Home Blog Page 249

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- १८ ऑक्टो
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची जिल्हाधिकारी कडे मागणी.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून सरकारने ०३ हेक्टर पर्यंत जाहीर केलेली मदत न दिल्याबाबत तसेच सरकारने शेतकऱ्याला घोषित केलेली अतिवृष्टीची मदत बँक ऑफ इंडिया हिंगणघाट व इतर शाखांनी पीक कर्जाच्या लोनमध्ये कपात करत असल्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेत जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात आला.
खरिपाच्या हंगामात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर महिन्याच्या आज मिती पर्यंत सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळाली. अतिवृष्टीमुळे नदी नाल्याचे पाणी शेतात साचल्यामुळे शेती खरडून गेली आणि काही शेतकऱ्यांच्या शेतात गाळ साचून पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसानीचा आढावा घेऊन ०३ हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली परंतु वेळा येथील पटवारी श्री.कपूर यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ०३ हेक्टरची मदत दाखविली नाही त्यामुळे ज्यांच्याकडे १० एकर,१५ एकर,२० एकर,२९ एकर जमीन अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली त्यांना ०१ हेक्टर पर्यंत १३ हजार रुपयाची सरकारकडून जमा झाली. तर काहींना फक्त ०८ हजार १६० रुपये खात्यात जमा झाली.
अशाप्रकारे वेळा येथील पटवारी श्री.कपूर यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीपासून वंचित ठेवून सरकारची लफ्तरे वेशीवर टांगली आहे. तरी त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना घोषित केलेली सरकारची हक्काची मदत देण्यात यावी तसेच संबंधित पटवाऱ्याने शासकीय कामात दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
तसेच काजळसरा येथील शेतकरी चोखाराम डफ यांना १७ एकर ७४ आर शेती असताना फक्त ०२ हेक्टरची मदत खात्यात जमा झाली. अशा अनेक शेतकरी या निष्काळजीपणामुळे मदतीपासून वंचित आहे.त्या गावला सौ.ढोक मॅडम या पटवारी असून त्यांनी सुद्धा सर्वे करून शेतकऱ्याला ०३ हेक्टर पर्यंत मदत दाखविली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण मदत झाली नाही.
तसेच बँक ऑफ इंडिया हिंगणघाट शाखेने काजळसरा येथील शेतकरी चोखाराम डफ व इतर शेतकऱ्यांची मदत पीक कर्जात कापून सरकारचे नियम धाब्यावर ठेवले आहे. तरी संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी गुणवंत कामडी, सतीश सायंकार, चोखाराम डफ, वामन वरघणे, नागो भुते,सुभाष शेंडे, शंकर भुते,नारायण लोणकर, सुरेश नखाते ,बंडूजी वाघमारे, बादशहाराव नखाते,नामदेव लोणकर,रुपेश तळवेकर, नारायण नखाते,प्रवीण आत्राम, मधुकर गायकवाड,शोभा सायंकार,कृष्णा बोरकर,अभिलाष कामडी, सिद्धेश सायंकार,सुजल शेंडे,देवा शेंडे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसाला सामाजिक कार्यकर्ता अरविंद झाडे याचे निधन

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- बिडकर वार्ड येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंन्द कवडूजी झाडे वय 37 वर्ष याचे हुदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे मागे पत्नि ,आई , 1भाऊ ,5 बहिनी वाढदिवसाच्या दिवशी मुत्यू झाला . त्याच्या या अचानक कमी वयात निधन झाल्यामुळे परिसरातील लोकांना हळहळ वाटत आहे. त्यांचा अतिम संस्कार वनामोक्ष धाम गाडगेबाबा पुलाजवळ परिसरातील लोक, नातेवाईक, समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितित होते. शोकसभा घेऊन सामाजिक कार्यकर्ते अरविंन्द झाडे याचे जिवन कार्यावर प्रकाश टाकला या शोक सभेला लोजपाचे जिल्हा अध्यक्ष केशव तितरे, माजी नप सभापती अनिल भोंगाडे ,देवा कुबडे, श्रीधरराव हुडे, चाहत्यानी शोक सवेदना व्यक्त करून मुक श्रध्दांजली अर्पण केली.

दिवाळीनंतर शासनाची किट मिळणार काय?

0

 

@ गोर गरीब जनतेचा सरकारला प्रश्र

शासनाने मोठा गाजावाजा करीत गोरगरीब जनतेला दिवाळीला १०० रुपयात धान्याची किट देण्याचे जाहीर केले आहे. मात्र दिवाळी ४ ते ५ दिवसांवर येऊन ठेपली असतांना अद्यापही स्वस्त धान्य दुकानातून धान्याची किट वितरीत केली जात नसल्याने शासन दिवाळीनंतर किट देणार काय ? असा प्रश्न गोरगरीब जनता उपस्थित करीत आहे

शासनाने वृत्तपत्रे आणि टि व्ही चॅनल्सद्वारे, मोठा गाजावाजा करीत दिवाळी निमित्त, एक किलो रवा, एक किलो चना दाळ, एक किलो साखर आणि एक किलो पामतेल या वस्तु शंभर रुपयात देण्याचे जाहीर केले आहे. मात्र दिवाळी अवघ्या चार ते पाच दिवसावर येऊन ठेपली असतांना अध्यापही स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीबांची व निराधारांची दिवाळी गोड करण्याकरीता जाहिर केलेली किट वाटप केली जात नसल्याने, सदर किट दिवाळी झाल्यावर मिळणार की काय? अश्या प्रश्नाचा भाडीमार जनता करीत असल्याचे दिसत आहे. तसेच दरमहा मिळणारे नियमित धान्य आणि प्रधानमंत्री गरीब अन्य योजने अंतर्गत मिळणारे मोफत धान्य यांचेही वाटप चालू झाले नसल्याने. त्यामुळे हे धान्य सुद्धा दिवाळी झाल्यावर मिळणार की काय? असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.

जंगली रानडुकराच्या हमल्यात महिलेचा मृत्यू

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

गिरड :- दि.16 ऑक्टोंबर
मृतक सौ. वृंदा बाबाराव गुंडे वय 55 वर्ष ही तिचे पती सोबत मौजा, आर्वी शेत शिवारातील त्यांचे मालकीचे शेतातील निंदनाचे कामा करिता गेली असता, अंदाजे संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान तिचे पती दुसऱ्या शेतात बैलाला चारत असताना मृतक ही
शेतात निंदन करीत असताना त्यावेळेस जंगली रानडुकरानी मृतकाच्या अंगावर हमला केला ,जागेवर तिचे पती आले असताना मृतक ही ठार झालेली दिसली. व आजूबाजूला प्राण्याचे पायाचे निशाण व जंगली रान डुकर दिसला . पुढील तपास गिरड पोलीस करीत आहे

अंधेरीत सेनेची मशाल उजळली ,ऋतुजा लटके विजयी मार्गावर .

0

 

बुलढाणा प्रतिनिधी विठ्ठल अवताडे

सत्ता संघर्षाने जपली महाराष्ट्राची अस्मिता ,शिवसेना पक्षाच्या दोन गटाच्या वादात सेनेचा धनुष्य बाण गोठवला गेला , तर अंधेरी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती सत्ता नाट्यात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्या संदर्भातील पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहून एक प्रकारे लटके यांच्या सोबत सद्भावना दर्शविली होती, त्यानंतर राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी पत्रकार परिषद घेऊन इच्छा वेक्त केली तर तसेच तरही बऱ्याच नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच इच्छा दर्शवली होती तर आज भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असून मुराजी पाटील यांची उमेदवारी मागे घेतल्याने अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ह्या विजयी झाल्या तर मुरजी पटेल समर्थक नाराज झाले असून रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत तर राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणा बाजी करताना दिसत आहेत ,शेवटी महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष काही असला तरी आज सर्वच पक्षाने भावनिक साद घालत अंधेरी निवडणूक बिनविरोध करून आदर्श ठेवला हे तितकं खर

सन्माननीय मुख्य मंत्री यांची शाहिरी कलावंतांनी घेतली अभिनंदनीय भेट:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(मुंबई)आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची नियोजित भेट मीटिंग ठाणे येथील टेंभी नाका कार्यालयात आपल्या शिष्ट मंडळातील सदस्य यांनी घेतली.विशेष म्हणजे आपल्या राज्यातील रजिस्टर लोक,कलावंत संस्था व लोककलावंत यांच्या व्यथा आणि सध्य परिस्थिती त्यांना समजाऊन सांगितली.आणि त्यांनी ते आत्मीयतेने ऐकून घेतले.तसेच मुख्यमंत्री मनाने की मी सविस्तर निवेदन स्वीकारून मी शासकीय जनजागृती करणाऱ्या तुम्हां सर्व लोक कलावंतांचा आदर करतो.तुमची जनजागृतीची कामे लवकरच चालु होतील असे आश्वासन देतो असे सांगीतले.सदर निवेदन देण्यासाठी आपल्या शिष्ट मंडळातील सदस्य शाहीर मालुसकर पुणे,शाहीर सुभाष गोरे सोलापूर,सत्यभामा आवळे पुणे,शाहीर उत्तम गायकर नाशिक,शाहीर बाबू राठोड जालना आणि ही भेट घडवून देण्यासाठी कष्ट घेणारे शाहीर गोरे यांचे परम मित्र गुरुनाथ दळवी ठाणे यांचा सक्रीय सहभाग अत्यंत मोलाचे ठरले.

विनापरवाना अवैद्य वाळुची वाहतुक करणारा महसुलने जप्त केलेला डंपर चोरून नेले गुन्हा दाखल

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथे शहरात विनापरवाना वाळू वाहतूक करणारे डंपर येथील महसूल विभागाने जप्त केले होते. ते डंपर आज पहाटे तीन च्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

येथे शहरात डंपर क्रमांक (एमएच १९ -८६५६) या डंपर मधून वाळू वाहतूक करीत असताना येथील महसूल विभागाच्या पथकाने सदर वाहन जप्त करून, तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. गुरुवार (ता.१३) पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान गणेश गंगाराम कोळी ( रा. ममुराबाद), संदीप आधार सोळंके (रा. कोळन्हावी ता.यावल) यांच्यासह इतर दोघांनी तहसील कार्यालयाच्या आवाराचे बंद गेट तोडून आत प्रवेश करत सहा लाख रुपये किमतीचे वाळूचे डंपर चोरून नेले. अशा आशयाची फिर्याद तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकारी दीपक बाविस्कर यांनी येथील पोलिसात दिली आहे. संशयित गणेश कोळी, संदीप सोळुंके यांचे सह इतर दोन असे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या करीत आहेत.

हिंगणघाट शहरात शासन व प्रशासन विरोधात जन आक्रोश मोर्चा

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 14 ऑक्टोंबर
हिंगणबाट बचाव समिती, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना कडून प्रशासन व शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष बाबत , मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली मागणी सध्या शहरात खालील विषयाकडे आज लक्ष देण्याची गरज आहे.
1)किडन्यापिंग चे प्रयत्न पाहता शहरातील बंद असलेले सी. सी .टीव्ही.कॅमेरे त्यरित चालू करण्यात यावे.
२) शहरातील बाल वयातील मुले व्यसनाधीत होत असल्यामुळे गांजा. दारू, नशेच्या गोळया या सारखे अवैध धंधे बंद करण्यात यावे.
३) शहरात दामिनी (चार्ली) पथक स्थापन करून सुसाट बाईक चालविन्यावर कार्यवाही करण्यात यावी.
अधिकारी यांना आठ दिवसात या समस्या निकाली काढा ? अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. श्री. सतीश मासाळ (तहसीलदार) यांनी येत्या मंगळवारी (ता.18 ऑक्टोंबर मंगळवार ला या विषयावर सर्व अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची सभा घेवून हा विषय निकाली काढण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

लग्न ठरले होते,लग्नघटिका जवळ आली पण मीनल गळफास घेऊन देवाघरी गेली , आकस्मित मृत्यूची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील अंजाळे गावातील लग्न घटकाजवळ आलेल्या तरूणी आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे सदर तरूणी असा प्रसंगी आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली असुन , याबाबत यावल पोलीस स्टेशन मध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहीती अशी की , मिनल निवृत्ती भागवत क्य२३ वर्ष राहणार नविन प्लाट क्षेत्र अंजाळे तालुका यावल या तरुणीने दिनांक १५ आक्टोबर २o२२ रोजी सकाळी १oवाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . या बाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत क्य५८ वर्ष यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अ.मृ .र ६५ / २०२२ प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे . सदरच्या आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळी नंतर होणार होता अशी माहीती मिळत आहे त्यामुळे विवाहची वेळ जवळ आली असता तरुणीने आत्मह्त्वा का केली असावी असा प्रश्न उपस्थित होते . दरम्यान मयत तरूणीचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश पवन जैन यांनी केली

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए. पि. जे.अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी:- शंकर पुरोहित

0

 

आज 15ॲक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईलमैन आपला संपूर्ण आयुष देशासाठी समर्पित करणारे डॉ ए पि जे अब्दुल कलाम यांची जयंती संग्रामपूर मित्र परीवार व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली…
या वेळी संग्रामपूर मित्र परीवारचे संस्थापक अध्यक्ष आरोग्य सम्राट न प चे गटनेते मा शंकर भाऊ पुरोहित, न प नगराध्यक्षा पती सिद्धार्थ सोनोने, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुवठा सभापती संतोषभाऊ सावतकार, प्रा हरिभाऊ तायड़े सर, अतुल अतुल वानखडे , नगरसेवक इरफान सय्यद, अशोक सावतकर, साबीर अय्युब शेख, आसिफ खान, शालिग्राम घाटे, सरदार शेख, श्रीकांत भोंबड़े , निसार शेख, हमीद पाशा सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते….