Home Blog Page 217

ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील अतिक्रमणामुळे सदस्य ठरले अपात्र..

0

 

सिंदी (रेल्वे). ग्रामपंचायत पळसगाव बाई येथील दोन ग्रामपंचायत सदस्य यांचेवर अतिक्रमण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी केली अपात्रतेची कार्यवाही, जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणुन नावलौकिक असलेल्या पळसगाव बाई येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन धाबडधुस्के व लक्ष्मी ईरपाते यांचे अतिक्रमण असुन त्याबाबात जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

अॅडव्होकेट परीक्षीत पेटकर यांनी अतिक्रमणबाबत ठोस पुरावे सादर करून बाजु मांडली तक्रारींचे अनुषंगाने गटविकास अधिकारी व तहसीलदार सेलू यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केले असून अहवालात अतिक्रमण असल्याचे जिल्हाधिकारी सुनावणी दरम्यान सिध्द झाले असून जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण कायदा १४ ज अंतर्गत कार्यवाही करीत ग्रामपंचायत सदस्य पदावरुन अपात्र घोषित केले आहे.

गजानन धाबडधुस्के यांनी स्वत: सदस्य पदावर असतांना घराचे बाजूला असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला तसेच सदस्या लक्ष्मी ईरपाते यांचे पतीच्या नावे अतिक्रमण आढळून आले आहे . गावातील जागुत नागरीकांनी आलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून अश्याप्रकारे स्वत: पदावर असतांना अतिक्रमण करून मिरवणाऱ्या व नाहक तक्रारी करून गावाची प्रतीमा मलीण करणा-या सदस्यांना चांगलाच चाप बसला आहे.

तक्रारकर्ते किशोर गोल्हर यांनी सदर निकालानंतर मत व्यक्त केले की, पळसगाव बाई येथील गावाचे सरपंच धीरज लेंडे यांचे पुढाकाराने ईतीहास नोंद घेईल इतका कायापालट झाला असतांना सदर सदस्य विरोधाचे राजकारण करुन विकास कामात अडथळा व नाहक तक्रारी करून गावाची प्रतीमा मलीण करीत असुन स्वत: पदावर असतांना अतिक्रमण करून असुन ईतर नागरीकांनी सदस्याकडुन काय आदर्श घ्यायचा त्यामुळे त्यांचेवर कार्यवाही मुळे भविष्यात अतिकमणाला आळा बसुन गावात अतिक्रम बाबत जबर निर्माण होईल..

गावात अतिक्रमण निर्मूलन जनजागृती व कार्यवाही बाबत सदस्यांचेच अतिक्रमण असल्यामुळे सरपंच म्हणुन कार्यवाही करतांना अडचण जात असुन नागरीकांचे बोलणे नेहमी ऐकावे लागत होते परंतु आता सदस्यावर अपात्रतेची कार्यवाही झाल्यामुळे भविष्यात अतिकमणाला आळा बसेल व गावातील अतिक्रमण कमी होण्यास मदत होईल..
*धिरज लेंडे, सरपंच*

कै.मनाबाई माधव कुरकुरे रा यावल यांनावृद्धकाळाने रात्री 11 वाजता निधन झाले

0

 

विकी वानखेडे  यावल

कै.मनाबाई माधव कुरकुरे वय ८७ ,रा यावल यांना काल दि 10/01/2023 रोजी वृद्धकाळाने रात्री 11 वाजता निधन झाले त्यांची अंत्य यात्रा आज सकाळी दि.11/01/2023 रोजी 11 वाजता म्हैसोबा महाराज मंदिर महाजन गल्ली जवळून निघणार आहे. शोकाकुल- श्री. कालिदास माधव कुरकुरे, श्री दिनकर माधव कुरकुरे, श्री योगेश कालिदास कुरकुरे, श्री मुकेश कालिदास कुरकुरे, श्री मिलिंद वासुदेव कुरकुरे यावल पंचायत समिती घरकुल प्रोग्रामर यांच्या आजी होत्या

वकिलावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शेगाव बार असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

0

 

इस्माईल शेख शेगाव

दिवाणी व फौजदारी न्यायालय शेगाव येथील बार असोसिएशनचे सदस्य एडवोकेट प्रकाश वाकोडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 09,01, 2023 रोजी शेगाव बार असोसिएशनच्या माध्यमातून तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक ०७/०१/२०२२ सायंकाळच्या सुमारास कोर्टाचे काम आटोपल्यानंतर एडवोकेट प्रकाश सुखदेव वाकोडे घरी जाण्यास निघाले असता. रोकडिया नगर मधील नालंदा कॉलनी मध्ये काही गाव गुंडांनी त्यांची गाडी अडवून लाकडी रॉडने गाडीवर हल्ला केला. सदर घटनेची माहिती एडवोकेट प्रकाश वाकोडे यांना विचारपूस केली असता.

या गावगुंडांचा उद्देश मला जीवे मारण्याचा होता. अशी फिर्याद पोलिसांकडे त्यांनी दिली.शेगाव वकील संघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत शेगाव बार असोसिएशनच्या समस्त वकिलांनी शेगाव तहसील कार्यालय तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना ०९/०१/२०२३ रोजी तीव्र निषेध व्यक्त करीत वकिलास संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले. व सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.

तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देताना शेगाव बार असोसिएशनचे वकील संघ

रमाई आवास घरकुल योजनेमध्ये होत असलेल्या अन्याय  विरोधात आमरण उपोषण

0

 

इस्माईल शेख शेगाव

नगर परीषद शेगांव येथील अनुसूचित जाती बौध्द बेघर अपंग विधवा महिला अतिवृष्टी धारकांवर गोरगरीब आर्थिक दुर्बल लोकानवर रमाई आवास घरकुल योजने मध्ये स्थानिक न. प. चे तात्कालीन सत्ताधारी व अधिकारी लोकांन कडुन होत असलेल्या अन्याय व जातीय भेदभाव करत असल्यानी शासनाने यांची तात्काळ दखल घेऊन रमाई आवास घरकुल योजनेचे मंजुर२७०अधीक ३२लोकांचे आर्थिक निधी देऊन जातीय भेदभाव करणाऱ्या लोकांनवर अॅट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हादाखल करून कार्यवाही करण्यात यावी.

या मागणीसाठी अंबादास भगवान गावई व महादेव बारिकराव शेगोकार व विनोद पांडुरंग मोरे (दिव्यांग) यांनी स्थानिक गांधी चौक येथे दि.१० जानेवारी रोजी आमरण उपोषणास सुरवात केली आहे.
नगर परीषद शेगांव येथे अनुसूचित जाती व बौध्द बेघर अपंग विधवा महिला ,अतिवृष्टी धारकांवर गोरगरीब आर्थिक दुर्बल लोकांचे रमाई आवास घरकुल योजने मध्ये मंजुर २७० अधीक ३२ घरे आहेत.

अनुसूचित जातीचे असल्यानी न. प. चे तात्कालीन सत्ताधारी व संबंधी अधिकारी वर्गा यां लोकांन सोबत, जातीय भेदभाव करुन घर मिळवण्यात अडथळे निर्माण करत आहे. आणि हि केवळ जातीय भेदभावातुन होत आहे. हा अनुसूचित जाती व बौध्द बेघर लोकावर जाणीवपूर्वक अन्याय आहे.असा आरोप उपोषणकर्ते यांनी पत्रकार परिषदेत केला.

यां अन्यायाने अनुसूचित जाती व बौध्द बेघर ,अपंग विधवा महिला अतिवृष्टी धारकांवर, गोरगरीब, आर्थिक दूर्बल लोकांकडे पक्के घर नसल्याने व अत्यंत अर्थिक दुर्बल असल्याने आणि निवार्याची व्यवस्था नसल्याने यांचे व यांच्या कुटंबाचे जीवन धोक्यात आले आहे. आम्हि यांबाबत विनंती करून सुचना केलेल्या आहेत.

तरी सुध्दा जातीय भेदभाव यां लोकांवर थांबलेला नाही.शासनाला वारंवार स्मरण पत्र देवुन सुध्दा आम्हाला न्याय मिळत नाही म्हणुन न्यायासाठी आमरण उपोषणास बसलो असे ही ते म्हणाले.

रमाई आवास घरकुल योजने पासुन वंचित आहेत. शेगांव न. प. मध्ये रमाई आवास घरकुल योजनेत या आधी २०१८ – १९ मंजुर यादी मध्ये पात्र लाभार्थांना डावलून नाव मध्ये फेरफार व भ्रष्टाचार करुन वंचित ठेवाण्यात आले आहे. व २०१६ ते २०२२ पर्यंत आतची अनुसूचित जाती जमाती नवबौध्द ( पुर्वाची दलित वस्ती सुधार योजनमध्ये) शासनाच्या कोटयावधी रुपयाचे आर्थिक निधीचे अफरातफर करुन भ्रष्टाचार केलेला आहे.

तरी शासना कडुन २०१६ ते २०२२ पर्यंत संपुर्ण झालेल्या व चालु असलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, आणि न. प. मध्ये जणिव पुर्वक भ्रष्टाचार व शासनाच्या आर्थिक निधेचा गैरवापर करण्यासाठी पात्र व अनुभवि बांधकाम अभियता नसल्यां मुळे तात्कालीन न. प. सत्ताधारी व अधिकारी लोकांनी आताचे बांधकाम अभियता पात्र व अनुभवि नसल्यामुळे हाताशी धरुन योजने मध्ये फारमोठया प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.

यांमुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे. तरी सखोल चौकशी करुन यांच्यावर तात्काळ कार्यावाहि कारण्यात यावी व अनुसूचित जाती बौध्द बेघर अपंग विधवा महिला अतिवृष्टी धारकांवर गोरगरीब आर्थिक दुर्बल लोकानवर रमाई आवास घरकुल योजनेचे मंजुर २७० अधीक ३२ घराचे अनुदान तात्काळ दि, ०८/०१/२०२३पर्यत देण्यात यावे. करिता न्यायासाठी लोकशाही मार्गाने दि, १० / ०१ / २०२३ पासुन मंजुर२७० अधीक ३२यां मध्येल लाभार्थि व मी न्यायासाठी अमरण उपोषण न. प. कार्यालया समोर गांधी चौक शेगांव जिल्हा बुलढाणा येथे बसलो आहे. यांची शासनाने दखल घ्यावी अशी मागणि अंबादास भगवान गवई (समाजसेवक) , महादेव बारिकराव शेगोकार , विनोद पांडुरंग मोरे (दिव्यांग) यांनी यावेळि केली.

डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

0

 

नागपूर : टेक्नोव्हिजन मीडिया अँड कम्यूनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश पांडे, उच्च न्यायालयाचे एडवोकेट आनंद देशपांडे, डॉ. कल्याणकुमार, वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर उपस्थित होते. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया माध्यमातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकातून माहिती व तंत्रज्ञानाची सुलभतेने ओळख होईल, अशा शुभेच्छा राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दिल्या. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनीही कौतुक केले.

यावेळी विदर्भातून विविध जिल्ह्यातून आलेल्या डिजिटल मीडिया प्रतिनिधींची उपस्थिती होती.

सोयाबीन-कापूस प्रश्नी ना.देवेंद्र फडणवीसांचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयलांना पत्र

0

 

रविकांत तुपकरांनी मुंबईत घेतली ना.फडणवीसांची भेट…पत्रात तुपकरांचा संदर्भ देत केल्या सूचना

मुंबई/बुलढाणा, दि. १० (प्रतिनिधी) –
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारशी निगडीत असलेल्या मागण्यांसदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना पत्र पाठविले आहे. यासंदर्भात तुपकरांनी ०९ जानेवारी रोजी मुंबईत ना.फडणवीसांची भेट घेतली होती.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मागणीनुसार आणि त्यांनी नमुद केलेल्या महत्वपूर्ण बाबी या पत्रात नमुद करण्यात आल्या आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी रविकांत तुपकर यांचा नामोल्लेखही या पत्रात केला आहे, हे विशेष.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि सोयाबीन-कापसाला उत्पादन खर्चानुसार योग्य दर मिळावा, यासाठी रविकांत तुपकर गेल्या काही महिन्यांपासून गल्ली ते दिली पाठपुरावा करत आहेत.

एल्गार मोर्चा, मुंबईतील अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी केलेली चर्चा, दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय कृषीमंत्री यांच्याकडे केलेला पाठपुरावा.

त्यानंतर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, वनमंत्री यांच्या भेटी घेऊन तुपकरांनी पुन्हा पाठपुरावा केला तर पुन्हा एकदा ९ जानेवारी रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांची भेट घेऊन कापूस-सोयाबीनच्या भावाबाबत केंद्राशी चर्चा करण्याबाबतची आग्रही मागणी तुपकर यांनी केली.

दरम्यान ना. देवेंद्र फडणवीस यांनी कापूस – सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना लेखी पत्र दिले आहे. महाराष्ट्रात ७० टक्के शेतकरी हे सोयाबीन – कापूस उत्पादक आहेत. सोयाबीनला प्रति क्वि. ५८०० तर कापसाला प्रति क्वि. ८२०० रुपये उत्पादन खर्च लागतो. परंतु सध्या खाजगी बाजारात सरासरी सोयाबीनला प्रति क्वि.५६०० रु. आणि कापसाला प्रति क्वि.९००० रु. दर आहे.

खाजगी बाजारात मिळणारा भाव हा फक्त उत्पादन खर्चाची बरोबरी करतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सोयाबीन – कापसाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्राने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. या संदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काही मागण्या आणि सूचना नमुद केल्या आहेत,

त्याबद्दल निर्णय झाल्यास महाराष्ट्रातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, असे या पत्रात नमुद आहे. यासाठी कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे,कापसाचे आयात शुल्क सध्या११ टक्के आहे ते तसेच कायम ठेवावे, जी.एम. सोयाबीनच्या लागवडीला परवानगी द्यावी, सोयाीबनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा व पिककर्जासाठी सिबीलची अट रद्द करावी, आदी मागण्या ना. फडणवीस यांनी या पत्रात नमुद केल्या आहेत.

या पत्रात रविकांत तुपकर यांचा स्पष्ट नामोल्लेख करत, तुपकरांच्या सुचनांचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा, असेही ना.फडणवीस यांनी म्हटले आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना लेखी पत्र पाठविणे ही तुपकर व शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रृती आहे. जर राज्य सरकारने केंद्राकडे या मागण्यांबाबत ताकदीने पाठपुरावा केल्यास सोयाबीन-कापूस उत्पादकांना केंद्राकडून न्याय मिळू शकतो…! अशी शेतकऱ्यांना अशा आहे.

२५ वर्षे लोटली जमीनीचा मोबदला कधी मिळणार ?

0

 

आमदार कुणावार यांना निवेदनाव्दारे अन्यायग्रस्त शेतकर्याचे साकडे

गुडडु कयुरेशी

सिंदी रेल्वे ता.१० : परिसरातील शेतकऱ्यांची निम्न वणा प्रकल्पा अंतर्गत बनविण्यात आलेल्या कालव्याकरिता इ. स. १९९७ मध्ये शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली. मात्र २५ वर्षे लोटुन सुध्दा अद्याप जमीनीचा मोबदला मिळाला नाही.

शासकीय कार्यालयाचे उंबरठे झीजवून सुद्धा अन्यायग्रस्त शेतकत्यांना न्याय मिळाला नसल्याने या अन्यायग्रस्त शेतकत्यांनी आमदार समीर कुणावार यांनाच सोमवारी( ता.९) निवेदन देऊन साकडे घातले.

……………..सविस्तर वृत असे की निम्न वना प्रकल्पा अंतर्गत बनविण्यात आलेल्या कालव्याकरिता सिंदी, कळमना, मारडा, दिग्रज, विखणी, जसापूर, गौळ, भोसा, कृष्णापुर, सालापूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांची शेत जमीन २५ वर्षाअगोदर म्हणजे इस. १९९७ ला अधिग्रहित करण्यात आली. मात्र सदर अधिग्रहीत शेत जमीनीचा मोबदला व भुभाडे पट्टी अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही.
२५ वर्षापासुन समधीत शासकीय कार्यालयाचे उंबरठे झीजवून सुद्धा अन्यायग्रस्त शेतकत्यांना न्याय मिळाला नाही.

आपल्या न्यायीक मागण्यासाठी हे सर्व विविध गावाचे अन्यायग्रस्त शेतकरी एकवटले असुन आम्हा शेतकऱ्यांचा हक्काचा शेत जमिनीचा मोबदला व भुभाडे पट्टी नवीन स्केल प्रमाणे मिळावे व हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा या अनुषंगाने लेखी निवेदन मा. आमदार समिरभाऊ कुणावार यांना सोमवारी (ता.९)देण्यात आले.
निवेदन सादर करताना अन्यायग्रस्त शेतकरी गजानन पाल, सुधाकरराव वाघमारे,राजू दांडेकर, बंटी बेलखोडे, सुनील शेन्डे, गजानन तिमांडे, रामदास मोहिते,वासुदेवराव सोनटक्के, प्रवीण सोनटक्के, नारायण बुरीले, पुरषोत्तमराव महाडुळे,समीर वांदिले, गणेश नौककर,पुरषोत्तमराव पाल,सुभाषराव बलवीर आदी ४० हुन अधिक शेतकर्याची उपस्थिती होती.

एकवटलेल्या शेतकर्याना शासणाने ताबडतोब मोबदला व भाडेपट्टी द्यावी अन्यथा या अन्यायग्रस्त शेतकर्यानी उग्र आंदोलन करण्याचा निर्धार बोलुन दाखविला

कट रचुन खंडणी उकाळण्याबाबत कलम १०९,१२०(b),३८४,३८५अन्वये गुन्हा दाखल

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :-दि.७ जानेवारी फिर्यादी पंकज रामदास तडस( वर्धा जिल्हा खासदार ) यांचा मुलगा यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे येवुन रिपोर्ट दिली की, यातील आरोपी मंगेश चोरे रा. वर्धा याने पुजा मुकुंद शेंद्रे रा. वर्धा हिला हाताशी धरुन फिर्यादी कडुन पैसे उकळण्याच्या उददेशाने फिर्यादीशी मैत्री करुन त्यांच्या परिवाराची बदनामी करण्याची धमकी देवुन त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करुन त्याच्याकडुन १ लाख रुपये उकळुन आणखी आरोपी मंगेश चोरे करिता ५० लाख रुपये तसेच

पुजा मुकुंद शेंद्रे करिता २ करोड रु. व फ्लॅटची मागणी केली असल्याने फिर्यादीने त्याबाबत असमर्थता दर्शविल्याने मंगेश चोरे याने त्याच्या न्युज पोर्टलवर फिर्यादीबाबत बदनामी कारक मजकुर छापण्यास सुरुवात केली तसेच दि.६ जानेवारीला परत फिर्यादीला एका ऑडीओ क्लिपव्दारे पुजा मुकुंद शेंद्रेचा

दुस-या व्यक्तिच्या माध्यमातुन खुन करुन फिर्यादीला त्यात फसविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा फिर्यादीला भय असल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अपराध क्र. २६/२०२३ कलम १०९,१२०(b),३८४,३८५अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा करित आहे.

जगातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका आणि समाज सुधरिका फातिमा शेख यांची 192 वी जयंती साजरी

0

 

अमीर प्रतिष्ठान ने गरजू आदिवासी विद्यार्थ्याना मदत देऊन सामाजिक उपक्रमातून केली जयंती साजरी

विक्की वानखेडे यावल

महिला शिक्षणाच्या अग्रदूत शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांद्या लावून स्त्री शिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या त्यांच्या सहकारी आणि आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका आणि समाज सुधारक फातिमा शेख यांच्या 192व्या जयंती निमित्त अमीर प्रतिष्ठान संचलित अमीर,कला व वाणिज्य,महाविद्यालय किनगाव यांच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष हाजी रमजान अमीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष संचालक श्री.सचिन तडवी यांनी.

अंत्यन्त दुर्गमभागातील सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळा वाघझिरा ता.यावल येथे ईयत्ता 12 वी च्या वर्गात प्रवेशीत असलेल्या गोरगरीब आदिवासी विधार्थ्यांना अपेक्षित संच वाटप कारण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे श्री.सचिन तडवी यांचे मित्र असलेल्या एक दलित बहुजन मातंग समाजातील व हाथाला मिळेल ते काम करून भटकंती करून आपल्या परिवाराची पोटाची खळगी भरणाऱ्या व दैनंदिन अशा प्रकारे आपला स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या हालाखिची परिस्थिती असलेल्या अशा.

अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती श्री.भिमा भाऊ चव्हाण यांच्या हस्ते अपेक्षित प्रश्न संच वाटप करून समाजा समोर एक नवा असा उल्लेखनिय आदर्श निर्माण करून दिला मागील कित्येक वर्षा पासुन सचिन तडवी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने हा कार्यक्रम राबवला आहे कार्यक्रमात श्री.सचिन तडवी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वीते विषयी व पुढील शैक्षणिक वाटचाली संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन श्री,राठोड सर यांनी केले.

आणि आभार प्रदर्शन श्री.महाजन सर यांनी केले कार्यक्रमा प्रसंगी अमीर प्रतिष्ठान संचलित कला व वाणिज्य महविद्यालयाचे खजिनदार व संचालक अजित तडवी,रफिक तडवी,संचालक मंडळ व शिक्षण प्रेमी,पालक,शाळेचे विध्यार्थी,शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक,श्री.किशोर महाजन सर शिक्षक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

नाबालिक मुलीचे अपहरण प्रकरण नाट्यमय घडामोडी..सायंकाळी मुलगी पोलीस स्टेशनला हजर होते आणि रात्री अडीच वाजता मुलाला अटक होते.

0

 

पिडित माता पिता महिला आयोगाकडे तक्रार करणार.

बुलढाणा अपहरण झालेली नाबालिक मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला जमा झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे. अद्यापही मेडिकल झालेले नसून तिला बाल सुधार गृहात कसे ठेवण्यात आले..?

स्थानिक जळगाव जामोद पोस्टे अंतर्गत मुलगी अपहरण प्रकरणात स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर आल्याची चुकीची माहिती जाणीवपूर्वक जाहीर करण्यात येत आहे.

तसेच स्थानिक जळगाव जामोद सामान्य रुग्णालयत प्राथमिक मेडिकल झाल्यानंतर नाबालिक मुलीला बुलढाणा येथील बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे. असे असताना तिला खामगाव येथे मेडिकलला नेण्याचे कट कारस्थान पोलीस प्रशासनाकडून होत असल्याचे समोर येत आहे.

स्थानिक तपास अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मुलगी स्वतःहून हजर झाली तिला आम्ही शोधले नाही. मग तपास अधिकारी जळगाव खान्देश, औरंगाबादमध्ये शासकीय दौरा टाकून कशासाठी गेले..? जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत नेमण्यात आलेले वेगवेगळे पथक रिकाम्या हाताने परतले काय…?

मुलगी स्वतःहून आली त्यानंतर तिला तिच्या आई-वडिलांसोबत भेटू दिल्या जात नाही. राजकीय दबाव तंत्राचा वापर सदर तपासा दरम्यान होत आहे. आई-वडिलांना मुली पासून जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात येत आहे.

मूलीला बुलढाणा येथील बाल सुधार गृहात आणल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर रात्री अडीच वाजता मुलाला अटक केल्याचेही माहिती समोर येत आहे.

सदर प्रकरणात आमदार संजय कुटे यांचा पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे तपास यंत्रणा ” हम करे सो कायदा ” या पद्धतीने आरोपीला वाचविण्यासाठी चुकीच्या दिशेने काम करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक स्थानिक ठाणेदार तपास अधिकारी सदर प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास का टाळत आहे का समोर येत नाही.

तीन महिन्यात मुलगी परत आली नाही आणि आज अचानक मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होते. त्यानंतर मुलाला अटक होते.हा सर्व प्रकार आरोपी माजी मंत्री आमदार संजय कुटेंचा ड्रायव्हर असल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी होत आहे. तसेच मुलीवर दबाव आणून मुलीचे बयान नोंदविला जात असल्याचा प्रकार घडत असल्याचे पीडित मुलीचे मातापित्यांचे म्हणणे आहे.

Dr Sanjaykute