Yavalnews:यावल दि.२८ यावल येथील आठवडे बाजाराच्या दिवशी अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे या महिलेचे निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ट्रक ट्रक चालक विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली नागरिकांनी केली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील चुंचाळे येथील कस्तुराबाई चैत्राम सावकारे वय ५८
यांचा काल यावल येथे शुक्रवारच्या बाजारात रस्त्यावरील अतिक्रमणामुळे झालेल्या अपघातात पायाला गंभीर दुखापत झाली असता त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू असताना काल शुक्रवार दि.- २७ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले,त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि.२८ रोजी दुपारी ५ वाजता चुंचाळे येथील राहत्या घरापासून निघेल त्या चैत्राम सावकारे यांच्या पत्नी होत तर किरण व विजय चैत्राम सावकारे यांची आई होत.
कस्तुराबाई काल यावल येथील आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी आल्या असता बऱ्हाणपूर- अंकलेश्वर ( यावल चोपडा रोडवर ) या महामार्गावर भरत असलेल्या बाजाराच्या आजूबाजूला व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे एका वाहनाच्या चाकाखाली त्यांचा पाय दाबला जाऊन गंभीर दुखापत झाली असता त्यांच्यावर यावल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव हॉस्पिटलमध्ये तातडीने रवाना करण्यात आले होते.
परंतु औषध उपचार सुरू असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले. यावल नगरपालिकेच्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि संबंधित सर्व यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे यावल येथील अतिक्रमणाचा पहिला बळी चुंचाळे येथील कस्तुराबाई सावकारे या ठरल्याने चुंचाळे ग्रामस्थ यांच्यासह यावल शहरात,तालुक्यात वाहनधारकांचे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावल येथील बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण आता तरी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेने काढायला पाहिजे आणि यात काही मोजक्या ठराविक राजकीय पुढार्यांनी,समाजसेवकांनी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप न करता शासकीय अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सहकार्य करावे अन्यथा यापुढे फार मोठी अप्रिय घटना घडू शकते याची समय सूचकता बाळगून तात्काळ अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
यावल शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे जागोजागी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो हे या अधिकाऱ्यांना आणि काही लोकप्रतिनिधींना दिसत नाही का..? आणि अतिक्रमण का काढले जात नाही.? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Yavalnews /गेल्या महिन्यात अतिक्रमण काढणे संदर्भात काही प्रमाणात सुरुवात करण्यात आली असता यावल शहरातील व बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण का काढले गेले नाही याबाबत सुद्धा यावल शहरात चर्चा सुरू आहे.
प्रतिनिधी आपल्या अतिशय साधी राहणे आणि जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे चर्चेत असणारे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे हे वेगवेगळ्या सामान्य घटनेने चर्चेत असतात. 27 जून वार शुक्रवार अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीच्या सर्वे करत असताना त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.
त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संवाद साधून समस्या सोडविण्याचे आदेश दिले सरसकट नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी वरच्या स्तरावर बोलणे केले हे सगळं सुरू असताना सकाळी आठ वाजेपासून घराच्या बाहेर पडलेले आमदार एक वाजता सहज मजाक मध्ये बोलले मला भूक लागली आहे.mlamanojkaynde
शेजारी असलेल्या मायमाऊलीने लगेच टोपली मधून पाच-सहा भाकरी काढल्या ठेचा लोणचं आमदार साहेबांच्या हातावर टेकविल्या आमदार साहेब तात्काळ तेथेच बांधावर न्यारीचा आनंद घेतला. आणि तात्काळ पुढील गावाच्या बांधावर जाण्यासाठी पुढे निघाले आमदार साहेबाचा हा साधेपणा बघून सामान्य लोक आवक होत आहे.
सामान्य चा आमदार अशी प्रतिमा जोपासत आमदार साहेब नक्कीच मतदार संघाचा विकास करतील ही अपेक्षा जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात बळावली आहे. अधिकाऱ्यांचा ताफा शोभत असल्याने अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली आमदार साहेबांसोबत चिखल तुडवत शेतात जावं लागलं.
mlamanojkaynde/मात्र या कृतीमुळे शेवटच्या घटकातला व्यक्तिमत्व सुखावून गेला यावेळी प्रामुख्याने नितीन कायदे प्राध्यापक सदाशिव मुंडे प्राध्यापक अरविंद चव्हाण विठ्ठल पाटील आटोळे अंबादास खंड परमेश्वर खंदारे विष्णू भाऊ केंद्रे नंदाजी कांगणे दिनकर फड चिखला सरपंच गणेश काकड देउळगाव कोळ सरपंच गणेश फड व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने साहेबांसोबत उपस्थित होते
Yavalnews:सतोद, 26 जून 2025 – ग्रामीण शिक्षण मंडळाच्या वतीने विकास विद्यालय, सतोद येथे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ग्रामीण शिक्षण मंडळाचे चेअरमन मा. श्री. अशोक त्र्यंबक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. पराग महाजन (मानसोपचारतज्ज्ञ, भुसावळ) यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. त्यांच्या सामाजिक जाणिवेचा व सेवाभावाचा हा अभिनंदनीय नमुना ठरला.
कार्यक्रमास ग्रामीण शिक्षण मंडळाचे सचिव श्री. प्रकाश धांडे, व्हाईस चेअरमन श्री. गोपाल फेगडे, डॉ. लखिचंद महाजन, माजी चेअरमन श्री. नितीन महाजन, अथर्व मेडिकल एजन्सीचे संचालक श्री. कैलास चौधरी तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, विद्यालयाचे सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Yavalnews:कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. के. आर. सोनवणे यांनी केले, तर सर्व दाते व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक श्री. एस्. डी. पाचपोळे यांनी केले.
हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, व सामाजिक संघटना कडून शहरातील विविध समस्यासाठी नगर परिषदेवर धडक आंदोलन करण्यात आले.
हिंगणघाट शहरातील १४२ कोटी रुपयांच्या अमृत योजने अंतर्गत मल निसारण भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा योजनेचे कामे झाली असून व नंतर ५० कोटीचे वाढीव कामे करण्यात आली अमृत योजना फेस १ चे काम संतोष कॅन्स्टशन कंपनी नांदेड यांना ६१ कोटी ची कामे दिली व २०१७ झाली या कामाला सुरुवात झाली.
फेस २ चे काम गुजरात येथील कंपनीला ५० कोटीची कामे दिली व ती सुरू आहे. व सन २०१८ साली मल निस्सारन योजना ८१ कोटीचे काम लक्ष्मी कॅन्स्टशन गुजरात यांना देण्यात आली. व ते कंपनीने काम सन २०२२ साली पूर्णता करून गेली. परंतु आजही हि कामे शहरात पूर्ण झालेली नाही. शहरात मल निसारण योजने अंतर्गत रस्ते खोदकाम केले असून रस्त्याचे कामे अजूनही अपूर्ण आहे.
तसेच रोड वरील चेंबर बनविण्यात आले त्या चेंबर चे झाकन पूर्ण पणे तुटलेल्या स्थितीत आढळून येत आहे. तसेच शहरातील काही प्रभागात नळाचे काम झाले आहे. तर काही प्रभागातअजून हि कामे झालेले नाही असे आढळून येत आहे. तर कुठे झालेल्या कामात नळाला तोट्या देखील लागल्या गेल्या नाही. एकंदरीत या झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला आहे असे दिसून येत आहे.
या झालेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित कंत्राकदारावर कारवाई करण्यात यावी.
तसेच शहरातील सन २००८ साली वना नदीच्या पात्रात ५ कोटी ३४ लाख रुपयांचा बंधारा बांधण्यात आला. व सन 2011 साली तो बंधारा पाण्यात वाहून गेला या कामात संबंधित कंत्राटदार यास प्रगती पुस्तके प्रमाणे रक्कम देण्यात आली होती. व त्या वेळेला अधिकारी व राजकीय पुढारी यांच्या हस्तशेप असल्यामुळे या बंधाराच्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आला.
तसेच या बंधाऱ्यासाठी आलेली शासकीय निधी प्रशासनानी कोणत्या बँकेत ठेवली होती यांची सदर माहिती देण्यात यावी. तसेच संपूर्ण काम झाल्याची ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते का? आणि एकाच कामाला दोन वेळा निधी मंजूर होत असतो का ? यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असे दिसून येत आहे. यामुळे या बंधाऱ्याची चौकशी करून त्यावेळेसचे संबंधीत अधिकारी व राजकीय पुढारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच नवीन बंधारा ५९ करोड रुपयाचा आहे तर त्यांचे स्वागतच आहे.
परंतु नवीन बंधाराचे काम निकृष्ट दर्जाचा न होता चांगल्या दर्जाचे व्हावे. याकरिता निरीक्षणासाठी वेगळी समिति नेमून त्या कामावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. जर हा बंधारा निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आला व त्यात परत भष्ट्राचार झाला तर आम्ही शासन / प्रशासनाला जबाबदार ठरवु. तसेच नवीन बंधाऱ्याच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार होऊ न देता या बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे.
तहसील कार्यालय ते रुबा चौक दरम्यान १८ कोटी ७० लाख रुपये निधी देऊन ९०० मिटर चा रस्ता निर्माण केला जात आहे. हा रस्ता शासनाच्या कोणत्या निकषाप्रमाणे निर्माण करण्यात येत आहे, त्यांचे विवरण आम्हाला द्यावे. १८ कोटी रुपये हा जनतेचा पैसा असून या कामांत भष्ट्राचार होत असेल तर या रस्त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. बस स्टॉप समोरील ट्रॅव्हल्स पॉईंट पासून ते झांसी राणी चौक पर्यंत संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.
हा रस्ता रहदारीचा असून या रस्त्यावर बस स्टॉप, महाविद्यालय, शासकिय कार्यालये आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या रस्त्याच्या खड्याच्या प्रश्न मार्गी लावावा.मनसे चौक ते डांगरी वार्ड पूला पर्यंत रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून संथ गतीने सुरू झाले आहे. परंतु आज पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावर मुख्य आठवडी बाजार भरत असतो. तसेच रस्त्याच्या मधोमध्ये दुभाजक अजून पर्यंत उभारलेले नाही. या रस्त्यामुळे नागरिकाना नाहक त्रास सहन कराया लागत आहे. त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.शहरातील डांगरी वार्ड येथील समर्थ रामदास आखाडा पासून ते लौटन चौक पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन एक वर्ष अगोदर करण्यात आले परंतु आज पर्यंत या रस्त्याचे काम अध्यापही झालेले नाही. करीता या रस्त्याच्या कामा कडे जातीने लक्ष घालून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे.
सर्व विषयाला गांभीर्याने घेऊन वरील सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तीव्र ठोस भूमिका घेईल नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन, प्रशासन राहील असे निवेदन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
Sharadpawar/यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहर निरीक्षक महेश झोटिंग पाटील,हाजी मोहम्मद रफिकभाई, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे,समाजसेवक सुनील डोंगरे,माजी नगरसेवक अशोक पराते, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर,दिव्यांग सेल प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,जिल्हामहासचिव मिलिंद कोपुलवार, महिला तालुका अध्यक्ष कविता वानखेडे,अंकिता गहलोत, गोमाजी मोरे,श्रीकांत भगत,राजेश भाईमारे,विजय तामगाडगे,सुधाकर वाढई, नितीन भुते,साहेबराव येडे,जगदीश वांदिले, नाना पुंड, रवी गिरसावले,उमेश नेवारे,सुनिल घोडखांदे,रमेश चतुर,प्रवीण भुते,अनिल लांबट, कुणाल येसबरे, प्रशांत एकोणकर,सुशील घोडे,विपुल थुल, हुकेश ढोकपांडे,देवा गवई, किशोर गायकवाड,पंकज भट्ट,राजू मुडे, आकाश हुरले,अन्सार शेख, पप्पू आष्टीकर,दिपक अंबरवेले,शेखर निखाडे, घिमेकर गुरुजी, मोहम्मद शाहिद,अनिल भुते,राहुल जाधव,वैभव साठोने, प्रशांत मेश्राम,छोटू वानखेडे,संजोक टेभोंर्ने, निखिल शेळके, रवी बोरकर,सौरभ घोडखांदे,सचिन घोडे, विपुल वाढई,रोहीत लेदे,मंगेश सातघरे,नंदू वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक ७६ लाख अधिक मतदारांची नोंद झाली असल्याच्या वाढीव मतदानाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका २५ जून २०२५ रोजी न्यायालयाने फेटाळली आहे.Election
या निर्णयामुळे प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उठलेल्या गंभीर प्रश्नांवर न्यायालयाने थोडासा विरोध दर्शविला आहे.
याचिकेत या ७६ लाख वाढीव मतांवरील आकडेवारीवर संशय व्यक्त केला गेला होता की ती निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीशी जुळत नाही आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही अपवित्र प्रवृत्ती घडली असण्याची शक्यता लक्षात घेतली गेली होती.
प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांना पत्र लिहून ईव्हीएमच्या वापराचा आणि १९६१ च्या निवडणूक नियमांत झालेल्या बदलांविरुद्ध एकत्रित लढा देण्याचा आवाहन देखील केला होता.Election
न्यायालयाने हे प्रकरण दोन्ही बाजूंच्या मतांवर ऐकून तपासून निकाल दिला असून, त्यानुसार याचिका फेटाळण्यात आली. न्यायालयाने या याचिकाकारणाने वेळ वाया गेला असल्याचा उल्लेख करत प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पुढील निर्णयासाठी निकालाचे सविस्तर कारण पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देण्याचे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षांच्या टीकांचा भडका कमी होण्याची शक्यता आहे, पण निवडणुकीतील वाढीव मतदानाचा भान राहण्याचे प्रश्न अजूनही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील.
या याचिकेनंतर निवडणूक समितीच्या कार्यपद्धतीवर अधिक लक्ष केंद्रित होण्याची गरज असल्याचे मतही काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.Election
Prakashambedkar / या याचिकेच्या फेटाळण्यामुळे प्रकाश आंबेडकरांसह विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे, तरीही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा प्रश्न अजूनही कायम आहे, ज्यावर पुढील काळात अधिक चर्चा होणार आहे.
दोघेही एकाच ठिकाणी असल्याचा गैर फायदा – शेतकऱ्याचे कामे प्रलंबित
या आधी ही विभागीय वन अधिकारी यांना तब्बल पुराव्या सहकार्यालय बंद असल्या बाबद तक्रार करण्यात आली होती मात्र त्यांनी कुठलीच ठोस कारवाई न केल्याचे स्पष्ट
Foreshtnews:देऊळगाव राजा : तालुक्यातील सामाजिक वनीकरण कार्यालची प्रतिक्रिया त्यांच्या कर्मचाऱ्या कडून उघडकीस सविस्तर माहिती अशी कि वनक्षेत्र पाल (RFO) हे दोघे पती पत्नी एकाच ठिकाणी असल्याने कर्तव्यात कसूर करत असून कार्यालयाचा कारभार मनमानी करत आहेत तसेच शेतकऱ्याचे वृक्ष लागवड बांदावरील वृक्ष लागवड असे कामे मात्र अद्याप ही प्रलंबित आहेत.
तसेच कार्यालयीन लिपीक नामे सोसे साहेब व दुसरे कर्मचारी श्री गजानन पोटे यांनी सुद्धा स्पष्ट बाईट द्वारे बोलतानी कळविले कि वनक्षेत्रपाल हे कधीच कार्यालयात चमकले नाहीत ते फक्त १ मे, २६जानेवारी व १५ ऑगष्ट या दीना निमित्त च कार्यालयात येतात नंतर मात्र कधीच आले नाहीत या उलट कार्यालचा कारभार हा घरूनच कसा चालतो आवक जावक रजिष्टर, असेल काही शासकीय कामकाज पत्रव्यवहार, पगार बिल घेण्यासाठी त्याच्या घरीच जावे लागते.
तसेच कार्यालयाचे चाबी सुद्धा शासकीय कर्मचारी यांच्याकडे नसून ही सर्व कामे एका खाजगी व्यक्ती मार्फत केली जातात असे स्पष्ट सांगितले तसेच त्यांना फोन द्वारे संपर्क केला आसता फोन सुद्धा घेत नाही असे सांगितले तसेच हे कार्यालय महिनाभर कर्तव्यात कसूर करून बंद असल्या बाबत विभागीय वन अधिकारी यांना पुराव्यासह तकरार करण्यात आली होती
मात्र त्यांनी ही सुद्धा थातूर मातुर कारवाई करून पाठीशी घातल्या मुळे सबधिताला मात्र आपले काहीच होत नाही या गुर्मीने परत ही मनमानी सुरूच आहे यांना वरिष्टा चा धाक न राहिल्या मुळे भय राहिले नाही मात्र आता नागरिकांना प्रश्न पडला आहे कि दोघे ही पती पत्नी अधिकारी एकाच ठिकानि असल्याचा गैर फायदा घेऊन मनमानी करून कर्तव्यात कसूर करत असल्याने ते आर्थिक गैरव्यावहारात अग्रेसर आहेत.
तसेच शासकीय निधीचा अपहार च्या तक्रारी असंख्य वाढत आहे व ते वादग्रस्त असून ते आर्थिक बबिशी निगडित असलेल्या पदायोग्य नसून येथून त्यांना दुय्यम पदाच्या जसे कि कार्या यौजना, प्रशिक्षण संस्था बांबू संशोधन केंद्र, अशा ठिकाणी बदली करून त्यांना आर्थिक व शासकीय निधी मिळणाऱ्या पदा पासून दूर ठेवण्यात यावे.
Foreshtnews /व तात्काळ त्याची विभागीय चौकशी करून त्याच्यावर दोषारोप करून नियमोचित कार्यवाही व्हावी व कार्यवाहीच अहवाल सार्वजनिक रित्या जाहीर व्हावा अशी देऊळगाव राजातील प्रतिनिधी व समाज माध्यमाची दाट चर्चा सुरु आहे
हिंगणघाट:- पतंजली योग परिवार हिंगणघाट व अभिनव विचार मंच हिंगणघाट द्वारा २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने भव्य निशुल्क योग शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन निखाडे मंगल कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले आहे.
सदर योग शिबिराचा तिसरा दिवशी, या योग शिबीराला शुभेच्छा देण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सचिन कापकर सदस्य अभिनव विचार मंच प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. शरीर स्वास्थ्या करिता नियमित योग, प्राणायाम, व्यायाम, करणे हाच उपाय आहे. योग साधक,साधिकांना मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.
योग शिबिराचे मार्गदर्शन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या प्रोटोकॉलचे व आसनांचे प्रात्यक्षिक योगशिक्षिका प्राची प्रसाद पाचखेडे यांनी केले. योग शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंढरी तडस यांनी केले.
Hingnghat :पतंजली योग समिती व अभिनव विचार मंच द्वारा शहरात प्रमुख मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी हिरवी झंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
Andolannews:सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून. ग्रामपंचायत मध्ये दररोज नागरिकांचे कामे पडतात परंतु ग्रामपंचायत अधिकारी हे कार्यालयामध्ये हजर नसतात.
व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बेकादेशीरपणे ठराव देणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, महिला ग्रामपंचायत सदस्यांना उध्दटपणाची वागणूक देणे, माहिती अधिकार अर्जदाराला माहिती अधिकारांमध्ये माहिती न देणे व त्या अर्जदाराला माहिती अधिकाराने काय होते.
अशी उडवाउडवीची उत्तरे देणे, विकास कामाच्या संदर्भात अनिमित्तता ठेवून बोगस कामे करणे, सरपंचपती यांच्यासोबत संगणमत करून भ्रष्टाचार करणे. अशा विविध कारणामुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा दोन दिवसाच्या नंतर ठिय्या आंदोलण करण्याचा इशारा देण्यात येत आहे.
sangitraobhongal:पातुर्डा ता. संग्रामपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम बऱ्याच महिन्या पासून रेंगाळत असून सदर बांधकाम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मा. जि.प.उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,मौजे पातुर्डा बु. गावासह लगतच्या १३ ते १४ खेड्यांची लोकसंख्या पाहता, पातुर्डा बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची नितांत आवश्यकता आहे.
यासंदर्भात शासन व प्रशासनाकडे यापुर्वी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नविन इमारतीस मंजुरात मिळाली होती. सदर कामाची ई-निविदा घेतलेल्या ठेकेदाराचा आकस्मिक निधन झाल्यामुळे इमारत बांधकामास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.
मात्र सदर कामाची परत दुस-यांदा ई टेंडर प्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण स्तरावर शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी, शेतमजुर व नवजात शिशु सह सर्वांना प्राथमिक उपचाराची गरज भासते. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविता याव्या यासाठी नवीन ईमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यात यावे.
जुनी इमारत क्षतीग्रस्त असल्यामुळे ती पाडण्यात आली आहे.त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली असुन, निव्वळ एकाच खोलीतुन रुग्णांना सेवा दिल्या जात असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या इमारत कामास ३ वर्षा आधी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने, २ वर्षा आधीच ही इमारत पूर्ण होऊन जनसेवेसाठी समर्पित होणे गरजेचे असताना, प्रशासनाच्या दिरंगाईने परत नव्याने नवीन प्रशासकीय मंजुरात घ्यावी लागली, उशिरा झालेली निविदा प्रक्रिया त्यात आलेले अडथळे, आज रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही या इमारतीस आणखी उशीर होत असल्याने हा या परिसरातील नागरिकांवर होत
sangitraobhongal:असलेला अन्याय आहे. आम्ही अन्याय सहन करणार नाही. त्यामुळे मौजे पातुर्डा ता. संग्रामपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रलंबित इमारतीचे प्रत्यक्ष बांधकामात सुरुवात करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्या जाईल, त्याची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, संगीतराव भोंगळ यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी केलेले आंदोलन आणि उपोषण सर्वश्रुत असून यावेळी ते कोणते आंदोलन करतात हे पाहणे औसुक्याचे ठरेल.
बुलढाणा:मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरु झाली आहे. मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख येथील विस गावाकऱ्यांना हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या.
केंद्रीय आरोग्य, आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणानी भेगांची गंभीर दखल घेतली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुख मध्ये दाखल झाली. ह्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता जिल्हा स्तरावरील जिल्हा साथरोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रशांत तांगडे ,वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ.बालाजी आद्रट उपस्थित होते. स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मिश्रा, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका तथा गावातील सगळ्या आशा सेविका व ईतर कर्मचारी वृंद यांनी सदर तपासणी केली .
पथकाने २० रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील १२ महिने ते ५ वर्षांपासून आहेत. मागील १-२ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ञांकडुन रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले .
काय म्हणतात डॉक्टर?
सदर आजार हा संसर्गजन्य नाही. ह्या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही.विविध प्रकारच्या प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार ( ऑटोम्मुने ) पध्दतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डाक्टर तांगडे यांनी सांगितले.
Pratapraojadhav / दुसरीकडे सर्व रूग्णांनी घ्यावयाची काळजी व उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन रुग्णांना व स्थानिक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.