Home Blog Page 199

मेडिकल कॉलेज की मांग के लिए काले गुब्बारे हाथ मे लेकर धरने आंदोलन महिला ओ का आंदोलन मे बडी संख्या मे सहभाग.

0

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट:

वर्धा जिले के लिए राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर में होने के लिए शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती द्वारा संघर्ष सुरू है।
डा बाबासाहेब आंबेडकर चौक में आयोजित धरने आंदोलन का कल चौदावा दिन था।

इसके लिए पहले संघर्ष समिती द्वारा बड़ा लॉंग मार्च निकाल कर बाजार पेठ बंद रखी गई थी l उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस की भेट लेकर चर्चा की गई और ज्ञापन दिया गया था l लेकिन शासन द्वारा अब तक इसकी कोई दखल नहीं ली गई।

इस पर शहर के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतले के पास धरना आंदोलन सुरू किया गया, जिसका कल चौदावा दिन था। जिसमे अब महिलांओ ने भी बड़ी संख्या में सहभाग लिया तथा अनोखे अंदाज मे सरकार का ध्यान आकर्षित किया।

शासकीय वैधकीय महाविद्यालय महिला कृति समिती ने सरकार का ध्यान आकर्षित करने काले
गुब्बारे हाथ मे लेकर धरणे दिए। जिसमे प्रमुखता से शासकीय महाविद्यालय कृती समिती की तरफ से सीमा मेश्राम, वंदना भगत, लक्ष्मी वानखेडे, वंदना थूल, राजश्री बांबोळे, सोनू बाभुलकर, शीतल तिवारी (औषधी केंद्र संचालक) की उपस्थिति थी। इस आंदोलन मे अब महिलाओ का बढता प्रतिसाद मिलता दिखाई दे रहा है।

महीलाओ के आंदोलन को देख के सभी वर्गो के लोगो को प्रेरणा मिली ।
रुपेश लाजुरकर, दिलीप पुनासे, गौरव डफ,अरविंद संगोले, सुरेंद्र बोरकर, श्याम इडपवार और साथियों के सामूहिक नेतृत्व में शुरू धरने आंदोलन को अब बढ़ता प्रतिसाद मिल रहा है।

विकासकामातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

 

अर्जुन कराळे शेगाव

बुलडाणा, दि. ११ : केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना यामधून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, आकाश फुंडकर, राजेश एकडे, प्रकाश भारसाकडे व चैनसुख संचेती उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या भागाचे भविष्य उज्वल असते. ज्यांच्याकडे पाणीसाठा नाही, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. यातून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र 50 टक्क्याहून अधिक वाढविण्यात येणार आहे त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खारपाणपट्ट्यात 900 प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ठिकाणावरील खारेपाणी गोड्या पाण्याखाली आणण्यात येणार आहे.

हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच खारपाणपट्ट्यात झिंगा उत्पादनाला वाव असल्याने यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल. खारपाणपट्ट्यात असलेल्या खडकपूर्णा धरणामध्ये झिंगा उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पाण्याचा अभाव, कापूस उत्पादन आणि अधिक खर्चात असलेली शेती ही कारणे असल्याने याबाबतही उपाययोजना गरजेच्या आहे. शेतकऱ्यांना समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणी, रोजगार, शाळा, स्वच्छता, मालाला भाव, मैदान, हॉस्पिटल अशा सुविधा निर्माण झाल्यास समृद्ध जीवन जगतील. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यासोबत वाहत्या पाण्याला थांबविणे आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे, रस्ते विकासाचे जाळे विणण्यास मदत करतात. जालना आणि सिंधी येथील ड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची निर्यात करणे शक्य झाले आहे. जनतेच्या पैशातून विकासकामे करण्यात येतात. ही विकासकामे चांगल्या दर्जाचीच व्हावीत. निकृष्ट दर्जाची कामे ही जनतेशी बेइमानी करणारे आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील कामांमध्ये अनेक वेळा व्यत्यय आला. मात्र ही कामे तीन भागात पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. याकामांबद्दल लोकप्रतिनिधींचा समाधानकारक अभिप्राय ही कामे चांगली झाली असल्याची पावती आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. गडकरी यांनी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या मलकापूर-बुलडाणा रस्ता विकासासाठी १२०० कोटी, बाळापूर -शेगाव रस्त्यासाठी ३५० कोटी, शेगाव-संग्रामपूर रस्त्यासाठी ३०० , संग्रामपूर ते सीमेपर्यंत रस्त्यासाठी 385 कोटी रुपये या नवीन विकासकामांची घोषणा यावेळी केली.

भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते आलापल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन

0

 

सी सी रोड आणि भव्य समाज मंदिराचे होणार बांधकाम

आलापल्ली:-स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागात माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

आलापल्ली ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ विविध प्रभागात विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करण्यात आली असून या ठिकाणी विकासात्मक कामे केली जाणार आहे.

प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 मध्ये समाज मंदिर आणि सी सी रोड, प्रभाग क्रमांक 2 मध्ये सी सी रोड आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये समाज मंदिर बांधकाम केले जाणार आहे.या कामासाठी तब्बल 35 लाखांची निधी उपलब्ध झाली असून भूमीपूजनानंतर विकासात्मक कामांना सुरुवात देखील झाले आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार,ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोने,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार,लक्ष्मण येर्रावार,पराग पांढरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी पास, वितरण कार्यालय बंद” असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी..

0

 

वरवट बकाल येथील पास वितरण कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याची गरज.

संग्रामपूर तालुक्यातील असलेले मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथील दिनांक 26 एप्रिल 2023 पासून जळगाव जामोद अंतर्गत येणारे पास वितरण कार्यालय’ सलगपणे बंद” आहे
सदर ठिकाण हे महत्त्वाचे असून वरवट बकाल गावाला अंदाजे 70 ते 80 गाव जोडलेले असून सदर ठिकाणी महाविद्यालय व कॉलेज आणि प्राथमिक शाळा सुद्धा असून पासेस काढन्या साठी येणाऱ्या विध्यार्थी संख्या ही हजारोंच्या घरात आहे.

वरवट बकाल येथून एकलारा,बावनबीर,टूनकी,सोनाळा पातुर्डा, वानखेड, खीरोळा, मनारडी, काथरगाव, काटेल कोलद, काकण वाडा, शेगाव व जळगाव व संग्रामपूर करिता विद्यार्थी ये जा करतात
सदर पास वितरण कार्यालय बंद असल्यामुळे विध्यार्थी यांना जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत असून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे.

सदर कार्यालय त्वरीत सुरू करण्यात यावे अशी विध्यार्थी व पालकांची मागणी आहे
अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबधित अधिकारी जबाबदार राहतील
विध्यार्थी यांच्या होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक त्रास यास महामंडळ चे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

 

विशेष आगर प्रमुख जळगाव जामोद यांना मागील 10 /4/ 2023 रोजी प्राचार्य अंकिता कम्प्युटर टायपिंग रजिस्टर नंबर 62 127 वरवट बकाल जळगाव जामोद आगर यांना निवेदन दिले होते असिस्टंट निवेदन मध्ये नमूद होती की वरवट बकाल येथील पाच विभाग चालू ठेवणे बाबत या मध्यस्थी ठिकाणचे पास ऑफिस विभाग बंद ठेवले

तर विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झाल्यास किंवा शिक्षण पासून वंचित राहिल्यास त्याला आपण जबाबदार असाल आणि अंकिता कम्प्युटर टायपिंग ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या 150 ते 200 पर्यंत आहे वरवट बकालीतील पास काढण्याचे ऑफिस बंद असल्यामुळे विद्यार्थी आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असून वरवट बकाल येथील एसटी पास विभाग चालू ठेवावे ही नम्र विनंती सुद्धा मागील 10 4 2023 ला केली होती परंतु याच्यावर कोणतीच लक्ष न देता जळगाव जामोद आगार चे संबंधित अधिकारी यांनी लवकरात लवकर वरवट बकाल चौकामधील एसटी पास ऑफिस चालू करण्यात यावे

 

 

मासिक पास योजना
सदर योजने अंतर्गत २० दिवसांचे परतीचे प्रवासभाडे आकारणी करुन एक महिना ३० दिवसांचे कालावधीचा परतीचा पास देण्यात येतो़ या योजनेच्या अंटी,शर्तीया त्रैमासिक पास योजनेप्रमाणेच अंसुन या योजनेअंतर्गत प्रवाशांना सुमारे ३३. ३३% प्रवास भाडे सवलतीचा लाभ होतो़ सदर योजने अंतर्गत पास प्राप्त करण्याची पध्दतीसुध्दा त्रैमासिक पास योजने प्रमाणेच आहे़ तथापि,या योजनेअंतर्गत पास धारकांस ज्या सेवेचा पास अंसेल त्या सेवेद्वारे प्रवास अंनुज्ञेय आहे़*

धुळेपाडा आदीवासी वस्तीवर पिण्याचे पाणी मिळावे यासाठी निळे निशाण सामाजिक संघटनेचे यावल येथे आंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्ती पाडयातील नागरीकांची गेल्या अनेक वर्षापासुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन शासनाने मंजुर केलेले जल जिवन मिशन या योजनेअंतर्गत काम अडकले

ग्रामपंचायतीच्या शिवार वादात आदीवासी बांधवांना पाणी मिळावे यासाठी निळे निशाण सामाजीक संघटनाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली यावल पंचायत समितीत चार तास ठीय्या आंदोलन अधिकाऱ्यांच्या लिखीत पत्रानंतर आंदोलन स्थगित.

यावल तालुक्यातील पंचायत समिती कार्यक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या सुमारे ४०० लोकवस्तीचे गाव असुन , या ठीकाणी ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी

लागत असुन, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशाने जल जिवन मिशन अंतर्गत तालुक्यातील आदीवासी वस्तींसाठी हर घर जल या योजनेस मंजुरी दिली होती . सुमारे २५ लक्ष रुपये खर्चाच्या योजनेच्या कुपनलीकेच्या कामास काही दिवसापुर्वी सुरूवात झाली होती मात्र सांगवी ग्रामपंचायत आणी बोरखेडा ग्रामपंचायतच्या शिवार वादामुळे सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम थांबविण्यात आल्याने

संत्पत झालेल्या आदीवासी ग्रामस्थानी निळे निशाण सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , तालुका अध्यक्ष विलास तायडे , नंदाताई बाविस्कर , महीला मंचच्या तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे , युवक चे तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल ,

अनिल इंधाटे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेकडो आदीवासी बांधव यांनी यावल पंचायत समितीत आपल्या मागणीसाठी ठीख्या आंदोलन केले .

यावेळी निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाउस्कर यांनी पंचायत समितीच्या कारभाराबद्दल व ग्रामस्थांच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांची उदासीनता पाहुन नाराजी व्यक्त केली , यावेळी आंदोलनकर्त्यांशी सहाय्यक . गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, ग्रामीण पाणीपुरवठाचे सुरवाडे , अभियंता पी बी देसले यांच्या मध्यस्थीवे तात्काळ तात्रींक अडचणी दुर करून काम सुरू करण्यात येइल असे लिखित आश्वासन् मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

खामगाव येथून जलंंब करिता पहाटे सुटणाऱ्या रेल्वेची वेळ बदला- माधुरी शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष रेल्वे महिला प्रवासी संघटना

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: खामगाव रेल्वे स्टेशन येथून पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी जलंब साठी सुटणारी रेल्वे गाडीची वेळ बदलण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने केली आहे याबाबत भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे प्रबंधक डीआरएम यांना रेल्वे स्टेशन उप प्रबंधक संतोष अनासने यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे

की पहाटेची वर्धा येथून भुसावळ कडे जाणारी पॅसेंजर ट्रेन ही जलंंब रेल्वे स्टेशन वर पहाटे पाच वाजता पोहोचते तर दुसरीकडे खामगाव येथून जलंब साठी गाडी क्रमांक 51102 ही तीन डब्याची असलेली ट्रेन पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी सोडण्यात येते ही ट्रेन जलंब स्टेशन येथे 5: 05 मिनिटांनी पोहोचते ही ट्रेन पोहोचे पर्यंत वर्धा भुसावळ ही पॅसेंजर गाडी जलंब रेल्वे स्टेशन येथून निघून गेलेली असते

त्यामुळे पहाटे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो किंवा जलंब येथे वर्धा भुसावळ पॅसेंजर गाडी पकडण्यासाठी खाजगी वाहनातून मानसिक शारीरिक त्रास सहन करून जलंंब येथे पोहोचावे लागते. रेल्वे प्रशासनाने खामगाव येथून गाडी संख्या 51102 या गाडीच्या वेळेमध्ये बदल करून या तीन डब्याची गाडी पहाटे 4:50 च्या ऐवजी चार वाजून वीस मिनिटांनी म्हणजेच अर्ध्या तास अगोदर खामगाव येथून जलंब साठी सोडण्यात यावी

जेणेकरून पहाटे पाच वाजताची जलंब येथे येणारी वर्धा भुसावळ पॅसेंजर ही गाडी पकडण्यासाठी खामगाव येथून जलंब साठी जाणारे प्रवाशांना मिळू शकेल व त्याद्वारे रेल्वे विभागालाही या तीन डब्याच्या रेल्वेद्वारे महसूल प्राप्त होईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या माध्यमातून डीआरएम भुसावळ रेल्वे मंडळ यांना स्टेशन उपप्रबंधक संतोष अनासने यांच्या मार्फत पाठविण्यात आले

या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष लीनाताई पाचबोले, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय संघटक रूपाली वानखडे, विभागीय सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष किरण ताई लंगोटे, मंगलाताई सपकाळ, जयश्रीताई देशमुख, आदींच्या सह्या आहेत

खामगाव नांदुरा रोडवर अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्या व विकत घेणाऱ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापा मारून पकडले.

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

खामगाव नांदुराम मार्गावर पोलीस उप अधिकारी यांच्या पथकाने छापा मारून अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्या दोघांना अटक केलीयावेळी मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल ट्रकसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

खामगाव शहरालगत सायंकाळी सजनपुरी परिसरातील – सजनपुरी भागात महामार्गावर महामार्गावर एका ठिकाणी अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती उपविभागी पोलिस अधिकारी यांना मिळाली गुप्त व खात्रीशीर मिळालेल्या या

माहितीवरून पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या पथकासह उपरोक्त ठिकाणी छापा मारून बायोडिझेलची विक्री करणाऱ्या व विकत घेणाऱ्यां अशा दोघांना विनोद ठाकरे व त्यांच्या पथकातील पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पुरवठा विभागाचे ही अधिकारी उपस्थित होते पोलिसांनी रशीद खान लियाकत खान (४०) रा. कॉलनी शेख करीम शेख लुकमान

बागवान (२७) रा. चिखली या दोघांना तब्येत घेतले यावेळी आरोपी हा ट्रक क्र. एमएच ३० काल एबी-३८३३ मध्ये अवैधपणे

बायोडिझेल भरत होता.

यावेळी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळून २००० लिटर बायोडिझेल, एक टाटा वाहन, टाक्या मशीन, पाईप जनरेटर, ट्रक असा एकुण २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुरवठा विभाग बायोडिझेल तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली

शाहिरांच्या विररस, स्फूर्ती गितांनी शिवप्रेमी श्रोते मंत्रमुग्ध.शिवराज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात साजरा.

0

 

प्रहार जनशक्ती पक्ष व लोकजागर मंचचा उपक्रम.

अर्जुन कराळे शेगाव

अकोट शहराचे आराध्य दैवत श्री संत नरसिंग महाराज मंदिर प्रांगणात सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या लोकजागर मंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलदादा गावंडे यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त विररसाने ओतप्रोत भरलेला पोवाडा

व स्फूर्ती गीतांचा ऐतिहासिक “महाराष्ट्राचा शाहिरी बाणा” या कार्यक्रमाचे आयोजन दि ६ जून रोजी करण्यात आले होते.

यावेळी सर्वप्रथम सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, हारार्पण व दिप प्रज्वलन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिलदादा गावंडे तथा प्रहार पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकजागर मंचचे पदाधिकारी, ह.भ.प शिवदास महाराज गाडेकर, कॅप्टन सुनिल डोबाळे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी झी युवा फेम विजेता युवा शाहिर विक्रांतसिंह राजपूत तथा सज्जनसिंह राजपूत यांनी काळजाला भिडणाऱ्या, लढवय्य कर्तृत्व मांडणाऱ्या आपल्या स्फुर्ती गीतांनी, पोवाडा गायनाने व विररस कथनाने या ऐतिहासिक कार्यक्रमातून शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

त्यांनी राजमाता जिजाऊ, छ्त्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, उदारता, दानशूरता, युद्ध निती, युद्धकला, धाडसी वृत्ती बाणेदारपणा इत्यादी गुण आपल्या स्फुर्तिगीतांतून मांडून श्रोत्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण केले. या कार्यक्रमाला नागरिकांनी व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला.

याप्रसंगी अनिल दादा गावंडे यांच्या हस्ते शाहीर विक्रांतसिंह राजपूत,शाहीर सज्जनसिंह राजपूत, यांचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तर अकोट राजपूत क्षत्रिय समाज, अकोली जहांगीर येथील राजपूत कुमावत समाज यांच्यावतीने सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकाश गायकी यांनी तर आभार गजानन बोरोकार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे व लोकजागर मंचचे मनीष भांबुरकर, राजासाहेब गावंडे, गजानन बोरोकार अनंतराव सपकाळ, आकाश बरेठीया, योगेश जायले, अर्जुन गाळखे,सागर उकडे , गोलू भगत ,अचल बेलसरे ,सचिन काळे, देवा कायवाटे, प्रतिक रोहणेकर , परीक्षित देशमुख, अविनाश बघेले ,श्याम फाळके ,अक्षय गावंडे , गोपाल जळमकर, आशिष उकळकर, दिलीप पिवाल, प्रफुल दबडघाव , सागर गळसकार,अंकीत शेळके,विनोद सगणे, गुरुदेव इसमोरे , तथा लोकजागर मंचचे सर्व पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

अनिलदादा सारख्या लोकांची आज समाजाला गरज आहे..- शाहीर विक्रांत सिंह राजपूत.

लोकजागर मंचच्या वतीने सतत शेतकरी मार्गदर्शक, युवकांना रोजगारनिर्मिती संदर्भात, समाज प्रबोधनाचे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे काम अनिलदादा गावंडे करत आहेत त्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून विनोद बाळे, कॅपटन सुनिल डोबाळे,गजानन जायले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शाहीर विक्रांत सिंह यांनी नेता असावा तर अनिल दादा गावंडे यांच्या सारखा असावा, आज समाजाला अशा लोकांची गरज आहे, “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा…” याप्रमाणे अनिल दादा यांचे कार्य अविरत सुरू आहे. असे भावनिक उदगार त्यांनी काढले.

शेगाव येथील रेल्वे स्टेशन वर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना तर्फे शेगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक तीन येथे ओडिसा येथील बालासोर मध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

0

 

इस्माईल शेख शेगाशेर प्रतिनिधी

शेगाव रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना पदाधिकारी व महिला सदस्यासह शेगाव रेल्वे स्टेशन येथील रेल्वे विभागातील अधिकारी आरपीएफ चे पोलीस निरीक्षक ठाणेदार यांच्याकडून याप्रसंगी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून वृत्तकांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम

आज पाच जून रोजी घेण्यात आला यावेळी शेगाव रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे रेल्वे स्टेशन ट्राफिक इन्चार्ज पी एम पुंडकर साहेब आर पी एफ चे पोलीस निरीक्षक ठाणेदार रणवीर सिंग राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे,च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष लीना पाचबोले मॅडम राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या संघटक रुपाली वानखडे अकोला जिल्हा अध्यक्ष सौ लीना ताई पाच बोले, सौ. मंदाकिनी चव्हाण विभागीय सरचिटणीस सौ ज्योती बावस्कर, अकोला जिल्हा सचिव फुला ताई राठोड, बुलढाणा जिल्हाध्यक्ष किरण लंगोटे, राष्ट्रीय रेल्वे महिला

प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा सरचिटणीस स्नेहलता दाभाडे मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय संघटक सौ लीनाताई भारंबे पाटील, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना जिल्हा सचिव व शीला सोनेकर मॅडम राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रणिता धामंदे मॅडम यांच्यासह शेगाव रेल्वे स्टेशनचे हेल्थ इन्चार्ज अनिल कुमार गुप्ता शेगाव रेल्वे स्टेशनचे रेल्वे कर्मचारी भिकाभाऊ बनकर यांच्यासह मोठ्या संख्येने रेल्वे अधिकारी कर्मचारी व राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला पत्रकार बांधव उपस्थित होते

नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना दणका

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूकदारांना नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचा दणका

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आज सोमवार दि.५ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सकाळी भुसावळहुन यावल येथील यावल तहसील कार्यालयात आपल्या तहसील पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी येत असताना अंजाळे गावाजवळ अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये तसेच संपूर्ण महसूल यंत्रणे मध्ये मोठी खळबळ उडाली.

प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना त्या म्हणाल्या की भर दिवसा अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याचे कारवाई करण्यात आली यापुढे सुद्धा अवैध गौण खनिज व अवैध व चुकीची कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे यावल तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारताना तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी सांगितले.