Home Blog Page 222

शेख रसूल शेख महंमद यांची आझाद, हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जा,तालुका अध्यक्ष पदी निवड,!!.

0

 

शेख रसूल शेख महंमद यांनी केलेल्या सामाजिक सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मयेतील योगदानाची दखल घेत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रिठे यांचे आदेशानुसार विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदिर यांनी नुकतीच शेख, रसूल शेख महंमद यांची नियुक्ती पत्राद्वारे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली सादर नियुक्ती ही दिनाक 22/12/2022 ते,22/12/2023 पर्यंत राहील,देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्या साठी पुढील कार्यास सदिचछा देत, तालुक्यात नियुक्त्ती पत्राद्वारे निवड करण्याचे अधिकार ही देण्यात आले,,

आमदार समीर कुणावार यांचा वाढदिवसा निमित्त विदर्भ स्तरीय वकृत्व स्पर्धा

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार समीर कुणावार यांचा वाढदिवस १ जानेवारी ला आहे वाढदिवसाच्या औचित्याने दिनांक २ जानेवारी ला विदर्भ स्तरीय वकृत्व स्पर्धा व सत्कार समारंभ च आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत वर्धा, अमरावती नागपूर, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातील विविध वक्ते यांची नोंदणी झाली आहे कार्यक्रमाचं आयोजन सनी बासनवार मित्र परीवार तर्फे करण्यात आला आहे.

तसेच हिंगणघाट शहरातील वृक्ष चळवळ संघटना वृक्षमित्र परीवार, सामाजिक संघटना मा. भवानी बहुद्देशीय सामाजिक संघटना व हिंगणघाट शहरातील फुटबॉल खेडाळु मुस्तफा बक्क्ष याचा सुद्धा सत्कार संमारभ होणार आहे,

कार्यक्रम उद्घघाटन माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, माजी नगरसेविका अर्चना कुबडे माजी नगरसेविका वैशाली सुरकार माजी नगरसेवक नरेश युवनाथे यांचा उपस्थित सकाळी १० ला होणार आहे,

तसेच बक्षीस वितरण समारंभ प्रेम बसंतानी माजी नगराध्यक्ष किशोर दिघे जिल्हा महामंत्री अंकुश ठाकरे प्रदेश सचिव भाजयुमो अशोक पिट्टलवार अध्यक्ष पद्मशाली समाज हिंगणघाट यांचा प्रमुख उपस्थित दुपारी ३.३० ला शितला माता मंदिर जुनी वस्ती येथे पार पडणार आहे…

यावल : यावल नगरपरीषदेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपरीषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

0

 

यावल /विकी वानखेडे 

 

नऊ महिन्यांपासून यशस्वीपणे सांभाळला पदभार
यावल नगरपरीषदेत मार्च 2022 पासून मनोज म्हसे यांची पदभार सांभाली होता मात्र प्रशासकीय कारणास्तव त्यांची मुरबाड, जि.ठाणे येथील नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली झाली आहे.

मनोज म्हसे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे आदेश 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीचे पत्र येथे प्राप्त झाले आहे.

यावल नगरपरीषदेचा पदभार आता कुणाकडे जातो? याकडे लक्ष लागले आहे

जालना शहरातील वाल्मीक नगर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी दहा जन गंभीर जखमी:

0

 

प्रतिनिधी:(जालना)शहरातील वाल्मीक नगर येथे दि.28 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने 10 जन गंभीर जखमी झाले आहेत.या सर्वा जनावय जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाल्मीक नगर येथे शेजारीच राहणार्‍या दोन कुटुंबात ही हाणामारी झाली असून,या घटनेत दोन्ही गटातील लोक जखमी आहेत.एका गटातील 7 जन जखमी आहेत.या जखमीमध्ये मध्ये 3 महिलांचाही समावेश आहे.यामध्ये नंदुसिंग राजपुत,देवा राजपुत,जित्तु राजपुत,जोमाबाई राजपुत,उमाबाई राजपुत,बायाबाई राजपुत,आदेश राजपुत अशी जखमींची नावे आहेत.तर दुसर्‍या गटातील 3 जन जखमी आहे.यामध्ये कलीम शेख शरीफ,अमजद शेख शम्मू,शेख सलमान शेख तमीज यांचा समावेश आहे.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु,सदरबाजार पोलीस ठाण्याचे स.पो.नि.ज्ञानेश्वर पायघन,चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पो.नि.नाचण यांच्यासह पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.सध्या घटनास्थळी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

धक्कादायक-मृत्युनंतरही सुरु होते उपचार,जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या ऑपरेशनचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या मुक्ताबाई साळुंके वय 65 रा.आवा-अंतरवाला,ता.अंबड, जि.जालना यांचा ऑपरेशनला घेऊन जातांना मृत्यु झाला. ही घटना दि. 29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली.आज होणार्‍या शिबीरामध्ये डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी 25 महिला रुग्णालयात अ‍ॅडमिट झाल्या होत्या.त्यात मुक्ताबाई साळुंके या देखील दि.28 डिसेंबर रोजी रुग्णालयात उपचारासाठी अ‍ॅडमीट झाल्या होत्या.त्यांच्या डोळ्यावर आज ऑपरेशन करण्यात येणार होते.परंतु,ऑपरेशन थेटरमध्ये जाण्यापुर्वी त्यांना भुलीचे इंजेक्शन दिले.त्यानंतर महिलेने चक्क्क मान खाली टाकली असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.परंतु,सदरील महिलेला कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन दिले नाही,तीला ऑपरेशनसाठी नेन्या आधिच हर्ट अटॅक आला असल्याने तीला उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलिवले.आणि इथे तिचा मृत्यु झाल्या असे उपस्थित डॉक्टरांनी सांगीतले.सदरील महिलेच्या संदर्भात डॉक्टरांना विचारले असता महिला ही मयत झाली आहे.परंतु,आयएमओ शिवाय मयत घोषीत करता येणार नसल्याचे त्यांनी सांगीतले.आयएमओ येईपर्यत मयत महिलेवर उपचार सुरुच होते.तोपर्यंत मयत महिलेच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना कळविले नव्हते.आयएमओ आल्यानंतर तपासणी करुन महिलेला मयत घोषीत केले व उपचार बंद करुन महिलेला लावलेल्या व्हेंटीलेटर मशिन देखील काढून घेण्यात आल्या. व नातेवाईकांना पेशंट मयत झाल्याचे सांगण्यात आले.मयत महिलेचे पीएम करण्यात येणार असल्याचे डॉ.परितकर यांनी सांगीतले आहे.

किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे दि.३० व ३१ रोजी तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा.

0

 

यावल (प्रतिनीधी) विकी वानखेडे

यावल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३
दि.३० व ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते स्पर्धा संपेपर्यंत डोणगाव किनगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगाव येथे होणार आहेत.

महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत यावल तालुकास्तरीय,पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकारी,कर्मचारी व
शिक्षक यांच्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम खालील प्रमाणे असणार आहेत

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी ओळखपत्राच्या फोटोवर सही व शिक्का असलेले परिपूर्ण माहिती भरलेले ओळखपत्र आवश्यक आहे.

सकाळी ८ वाजता ज्या खेळात सहभागी आहे त्या स्पर्धेत सहभाग घेतल्याबाबत संम्बधीत टेबल वर रिपोटींग करावी अन्यथा आपण गैरहजर आहे असे समजण्यात येईल.

खेळाडू स्पोर्ट्स किट (गणवेश) मध्येच असले पाहिजे यात पुरूषांनसाठी हाफ पॅट टी शर्ट तर महीला खेळाळूंनसाठी पंजाबी ड्रेस (पांढरा असल्यास चांगले राहिल)
स्पर्धेत येतांना सोबत एक वेळेचा पुरेसा जेवणाचा डबा सोबत आणावा तसेच.

खेळाडूंनी सदर स्पर्धेत कोणतेही मद्म सेवन करून आल्यास स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार नाही इ.नियम पाळणे खेळाळूंना बंधन कारक राहील असे सौ.मंजुश्री गायकवाड मॅडम गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी -१) तथा
क्रीडा समिती अध्यक्ष यावल एन.के.शेख गटशिक्षणाधिकारी तथा सचिव क्रीडा समिती यावल शिक्षण विभाग यावल, मुख्याध्यापक श्री.के.यु.पाटील समन्वयक क्रीडा समिती यावल.यांनी सांगीतले.

शालेय क्रीड़ा स्पर्धेत महेश ज्ञानपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी नवा विक्रम नोंदवीला

0

प्रतिनिधि सचिन वाघे

हिंगनघाट :- शालेय क्रीड़ा मध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर शाळेचा नाव लौकिक करण्यात विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले
वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदा इतकं मोठं विक्रम करणारी शाळा महेश ज्ञानपीठ ठरली आहे.

आजच्या जगात विद्यार्थ्यांच मैदानी खेळात मन नाही लागतं तरी त्यांचे क्रीडा प्रशिक्षक मुस्तफा बख्श नेहमी विद्यार्थ्यांना मैदानी खेळात प्रशिक्षण देऊन त्यांना शारीरिक मजबूत करतात.

महेश ज्ञानपीठ हायस्कुल आणि ज्यू. कॉलेज,हिंगणघाट च्या खेळाडूंची शालेय स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड फुटबॉल , हॉकी , क्रिकेट , योगा ,चेस , कराटे , बॉक्सिंग , एथलेटिक , ज्यूदो , कुश्ती , कॅरम इत्यादी विविध खेळात एकूण 105 खेळाडू विभागीय स्तरावर तर 22 खेळाडूंची राज्यस्तरावर
निवड झालेली आहे.

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट ची महेश ज्ञानपीठ शाळा एकमात्र शाळा ठरली.

विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर खेळाडूंची निवड झालेली शाळा महेश ज्ञानपीठ जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

शालेय क्रीडा मध्ये इतका मोठा विक्रम नोंदवणारया शाळेचे क्रीडा प्रशिक्षक मुस्तफा हबीब बख्श क्रीडा क्षेत्रात मोठं नाव आहे,
विभागीय स्तर, राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंनी विजयाचे श्रेय शाळेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधरबाबु राठी, संचालक मंडळाचे सर्व सदस्य , प्राचार्या वैशाली पोळ , उपप्राचार्य दिगांबर खटी, जिल्हा क्रीड़ा अधिकारी लेकुरवाड़े मॅडम , क्रीड़ा अधिकारी निमगडे सर, तालुका संयोजक खांडरे सर, तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श, सचिन मुळे , प्रणिता चिंतलवार व सर्व शिक्षक वृंदाना दिले
त्यांचे यशाबद्दल सर्व स्तरावरुण अभिनंदन करण्यात येत आहे

डॉ. निर्मेशकोठारी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपुर :- सुप्रसिद्ध डॉ. निर्मेशकोठारी यांच्या वाढदिवसा निमित्त फिल्टर प्लांट मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर सभापती मा. श्री. हिम्मत चतुर यांच्या प्रमुख उपस्थित व नगर पंचायत समुद्रपूर नगराध्यक्षा सौ. योगिता तुळनकर ,उपाध्यक्ष बाबाराव थुटे, जिल्हा अध्यक्ष ओ. बी. सी. सेल हरीश काळे, गुरूसिंह बावरा, मधुकर कामडी, महेंद्र शिरोडे यांच्या उपस्थितीमधे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्यावेळी सचिन तूळनकर , निशांत बोरकुटे तालुका अध्यक्ष अतुल चौधरी. उपाध्यक्ष. पवन मुडे अतुल टेकाडे अमित लाजूकर,रोशन शेळके , आक्षय दोडके,सौरभ घुमे,कुणाल कुडमते,विशाल असुटकर,ललित डगवर, प्रदीप डागवर, शंकरराव धोटे, रजु कटारे , शालिक वैद्य,रामभाऊ चौधरी चेतन तना,गजू सुर्वे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जेईएस महाविद्यालयात राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-जेईएस महाविद्यालयात सायन्स फोरम च्या वतीने दिनांक 24 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्द्घाटन आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज, सायन्स फोरम प्रमुख प्रा. डॉ. राजेश सरकटे, प्रा. डॉ. जवाहर काबरा, प्रा. डॉ. दिलीप अर्जुने, प्रा. डॉ. सुखदेव मांटे आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेमध्ये जवळपास 52 स्पर्धकांनी भाग घेतला.
पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धेचे परीक्षक प्रा. डॉ. गजानन तांबडे यांनी प्रेझेंटेशन कसे करावे व त्याचे मुल्यांकन कसे केले जाते

याच्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी संशोधन हे नावीन्यपूर्ण व समाजाभिमुख असले पाहिजे असे म्हटले.

तसेच अशा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी व भिन्न विषयाचे पोस्टर घेऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ. सुशांत देशमुख यांनी स्पर्धेमध्ये बक्षीस न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील स्पर्धेत चांगला विषय घेऊन सहभागी होण्याचे आव्हान केले.

स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अंबिका कोपले व विशाखा सरोदे यांना तर द्वितीय पारितोषिक लक्ष्मण शिंदे यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ 5 स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सुशांत देशमुख, प्रा. डॉ. उमेश मोगले व प्रा. डॉ. गजानन तांबडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जान्हवी शिरले व श्रावणी कुलकर्णी ने केले तर उपस्थितांचे आभार साक्षी चौंडिये हिने मानले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. जी. बी. कुलकर्णी, प्रा. डॉ. गणेश रोकडे, प्रा. डॉ. आमोल खांडेभराड, प्रा. संतोष मुंदडा, प्रा. स्वप्ननिल सारडा, प्रा. अरविंद महाजन, गजानन घोडके, सचिन जाधव आदींनी परिश्रम घेतले.

ग्रा प सदस्य पतीने खुर्ची मारून सरपंचास जखमी केले

0

 

शेगाव : विकास कामाच्या माहिती मागण्याच्या कारणावरून वाद
ग्रामपंचायत सदस्य पतीने सरपंचास खुर्ची मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथे बुधवारी घडली.

याबाबत असे की,नागझरी येथील
सरपंच गणेश रामभाऊ खरप वय 47 व ग्रा प सदस्य पती संतोष देविदास पवार हे ग्रामपंचायत कार्यालयात गावातील इतर लोकांसह घरकुल योजना संबंधी चर्चा करत असताना, पंधराव्या वित्त आयोगाची माहिती मागत होता.

त्यावर सरपंच खरप यांनी आरोपीला सध्या घरकुलाची चर्चा चालू आहे. इतर माहिती तू नंतर माग असे म्हटले असता, आरोपीने ग्रामपंचायत कार्यालयातील प्लास्टिक खुर्ची सरपंचांचे डोक्याला मारून जखमी केले.

याबाबत सरपंच खरप यांनी पो स्टे ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच संतोष पवार यांनी ही सरपंच खरप विरोधात तक्रार दिली असून पुढील शहर पोलीस तपास करत आहेत.