Home Blog Page 202

सिद्धरामैय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाचा धनगर समाजाकडून जल्लोष

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव : कर्नाटक राज्यात काँग्रेसने धनगर समाजाचे सिद्धरामैय्या यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केल्याने धनगर समाजाच्या वतीने शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत २० मे रोजी जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पन करून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने चौक दणाणला होता. कर्नाटक येथे २० मे रोजी शपथविधी पार पडला यामध्ये धनगर समाजाचे देशातील एकमेव मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

त्यामुळे सर्वत्र आनंदाची लहर उठली असून समाजच्या वतीने जल्लोष करण्यात आला आहे.

यावेळी निलेश घोंगे, गजानन गुरव, पत्रकार अमर बोरसे, सुरेश फासे, संतोष दिवनाले, सागर घुले, किशोर जुमळे, सुधाकर गुरव, संजय जानकर, राहुल करे, विवेक बोरसे, विनायक घुले, आकाश डांगे, आकाश सुरोसे, सचिन नागे, वैभव उभे, आशुतोष घुले, ओम घुले, उमेश घुले, चेतन बोरसे, भारसाकळे, गजानन भिवटे विशाल गाडगे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.@cmomaharashtra #cmomaharashtra #devendrafadnvis #eknathshinde @eknathshinde

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने मध्ये सुधारणा करून यापुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यात येणार

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव. तहसीलदार समाधान सोनवणे यांची माहिती
अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे

कृषी विभागाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वेळेत दावे मंजूर न झाल्याने योजनेमध्ये सुधारणा करून ती योजना यापुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यात येत आहे, अशी माहिती तालुकास्तरीय समिती अध्यक्ष तथा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली आहे.

योजनेंतर्गत पात्रतेसाठी रस्ता / रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, अपघात, सर्पदंश व विंचू दंश, जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावल्यामुळे जखमी-

मृत्यू बाळंतपणातील मृत्यू दंगल, यामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्यांचा मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकुण २ जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी असल्यास कृषी सहायक यांचेशी संपर्क साधवा, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी हर्षल पाटील तर उपसभापती दगडु( बबलू) कोळी यांची बिनविरोध निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाये दगडू ( बबलु ) जर्नादन कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

आज यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुकीत भाजपा शिंदे गटाच्या महायुतीचे १८ पैक्की१५ संचालक निवडुन आले होते .

आज दिनांक १८ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यावल ची सभापतीपदासाठीची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणुक| निर्णय अधिकारी एफ पी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापतीची निवडणुक पार पडली ,

यात सभापतीपदाची धुरा महायुतीच्या भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य तथा विद्यमान संचालक हर्षल गोविंदा पाटील यांची तर उपसभापतीपदी शिवसेना ( शिंदे गट )चे दगडु जर्नादन कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

या बैठकीस संचालक हर्षल गोविंदा पाटील , नारायण शशीकांत चौधरी , राकेश वसंत फेगडे , उज्जैनसिंग राजपुत , विलास चंद्रभान पाटील , उमेश प्रभाकर पाटील , संजय चुडामण पाटील , सागर राजेन्द्र महाजन ,पंकज दिनकर चौधरी . कांचन ताराचंद फालक, यशवत माधव तळेले, राखी योगीराज बऱ्हाटे, सुर्यभान निंबा पाटील , दगडु जनार्दन कोळी, अशोक त्र्यंबक चौधरी ,सुनिल वासुदेव बारी, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ यावेळी

निवडीच्या बैठकीस माजी सभापती हिरालाल चौधरी , हर्षल पाटील , नरेन्द्र नारखेडे , पुरूजीत चौधरी ,यांनी आपले विचार मांडले .बैठकीस भरतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव ,

भाजपा युवा मोर्चाचे सागर कोळी , माजी पंचायत समिती उपसभापती दिपक अण्णा पाटील , सरपंच अजय भालेराव , फैजपुरचे माजी नगराध्यक्ष निलेश (पिंदू ) राणे , भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे , देवीदास धांगो पाटील ,शिवसेना शिंदे गटाचे तुषार मुन्नाभाऊ पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , व्यकंटेश बारी परिष नाईक व पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

बैठकीचे सुत्रसंचालन व आभार भाजपाचे तालुका सराचिटणीस विलास चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Yaval krushi

यावल भुसावल मार्गावर मोटरसायकल चालवितांना अचानक हृदयविकाराचा झटका दुचाकी कोसळुन एक ठार तर दोन जख्मी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील यावल भुसावल मार्गावरील रस्त्यावर भुसावल हुन दुचाकी वाहनाने यावल कडे येत असतांना वाहन चालविंंता सायंकाळच्या सुमारास यावल पासुन ३ किलो मिटर लांब असलेल्या हतनुर पाटचारी वरून येतांना

अचानक हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने चोपडा येथील फकीर वाडा फुलेनगर येथे राहणारे राजु बशीर पिंजारी वय५५ वर्ष हे भुसावळ येथुन लग्नाच्या कार्यक्रमातुन आपल्या कुटुंबा सोबत परत येत असतांना त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहनाचा तोल सुटल्याने पाटचारीत मोटरसायकल कोसळल्याने राजु पिंजारी यांचा जागीच मृत्यु झाला असुन,

त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी व मुलगा देखील या अपघातात गंभीर जख्मी झाला असुन, अपघातच्या स्थळी भुसावळ कडुन येणारे जितेन्द्र सोनवणे व त्यांच्या मित्रांनी तात्काळ १o८या रुग्णवाहीके साठी संपर्क करून तात्काळ त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले ,

या ठिकाणी जखमींना प्रथम यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी व त्यांच्या आरोग्य कर्मचारी यांनी जख्मींवर प्रथम प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने तात्काळ चोपडा येथे खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .

अशा प्रकारे झालेल्या अपघाताचे वृत्त कळताच यावलच्या ग्रामीण रुग्णालयात बघण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती .

अवैधरीत्या दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने दारूची वाहतूक करणाऱ्याला पकडले

0

 

 

इस्माईलशेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणा वैजनाथ येथे विश्वजीत अर्जुन निंबाळकर वय 23 वर्ष राहणार तीन पुतळे परिसर शेगाव. हा दारूची विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने याच्या जवळील दारूचा माल पोलिसांनी प्रोवि रेट दरम्यान 18 मे रोजी ताब्यात घेतला.

विश्वजीत निंबाळकर यांच्याजवळ देशी दारू टॅंगो पंच कंपनी सीलबंद.90 मिली च्या 100 नग शिशा. किमान 35 रुपये प्रमाणे 3500 रुपये. एक नायलॉन थैली 20 रुपये.

तसेच एचएफ डीलक्स मोटर सायकल क्रमांक एम एच 28 _ए पी 20 26 अशा प्रकारची जुनी वापरते मोटरसायकल किंमत अंदाजे 30 हजार रुपये व एक्स सॅमसंग मोबाईल a23 अंदाजे 15000 रुपये असा एकूण 48 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याचा पुढील तपास बीड जमदार डी. बी. डाबेराव करत आहेत.

आरोपी मोहम्मद दानिश याला आजन्म कारावास

0

 

सीसीटीव्ही फुटेज ची साक्ष ठरली महत्त्वाची

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

खामगाव शेगाव येथील जगदंबा चौकातील माऊली टी सेंटर मध्ये झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने तेरा साक्षीदार तपासले .त्यापैकी सीसीटीव्ही फुटेज चा प्राथमिक पुरावा महत्त्वाचा ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार ६ मे २०१८ रोजी आठवडी बाजारातील मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम या 22 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता .दरम्यान पोलिसांनी मोहम्मद दानिश जाहीद हुसेन याच्यासह दोघांविरुद्ध कलम 302 ,201,120 बी,340 नुसार गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायालयात दाखल केले.

घटनेची पार्श्वभूमी अशी की दि 6मे2018 रोजी मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम हा माऊली टी सेंटरमध्ये बसलेला होता. दरम्यान संध्याकाळी पावणे सात ते सात वाजताच्या सुमारास आरोपी मोहम्मद दानिश जाहीर हुसेन हा त्या ठिकाणी आला व वाद घालून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व खिशातील चाकूने शोएबच्या मानेवर ,पोटावर व गालावर 19 वार केले .

त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला .त्याला दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेच्या दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्यात आला होता मात्र पुन्हा हा वाद उफाळून आल्याने सदर घटना घडली होती .

अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एडवोकेट रजनी बावस्कर (भालेराव) यांनी अत्यंत बारकाईने ह्या गुन्ह्यातील मुद्दे न्यासरलयासमोर मांडत प्रभावी युक्तिवाद केल्यानंतर खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एस कुलकर्णी यांनी आज आरोपी मोहम्मद दानिश याला आजन्म कारावासाची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावाचे शिक्षा सुनावली.

एम आय एम पक्षाच्या शेगाव शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख हाजी बुडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज 18 मे रोजी बुलढाणा येथे खासदार बॅरिस्टर असोदद्ऊदीन ओवेसी राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या ऑल इंडिया मजलीस ए इथेहा दूल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बुलढाणा येथे

पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची व मुख्य कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये एमआयएम पक्षाच्या विस्तारासंबंधी चर्चा करण्यात येऊन शेगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख हाजीबुडन यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याबद्दल व आगामी काळात

होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांची शेगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती एमआयएम पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दानिश शेख यांनी एका नियुक्ती पत्र द्वारे केली आहे

सर्व धार्मिक परंपरेला मूठ माती देत केला नवा उपक्रम.

0

 

शेगाव तालुक्यामध्ये लासुरा गावातील महावितरण चे सहायक अभियंता आदरणीय सुनील जवंजाळ यांच्या आईचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने 16 मे रोजी निधन झाले.

त्यांच्या असती विसर्जनाचा कार्यक्रम हा 18 मे रोजी आयोजित केला होता त्या ठिकाणी त्यांनी त्या असती हे कोणत्याही नदी किंवा नाल्यांमध्ये न टाकता आपल्या शेतामध्ये खड्डा खोदून व त्या खड्ड्यांमध्ये असती विसर्जन करून त्यावर एक आंब्याचे झाड लावले आहे

याच ठिकाणी प्रास्ताविक भाषणामध्ये समाजाला व इतर लोकांना संचालकाने संबोधित करताना सांगले की मनुष्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो

त्यावेळेस तो पंच तत्वामध्ये विवीध होतो त्यामुळे नदी किंवा नाल्यामुळे त्यांच्या असती टाकण्याच्या आवजी त्या असतीना त्या व्यक्तीच्या आठवण म्हणून त्या असती विसर्जन करून त्या ठिकाणी त्यांची आठवण म्हणून एक झाडाची रोपणी करावी आज संदेश सर्व समाज बांधवांना देत आहोत

विधवा आईने मयत मुलाला न्याय मिळेल या अपेक्षेने जळगांव पोलिस अधिक्षक यांचे कडे घेतली धाव

0

 

सूर्या मराठी न्यूज विकी वानखेडे

दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजि भुसावळ येथे विशाल विजय बच्छाव वय ३७ याने विष प्राशन केले त्यामुळे त्याचा डॉ. मानवतकर यांच्या रुग्णालयात औषधोपचार घेत असतांना दुर्देवी मृत्यू झाला अशी नोंद भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशन येथे करण्यात आली परंतु.

असे काय घडले ज्यामुळे या ३७ वर्षाच्या तरुणाला विष प्राशन करून आपले आयुष्य संपविण्या शिवाय पर्याय नव्हता या सर्व विषयांचा खुलासा मयत विशाल बच्छाव याची आई ग.भा. प्रमिला बच्छाव यांनी दि . ९ मे २०२३ रोजी जळंगाव पोलिस अधिक्षक यांचे कडे लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदणात जे नमुद केले ज्यामुळे अक्षरशा अंगांवर शहारे येतील अशी माहिति समोर आली प्रमिला बच्छाव यांनी.

निवेदणात नमुद केले कि त्यांचे पति वरणगांव आर्डनस फॅक्ट्री मध्ये नौकरीस असतांना सन २०१६ मध्ये त्यांचे हृदय विकाराने निधन झाले त्यांचे पश्चात विशाल आणि विकास हे दोन मुल होते दोन वर्षापुर्वी मोठा मुलगा विशाल याचे लग्न पाचोरा येथील रामेश्वरी सदाशिव सोनवणे या मुली सोबत करण्यात आले परंतु लग्नाच्या तिन महिन्या नंतरच रामेश्वरीची आई चंद्रभागा या महिलेने विशाल याला आपली आई प्रमिला बाई यांचे पासुन वेगळा राहण्याचा सल्ला दिला.

विशाल ने आपल्या आईला सांगितल्या नंतर आईने आपल्या मुलाच्या सुखा करिता आपल्या मुलाला वेगळे राहण्यास परवानगी दिली आणि प्रत्येक महिन्याला घर खर्चाकरिता दहा हजार रुपये देऊ लागली पंरतु विशाल ची सासु चंद्रभागा या महिलेचा पाचोरा येथे व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय आहे त्यामुळे त्या महिलेने विशाल ने हि आई जवळुन पैसे घेऊन व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करावा असा तगादा केला.

परंतु विशाला याला हा व्यवसाय आवडत नसल्याने तो वारंवार नकार देऊ लागला परंतु दोन वर्षात रामेश्वरी तिची आई चंद्रभागा व आजी यांनि विशाल याला मानसिक त्रास देण्यास शुरुवात केली रामेश्वरी ची आई चंद्रभागा भगत असल्याचे सांगुन देवि आंगात येण्याचे ढोंग करून नेहमि विशाल याला भ्रमित करून रामेश्वरीला वारंवार माहेरी राहण्यास सांगु लागली त्यामुळे विशाल हा मानसिक दृष्ट्या त्रस्त झाला

आणि दि . १५ एप्रिल २०२३ रोजि जेव्हा १ महिन्या पासुन रामेश्वरी विशाल याला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने वडिलांच्या आजाराचा बहाना करून माहेरी गेली होती तेव्हा विशाल त्याची मावस बहीण जि भुसावळ येथे राहते तिच्या कडे गेला आणि तिला सांगु लागला कि रामेश्वरी सोबत लग्न करून मला पश्चाताप होत आहे

रामेश्वरी तिची आई आणि आजि मला पैश्या करिता खुप मानसिक त्रास देत आहे यांचे मुळे मि जिव देऊन टाकेल आणि खरोखर त्याने २६ तारखेला आपला जिव दिला २६ तारखेला त्याची सासु आणि त्याचे मोबाईल फोनवरून संभाषण झाले आणि तो मानसिक दृष्ट्या खचला आणि त्याने आपला जिव गमावला कारण त्याच्या मृत्यु नंतर त्याचा मोबाईल फोन ठेचुन एक बाजुला ठेवण्यात आलेला होता

आणि रामेश्वरी व तिचा भाऊ . आई . आणि आजी यांनि संगनमत करून मोबाईल फोनचे सिम कार्ड व मेमोरी कार्ड हे गायब केलेले आहे त्यामुळे रामेश्वरी व तिच्या सोबत तिची आई आजि व भाऊ यांचे विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी माझ्या मुलाचा मोबाइल नंबर 8390249770 आहे तरी या नंबरचा C D R काढुन २६ एप्रिल २०२३ रोजि माझा मुलगा विशाल याचे शेवटचे बोलणे कुणा सोबत झाले याची माहिती घेऊन माझ्या मुलाला न्याय द्यावा

अशि मागणि निवेदनाव्दारे पोलिस अधीक्षक जळगांव व डि वाय एस पी वाघचौरे साहेब यांचेकडे केली आहे आणि प्रमिलाबाई यांना विश्वास आहे कि त्यांना न्याय मिळणारच असा विश्वास आहे त्यामुळे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष पोलिस अधीक्षक साहेब यांच्या निर्णयाकडे लागुन आहे

स्वतः मध्ये “समग्र गुणात्मक बदल” घडवून शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा–डाएट प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे विषय साधनव्यक्ती यांच्या आढावा सभेत प्रतिपादन.

0

 

गडचिरोली:-दिनांक:-१७.५.२०२३ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर कार्यरत विषय साधनव्यक्ती यांची दिनांक १६ मे २०२३ ते १८ मे २०२३ या कालावधीत विज्ञान,गणित,सामाजिक शास्त्र,हिंन्दी मराठी व इंग्रजी विषयाच्या विषय साधनव्यक्तींची शासन स्तरावरावरील राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमाच्या अनुषंगाने आढावा सभा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.

आढावा सभेचे अध्यक्ष डॉ विनित मत्ते हे होते तर प्रमुख उपस्थिती अधिव्याख्याता वैशाली ऐगोलपवार मॅडम,पुनित मातकर सर,प्रथम संस्थेचे श्री श्रीकांत पावडे,विषय सहायक प्रदीप पाटील,गुरूराज मेंढे,समुपदेशक प्रभाकर साखरे,सुनील उंदीरवाडे,आयटी विषय सहायक तपन सरकार उपस्थित होते.

आढावा सभेत गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या फुलोरा उपक्रमात विषय साधनव्यक्ती यांची भूमिका, प्रभावी आणि परिणामकारक शाळा भेटी,निपुण भारत अभियान कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी केलेले प्रयत्न,शिक्षण परिषदांमध्ये घेत

असलेले विषय,कृतीआराखडा, SLAS,NAS मध्ये केलेले कार्य,अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण,प्रारंभिक मुक्त शाळा निर्माण करण्यासाठी शाळांना केलेली मदत,शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा आणि माता पालक गटांना दिलेल्या मदतगार भेटी,व्यवसाय अभ्यासक्रम,बालभवनातील योगदान,शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न,स्टार्स प्रकल्पांतर्गत केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणासाठी केलेले

कार्य,निष्ठा ४.० आणि अविरत प्रशिक्षण,स्वतःचा प्रशिक्षणातील सहभाग,कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न,शैक्षणिक साहित्यांच्या पेटीतील साहित्य वापर व इतर महत्त्वाच्या विषयावर पिपिटी व्दारा सादरीकरण आणि आढावा घेण्यात आला.

प्रसंगी अधिव्याख्याता पुनित मातकर आणि वैशालीताई येगोलपवार यांनी सादरीकरणातील नोंदीसह विषय साधनव्यक्तींना आवश्यक सुचना केल्या तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांनी बारा ही तालुक्यातील उपस्थित विषय साधनव्यक्ती यांनी सादर केलेल्या पिपिटीचे कौतुक करून स्वतः सक्षम होऊन इतरांना सक्षम करण्यासाठी आणि शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांचे आभार विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी व्यक्त केले.