Home Blog Page 197

अकोट रोड वरील कलवाडी वस्ती जवळ पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज करण्यात आली.

0

 

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव..अकोट रोडवरील कलवाडी वस्ती जवळ पोलीस बंदोबस्त मध्ये अतिक्रम अतिक्रमाची कारवाई आज करण्यात आली

शेगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने आज सोमवार 19 जून रोजी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अकोट रोड वरील लाल बाबा दुर्गा माता मंदिरासमोर वसलेल्या नवीन खलवाडी वस्ती लगत हॉटेल पान टपरी इत्यादी अतिक्रमण पाठविण्याची कारवाई करण्यात आली

यावेळी शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व मुख्य प्रशासक डॉक्टर जयश्रीताई काटकर बोराडे मॅडमशेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील उपस्थित होते

खा.जाधव, माजी मंत्री आ.डाॅ. कुटे ,डीआरएम केडिया यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव राज्याचे माजी मंत्री व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे तसेच भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे डी आर एम केडिया साहेब यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे डीआरएम

शेगाव येथील रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 18 जून रोजी शेगावला आले होते त्यांनी शेगाव येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर खामगाव रोडवर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह सभागृहांमध्ये खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजीव भाऊ कुठे यांच्यासोबत आयोजित पूर्वनियोजित बैठकीसाठी ते विश्रामगृह कडे रवाना झाले.

विश्रामगृह येथील व्हीआयपी सभागृहामध्ये खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय भाऊ कुठे व डी आर एम केडिया यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा सरचिटणीस स्नेहलता दाभाडे जिल्हा संघटक मंदाकिनी चव्हाण व जिल्हा सचिव शीला सोनेकर मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी रेल्वे संबंधी विविध मागण्या

सुद्धा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम दाणे पाटील माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख तालुकाध्यक्ष रामेश्वर धारकर रेल्वेचे उच्च अधिकारी उपस्थित होते

यावल आगारातील रात्रीची भुसावळ बससेवा सुरू करावी व पुणे रातराणीच्या बस सेवेच्या वेळेत बदल करावी : शिवसेना उबाठा व प्रवाशी संघटनेची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल आगारातुन रात्री १०.३oवाजे नंतर भुसावळ आणी यावल ते पुणे जाणारी रातराणी प्रवाशांना जाण्यासाठी एसटी बस नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने नागरीकांच्या समस्याचे निराकरण व्हावे यासाठी शिवसेना (उबाठा ) आणी तालुका प्रवाशी संघटनेच्या वतीने आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांना तक्रार निवेदन देण्यात आले आहे .

या संदर्भात यावल शहर शिवसेना ( उबाठा ) आणि तालुका प्रवाशी संघटनेच्या वतीने यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की ,

आपल्या यावल एसटी आगारातुन प्रतिदिन यावल ते भुसावळ जाण्यासाठी रात्री ९ .३oवाजे नंतर भुसावळ बससेवा नसल्याने व ही बस चुकल्यास प्रवाशांना भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्याने या ठीकाणाहुन पुढील रेल्वेच्या प्रवाशाघेवुन अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान रात्री १o ,३० वाजे नंतर बाहेरून विविध रेल्वेने प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री यावल कडे येण्यासाठी देखील बससेवा नसल्याने रात्री भुसावळच्या बस स्थानकावर प्रवाशांसाठी धोकादायक असलेल्या बसस्थानकावर थांबावे लागते .

त्याच बरोबर यावलच्या बस स्थानकावरून रात्रीच्या प्रवाशांसाठी सुटणारी यावल पुणे एसटी सायंकाळी सुटणारी ४ वाजेची रातराणी बससेवाच्या सुरू असुन ही बस शिवाजीनगर बसस्थानकावर रात्री २ .३०ते ३ वाजेच्या सुमारास पहोचणाऱ्या प्रवाशांना उपनगरातील बसस्थानकावर रात्रीच्या वेळेस स्थानीक शहर बस सेवा उपल्बध नसते

अशा वेळेस प्रवाशांना बसस्थानकावर २ते ३ तास ताटकळत बसावे लागते किंवा अव्वा की सव्वा भाडे देवुन आपला प्रवास करावा लागतो अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा प्रवाशी सकाळच्या सुमारास पहोचतील याकरीता पुणे रातराणी बससेवेच्या वेळेत दुपारच्या ४ वाजेच्या वेळेत बदल करून सायंकाळी ६ वाजेची करावी अशी मागणी

यावल शहर शिवसेना ( उबाठा ) व प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्यासह शिवसेना ( उबाठा ) चे संतोष धोबी , शिवसेना तालुका उपप्रमुख व कृउबाचे संचालक सुनिल बारी , शरद कोळी , पप्पू जोशी , आदीवासी शिवसेनेचे हुसैन तडवी , डॉ. विवेक अडकमोल ,सागर देवांग , प्रकाश धोबी , योगेश चौधरी , ईलीयास खान, विजय पंडित , भरत राजपुत , विभागप्रमुख प्रविण लोणारी यांच्यासह

किनगाव गावातुन ११ वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तिने काहीतरी कारणासाठी फुस लावुन पळविले पोलीस गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील अकरा वर्षाच्या मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तिने पळवुन नेल्याची घटना घडली असुन , या घटनेमुळे परिसरातील पाल्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे . मुलाच्या आईने फिर्याद दिल्याने पोलीसात त्या अज्ञात व्याक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, नुर मोहम्मद साबीर खान , वय ११ वर्ष११ महीने राहणार गौशिया नगर किनगाव तालुका यावल या मुलास दिनांक १७ जुन रोजी दुपारी ४,३oवाजेच्या सुमारास राहत्या घरातुन कुणीतरी अज्ञात व्यक्तिने काहीतरी अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले आहे .

दरम्यान १५ जुन पासुन सर्वत्र शाळा सुरू झाल्या असुन , शाळेत जाण्यासाठी मुलांची वर्दळ असते अशा वेळेस या मुलास अज्ञात व्यक्तिने पळवुन नेल्याची घटना घडल्यामुळे परिसरात विद्यार्थी पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेते विषयी एकच भिती व चिंता व्यक्त करण्यात येत आहे .

या घटने बाबत नुर मोहम्मद खान या मुलाची आई सईदाबी साबीर खान वय३३ वर्ष या यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ति विरूद्ध फिर्याद दाखल केल्याने भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे

विदर्भाची प्रति पंढरी शेगाव ते देशाची पंढरी पंढरपूर अशी सरळ रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी याकरिता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत आपण लवकरच भेट घेणार असलेल्या ची माहिती .खासदार प्रतापराव जाधव

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

. शेगावखासदार प्रतापराव जाधवयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्राम भवन सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी त्यांनी परळी ते अकोला पर्यंत धावणारी पॅसेंजर शेगाव पर्यंत वाढविण्याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचेही बोलताना सांगितले

खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळी वैजनाथ ते अकोला ही ट्रेन अकोला येथे चार तास उभी राहते त्यामुळे ती ट्रेन शेगाव पर्यंत वाढविण्याकरिता आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती

जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे विश्राम भवन या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी पत्रकार परिषदेला आमदार व माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख शांताराम दाणे पाटील उपजिल्हाप्रमुख राजीव पाटील मिरगे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर धारकर शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते

होन्डाई शोरुम येथे जबरीने लुटमार करणारे आरोपीतांना जिल्हा बुलढाणा, वर्धा येथून अटक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची कार्यवाही

0

 

प्रमोद जुमडे, वर्धा

दिनांक 12/06/2023 रोजी रात्री फिर्यादी नामे- श्री. देविदास अजाबराव टोनपे, वय 58 वर्ष, रा. आदर्श कॉलनी, साटोडा, वर्धा हे होन्डाई शोरुम बायपासरोड, वर्धा येथे सेक्युरीटीगार्ड म्हणुन नाईट ड्युटीवर असतांना अज्ञात तिन आरोपीतांनी संगनमत करुन फिर्यादीचे ताब्यातील होन्डाई शोरुम मध्ये प्रवेश करुन 1 ) रेनॉल्ड कंम्पनीची डस्टर कार क्रमांक एमएच 49 बी 8200

किंमत2,60,000/- रु. 2 ) वेगवेगळया कंम्पनीचे कारच्या तिन चाव्या किंमत 7,000/- रु. 3) एक मोटोरोला कम्पनीचा मोबाईल किंमत 3,000/- रु असा एकुण जु. किंमत 2,70,000/- रु चा जबरदस्तीने हिस्कावुन जिवे मारण्याची धमकी देवुन चोरी करुन नेला अशा फिर्यादीच तॉडी रिपोर्टवरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे समांतर तपास करुन गुन्हयाचे घटनास्थळावरील सिसिटीव्ही फुटेजचे आधारे गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन सदर आरोपीतांचा तांत्रीक माहीतीचे आधारे शोध घेवून आरोपी नामे- 1) विश्वजित विठ्ठलसिंग सिसादे, वय 23 वर्ष, रा. बोरजवाळता. खामगाव जिल्हा बुलढाणा यास खामगाव जिल्हा बुलढाणा येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता

त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार आरोपी नामे- 2) इमदात उर्फ मोनूतलीम खान पठाण, वय 23 वर्ष, रा. जुनीवस्ती म्हसाळा सेवाग्राम, वर्धा, 3) शेख अयानतर्फे राजा शेख जमालुद्दीन, वय 19 वर्ष, रा. नविन वस्ती कारला लॉनजवळ म्हसाळा, वर्धा, 4) मंगेश ठाकरे, रा. मंगरुळ (दस्तगीर), जिल्हा अमरावती यांचे सह मिळुन केल्याचे सांगीतल्याने आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना ताब्यात घेवुन

आरोपीतांच ‘ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेली 1) रेनॉल्ड कंम्पनीची डस्टर कार क्रमांक एमएच 49 बी 8200 किंमत 2,60,000/-रु. 2) एक होन्डाई कम्पनीचे कारची चाबी किंमत 3,000 /- रु. 3) गुन्हयात वापरलेल आरोपीतांचे तिन अॅन्ड्राईड मोबाईल किंमत 30,000 /- रु असा एकूण जु. किंमत 2,93,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करुन नमुद आरोपीतांना अटक करुन सदरचा गुन्हा उघडकिस आनला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा आबुराव सोनवाने, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी अमोल लगड, पोलीस अमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, नितीन ईटकरे प्रदिपवाद दिनेश बोक अनुप कावळे सर्वनेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सेवाग्राम चंद्रशेखर चकाटे यांचे मार्गदर्शनात पोउपनी संतोष चव्हाण पोलीस स्टेशन सेवाग्राम करीत आहे.

भुसावळ रेल्वे डिव्हिजन चे मंडळ प्रबंधक केडिया यांनी आज शेगाव रेल्वे स्टेशन परिसराची पहाणी केली

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज 17 जून रोजी डी आर एम केडिया यांचे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत गीतांजली एक्सप्रेसने दुपारी सव्वा तीन वाजता शेगाव रेल्वे स्टेशनवर आगमन झाले

यावेळी शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे व ट्रॅफिक यांच्यात पीएम पुंडकर यांनी त्यांचे सर्वप्रथम स्वागत केले या भेटीदरम्यान डी आर एम के डी आय यांनी शेगाव रेल्वे स्टेशन येथील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली

तसेच स्वच्छता व इतर बाबी ची प्रशंशा केली यावेळी शेगाव रेल्वे स्टेशनचे आरपीएफ चे ठाणेदार रणवीर सिंग पीएसआय डॉक्टर विजय साळवे श्रीवास्तव साहेब लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार मगर शेगाव रेल्वे स्टेशनचे आरोग्य निरीक्षक इन्चार्ज अनिल गुप्ता सर यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेगाव शहर पोलिसांद्वारे दारूबंदी संबंधाने झाडाझडतीमध्ये दोन गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यात आली.

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक 17 जून 2023 रोजी सकाळी 08/30 वा. सुमारास शेगाव शहर पोलिसांनी आठवडी बाजारात दारूबंदी कायदा अंतर्गत छापा कार्यवाही करून

आरोपी वासुदेव महादेव तायडे वय 30 वर्षे राहणार चिंचोली यास जागीच पकडून त्याच्याकडून देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या 50 नग शिशा प्रत्येकी किमती 50 रुपये प्रमाणे एकूण 3050/- रू चा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक 1092 सुसर हे करीत आहे.

तसेच सकाळी 9:30 वा सुमारास आरोपी वासुदेव नागोजी फुसे वय 59 वर्षे राहणार शितलनाथ महाराज मंदिराजवळ शेगाव यांच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा कारवाई केली असता

त्यांचे जवळून 80 नग देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या सीलबंद बॉटल वायरच्या थैलीसह असा एकूण 4700 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून

दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका 742 गजानन वाघमारे हे करीत आहे.

श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात कार्यशाची सांगता

0

 

पातुर प्रतिनिधी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात
तीन दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यपीठांतर्गत विद्यार्थि कल्याण विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला अंधारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय सॉफ्ट स्किल्स कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

समारोप सोहळ्यात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री नारायण भाऊ अंधारे हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थित रूबिक्योन स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड पुणे. चे प्रशिक्षक म्हणून कु कोमल नागरे छत्रपती संभाजीनगर येथून व अमेय गर्गवा इंदोर येथील दोन प्रशिक्षक, तसेच अनता अंधारे, प्राचार्य डॉ. राम खरडे , रा. से. यो कार्यक्रम अधिकारी शैलेश दवणे हे उपस्थित होते.

या वेळी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी धनश्री बुळबुले, सुमित खंदारे, संचित काळपांडे, गायत्री डहाके, नचिकेत देशपांडे, श्रद्धा मुंढे, संकेत कदम, अश्विनी पांडव,नेहा अंबुसकर, गौरव गावंडे, सहील ननावरे, नारायणी चौढरी, यांनी आपली तीन दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन झाले त्याचे बदल आपले मनोगत व्यक्त केले.

या समारोह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी धोटे हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. सागर भगत यांनी केले.या कार्यक्रमाला आयोजन करण्यात साठी विद्यार्थि कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे, कृषि महाविद्यालय चे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्णाभाऊ अंधारे, विद्यापीठ कार्यकारणी सदस्य सौ.हेमलताताई अंधारे, प्राचार्य डॉ राम खरडे यांच्या मार्गद्शनाखाली करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि प्रा. शैलेश दवणे, प्रा सागर भगत, प्रा पांडुरंग जाधव, प्रा शिवकुमार राठोड, प्रा रोहित कानोजे, प्रा संजय गायकवाड, प्रा भाग्यश्री राऊत, प्रा सोनल खवने. प्रा आरती पंचभुधे, सौरभ वर्मा, पंकज देशमुख ओम जाधव, राधेश्याम दाखोर यांनी मेहनत घेतली.

शेगाव पोलिसांनी वृद्ध महिलेस हरविलेले सोन्याचे मंगलसूत्र सोने ची पोत 2 तोले 1,20,000 रूचि परत मिळवून दिले 

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

काल दि, 14,06,23 रोजी शिवनेरी चौक शेगाव मध्ये राहणाऱ्या सौ, रमा बजरंगलाल शर्मा वय 56 रा शिवनेरी चौक शेगाव यांच्ये 2 तोले सोन्याचे मंगलसूत्र 2 तोले वजनाचे कीमत 1,20,000 रूपयांचे नगदी 4000 रुपये असा 1,24,000 रूपयांची पर्स काल हरविली होती त्या तकरारिवरुणं शेगाव शहर पोलिसानी CCTV केमेराचे साहयाने

तांत्रिक पध्दतीने शोध घेवून सदर हरर्वीलेल्या मंगलसूत्राचा शोध घेवून सदर महिलेस त्यांच्ये मंगल सूत्र, नगदी रक्कम असा 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल शोध घेवून 24 तासाच्या आत परत मिळवून दिल्याने, सदर महिलेच्या डोळ्यात आनंददायी अश्रू तरळले त्याबद्दल तिने शेगाव पोलीस श्री प्रकाश गवांन्दे ठाणेदार विलास पाटील यांचे आभार मानले , आपले किमती वडिलोपार्जित सौभाग्याचे लेणे तिच्या हातात परत सुखरूप मिळालेवर तयांचा चेहर्यावरील आंनदाश्रू

*पोलिसांबद्दल कृतज्ञा व्यक्त करून गेले धन्यवाद शेगाव पोलीस**