Home Blog Page 259

जनहितार्थ रक्तदाता शोध मोहीम व जनजागृती अभियान.

0

 

जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुरचा उपक्रम.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी:-जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुर ता.चामोर्शी जि. गडचिरोली द्वारा संचालित जिल्हा रक्तदाता शोध मोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत आपल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नये म्हणून, वेळेवर गरजू व्यक्तीला रक्त मिळवून देण्याकरिता,रक्तदाते शोधण्याच्या व जनजागृती करण्याच्या प्रयत्न करण्याच्या उद्देशाने दिनांक ४ ऑक्टोबर 2022 रोज मंगळवार ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तु) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, सदर रक्तदान शिबिराकरिता आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मा.कुंदन गावडे साहेब यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन युवा मंडळ मुधोली (तु) यांच्या विद्यमानाने,ग्राम रक्तदुत रामकृष्ण दिवाकर झाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तु) येथे आयोजित केले आहे,तरी आपण दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत उपस्थित राहून आपण राष्ट्रीय कार्यास उपस्थित राहून रक्तदान व जे होईल ते सहकार्य करावे असे आपणास युवा मंडळ मुधोली (तुकुम) वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

महात्मा गांधी जयंती निमित्ताने यावल पंचायत समितीमध्ये बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

महात्मा गांधी जयंती निमित्त गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांच्या मार्गदर्शनानुसार बांधकाम कामगार लाभार्थ्यांना वैयक्तिकरित्या फोन करून बोलावून आरोग्य तपासणी करण्यात आली

आज 02/10/2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने पंचायत समिती यावल येथे पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री एकनाथ चौधरी यांच्या मार्गद्शनाखाली ब्लॉक मॅनेजर चेतन चौधरी (पंचायत समिती यावल ) यांनी सर्व बांधकाम कामगारांना स्वतः वयक्तिक कॉल करून ई कामगार नोंदणी/ ऑनलाईन upadte साठी कामगारांचा पाठपुरावा घेतला व महालॅब (Hindlabs) यांच्या अंतर्गत बांधकाम कामगार/ वेठ बिगारी कामगार यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली त्यात रक्त संकलन मेहराज खान यांनी केले त्यात सीबीसी, शुगर,HIV, इत्यादी तसेच बीपी ची चाचणी छाया नन्नवरे यांनी केले तपासणी केले . कॅम्प cordinator सुनील सैंदाणे यांनी ऑनलाईन update केले, त्यात सहकार्य महालॅब लॅब मॅनेजर कल्पेश महाजन, महालॅब लॅब इन्चार्ज भरत नारखेडे, आयसीटीसी समुपदेशक यावल वसंतकुमार संदानशिव , छाया नन्नवरे , चेतन धनगर (mahalab लॅब मॅनेजर जळगाव) यावल पंचायत समिती घरकुल ऑपरेटर मिलिंद कुरकुरे पंचायत समिती ऑपरेटर जावेद तडवी , रोनक तडवी ब्लॉक मॅनेजर चेतन चौधरी, परविन तायडे याच्या सहकार्य ने पार पडला.

मनसे तर्फे पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्या PFI संस्थे विरोधात कारवाई करण्याची मागणी

0

 

हिंगणघाट :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हिंगणघाट तालुका व हिंगणघाट शहर तर्फे निवेदन देण्यात आले मा.श्री अमितजी शाह साहेब गृहमंत्री भारत सरकार आणि माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यानां …मार्फत उपविभागीय अधिकारी साहेब हिंगणघाट जिल्हा वर्धा :…..
विद्येचे माहेरघर असलेले पुणे येथे काही पीपल्स फंड ऑफ इंडियाच्या लोकांनी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे भारतात लावले त्यामुळे येथील देशप्रेमींचा राग अनावर झालेला दिसून येत आहे त्यामुळे देशाची शांती भंगही झाली असती अशा प्रकारच्या नालायक द्रोही देश द्रोहीवर भां दवी कलम १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा जेणेकरून यापुढे कोणीही अशी हिंमत करणार नाही आणि हिम्मत होणार नाही माननीय महोदय गृहमंत्री भारत सरकार यांना विनंती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा जिल्हा उपाध्यक्ष रमेश घंगारे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष जयंत कातरकर. हिंगणघाट शहराध्यक्ष शाम इडपवार वाहतूक विधानसभा सरचिटणीस जितेंद्र रघाटाटे हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष रुपेश चंदनखेडे व अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

जालना जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार,माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा अध्यक्ष भीमराव आबा डोंगरे यांनी आज एकशे पन्नास पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.त्यांचे पक्षामध्ये हार्दिक-स्वागत.यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,शहराध्यक्ष राजेश राऊत,जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,सिद्धिविनायक मुळे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भीमराव डोंगरे काय म्हणाले ते आपण पुढील प्रमाणे ऐकूया.

 

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

दारातच पाळत होता हात भट्टीची दारू ,गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून कारवाही करत आवळल्या मुस्क्या

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

बाळापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ दिनांक 2/10/2022 रोजी सकाळी दरम्यान ठाणेदार अनंतराव
वडतकार साहेब यांना गुप्त
बातमीदाराने माहिती दिली की ग्रामनिंबा येथे नारायण डाबेराव हा त्याचे राहते घराचे अंगणामध्ये अवैधरित्या गावठी हात भट्टीची दारू विनापरवाना विक्री करिता गाळत आहे अशी माहिती प्राप्त होता बीट अंमलदार यांना कार्यवाही करण्याकरिता पाठवले गावात जाऊन आरोपीचे राहते घरी पाहणी केली असता नारायण डाबेराव हा त्याचे अंगणामध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री करता अवैधरित्या विनापरवाना गाळताना मिळून आला त्याचे घराची झडती घेतली असता त्याच्याजवळून पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत अंदाजे 500/- रुपये व एकूण 15 पत्राचे पिपे त्यामध्ये एकूण 150 लिटर सडवा मोहमाच किंमत अंदाजे 1500/-असा एकूण 2000/- रुपयाचा मुद्देमाल आरोपी नारायण शालिकराम डाबेराव वय 60 वर्षे रा. निंबा याचे कडून जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 65 क ड फ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष भोजने, रवी हिंगणे, महिला अंमलदार कविता बुटे यांनी कार्यवाही केली.

महात्मा गांधी जयंती साजरी करून गट विकास अधिकाऱ्याने स्वतः वैयक्तिक बांधकाम कामगारांना फोन करून केला पाठपुरावा ,

0

 

 

विकी वानखेडे यावल

आज 02/10/2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने पंचायत समिती यावल येथे पंचायत समिती गट विकास अधिकारी श एकनाथ चौधरी यांच्या मार्गद्शनाखाली ब्लॉक मॅनेजर चेतन चौधरी (पंचायत समिती यावल ) यांनी सर्व बांधकाम कामगारांना स्वतः वयक्तिक कॉल करून ई कामगार नोंदणी/ ऑनलाईन upadte साठी कामगारांचा पाठपुरावा घेतला व महालॅब (Hindlabs) यांच्या अंतर्गत बांधकाम कर्मचारी वेठरी बिगर कामगार यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली त्यात रक्त संकलन मेहराज खान यांनी केले त्यात सीबीसी, शुगर,HIV, इत्यादी तसेच बीपी ची चाचणी छाया नन्नवरे यांनी केले तपासणी केले . कॅम्प cordinator सुनील सैंदाणे यांनी केले, त्यात सहकार्य महालॅब लॅब मॅनेजर कल्पेश महाजन, महालॅब लॅब इन्चार्ज भरत नारखेडे, आयसीटीसी समुपदेशक यावल वसंतकुमार संदानशिव , छाया नन्नवरे , चेतन धनगर (mahalab लॅब मॅनेजर जळगाव) जावेद तडवी , मिलिंद कुरकुरे रोमत तडवी परविन तायडे
, चेतन चौधरी,याच्या सहकार्य ने पार पडला.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवड्या अंतर्गत स्वच्छ्ता अभियान- डॉ संजय कूटे

0

 

महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तने आयोजित सेवा पंधर वाड्या अंतर्गत जळगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियान आज दिनांक 2 ओक्टोबर रोजी संपूर्ण श हर भर राबविण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधि व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आ डॉ संजय कुटे यांनी छत्रपति शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले व त्या परिसरातील स्वच्छता कार्य करत्या सोबत केली. सकाळी 9 वाजता सदर स्वच्छता अभियानाला कृषि उत्पन्न बाजार समितिच्या आवारात स्वच्छता केली व तेथील माहत्मा ज्योतिबा फुलेनच्या पुतळ्यास माल्यार्पण केले त्यानंतर भीमनगर,सिद्धार्थ नगर व पंचशील नगर येथील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करीत आजूबाजूच्या परिसारातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी अभियान प्रमुख प्रा. राजेश गोटेचा,माजी नगराध्यक्ष सीमाताई डोबे, माजी नागराध्यक्ष रामदास बोम्बटकार, जिल्हा महामंत्री नंदकिशोर अग्रवाल, भाजपा शहर अध्यक्ष अभिमन्यु भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचीन देशमुख, लताताई तायडे, शिल्पा भगत, म्हसाळ ताई, सुरेश इंगळे, अरुण खिरोड़कार, कैलास डोबे, गोटू खत्ती,सखाराम ताड़े, कैलास पाटिल, पांडुरंग मिसाळ,नीलेश शर्मा,अप्पा,करणसींग राजपूत, अजय वंडाळे,शाकिर खान, शुभम चांडाले, शोएब,आशीष सारसर,ओंकार वानखड़े,रामा इंगळे, अमोल म्हसाल,अतुल दंडे, सचीन कल्याणकर,प्रवीण मूळतकर अमोल भगत, कैलास सोनोने,शोएब काजी गणेश आरुड़कर यासह भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरपरिषद हिंगणघाटने राबविले खिळे मुक्त झाड अभियान –

0

 

– हिंगणघाट
दि. ०२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त व सेवा पंधरवाडा अंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या झाडांना असलेले खिळे, अनाधिकृत छोटया पाटया, बोर्ड काढण्याची मोहिम नगर परिषदेने राबविली असुन त्या मोहिमेला वृक्ष मित्र परिवार यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे मोहिम यशस्वी ठरली त्यावेळी सुमारे ८७ छोटे बोर्ड, १७८ छोटे / मोठे खिळे, तार काढण्यात आली.
सदर मोहिम नगर परिषद मुख्याधिकारी श्री. हर्षल गायकवाड यांच्या नियंत्रणात, प्रशासकिय अधिकारी श्री. निलेश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली, उद्यान पर्यवेक्षक श्री. प्रविण काळे यांचे वतीने राबविण्यात आली. सदर मोहिमेची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथुन सकाळी ९.०० वाजता करण्यात आली, सर्व प्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळयास व लाल बहादुर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले, त्यानंतर मोहिम सुरु करण्यात आली. मोहिम यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी श्री. राजु कोल्हे, श्री. विठठल कामडी, श्री. सतिश झक्कणवार, श्री. विजय वानखेडे, श्री. दिपक चंदनखेडे व वृक्ष मित्र परिवार यांचे तर्फे श्री. उमेश मंगळुरकर, श्री. गोपाल मांडवकर, श्री. विठठल गुळघाणे, श्री. गजु कुबडे, श्री. सुनिल डोंगरे, श्री. धनंजय बकाने, श्री. नितिन शिंगरु, श्री. राजु कारवटकर, श्री. प्रेमकुमार पालीवाल, श्री. वासुदेव पडवे, श्री. रतन पटेल, श्री. मिलिंद कोठेकर, श्री. राजु रुपारेल, श्री. दर्शन बाळापुरे, श्री. चंद्रकांत ननंदकर, श्री. गोपाल यादव, श्री. नितिन क्षिरसागर, श्री. धनराज कुंभारे, श्री. दिपक जोशी, श्री. राकेश झाडे, श्री. नरेन्द्र मेघरे, तुषार हवाईकर, श्री. दिनेश वर्मा, श्री. रुपेश लाजुरकर, श्री. किशोर पांडे, श्री. शुभम घोडे, श्री. नितिन भांडे, श्री. देवा जोशी, श्री. सचिन एलकुंचेवार, श्री. हरीष त्रिवेदी, श्री. विजय चंदनखेडे, श्री. अतुल नंदागवळी, श्री. आसीफ अली. श्री. प्रशांत वैघ, मोहन पिरकुंडे, श्री. सुरज कुबडे, श्री. नैतिक मुन, श्री. रंजित जिवणे, श्री. राम मिहाणी, श्री. मनिष शितलांगे, श्री. सुरेंद्र टेंभुर्णे, श्री. राजु खांडरे, श्री. गौरव तांबोळी, श्री. सतिश गौळकार, श्री. रवि रोहणकर, श्री. संजय कारेकर, श्री. अमोल वाघमारे व सर्व वृक्ष मित्र परिवार व श्री. आशिष भोयर, पर्यावरण संवर्धण संस्था यांनी मोहिम यशस्वी करण्यासाठी खुप मदत केली.
नगर परिषदेतर्फे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, झाड आपल्या घरासमोर / आस्थापने / दुकानासमोर असल्यास त्याच्यावर बोर्ड, खिळे, तार लावु नये जेणे करुन वृक्षाची वाढ व्यवस्थित होईल व वृक्षाची जोपणास होईल.
वृक्ष प्रेमी / वृक्ष मित्र यांनी संकल्प केला की, एक बि लावली नं… त्याचं झाड होते, आणि एक झाड लावलं तर त्याचं वटवृक्ष होते, या वाक्यासह शहर हिरवेगार करण्याचा मानस असल्याचे सामारोप करण्यातांना सर्वांनी संकल्प करुन कार्यक्रमाची सांगता केली.

अजब प्रेमाची गजब कहाणी अल्पवयीन मुलाकडून युवती गर्भवती , गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलाने एका १९ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका खेडेगावात १९ वर्षीय तरूणी ही आपल्या आईवडील व आजी सोबत वास्तव्याला आहे. शेतात मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करते. गेल्या वर्षी किनगाव शिवारातील शेतात काम करत असतांना तरूणीची १६ वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. त्यातून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, अल्पवयीन मुलाने तरूणीला शेतात बोलवून तिच्यावर वारंवार
अत्याचार केला. या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांना जबर धक्का बसला. पिडीतेसह तिच्या नातेवाईकांना यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

तीर्थक्षेत्र पोहरागड ते मंत्रालय मुंबई रमेश पवारची पदयात्रा -एक चिंतन:

0

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना)तीर्थक्षेत्र पोहरागड हे 15 कोटी गोर बंजारा समाजाचे काशी असुन प्रवित्र श्रद्धास्थान आहे.भारताच्या अनेक राज्यातूनच नव्हे तर विदेशातूनही पोहरागड येते भाविक भक्त येतात आणि क्रांतीसुर्य संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नतमस्तक होतात.क्रांतीसुर्य सेवालाल महाराज हे विज्ञानवादी होते.त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 मध्ये आंध्रप्रदेशातिल स्वर्णकोपा या गावी झाला असून, त्यांनी भारत भ्रमण करून गोरबंजारा समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि विज्ञानवादाकडे नेण्यासाठी ते आपल्या वाणीतून लोकाला संदेश देत असत.जाणजो…छाणजो…पच माणंजो! अशा महान संतांचे जन्मदिनी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी.या मागणीसाठी रमेश उर्फ सोनू उत्तम पवार राहणार उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम हा मुलगा(युवक) 26 सप्टेंबर 2022 रोजी धनराज राठोड ला सोबत घेऊन पोहरागडावरून मुंबई येथील मंत्रालयाकडे पदयात्राने जात आहे.गोरबंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 15 फेब्रुवारीला जयंतीदिनी शासकीय सुट्टी मिळावी.ही मागणी घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून हा मुलगा निवेदन देणार आहे.खरंच रमेश पवार यांचे आपण कौतुक केले पाहिजे.आज गोरबंजारा समाजामध्ये विविध संघटना,नेते पुढारी,विचारवंत,बुद्धिजीवी ही सर्व मंडळी असताना कोणाच्याही मनात 15 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी मिळावी.यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याला भेटून निवेदन द्यावे.असे कोणाच्याही मनात आलेले नसताना मात्र रमेश उत्तम पवार या मुलांच्या मनात ही गोष्ट यावी ही गोरबंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल! 26 सप्टेंबर 2022 रोजी पोहरागड येथील महान संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेऊन मंत्रालय मुंबईकडे निघालेला हा रमेश पवार यांच्या हिमतीला दात द्यावी लागेल. खरंच गोरबंजारा समाजामध्ये खेड्यापाड्यात सुद्धा अनेक विचारवंत रमेश पवार सारखे आहेत हे या घटनेवरून दिसून येते.पोहरागड येथे हजारो भाविक भक्त दरवर्षी रामनवमी यात्रेला येतात.इतके महत्त्व या पोहरागडाला आहे.एक दोन कोटी लोकसंख्या असलेल्या जातीच्या संताच्या जन्मदिनी शासनाने सुट्टी जाहीर केलेली असून गोरबंजारा समाजाची भारतामध्ये जवळपास 15 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा राज्य व केंद्र शासनाने याबाबतची दखल घेतलेली नसल्यामुळे ही गोष्ट हेरून हा सेवालाल भक्त रमेश पवार या मागणीसाठी तो मंत्रालयाकडे पैदल निघालेला आहे.पोहरागडावरून निघताना त्यांचे फार जल्लोसात स्वागत केलेले असून गावोगावी हा सेवालाल भक्त रमेश पवार यांचे जंगी स्वागत होत आहे. हा जवळपास 700 ते 800 किलोमीटरचा प्रवास रमेश पवार पदयात्रेंनी करणार असून ऊन, पाऊस याची पर्वा न करता आपले जीवन सेवालाल चरणी समर्पित करून तो चांगल्या भावनेने मुंबईकडे निघालेला आहे. दररोज तो 25 ते 30 किलोमीटर अंतर कापत आहे.तो जवळपास 21 ते 22 दिवसात मुंबई ला पोहचेल. आज तो बिबी वरून सिंदखेडराजा कडे निघालेला आहे. आणि सिंदखेडराजा येथे मुक्काम आहे.. ही फार मोठी गोरबंजारा समाजासाठी उपलब्ध असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रमेश पवार यांच्या पदयात्रेची दखल घेऊन 15 फेब्रुवारी ला संत सेवालाल महाराजांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी जनसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.रमेश पवार यांचे कौतुक करणे हे शब्दात बसत नाही.रमेश पवार यांच्या पदयात्रेला कोटी कोटी शुभेच्छा. संत सेवालाल महाराज संत जेतालाल महाराज सामकीयाडी आपणास विनंती करतो की आपला भक्त मुंबईकडे निघालेला आहे. त्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी,हीच प्रार्थना.
नोट—मी गावोगावीच्या लोकांना विंनती करतो की ,रमेश पवार आपल्या गावात आल्या बरोबर आपण निदान तासभर तरी त्यांच्या सोबत चालावे जेणेकरून त्यांच्या पदयात्रेला बळकटी मिळेल.आणि शासनाने शुद्धा या पदयात्रेची दखल घेऊन त्याला आरोग्य सुविधा पुरवावी.
!!जय सेवालाल,जय वसंत!!
रमेश पवार-मो.नंबर-9765092059.