Home Blog Page 198

बंद असलेले आयसीयू व रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी व प्रस्तावित मेडिकल कॉलेजच्या मागणीच्या पूर्तता करण्याबाबत गजू कुबडे करणार सद्बुद्धी आंदोलन !

0

 

हिंगणघाट प्रमोद जुमडे

येथील उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेले आयसीयू तसेच रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या व प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगणघाटला देण्यात यावे या मागणीसंदर्भात शासनाला सद्बुद्धी मिळावी म्हणून रुग्णमित्र गजू कुबडे हे दि 19 जूनला येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक दिवसाचे सद्बुद्धी आंदोलन करणार आहे.

याबाबत त्यांनी एका निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाट शहरात आरोग्याच्या असलेल्या अपुऱ्या वैद्यकीय सोयी सवलती मुळे असंख्य गोरगरीब,गरजू रुग्णांना नाईलाजाने वर्धा,सेवाग्राम,सावगी किंवा नागपूर येथे जावे लागत आहे.मागील ७० वर्षांपासून हेच सुरू आहे.

आता सद्यस्थितीत हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 बेडसचे मोडुयलर आय सी यु चे उदघाटन झाले. परंतु उदघाटन झाल्यापासून सदर आयसीयू बंद अवस्थेत पडून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या साठी आवश्यक असलेला स्टॉप या ठिकाणी नाही त्यामुळं सदर केंद्र बंद असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.

या मॉड्युलर आय सी यु साठी एक तज्ञ डॉकटर नसल्याने हे आयसीयू केवळ शोभेची वस्तू ठरलेली आहे.त्यामुळेच या आय. सी. यु. चे उदघाटन झाले त्याच दिवशी तज्ञ डॉक्टरच्या अभावी या रूमला कुलूप लागले ते आजतागायत तसेच आहे.
याची जबाबदारी कोणाची ?

उदघाटन करणाऱ्यांनी या साठी आधी तज्ञ डॉकटरची नियुक्ती केल्यानंतर या केंद्राचे उदघाटन करावयास पाहिजे होते की नाही ? हा त्यांचा सवाल आहे.

सोनोग्राफी मशीन साठी 45 डिग्री तळपत्या उन्हात केलेल्या आंदोलनाचे यश म्हणून गर्भवती महिलांची सोनोग्राफी आठवड्यातून तीन दिवस करण्याचे पत्र मला वैद्यकीय अधिकारी यांनी दिले.व त्यानुसार रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ मीनाक्षी वावरे ह्या आठवड्यातून तीन दिवस गर्भवती महिलांची सोनोग्राफी करीत आहेत व लवकरच सोनोग्राफी तज्ञ डॉकटरची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मला लेखी कळविले होते.

या आंदोलनाची दखल घेत सहसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांनी सोनोग्राफी तज्ञ डॉ रेवतकर यांची नियुक्ती केली व तसे पत्र मला आंदोलनाच्याच दिवशी दिले.
आज त्या बातमीला दीड महिन्याचा काळ लोटून राहिला पण डॉ रेवतकर मात्र अजून पर्यंत येथील उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेले नाहीत.

या दप्तरदिरंगाई पणा मुळे गोरगरीब जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय महाराष्ट्र शासनाने वर्धा जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची घोषणा केलेली आहे.साकल्याने विचार केल्यास हिंगणघाट मतदार संघात हे मेडिकल कॉलेज होणे गरजेचे आहे.त्यामुळे आपण जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून या बाबत पुढाकार घेऊन शासनाकडे याबाबत पत्रव्यवहार करून सदर कॉलेज या भागात आणावे या विविध मागणी साठी गजू कुबडे स्वतः प्रशासनाला *सद्बुद्धी मिळो हे आंदोलन* करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

येत्या सोमवार दि.१९ जूनला महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ एक दिवसाचे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात एका छत्रीखाली *सद्बुद्धी आंदोलन* करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवेदन देते वेळी सुरज कुबडे,अजयभाऊ लढी,मुन्ना ठाकूर,सतीश गलांडे,आकाश तळवेकर,रोशन बरबटकर,मारोतिभाऊ महाकाळकर,सागर आत्राम,रितेश गुडढे, मयूर पुसदेकर

जिल्हा स्तरीय शैक्षणिक कार्यबल बैठक ही जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मदतगार ठरणार.-डॉ विनित मत्ते यांचे प्रतिपादन.

0

 

गडचिरोली- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने G20 शैक्षणिक कार्यबल जिल्हा स्तरीय पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर एक दिवसीय परिसंवाद कार्यशाळा दिनांक 15/06/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि निपुण भारत अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जी २० अनुषंगाने मुलांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हा स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेत फुलोरा उपक्रम आणि गडचिरोली जिल्ह्यातील राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमाची चर्चा करण्यात आली. निवडक सादरीकरण घेण्यात आले. बालके ही राष्ट्राची संपत्ती आहेत त्यांना योग्य शैक्षणिक गुणवत्ता प्रदान करून जतन करणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण हा देशाचा पाया आहे त्यामुळे तो भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते, उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विवेक नाकाडे, डॉ. दिलीप बारसागडे, अधिव्याख्याता मिलिंद अघोर, वैशाली येगोलपवार आदी मान्यवर उपस्थित होते.

G20 Summit चे महत्व, उद्देश, कार्य याबाबत समाजामध्ये व्यापक प्रमाणात वैचारिक जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने जनचळवळीच्या माध्यमातून राज्य स्तर ते शाळास्तर, गावपातळीवर वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजन व अंमलबजावणी करिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख, उपक्रम शिक्षक,अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते. या कार्यशाळेला गट साधन केंद्र आरमोरी,गडचिरोली, एकात्मिक बालविकास प्रकल्प गडचिरोली,प्रथम एज्युकेशन फाउंडेशन,सिखे फाउंडेशन, संपर्क फाउंडेशन,गट साधन केंद्र चामोर्शी,पालवी प्रोजेक्ट धानोरा आदीकडुन विविध शैक्षणिक उपक्रमाच्या साहित्याचे प्रदर्शनाचे स्टाल लावण्यात आले होते.

जिल्हा स्तरीय कार्यबल बैठक दरम्यान अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार,मिलींद अघोर,गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे,केंद्र प्रमुख राजेश वडपल्लीवार,डॉ विजयकुमार रामटेके,गुरुराज मेंढे,खुर्शीद शेख,देवेंद्र लांजेवार,विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते आदी तज्ञ मार्गदर्शकांनी विविध शैक्षणिक उपक्रमावर सुलभनासह कार्याचे सादरीकरण केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक वैशाली येगोलपवार यांनी केले तर सुत्रसंचलन जिल्हा समुपदेशक प्रभाकर साखरे,आभार प्रदर्शन जिल्हा फुलोरा समन्वयक कुणाल कोवे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तपन सरकार, सुनील उंदिरवाडे,अंकीत जोशी,किरण काळबांदे व सर्व विषय साधनव्यक्ती व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अग्रेशन चौक परिसरातील नक्षत्र ज्वेलर्सच्या सराफा व्यवसायीका च्या सतर्कते मुळे शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी सोने चांदी विक्रेत्यांना गंडवणारा गुन्हेगाराला केले गजाआड 

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

दिनांक 13/06/2023 रोजी रात्री 09/00 वा. सुमारास आरोपी विठ्ठल भालचंद्र सानप वय 52 वर्ष राहणार प्लॉट नंबर 72 राजीव गांधी नगर सिडको छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद याने शेगांव येथील नक्षत्र ज्वेलर्स शेगावचे सराफा व्यवसाका कडून सोन्याचे पेंडल खरेदी केले व गहूमनी खरेदी करायचे आहे असे म्हणाला. त्यानंतर सोन्याचे 46 गहू मनीचे वजन घ्यायचे आहे

असे सराफा व्यावसायिकाला म्हणाला, मोड म्हणून आपल्या जवळील काही दागिने त्यांना दिली परंतु सदर दागिने नकली असल्याचे सराफा व्यावसायिकाचे लक्षात आल्यामुळे त्यांना सदर व्यक्ती बद्दल संशय आला नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक निलेश गणोरकर यांनी याबाबत शेगांव शहर पोलिसांना माहिती दिली.

सदर माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासह जाऊन त्यांनी आरोपीला पकडून त्याचेंजवळून नगदी 88,080/- रु. व काही पांढऱ्या व पिवळ्या धातूचे वस्तू दागिने व बनावट चांदी चे दागींने ईतर साहित्य जप्त करून ताब्यात घेतले

याबाबत सराफा व्यावसायिक निलेश शांताराम गणोरकर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून अपराध क्र. 328 /23 कलम 420,511 भा.द.वी. चा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पो. उप. नि. आशिष गंद्रे करीत आहे.

या आरोपी ची छत्रपती संभाजी नगर बीड व जालना यथे गुन्हेगारी पूर्वपार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली असून त्याला पकडल्याने सराफा व्यवसायिकांचे फसवणुकीचे बरेच गुन्ह्याची उकल होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे.

निर्मला तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे मॅडमच्या हस्ते आदर्श समाज रत्न पुरस्कार प्रदान

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव :राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय समाजसेविका राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या प्रदेश पदाधिकारी सावित्रीबाई फुले नारी रत्न पुरस्कार प्राप्त सौ.निर्मला गणेश तायडे यांनी केलेल्या विविध सामाजिक व सेवा कार्याची दखल घेऊन आधार सोशल फौंडेशन मार्फत राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार,2008 च्या मिस इंडिया असणाऱ्या शुभांगी शिब्रे मॅडम च्या हस्ते बेळगाव (कर्नाटक) येथे सौ निर्मला गणेश तायडे यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन

त्यांचा गौरव करण्यात आला त्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे गरीब गरजू कुटुंबांना मदत करणे पूरग्रस्थांना सुधा एक मदतीचा हात दिला, माता रमाई जयंती निमित्ताने धून भांडी करणाऱ्या महिलांना साडी चोळी वाटप केले,प्रत्येक महिला दिनाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या, महिलांचा शाल, श्रीफळ पु्स्पगुच्छ देऊन मातृ शक्तीचा सन्मान केला

महिलांच्या समस्या जाणून होईल ती मदत करण्याचा एक सामाजिक प्रयत्न सर निर्मलाताई तायडे या सतत करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सौ निर्मला गणेश तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन कर्नाटक महाराष्ट्रातील सीमा भागात असलेल्या बेळगाव येथे आज आयोजित कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आले

विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने प्रा. डॉ. शरद विहीरकर यांच्या सत्कार

0

 

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट

हिंगणघाट प्रमोद जुमडे: विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने रघुनाथ शेंडे यांच्या नेतृत्वात प्रा.डॉ. रमेश पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनटक्के यांचे नियोजनामध्ये 6 जून ते 11 जून या कालावधीत संवाद यात्रा नागपूर वरून निघाली विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा ,यवतमाळ अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून संवाद साधत शेवटी नागपूर येथील नेहरू महाविद्यालय सक्कदरा चौक करण्यात आला

समारोपीय कार्यक्रमाला रघुनाथ शेंडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. श्रीरामजी कावळे प्र – कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. प्राचार्य सुनील साखरे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ.सतीश चाफले महामंत्री शिक्षक मंच ,नागपूर तसेच प्रा. डॉ.नामदेव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. शरद विहीरकर यांचा सत्कार करण्यात आला

हिंगणघाट परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभाग घेणारे प्रा. डॉ शरद विहीरकर हे रा. सू. बिडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, हिंगणघाट येथे इंग्रजी विभागामध्ये कार्यरत असून आयक्युएसी समन्वयक आहे यांचे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणावर निवड झाल्याबद्दल यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

याप्रसंगी नागपूर विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आणि समाज बांधव उपस्थित होते .

यावल चोपडा मार्गावर एसटी बस व मोटरसायकलचा भिषण अपघात एक जण ठार तर तिन जण गंभीर जख्मी

0

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर महामार्गावर यावल शहरा पासून अवघ्या दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मरण पावला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे .

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , आज दिनांक १२ जुन रोजी दुपारी ३ते ३,३eवाजेच्या सुमारास बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल साकळी दरम्यानच्या यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ यावलहुन चाळीसगाव जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच १४ बिटी२१४४या वाहनचालक राजेन्द्र सोनवणे

यावल आगाराची बसचा आणी मोटरसायकल एम पी ०९क्युटी ३९३९या वाहनांचा भिषण अपघात होवुन यात दयाराम बारेला वय २o वर्ष राहणार जामुनझीरा तालुका यावल हा जण ठार तर मांगीलाल कोशा बारेला वय२८ वर्ष, सुनिता मांगीलाल बारेला वय २५ वर्ष, आणी चिंकी बारेला वय३ वर्ष सर्व शिरवेल ( मध्य प्रदेश ) तिन जण जखमी झाल्याचे वृत आहे .

दरम्यान जख्मींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रग्णालयात पाठविण्यात आले आहे

शेगाव पोलीस स्टेशन समोर वाहन तपासणी करीत असताना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये वीस इंच लांबीची दोन इंच रुंदीची धारदार तलवार मिळाल्याने एकच खळबळ

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र तसेच विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव शहरात आज बारा जून रोजी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील व विवेक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी सहा वाजे दरम्यान पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी दरम्यान पांढरा रंगाची शिफ्ट कार क्रमांक टी एस 17 जे 44 58 या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये सागर गंगोडा व्यासाली व वीस वर्षे राहणार मंडळ झुकल मोहम्मद खंडेबलूर निजामाबाद आंध्र प्रदेश व शंकर गोंडा लक्ष्मण गोंडा बासलवर व 19 वर्षे राहणार सेक्टर 110 नगरबोध मार्केट लांद्रन मोहली पंजाब या दोघांना संचायावरून ताब्यात घेतली

व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून एक तलवार स्टीलची 20 इंच लांबीची व दोन इंच रुंदी ची धारदार पाहत असलेली स्टीलची तलवार किंमत दोन हजार रुपये एक लाकडी दांडा 32 इंची लांबी साडेचार इंच गोलाई अर्धा लिटर पेट्रोल बॉटल विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार रुपये विवो वाय 75 कंपनीचा मोबाईल किंमत 22 हजार रुपये नोकिया कंपनीचा मोबाईल किंमत हजार रुपये व बनावट पांढरा मुंबई या स्विफ्ट डिझायर कार किंमत आठ लाख रुपये असा एकूण आठ लाख 50 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

याप्रकरणी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी आर्म एक्ट कलम चार ऑब्लिक 25 135 मुंबई पोलीस कायद्यान्वये 41( 4) crpc प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शेगाव शहरात एकच खडबड निर्माण झाली आहे

कारवाई शुन्य नगर पालीकेच्या विरोधात पुन्हा जनआक्रोश

0

 

नागरीकांनी दिला जिल्हाधिकारीना निवेदनातुन आमरन उपोषणाचा इशारा

सिंदी रेल्वे ता.१२ : नेहमीप्रमाणे स्थानिक नगर पालिका प्रशासणाला अतिक्रमणाबाबत अनेक लेखी तक्रारारी करुन सुध्दा कारवाई शुन्य नगर पालीका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश पेटला असुन प्रभाक क्रमांक ७ मधील वार्ड क्रमांक १३ येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन शुक्रवारी (ता.१६) पासुन नगर पालिका कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचाच इशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की,घरटॅक्स सक्तीने वसुल करणार्‍या नगरपालीका प्रशासणाने नुकतीच अव्वाच्यासव्वा घरटॅक्स वाढीची नोटीस सर्व सिंदीवासीयांना बजावली मात्र कोणत्याही टॅक्सधारक नागरीकानी अतिक्रमणाबाबत किवा दोन शेजारी घरामधील जागेवरुन उध्दभवलेल्या वादावर कवडीची कारवाई सिंदी नगरपालिका प्रशासन करीत नाही परिणामता शहर अतिक्रमणाने बजबज झाले आहे गल्लीबोळातुन दुचाकी जाने कठीन झाले आहे. याबाबत संपुुर्ण सिंदीवासीयांत पालिका प्रशासना विरुद्ध रोष पहायला मिळतो.

शहरातील प्रभाक क्रमांक ७ वार्ड क्रमांक १३ मधील रहिवासी प्रभाकर लारोकार यांच्या नविन घराचे बांधकाम सुरू आहे त्यांनी आपल्या घराचा जीना/ पायर्‍या सार्वजनिक आमरस्त्यावर बांधल्यांने परिसरातील नागरिकांना जाने-येने करतांना अडचन होते. या अतिक्रमणाबाबत नगर पालिका प्रशासणाला मोहल्ल्यातील नागरीकानी तीनदा लेखी तक्रार केली. पालिका प्रशासनाने दोनदा प्रत्यक्षात मोक्का पाहनी केली आणि श्री लारोकार यांनी अतिक्रमण केल्याचे मान्य केले मात्र कारवाई शुन्य नगरपालिकेने अद्याप हे अतिक्रमण पाडुन मोकळे केले नाही.

पालिका प्रशासन केवळ अतिक्रमणाच्याच मुद्दावर कोणाच्या दबावात काम करते हेच कळत नाही.
शेवटी वैतागुन परिसरातील रहीवाश्यांनी खुशाल उर्फ पिन्टु इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना हि समस्या बुधवारी (ता.१५) पर्यंत निकाली काढली तर ठिक अन्यथा शुक्रवारी (ता.१६) पासुन नगर पालिका कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचाच इशारा दिला आहे.

कारवाई शुन्य नगर पालीका प्रशासनाच्या विरोधात अनियमित होणार्‍या पाणी पुरवठा बाबत काॅग्रेसने नुकताच जनआक्रोश मोर्चा काढुन रोष व्यक्त केल्याच्या बातमीची शाई वाळते न वाळते तर वार्ड क्रमांक १३ मधील नागरीकांनी अतिक्रमणाच्या समस्येवर आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने पालिका प्रशासना विरुद्ध आक्रोश पाहाला मििळतो आहे

विहिगाव -खेट्री येथील दोन दुचाकींची समोरासमोर धडक?

0

 

▪️विहीगाव- अटाळी रस्त्यावरील अपघात घटना
▪️एक जागीच ठार दुसरा गंभीर जखमी

राहेर:-पातुर तालुक्यातील खेट्री येथील दुचाकी विहीगाव अटाळी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना खामगांव तालुक्यातील विहीगाव येथे रविवार दि. 11 जून रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली.

यात विजय शेगावकर वय 58 वर्ष रा.विहीगाव ता.खामगाव असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.खेट्री येथील अमोल एकनाथ लांडे वय 35 हे गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

खेट्री येथील योगेश महादेव ताले व अमोल एकनाथ लांडे हे दोघेजण दुचाकीवर खामगांव कडे जात होते तर खामगांव तालुक्यातील विहीगाव येथील दुचाकीस्वार खामगांव हून विहिगाव कडे जात असताना दरम्यान दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात विहीगाव येथील विजय शेगावकर हे जागीच ठार झाले.

अमोल एकनाथ लांडे हे गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी अकोला हलविले आहे.प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे

सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांच्या प्रयत्नाने हिंगणघाट शहरातील ३१ अंगणवाडी पोहोचले विद्युत मीटर

0

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट

मास्टर कॉलनी(यशवंत नगर),रामनगर वॉर्ड व दत्त मंदिर वार्ड सह हिंगणघाट शहराच्या अशा एकूण ३१ अंगणवाडीला महावितरणाकडून विद्युत मीटर लावण्याचे काम सुरु

सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश

हिंगणघाट शहरातील अंगणवाडीला महावितरणाचे वीज मीटर मिळावे व अंगणवाडीतील वीज समस्या दूर व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांच्या मार्गदर्शनात महावितरणाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याकडे अंगणवाडी मधील विद्युत मीटरची समस्या मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते.

हिंगणघाट शहरातील प्रत्येक अंगणवाडी मध्ये,लहान मुलानंचे आहार,लसीकरण,किशोरवीण मुलींची सभा,महिन्याची आरोग्य तपासणी,पोलियो डोज असे विविध उपक्रम राबविल्या जातात यात ३ ते ५ वयोगटातील असे ३० ते ४० लहान मुलं रोज शिक्षण घेतात परंतु ३१ अंगणवाडीमध्ये

आतापर्यंत विद्युत मीटर लावण्यात आलेले नव्हते विद्युत प्रवाह व विद्युत मीटर नसल्यामुळे उन्हाळ्याची ऊन लक्षात घेता अंगणवाडी सेविकेला व लहान मुलांना बरेच वर्षा पासुन त्रासाला सामोरे जावे लागतं होते.

परंतु स्थानिकांनी सामाजिक कार्यकरते विकी वाघमारे यांच्या सामाजिक क्षेत्रावर विश्वास ठेवून अंगणवाडी मध्ये विद्युत मीटर नाही या संदर्भात सांगितले हेचं गांभीर्य लक्षात घेत महावितरणाला कसून पाठपुरावा केला,हिंगणघाट शहरातील अंगणवाडीत विद्युत प्रवाह नाही व मीटर नाही,विद्युत प्रवाह संपूर्ण हिंगणघाट शहरारातील अंगणवाडीला मिळावे यासाठी विकी वाघमारे यांनी गांभीर्य लक्षात घेत कामाला दुजोरा दिला व महावितरण विभागाचा अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून पाठपुरावा करीत मागणी केली

अखेर सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले या मध्ये मास्टर कॉलनी(यशवंत नगर),रामनगर वॉर्ड व दत्त मंदिर वार्ड सह हिंगणघाट शहराच्या अशा एकूण ३१ अंगणवाडीला महावितरणाकडून विद्युत मीटर
लावण्याचे काम सुरु केले आहे.

 

प्रतिक्रिया:-

नागरिकांनी माझ्या सामाजिक क्षेत्रावर विश्वास ठेवला तोच विश्वास ठेवत मि अंगणवाडी मध्ये विद्युत वीज मीटर लागावे,अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम राबविल्या जातात विद्युत मीटर नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व लहान मुलांना पुष्कळसा त्रास सहन करावा लागतं होता आता हा त्रास समोर होणार नाही हेच डोळ्यासमोर ठेवून अंगणवाडी मध्ये विद्युत विज मीटर लावण्यात यावे हाच प्रयत्न सातत्याने करीत होतो,महावितरणाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने माज्या उपस्थितीत मीटर लावल्यात आले याचा आनंद आहे

:सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे