Home Blog Page 226

ग्राम पंचायत निकाल जाहिर १० गावात निवडून आले थेट जनतेतून सरपंच

0

 

शेगाव  इस्माईल शेख 

अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती *कुणी गुलालात रंगले तर कुणाचे स्वप्न भंगले

शेगाव – तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचे निकाल दुपारपर्यंत घोषित झाले. यामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती बघायला मिळाल्या तर काही गावात एकतर्फी निकाल लागल्याचे दिसून आले.

मागील काही दिवसांपासून ग्रा. पं. निवडणुकीने गावा-गावातील राजकारण ढवळून निघाले होते. १८ डिसेंबर रोजी मतदान होवून आज २० डिसेंबर रोजी निकाल घोषित झाले.

शेगाव तालुक्यातील १० ग्रा. पं. च्या मतमोजणीला आज सकाळी १० वा. सुरुवात झाली. येथील वाटिका चौकातील नवीन तहसील कार्यालयात निवडणूक विभागाच्या हॉलमध्ये मतमोजणी झाली.

यावेळी एका पाठोपाठ एका गावाचे निकाल घोषित झाले. यामध्ये काही ठिकाणी चुरशीच्या लढती बघायला मिळाल्या तर काही गावात एकतर्फी उमेदवार विजयी झाले.

विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकत्यांनी गुलाल उधळत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. बिजयी सरपंच हे आपल्याच पक्षाचे असल्याचा दावा राजकीय पक्षांकडून केल्या जात आहे मात्र विजयी झालेले हे सरपंच नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हे येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.

विजयी नवनिर्वाचित सरपंच

खातखेड – शितल रामेश्वर थारकर ४२८, कठोरा – सुषमा जितेंद्र खवले ४४९, येऊलखेड – सदानंद सारंगधर पुंडकर ३८७, लासुरा खु.- योगिता प्रशांत ढोले ४६९, पाडोदी – लता संतोष भरसाखडे ४७७, चिचखेड – मनकर्णा महादेव डुकरे ३१४, कुरखेड – विजय प्रल्हाद धंदर ४९६, तिव्हान खू. – दिपाली अमोल लांजुळकर १७९, माटरगाव खू. – सिध्देश्वर सुखदेव बोंबटकार ३८०, सगोडा – द्वारकाबाई तेजराव बाठे ३५९
यांचा विजय झाला आहे.

हिंगणघाट तालुक्यातील 12 ग्रामपंचायत विजयी सरपंच

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट तालुक्यातील 12 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी दि. 18 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले त्याचा आज दि. 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे सरपंच विजयी उमेदवार यांचा निकाल घोषित करण्यात आला.

1)येरणगाव
विठ्ठल लक्ष्मण आत्राम 357-
जगन चंपत आत्राम 336
2)नांदगाव कानगाव
ताई नारायण खापरे 328
शितल सतीश ठाकरे 318
3)सेलू मुरपाड
नीलिमा विठ्ठल धोटे 493
राधाबाई सदानंद खडसे 347
4 )पारडी नगाजी
अलका दिनकर पवार 350
आरती प्रवीण जगताप 132
5)सावंगी हेटी
किशोर दादाजी गुडदे 254
सचिन बळीराम सावकार 107
6 )धानोरा
रमेश तुळशीराम नारनवरे 366
ओम प्रकाश अनिल जांभुळे 356
7)पोटी
भास्कर विष्णुजी पारिसे 272
विजय केशवराव पोहनकर270
8)मनसावळी
प्रांजली मुकेश भोयर 446
राधा प्रवीण सुरजुसे325
9)काचनगाव
नंदाताई गजानन चिंचोळकर550
प्रेमिला शांताराम खोड 469
10) छोटी आर्वी
सुषमा अमोल मेश्राम 1109
जया सारंग येळके 904
11 ) आजनगाव
गीता मोतीराम टेकाम 265
सुनंदा रत्नाकर धोटे 163
12) धाबा ग्रामपंचायत अविरोध
जोशना प्रवीण बोकडे सरपंच
एकूण ग्रामपंचायत 12
टोटल सदस्य संख्या 88 बिनविरोध सदस्य 23,
1 रिक्त
तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्री सतीश मासाळ
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
1)कु. विद्या चंपतराव नगराळे.
काचनगांव, मनसावळी, पोटी
2)सौ.प्रिया सुर्यवंशी
आर्वी (छोटी),आजनगांव,नांदगांव का.
3)श्री.मारोती जायभाये धानोरा,येरणगांव ,दाभा
4)श्री. पंकज वाघमोडे
सावंगी (हे) पारर्डी न.सेलु मु.

सांगवी खुर्द च्या ३६ वर्षीय विवाहीत तरुणाने घेतला टोकाचा निर्णय गळफास घेऊन केली आत्महत्या

0

 

यावल : ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात एका ३६ वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची घटनासमोर आली असुन, याबाबत पोलीसात नोंद करण्यात आली आहे .

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की सांगवी खुर्द तालुका यावल येथील राहणाऱ्या घनश्याम सोपान कोळी वय३६ वर्ष यांनी आज दिनांक १९डिसेंबर रोजी अट्रावल शिवारातील सुभाष चौधरी यांच्या शेत बटाईने केलेल्या शेतात ते सकाळी गेले असता.

घनश्याम कोळी यांनी शेतालगतच्या असलेल्या बोरीच्या झाडाला दोरीच्या साह्याने हा विवाहीत तरूण गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळुन आला. सदर प्रकार शेतात कामास गेलेल्या उपस्थित शेत मजुरांच्या निदर्शनास आला व त्यांनी तात्काळ कोळी यांच्या कुटुंबांना सदरची माहिती क्लली.

तेव्हा मजुरांच्या सहाय्याने तात्काळ घटनास्थळा वरून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण, डॉ.सचिन देशमुख यांनी तपासणी अंती कोळी यास मृत घोषित केले. मयत घनश्याम कोळी यांच्या पक्षात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

या विवाहीत तरूणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळु शकले नाही. या संदर्भात रामकृष्ण भागवत कोळी यांनी यावल पोलिसात घटनेची खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.

अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यास अटक

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

मोरझाडी:पोलीस स्टेशन उरळ ठाणेदार अनंतराव वडतकर साहेब यांना आज दिनांक 19/12/22 रोजी सकाळी 10/30 वाजता
दरम्यान गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की एक इसम त्याचे मोटरसायकलवर ग्राम लोहाराकडून निंबा फाटाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक करणार आहे तात्काळ पोलीस स्टाफ सोबत घेऊन निंबा फाटा येथे पोहोचून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित मोटरसायकल चालक नामे उमेश विष्णू भालेराव वय 32 वर्षे राहणार जुना अंदुरा ताब्यात घेऊन त्याच्याकडून कॉलेज बॅग मध्ये McDowell’s no.1, 180 ml 24 बॉटल्स, imperial blue 14 बॉटल्स अशी एकूण 5940 रुपयाची इंग्लिश दारू व टीव्हीएस कंपनीची अपाची गाडी क्रमांक MH30 z 4917 किंमत अंदाजे 50,000/- असा एकूण मुद्देमाल 50,940/- आरोपीकडून जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्यवाही करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकर, पोलीस अंमलदार पद्मसिंग बैस ,सुनील सपकाळ, कांताराम तांबडे

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक

0

 

कोल्हापूर/तानाजी कुऱ्हाडे

१८ डिसेंबर कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदानासाठी मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त व शांततेत होत असल्याचे दिसत आहे. २०२२ ते २०२७ पंचवार्षिक ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी जनतेतून निवड होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सरपंच व सदस्यांना(उमेदवार) यांना काही पक्षातून पाठिंबा साथ मिळत आहे. तर काही उमेदवार आपल्या स्वतःच्या स्वबळावर लढत आहेत

. ग्रामपंचायतमधील आजी – माजी सरपंच,सदस्य व नवीन उमेदवार काही ठिकाणी दिसत आहेत. तर काही उमेदवार आपल्या जागेवर एका ठिकाणी आपल्या गावातील मतदार यांचे आभार मानताना दिसून येते आहेत.

मतदार यांचे मतदानासाठी मतदान केंद्रावर महिला, पुरुष व युवा यांची गर्दी लांबपर्यंत रांगेत उभे तर काही ठिकाणी कमी संख्या मधे मतदार आपल्या हक्काचे मत देण्यासाठी दिसत आहेत. मंगळवार दिनांक २० डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होणार आहे.

आता आजी – माजी सरपंच व सदस्यांची ओढ निकालाकडे.

 

जिल्हाध्यक्षपदी गजानन खंडाळे यांची नियुक्ती

0

 

मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
सिंदी रेल्वे ता.२० : शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक तथा काग्रेस कार्यकर्ते गजानन खंडाळे यांची मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे आणि महासचिव विजय सोनोने यांनी सर्वानुमते गजानन खंडाळे यांची निवड केली.

आपल्या निवडीबद्दल गजानन खंडाळे यांनी मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. असुन आपण समाजाच्या उत्थानासाठी स्वतःला यापुढे वाहुन घेऊ असे आश्वस्त केले.

सिंदी रेल्वे सारख्या छोट्या शहरातुन जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या गजानन खंडाळे यांचे सर्व स्तरातून तसेच मातंग समाज बांधवा कडुन अभिनंदन होत आहे.

जालना शहर वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार सुरेश राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

 

जालना शहर वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार सुरेश राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

(तुकाराम राठोड/जालना)

जालना-पाथरुड येथील रहिवासी तसेच जालना शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुरेश सोमा राठोड यांचे आज सकाळी हदयविकाराच्या झटक्याने औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू समय त्यांचे वय 52 वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,भाऊ,बहिण असा मोठा परिवार आहे.सुरेश राठोड यांना गुरुवारी दिनांक १५/१२/२०२२ रोजी हृदय विभागाचे झटक्या आल्यामुळे जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.काल त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथेच त्यांचे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या जाण्यामुळे परिसरामध्ये हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे.

(तुकाराम राठोड/जालना)

जालना-पाथरुड येथील रहिवासी तसेच जालना शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुरेश सोमा राठोड यांचे आज सकाळी हदयविकाराच्या झटक्याने औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू समय त्यांचे वय 52 वर्षे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,भाऊ,बहिण असा मोठा परिवार आहे.सुरेश राठोड यांना गुरुवारी दिनांक १५/१२/२०२२ रोजी हृदय विभागाचे झटक्या आल्यामुळे जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काल त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथेच त्यांचे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या जाण्यामुळे परिसरामध्ये हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे.

अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात उजळणी प्रशिक्षण शिबिर संपन्न..

0

 

उजळणी प्रशिक्षण शिबिर हे अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात घेण्याची मान्यता द्यावी .. (संगीता इंगळे ता.समादेशक)

प्रतिनिधी.अशोक भाकरे

अकोला होमगार्ड जिल्हा समादेशक मोनिका राऊत यांच्या आदेशावरून प्रशासकीय अधिकारी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित पुरुष होमगार्ड चे उजळणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात पुरुषांचे उजळणी प्रशिक्षण शिबिर क्रमांक ०७/१०/०२२ दिनांक ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आले होते. शिबिरामध्ये, कवायत, शस्त्र कवायत,पदकवायत उजळणी प्रशिक्षण घेन्यात आले.शिबीराकरीता पातुर,अकोला, अकोट, बाळापूर, मुर्तिजापूर येथील सैनिकांनी सहभाग घेतला होता.उजळणी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमा चे आयोजन १६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते .यावेळी समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी शेख हे होते तर मार्गदर्शक प्र.केंद्र नायक शेळके, तसेच प्र.सा.सु.जयस्वाल, अभिषेक देशमुख,समादेशक सुरेश नाठे अकोट,समादेशक राजु खडसे,यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमांमध्ये माजी. होमगार्ड म्हसने यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामधे प्र.अधीकारी शेख,प्र.केंद्र नायक शेळके,समादेशक संगीता इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. उजळणी प्रशिक्षण शिबिर हे होमगार्ड जिल्हा कार्यालयात संपन्न झाले.त्यामुळे शिबीर प्रशिक्षणार्थी अत्यंत खुश व आनंदात होते.
संगीता इंगळे सह पाचही समादेशकांनी पुढील होणारे उजळणी प्रशिक्षण शिबिर हे अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात घेण्याची विनंती केली. होमगार्ड जिल्हा कार्यालयातील आठ दिवसाचे पुरुष उजळणी प्रशिक्षण शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समादेशक राजू खडसे यांनी केले.

यावल  तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता शनीवारी निवडणूक साहित्यासह कर्मचारी रवाना झाले.

0

 

यावल विकी वानखेडे  

यावल तहसील कार्यालयात कर्मचार्‍यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. आठ ग्रामपंचायतीच्या 35 बुथमध्ये रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

सरपंच पदाकरीता 28 तर 52 सदस्य पदाकरीता 136 उमेदवार रींगणात असून सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होईल.

या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक, कासारखेडा, न्हावी, चुंचाळे, पिळोदा बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोडा या आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.

या निवडणुकीत पिळोदा बुद्रुक ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचासह सात ग्रामपंचायतीमधून 26 सदस्य माघारीत बिनविरोध ठरले होते तर उर्वरीत सात ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदाकरीता 28 तर 52 सदस्यापदाकरीता 136 उमेदवार रींगणात आहेत.

आठ ग्रामपंचायतीत रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

सोमवारी हाती येणार निकाल निवडणुकीसाठी तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी हनीफ तडवी, बबीता चौधरी, एस.एल. पाटील, सचिन जगताप, एन.पी.वैराळकर, एम.पी.देवरे, शेखर तडवी आदी लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सोमवार, 19 रोजी सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात होईल.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे

यावल तालुका हादरला : बोरावलला शेतात जमिनीत पुरलेला हात बॉम्ब निंदणी करतांना फुटला ; महिला गंभीर जखमी

0

 

यावल तालुका( प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल : तालुक्यातील बोरावल बुद्रुक शेत शिवारामध्ये निंदणी करत असतांना महिलेचा गावठी बनावटीचा हात बॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याने या घटनेत महिला गंभीर जखमी झाली.

ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. जखमी महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिला जळगावी हलवण्यात आले.

रानडुकरांच्या शिकारीच्या उद्देशाने फासेपारधींनी हातबॉम्ब शेतात पुरल्याचा संशय आहे.

55 वर्षीय महिला गंभीर बोरावल बुद्रुक, ता.यावल या शिवारात तापी नदीच्या किनारी नरेश लक्ष्मण जावळे (रा.राजोरा) या शेतकर्‍याचे शेत असून या शेतात त्यांनी हरभरा पेरणी केली आहे.

शुक्रवारी या हरभर्‍याच्या शेतात महिला मजुर निंदणी करीत असताना बेबाबाई पंडित सोनवणे (55, रा.राजोरा) या महिलेला एक गोळा आढळला व महिलेच्या स्पर्शाने छेडछाडदरम्यान गोळ्याचा विस्फोट होवून त्यात बेबाबाई सोनवणे यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली.

या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटं तुटली आहेत. ब्लास्टनंतर शेतातील मजुरी करणार्‍या महिला या सैरावैरा पळाल्या.
महिलेची प्रकृती गंभीर शेतकरी नरेश जावळे यांनी जखमी अवस्थेतील महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपपरीचारीका मनीषा धांडे, नेपाली भोळे, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले व त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

शिकारीच्या उद्देशाने लावले असतील हात बॉम्ब
शेतासह परीसरात फासेपारधींकडून रानडुकरांच्या शिकारीसाठी अशा पद्धतीने गावठी बनावटीचे हात बॉम्ब बनवून जमिनीत पुरले जातात.

शेत मशागतीत हा बॉम्ब जमिनीत गाढला गेल्याचा अंदाज असून महिलेने त्यास स्पर्श करून छेछाड केल्याने त्याचा ब्लास्ट झाल्याचे शेतकरी नरेश भंगाळे म्हणाल