Home Blog Page 255

कैवल्या एज्युकेशन फाउंडेशन द्वारा चामोर्शी तालुक्यातील १४ जि.प.शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी संपन्न.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-गडचिरोली हा आकांक्षीत जिल्ह्या असून जिल्हा आणि तालुका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने,चामोर्शी तालुक्यातील काही निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशनने बेसलाइन मूल्यमापन केले आहे.चामोर्शी तालुका समन्वयक आमीन खान यांनी सांगितले की,हे मूल्यमापन तालुका अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि गांधी फेलो प्राची मेतकर, वैष्णवी खैरनार,हिना खळदकर यांच्या द्वारे १४ जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे भाषा व गणित विषयावर असर टूल आधारित मूल्यमापन करण्यात आले.मुलांच्या मूलभूत साक्षरतेची स्तर मोजण्यासाठी आणि कैवल्या एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यात आणखी योग्य बदल करण्यासाठी,तसेच शैक्षणिक सत्राच्या शेवटी कार्याच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी अंतिम मूल्यमापन घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

स्कूलऑफ स्कॉलर्स येथे ग्रँड गरबा नाईट्स आयोजित

0

 

हिंगणघाट: भारतीय हिंदू समाजात उत्सव साजरा करण्यात नवरात्राचे विशेष स्थान आहे. नवरात्र ही शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे ज्यात मातेचे तीन रूपं पूजा महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गा यांची पूजा केली जाते. दरवर्षी भारतीय संस्कृतीचे महत्त्व ठेवून, नवरात्रीचा उत्सव यावर्षी स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत खूप धूमधामात साजरा झाला.
नवरात्राच्या निमित्ताने स्कूल ऑफ स्कॉलर्स विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत, प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगनघाटने संपूर्ण उत्साहाने स्कूल कॅम्पसमध्ये एक चमकदार गरबा नाईट 2022 सादर केले. मुख्य अतिथी श्री. अतुलजी वांदिले , श्री. प्रेम बाबू बसंतानी माजी अध्यक्ष नगरपालिका हिंगनघाट यांच्या आगमनाने हा कार्यक्रम सुरू झाला. उद्योगपती-श्री संजय जी मिहानी, श्री. भूपेंद्र जी शाहणे मॅनेजर पीव्ही टेक्सटाईल जाम, श्री दिनेश वर्मा सोशल वर्कर्स, कुणाल सर आणि माधुरी मेघे, एमजीएस नागपूर.
अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. आणि प्राचार्य शिल्पा चौहान, शैक्षणिक समन्वयक संतोषी बैस आणि एओ प्रदीप जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले . या कार्यक्रमाचे उद्घाटन मातेच्या उपासनेने झाले . त्यानंतर रास गरबा आणि दांडीया नृत्य कार्यक्रम आयोजित केले गेले. प्री -प्राइमरी चिमुकल्यांना नवदुर्गा म्हणून एका सुंदर ड्रेसमध्ये पाहून सर्व अत्यंत भारावून गेले. रिदम डान्स अकॅडमीने गरबा कार्यक्रमाची सुरुवात केली आणि टिटिडा गरबा, दंदिया, फ्री स्टाईल आणि बॉलिवूड गाण्यांसह विनामूल्य शैली यासारख्या एकूण पाच ट्रॅकसह दृश्यांना रंगविले. विवाहित जोडप्यांचा गरबा हे आकर्षणाचे केंद्र ठरले. फ्लेवर टी, अशोका इंडस्ट्रीज, राजपुरीया स्टील्स, मिहान मेन्स, पांढरे झेरॉक्स, स्वरसंगम ट्यूशन क्लासेस, न्यू झुलेलाल सुपर शॉपी, अमित इलेक्ट्रिकल्स, जुही टेलर्स तर्फे तसेच दुर्गा अरविंद जयस्वाल याच्या आठवणींमध्ये ज्यांनी 5 ते 10 वर्षे, 11 ते 18 वर्षे आणि 19 आणि गट ए मध्ये 45 वर्षे या वयोगटात विशेष कामगिरी केली त्यांना विशेष आकर्षक पुरस्कार देण्यात आले.
दिनेश तेलरांदे यांच्या मार्गदर्शना खाली आणि सातव्या वर्गाचा विद्यार्थी शर्जील अली आणि आठव्या वर्गाचा अथर्व भवसार आणि ओजस्विनी लोधी यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ए. ओ. प्रदीप जोशी सर यांनी केले.चविष्ट पदार्थांचे विविध स्टॉल हे आकर्षण होते.
गरबा उत्सव सर्वांसाठी संस्मरणीय होता. स्पर्धकांनी आपल्या कामगिरीने सर्वांना आनंदित केले. शिक्षक आणि इतर शालेय कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला.

विवाहित महिलेचा विनयभंग .. किराणा व्यापारीविरुद्ध गुन्हा दाखल..

0

 

नवरात्रीत मातृशक्तीस वाईट नजरेनी पाहणारा व्यापा-यास  जनतेनी चांगलाच प्रसाद दिल्याची चर्चा.

 

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे 28 वर्षीय विवाहित महिलेचा किराणा दुकानदाराने विजयभंग केल्याची घटना आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे याविषयी पीडित महिलेने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीत पीडित महिलेने नमूद केली की माझे पती , मुले 2 तसेच सासु, सासरे यांच्यासह सुनगाव येथे राहते व आम्ही शेतीचा कामधंदा करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आमच्या गावात दिलीप सुंदरलाल राठी यांचे किराणा दुकान आहे आम्हाला काही वस्तु लागल्यास आम्ही नेहमी त्यांच्या दुकानात जात असतो.
दिनांक 04/10/2022 रोजी सकाळी 09/30 या दरम्यान मी दिलीप राठी यांच्या किराणा दुकानात किराणासाठी गेले होते. तेव्हा दिलीप राठी हे मला म्हणाले की, तु तुझे आईवडीलांसोबत का बोलत नाही, तेव्हा मी त्याला सांगीतले की, मी माझे दिरासोबत मोटारसायकल वर बसुन शेतात जात असते म्हणुन लोक माझे, त्यांचेसोबत पाप लावत असतात त्यामुळे माझे आईवडील माझेसोबत बोलत नाही असे म्हटले असता दिलीप राठी मला म्हणाला की, माणसाला ज्याप्रमाणे जेवनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे बाईला ते सुध्दा आवश्यक असते त्यानंतर किराणा घेत असतांना मी एक नारळ दिलीप राठी यांना मागीतले, त्यांनी मला एक नारळ दिले मी त्यांना मोठे नारळ दया असे म्हटले असता दिलीप राठी यांनी वाईट उददेशाने माझेकडे बघुन मला डोळा मारला व म्हणाला की तु मला खुप आवडते. तु आत ये आणी तुला वाटेल ते नारळ घे असे त्यांनी म्हटले त्यामुळे मला लज्जा उत्पन्न झाली म्हणुन मी त्याला म्हटले की, माझे लग्र झालेले आहे तुम्हाला असे म्हणने शोभत नाही असे म्हणुन मी तेथुन निघुन घरी आले व झालेली सर्व हकीकत माझे पती यांना सांगीतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरुद्ध 354अ दाखल केलेला असून पुढील तपास ठाणेदार सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कैलास चौधरी करीत आहे

धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई येथे रंगले कवी संमेलन

0

 

(मुंबई / पवई प्रतिनिधी )

धम्म चक्र प्रवर्तन मंडळ आयोजीत धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने अंधेरी (पुर्व) विधानसभेचे कोषाध्यक्ष माणिक ओव्हाळ यांनी कवी शाम बैसाणे यांच्या सहकार्याने त्यांच्या स्थानिक ठिकाणी महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई सार्वजनिक कट्टयावर काव्य संमेलन आयोजित केले होते.
या कार्यक्रमाला निमंत्रित कवी म्हणून जीवनसंघर्षकार कवी लेखक नवनाथ रणखांबे , कथा कादंबरीकार लेखक कवी भटू जगदेव , कवी शाम बैसाणे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि आंबेडकरी चळवळीच्या परिवर्तनवादी दर्जेदार कविता सादर केल्या. महात्मा फुले नगर करानी देखील जोरदार टाळ्यांच्या गजरांनी आणि मोठ्या उत्साहाने कवितांना दाद दिली. महिलांनी देखील कवितांना उत्तम प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धम्म चक्र प्रवर्तन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माणिक होवाळ, अध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष राजू शिवसरन, सचिव संघसक्षक मोरे, उपसचिव रमेश पाल, सल्लागार अरुन झोडगे यांनी मेहनत घेतली .
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर बसवंत गाडगे , अंधेरी विधानसभा प्रभारी कुंदन वाघमारे, मनोहर रत्नपारखे, महेंद्र कानोजिया, ऍड. प्रणाली पाते, सखा धबाले, अंजना शाम बैसाणे , संदीप पाटील, संजना संदीप पाटील उपस्थित होते. जेष्ठ नेते बसवंत गाडगे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचा सत्कार:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना जिल्हा परिषद नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना माॅडम यांचा भाजपा युवा मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला,यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री.भागवत बावणे,भाजपा नेते मा.श्री.संजय आटोळे,तालुकाध्यक्ष मा.श्री.संजय डोंगरे,मराठवाडा संयोजिका शर्मिष्ठा कुलकर्णी,जिल्हाध्यक्ष भाजपा वि.आ.कृष्णा गंगाधर गायके,जिल्हाउपाध्य तुषार गायकवाड,तालुकाउपाद्यक्ष गजानन नरवडे,तालुकाध्यक्ष ओम कळंकुबे,व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे ह्यांचा विकासकामांचा धडाका सुरू:

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

प्रतिनिधी:(जालना)रावसाहेब दानवे ह्यांनी रेल्वे पदभार स्वीकारल्यापासून त्यांची विकासाची रेल्वे देशात आणि खासकरून मराठवाड्यात सुसाट धावत आहे.मागील काही महिन्यात मनमाड-मुदखेड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण,जालना-जळगाव सर्वेक्षण,जालना अंतर्गत पाणीपुरवठा करिता 129 करोड च निधी,जालना रेल्वे स्टेशन १५० कोटींची श्री राजुरेश्वर मंदिराचा लूक असणारी भव्य इमारत,पिट लाईन,लॉजिस्टिक पार्क,ICT कॉलेज करीत ५५ करोड चा निधी असा त्यांनी लावलेला कामाचा धडाका आवाक करणारा आहे.खासकरून जालनेकरांना हा सुखद आणि तितकाच आश्चर्यकारक अनुभव आहे.जालना रेल्वे स्थानकांच्या मोठ्या अपग्रेडेशनची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेत रेल्वे स्टेशन रूफ प्लाझा/कॉन्कोर्सची तरतूद समाविष्ट आहे.जेथे प्रवासी आणि इतर वापरकर्ते आरामात थांबू शकतील आणि आरामगृह,करमणूक क्षेत्र,प्रतीक्षालय,आसनव्यवस्था,शॉपिंग क्षेत्र रेस्टॉरंट/यासारख्या उत्कृष्ट आणि सुव्यवस्थित सुविधांचा आनंद घेऊ शकतील.कॅफेटेरिया,टॅप केलेले शुद्ध पिण्याचे पाणी पॉइंट्स,प्रसाधनगृहे,वायफाय,एटीएम,वैद्यकीय सुविधा इ.सुविधा ही त्यात अंतर्भूत असतील.काही दिवसांपूर्वीच मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्प करार झाला.ह्या लॉजिस्टिक्स पार्कमध्ये कच्चा माल भाजीपाला साठवून शीतगृहे,मोठी गोदामे उपलब्ध करून देण्यात असून त्या सोबतीला आधुनिक electrified रेल्वे कनेक्टिव्हिटी व समृद्धी महामार्ग सारखी कार्यक्षम रस्ते कनेक्टि्हिटी ची जोड देण्यात दानवे साहेब कोणतीही कसर मागे ठेवली नाही.आज झालेल्या पिट लाईन सेवेची पायाभरणी झाली.भविष्यातील अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ह्या पीटलाइनवर एक्स्प्रेस रेल्वे थांबल्यानंतर रेल्वे तंत्रज्ञ ट्रॅकखाली जाऊन इंजिन तसेच डब्यांची पाहणी करू शकतात.काही बिघाड असेल तर त्याची दुरुस्ती करणे सहज शक्य होते.शिवाय पीटलाइनवर डबे धुणे तसेच स्वच्छतेची खास यंत्रणा असते.त्याशिवाय शेवटचा थांबा असणाऱ्या ह्या पिट लाईन युक्त स्थानक पासून नवीन रेल्वे जालना – गोरखपूर सुरू करण्यास सहज होईल अन् त्याचा फायदा जालना MIDC मध्ये काम करणाऱ्या उत्तर भारतीय मजुरांना होणार आहे.ह्या पीट लाईन मूळे जालना जिल्ह्याचा संपर्क राज्यातील इतर जिल्ह्यांशी वाढणार आणि पर्यायाने विकासाच्या कक्षा रुंदावणार,
विविध रोजगार उपलब्ध होतील,अन् पर्यायाने जालना सोन्याचा पाळणा ही उक्ती शब्दशःजिल्ह्याला लागू होईल.ही अपेक्षा सामान्य जलनेकर बाळगून आहे.ना.केंद्रीयमंत्री दानवे साहेबांनी विकासाची गंगा आपल्या भागीरथी प्रयत्नातून जालन्यात आणण्याची पराकाष्ठा सामान्य जालनेकर अनुभवत आहे एव्हढे मात्र नक्की.

महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या मागणी संदर्भात यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन उपोषण संपन्न

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याध्यक्ष विलासराव जोगदंडे कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे उपाध्यक्ष दयानंद कांबळे महासचिव राजेंद्र जितकर कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे यांच्या आदेशान्वये यावल पंचायत समिती येथे एक दिवशीय लक्षण व धरणे आंदोलन पार अध्यक्ष बाळासाहेब तायडे व संघटक खुशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले ग्राम रोजगार सेवकांच्या 14 वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी एकदिवसीय उपोषण व निदर्शने करण्यात आली शासनाच्या निदर्शनास काही बाबी आणून देण्यात आल्या की ग्रामरोजगार सेवक हा शासन व लाभार्थी या मधला दुवाअसून सुद्धा त्याला तात्पुरत्या मानधनावर काम करावे लागते त्याचा उदरनिर्वाह मिळणाऱ्या मानधनावर चालत नाही त्याला नियमानुसार मानधन प्रवास खर्च मिळत नाही शासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही कसलेही प्रकारची नोंद घेण्यात आलेली नाही आजमीतिला ग्रामरोजगार सेवक निराशेच्या संकटात सापडलेला आहे राज्यात महात्मा गांधी मनरेगा माध्यमातून 264 योजना राबविणाऱ्या ग्राम पातळीवर यासारख्या दिवसभर राबवून वैयक्तिक लाभाच्या योजना मजुराच्या हाताला काम देणाऱ्या आज स्वतः संसाराचा गाडा चालविण्यास असमर्थ आहे शासनाने व प्रशासनाने मनरेगाच्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेगा योजनेचा मुक्काखाना असणाऱ्या ग्रामरोजगार सेवकाला न्याय देण्याची कृपा करावी व आमच्या खालील प्रकारे मागण्या मान्य कराव्या त्या मागण्या ग्रामरोजगार सेवकांचे आकृतीबंध समायोजन करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे, किमान वेतन कायद्याअंतर्गत ठराविक मासिक वेतन देण्यात यावी, वैयक्तिक खात्यात मानधन जमा करावे, एन एम एम एस अंतर्गत हजेरी घेण्याचे बंधनकारक असल्यास अँड्रॉइड मोबाईल व दरमहा नेट पॅक प्रदान करावा कामाच्या ठिकाणी नेटवर्क नसल्यास ऑफलाइन हजेरी मान्य करावी, ग्रामरोजगार सेवकाला विमा संरक्षण प्रदान करण्यात यावे, ग्राम रोजगार सेवकांचे प्रलंबित देयके त्वरित देण्यात यावी सदर मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात याकरिता आज रोजी एक दिवशीय राज्यव्यापी उपोषणास यावल रावेर चे आमदार श्री दादा चौधरी व सामाजिक कार्यकर्ते अमोल हरिभाऊ जावळे यांनी दूरध्वनीवरून संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून जाहीर पाठिंबा दिला माजी जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले महाराष्ट्र राज्य सरपंच परीक्षेचे यावल तालुका उपाध्यक्ष असा सय्यद ग्रामपंचायत सदस्य मतीरजादे मारूळ ग्रामपंचायत सदस्य संजय भालेराव भालोद सामाजिक कार्यकर्ता मुनाफ तडवी संभाजी ब्रिगेड व छवा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील सामाजिक संघटनेच्या यावल मतदार संघाच्या महिला प्रमुख लक्ष्मीबाई मेढे ग्रामपंचायत सदस्य रमेश तायडे इत्यादी मान्यवरांसह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी राज्यव्यापी एक दिवसीय उपोषण व आंदोलनाला भेटी देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला उपोषणात राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे राज्य संघटक खुशाल पाटील तालुका अध्यक्ष दीपक कोळी उपाध्यक्ष वसीम पिंजारी उपाध्यक्ष अनिल अडकमोल सचिव सरफराज तडवी सहसचिव फकीरा तडवी आदी तालुक्यातील संपूर्ण रोजगार सेवक उपस्थित होते

संग्रामपूर तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता

0

 

आज दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी पंचायत समिती संग्रामपूर समोर विविध मागण्यांसाठी जे आंदोलन होतं त्याची सांगता झाली
सदर उपोषणाला सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांच्या मंडळींनी भेटी दिल्या तसेच सरपंच संघटना आणि ग्रामसेवक संघटना यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला तसेच सर्व पक्षाचे राजकीय पुढारी यांनीही भेटी दिल्या त्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने उपतालुक्का प्रमुख विजय मारोडे, उपतालुकाप्रमुख कैलास भाऊ कडाळे किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे इतर शिवसैनिक भारतीय जनता पक्षाचे माननीय आमदार संजू भाऊ कुटे यांचे भाऊ बाळू भाऊ कुटे राजीव पाटील अंबादास चव्हाण रणजीत सिंग डाबेराव तसेच इतर भाजपाचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य राजीव पवार श्रीराम भाऊ बांगर वसूलकर काका राहुल उमाळे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजुभाऊ ठाकरे व त्यांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भाऊ भोंगळ सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ अरबट सोपान पाटील पप्पू पाटील व इतर सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी ग्रामसेवक संघटनेचे सुभाष भाऊ दुबे आणि सर्व पदाधिकारी तसेच इतरही सर्व पक्षांची पदाधिकारी यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला त्यानंतर पंचायत समिती संग्रामपूर येथील बीडिओ पाटील साहेब यांनी माननीय भिलावेकर साहेब तायडे साहेब यांच्यामार्फत लेखी पत्र देऊन वरिष्ठांकडे माहिती पाठवली असे सांगून उपोषणाची सांगता झाली
तसेच
पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार बांधव दिवसभर उपस्थित राहून त्यांनी पण या उपोषणाला सर्व मदत केली त्यावेळी सर्व तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते त्यासाठी तालुका अध्यक्ष राहुल मेटांगे यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले

कृषी उत्पन्न बाजार समिती व पर्यावरण संवर्धन संस्थेचा संयुक्त उपक्रम.

0

 

हिंगणघाट :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट व पर्यावरण संवर्धन संस्था, हिंगणघाटच्या वतीने १०० वृक्ष लागवडीचा भव्य कार्यक्रम कृ. उ. बा. समिति हिंगणघाटच्या नांदगाव येथील गोडाऊन परिसरात पार पडला.
कृ. उ. बा. समितिचे सभापती श्री. अँड सुधीरबाबु कोठारी यांच्याशी पर्यावरण संवर्धन संस्थेने कृ. उ. बा. समिती, हिंगणघाट परिसरात हिरवळ दिसावी याकरिता निवेदन दिलेले होते. यावर सकारात्मक प्रतिसाद देत कोठारी साहेबांनी ५०० झाडांच्या लागवडीची इच्छा व्यक्त केली. त्यातील पहिल्या टप्प्यात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण करताना दुर्मिळ होत चाललेल्या व देशी प्रजातींची लागवड करण्यात यावी, असे दिगांबरजी खांडरे यांनी सुचविले होते. त्यानुसार बेल, कवठ, शिवलिंग, कुसूम, जारूळ, बहुनिया, कडूनिंब, अर्जुन, हिरडा, जांभूळ, काटसावर, आंबा ही झाडं लावण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुधीरजी कोठारी तर प्रमुख अतिथी म्हणून वनश्री दिगांबरजी खांडरे, कृ. उ. बा. समिती समुद्रपूरचे सभापती हिंमतरावजी चतुर, हिंगणघाट बाजार समितीचे संचालक ओमप्रकाशजी डालिया, मधुसूदनजी हरणे,संजयजी कात्रे, नगरसेवक धनंजयजी बकाने, निलेशजी ठोंबरे, समाजसेवक सुनिलजी डोंगरे, प्रा. अभिजित डाखोरे, प्रा. श्रीकृष्ण बोढे, संतोषजी खाडे, नथ्थुजी ढेकरे, जेष्ठ पत्रकार सतिशभाऊ वखरे, राजेश धनरेल, तेजस तडस यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे सचिव तुकाराजी चांभारे यांनी तर प्रास्ताविक व आभार पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी केले. याप्रसंगी शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक मोहन भाऊ कठाने यांचा वाढदिवस वृक्षारोपणासह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिंगणघाट बाजार समितीचे सर्व कर्मचारी मंडळी तर पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्रदीप गिरडे, सचिन थुल, उमेश मंगरूळकर, अजय वानखेडे, सतिश नक्षीने, धनराज कुंभारे, राकेश झाडे, प्रा. योगेश वानखेडे, विनोद थुटे, हेमंत हिवरकर, उमेश डेकाटे, राहुल सिंगरु, सचिन एलकुंचवार, पवन डफ, नरेन्द्र मेघरे, साकीब शेख, दर्शन बाळापुरे, रंजित भोमले, प्रमोद माथनकर, यांनी सहकार्य केले. तर रूग्नमित्र गजू कुबडे, विठ्ठल गुळघाने, नितीन क्षीरसागर, चंद्रकांत ननंदकर, दिपक जोशी, आसिफ अली, मोहन पेरकुंडे, सुरज कुबडे, आनंद कांकरिया, सुनिल इंगोले, मनिष चितलांगे, अशोक पवनीकर, पंकज मसतकर, गणेश कुंभारे, संजय कुंभारे आदींची उपस्थिति होती.

पोदार इंटरनेशनल स्कूल भुसावळ मध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

अक्लुद तालुका यावल येथील पोदार जम्बो किड्स व पोदार इंटरनेशनल स्कूलचा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात झाला. विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आले. शिक्षकांनी व विद्यार्थींनी वर्गात गांधींजींच्या जीवनशैलीवर व राहणीमानावर सुंदर देखावे बनविले होते. पालकांसाठी व विद्यार्थांसाठी आईस्क्रीमच्या काड्यांपासून चरखा बनविणे, कागदापासून लाल बहादूर शास्त्रींची टोपी बनविणे. तीन माकडचे चित्राला बोटांच्या ठसांच्या सह्याने रंगविणे, प्रश्नमंजुषा अश्या प्रकारचे विविध मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

पालक व गांधीजी, कस्तुरबाजी, लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या वेशभूशेतील विद्यार्थ्यांनी दाडी यात्रेच्या देखाव्यापर्यंत दांडी मार्च काढला. शाळेचे प्राचार्य श्री.आनंद हिरालाल शाह यांनी लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दोन्ही महापुर्षांचे अभिवादन केले. विद्यार्थांसाठी आयोजित केलेले विविध खेळ व देखावे हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा श्रृंगी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक श्री.रामदास कुळकर्णी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.