Home Blog Page 254

नवरात्र उत्सवानिमित्त निशानपुरा वार्ड येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

दि. ०८ ऑक्टोंबर
हिंगणघाट :- निशाणपुरा वार्ड लोकमान्य टिळक प्राथ.शाळा येथे मॉ साहेब राज माता जिजाऊ चौक व आई रेणुकामाता नवरात्री उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवानिमित्ताने अमित गावंडे मित्र परिवार द्वारा मोफत आरोग्य तपासणी (महिला)व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन उत्स्फुर्तपणे यशस्वीरीत्या पार पडले.
वार्डातील बहुसंख्य महिलांनी आरोग्य तपासणी शिबीरात सहभाग नोंदविला तसेच”रक्तदान हेच जीवनदान”या वाक्याला सार्थ ठरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांनी व युवतींनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला.
शिबीराचे उदघाटन मा.श्री.कोठेकरसर (मुख्यध्यापक),डॉ. सौ. बोंडे मॅडम( उपजिल्हा रुग्णालय,हिं.),मा.श्री.नरेंद्रजी थोरात पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आले. तर उपस्थित सर्व नागरीकांचे व शिबीराला यशस्वी करतांना महत्वाचा घटक असलेले सेवाग्राम रुग्णालयातील श्री.प्रविणजी गावंडे व रक्तदान शिबीराची टिम व आरोग्य तपासणी साठी आलेली स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या टिमचे श्री. चेतन काळे आभार मानले.
आयोजन यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ धर्मे,अक्षय निकम, अक्षय भांडवलकर,गोपाल जांभुळे,विक्की राऊत,स्वप्निल सुरकार,अमोल बोभाटेअनिल पावडे,दर्शन वाडेकर,आशिष दांडेकर,अखिल देवघरे,चेतन काळे, तुषार चोपडे, अमोल बोभाटे,गोलू पावडे,प्रशांत गावंडे,शैलेष सुरकार,गोलू वरघणे,रोहित मोरे,मो.शाहिद,गणेश पढाल,योगेश सुरकार,चंदु झाडे, पिंटुभाऊ सुरकार, सौ. सोनाली गावंडे,सौ.वैशाली सुरकार,सौ.मिराबाई निकम,कोरे काकू,उगले काकू,सौ.वैशालीताई भडे व सर्व नवरात्री उत्सव मंडळाचे सदस्यांनी खुप परिश्रम घेतले…

विकासाच्या प्रश्नावर आपण राजकारण करत नाही,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन.

0

 

2.सातोना खुर्द व वरफळवाडी ता.परतूर येथे 01 कोटी 45 लाख रुपयांच्या कामाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

3.सातोना जिल्हा परिषद सर्कल मध्ये भाजपचा उमेदवार निवडून द्या,निवडणूक होताच दोन कोटी रुपयांचा निधी सतोना गावच्या विकासासाठी देणार.

4.सातोना येथील नागरिकांना आमदार लोणीकरांचे आश्वासन.

5.मतदार संघातील 200 गावांमध्ये सामाजिक व धार्मिक कार्यासाठी सभागृह बांधले.

6.देवेंद्र फडणवीस,नितीनजी गडकरी,सुधीर मुनगुंटीवार यांच्या माध्यमातून मतदार संघासाठी 4700 कोटीचा निधी आणला.

7.पूल व रस्त्याच्या कामासाठी 01 कोटी 20 लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल आमदार लोणीकर,अन्वर देशमुख यांचे वरफळवाडी येथील ग्रामस्थांनी मानले आभार.

8.वॉटर ग्रीड कार्यान्वित होण्यापूर्वी दुष्काळी परिस्थितीमध्ये मतदार संघामध्ये 25 कोटी रुपयांचे आर ओ प्लॅन ग्रामपंचायतीना उपलब्ध करून दिले.

प्रतिनिधी(जालना)विकासाच्या कामात आपण कधीच राजकारण केलेले नसून विकासाच्या मुद्द्यावर आपण जनतेसोबत असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते सातोना खुर्द व वरफळवाडी तालुका परतुर येथे 01 कोटी 45 लक्ष रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते ऍड अनवर देशमुख यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माधवराव कदम भा ज पा ता अध्यक्ष रमेश भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून दिल्यास सातोन्यातील नागरिकांना दोन कोटी रुपयांचा निधी विकासासाठी तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.
वॉटर ग्रीडयोजना कार्यान्वित होण्यापूर्वी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतींना 25 कोटी रुपये निधीचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठीचे आरो प्लांट उपलब्ध करून दिले होते असे सांगतानाच वरफळ वाडी येथील प्लॅन सुरू आहे की नाही यासंदर्भात त्यांनी विचारणा केली प्लॅन सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगताच याबाबतीत त्यांनी समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की आपण मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा भार सांभाळत असताना परतुर विधानसभा मतदारसंघासाठी वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आणली त्याचबरोबर तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तात्कालीन अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मतदार संघासाठी 4700 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला
या निधीच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचा गजानन महाराजांच्या शेगाव पासून तर पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत रस्ता बांधण्याचं काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्यामार्फत आपण मंजूर करून आणले व मतदार संघाचा विकास साधला
मतदार संघातील प्रत्येक रस्ता डांबरीकरणाने कसा जोडता येईल यासाठी प्रयत्न करत असताना मतदार संघातील प्रत्येक रस्त्याला डागरीकरणाच्या माध्यमातून जोडण्याचे काम आपण मंत्री असताना प्राधान्याने केले असे सांगत असतानाच अनेक गावातील कार्यकर्ते नियमितपणे मागणी करायचे धार्मिक कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यक्रमांची कार्यक्रमासाठी सभागृह पाहिजे कार्यकर्त्यांची ही मागणी पूर्ण करताना 200 च्या वर गावांमध्ये सभा मंडपाचे बांधकाम आपण मंत्री असताना केले मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि आघाडीचे सरकार सत्तेत आले कोरोना सारखी महाभयंकर महामारी ही जगासह देशात थैमान घालत होती या महामारीचा मुकाबला करण्यासाठी माझ्या फंडातून मी स्वतः 25 लक्ष रुपये कोरोना महामारीतील अनेक निष्पाप जीवांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारची उपकरणे खरेदी करण्यासाठी दिले.
वॉटर ग्रीड सारखा महत्वकांक्षी प्रकल्प मतदार संघात उभा करून मतदार संघातील प्रत्येक गावाला स्वच्छ निर्मळ फिल्टर चे पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले आज या वॉटर बीडच्या माध्यमातून जवळपास परतुर तालुक्यातील शंभर तर नेर शेवली व मंठा तालुक्यातील 40 ते 50 गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मतदार संघातील प्रत्येक गावाला स्वच्छ व निर्मळ पाणी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.
दरम्यान आमदार बबनराव लोणीकर यांनी वरफळवाडी गावासाठी सांस्कृतिक सभागृह शाळा खोल्या आरो प्लांट आधीच अनेक विकास कामे केली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी नमूद केले.
आपल्या 42 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आपण राजकारण करीत असताना विकासाच्या मुद्द्यावर कुठेही राजकारण केलेले नसून विकास कामाला आपला सदैव पाठिंबा राहिला असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
या प्रसंगी वरफळवाडी तालुका परतुर येथील 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या पूल व रस्त्याच्या कामाचे तसेच सतोना खु येथे नागरी सुविधे अंतर्गत सिमेंट रस्ता नाली बांधकाम 20 लक्ष रु, शाळा खोली दुरुस्ती 4 लक्ष रु आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

संग्रामपूर तालुक्यातील रोजगार सेवकांची तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

दिनांक 06/10/2022 ते 08/10/2022 प्रशिक्षण आयोजित केले सदर प्रशिक्षणामध्ये रोजगार हमी मध्ये असणारी काम यावर सविस्तर माहिती देण्यात आली
तसेच पंचायत समिती मधून विविध असणाऱ्या योजना बद्दल माहिती देऊन गोरगरिबांपर्यंत योजना पोहोचवा असे आदेश माननीय गटविकास अधिकारी संजय पाटील साहेब यांनी दिले प्रत्येक गावातील गरजू लाभार्थी हा वंचित राहणार नाही व त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व रोजगार सेवक यांनी काम करणे गरजेचे आहे असे संजय पाटील यांनी सांगितले
सदर शिबिरामध्ये एक दिवस बोडखा या गावात जाऊन काम कसे करायचे आणि नियोजन कसे करायचे याबद्दल ट्रेनिंग देण्यात आले त्याचप्रमाणे प्रत्येक गावात काम झाली पाहिजे असे सांगण्यात आले अशी माहिती रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल मेटांगे यांनी दिली सदर प्रशिक्षणासाठी अवकाळे साहेब व खोडके साहेब यांनी प्रशिक्षण दिले
कार्यक्रमाचे उद्घाटन व समारोप माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी भिलावेकर साहेब यांनी केला सदर प्रशिक्षणासाठी सुरडकर मॅडम मोरे साहेब परिहार साहेब मुळे साहेब इंगळे साहेब त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला

हिंगणघाट शहरात शासन व प्रशासन यांची अतिक्रमण बाबत दुटप्पी भूमिका

0

 

हिंगणघाट :- आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्याचे रोडवरील अतिक्रमण हे सजावट तर बस स्टॅन्ड कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण वर कारवाई ?
महाराष्ट्र नगरोत्थान सन 2017-18 अंतर्गत किरकोळ भाजीपाला विकणान्यांकरीता लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या 120 ओट्याचे काय झाले ?
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान सन 2017-18 अंतर्गत 120 ओट्याचे बांधकान पुर्ण झालेले आहे. पुर्ण झालेल्या ओटयाचे रस्त्या वरील किरकोळ भाजीपाला विक्रेता यांचे अर्ज मागवून त्यांचे कडून ओटयाचा किराया खालील प्रमाणे ठरविण्यात आला
1)ओट्याच्या क्षेत्रफळा अन्वये प्रति वर्ष किराया रुपये 750/- व सेवाकर, इतर कर
2)दुसन्या वर्षी किरायाच्या 10 टक्के वाढ व सेवाकर, इतर कर
3) तिसन्या वर्षी किरायाच्या 10 टक्के वाढ व सेवाकर, इतर कर
या समितीमध्ये 1) श्री. प्रेम साजनदासजी बसंतानी, अध्यक्ष, न.प.हिंगणघाट 2) श्री. मंद्रकांत गणपतराव घुसे, समिती सदस्य 3) श्री. चंद्रकांत गणपतराव मावळे, समिती सदस्य, 4) श्रीमती. अर्चना रामदासजी कुबडे, समिती सदस्य, 5) श्री. नरेश पांडुरंगजी युवनाथे, समिती सदस्य यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीने घेतलेल्या निर्णया बाबतची अमोल बजावणी का होत नाही

प्रा. डाॅ.राजु निखाडे रा.से.यो.उत्कृष्ट कार्यक्रम अधीकारी पुरस्काराने सन्मानीत

0

हिंगणघाट:-मलक मो नईम

स्थानिक रा.सु.बिडकर महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. राजु निखाडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यपिठाने उत्कृष्ट एन एस एस अधीकारी या पुरस्काराने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डाॅ.सोपानदेव पिसे व प्र.कुलगुरु डाॅ.संजय दुधे यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. राजु निखाडे रा.सु.बिडकर महाविद्यालयात २०१६ पासुन रा.से.यो.चे कार्यक्रम अधीकारी म्हणुन कार्य करीत.
प्रा.डाॅ.राजु निखाडे हे रा.सु.बिडकर महाविद्यालयात समाजशास्र विभागप्रमुख असुन त्यांचे कडे २०१६ पासुन रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी म्हणुन काम पाहतात.त्यांच्या या कामाची दखल घेत विद्यापीठाने वर्धा जिल्हा विभागिय समन्वयक म्हणुन २०१९ पासुन नियुक्ती केली आहे. त्यांच्या या कार्यकाळात राष्ट्रिय सेवा योजना विशेष शिबिर वेळा, शेगाव कुंड, वणी, सातेफळ, पिंपळगाव, या ठिकनी घेतले. त्यात त्यांनी ग्रामस्वच्छता वृक्षारोपन, श्रमसंस्कार शिबीर, आरोग्य शिबिर, पशुशिबीर, रक्तदान, वेगवेगळ्या विषयातुन उदबोधन केले.यामळे प्रत्येक ग्रामपंचायतने त्यांच्या कामाची दखल घेत उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणुन त्याना प्रमाणीत केले.
प्रा.डाॅ.राजु निखाडे शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजीक कार्यातही जुळलेले आहेत.लोकसत्ता, पुन्यनगरी, सारख्या दैनिक वृत्तपत्राचे लेखनही केले आहे.संताजी नागरी पतसंस्थेचे संचालक, उपाध्यक्षही राहिलेले आहे.
तसेच नागपुर टिचर असोशिअनचे वर्धा जिल्हा उपाध्यक्षही होते. हिगंनघाट रोटरी क्लबचे२०२१-२२ चे उपाध्यक्ष होते २०२३-२४ चे प्रेसिडेंट ईलेक्ट आहे व फर २०२३ च्या रोटरी उत्सवाचे अध्यक्षपदही भुषवित आहे.
नागपुर विद्यापीठ परीक्षा मुल्यांकन माॅडरेशन पीएचडी. चे मार्गदर्शक असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ जळगाव पीएचडी चे सुपरवायझर म्हणुनही कार्य केले. सध्या ते विद्यापीठाच्या समाजशास्र विषयाच्या टाक्सफोर्स समीतीचे सदस्य ही आहे. तसेच कोविडच्या काळात प्रा.राजु निखाडे यांनी रा.से.यो.च्या स्वंयमसेवकासोबत गरजुंना बिस्कीट वाटप फळांच्या कीट वाटप पाणी वाटप व गरजुंना दवाखाण्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले.तसेच बॅंके समोर झालेल्या गर्दीमधेही स्वयंमसेवकाना सोबत घेउन सोशल डिस्टेंसिंगचेही कामे केली.
रा.से.यो.च्या उत्कृष्ट कामाची दखल घेउन रा.सु.बिडकर महाविद्यालयालाही उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देण्यात आला.
आपल्या या पुरस्काराचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा मा.डाॅ. उषाताई थुटे व प्राचार्य डाॅ.भास्कर आंबटकर महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक रा.से.यो चे स्वयंसेवक रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.मुखी व सर्व सदस्य यांना दिले.

निवृत्त जवानांचा प्रहार तर्फे सत्कार

0

हिंगणघाट मलक नईम

सीमा सुरक्षा दलात 22 वर्षे देश सेवा देऊन निवृत्त होऊन आपल्या जन्मगावी हिंगणघाट येथे आल्या नन्तर आज दि.४ आक्टोंबरला येथील कारंजा चौक येथे स्वागत सोहळ्याचे आयोजन प्रहार संघटनेतर्फे करण्यात आले.
आज सकाळी वीर जवान श्रीकांत रामाजी फलके यांचे रेल्वेने हिंगणघाट शहरात आगमन झाल्या नंतर येथील कारंजा चौकातील अमर ज्योतीला त्यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.राष्ट्रगीत गाऊन सलामी देण्यात आली.
त्यानंतर निवृत्त जवान श्रीकांत फलके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रहारचे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी गजू कुबडे यांनी त्यांच्या देशसेवेचा गौरव केला.
या कार्यक्रमाचे आयोजक
सूरज कुबडे यांनी अतिथींचे स्वागत केले.या कार्यक्रमाला माझी सैनिक संघटनाचे पुंडलिक बकाने, दिलीप वाघमारे आणि संघटनेचे पदाधिकारी,राष्ट्रवादी चे माजी आमदार राजू तिमांडे,भाजप कार्यकर्ते देवा कुबडे प्रहारचे धीरज नंदरे, किशोर देवढे, संदीप प्रजापती, प्रवीण चरडे, पडवे सर, अजय ठाकरे, सतीश गलांडे, अमोल वाघमारे, मोहन पेरकुंडे, समीर मानकर,सुमित तेलहांडे,सुधीर मोरेवार, भास्कर सोरटे, अनंता वायसे, रितेश गुडधे, प्रकाश मने, मयूर पुसदेकर, अमोल किनाके,

१०० वृक्ष लागवडीचा भव्य उपक्रम

0

 

कृषी उत्पन्न बाजार समिती व पर्यावरण संवर्धन संस्थेचा संयुक्त उपक्रम.

हिंगणघाट: मलक मो नईम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट व पर्यावरण संवर्धन संस्था, हिंगणघाटच्या वतीने १०० वृक्ष लागवडीचा भव्य कार्यक्रम कृ. उ. बा. समिति हिंगणघाटच्या नांदगाव येथील गोडाऊन परिसरात पार पडला.

कृ. उ. बा. समितिचे सभापती श्री. अँड सुधीरबाबु कोठारी यांच्याशी पर्यावरण संवर्धन संस्थेने कृ. उ. बा. समिती, हिंगणघाट परिसरात हिरवळ दिसावी याकरिता निवेदन दिलेले होते. यावर सकारात्मक प्रतिसाद देत कोठारी साहेबांनी ५०० झाडांच्या लागवडीची इच्छा व्यक्त केली. त्यातील पहिल्या टप्प्यात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण करताना दुर्मिळ होत चाललेल्या व देशी प्रजातींची लागवड करण्यात यावी, असे दिगांबरजी खांडरे यांनी सुचविले होते. त्यानुसार बेल, कवठ, शिवलिंग, कुसूम, जारूळ, बहुनिया, कडूनिंब, अर्जुन, हिरडा, जांभूळ, काटसावर, आंबा ही झाडं लावण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुधीरजी कोठारी तर प्रमुख अतिथी म्हणून वनश्री दिगांबरजी खांडरे, कृ. उ. बा. समिती समुद्रपूरचे सभापती हिंमतरावजी चतुर, हिंगणघाट बाजार समितीचे संचालक ओमप्रकाशजी डालिया, मधुसूदनजी हरणे,संजयजी कात्रे, नगरसेवक धनंजयजी बकाने, निलेशजी ठोंबरे, समाजसेवक सुनिलजी डोंगरे, प्रा. अभिजित डाखोरे, प्रा. श्रीकृष्ण बोढे, संतोषजी खाडे, नथ्थुजी ढेकरे, जेष्ठ पत्रकार सतिशभाऊ वखरे, राजेश धनरेल, तेजस तडस यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे सचिव तुकाराजी चांभारे यांनी तर प्रास्ताविक व आभार पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी केले. याप्रसंगी शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक मोहन भाऊ कठाने यांचा वाढदिवस वृक्षारोपणासह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिंगणघाट बाजार समितीचे सर्व कर्मचारी मंडळी तर पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्रदीप गिरडे, सचिन थुल, उमेश मंगरूळकर, अजय वानखेडे, सतिश नक्षीने, धनराज कुंभारे, राकेश झाडे, प्रा. योगेश वानखेडे, विनोद थुटे, हेमंत हिवरकर, उमेश डेकाटे, राहुल सिंगरु, सचिन एलकुंचवार, पवन डफ, नरेन्द्र मेघरे, साकीब शेख, दर्शन बाळापुरे, रंजित भोमले, प्रमोद माथनकर, यांनी सहकार्य केले. तर रूग्नमित्र गजू कुबडे, विठ्ठल गुळघाने, नितीन क्षीरसागर, चंद्रकांत ननंदकर, दिपक जोशी, आसिफ अली, मोहन पेरकुंडे, सुरज कुबडे, आनंद कांकरिया, सुनिल इंगोले, मनिष चितलांगे, अशोक पवनीकर, पंकज मसतकर, गणेश कुंभारे, संजय कुंभारे आदींची उपस्थिति होती.

दुय्यम निबंधकाच्या नियमबाह्य दस्त नोंदणी मुळे शेतकरी याचा फेरफार अडचणीत.

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- राहुल फुलमाळी रा.पारडी येथील र्शेतकऱ्याने उमा राजू मंडलवार रा. हिंगणघाट यांचे मोजा सातेफळ येथील शेत विकत घेतले . शेती विकत घेताना 2.43 या शेतावर एक लाख रुपये बँक ऑफ इंडिया हिंगणघाट यांचे कर्ज होते. यातील 1.21 शेत दि.11.8.3022 ला विकत घेतले. फेरफार घेताना पटवारी यांनी यावर बँकेचे कर्ज असल्यामुळे फेरफार घेतला नाही . संबंधित प्रकरणाची माहिती घेतली असल्यास या मध्येबँकेचा बोझा असलेल्या जमिनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 47 नुसार बँकेच्या संमती/ परवानगी शिवाय हस्तानंतरन करता येत नाही.
शेतकऱ्यांना बँकाना गहाण असलेल्या जमिनीचे वाटणीपत्र , बक्षीसपत्र, विक्रीपत्र अथवा कोणत्याही प्रकारचे हस्तानंतरन करायचे असल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 47 नुसार संबंधित बँकेची परवानगी घेणे आवश्यक असतांना स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयातून दलाला मार्फत शेतकऱ्यां कडून स्वतःचे खिसे गरम करुन नियमबाह्य पद्धतीने दस्त नोंदणी केल्या जात आहे. अश्या नोंदणीकृत दस्ताचे ई फेरफार निर्गतिकरण करतांना तलाठी, मंडळ अधिकारी फेरफार नामंजूर करीत असल्यामुळे शेतकऱ्याने या व्यवहाराकरिता शासनाकडे भरलेला लाखोचा मुद्रांक शुल्क वाया जात असुन, ठरलेल्या व्यवहारातील जमिनीच्या मोबदल्या पासून शेतकरी वंचित राहून त्याची आर्थिक कोंडी होतं आहे. वास्तविक निर्बंधित सत्ताप्रकारातील जमिनी सिलिंग, कुळ कायद्या अंतर्गत, भुदान, सरकारी पट्टेदार, लाभ क्षेत्रातील जमिनी अश्या जमिनीचे व्यवहाराची निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करतांना सक्षम प्राधिकरणाची परवानगी सादर करणे बंधनकारक आहे. परंतु हिंगणघाट शहरात दलाल,अर्जविनिस मार्फत दुय्यम निबंधकांशी संगणमत चिरीमिरीचा व्यवहार करून शेतकरी वर्गाची आर्थिक फसवणूक करीत असल्यामुळे स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयाची उच्च पातळीवर चौकशी करुन दोषी वर कारवाई करण्याची मागणी फसवणूक झालेले शेतकरी करीत आहे

देविदास यादवराव हेमने (मंडळ अधिकारी:- हिंगणघाट) :- बँकेचा बोझा आहे बोझा कमी करून
आना .
गाढवे मॅडम (दुय्यम निबंधक अधिकारी) :- उमा राजू मंडलवार यांचे 2.43 शेत जमीन यापैकी 1.21 शेत जमीन विक्री व्यवहार केला त्यामुळे बँकेचे बोजा कमी करण्याचे ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

सतीश मासाळ (तहसीलदार हिंगणघाट ) :- उमा राजू मंडलवार यांचे संपूर्ण शेत जमीन वर बँकेचे कर्ज असल्यामुळे बँके चे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे .

पोलिस पथकाने ईंजन चोरणाऱ्या आरोपिला केल अटक

0

 

हिंगणघाट मलक नईम

उपरोक्त विषयाची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, यातील दिनांक 29/09/2022 चे 19.00 ते दिनांक 04/10/2022 चे 10.00 वाजता दरम्यान यातील फिर्यादी नामे श्रीमती सुष्मा राजेन्द्र भस्मे वय 43 वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांचे मौजा आजंती शिवारातील शेतातील अर्धवट फॉर्महाउसचे परीसरात ठेवुन असलेले 01) एक डिझेल ईजीन किंमत 30,000/- रू. 02) लोखंडी दोन ग्रिल किंमत 8,000/- रू 03) सहा लोखंडी फासा किंमत 3500/- रू 04) पानेपेंचीस किंमत 500/- रू 05) एक सब्बल किंमत 500/- रू 06) एक कटर मशिन किंमत 2000/- रू 07) विहीरीवर खिराडी बसविण्याचे दोन लोखंडी एंगल किंमत 1500/- रू असा एकुण 46,000/- रू चा माल चा मुददेमाल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याचे फिर्यादीचे रिपोर्टवर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्रमांक 1046/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांनी व त्यांचे पथकाने आरोपी नामे 1) अमरदिप शंकरराव हाडके वय 30 वर्ष, 2) संदीप दिलीपराव गोटे वय 38 वर्ष, 3) आकाष राजेन्द्र कांबळे वय 27 वर्ष तिन्ही रा. मौजा आजंती यांना निश्पण्ण करून त्यांचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेला मुददेमाल आणी गुन्हा करण्याकरीता वापरलेले वाहन एक मालवाहु टाटा चारचाकी क्रमांक एम.एच. 34/ ए.व्हि. /1815 किंमत 2,00,000/- रूपये असा एकुण 2,46,000/- रू चा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास नापोकॉ प्रशांत वाटखेडे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, आषिश गेडाम आणी उमेश बेले यांनी केली.

ग्रुप ग्रामपंचायत मालोद उपसरपंच सैनाज शरीफ तडवी यांनी पदभार स्वीकारले

0

 

यावल तालुका(प्रतिनिधी )विकी वानखेडे

सैनाज शरीफ तडवी यांना ०८ मते पडली तर उर्मिला अनिल बारेला यांना ०५ मते पडली वरी पैकी सैनाज तडवी यांना सर्वधिक ०८ मते प्राक्तझाल्यामुळे त्यांना मालोद ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून यथोचितरित्या निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाबाई भालसिंग बारेला ,सरपंच हे होते
दशरथ रमजान तडवी, जहांगीर शेर का तडवी ,सलीम अकबर तडवी, मुन्नी जम्मा तडवी ,भिका निजाम तडवी ,शकीला रंजीत बारेला, अबेदा सिकंदर तडवी ,परविन भिकारी तडवी ,पिंट्या रुईसिंग बारेला, नजमा हमीद तडवी, सुंदर सिंग गुलाब बारेला, उर्मिला अनिल बारेला
होते तडवी भाऊसाहेब यांनी कामकाज बघितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत रोजगार सेवक ग्रामपंचायत शिपाई ग्रामपंचायत ऑपरेटर उपस्थित होते