Home Blog Page 23

Hingnghatnews /राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी ज्ञानदा स्कूल सातेफळ चे 5 खेळाडूंची निवड

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शेलूबाजार, जिल्हा वाशिम येथे नुकत्याच पार पडलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर शुटिंगबॉल स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या मुले व मुलींच्या संघांनी उपविजेतेपद पटकावले.

यामध्ये उत्कृष्ट खेळ करणाऱ्या ज्ञानदा स्कूल सातेफळ येथील 5 खेळाडूंना राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी राज्य संघात निवडण्यात आले आहे.यामध्ये चैतन्य पाल , नमस्वी ठाकरे , वेदिका गमे , त्रिवेणी दाडे , ज्ञानेश्वरी थेरे २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान बौद्धगया (बिहार) येथील कालचक्र मैदानावर होणाऱ्या ४४ व्या राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी झाली आहे.

जाहिरात

या यशाबद्दल खेळाडूंना त्यांनी या विजयाचे श्रेय शाळेचे
काशिनाथ लोणारे सर कोषध्यक्ष लकी खिलोसिया सर सह सचिव निकीत गेडाम सर मुख्याध्यापक
जिल्हा क्रीड़ा अधिकारी आशा मेश्राम , क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे क्रीड़ा अधिकारी अनिल निमगडे सर, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी क्रीडा अधिकारी

सांजली वानखेडे रवी काकडे अॅमेच्युअर शुटिंगबॉल असोसिएशन, विदर्भ प्रदेश व वर्धा जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन तर्फे अरविंद गाबडा (अध्यक्ष, विदर्भ प्रदेश शुटिंगबॉल असोसिएशन), किशोर (उपाध्यक्ष),

Hingnghatnews /शकिलोद्दिन काजी (सचिव), शुभम चव्हाण (अध्यक्ष, जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन), रोहितकुमार गुप्ता (उपाध्यक्ष), विनोद भुते (सचिव), आकाश किलनाके (सहसचिव),तालुका संयोजक खांडरे सर तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा बखश , व सर्व शिक्षक वृंदाना दिले.

Ajitpawar/माजी आमदार राजु तिमांडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यकर्त्यांसह करणार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश..

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- माजी आमदार राजू तिमांडे हे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये अनेक राजकीय फेरबदल होताना दिसून येत आहे. यात राजू तीमांडे हे आपले जुने सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्यासोबत परत नव्या उमेदीने काम करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहे.

Bjpnews/विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजप मधे राजकीय प्रवेश..

विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर राजू तिमांडे यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र सध्या सर्वत्र परिस्थिती वेगळी आहे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल असे चित्र अजिबात नाही.

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, व शिंदे शिवसेना यात हिंगणघाट शहरामध्ये भाजप व आता राजू तिमांडे यांचा अजित दादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष भक्कम मजबूत पहावयास मिळेल. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मोठी ताकद तर शिवसेना उबाठा पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात असल्याने हे दोनही पक्ष प्रबळ दावेदार आहेत.

काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरात जेमतेम बांधणी असल्याने हा पक्ष नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिंदे शिवसेनेप्रमाणेच मागे पहावयास मिळेल. मात्र यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्ष हा अतिशय मजबूत असल्याने व ओबीसी किंवा ओपन अशी उमेदवारी थेट जनतेच्या नगराध्यक्षाची आल्यास राजू तिमांडे यांची दावेदारी ही प्रबळ मानली जाईल फेसबुक, व्हाट्सअप , तसेच शहरातील मुख्य चौकात, सध्या याच विषयावर सगळीकडे चर्चा सुरु असल्याचे दिसले

. यामुळे उदया राष्ट्रवादीमध्ये होणारा माजी आमदार राजु तिमांडे यांचा प्रवेश हिंगणघाट नगरपालिकेचे चित्र बदलवणारा असेल! कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर कोठारी यांनी तत्पूर्वी हिंगणघाट नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पद भूषवले आहेत. मात्र मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुधीर कोठारी यांची जमानत जप्त झाली होती.

यामुळे कोठारी यांचा तीमांडे यांच्यावर डाव लावण्याचा हा पक्षप्रवेशाच्या माध्यमातून प्रयत्न तर नाही? राजू तिमांडे हे जर राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार झाल्यास राष्ट्रवादी पक्ष हा मोठा पक्ष म्हणून हिंगणघाट नगर पालिकेत पहावयास मिळण्याची शक्यता आहे. सध्या हिंगणघाट मध्ये अजित पवार येणार या पेक्षा जर तर चर्चेला जास्त उधाण आल्याचे दिसत आहे

Bjpnews/विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजप मधे राजकीय प्रवेश..

0

 

आज सर्किट हाऊस कराड येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या विचारांवर विश्वास ठेवून पक्षात दाखल झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार अतुल बाबा भोसले यांनी स्वागत केले.

ह्या वेळी आमदार अतुल बाबा भोसले म्हणाले की या कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे कराड तालुक्यातील संघटन अधिक बळकट होईल, याचा मला विश्वास आहे.
यामुळे कराडसह जिल्हाभरातील जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी नवी ताकद आणि नवा आत्मविश्वास मिळणार आहे.

Hingnghatnews/ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट शाळेचा बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर झेप.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली सशक्त भारत – आत्मनिर्भर भारत या ध्येयाकडे वाटचाल करताना सातारा जिल्हा निश्चितच आघाडीवर राहील.

यावेळी श्री. प्रदीप भोसले, श्री. अनिल वडार, श्री. अनिल चौगुले, श्री. संतोष पवार श्री. राहुल वाडकर, श्री. भास्कर वाडकर, श्री. चांद मुल्ला, श्री. रोहित सकटे, श्री. विनोद वरनारायण, श्री. समीर सय्यद, श्री. सचिन वल्लाळ, श्री. विक्रम वरनारायण, श्री. सागर मोहिते, श्री. अब्दुल मुल्ला श्री. मोहसीन जमादार, श्री. आकाश पवार यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

हेमंत पाटील
सूर्या मराठी न्यूज साठी
कराड

Hingnghatnews/ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट शाळेचा बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर झेप.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, दि. 18 व 19 ऑगस्ट 2025. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांचा वतीने महेश ज्ञानपीठ हिंगणघाट येथे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्षाखालील मुलींच्या गटात अथर्वी ढगे हिने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळावीला तसेच 14 वर्षाखालील मुलामध्ये चैतन्य लाखे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळावीला.

Maharashtra Cabinet Meeting / राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : घरांसाठी मोफत वाळू आणि झोपडपट्टी पुनर्वसनाला गती

वयोगट 17 वर्षाखालील मुलांच्या गटात सारंग उमाटे या विद्यार्थांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला. या विजया नंतर तीनही स्पर्धकांनी वर्धा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अन्य साधारण आहे शाळेचे संस्थापक गिरधर राठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करीत असतात. *विद्यालयाची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे वर्षानुवर्षाची विजयाची परंपरा बुद्धिबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. यापूर्वी सुद्धा या शाळेतील विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत नवे उच्चांक प्रस्थापित केले आहे.

Hingnghatnews/क्रीडा शिक्षकांचे योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सक्षम होऊन अशा स्पर्धेमध्ये यश मिळवत आहेत ही विशेष बाब.मुलांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिरधर बाबूजी राठी

Darunews / पळशी झाशी येथे श्री रामकिसन  माळी साहेब पोलीस  यांच्या नेतृत्वात अवैध दारू भट्ट्या उध्वस्त

(संस्थापक – ज्ञानदीप विद्यानिकेत हिंगणघाट व वाघोली ), अर्पना राठी ( अध्यक्षा ), रशेष राठी (सहसचिव ), प्रवीण धोबे (कोषाध्यक्ष), अभिनव जैस्वाल ( मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट ), रोहन हुमाड (क्रीडा शिक्षक ) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेता खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.

Darunews / पळशी झाशी येथे श्री रामकिसन  माळी साहेब पोलीस  यांच्या नेतृत्वात अवैध दारू भट्ट्या उध्वस्त

0

 

दिनांक 15 ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन भव्य मोटर सायकलने गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, माजी सैनिक, ग्रामपंचायत उपसरपंच पंचफुलाबाई पवार, गावकरी मंडळी यांच्यामार्फत पोलीस स्टेशन संग्रामपूरला निवेदन देण्यात आले होते,

तरीही गावातील काही दारू विक्री प्रमाण चालूच होते, त्यामुळे आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी माननीय श्री रामकिसन माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात सापळा रुचून गावात सुरू असलेल्या अवैध भट्ट्या निस्तनाभूत करण्यात आल्या, त्यावेळी शेख सलीम शेख सत्तार होमगार्ड प्रफुल मारोडे ( बबलू) सरपंच पती राहुल मेटांगे उपस्थित होते.

Darunews/कारवाई पूर्ण झाल्यानंतर सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, सचिव हेमंत बापू देशमुख व गावकरी मंडळी यांच्या वतीने माननीय श्री राम किसनजी माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शेख सलीम शेख सत्तार होमगार्ड, व गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मारोडे, यांचा शाल श्रीफळ व छत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Bloodbank/ संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरामध्ये 163 जणांचे रक्तदान

0

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. 17 ऑगस्ट रोजी संत निरंकारी सत्संग भवन, खामगांव या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 163 जणांनी रक्तदान केले आहे.

शिबिराचा शुभारंभ खामगांव मुक्तेश्वर आश्रम चे मान्यवर मुक्तेश्वर कुलकर्णी जी तसेच सोबतच जिल्हा संयोजक संतोष जी शेगोकार ह्यांनी केले.

संत निरंकारी मिशन च्या माध्यमातुन मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये – स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नैसर्गिक संकटाच्या वेळी सहायता असे अनेक जनसेवेचे उपक्रम राबविण्यात येतात.

PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम? 

आपण मानव आहोत रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो असा सुदंर संदेश देण्यात येतो.
रक्त संकलन जिल्हा शासकीय रूग्णालय खामगाव ब्लड बँक, अकोला जिल्हा शासकीय रूग्णालय ब्लड बँक यांच्या माध्यमातून करण्यात आले.

Bloodbank/या शिबिरासाठी खामगाव मुखी अजयजी छतवानी ह्यांच्या देखरेखेखाली सेवादलच्या युनिट नं 689 चे संचालक, शिक्षक महात्मा तथा बहेनजी सोबतच युवकांचे व अन्य स्थानिक भक्त गणांचे मोलाचे सहकार्य लाभले. खामगांव तसेच आजुबाजूच्या परिसरातील युवकांनी भरभरून रक्तदान करून मानवतेच्या या महान यज्ञरूपी कार्यामध्ये आपले अतुलनीय योगदान दर्शविले.

Policenews/प्रतिबंधीत तंबाखुची अवैध्द वाहतुक विक्री करणारा हिंगणघाट पोलीसांचे जाळयात

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दि. 16/08/2025 रोजी पेट्रोलींग डयुटी करीत असतांना मिळालेल्या माहिती प्रमाणे एक इसम हा त्याचे ताब्यातील मोपेड गाडी क्र. एम.एच. 32 ए.झे 3922 ने सुगंधीत तंबाखुची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन होला कंपनीचा संुगधीत तंबाखु एकुन 10 की.लो की. 13,250/ व मोपेड गाडी की.80,000/रू. असा एकुन 93,250/रू. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

महाराश्ट्र राज्यामध्ये शासनाने प्रतिबंधीक केलेला तंबाखु आरोपीचे ताब्यात मिळुन आल्याने अन्न सुरक्षा विभाग वर्धा यांना माहिती देवुन अन्न सुरक्षा विभाग वर्धा येथील अधिाकरी यांचे लेखी रिपोर्ट वरून आरोपी सुरज रमेश कामडी वय 31 वर्ष राहणार हनुमान वार्ड हिंगणघाट विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.

Policenews / हिंगणघाट पोलीसांची अवैध्द दारू विक्रीवर कारवाई

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अनुराग जैन , वर्धा , अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे , उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशिलकुमार नायक यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट ठाणेदार पोलीस निरिक्षक देवेन्द्र ठाकुर यांचे

Policenews /मार्गदर्शनामध्ये गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार. प्रविण बावणे, पोलीस नाईक निलेशसिंग सुर्यवंशी, नरेंद्र आरेकर, पोलीस शिपाई सागर सांगोले, संतोष गिते यांनी केली.

Policenews / हिंगणघाट पोलीसांची अवैध्द दारू विक्रीवर कारवाई

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणधाट :- दी. 18/08/25 रोजी नाईट पेट्रोलींग डयुटी करीत असतांना मिळालेल्या माहिती प्रमाणे दाभा गावाकडुन हिंगणघाट शहराकडे येणारे रोडवर नाकेबंदी करीत असतांना आरोपी सुनिल शरबत भोसले व त्याचे पत्नी मिना सुनिल भोसले हे त्यांचे मोपेड गाडी क्र. एम.एच. 32 ए.एयु. 6327 ने अवैध्द गावठी मोहा दारूची वाहतुक करीत असतांना पंचासमक्ष मिळुन आले.

आरेापीचे ताब्यातुन 8 प्लास्टीक पन्न्यांमध्ये एकुन 80 ली. गावठी मोहा दारू की. 12000/रू. व एक जुपीटर कंपनीची मोपेड गाडी एम.एच. 32 ए.एयु. 6327 जुनी वापरती की. 80,000/रू. असा. एकुन कि. 102,000/रू. चा माल जप्त करून आरोपीस पोलीस स्टेशन हिंगणघाट पोलीसांनी अटक केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Sivshena / काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अनुराग जैन , वर्धा , अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे , उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशिलकुमार नायक यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट ठाणेदार पोलीस निरिक्षक देवेन्द्र ठाकुर यांचे

Policenews/मार्गदर्शनामध्ये गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार. प्रविण बावणे, पोलीस नाईक निलेशसिंग सुर्यवंशी, नरेंद्र आरेकर, पोलीस शिपाई सागर सांगोले, संतोष गिते यांनी केली.

Sivshena / काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दि. १८ ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे नगरपरिषद हिंगणघाट येथील मा. मुख्याधिकारी यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे,सतीश धोबे तसेच तालुकाप्रमुख मनीष देवडे व शहर प्रमुख चंद्रकांत भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

सविस्तर अशे की, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ या दिवशी हिंगणघाट नगर परिषदेच्या नवीन इमारत बांधकाम तसेच अंतरिक साज-सजावट पूर्ण झाल्यामुळे त्याचा लोकार्पण सोहळा ठेवण्यात आला होता.

या सोहळा निमित्त कार्यक्रम पत्रिका विनीत म्हणून या नगरपरिषदचे मुख्य अधिकारी प्रशांत उरकुडे यांनी राज्य शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) मा. खासदार यांचे नाव महाराष्ट्र सरकारच्या राज्यमंत्री यांच्यानंतर पाहिजे होते . परंतु या पत्रिकेत मा. आमदार समीर कुणावार यांचें नाव राज्यमंत्री नामदार डॉ.पंकज भोयर यांचे नंतर टाकण्यात आले.

PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम? 

व मा. खासदार यांचे नाव विशेष उपस्थिती म्हणून अमर काळे यांना पत्रिकेत खाली दर्शविण्यात आले. तसेच बसविलेल्या कोणशीला वर प्रोटोकॉल वगळून नावे अधोरेखित करण्यात आले. महाविकासआघाडी चे घटक पक्ष म्हणून शिवसेना खासदार श्री. अमर काळे साहेब यांचा झालेला अपमान सहन कसा काय करणार ? त्यामुळे शिवसेना द्वारा मुख्याधिकारी यांना सात दिवसाच्या आत त्या कोणशीला बदलविण्या बाबत सूचना करण्यात आल्या.

अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने त्या इमारतीचा उद्घाटनाचा दगड फोडून त्या ठिकाणी दुसरा दगड बसविण्यात येईल असे सक्त ताकीद देण्यात आली.
तसेच हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौक येथे डॉ. गमे हॉस्पिटल जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामपूर्ण करण्यासाठी जवळपास वीस दिवसापासून मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे.

त्या खड्ड्या मुळे वाहतुकीस व त्या परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांना व डॉ. गमे यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना वहिवाट करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे शहरातील इतर भागात सुद्धा खड्डे खोदून असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.त्यासाठी वरील सर्व शिवसेनेचे पदाधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत त्या ठिकाणी त्या खड्ड्यात झाडे लावून उन्हामध्ये बसून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात त्या परिसरातील सन्माननीय नागरिक तथा शिवसैनिक उपस्थित होते .सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तर्फे अभियंता व ठेकेदार यांचा प्रतिनिधी त्या आंदोलन स्थळी येऊन सदर काम पंधरा दिवसात पूर्ण करून देऊ असे लेखी स्वरूपाचे आश्वासन दिल्या गेले .त्या अधिकाऱ्यांना व ठेकेदार यांना शिवसेनेचे पदाधिकाऱ्यामार्फत सक्त ताकीद देण्यात आली की, जर पंधरा दिवसाच्या आत काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने यापुढे आंदोलन करण्यात येईल.

Sivshena / सदर सर्व बाबीस प्रशासन म्हणून आपण जबाबदार आहे. आंदोलनाकरिता शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने ,माजी नगरसेवक शंकर मोहमारे,भास्कर ठवरे, नंदू रेडलावर ,शंकर झाडे ,अनंता गलांडे ,नितीन वैद्य ,चंद्रशेखर भोयर, गजानन काटोले, शितल चौधरी ,शकील अहमद ,वसीम शेख ,पप्पू घवघवे, संजय पिंपळकर ,राहुल मोहितकर, रितिक मोघे, फिरोज पठाण, हिरामण आवारी, नरेंद्र गुलकरी,दिलीप चौधरी, दिनेश धोबे, सुभाष काटकर ,विलास चौधरी ,प्रशांत कांबळे,हेमंत भोयर, राजेश बोडे ,संजय अंभोरे संजय रहाटे,भजभुजेताई, किशोर इंगोले, प्रशांत सुपारे, भास्कर भिसे, प्रभाकर खडसे,प्रभाकर खडसे, हार्दिप काळे,प ,प्रभाकर खोडे ,विजय कोरडे, बलराज डेकाटे, गौरव गाडेकर,सांताराम मुरकुटे, प्रवीण राऊत ,पांडुरंग निखाडे, नारायण मोघे ,श्रावण मोरे, संजय मोरे,महादेव विताळे,निमेश भोयर, नरेश खाडे, अतुल रोहनकर, प्रशांत भोयर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

PwdNews /टूनकी ते वसाडी रोडवरील पुलाच्या भिंतीचे निकृष्ट आणि धोकादायक दर्जाचे काम? 

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

बुलढाणा:-सदर तक्रार अर्जा द्वारे मी शेखशे सईद आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की , टूनकी ते वसाडी या महत्त्वाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामा मार्फत एक नवीन पुलाचे बांधकाम सध्या सुरूच आहे.

हा पूल शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी,मुस्मुलीम लोकांचा मदरसा, आलेवाडी येथील इस्तमा,आजारी रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.या मार्गावरून सतत वाहनांची व लोकांची ये-जा चालते.

revenuenews / कुविख्यात गुंड वाळूतस्कर भैय्या रोकडे याची येरवडा कारागृहात रवानगी

ते पावसाळ्यात या पुलामुळे गावाला व तालुक्याचे ठिकाणी योग्य संपर्क साधता येईल, म्हणूनच या कामा विषयी सर्व नागरिकांची अपेक्षा मोठीहोती .
परंतु अत्यंत खेदा ने नमूद करावे लागते की सदर पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.

कामाच्या सुरुवातीला अनियमितता स्पष्टपणे जाणवत आहे. बांधकामात आवश्यक त्या दर्जेदार साहित्याचा वापर न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. कंत्राटदारा कडून कामा तबेफिकीरी व निष्काळजी पणा दिसून येत आहे.

सदर कामात बांधण्या त आलेले रिटर्न वाल हि पुलाला सोडून बाहेरच्या दिशेने नेवल न झालेल्या आहेत.आज
रोजी हि भींत अश्या अवस्थेत आहे कालांतराने सदर भींती पासून भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो.

त्या वरून कामाचा दर्जा आपल्या समोर स्पष्ट होते.ते
पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढल्यास पुल कोसळण्याचा गंभीर धोका संभवतो.अपघात होऊन जनतेचे या जीविताला धोका निर्माण होईल.
सार्वजनिक निधी वाया जाऊन सरकारच्या तिजोरीला मोठा तोटा होईल.

PwdNews/शेतकऱ्यांना,विद्यार्थ्यांना व रुग्णवाहिकांना वाहतुकीतुकीत अडथळे निर्माण होतील.अशा भविष्यात अनेक निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.