Home Blog Page 27

Hingnghatnews /राज्यस्तरावर तनवी कन्नाकेचा प्रवेश — ज्ञानदीप विद्यानिकेतनचा अभिमान वाढविला

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:-हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था संचलित ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथील तनवी कन्नाके हिने अलीकडेच पार पडलेल्या विभागीय स्तरावरील जुडो स्पर्धेत अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

तनवीच्या या यशामुळे ज्ञानदीप परिवारात आनंद आणि अभिमानाची लहर पसरली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पणा राठी, सहसचिव रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण ढोबे, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल, तसेच क्रीडा शिक्षक रोहन हुमाड यांनी तनवीचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ज्ञानदीप विद्यानिकेतन ही संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे. तनवी कन्नाकेने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने शाळेचे नाव उज्ज्वल केले असून ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

Hingnghatnews /शाळेच्या शिक्षकवर्गाने आणि विद्यार्थ्यांनी तनवीचे अभिनंदन करत तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Hingnghatnews/ शहीद कोठारी बंधूंच्या स्मृतिदिनानिमित्त विहिप-बजरंग दलतर्फे हिंगणघाटात भव्य रक्तदान शिबिर

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (ता. ५ नोव्हेंबर) — शहीद हुतात्मा कोठारी बंधू यांच्या बलिदान दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, हिंगणघाट शहर यांच्या वतीने श्रीराम मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४० हून अधिक रामभक्तांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आणि राष्ट्रभक्तीचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीराम आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रक्तदान या सर्वश्रेष्ठ दानातून अनेकांचे प्राण वाचतात, या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विहिप वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, प्रखंड मंत्री देवा वाघमारे, बजरंग दल सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी, प्रखंड संयोजक दीपक शर्मा, नगर संयोजक संदीप नासरे तसेच अजय भोंग, सुरेंद्र आगरे, ओमप्रकाश मस्कर, हर्षल लाखे, रोशन चंदनखेडे, संदीप सातपुते, प्रमोद टिपले, अतुल सूर, शंकर गेडेकर, संजय कडू, मनीष शेंडे, राम खोकले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

रक्तसंकलनासाठी सेवाग्राम येथील वैद्यकीय टीम उपस्थित होती. शिबिरात सूरज वर्थी, पवन गावंडे, जय आष्टाणकर, दिनेश नरड, हेमंत चाफले, नयन पणत, अंजेश पांडे, हर्षल मसाये, अनिल चांगल, महेश बोकारे, ऋषिकेश भोयर, नितीन सिंगरू, कुणाल राऊत, शुभम लाखे, राहुल जगताप, मंगेश तेल्हाडे, गोपाल जोशी, सौरभ कावळे, श्रीरंग धारकर, समीर भोयर, शंकर वरघने, निशांत शिरपूरे, कृष्णा नासरे, पंकज देशपांडे (भाजप), आदर्श सुपारे, जगदीश लोणकर, राजू खंडसकर आणि अन्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Hingnghatnews /या उपक्रमास पोलीस स्टेशन हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच श्याम इडपवार, भाजपचे अभय संचेती व पुंडलिक बकाने यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
या रक्तदान शिबिरातून सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा संदेश समाजात पोहोचला. आयोजकांनी सर्व रक्तदाते व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Farmernews /दारोडा येथे आत्मा अंतर्गत ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम: सघन कापूस लागवड व रब्बी हंगामाचे नियोजन

 

प्रतिनिधी सचिन वाघे

दारोडा – ४ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) रोजी साईबाबा सभागृह, दारोडा येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आत्माचे ए. एन. देवतळे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, हिंगणघाट यांनी प्रास्ताविक देऊन केली.

कृषि शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे यांनी शेतकरी दिलीप पोहणे यांच्या शेतातील सघन कापूस लागवडीचा शिवार फेर करून प्रत्यक्ष फायद्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, डॉ. रुपेश झाडोदे यांनी रब्बी हंगामातील एकात्मिक पिक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले.

डॉ. निलेश वझिरे यांनी कपाशी पिकातील किड व रोग नियंत्रणाबाबत, तर डॉ. सविता पवार यांनी BBF लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
मा. श्रीकांत अमरशेटीवार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी जमीन तयार करण्यापासून लागवड खर्च व विक्री व्यवस्थापनापर्यंतचा मार्गदर्शन दिले.

तसेच, मा. स्वप्नील तोरणे, उपविभागीय कृषी अधिकारी, हिंगणघाट आणि एस. डी. सुतार, तालुका कृषी अधिकारी यांनी योजना अंमलबजावणी आणि विविध कृषी योजनेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी दिलीप पोहणे यांनी सघन कापूस लागवड अनुभवावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभाप्रदर्शन डॉ. अंकिता अगायित्कर यांनी केले.

Farmernews /दारोडा, वडनेर, कूटकी, आर्वी, काचगाव, सिरगाव आणि इतर गावांतील शेतकरी बांधव आणि महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

buldhana urban/ एका अजब गजब बँक नरमली आणि तब्बल ७० कोटीचा बोजा कमी केला.

 

[ जैन ट्रस्ट जमिनीच्या वाद चव्हाट्यावर! नंतर खुलासे समोर येतीलच .]

बुलढाणा ः- एका अजब ,गजब बँकेचा गैर कारभार सुरू असतांना व जैन वसतीगृह प्रकरण उजाळात येत असतांना आणखी एक प्रकार उघडकीस आला तो म्हणजे दोन बँकांचे तब्बल ७० कोटीचा कर्जबोजा कमी करण्याचे केल्याचे अधिकृत रित्या समजते.

याबाबत प्राप्त माहिती सदर संस्थेच्या प्रभाग एक रोड शाखेकडून गोखले लँडमार्क एस एन व्ही तर्फे दोन कर्जदारांनी सहभाग कर्ज योजनेअंतर्गत व्यावसायिक कामासाठी कर्ज घेतले होते, त्यासाठी तारण म्हणून सदर मालमत्ता रजिस्टर गहाण खताद्वारे लिहून दिलेली आहे.

सदर मालमत्तेच्या उता-यावरील संस्थेचा कर्ज बोजाची नोंद कमी करण्यास काही हरकत नाही, त्यामध्ये बुलढाणा अर्बन व क्रेडिट सोसा,लि, कडील २० कोटी व श्री विरेश्वर क्रेडिट सोसा. लि. संस्थांचे ५० कोटी असे.

buldhana urban/एकूण ७० कोटी रुपये कर्ज कमी करण्याचे पत्र विभागीय व्यवस्थापक यांनी दिल्याचे समजते. ह्यावरून जनतेने समजून घ्यावे, या अजब, गजब बँकेचा किती अनागोंदी कारभार सुरू आहे ,एवढेच तुर्त.,, आणखी बघू काय प्रकार उघडकीस येतात.त्याचा पर्दाफासा होईलच.

Sharadpawar /राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज — जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले

 

१० नोव्हेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत — वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे आवाहन

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने हिंगणघाट येथे भव्य आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले होते.atulvandile

बैठकीस प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते सुनिल राऊत, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सहकार नेते वासुदेव गौळकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, सुधाकर खेडकर, विनोद वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा सचिव श्रीकांत भगत, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे आदी मान्यवरांची होती.

या वेळी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी उमेदवारीसाठी इच्छुकांनी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्णतः सज्ज आहे. आगामी निवडणुकांत गावपातळीपासून जनतेचा विश्वास संपादन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक सक्षम पर्याय ठरेल. युवक व महिलांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत बूथस्तरीय संघटन रचना, मतदार नोंदणी, जनसंपर्क अभियान आणि स्थानिक प्रश्नांवरील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत घवघवे यांनी मानले.

Sharadpawar /या प्रसंगी हिंगणघाट तालुका अध्यक्ष मिलिंद कोपुलवार, शहराध्यक्ष बालू वानखेडे, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी गटनेता आशिष देवतळे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, युवक सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hingnghatnews /हिंगणघाटला मिळणार नवी सांस्कृतिक ओळख!

 

भव्य नाट्यगृह बांधकामाच्या भूमिपूजनाने शहरात सांस्कृतिक चैतन्य

प्रतिनिधी – सचिन वाघे

हिंगणघाट :नगर परिषद हिंगणघाट तर्फे आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शहरात भव्य अशा सांस्कृतिक सभागृह (नाट्यगृह) बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रकल्पासाठी तब्बल ₹१७.२५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने हिंगणघाट शहराला सांस्कृतिक वैभवाची नवी ओळख मिळणार आहे.

या नाट्यगृहाचे भूमिपूजन हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या सभागृहात १००० आसनक्षमतेचे वातानुकूलित सभागृह, आधुनिक ध्वनी-प्रकाश व्यवस्था, कलाकारांसाठी स्वतंत्र तयारी कक्ष, तसेच पर्यावरणपूरक बांधकामाचे वैशिष्ट्य असणार आहे.

या प्रसंगी वर्धा लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार रामदास तडस, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, निलेश ठोंबरे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, तसेच माजी उपाध्यक्ष, नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Hingnghatnews /मान्यवरांनी या उपक्रमामुळे हिंगणघाट शहराचा सांस्कृतिक विकास आणि कलात्मक चळवळींना नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Hingnghatnews/ हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद – बजरंग दल तर्फे दि.५ नोव्हेंबर ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, हिंगणघाट शहर तसेच हिंगणघाट प्रखंडातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक राम मंदिर येथे करण्यात आले. अयोध्या येथील राम मंदिर आंदोलनात हुतात्मा झालेले राम कोठारी आणि शरद कोठारी या बंधूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते. यावर्षी या शिबिराचे औचित्य गुरुनानक जयंतीनिमित्त साधण्यात आले.

असून, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राम मंदिर येथे या शिबिराची सुरुवात होणार आहे.
या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी नायक साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार यांनी सर्व रक्तदात्यांना आवाहन केले आहे की, हुतात्मा कोठारी बंधूंच्या बलिदानाची आठवण करून या दिवशी रक्तदान करावे.

Gurunanak jaynti/या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनुकूल कोचर, देवा वाघमारे, प्रशांत तिवारी, दीपक शर्मा, संदीप नासरे, जय आष्टणकर आणि सागर चांगलानी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Hingnghatnews /हिंगणघाट बस स्थानक पुनर्बांधणीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : हिंगणघाट शहरातील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर प्रदेश श्रीकांत गभणे, कार्यकारी अभियंता नागपूर प्रदेश श्रीमती शितल गौंड, यंत्र अभियंता वर्धा विभाग प्रतापसिंग राठोड, वरिष्ठ संख्यांकिक अधिकारी नागपूर प्रदेश किशोर आदमने, ठाणेदार अनिल राऊत, तसेच वानखेडे मॅडम, कोसरे मॅडम, सुधीर गुल्हाने, लोणे मॅडम, उजवणे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन नितीन सुकळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बस स्थानक डेपोचे व्यवसस्थापक शेडमाके साहेब यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.

Hingnghatnews /नवीन बस स्थानकाच्या बांधकामामुळे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार असून, हिंगणघाट शहराचा विकास अधिक गती घेईल, असे मत या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.

Banknews /एका नामांकित अजब ,गजब बँकेचा नियमबाह्य कारभार येणार चव्हाट्यावर

 

अनिलसिंग चव्हाण/मुख्य संपादक

[जैन वसतीगृह प्रकरण अंगलट येण्याची शक्यता!]

Banknews /पूणेः- नामांकित अश्या एका अजब ,गजब नावाजलेल्या बँकेचे अति हुशार मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कोणत्याही कागदपत्राची पाहणी व पडताळणी न करता जनतेचा कोट्यावधी पैसा निधी म्हणून नियमबाह्य ” जैन वसतीगृहाला दिल्याचे अधिकृत रित्या समजते.

ह्या अजब गजब बँकेचा नियमबाह्य कारभार चव्हाट्यावर येवून “जैन वसतीगृह निधी प्रकरण संबधितांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.
एका नामांकित कंपनीने कदाचित मोठा दर्जा असणाऱ्या

(आशीया खंडातील) प्रसिध्द बँकेने नियम धाब्यावर बसवून कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता एका ” जैन वसातीगृहासाठी” कोट्यावधी रुपयाचा निधी दिला.

Banknews /ह्यामध्ये आणखी एका बिरेश्वर को.आॕप,सोसायटी बँक कर्नाटक चाही सहभाग असल्याचे समजते.सदर पैसा हा जनतेचा असून सर्रास वापरणे सुरु झाले आहे,हे आपल्या समोर उघड केले जाणार असून त्या पर्दाफाश होणार आहे.तूर्त एवढेच……

Hingnghatnews/ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वर्धापन दिन साजरा – वृध्दाश्रमात टॉवेल व फळांचे वाटप

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रेम मंदिर वृद्धाश्रम, शहालंगडी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्षा कविता मुंगले होत्या.

कार्यक्रमात कविता मुंगले समता परिषदेच्या स्थापना दिनाचा उल्लेख करताना सांगितले की, 1 नोव्हेंबर 1992 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना झाली.

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून बहुजन समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी कार्य करणारी ही संघटना आज 34 वर्षे पूर्ण करत आहे, असे त्या म्हणाल्या.

Hingnghatnews /या प्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना टॉवेल आणि फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा अध्यक्षा कविता मुंगले यांच्यासह पदाधिकारी सुजाता जीवनकर, दीपाली रंगारी, सुनिता तळवेकर, रागिणी शेंडे, गिरी मॅडम, सारिका गायकवाड, योगिता मेश्राम, रीना रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.