Home Blog Page 258

जालना तालुक्यातील पारेगाव शिवारातील कपाशी पिक जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी:

0

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक २८/०९/२०२२ रोजी जालना तालुक्यातील पारेगांव,पारेगांव तांडा,पारेगांव वाडी,जैतापूर व अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे परिसरात कपाशी,सोयाबीन आणि तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मौजे पारेगांव,पारेगांव तांडा,पारेगांव वाडी,जैतापूर व परीसरात अचानक संध्याकाळी ७.०० वाजता वीजा सहीत मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व हाताशी आलेल्या सोयाबीन,कापूस व तुरीचे तसेच नेट चे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहे.तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांची तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी ५०,०००/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत द्यावी.जेणे करून शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर थोड्याफार प्रमाणात मदत होईल.तात्काळ पंचनामा करावे अशी विनंती- रामजी शेजुळ(मा.सरपंच),भाऊराव शेजुळ(सरपंच),छबुराव राठोड(मा.सरपंच),राजेश पवार,केशव सुरूशे,लहु राठोड पारेगाव व अनेक शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

मराठा पाटील युवक समिती शाखा पुनरगठन वरुड ता.शेगाव नामफलकाचे अनावरण

0

 

प्रतिनिधि विट्ठल अवथड़े

मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते दि. 28 बुधवार 2022 रोजी वरुड ता.शेगाव येथे शाखा

नामफलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली या नंतर गावातील नागरीकांन वतीने उपस्थीत समितीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . संस्थापक, अध्यक्ष.गजानन दादा ढगे यांनी युवक समितीच्या कार्याची माहिती देऊन युवकांना संघटीत होण्याचे आवाहन करून युवकांनी उच्चशिक्षित होऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले . व जिल्हा सदस्य, प्रफुल्ल पाटील यांनी ही उपस्थिताना काही मुद्यावर मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील , जिल्हा उपाध्यक्ष, सुनील पाटील ,जिल्हा प्रवक्ता, विठ्ठल अवताडे, जिल्हा संघटक, रामेश्वर निकामे,खामगाव ता. अध्यक्ष, श्रीहरी टिकार,शेगाव, ता. अध्यक्ष, श्याम अढाव,खामगाव तालुका कार्याध्यक्ष, राम पारस्कर, ता. सदस्य, श्रीधर टिकार, शेगाव विद्यार्थी समिती. सदस्य, अजय खोड,सरपंच अमोल भाऊ गोळे, शाखा अध्यक्ष एकनाथ कोकाटे, उपाध्यक्ष सोपान गोळे, कोशाध्यक्ष सागर निकम, प्रविण गोळे, दामोदर गोळे, पाडुरंग गोळे, दिलीप गोळे, निवृत्ती गोळे, संतोष गोळे, अशोक गोळे, मुकिंदा गोळे, गणेश गोळे, राजकुमार गोळे, मधुकर कोकाटे, देविदास कोकाटे, रमेश कोकाटे, श्रीधर कोकाटे, सदानंद निकम, महेश गोळे, नितीन गोळे, महादेव गोळे, अनंता गोळे, चेतन गोळे, अविनाश कोकाटे, योगेश कोकाटे, पवन कोकाटे, ऋषिकेश कोकाटे, प्रदीप कोकाटे, अरुण कोकाटे, प्रज्वल कोकाटे, ज्ञानेश्वर घोंगे, सुनिल गावंडे, शाम कंकाळे, शंकर निकम, दत्ता निकम, शाम कोकाटे, दत्तात्रय कोकाटे,
समस्त गावकरी मंडळी*

जालना तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी:

0

 

तुकाराम राठोड,सावंगी तलाव,ता.जि.जालना

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक २८/०९/२०२२ रोजी बुधवारी जालना तालुक्यातील सावंगी तलाव,उमरी,दहीफळ,पाहेगाव,साळेगाव,पारेगांव,वाडी,जैतापूर,मानेगाव,मोती गव्हाण,बाजीउमृद सह अनेक गावांमध्ये व शेतामध्ये मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे.परीसरात अचानक संध्याकाळी ७.०० वाजता वीजा सहीत मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यासह सह हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस व तुरीचे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहे.तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेला घास हातातुन जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांची तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी ५०,०००/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत द्यावी.जेणे करून शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक संकटावर थोड्याफार प्रमाणात मात होईल.तसेच तात्काळ पंचनामा करावे अशी विनंती शेतकरी वर्गाकडून करण्यात येते आहे.

अट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची UAEदुबई येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धच्या सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडु म्हणुन निवड

0

 

 

यावल ( प्रतिनिधि )विकी वानखेडे

आदीवासी क्षेत्र म्हणुन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोटयाशा गावातुन जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयमुख तरूण क्रिकेटच्या अष्टपैलु खिलाडीची अंतराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली आहे . अट्रावल तालुका यावल येथील रहीवासी असलेल्या कल्पेश नारायण क्षिरसाळे हा फैजपुर येथील डीएन कॉलेज मधील मराठी एमएचा विद्यार्थी असुन , मध्यवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या कल्पेश यास लहाणपणा पासुनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता , अट्रावल सारख्या गावात अतिश्य प्रतिकुल परिस्थितीत कल्पेश याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धपर्यंत भरारी घेतली आहे . दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ पासुन UAE दुबई येथे सुरू होणाऱ्या अंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धसाठी क्लपेश शिरसाळे याची INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ निवड करण्यात आली असुन या संघात निवड झालेला तो महाराष्ट्र राज्यातुन कल्पेश हा एकमेव खेळाडु आहे , नुकत्याच ( राजस्थाव ) येथे झालेल्या अंतरराज्य क्रिकेट स्पर्धतील सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते , या सराव सामन्यांमध्ये देशातील सुमारे ५००च्या वर क्रिकेटच्या खेळाडूंनी यात भाग घेतला होता यापैक्की संपुर्ण देशातुन ३० खेळाडुंची निवड झाली त्यात महाराष्ट्र राज्यातुन कल्पेश शिरसाळे हा एकमेव खेळाडू असुन या INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ, मुंबईच्या निवडी झालेल्या प्रशिक्षणार्थ घेण्यात आलेल्या सराव सामाऱ्यात कल्पेश यांने केलेल्या अष्टपैलू कामगीरीमुळे त्याची ही निवड करण्यात आली आहे या सामन्यासाठी प्रशिक्षक म्हणुन सलाह काजी व मधुसर यांचे मार्गदर्शन त्यास लाभले . आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील छोटयाशा गावात जन्माला आलेल्या या खेळाडुच्या अंतरराष्ट्रीय लिगच्या क्रिकेट सामान्यांसाठी संघात निवड झाल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .8ई

यावल भुसावळ या राज्य मार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था झाली असून अंजाळे घाटावर नव्याने बांधलेल्या पुलावर कठडे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील यावल ते भुसावळ जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्याची पावसामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली असुन , रस्त्यावर ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन रस्त्याची , त्याचबरोबर अक्षरश : चाळण झालेली असुन, त्याच बरोबर कोटयावधी रूपये खर्च करून तयार केलेल्या अंजाळे घाटावरील सुरक्षा कठडे म्हणुन अॅन्टी क्रॉस बैरिअर बसविण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले आहे की , यावल ते भुसावळ मार्गावरील यावल शहरालगत असलेल्या बालाजी सिटी या परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याकारणाने रस्त्याची तलाव सदृष्यस्थिती निर्माण होत आहे तसेच यावल ते भुसावळ या सोळा किलोमिटरच्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे . सदरचे पाणी हे वाहुन जाण्यासाठी गटार नसल्याकारणाने पावसाचे वाहुन जाणारे पाणी हे पुर्णपणे रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवतांना तारे वरची कसरत करावी लागत आहे . वादळी पाऊस सुरू झाला की यावल आगारातुन जाणाऱ्या एसटी बसेस व ईतर वाहनांची रहद्दारी काही काळ बंद करण्यात येते , तरी या मार्गावरील रस्त्यावर ठीकठीकाणी सिमेंट कॉक्रीटचा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजुस गटारी करण्यात याव्यात , तसेच यावल ते भुसावळ दरम्यानच्या रस्त्यावर अंजाळे गावाजवळ मोर नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या प्रवाशी पुलावरून वाहनांची मोठी वर्दळ असते तरी संभाव्य धोका लक्षात घेता या पुलाच्या दोन्ही बाजुस सुरक्षा कठडे ( अॅन्टी क्रॉस बेरिअर ) बांधण्यात यावीत तसेच गेल्या अनेक वर्षापासुन सदरील पुलाचे हे काम कासवगती अत्यंत कमी वेगाने होत असुन या कामाची गती वाढविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

आरेवाडी येथील दसरा मेळाव्यास बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.बाबासाहेब आटोळे यांचे आवाहन

0

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना)कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री बिरोबा बनात अरेवाडी येथे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रविवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यास जालना जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे.
या दसरा मेळावा प्रसंगी बहुजन ह्रदय सम्राट लोकप्रिय लोकनेते आ.गोपीचंद पडळकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील बहुजनांना वंचितांना विस्थापितांना भटक्याना अन्यायग्रस्तांना शेतकऱ्यांना कामगारांना कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांना नोकरदारांना मेंढपाळांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याकरिता आमदार गोपीचंद पडळकर साहेब अविरत संघर्ष करत आहे. आ.पडळकर साहेबांची विचारधारा गाव गाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता या दसरा मेळाव्या प्रसंगी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा चे जालना जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार द्वारे केले आहे.
राज्यभरातील भटक्या वंचित विस्थापित बहुजन समाजातील लोकांच्या प्रश्नांवर विचारमंथन करून त्या प्रश्नांची शासनाला जाग आणून देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आरेवाडी येथील बिरोबा बनात दसरा मेळावा भरवण्यास सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांत कोरोनामुळे हा दसरा मेळावा झाला नाही.यंदापासून पुन्हा हा मेळावा भरवण्याचे श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे.येत्या रविवारी हा दसरा मेळावा होणार आहे.

मुक्ताईनगरात राष्ट्रवादीतर्फे तानाजी सावंतच्या वक्तव्यामुळे जाहीर निषेध

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा जिल्हा अध्यक्ष आदरणीय भैय्या साहेब पाटील व आदरणीय रोहीनि ताई खडसे यांच्या मार्गदर्शना खाली व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्तित ” मराठयांना आताच आरक्षणाची खाज सुटलीका ” असे बेताल व आक्षेपार्ह्य विधान करणाऱ्या व 50 खोके घेऊन ओके झालेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा फोटो निषेद म्हणून जाळण्यात आला. सदर च्या बेताल वक्तव्या मुळे फक्त मराठा सामाज्याच्याच नव्हे तर अठरापगड बाराबलुतेदार व सर्वच जाती धर्मच्या भावना दुखावल्या गेल्या आहे , तरी ह्या सरकार मध्ये मराठ्यांन बद्दल संवेदनशीलता असेल तर त्यांनी येत्या 2 दिवसात तानाजी सावंत चा राजीनामा घयावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या विरोधामध्ये जण आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी, तसेच तहसीलदार संचेती मॅडम , व पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले ..
प्रसंगी जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस श्री ईश्वर भाऊ राहणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री निवृत्ती भाऊ पाटील, माजी सभापती श्री विकास समाधान पाटील, माजी सभापती श्री दशरथ भाऊ कांडेलकर , जिल्हा उप अध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील , वक्ता सेल चे जिल्हा अध्यक्ष श्री विशाल महाराज खोले , कार्य अध्यक्ष सोपान भाऊ दुट्ये , शेषराव पाटील , तालुका सरचिटणीस रवी भाऊ दांडगे , बापू ससाणे ,सोनू भाऊ पाटील , शहर अध्यक्ष बबलू सपधारे , दीपक साळुंखे , मुन्ना बोन्डे , प्रवीण दामोदरे , हरलाल राठोड , सईद खान , संदीप पाटोळे , संतोष पाटील , निखिल पाटील , चंद्रकांत पाटील , प्रदीप पाटील , नितीन पाटील , सारंगराजे, वैभव पाटील , कपिल पाटील , शरीफ शेख ,ऍड. राहुल पाटील , रोशन पाटील , योगेश पाटील , आकाश सुरवाडे , पवन कऱ्हाड , राकेश कऱ्हाड , मनोज इंगळे , जयराज इंगळे , सोपान कोळी , ज्ञानेश्वर भोई , सद्दाम शेख , हातिम भाई , अल्ताफ भाऊ ,वैभव पाटील , विशाल पाटील , विवेक पाटील , मयूर साठे, आशीष घोगरे , स्वप्नील सोनावणे , दीपक ठाकरे , गौरव साळुंखे , कुंदन महाजन , जय सोनावणे, पंढरीनाथ पाटील यांच्या सह राष्ट्रवाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तित होते ..ह

आंतरशालेय गतका पुणे जिल्हा स्तरीय स्पर्धा – २०२२.

0

 

पंजाब राज्यातील पारंपरिक खेळ गतका या खेळाच्या आंतरशालेय जिल्हा स्तरीय स्पर्धा गतका असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी येथे आयोजित करण्यात आल्या. गतका खेळाचा केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेमध्ये १५ शाळेतील २१० खेळाडू सहभागी झाले. यामध्ये अनुक्रमे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी प्रथम क्रमांक, जगद्गुरू इंग्लिश स्कूल देहुगाव द्वितीय क्रमांक, मातृ विद्यालय वाल्हेकर वाडी तृतीया क्रमांक पटकावला.
फरी सोटी (काठीची लढत) आणि काठी फिरवीने या खेळ प्रकारात खेळाडूंनी प्राविण्य मिळवले.
स्पर्धेचे उद्घाटन जि. एस. के. स्कूल चे संस्थापक श्री. गणेश घोगरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गतका असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. संजय बनसोडे सर, सचिव श्री. किरन अडागळे सर, मालुसरे सर हे उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षीस वितरण केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रैना सर, राष्ट्रीय सैनिक संस्था पदाधिकारी श्री. प्रतापराव भोसले सर, सौ. स्मिता माने मॅडम. राष्ट्रीय हॉलीबाँल खेळाडू श्री. श्रीनिवास मुरलीधर सावंत सर यांच्या हस्ते झाले.
पंच म्हणून सुदर्शन सुर्यवंशी सर, रविराज चखाले सर, स्मिता धिवार मॅडम, अंजली बर्वे, श्रेया दांडे, रूपाली चखाले, गणेश चखाले मारीयप्पन सर यांनी कार्यभार सांभाळला.

रोहीनीताई खडसे यांच्या संवाद यात्रेतुन सुटला निमखेड ता बोदवड येथील विद्यार्थी व गावकरयांचा मोठा प्रश्न ..

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

निमखेड ता बोदवड येथील दररोज बोदवड येथे शिक्षणासाठी ४०/५० विद्यार्थी नियमित येत होते तरी त्यांना बोदवड येथे सकाळी शाळेत यायला बस येत नव्हती म्हणुन तेथील गावकरयांनी संवाद यात्रे दरम्यान रेहीणीताई खडसे खेवलकर यांच्या लक्षात विषय आनुण दिला तर ताईनी त्यात ताबडतोब लक्ष देऊन व पाठपुरावा करुण आज पासुन नियमित सकाळी ६.३० वाजता एक व दुसरी १०.१५ वाजता या वेळेत विद्यार्थी व गावकरयांना बसची सुविधा उपलब्ध करुन दिली त्यासाठी जळगाव जिल्हा युवक सरचिटणीस विजय चौघरी यांनी सुद्धा वेळोवेळी जाऊन पाठपुरावा केला म्हणुन गावकरयांनी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले ..तसेच बस .चालक व वाहक .यांचा शाल नारळ फुलांच्या माळा देऊन स्वागत केले उपस्थित सरपंच सुरंगे सर ,संतोषभाऊ पाटील व सर्व गा्रमपंचायत सदस्य विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ७२९ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजुरी आदेशाचे लोणीकरांच्या हस्ते वाटप;

0

 

सेवा समर्पण पंधरवड्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सेवेत कायम तत्पर रहा – लोणीकरांचे आवाहन:

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना)जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण सातत्याने काम करत असून पण लोकांच्या सेवेसाठी आपण कायम तत्पर असले पाहिजे सर्वसामान्य गोरगरीब दिन दलित शेतकरी कष्टकरी माता भगिनी व बांधवांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम प्रत्येकानं करावं त्याचबरोबर आपल्या परीने होईल तेवढी मदत सहकार्य या वंचित वर्गाला करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा मी स्वतः रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोरगरीब दीन दलितांची मदत करणे दुबळ्यांची सेवा करणे यासाठी खर्च करणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले.

तहसील कार्यालय मंठा येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेच्या ७२९ लाभार्थ्यांना अर्थसहाय मंजुरी आदेश पत्राचा वाटप आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना दिव्यांग विधवा परित्यक्ता दुर्धर आजार ग्रस्त अशा अनेक विविध लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ दिला जातो या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील यावेळी लोणीकर यांनी केले.

जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे फळपीके व शेती पिके अनुदान स्वरूपात ०१ कोटी ६४ लाख ८४ हजार ५६० रुपयाचे अनुदान माजीमंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. वितरित करण्यात आलेले हे अनुदान ४२४५ शेतकऱ्यांना दिले जाणार असून जिल्ह्याला एकूण प्राप्त झालेल्या ३ कोटी रुपयांपैकी हा निधी मंठा तालुक्यासाठी प्राप्त झाला होता.

मागील सरकारच्या काळात पिक विम्याची पद्धत पूर्णपणे चुकीची होती त्यामध्ये पीक विमा कंपन्या मालक आणि सरकार मात्र चोर अशा स्वरूपाची चुकीची पद्धत होती त्यामुळे अनेकांना पिक विमा मिळाला नाही लवकरच त्या पिक विमा पद्धतीमध्ये बदल करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ कशी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती देखील यावेळी लोणीकर यांनी दिली.

यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ०२ वारसदारांना प्रत्येकी ०१ लक्ष रुपयाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले त्यामध्ये उस्वद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी हरिभाऊ सरोदे यांच्या पत्नी श्रीमती आशामती हरिभाऊ सरोदे व जाटखेडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बबन गोपाल राठोड यांच्या पत्नी श्रीमती बेबीबाई बबन राठोड यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच वीज पडून जखमी झालेल्या शांताबाई बाबुराव चव्हाण रा.विरगव्हाण यांना देखील ४३०० रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे की हळवडगाव येथील ओंकार सिद्धेश्वर नाईक व माळकिनी येथील ज्ञानेश्वर उद्धवराव जाधव यांना देखील वीज पडून जखमी झाल्यामुळे शासन स्तरावर प्रत्येकी चार हजार तीनशे रुपयांची मदत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती यावेळी लोणीकर यांनी दिली.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा समर्पण पंधरवडा कार्यक्रमांतर्गत ज्ञानेश्वर महादेव सोळंके केदार वाकडी आकाश प्रकाश चव्हाण हिवरखेडा अमित विजय राठोड कराड सावंगी दीपक दिनकर कहाळे वझर सरकटे रोहित उमेश प्रधान टोकवाडी सक्षम सिद्धार्थ खरात पाडळी दुधा स्वरा सिद्धार्थ खरात पाडळी दुधा संतोष उत्तमराव जाधव टोकवाडी गजानन उत्तम जाधव टोकवाडी यांना जात प्रमाणपत्राचे तर शैक्षणिक शेख मंठा बाबासाहेब संपत ढाले हातवन व योगेश राजुदास चव्हाण हिवरखेडा यांना उत्पन्न प्रमाणपत्राचे वाटप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केले यावेळी गणेशराव खवणे सतीशराव निर्वळ पंजाबराव बोराडे राजेश मोरे नागेश घारे प्रसादराव बोराडे उद्धवराव गोंडगे किशोर हनवते प्रसादराव गडदे सुभाषराव राठोड विठ्ठलराव काळे शेषनारायण दवणे राजेभाऊ खराबे बाबाजी जाधव सूर्यकांत जाधव किरण देशमुख कैलास चव्हाण शिवाजी थोरवे विठ्ठलराव कदम दत्ताराव खराबे अशोक बोराडे शरद मोरे श्रीराम खरात नवनाथ चट्टे केशवराव येउल पेशकार प्रल्हाद दवणे नायब तहसीलदार श्री शिंदे कपिल तिवारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.