Home Blog Page 201

दहीगावमध्ये महापुरुष डॉ .बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना तणावपूर्ण शांतता पोलीसांचा तगडा बंदोबस्त

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असुन , गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिक उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचत शांततेचे आव्हान केले आहे दरम्यान गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे राकेश मानगावकर ,पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत

तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेवाजेचे सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली.

रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले.

या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर गंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचे सह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. ,

दरम्यान महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. दहिगाव गावात विटंबनानंतर तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळ पासून बंद करण्यात आली आहे .

यावल पंचायत समिती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

0

 

यावल ( प्रतिनिधी विकी वानखेडे

किशोर सी. सपकाळे सहा गटविकास अधिकारी, सर्वर तडवी सहा प्रशासन अधिकारी, ज्ञानेश्वर निळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, गजानन रिंधे कनिष्ठ प्रशासन अधिकारी

, डॉ ढाके पशुसंवर्धन सुपरवाझर, गोकुळ सोनवणे विस्तार अधिकारी कृषि, लतेश नेमाडे कनिष्ठ सहा, विश्वनाथ धनके गटशिक्षण अधिकारी,रुबाब तडवी ग्रामसेवक, दिनेश पाटील स्थापत्य अभि सहा, रुबाब तडवी वाहन चालक, शरद बारी शिपाई,

मिलिंद कुरकुरे घरकुल प्रोग्रामर, राहुल बाऊस्कर शिपाई, चेतन चौधरी तालुका व्यवस्थापक ASSK जावेद तडवी डेटा ऑपरेटर,फतू तडवी शिपाई

विविध शासकीय कर्मचारी उपस्थित होते

घाटपुरी येथे आयोजित श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्तआयोजित कार्यक्रमांमध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन –

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

खामगाव येथील घाटपुरी येथे असलेल्या कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या मंदिरावर संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन

कुंभार समाज कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. घाटपुरी येथे संत शिरोमणी श्री गोरोबाकाका मंदिर येथे मंगळवार 18 एप्रिल रोजी संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.

यानिमित्त 18 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता वडगाव डिघी येथील ह भ प श्री वसंता महाराज कापडे यांच्या मधूर वाणीमध्ये काल्याचे किर्तन होणार असून इतरही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत .

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कुंभार समाज सामाजिक संस्था बुलढाणा जिल्हा अध्यक्ष एडवोकेट राजीव मंगळवेढे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र कुमार टाके, जिल्हा सचिव रामेश्वर कापडे, खामगाव तालुकाध्यक्ष विनोद लाऊडकार, खामगाव तालुका उपाध्यक्ष हरिदास बावस्कार, तालुका कृषी अध्यक्ष अंबादास थोटे कुंभार समाज सामाजिक संस्था महिला आघाडीच्या महाराष्ट्रप्रदेश सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सौ.शकुंतलाताई जैताळकर, बुलढाणा जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ किरण ताई हरिभाऊ लंगोटे खामगाव तालुकाध्यक्ष मंगलाताई रामभाऊ हिवरकर खामगाव तालुका उपाध्यक्ष कौशल्यताई लाहुडकार, खामगाव तालुका सचिव सो नर्मदा संतोष इंगळे महिला आघाडी खामगाव शहराध्यक्ष सौ प्रतिभाताई उज्वल लाऊडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर समिती घाटपुरी खामगाव, खामगाव शहर व तालुका कुंभार समाज याचप्रमाणे कुंभार समाज महिला आघाडी आणि पुरुष आघाडी चे पदाधिकारी समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

 

18 एप्रिल रोजी आयोजित कुंभार समाजाचे आराध्य संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाची एकता प्रदर्शित करावी असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्था बुलढाणा जिल्हाध्यक्ष एडवोकेट राजीव मंगळवेढे, जिल्हा सचिव रामेश्वर कापडे महिला आघाडीच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षा सौ.किरणताई हरिभाऊ लंगोटे यांनी केले आहे

भारतीय संविधान वाचविण्यासाठी लढा द्या हिच महामानवांना खरी मानवंदना ठरेल- संगितराव भोंगळ

0

 

विश्वरत्न भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी सकल धर्मासाठी प्रेरणा दिली.आज महामानवांची जयंती आहे मात्र, या प्राश्वभुमीवर डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगिकारत भारतीय संविधान वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतीय संविधान वाचविण्यासाठी लढा द्या हिच महामानवांना खरी मानवंदना ठरेल अशी प्रतिक्रिया बुलढाणा जि.प.चे माजी उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांनी दिली.

आज भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अनुषंगाने सामाजिक सेवा संकल्पनेतुन धम्मक्रांती नवयुवक मंडळ जस्तगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराचे उध्दघाटक म्हणून बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते संगितराव भोंगळ [राजु पाटिल] यांनी उपरोक्त विचार मांडले उध्दघाटक म्हणुन बोलतांना ते म्हणाले की, भारतरन्त डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीय नागरिकांला न्याय दिला.

उपेक्षित घटकांना शैक्षणिक प्रवाहात आणले महिलांना सन्मान दिला. माणसाला ‘माणुस’ म्हणुन जगण्याचा अधिकार दिला. त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. महामानवांना डोक्यावर नको तर डोक्यात घेण्याची गरज आहे. डाॕ.बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला जिवंत ठेवले आज त्यांना त्यांच्या विचारांचा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संविधान वाचविण्याच्या चळवळीत सर्वांनी ऐकत्र यायला हवे. ही महामानवांना खरी मानवंदना ठरेल असे विचार संगितराव भोंगळ यांनी मांडले.
या आरोग्य शिबीराला डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन व पुष्पाहार अर्पण संगितराव भोंगळ यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी डाॕ.विलास चौधरी,डाॕ.नेताजी बोडके,डाॕ.अतुल नायसे,डाॕ.डि.व्ही तायडे,डाॕ.संजय शेगोकार,डाॕ.विजय दुतोंडे,डाॕ.पवन चव्हाण,डाॕ.शुभम मंडवाले,डाॕ.अतुल वानखडे आदी आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांनी शिबीरात सेवा दिली.

प्रमुख उपस्थिती विश्वासराव डोसे,शालिग्राम वानखडे,ज्ञानेश्वर पुंडे, भीमराव भिलंगे, कपिल डोसे(प्र सरपंच),अंबादास गौलखडे,संतोष डोसे, समाधान वानखडे, नांगोराव पाटील, हरिभाऊ पुंडे, पंजाबराव वानखडे, धनराज ससाने,पप्पु पठाण,समाधान वानखडे,प्रभाकर झांबरे,प्रतीक्षाताई डोसे,राहुल वानखडे जगन गवांदे, प्रकाश तायडे,सुभाष अंदुरकर,रामधन साबे,भगवान वानखडे,शामराव वानखडे,गजानन चोपडे,मिलिंद गवांदे,संतोष वाकोडे,धम्मदीप गव्हांदे,भूषण राव वानखडे,आशिष वानखडे,भीमराव वानखडे,शत्रुघ्न वानखडे,रतन सोनोने, संतोष दाभाडे,संतोष चांदणे,पुंडलिक डोसे, आम्रपाल भिलंगे, कैलास पुंडे,विशाल वानखडे जितेंद्र वानखडे,राष्ट्रपाल वानखडे,नागोराव आटे,उत्तम हातेकर, निलेश पाटील व गावकरी मंडळी उपस्थित होते.

या आरोग्य तपासणी शिबिरात सर्व गावकरी मंडळी ज्येष्ठ मंडळी व गावालगतच्या गावातील लोकांनी या आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरात उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी केली.

पत्रकार नवनाथ खिलारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

0

 

पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराने नवनाथ खिलारे सन्मानीत

पंढरपूर प्रतिनिधी: नवभारत वृत्तपत्र समूहाचे दैनिक नवराष्ट्रचे पंढरपुर प्रतिनिधी पत्रकार श्री नवनाथ खिलारे यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिवतिर्थावर ७ एप्रिल रोजी हा सन्मान सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक श्री चंदुलाल बियाणी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुंबई प्रदेशअध्यक्ष श्री वसंत मुंडे उपस्थित होते.संपूर्ण राज्यभरातील अनेक प्रख्यात पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथील पत्रमहर्षी स्व. मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

यात पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार श्री नवनाथ खिलारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी ६ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी पत्रकार नवनाथ खिलारे यांना प्रदान करण्यात आला आहे.

पत्रकार नवनाथ खिलारे यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शब्दगौरव केला आहे. समाजातील घटकांना समाज कार्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्या समाज कार्याला विशेष बळकटी देणारा पत्रकारीतेचा एक नवीन प्रघात त्यांनी समोर आणला आहे.

त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दैनिक मराठवाडा साथी यांच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

पत्रकार नवनाथ खिलारे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बाबासाहेबांचे विचार आणि भारतीय संविधानच देशाला तारू शकतो–चांगदेव सोरते यांचे प्रतिपादन.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

आमगाव:-आज दिनांक १४ एप्रिल रोजी विश्वरत्न, महामानव,कायदेपंडित,इतिहासकार,बोधिसत्त्व,महाकारूनीक,ज्ञानाचा महासागर,अर्थतज्ज्ञ,पुस्तकप्रेमी,शोषितांचे उद्धारक, कायदेपंडित,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंतीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मंडळ आमगाव यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाविका देवतळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव जयश्री खोब्रागडे,सरपंच ज्योत्स्ना गव्हारे,उपसरपंच विनोद शेंगर, सदस्य भाऊराव देवतळे,निर्मला वासेकर,वंदना बैस,वैशाली आदे,डॉ गिरीधर मेश्राम नाचनगाव व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. तर मुख्य मार्गदर्शक विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते हे होते.
दरम्यान मुख्य मार्गदर्शक चांगदेव सोरते यांनी विश्वरत्न महामानव बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर,कर्तृत्वावर, संघर्षावर,महान त्यागावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

बोलतांना चांगदेव सोरते म्हणाले की,डाॅ बाबासाहेबांचे आपल्या देशातील प्रत्येक सजीव नागरिकांवर खूप मोठे उपकार आहेत ते फेडणे या जन्मात शक्य पण नाही.बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालले तरी पण प्रत्येकाचे जीवन यशस्वी,समृद्ध,उन्नत आणि सुखी होण्यासाठी शंभर टक्के मदतगार ठरते.

बाबासाहेब हे जगात एकमेव व्यक्तीमत्व आहेत की त्यांना सर्वचजण बाबासाहेब संबोधतात.दोन वर्षे,अकरा महिने आणि अठरा दिवस कठोर परिश्रम करून या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिला आहे,निस्वार्थाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमानेच येते,आज संविधान बदलविण्यासंदर्भात आपण ऐकतो आहे.परंतू असा साधा विचार करणाऱ्यांना हे सुद्धा माहिती आहे काय?की आकाशाची उंची मोजायला कुठलेही टेप आहे काय? समुद्राच्या पाण्याची पातळी मोजायला कुठलेही मॅप आहे काय?आणि या देशाचे दुसरे संविधान लिहायला यांच्याकडे दुसरा बाप आहे काय?

देश आजही वेगवेगळ्या गुलामगिरीत असल्याचे चित्रण पहायला मिळते आहे,देश चालविणारे हात,विचार आणि समृद्धता परिपक्व असणे गरजेचे आहे….!

प्रसंगी देवळीचे डॉ गिरीधर मेश्राम,भाविका देवतळे व इतर मान्यवर मंडळी यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खोब्रागडे यांनी केले तर आभार राहुल वाळके यांनी यांनी व्यक्त केले.

यशस्वीसाठी संदीप खोब्रागडे व बौद्ध उपासक- उपासिका आणि विशेष सहकार्य केले
प्रसंगी परिसरातील बहुसंख्य बौद्ध उपासक,उपासिका,कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवक, महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. DR Babasaheb Ambedkar

अकोला(पुर्व) मतदार संघातील सुमारे २६ कोटी रुपयांचा रस्ते व पुल विकास कामांचा आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते भुमिपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न…..

0

 

अकोला प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे

ग्राम स्वराज्य ग्रामीण विकासाचा झाल्याशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.

असून महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेला मार्ग ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना सरकार कटिबद्ध असून जिल्ह्यात खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण अर्थव्यवस्था सह अविकसित भागाचा विकास करण्यासाठी भाजपा लोकप्रतिनिधी सक्रिय असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाशिवाय ख-या अर्थाने ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक विकास साधला जाणार नाही हे सूत्र सतत लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विकास कामांवर लक्ष केंद्रित करीत अकोला पूर्व मतदारसंघातील रस्ते विकास कामांच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती दिली आहे , .

केंद्रीय राज्य मंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आज सुमारे २६ कोटी रुपये किंमतीच्या ८ कामांचे भुमिपुजन व लोकार्पण आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले,

. दहीहंडा गावापासून सुरुवात करीत दिनोडा येथील पुलाच्या भुमिपुजन कार्यक्रमाने सांगता केली, )किनखेड-दहिहांडा-दर्यापूर (जिल्हा सिमेपर्यंत) रा.मा. २७८ वरील कि.मी. ७७/७०० ते ७८/९०० (गनोरी-दहिहांडा ते जिल्हा सिमापर्यंत) ता. अकोट जि. अकोला..

.३.९० कोटी रु.) कालवाडी वरूर जउळका कावसा रेल-धारेल प्रजिमा ५ वरील कि.मी. १०/०० ते २१/६०० रस्त्याची सुधारणा व द्वीवार्षिक देखभाल करणे ता. अकोट जि. अकोला. . १.७७ कोटी )कालवाडी वरूर जऊळका- कावसा रेल-धारेलप्रजिमा ५ रस्त्यावरील कि.मी. २०/६०० वर रेल गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे ता. अकोट जि. अकोला • १.२१ कोटी रू. ) कुटासा कावसा-तरोडा प्रजिमा व रस्त्यावरील कि.मी. ०/०० ते २/२००७ (कुटासा ते अकोट अकोला महामार्ग) रस्त्याची सुधारणा करणे. ता. अकोट जि. अकोला.. ..६.२१ कोटी रू. तसेच) सावरा-कवठा-पुडा-बांबर्डा-कुटासा दहिहांडा प्रजिमा ४ रस्त्यावरील कि.मी. २६/४०० वर बांबर्डा गावांजवळ न पुलाचे बांधकाम करणे ता. अकोट जि. अकोला…. १.४८ कोटी रु व) सावरा-कवठा पुंडा-बांबर्डा-कुटासा दहिहांडा प्रजिमा ४ रस्त्यावरील कि.मी. २०/०० ते २५/०० (कवठा ते बांबर्डा ता. अकोट जि. अकोला.. २.५० कोटी रु तसेच) कालवाडी वरूर जऊळका-कावसा-रेल धारेल प्रजिमा ५ रस्ता वरील कि.मी. ३/३०० ते १३/०० (खापरवाडी ते दिनोडा) रस्त्याची सुधारणा करणे ता. अकोट जि. अकोला.. ..६.२६ कोटी रू. व) कालवाडी वरूर जउळका- कावसा- रेल-धारेल प्रजिमा ५ वरील कि.मी. ११/४०० वर दिनोडा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे

ता. अकोट जि. अकोला….. २.६६ कोटी रू कामांचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यावेळी नागरिकासह अधिकाऱ्यांनी दक्षपणे राहून रस्ते चांगले होणार दळणवळण सोय चांगली रहावी याकडे लक्ष द्यावे अशीही आमदार सावरकर म्हणाले.

भर उन्हात नागरिक सक्रिय आमदार रणवीर भाऊ सावरकर यांच्या स्वागतासाठी व विकास कामाचा पाठिंबा देण्यासाठी फाट्यावर उपस्थित राहून वाजत गाजत मिरवणुकीत कार्यक्रमस्थळी मातृ शक्ती हस्तेओवाळणी पूजन सृष्टी द्वारे स्वागत केले

कार्यक्रमाला राजुभाऊ नागमते, गणेश पोटे ,गोविंद गोयंका, संतोष मोहोरकर ,दिनेश पांडे दिनेश डहाके आशिष मगर दिलीप मिश्रा अशोक पळसपगार सरपंच पळसपगार ताई
विनोद मंगळे दादाराव पेठे गोपाल पेठे सरपंच रेल किशोर घुले संतोष शिवरकर दत्तू पाटील गावंडे पवन वर्मा श्रीकांत गाडेकर मंगेश घुले कालेखन पठाण, कावसा सतीश सावरकर मोहन सावरकर अनुप साबळे अंकुर गावंङे,विवेकभाऊ भरणे, मंगेश घुले,अमोल धुमाळे,रमेश धुमाळे,अंकुश सागोरकर, अक्षय ढोरे,मोहन कपले, मोहन घुगरे,अमोल मेहेसरे,अय्याज अली, डॉ सलीम,डॉ चाकोटे, पवन वर्मा,माधव बकाल,स्वप्नील बुटे कावसा, संतोष सागोरकर,ज्ञानू आळे, दत्ताभाऊ गावंडे,विजुभाऊ सोळंके,सुभाष मुकुंदे,गजानन नळे, किशोर बुले,शुभम ढोरे,महादेव धमके,राहुल लिंगोट,हर्षल कोल्हे,बाबुसिंग सोळंके,शेहजा द अली,समिुल्ला खा,कालेखा ,कालू मेम्बर,मंगेश ताडे, वर्षा वानखडे,कोमल पेठे मा. जी.प.सदस्या,माधुरी धमके,शारदा सागोरकर,संगीता लोणे, हरिओम लोणे,राजेश रावणकर, मंगेश भोंडे,श्रीकृष्ण उमाळे,विष्णूभाऊ

नरोकर,शालिकराम तेलंग,सुरेश इंगळे,गजानन काटकर, प्रकाश पुणकर,अनिल बेलूरकर, मंगल पेठे, रुपेश कोल्हे,रवी जाधव,रवी धमके,इबादुल्ला खा,रमेश कांदलकर, दादासाहेब खोटरे, प्रविण डीक्कर, प्रविण हगवणे, वैभव माहोरे, गोपाल मोहोड, गजानन नळे, अशोक गावंडे, राजेश रावणकर, नामदेव कुलट, शिवाजी सपकाळ, विठ्ठल वाकोडे, वामनराव बानेरकर, मनोहर चाकोते, लोणकरजी, डागा, सुरेश शेळके, ज्ञानेश्वर आढे, विशाल कुलट तथा समस्त गावातील सरपंच ,उपसरपंच, ग्राम प सदस्य व पंचक्रोशीतील गावातील नागरिक उपस्थित होते,

उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर यांच्या विशेष पथकाची वरली जुगारावर धाड

0

 

प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे

दिनांक 8 एप्रिल रोजी पोस्टे पातूर हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज जी साहेब बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश महाजन , पोहेका सय्यद शारीक सय्यद रउफ, सुधाकर करवते, उज्वला इटिवाले/ बगेवार, गजानन शिंदे, विठ्ठल उकर्डे, कबीर खान यांनी.

पातूर येथील विजय टॉकीज जवळ टीन पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या वरली जुगारावर धाड टाकून ७ आरोपी आरोपी ताब्यात घेतले. त्यामध्ये आरोपी ,पंजाब अवचार, रमेश गायकवाड, मोहम्मद शरीफ मोहम्मद शकील. भास्कर माहूलीकर,मो शरिक मो. सिकंदर, संतोष कांबळे,राजेश राठोड या ७ आरोपींना ताब्यात घेतले.

यांच्याकडून जुगार साहित्य एक मोसा व नगदी रुपय असा एकूण 96320 रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.

यातील एक आरोपी मो. रुस्तम जमादार हा पसार झाला या सर्वांना पोलीस स्टेशन पातुर येथे आणून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4,5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धा जिल्हयात अधिक बळकट करण्यासाठी अतूल वांदिलेंना पवारांचे कानमंत्र…..

0

 

अतुल वांदीलेंना नागपूर येथे बोलावून घेत झाली संघटनात्मक चर्चा…..

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याशी सखोल चर्चा केली. नागपूर येथील रेडीसन ब्ल्यू हॉटेल येथे शरद पवार आले असता ही संघटनात्मक चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील ताकतवर व्यक्तींचां पक्षात प्रवेश केला जाणार आहे. राज्याचे सरकार हे अस्थिर असून केव्हाही निवडणुकांना पुढे जावे लागू शकते, यासाठी म्हणून पक्षाची तयारी ही त्या दृष्टिकोनातून करण्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.

अतुल वांदिले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होऊन एक वर्ष झाले .या वर्षभरामध्ये सात हजारांच्या वर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणण्याचे अतुल वंदिले यांनी केलेल्या कामाचे शरद पवार यांनी कौतुक केले.

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखिल उपस्थीत होते.तर या भेटीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री व वर्धा जिल्हा संपर्क अध्यक्ष सुबोध मोहिते यांनी वर्धा जिल्हात पक्ष बळकट करण्यादरम्यान आलेल्या अनेक आव्हानांन बद्दल देखिल शरद पवारांना अवगत करून दीले.

यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओ. बी. सी. सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे , पवन तिजारे, दशरथ ठाकरे,अमोल बोरकर, रोशन तेलंगे, प्रशांत लोणकर आदी उपस्थित होते.

यावलला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थित विविध शासकिय योजना आढावा बैठक व आदीवासी महीला बचत गट भोजनालयाचे उद्धाटन

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथील तहसील कार्यालयास गुरुवारी भेट देऊन तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचा आढावा घेतला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग नगरपालिका, पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस प्रशासन विभागाचे सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत अडी अडचणी संदर्भात विचारण्यात आल्या जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावल पोलीस स्टेशनला भेट देवुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबणा नंतर अट्रावल गावाच्या सद्य परिस्थिती व दंगलीची सविस्तर माहीती जाणुन घेतली,

बैठकीस उपविभागीय अधिकारी कैलास कडलग उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे उपस्थित होते

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजित निंबाळकर, वनविभागाचे विक्रम पदमोर, यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पी बी देसले , महीला व बालविकास प्रकल्पच्या अर्चना आटोळे यांचे सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी महिला बचत गटाच्या अनुदानीत तत्वावरील नाश्ता व भोजन केन्द्राचे उद्घाटन

येथील भुसावळ रस्त्यावरील दूरध्वनी कार्यालयाजवळ पेट्रॉलपंपाच्या शेजारी आदिवासी विकास प्रकल्प विभागा च्या न्यूक्लिअस योजनेअंतर्गत आदिवासी महिलांच्या बचत गटाला खादय ढाबा साठी ८५ % टक्के अनुदान योजनेस आयुक्त नयना गुडे व अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडुन मान्यता मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्वातील यावल चोपडा व रावेर या ठीकाणच्या खाद्य ढाब्यांना मान्यता मिळाली असुन ,

यावल तालुक्यातुन या योजनेची सुरूवात करण्यात आली आहे . यावल येथे एकलव्य आदिवासी महिला बचत गटाच्या नाश्ता भोजनालय केन्द्राचे उद्घाटन जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार महेश पवार आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्युक्लिअस बजेट योजनेचे सहाय्यक पवनकुमार पाटील , सहाय्यक प्रकल्प अधिकारी जे आय तडवी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे , सहाय्यक लेखा अधिकारी पी व्ही रोकडे यांच्यासह एकलव्य आदीवासी महिला बचत गटाच्या सर्व भगिनी उपस्थित होत्या .