Home Blog Page 250

राहुलभैय्या लोणीकर यांच्या निवडीने मराठवाड्यात नवचैतन्य निर्माण झाले,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी सेवली येथे व्यक्त केले गौरवोद्गार

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)भारतीय जनता युवा मोर्चाचे फायरब्रॅंड युवानेते,युवाह्रदयसम्राट मा.राहुलभैय्या लोणीकर यांची आज भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने मराठवाड्यातील जनतेमध्ये विशेषःत नवतरुणामध्ये वनचैतन्य निर्माण झाल्याचे गौरवोद्गार भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,श्री.ज्ञानेश्वर (माऊली)शेजुळ यांनी आज सेवली येथे आनंदोत्सव साजरा करताना काढले आहे.उपमुख्यमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा प्रदेश अध्यक्ष,श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे व भाजपा प्रदेश महामंत्री मा.श्री.विक्रांतदादा पाटील यांच्य् उपस्थितीमध्ये आज भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे हि निवड जाहीर करण्यात आले.मा.राहुलभैय्या लोणीकरांच्या निवडीचे वृत्त समजताच सेवली सर्कलमधिल कार्यकर्त्यांंनी एकत्र येत फटाके वाजवुन व मिठाईचे वाटप करुन आंनंदोत्सव साजरा केला.यावेळी उपस्थितांशी व माध्यमांच्या प्रतिनिधिशी बोलताना श्रीज्ञानेश्वर शेजुळ यांनी वरील गौरवोद्गार काढले आहेत.पुढे बोलताना श्री.ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले की,मा.मंत्री तथा आमदार मा.श्री.बबनरावजी लोणीकरांनी केलेली विकासकामे परतुर मतदारसंघा बरोबरच मराठवाड्यात घराघरात पोहचविणे गरजेचे आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन सुद्धा भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,श्री.ज्ञानेश्वर (माऊली)शेजुळ यांनी उपस्थितांना केले आहे.यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.जिजाबाई जाधव यांनी सुद्धा मा.राहुलभैय्या लोणीकराविषयी गौरवोद्गार काढले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास दिलीप जोशी,शिवराज तळेकर,विशाल गिते,पिराजी मेहेत्रे,सईद पटेल,समाधान वाघमारे,प्रमोद भालेकर,गजानन राठोड,संजय काळे,प्रभाकर गाढवे,दिलीप पोमने,अनिल शेटे,दिनकर शिलवंत,शे.खाजा,सतिश सदावर्ते,संतोष निंबाळकर,नंदु देशमुख,राजु देशमुख,बाळकृष्ण देशमुख,बबन झोरे,मुन्ना पटेल यांच्यासह सेवली सर्कलमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय खाद्य महामंडळ निगमच्या राज्य सदस्यपदी कपिल दहेकर यांची निवड:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना भारतीय खाद्य महामंडळ निगमच्या राज्यसदस्यपदी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दहेकर यांचे स्वागत केले.केंद्र शासनाकडून राज्य स्तरावर भारतीय खाद्य महामंडळ निगम समिती स्थापन करण्यात आली.कपिल दहेकर यांनी धनगर समाज तथा ओबीसी समाजाचे प्रश्न जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर सोडवण्यासाठी चांगले प्रयत्न केले .जनसामान्याच्या हक्कासाठी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले.ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा लढा असेल,विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वसतिगृहाच्या बाबतीत प्रश्न असेल,असे उल्लेखनीय कार्य पाहून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय खाद्य महामंडळ (निगम)महाराष्ट्र राज्य सदस्य पदी त्यांची निवड केली.या निवडीबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे,केंद्रीय मंत्री पियुष गोयल,आ.संतोष दानवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर,शहरध्यक्ष राजेश राऊत,अतिक खान आदींनी अभिनंदन केले आहे.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर याची निवड:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करत असले बाबतची घोषणा केली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री बावनकुळे म्हणाले की भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आणि सजग असला पाहिजे.तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घटकापर्यंत पोहोचून शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम पोहोचविण्यासाठी त्याने प्रयत्नशील असावे.युवा वॉरिअरच्या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील तरुणांना भारतीय जनता पार्टी कडे आकर्षित करण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन युवा वॉरिअरच्या शाखा उघडण्याबाबत भर द्यावा त्याचप्रमाणे मोदीजींच्या योजना महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

युवा वॉरियर्स ही १८ ते २५ वयोगटातील तरुणांची एक निपक्ष पातळीवर काम करणारी फळी असून त्या युवकांना भारतीय जनता पार्टीचे कार्य समजावून सांगत नवयुवकांची मोठी फळी उभारणार असल्याचे यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची पार्टी असून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पक्षात न्याय मिळतो अशा भावना भाजपा प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली.

केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील पक्ष नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात मला प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मिळाली असून मी नक्कीच तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून त्याला न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करेल त्याचबरोबर केंद्रीय आणि राज्यातील पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वासने सार्थ ठरवेल अशी प्रतिक्रिया देखील यावेळी राहुल लोणीकर यांनी दिली.

युवा वॉरियर च्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील १८ ते २५ वयोगटातील युवकांची मोठी फळी भारतीय जनता पार्टी च्या बाजूने उभारली जाणार असून त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार असून ज्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे त्या सर्व लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन मोदीजींचे आभार व्यक्त करणारे ५० लाखापेक्षा अधिक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार असल्याचे यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले.

जालना तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा,राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर:

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

प्रतिनिधी:(जालना)दिनांक -14/10/2022 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-जालना यांच्या वतीने जालना तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांची तात्काळ नुकसान भरपाई व पीक विमा शेतकऱ्यांना देणे बाबतचे निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना मा.श्री.रविंद्रजी तौर साहेब-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य तथा पक्षनिरीक्षक बुलढाणा जिल्हा,श्री.दिलीपराव भुतेकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना,जगन्नाथ काकडे,दिनकर बापू भुतेकर,भारत कदम-युवा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भगवान नाईकनवरे,रामेश्वर भुतेकर,गणेश लोखंडे,तात्यासाहेब सराटे,सतिष गव्हाळे,गजानन शिंदे,रावसाहेब मोहिते,संतोष भुतेकर,देवराव गायकवाड,अमोल जाधव,कदीर सय्यद ,गणेश कदम,मनोज देशमुख,भगवान कदम,भगवान अनपढ,गजानन भांडवले,शिवाजी राव भुतेकर,मुक्ताराम सराटे,आरेकर तात्या,शरद पो्हेकर,भाऊसाहेब शिंगाडे,शिवाजी लिखे,सुरेश कदम,ज्ञानेश्वर सराटे,दत्ता भुतेकर,नारायण कोकरे,देविदास बोंबले,गणेश बर्वे,कैलास नागवे,सुशील पिसोरे,राजेभाऊ उजेड,अनारस म्हस्के,बाळू कुटे,उमेश फासाटे,गजानन शिंदे,सुंदर नागवे,कैलास नागवे,निलेश भुतेकर,प्रवीण कवठे तसेच जालना तालुक्यातील अनेक कार्यकर्ते,शेतकरी बांधव निवेदन देताना उपस्थित होते.तर या निवेदनात-गेल्या सहा महिन्यापासून राज्याच्या विविध भागात विशेत जालना तालुक्यात चालू वर्षात २०२२ सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतातील उभे पिकांची अक्षरक्ष माती झालेली आहे.सोयाबीन,तूर,भात , कापूस,मोसंबी फळबागा,अंगूर इत्यादी पिकांची अतिरिक्त पावसामुळे ती सडुन गेली आहे.शासनस्तरावर अजून कुठलाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान,पिकविमा देण्यात आलेला नाही.जालना तालुक्यातील रामनगर,सेवली,नेर,विरेगांव,भाटेपुरी,पाचनवडगाव या महसूल मंडळातील शेतकऱ्यांची पिके १०० टक्के नासाडी झालेली आहे.या संदर्भातील जाचक अटी रद्द करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी.नसता आम्ही रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारू या निवेदनाद्वारे स्पष्ट सांगितले.

जालना तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)जिल्ह्यासह तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे याबाबत प्रशासनाकडून तहसीलदार श्रीकांत भुजबळ साहेब यांनी तलाठी,मंडळ अधिकारी यांना निर्देश दिले आहे.त्यामुळे बाजीउमृद येथील तलाठी जाधव साहेब यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकाची पाहणी केली व नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामा केला. सदर ठिकाणी कपाशी,सोयाबी,बाजरी,मका सह अनेक पिकांचा बाजीउम्रद गांव व ताडा येथे पंचनामा करण्यात आला.यावेळी तलाठी जाधव साहेब,सरपंच संजय राठोड, उपसरपंच विष्णू राठोड,उत्तम पवार,झाबुसिंग पवार,दतु चव्हान,विजय पवार,शिवाजी राठोड सह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या कारवाईस स्थगिती दाया .

0

 

हिंगणघाट :- डाॅ उमेश वावरे ची राज्य सरकारला मागणी.
आज दुर्गम भागा मध्ये मुलाना योग्य शिक्षणाची सोय नाही.
ऐकीकडे गाव तिथे शाळा हा संकल्पना आहे.
आज अनेक दुर्गम भागा मध्ये शाळा नाही विघार्थाना पायपीट करून नदी नाले ओलांडून दुर दुर शाळेत जावे लागते. मात्र शासन जर 94 हजार शाळा बंद करण्यार असेल तर गरीब व मेहवती मुलानी शिक्षण कुठे घ्यायचे
भविष्यात शिक्षणाची सरकार कडे काय योजना आहे.त्याना अशिक्षीत ठेवनाची कुटील निती तर नाही आहे
यावर आळा बसला पाहीजे म्हणून शासनाने एक ही शाळा बंद करू नये अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाडी च्या वतीने मा. जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .मा. शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
त्या प्रसंगी मनीष कांबळे. चारू आटे. प्रदिप कोल्हे. जिवन उरकुडे. दिलीप कहूरके. प्रदिप मानिकपूरे. प्रणय पाटील. नुतन राठोड. प्रशांत शंभरकर. देवेंद्र त्रिपल्लीवार.
संजय गायकवाड. संजय धाबर्डे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते होते..

यावल व चोपडा वन विभागासह मध्यप्रदेश वनविभागाने केली संयुक्तरित्या सिमेलगत कार्यवाही लाखोचे अवैध सागवान जप्त

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

सातपुडा पर्वताच्या वनक्षेत्रातील महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सिमेवर लागुन असलेल्या दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रथमेश हाडपे (सहाय्यक वनसंक्षक चोपडा, यावल ) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मध्यप्रदेश उपवनसंरक्षक अनुपम शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक सुरेश कुमार अहिरवार सेंधवा यांच्या संयुक्त कार्यवाहीत लाखो रुपयांच्या बेकाद्याशीर झालेल्या वृक्षतोडीवर कार्यवाही झाल्याने सागवान वृक्ष तोड माफीयामध्ये एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात महाराष्ट्र वनविभागाच्या वतीने मध्य प्रदेशमधील वनविभागास संदेशानव्ये कळवून सह संयुक्त कार्यवाही करत बी के थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा व वैजापुर कार्यक्षेत्रातील पथकातील आय एस तडवी वनपाल, चुनीलाल कोळी , बाजीराव बारेला, संदीप भोई, वनरक्षक तसेच गस्तीपथक यावल कडील योगेश सोनवणे वनरक्षक, सचिन तडवी पोलीस शिपाई, आनंद तेली व निखिल पाटील वाहन चालक तसेच वन परीक्षेत्र वर्ला, व धवली सह मध्यप्रदेश वनविभाग मधील वन परिक्षेत्र धवली अंतर्गत येत असलेल्या धामण्या ग्राम जिल्हा बडवानी ( मध्य प्रदेश )मध्ये सयुंक्त गस्त पथकाने कार्यवाही करीत अवैधरित्या विना परवाना सागवानी लाकडांचे वस्तू तसेच साग चौपट नग हे तयार केलेले तसेच अर्धवट वस्तू मिळुन आल्यात तसेच काही भागाचा शोध घेतला असता दोन कटर मशीन अशी सुमारे एक ते दिड लाख रूपये किमतीचे मुद्देमाल मिळुन आलेत तरी जप्त केलेला काही मुद्देमाल हा वनपरिक्षेत्र वैजापूर येथे रवाना करण्यात आला आहे, सदरच्या जप्त केलेल्या मालाचे साग तस्कर यांचा कसून शोध हा सहाय्यक वनसंरक्षक चोपडा यांच्या आदेशान्वये चोपडा वैजापूर तसेच देवझीरी वनक्षेत्रातील कर्मचारी करीत आहेत तसेच परप्रांतीय साग तस्करांच्या माध्यमातुन अश्या होत असलेल्या धडाकेबाज कार्यवाहींमुळे वृक्षतोड माफीया मध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे . सदरची कार्यवाही ही डिगंबर पगार (वनसंरक्षक धुळे ) , संजय पाटील ( विभागीय वनाधिकारी धुळे ), विवेक हौसिंग (उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव ) यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली असून अश्या काही अवैध गुन्हे तसेच घटना जर आपल्या परिसरात घडत असतील तर १९२६ महारष्ट्र वनविभाग टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून जागृत नागरीक म्हणुन आम्हाला अशा प्रकारची माहिती देऊन वृक्षतोड माफीयापासुन आपल्या सातपुडा पर्वताच्या बहुमुल्य वृक्षांच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे येवुन सहकार्य करावे असे आवाहन धुळे विभागाचे वनसंरक्षक डिंगबर पगार व वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथे जागतिक अंडा दिन साजरा

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला, दि.14(जिमाका) स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था अकोला यांच्यामार्फत जागतिक अंडा दिनानिमित्त मोरगाव भाकरे ता. बाळापूर येथे शुक्रवार(दि.14) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत अंडी वाटप करण्यात आले.
यावेळी अंड्याचे आहारातील महत्व व फायदेविषयी माहिती देऊन रोग प्रतिकार क्षमता वाढीसाठी अंत्यत महत्वाचे असल्याचे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी सांगितली. तसेच विद्यार्थ्यांकडून “संडे हो या मंडे रोज खावो अंडे ” अशा उदघोषणा म्हणवून घेतला. यावेळी डॉ. चैतन्य पावसे, डॉ. मिलिंद थोरात, डॉ प्रशांत कपले, डॉ. प्राजक्ता कुरळकर, मोरगाव भाकरे सरपंच उमाताई माळी, गावातील नागरिक गणेश भाकरे, अभिजित फंदात, पोस्ट ग्रॅज्युएट विदयार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सतीश मनवर यांनी केले. तर सूत्रसंचालक विभाग प्रमुख जीवरसायनशास्त्र डॉ. प्रशांत कपले यांनी व आभार प्रदर्शन डॉ प्राजक्ता कुरळकर यांनी केल.

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जिल्ह्यामध्ये मागिल काही दिवसांपासून रिमझिम व मुसळधार पाऊस तसेच चक्रीवादळ सदृश परिस्थिती आणि विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे,त्यामुळे वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत च आहे.अशीच घटना दिनांक 14,10,2022 रोजी घडली.घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला असल्याची घटना बारा वाजेच्या सुमारास घडली,सरफगव्हाण येथील शेतकरी तुकाराम काळे हे नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असताना,अचानक त्यांच्यावर वीज कोसळली,त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला,यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

मानोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा स्थापना

0

 

हिंगणघाट :- मानोरा येथे माननीय श्री राज साहेब ठाकरे यांचे विचार मनात घेऊन आज दिनांक 14/10/22 ला मानोरा या गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा फलकाच्या अनावरण करण्यात आले उदघाटक .. वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश घंगारे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच शाखा अध्यक्ष. आशिष सातपुते. उपाध्यक्ष राजू राऊत. सचिव वासुदेव सागरकर . उपसचिव समीर उसरे . संजू उसरे .धनराज मेश्राम .निलेश मेश्राम .समीर आत्राम. हरिचंद्र राऊत. राहुल वांद्रे.अधिक सातपुते. संभाजी देवकते .मंगेश मेश्राम. व पदाधिकारी. रुपेश रघाटाटे सावली सर्कल प्रमुख .हरिभाऊ महाजन समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष. रुपेश चंदनखेडे हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष. जितेंद्र रघाटाटे वाहतूक सेना सरचिटणीस.. वैभव बोरकुटे .प्रतीक चापले .मनोहरराव सुमोलकर. भारत भोयर. हिंगणेजी . व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते