Home Blog Page 227

लग्न मंडपातून घरी आणून लेकीला फासावर चढविले:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-गावातील एका मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी झाली; पण लग्नापूर्वीच अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्यावरून बिनसले. संतापलेल्या वडील व काकांनी मुलीला मंडपातून ओढत घरी आणले.

बदनामीच्या रागातून त्या दोघांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले.

दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला. राख दोन पोत्यात भरून ठेवली. हृदय पिळवटून टाकणारी ही ऑनर किलिंगची घटना जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथे बुधवारी उघडकीस आली. ज्या ठिकाणी मृतदेह जाळला होता, तेथे रांगोळी काढल्याचे दिसून आले आहे.

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन-मा.आ. नरेंद्र पवार.

0

—————————————-
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थीत रहावे – डॉ.रमेश तारगे
—————————————-
जालना(प्रतिनीधी)भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागपूर येथे आयोजित करण्यात आले.

असून,या अधिवेशनास जालना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जालना जिल्हा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश तारगे यांनी केले आहे.

नागपूर येथील भटके विमुक्त आघाडीच्या अधिवेशनास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर,मंत्री अतुलजी सावे,मा.खा.डॉ.विकास महात्मे,खा.प्रीतमताई मुंडे,आ.श्रीकांत भारतीय,भिकुजी विधाते,विश्वास पाठक,अतुल वझे,रामेश्वर नाईक आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय होणार आहे.युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी.तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी हे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे.

या अधिवेशनात भटके विमुक्त आघाडीचे संपूर्ण राज्यातून व प्रत्येक जिल्ह्यातून महिला,युवक,युवती मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असेही डॉ.तारगे यांनी सांगितले आहे.

मराठवाडा स्वतंत्र राज्य निर्माण समीती ची स्थापना:

0

 

Jalna (तुकाराम राठोड)

जालना-दि.14/12/2022 मराठवाडा स्वतंत्र.राज्य निर्माण करण्यासाठी रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे बैठक संपन्न
बैठकीत मध्ये कार्यकारिणी जाहीर

मराठवाडा स्वतंत्र राज्य निर्माण समीती चे अध्यक्ष पदीं ऍड.गुणरत्न सदावर्ते यांची एकमुखाने नियुक्ती करण्यात आली,तर सचिव म्हणून दत्ता भाऊ पार्थीकर,औरंगाबाद तर.

कोषाध्यक्ष म्हणून.गजानन भांडवले जालना यांची एकमुखाने नियुक्ती करण्यात आली.तर सल्लागार समिती जे.के.जाधव, औरंगाबाद,प्रा बाबा उगले जालना.

रवींद्र बोडखे औरंगाबाद सौ.शकीलाताई पठाण औरंगाबाद,सौ अमृताताई चव्हाण औरंगाबाद,रमेशराव मुळे औरंगाबाद,जोगश सर औरंगाबाद,बाबुराव गोल्डे जालना,ऍड.रेवणनाथ भोसले उस्मानाबाद,बसवराज आयमद उस्मानाबाद,निपाणीकर सर उस्मानाबाद,डॉ.भागवत नाईकवाडे बीड,अर्जुन उजागरे बीड,ऍड.डि.आर.देशमुख परभणी,सुभाष दादा जावळे परभणी,डॉ.पि.के गुटटे परभणी ,प्रा.यशवंत कसबे पाटील परभणी,प्रा सुनील जाधव हिंगोली,रामेश्वर शिंदे हिंगोली,जोंधळे परभणी,विध्याश्री सुर्यवंशी नांदेड,रमेशराव वाघमारे नांदेड,रंगनाथराव ढवळे नांदेड,इंदरजीत पाटील लातूर, प्रा बि.एम.पठाण लातूर ईत्यादी पदाधिकरी च्या नियुक्ती घोषणाकरण्यात आली.

उर्वरित पुढील नियुक्ती आता लगेच मराठवाडा दौरा काडुन पुढील नियुक्ती करण्यात येतील अशी माहिती ऍड.सदावर्ते यांनी दिली व पुढे बोलताना जो कोणी मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी आडवा येईल एका रेषेत सरळ करू व जो मराठवाडा राज्य स्वतंत्र करण्यासाठी मदत करील,त्यांचे स्वागत करु व मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी मराठवाडा तील जनतेने पुढाकार घेवा आशे आवाहन ऍड.सदावर्ते यांनी केले.

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून डॉ,मंजुश्री गायकवाड (बोरसे )यांची नियुक्ती

0

 

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल : यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून डॉ,मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांनी आज गुरुवार रोजी पदभार स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसापासून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद हे रिक्त होते

व प्रभारी पदभार एकनाथ चौधरी सहाय्यक गटविकास अधिकारी अंमळनेर यांच्याकडे होता त्यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी पदाचा चार्ज श्री अजय चौधरी सहाय्यक गटविकास अधिकारी भुसावळ यांच्याकडे होता. मात्र आता यावल पंचायत समितीला कायमस्वरूपी गट विकास अधिकारी पदभार आहे

. गुरुवार रोजी डॉ मुंजुश्री गायकवाड यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आगामी काळात पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वेळत पुर्ण होण्यासाठी आपले प्राध्यान्य असे असे प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगीतले.

आहे तसेच त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा यावल तालुका ग्रामसेवक युनियन कडून स्वागत सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमातला रुबाब तडवी तालुकाध्यक्ष व पी व्हि तळले सचिव , बीके पारधी उपाध्यक्ष पारोळा सोसायटी हितू महाजन राजू तडवी राजेंद्र महाजन घरकुल प्रोग्रामर मिलिंद कुरकुरे व तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर अधिवेशनावर “महामोर्चा” धडकणार.

0

 

अनिलसिंग चव्हाण  मुख्य संपादक

नागपूर:-महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा योजना ही केंद्र सरकार व राज्य सरकार पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना सन १९९९ पासून राज्यात सुरू असून या योजनेच्या संपूर्ण यशस्वीतेची जबाबदारी या विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे.

गुणवत्तेचा संपूर्ण डोलारा करार कर्मचारी यांच्यावरच निर्भर आहे.तसेच गुणवत्ता विकास,शाळा सिध्दी,माहितीचे संकलन आणि विश्लेषण, शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे,भौतिक सुविधा,दिव्यांग प्रवर्गातील विविध शैक्षणिक योजना या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर राबविण्यात येत आहे

 

.विद्यार्थी-शिक्षक शाळा आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी या करार कर्मचाऱ्यांचा उपयोग करून घेतल्या जात आहे.परंतू बिस ते बावीस वर्षे लोटूनही या कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत अद्यापही कायम केलेले नाही. सोबतच तुटपुंज्या मानधनावर काम करवून घेतले जाते.

पाच वर्षे लोटूनही महागाईच्या काळात सुद्धा एक रुपया मानधानात वाढ केलेली नाही. किमान समान काम समान वेतन हि बाब लागू करणे संविधानिकदृष्ठ्या आवश्यक असतांना शासनाला आता पर्यंत जाग आलेली नाही अशी भावना राज्यातील समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.

या कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेत जीवन जगावे लागत आहे.

मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि कुटुंबातील सदस्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.कित्येक कर्मचारी मृत्यूमुखी पडले तर कित्येकांनी वयाची मर्यादा ओलांडली आहे.

सद्याच्या शिंदे व फडणवीस सरकार कडून या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागु करावी,६०% मानधानात वाढ करावी,सेवानिवृत्ती वयाची ६५ वर्षे करावी या सारख्या मागण्यांसाठी २३ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा धडकणार असल्याचे महामोर्चा कृती समितीच्या आयोजकांनी सांगितले आहे.

सेवा निवृत्त शिक्षक शेतकऱ्याचा केळीचा माल जम्मू काश्मीरला रवाना.

0

 

विकी वानखेडे  यावल

याबाबत प्राप्त माहिती अशी की यावल तालुक्यातील वड्रा येथील से.नि शिक्षक यांनी आपल्या पेन्शनच्या भरोवश्यावर न राहता स्वतः शेतकरी म्हणून केळी पिकाची लागवड केली. आणि त्याची मशागत करून त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे केळीचे उत्पादन घेतले व त्या केळीची विक्री काश्मीरला रवाना केल्याचे समजते.

यावल तालुक्यातील वर्डी गावचे सेवानिवृत्त शिक्षक धनंजय शेणू पाचपोळ यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली त्यांच्याजवळ स्वतःची शेती असल्याने ते सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनच्या भरोश्यावर न राहता शेतकरी म्हणून त्यांनी शेती करून आपल्या शेतात केळीची शेती करून मशागत केली आणि उत्कृष्ट केळीचे उत्पादन घेतले. यावर्षी त्यांच्या बागास पहिल्या वेळेस १३५०/-रुपये तर दुसऱ्या गाडीला १९००/- रुपये भाव मिळून आज दि. १४/ डिसेंबरला तिसऱ्या गाडीला २२००/-रुपये चा भाव मिळाला असून हा माल रावेर येथील व्यापारी मोंटी शेठ यांनी खरेदी करून तो माला जम्मू-काश्मीरला रवाना केला आहे .विशेष म्हणजे त्यांनी प्रति टन काट्यावर त्यांना ऑनलाईन पेमेंट केल्याचे समजते.

अकोला ग्रा.पं. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

0

 

प्रतिनिधि अशोक भाकरे अकोला

अकोला दि.१३ जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे.

त्या पार्श्वभुमिवर निवडणूक यंत्रणेचा पूर्वतयारीचा आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलीस उपअधीक्षक नितीन शिंदे, सहा. पुरवठा अधिकारी संतोष शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मतदान पूर्व तयारी.

मतदान यंत्रे, (बॅलेट युनिट कंट्रोल युनिट इ.), मतदान केंद्रांवरील सोई सुविधा, संवेदनशील मतदान केंद्र, आवश्यक पोलीस बंदोबस्त, वाहन व्यवस्था, मतदान यंत्रे ठेवण्यासाठी निर्धारीत केलेल्या स्ट्रॉंग रुम इ. सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला.

यासंदर्भात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून सुव्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यंत्रणांना दिले

शेतकरी संघटनेचे देवकृपा लॉन्स मंगल कार्यालय घोडेगाव फाटा ता.जि.जालना येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शरद जोशी यांच्या सातव्या पुण्यास्मरण च्या निमित्ताने शरद जोशी ना अभिवादन करून कैलास तवार यानी विविध विषयांवर मार्ग दर्शन केले.

.त्या नंतर शेतकरी संघटनेचे युव प्रदेश अध्यक्ष सुधीर भाऊ बिंदु यांनी शरद जोशी यांचे राहीलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षे भराचा कार्यक्रम दिला.

यानंतर शेतकऱ्याचे कैवारी मराठी चित्रपटाचे अभिनेते दिग्दर्शक राजकुमारजी तांगडे यांनी शरद जोशी यांच्या संपूर्ण आठवणी सांगुन,शरद जोशी यांचा जिवनावरील संपूर्ण चित्रपट ऊलगडीला व नेता कसा असावा.

तर फक्त शरद जोशी सारखाच आसावा असे सांगितले आहे.यावेळी डॉ.कदम,शिवाजी महाराज भोसले,बाबुराव गोल्डे,डॉ.काळे,नितीन देशमुख,सदाशिव खलशे,नाथा सस्ते,ज्ञानदेव काकडे,लक्ष्मण मोहीते,विश्वंभर भानुशे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातुन पुंजाराम सुरूंग,संताराम राजबिंडे,अलकताई गवळी,निर्मलाताई भांडवले,महादेव काकडे,अशोक खलशे,महादेव राजे जाधव,क्षिरंग मोहीते,संतोष खराबे,भगवान काकडे,काकडे चेअरमन,रंगनाथ शिंदे,आपा चोखनफळे,निकम,भाऊसाहेब कचरे,ईत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहभाग नोंदवला यावेळी हनुमान अडसूळ व संतोष खराबे यानी शरद जोशी साहेब यांच्या वर गित सादर केले.

या कार्यक्रमासाठी रेवगाव,घोडेगाव,सेवली,बोरगाव,जयपुर,वडीवाडी तसेच जालना, परतुर,मंठा,भोकरदन,बदनापूर, घनसावंगी,आबंड,जाफ्राबाद असे सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुत्रसंचालन,लक्ष्मण कावळे,तर आभार प्रदर्शन गजानन पाटील भाडवले यानी मानले.

शहरामध्ये चारचाकी वाहनातुन विदेशी दारूची वाहतूक 5,86,100 रू., माल जप्त

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :– 12 डिसेंबर रोजी मुखबीरचे विश्वसनीय खबरेवरून पोहवा. शेखर डोंगरे, ना.पो.शि.निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, व , सचिन भारशंकर यांनी कलोडे चौक, हिंगणघाट येथे नाकेबंदी करून मारोती स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-40 / KR-5590 यावर प्रो. रेड केला असता, कार चालक आरोपी स्वप्नील सुभाषराव हुलके व त्याचा साथीदार नितेश दिवाकर अराडे, दोन्ही रा. हिंगणघाट यांचे ताब्यातुन मारोती स्विपट डिझायर कार क्र. MH-40/KR-5590 चे डिक्कीमधुन पाच खोक्यामध्ये प्रत्येकी 375 एम.एल.च्या 106 विदेशी दारूच्या शिशा दारूने भरलेल्या किं. 63,600 रू. चा माल बिनापास परवाना बाळगुन त्याची अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मोक्यावर रंगेहात मिळुन आले.

आरोपीच्या ताब्यातुन मोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू साठा व कार, दोन अॅन्ड्राईड मोबाईल व नगदी 2500 रू. असा 5,86,100 रू. चा माल जप्त केला. गुन्हा नोंद करून इतर आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.

खेळ मांडीयला महिला भगिणीसाठी कार्यक्रम संपन्न:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक,अध्यक्ष व माजी केद्रीयमंत्री अशा सर्व क्षेत्रात पदभुषविलेले पद्मभुषण श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घनसावंगी येथे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

यापैकी खेळ मांडीयला हा एक कार्यक्रम फक्त महिला बघिणीसाठीचं या कार्यक्रमाचा खरा उद्देश आमच्या महिला बघिणींच्या चेहऱ्यावर हसू ,आनंद पाहुन सार्थक झालेले दिसले.

आमच्या महिला बघिणींना आपल्या रोजच्या कामाच्या व्यापातुन थोडा आनंदाचे क्षण उपभोगता यावे यासाठी आपले कर्तव्यदक्क्ष माजी आरोग्य मंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ.मनिषाताई राजेश टोपे यांचे आपल्या समाजाप्रती सतत काहीना काही चालू असते.

नेहमीचं पुरुषमंडळीसाठी कार्यक्रम होत असतात. एखाद्या कार्यक्रम महिलासाठी व्हावा यामध्ये सर्व महिलांना सहभागी होता आले पाहिजे यासाठी त्यांनी महिला बघिणींसाठी मराठवाड्यात पहिल्यांदा एका आगळ्यावेगळ्या होम मिनिस्टर फेम अंतर्गत सुप्रसिद्ध आदेशजी बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयला हा कार्यक्रम आयोजित केला.महिला बघिणींच्या या दोन ते तीन तासात वेगवेगळ्या विभागातुन ,समाजातुन आलेल्या महिला मंडळींनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून जणु एका प्रकारे नविन विक्रमचं घडवला आहे.

या तीन तासात रोजचे दुःख विसरून माय माऊलींनी निखळ आनंद घेतला यातचं या झालेल्या कार्यक्रमाचे सार्थक झाले आहे.पहिले बक्षीस ,दुसरे बक्षीस,तीसरे बक्षीस व काही शेकडो प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली.

पण यापेक्षाही काही महिला बघिणींनी आपले मत व्यक्त करतांना आम्ही बक्षीस मिळाली नाही म्हणुन बिलकुल नाराज नाही क्षणभर आनंद मिळाला हेचं खुप झाले.असे महिलासाठी कार्यक्रम नेहमीच आयोजित करण्यात यावे अशा भावनाही काही महिलांनी व्यक्त केल्या आहेत.असे कार्यक्रम घेतल्याबद्दल सौ.मनिषाताई टोपे व राजेशभैय्या टोपे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.