनहजार रुपयाची मागणी केली.

तडजोडी अती अडीचहजार रुपयाची लाच घेताना संदीप अर्जुन दाभाडे वय 46 राहणार कोठारी वाटीका नं.4 मलकापुर ,अकोला जि. अकोला याला तहसिल कार्यालय शेगांव येथे लाच घेतांना बुलढाणा लाचप्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
पोलिस उपअधीक्षक शितल घोगरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक महेश भोसले , सहाय्यक फौजदार शाम भांगे, पोलिस कर्मचारी विलास साखरे,विनोद लोखडे, जगदिश पवार, स्वाती वाणी आदीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

यावल येथे गोंडगाव अत्याचार घटनेच्या निषेर्धात व गुन्ह्यातील आरोपीस कठोर शिक्षेच्या मागणीसाठी सर्वधर्मिय व सर्वपक्षीय मुकमोर्चा

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका नराधमाने ८वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयीपणे खुन केल्याच्या घटनेच्या निषेधार्ता यावल येथे सर्वधर्मिय मुकमोर्चा काढण्यात येवुन आरोपीस कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली .

यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरातुन आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११वाजता गोंडगाव तालुका भडगाव येथे घडलेल्या ८ वर्षीय कल्याणी या बालीकेवर गावातीलच एका नराधमाने तिच्यावर लैगिंग अत्याचार करीत तिचा निर्दयीपणे खुन केल्याची घटना घडली असुन ,

या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील त्या नराधमास पोलिसांनी अटक केली असुन, गुन्ह्यातील नराधम आरोपीस जलदगती न्यायलयातुन तात्काळ कठोर शिक्षा व्हावी या मागणी करीता सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मुकमोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला

,यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरिक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या उपस्थितीत चिमुकल्या मुलींच्या हस्ते असंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले

, यापुर्वी तहसीलच्या आवारात जमलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरीक मोर्चात सहभागी लहान चिमुकल्या व महिला यांच्या वतीने दुदैवी कु कल्याणी पाटील हिला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , काँग्रेसचे शेखर पाटील , शहराध्यक्ष कदीर खान, आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी , शिवसेना ( उबाठा)चे अजहर खाटीक , रिपाइ चे तालुका अध्यक्ष विष्णु पारधे यांच्यासह मोठया संख्येत महिला भगिनी व चिमुकल्या मुली यांनी या मुकमोर्चात सहभागी होवुव अत्याचारास बळी गेलेल्या कल्याणीला न्याय मिळुन देण्याची मागणी केली .

देखरेखी शिवाय बगीचा झाला जंगल….शहरातील एकमेव बगीच्याची दैनाअवस्था

0

 

सिंदी रेल्वे ता.४ : असंख्य वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पालिकेच्या शहरात एकमेव बगीच्या कसाबसा अस्तित्वात आला मात्र तो ही वर्षेभर्यातच देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने जंगल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की शंभर वर्षांपूर्वीची नगर परिषद असलेल्या सिंदी रेल्वे शहरात राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे अद्याप पर्यंत एकही बगीच्या अस्तित्वात नोव्हता.

तेव्हा तत्कालीन नगराध्यक्षा डॉ शालीन मुडे यांनी विशेष प्रयत्न करुन पशु वैद्यकीय दवाखान्याची जिल्हा परिषदेच्या मालकीची सहा एकर जागा नगर पालीकेकडे वळती करुन घेतली आणि तेव्हापासूनच येथे बगीच्या बनविण्याचे नियोजन व्होवू लागले मात्र क श्रेणी नगर पालिकेला विकास कामासाठी तेव्हा मिळणारा नीधी हा फार तुटपुंजा असाचा परिणामता इच्छा असुन सुद्धा शहर बगीच्यापासुन वंचित राहले.

यानंतर विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी शहरातील विकासकामासाठी १३ करोड रुपयाचा नीधी मिळवीला आणि बगीच्याचे अनेक वर्षांपासूनचे शहराचे स्वप्न पुर्णत्वास ऐण्याचा मार्ग मोकळा झाला.

मात्र नियोजनाच्या अभावामुळे बगीचा निर्मितीस चक्क पंचवार्षिक वेळ लागला. शिवाय चार ते पाच एकरात असलेला बगीच्या पाच वर्षांत केवळ एक ते दिड एकरच विकसित व्होवु शकला.
बगीच्याचे उद्घाटन व्होवुन वर्षे लोटले मात्र केअर टेकरचा अभाव आणि पालिका प्रशासनाची निष्काळजीपणामुळे बगीच्यात डुकरांचा सर्रास वावर पाहायला मिळतो. आणि आता पावसाळ्यात तर बगीच्या मध्ये गवत वाढुन संपुर्ण बगीच्याच चक्क जंगल झाला आहे.

येथे वयोवृद्ध नागरीक, लहान मुलबाळ, शाळकरी विद्यार्थी, महीला पुरुष आदीची दररोज मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र येथील परिस्थीती आणि व्यवस्था पाहुन हिरमुस होतो. शिवाय वाढलेल्या गवतात सरपटणारे प्राणी जसे साप विंचु आदी चावा घेण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही.
याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ताबडतोब उपाययोजना करावे अशी शहरवासीयांची तसेच परिसरातील रहीवाश्यांची मागणि

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पवन युवराज पाटील यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

दिनांक 7/8/ 2023 रोजी शेतकी संघा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील युवक चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व यावल राष्ट्रवादी चे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल तालुका अध्यक्षपदी विरावली चे मा. ग्राम पंचायत सदस्य श्री पवन युवराज पाटील यांची निवड केली.

पवन पाटील हे विद्यार्थीदशेपासून राष्ट्रवादी विचारसरणीचे जोडलेले व्यक्तिमत्त्व आहे. याआधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष , त्यानंतर राष्ट्रवादी युवक चे तालुका उपाध्यक्ष म्हणून मी त्यांनी पक्षांमध्ये संघटनेची जबाबदारी पार पडली आहे .

गेल्या पंधरा वर्षापासून शरद पवार साहेबांच्या शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये यावल तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी विविध आंदोलने सुरुवातीच्या काळात केली त्यानंतर युवक राष्ट्रवादी मध्ये काम करत असताना प्रदेश स्तरावरून आलेल्या निवेदने आंदोलने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी मिळाली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले सर चोपडा पंचायत समितीचे सभापती डीपी साळुंखेसर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय पाटील बोदडे नाना फैजपूर चे शहराध्यक्ष अन्वर खाटीक वि का संचालक किरण पाटील अन्वर सईद जाकीर भाई ललित पाटील, राहुल चौधरी, रोहन महाजन ,अशोक भालेराव मोहसीन भाई, चंद्रकांत येवले, विशाल पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील, संचालक गणेश पाटील सारंग अडकमोलमनोज तडवी गजानन पाटील ज्ञानेश्वर पाटील विशाल पाटील पाडळसे भैय्या पाटील चुंचाळे योगेश पाटील, निलेश बेलदार गिरीश पाटील राजेश अडकमोल कोमल सिंग पाटील मनू महाजन विनोद पाटील कासवे तुषार येवले पितांबर महाजन भगवान बर्डे आदी उपस्थित होते या निवडीचे स्वागत करून पवन पाटील यांना शुभेच्छा दिल्या

सिंदखेड राजा बाजार समिती ची निवडणूक पुढे ढकलली

0

 

प्रचार तोफा शांत झाल्या

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात दिनांक ५ व ६ जुलै रोजी दोन मंडळामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी झालेली असून प्रचंड नुकसान होऊन शेतीचे मोठे नुकसान झालेले असल्यामुळे नैसर्गिक आपत्ती विचारात घेऊन सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलणे

बाबत दिनांक ४/८/ 2023 चे पत्रांनी प्राधिकरणाकडे विनंती केली होती तथापि महाराष्ट्र कृषी उत्पन्न पनण( विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 14( 3 )अनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे अधिकार शासनास प्राप्त असल्याने प्राधिकरणाने संदर्भ क्रमांक 3 चे पत्रांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदखेडराजा या बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिये बाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करून उचित आदेश होण्यास शासनाकडे विनंती केली होती

त्यानुसार शासनाने संदर्भ क्रमांक 4 चे पत्रांनी राज्यातील जून नंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता तसेच सदर परिस्थिती पूर्व पदावर येण्यास लागणारा कालावधी विचार घेता सहकार विभागाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दिनांक 30 /9 /2023 पर्यंत पुढे ढकलण्याबाबतचे दिनांक 28 /6 /2023 रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत

त्याप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील उपरोक्त नमूद नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती विचारात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदखेडराजा या बाजार समितीची निवडणूक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात चे निर्देश डॉ पि एल खंडागळे सचिव ,राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांना दिले आहेत

कागदपत्र आणायला कवठा तालुका अकोला येथे जाते असे सांगून घरून निघालेल्या १७ वर्षीय विद्यार्थीनीला अज्ञात आरोपीने पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

एका १७ वर्षीय विद्यार्थीनीला अज्ञाताने पळवून नेल्या – घटना उघडकीस आली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी १७ वर्षीय विद्यार्थीनी ४ ऑगस्ट रोजी कागदपत्र आणाय कवठा ता. अकोला येथे जाते असे तिच्या आईला सांगून घरून निघून गेली. मात्र अल्पवयीन मुलगी परत घरी आलीच नाही.

कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती मिळाली नाह यामुळे याबाबत मुलीच्या पालकांनी शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली कीआपल्या मुलीला कुणीतरी पळवून नेल्याचे म्हटले आहे. यावरुन पोलिसां अज्ञाताविरुध्द कलम ३६३ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस करीत आहेत

शेगाव बसस्थानकावर नातेवाईकांना सोडविण्यासाठी आलेल्या रोकडिया नगर येथील इसमाच्या खिशातून अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

शेगाव येथील बसस्थानकावर गर्दीचा फायदा – घेवून अज्ञात चोरटयाने इसमाच्या खिशातून २४हजार रुपये लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली.

शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या रोकडिया नगर परिसरात राहणाऱ्या मधूकर काशीनाथ तायडे (५३) रा. रोकडीया नगर हे नातेवाईकांना सोडण्यासाठी येथील बसस्थानकावर आले होते. यावेळी नातेवाईकांना बसमध्ये बसवून देण्यासाठी तायडे हे गर्दीत घुसले असता

अज्ञात चोरटयाने त्यांच्या खिशातील २४ हजार रुपये काढुन घेतले व तो फरार झाला. याबाबत तायडे यांनी शहर पोस्टेला तक्रर दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३७९ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

माटरगाव येथील पालकावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ माटरगाव कडकडीत बंद

0

 

पालकावरील गुन्हे मागे न घेतल्यास विद्यार्थ्यांचा शाळा बंदचा इशारा व पालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शेगाव प्रतिनिधी अर्जून कराळे

शेगाव- माटरगाव येथील विद्यार्थी व पालकांनी २ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषद बुलढाणा येथे शाळेला शिक्षक व इतर समस्या बाबत बुलढाणा येथे co मॅडमच्या दालनात न्याय मागण्याकरिता गेल्या असता काही पालकावर गुन्हे दाखल करण्यात आले.याच्या निषेधार्थ आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी माटरगाव येथे कळकळीत बंद ठेवण्यात आला.

व पालकावरील गुन्हे मागे न घेतल्यास विद्यार्थ्यांनी शाळा बंदचा इशारा देऊन गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे की माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सात ते आठ शिक्षकांचे कमी असल्याकारणाने व शाळेतील अनेक समस्यांच्या बाबत येथील शाळा समिती यांनी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथे दोन-तीन वेळा निवेदन देऊन सुद्धा अद्यापही त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही.

त्यामुळे दिनांक २ ऑगस्ट रोजी येथील पालक व विद्यार्थी बुलढाणा येथे जिल्हा परिषद कार्यालय co मॅडमच्या दालनात यांनी शाळा भरवली तिथेच राष्ट्रगान केले व आपल्या समस्या मांडण्याकरिता co मॅडमच्या प्रतीक्षेत तीन तास वाट पाहात बसावे लागले त्यातच एका मुलीला भोंड आल्याने ती बेशुद्ध पडली व पालकांची धावपळ झाल्याने त्यांनी हवेचे ठिकाण म्हणून वरच्या रूम मध्ये पंख्याच्या हवे खाली त्या मुलीला नेण्यात आले.

काही काळाने सीओ मॅडम त्यांना भेटायला आले असता त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तुम्हाला शिक्षक देऊ व शाळेच्याही समस्या दूर करू असे आश्वासन दिले व नंतर विद्यार्थी व पालक आपल्या गावी परत आले परंतु दुसऱ्या दिवशी त्यामधील अकरा पालकावर गंभीर स्वरूपाचे शासकीय कामात अडथळा आणल्या बाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे चुकीचे असून या गुन्ह्याच्या निषेधार्थ माटरगाव येथील पालकांनी व गावकऱ्यांनी आज माटरगावत कडकडीत बंद पाडला व गुन्हे दाखल करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला.

यावेळी गावातील सर्व पक्षीय लोकांनी सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध केला सदर विद्यार्थी व पालकांनी माध्यमांशी बोलताना आमच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आम्ही न्याय मागण्याकरिता गेलो असता उलट आमच्यावरच गुन्हे दाखल झाले चोरांच्या उलट्या बोंबा हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा असल्याचे येथील पालक व विद्यार्थ्यांनी सांगितले.

एका प्रकारे लोकशाहीची गडचिप्पी होताना दिसत आहे लोकशाही मार्गाने रीतसर निवेदन दिले. तरी सुध्दा भारतीय दंड विधान भादवी 153,143,149,66, 192 सारखे गंभीर गुन्हे पालकांवर लावण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांनी केला असा ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे.
ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही बसण्याकरिता पुरेसे डेक्स बॅच नाहीत पावसाळ्यात शाळा गळते शाळेला कंपाउंड नाही मुलींना मुताऱ्या नाहीत अशा अनेक समस्यांच्या जाळ्यात अडकलेली ही शाळा याबद्दल मुलींनी प्रतिक्रिया दिल्या की आम्ही फक्त खिचडी खाऊन भिकारी बनण्यापेक्षा चांगले शिक्षक देऊन अधिकारी बनवा अशा केविलवाण्या स्वरूपात येथील शाळेतील विद्यार्थिनींनी प्रतिक्रिया दिल्या. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या आणि पालकावर झालेले गुन्हे हे मागे घेतल्या जात नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पालकांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा पालकावर खोट्या स्वरूपात दाखल केलेले गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी बोलताना विद्यार्थी व गावकऱ्यांनी दिला आहे.