Home Blog Page 24

Hingnghatnews /हिंगणघाटमध्ये आज भव्य सभा; फडणवीसांच्या भाषणात कोणती आश्वासने? नागरिकांमध्ये उत्सुकतेचा माहोल

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, २८ नोव्हेंबर २०२५ भाजपा – आर.पी.आय. (आ) युतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक / नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभेची आज दुपारी १:३० वाजता गोकुलधाम मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, हिंगणघाट शहरासाठी कोणती नवीन विकासात्मक आश्वासने जाहीर होणार याबाबत नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्थानिक पातळीवर वाढत चाललेले पाणीपुरवठा प्रश्न, रस्ते-विकास, स्वच्छता मोहीम, औद्योगिक संधी, आरोग्य सुविधा या मुद्यांवर फडणवीस काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गोकुलधाम मैदान परिसरात सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि सभेसाठी आवश्यक सुविधा यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Wardhanews /नगरपालिका निवडणुकीस काहीच दिवस उरले असताना, ही सभा निवडणुकीच्या वातावरणात अतिरिक्त ऊर्जाभर घालणारी ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Umrganews /भुसणी केंद्रिय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन संपन्न….

 

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

Dharashivnews /उमरगा: तालुक्यातील भुसणी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन संपन्न झाला.

प्रथमतः भुसणी केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मण बनसोडे आणि शाळेचे मु.अ.गोविंद सोमवंशी यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविकपर कु.आर्या हिरमुखे याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितले.

शाळेतील उपक्रमशील शिक्षक अनिल जाधव, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोहित गायकवाड यांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती सांगून प्रश्न मंजुषा हा उपक्रम घेतले.

इयत्ता पहिली ते सातवी सातवी वर्गातील निवडक विद्यार्थीनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ऊल्लेखनीय जीवन कार्याविषयी भाषण केले.

बालसभा उपक्रमातंर्गत इयत्ता सहावी वर्गाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कु. समिक्षा बनसोडे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.श्रद्धा गावडे आणि आभार प्रदर्शन कु.भुमिका पवार यांनी केले. बालसभा उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना सहावी वर्गशिक्षक अनिल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Umrganews /यावेळी शाळेचे मुख्याद्यापक गोविंद सोमवंशी,अनिल जाधव, संभाजी माळी,व्यंकट कांबळे, विजय धोत्रेकर,परमेश्वर साखरे, श्रीम.अनिता रांजणकर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोहित गायकवाड आदि सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Punenews/पुणे गृहरक्षक दलाच्या जवानच्या सतर्कतेमुळे वाचले नवजात श्वान आणि नागरिकांचे चे प्राण

 

Punenews/पुणे गृहरक्षक दलाच्या जवानच्या सतर्कतेमुळे वाचले नवजात श्वान आणि नागरिकांचे चे प्राण

Punenews/पुणे शहर गृहरक्षक दलाचे विभाग नाईक श्री उमेश लोंढे यांच्या सतर्कतेमुळे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी रुपीनगर निगडी येथे समर्थ हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी परिसरात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीचे भयंकर रूप वेळीच लक्षात घेऊन श्री उमेश लोंढे यांनी त्वरित आग आटोक्यात आणण्यासाठी चे प्रयत्न केले तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास तसे कळवून आग विझवण्यासाठी चे प्रयत्न केले . आगीचे भयंकर रूप पाहून नागरिक भयभीत झाले होते,

Punenews/प्रथमदर्शनी त्यांना आगीचे भयान रूप पाहून त्या ठिकाणी नवजात श्वान (कुत्र्यांचे पिल्ल) आवाजामुळे लक्षात घेऊन त्यांनी तेथील पिल्लांना आगीपासून दूर करत त्यांचे प्राण वाचवले व अग्निशमन दलाच्या मदत येईपर्यंत तेथील आग आटोक्यात आणली.

उमेश लोंढे, विभाग नाईक 5220 पुणे शहर,गृह रक्षक दल.

Umrganews /बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात “संविधान दिन साजरा

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा : बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात “संविधान दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.

तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस अधिकारी व जवानांना अभिवादन करण्यात आले. शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले.

Dharashivnews /यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कावळे मॅडम शिक्षिका श्रद्धा पुजारी,मोनिका नदीवाडे,अश्विनी जोशी, शबाना मुल्ला,पल्लवी मुटले, शिक्षक अक्षय राठोड,आकाश कटकधोंड तसेच विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Farmernews /समुद्रपूरमध्ये शेतकऱ्यांने गांजा लागवडीसाठी परवानगी मागणीचा मुद्दा चर्चेत; तहसिलदारांनी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपूर, : समुद्रपूर तालुक्यातील करुर (प) येथील रहिवासी श्री. मल्हार बाबाराव साबळे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये गांजा लागवडीसाठी शासकीय परवानगी मिळावी म्हणून तहसिल कार्यालय समुद्रपूर येथे अर्ज सादर केला आहे. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्राप्त झालेल्या या अर्जावर तहसिल कार्यालयाने प्राथमिक नोंद घेतली असून, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

तहसिलदार, समुद्रपूर यांनी दिनांक 20/11/2025 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अर्जदाराने 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागवडीस परवानगी देण्याची मागणी केली आहे. तथापि, गांजा लागवड ही अत्यंत संवेदनशील व कायदेशीर बंधनांशी संबंधित बाब असल्याने, अंतिम निर्णय देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्राधिकरणाकडे आहे.

या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार कायद्याअंतर्गत वैद्यकीय, औषधी किंवा संशोधनासाठी अशा लागवडीस विशेष परवानगी दिली जाऊ शकते, मात्र त्यासाठी कठोर अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असते.

या घडामोडीकडे कृषी विभाग, महसूल विभाग आणि कायदा अंमलबजावणी पोलीस यंत्रणांचेही लक्ष वेधले गेले आहे. अर्जावरील अहवाल, क्षेत्र पडताळणी आणि इतर कायदेशीर बाबींची तपासणी झाल्यानंतरच जिल्हाधिकारी कार्यालय परवानगी बाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रशासनिक सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Farmernews /स्थानिकांत या प्रकरणाविषयी उत्सुकता वाढली असून, पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Crimenews /रिमडोह चेक पोस्टवर विदेशी दारूसह एक इसम ताब्यात; ८,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुका पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाच्या आदेशानुसार हिंगणघाट नगरपरिषदेतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील जाम–हैदराबाद मार्गावर, रिमडोह येथील मोठ्या मारुती मंदिरासमोर चेक पोस्ट उभारण्यात आले आहे.

हे चेक पोस्ट २४ तास कार्यरत असल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या अवैध धंदेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी पर्यायी मार्गांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

या चेकपोस्टवर नगरपरिषद प्रशासनाचे तीन कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी अशी एकूण चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक प्रामाणिकपणे तपासणीचे कार्य बजावत आहे.

दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी जाम–हिंगणघाट रोडवरील तपासणीदरम्यान एस.टी. महामंडळाची एमएच 14 एमएच 5241 ही बस तपासण्यात आली. यावेळी एका प्रवाशाजवळील बॅगेत रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू आढळून आली. त्यात दोन लिटरचे दोन बंपर व 180 एमएलची एक निप असा एकूण 4 लिटर 180 एमएल दारू मिळून आली. मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹8,400 एवढी आहे.

सदर इसमाने आपले नाव कमलेश गुलाबराव भगत (वय 49, रा. प्रज्ञा नगर, संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी त्यास एफएसटी पथक व हिंगणघाट पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले.

Hingnghatnews /ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक ठाणेदार हिंगणघाट, एफएसटी पथकातील निवडणूक नोडल अधिकारी अमर मनालाल रेवते, सहाय्यक नोडल अधिकारी महेंद्र शर्मा, पोलीस हवालदार प्रवीण बावणे (पोलीस स्टेशन हिंगणघाट) तसेच एसएसटी पथकातील सोमनाथ विठ्ठल जाधव, संजय दुबे, बाळकृष्ण सातपुते व पोलीस शिपाई कृष्णा माने यांच्या संयुक्त कार्यवाहीत करण्यात आली.
या प्रकरणी अपराध क्रमांक 17/19/2025 नुसार दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Buldhanaurbannews /बुलडाणा अर्बन को. बँकेने दिले नियमबाह्य कर्ज

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

बँकेचा निधी वापर सभासदांसाठी न करता बिल्डरलाच दिले कर्ज.]

[सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.]

बुलडाणाः- जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात व ईतर ठिकाणी अग्रगण्य व कोट्यावधी ठेवी असलेल्या बुलडाणा अर्बन को,बँकेने नियम धाब्यावर बसवून बँकेच्या निधीचा वापर गोरगरीब गरजू सभासदांकरीता न करता गोखले नामक बिल्डरला केला .तोही नियमबाह्य.त्यामुळे सदर बाबीची चांगलीच चर्चा होत आसतांना दिसत आहे.Buldhanaurbannews

Punejainbording/बुलडाणा अर्बन को.बँकेचा ह्या अगोदर चांगलाच प्रकार गाजला होता.त्यात आता ह्या बुलडाणा आर्बनच्या सेठजींच्या आशीर्वादाने गोखलबिल्डार ह्यास खाजगी प्रकल्पासाठी कर्ज दिले.बरं दिले तर दिले ह्यामध्ये बिल्डरने काही कागदपत्र अपूर्ण व बनावट असल्याचे संकेत मिळाले आहेत.

विशेष म्हणजे कर्ज मंजुरी दरम्यान बँकेच्या आॕडीट टिम व संबंधित वरीष्ठ अधिकारी ह्यांनी पडताळणी न करता दबावाखाली मंजूरी दिल्याचे समजते.तसेच ह्या कर्ज रकमेतून काही रक्कम इतरांचे नावावर हस्तांतरण झाल्याची चर्चा आहे.punebuldhanaurban

गोखले बिल्डर कडून वेळेवर कर्ज परतफेड न झाल्यास हा तोटा बँक व थेट ठेवीदार, सभासदांच्या पैश्यावर येणार आहे.त्यामुळे शेतकरी ,ठेवीदारांचे नुकसान हे बँकेच्या नियमबाह्य कारभारामुळे धोक्यात येणार आहे.सदर प्रकरणा बाबत सहकार खात्याकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

Buldhanaarbun /व संबंधित कर्ज मंजूर करणारेअधिकारी ,पदाधिकारी आणि कर्जदार गोखले बिल्डरवर गुन्हा दाखल करावा.बँकेच्या लेखापरिक्षण अहवालाची स्वतंत्र तपासणी करावीअशी मागाणी ठेवीदार नागारिक ,सभासदांकडून होत आहे.

तात्पर्य ः-[-जनहिताकरीता अनेक उपक्रम हाती घेवून नावाजलेल्या व नाव लौकीक मिळवलेल्या बुलडाणा अर्बन बँकेसारख्या मोठ्या सहकारी संस्थेकडून अश्यानियमबाह्य कर्ज प्रकरणा बाबत सहकार चळवळीला अपमान मानला जात आहे,त्यामुळै ह्याप्रकरणाची निपक्षपणेव योग्य चौकशी होवून संबंधित जबाबदार असणाऱ्या वरकारवाई होण आवश्यक आहे]

[महाराष्ट्र ते आशीया खंडापर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची व फसवणूक बाबत पोलखल ” सुर्या माराठीवर लवकरच पहावयास व वाचावयास मिळेल तुर्त…..]

Sarpanchnews /माजी सरपंच धीरज लेंडे यांच्या पुढाकाराने परसबागेला मिळाले चैतन्य

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात नव्या रोपांची लागवड; मिशन समृद्धीच्या प्रेरणेतून उपक्रम

पळसगाव बाई │ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत नवनवीन उपक्रम राबविणारे माजी सरपंच श्री. धीरज लेंडे यांच्या पुढाकाराने पळसगाव बाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र यांच्या परिसरातील परसबाग प्रकल्पाला नवे चैतन्य लाभले आहे.hingnghatnews

मिशन समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही परसबाग गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या पोषण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

या उपक्रमांतर्गत शाळा परिसरातील परसबागेत स्वच्छतेपासून नव्या रोपांच्या लागवडीपर्यंत विविध कामे करण्यात आली. परिसरातील झाडांभोवतीची तणनिवारण करून जमीन तयार करण्यात आली व त्यानंतर फळझाडे, औषधी वनस्पती तसेच विविध पालेभाज्यांची लागवड करण्यात आली.wardhanews

मुलांच्या आहारात रोजच्या रोज पौष्टिक अन्नघटकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पालक तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने हे विशेष नियोजन करण्यात आले. पालेभाज्यांच्या लागवडीमुळे विद्यार्थ्यांना ताज्या, रसायनमुक्त भाज्या उपलब्ध होणार असून त्यांच्या पोषण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.

याप्रसंगी मिशन समृद्धी PRP सौ. वैशाली किशोर गोल्हर यांनी परसबाग उपक्रमाचे महत्व सांगत शाळा आणि अंगणवाडीतील मुलांसाठी पोषक अन्नसाखळी मजबूत करण्यावर भर दिला. त्यांनी मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सॉईल सन फार्मर प्रोडूसर कंपनीच्या संचालिका सौ. प्रीती लेंडे यांनी मार्गदर्शन करताना कृषीआधारित प्रायोगिक शिक्षण व शाश्वत पद्धतीने पिके कशी घेतली जावीत याबाबत माहिती दिली. परसबाग ही फक्त बाग नाही तर मुलांसाठी नैसर्गिक प्रयोगशाळा आहे, जिथे ते कृषीविज्ञान, पर्यावरण आणि पोषण यांचे प्रत्यक्ष शिक्षण घेतात, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात प्रशासक श्री लवणे सर, ग्रामसेवक धीरज शिरपाते, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. प्रशांत बुरले, मनरेगा कर्मचारी रुपेश मून, महेंद्र भट, योगेश देवतळे यांचे विशेष सहकार्य लाभले. गावातील युवक आणि महिलांनी देखील उत्साहाने भाग घेत परसबागेची साफसफाई, कुंपण दुरुस्ती आणि रोपांची लागवड यामध्ये मदत केली. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरला.

माजी सरपंच धीरज लेंडे यांनी या प्रसंगी सांगितले की, “शाळा व अंगणवाडीतील मुलांना पोषक अन्न, स्वच्छ वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे ज्ञान देणे ही आजच्या काळाची गरज आहे. परसबाग हा त्यासाठी एक आदर्श उपक्रम ठरेल. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करण्यात येईल आणि अधिक फळझाडे व पोषक मूल्य असलेली पिके लावली जातील.”

Sarpanchnews /पळसगाव बाई ग्रामपंचायतीच्या सामाजिक जबाबदारीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या परसबाग प्रकल्पामुळे शाळा परिसराचे सौंदर्य वाढले असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि पोषणाबाबत जागरूकताही निर्माण झाली आहे. गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम केल्यास असे उत्तम उपक्रम फुलत राहतील, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Crimenews /सोनाळा रोडवर दोघी बहिणींचा विनयभंग,शिवीगाळ प्ररणी ४ जणां विरुद्ध गुन्हा दाखल.

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक )

संग्रामपूर)ः- तालुक्यातील दोघी बहिणी व व फिर्यादी हे मोटर सायकलने टुनकी येथे साहित्य खरेदी करुन सोनाळा परत येत असतांना रस्त्यावर ओव्हरटेक करुन त्त्यांचा पाठलाग करुन विनयभंग केल्याप्रकरणी व वत्यांना मदत करुन शिविगाळ धमकी दिणारे साथीदार अश्या ४ जणांविरुद्ध सोनाळा पो.स्टे.ला आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, आज दि.२१ रोजी फिर्यादी व त्याच्या दोन बहिणीसह टुनकी येथे साहित्य खरेदी करुन सोनाळा येत असतांना रस्त्याने जाणाऱ्या मोटर सायकल वरील मुलींना पाहून मोटरसायकल ओव्हरटेक करुन हार्न वाजवून वारंवार त्या मुलीकडे त्यांचा पाठलाग करुन विनयभंग केला.

ह्याबाबत फिर्यादीचा भाऊ व मामा हे त्यांना विचारण्यासाठी गेले असता ते दोघेजण व मदत करण्यासाठी आलेले यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी सोनाळा पो.स्टे,ला.अप,क्र,३९०/२०२५ कलम ७८,१२६(२),११५(२),३५२,३५१(२),३५१(३),३(५),भा.न्या.सं,२०२३ सह कलम १२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ दाखल केला.

केला,सदार परिस्थितीचे गांभीर्य पाहून तात्काळ ग्राम टुनकी येथील रोशन गोविंद लोणकर, गणेश किसाध मेहनकार,त्यांना मदत करणारे राजू अजाबराव लोणकर, अजय गजानन मातोडे यांना अटक करुन आजच विशेष न्यायालय मलकापूर येथे हजर केले.

असता,वि.न्यायाधिष न्यायालय मलाकापूर यांनी त्या चौघांना MCRचा आदेश सुनावला आहे ,षादर कारवाई ही सपोनि.संदिप काळे यांनी केली आहे ,

Policenews /सोनाळा पो.स्टे,हद्दीत महिला,बालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी यांची छेड कोणी काढत असल्यास त्याबाबत निसंकोचपणे आम्हाला मो.नः,7972011172 वर माहिती द्यावी ,आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल,
संदिप काळे.सपोनि.पो.स्टे.सोनाळा,]

Nagarparishadnews /नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी डोंगरे यांना काँग्रेसचा अधिकृत पाठींबा ; काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : आगामी हिंगणघाट नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगरपरिषद अध्यक्ष पदाकरिता शुभांगी सुनिल डोंगरे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठींबा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर (अध्यक्ष, वर्धा जि. काँ. क.) यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात नगरसेवक पदाकरिता मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. दोन्ही पक्षांचे नगरसेवक उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शुभांगी डोंगरे यांना समर्थन देतील, असे स्पष्ट करण्यात आले.

Nagarparishadnews /या निर्णयामुळे हिंगणघाटच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून आगामी निवडणुकीत काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार गट) युतीची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.