Home Blog Page 273

श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ व छत्रपती सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर

0

 

@ शिबिरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ व छत्रपती सेनेच्या वतीने दि. ७ सप्टेंबर रोजी वाडेगाव येथील श्री जागेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दर दिवशी घडणारे अपघात व विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यामुळे रक्तपेढ्यामध्ये वारंवार रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे सामाजिक जाणिवेतून छत्रपती सेनेच्या वतीने वाडेगाव येथील श्री जागेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण साहू, युवासेना जिल्हा प्रमुख नितीन मानकर, रक्ताचं नातं ग्रुप संस्थापक अध्यक्ष विजय गांवडे, दिलीप गावंडे याच्याहस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले या शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर अकोला येथील साई ब्लड बँक रक्तपेढीच्या चमूने रक्तसंकलनाचे काम केले. यावेळी रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. या शिबिरामध्ये राहुल शर्मा, अमोल फाळके, वैभव सौदळे, विजय डोईफोडे, राजु रायकर, मनोज मानकर, मंगेश मानकर, अन्सार शहा, सुरज अवचार, निलेश सावदेकर, राजु गावंडे, सुरज गजानन अवचार, नागेश लाभाणे, ज्ञानेश्वर सरप, सुमेध अवचार, नरेंद्र नागरे, मंगेश दुतोंडे, नितीन निंबोकार, शुभम मानकर,आकाश वानखडे, शेवलाल गावंडे, किरण मोकडकार, दत्ता मानकर, रोहन लांडे, वृषभ मानकर, ज्ञानेश्वर काकड, ऋषभ खिलोशिया, ऋषिकेश भटकर, धीरज भटकर, आकाश मानकर, सागर नकासकर, मंगेश भांगे, ऋषिकेश पेठारकर, रंजित साबे, शुभम शेवलकार, सोहम मानकर, चेतन बोंडे, विशाल पारखेडे, योगेश सरप, नितीन पांडे, नितीन बारबुदे, राहुल सावरकर, सुधीर उपरवट, शिवाजी मानकर, केशव कळस्कर, महेश यादव, अनिरुद्ध मानकर, शुभम शिरसाट, नितीन मानकर, महेश साबळे, दिपक श्रीनाथ, रविंद्र डोंगरे, मंगेश वानखडे, सचिन नकास्कर आदींनी परिश्रम घेतले.

यावलच्या महसूल पथकाने दगड गोटे वाहतूक करणारे दोन डंपर पकडले दोघे डंपर पोलीस वसाहत मध्ये लावण्यास पोलिसांचा नकार

0

 

 

यावल : तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तहसील कार्यालयाच्या गौण खनिज वाहतुक नियत्रंण पथकाने अवैध गौण खनिज वाहतुक करणारे दोन डंपर पकडले. ही कारवाई बुधवारी भुसावळ – अंजाळे दरम्यान करण्यात आली. दोघा डंपर मध्ये बारा ब्रास अवैधरित्या दगड गोटे वाहतूक केले जात होते. तर महसुल पथकाने पकडलेले दोघे डंपर पोलीस प्रशासनाने आपल्या आवारात लावण्यास नकार दिला. तेव्हा हे वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहे
यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करीता भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. या भरारी पथकातील मंडळ अधिकारी सचिन जगताप, मिलिंद देवरे, बबिता चौधरी, शेखर तडवी, तलाठी एस. व्ही.सूर्यवंशी, समीर तडवी, वसीम तडवी, ईश्वर कोळी या पथकाने बुधवारी सायंकाळी भुसावळ – अंजाळे दरम्यान गस्तीवर असतांना डंपर क्रमांक एम. एच. १९ सी.वाय ८२१८ व एम.एच.१९ सी.वाय ९५९५ हे दोघे अवैद्य रित्या दगड गोटे वाहतांना आढळून आले चौकशी अंती त्यांच्या कडे दगडगोटे वाहतुकीचे परवाने मिळून आले नाही तेव्हा या वाहनांचे मालक पृथ्वी सिंग भुसावळ व रतन शेठ पाडळसा या दोघांना दंडाच्या नोटीस बजावून वाहत ताब्यात घेण्यात आले आहे.या दोघा वाहनात १२ ब्रास दगड गोटे मिळुन आले आहे.या कारवाई मुळे अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाहन लावण्यास पोलिसांचा नकार
महसूल पथकाने पकडून आणलेले विविध वाहन पोलीस ठाण्याच्या मागील बाजुस असलेल्या कवायत मैदानावर लावले आहे मात्र, आता या मैदानावर वाहन लावण्यास पोलीस निरीक्षकांनी नकार दिल्याचे तहसीलदारांनी सांगितले तेव्हा दोघं वाहन सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहे.-पुर्ण-फोटो आहे

विद्याभारती विदर्भ हिंगणघाट तालुका बैठक संपन्न

0

 

विद्याभारती विदर्भ प्रांत  हिंगणघाट तालुका बैठक बुधवार दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला एस. एस. एम.विद्यालय हिंगणघाट येथील परमपूज्य डॉ. हेडगेवार सभागृहात संपन्न  झाली.यावेळी व्यासपीठावर श्री र.गं. धारकर अध्यक्ष विदर्भ प्रांत श्री ब.रा चव्हाण सदस्य विदर्भ प्रांत श्री गजानन सयाम वर्धा जिल्हाप्रमुख विद्याभारती शाळेचे मुख्याध्यापक श्री च. ज्ञा.खडतकर श्री सुपारे जिल्हाप्रमुख संस्कृती ज्ञान परीक्षा नवनियुक्त तालुका अध्यक्ष सौ.की.र मद्दलवार उपाध्यक्ष सौ.नी.ची  बुरिले तालुका मंत्री श्री मिलिंद सावरकर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन वंदनेने झाले यावेळी संगीत शिक्षक श्री गावंडे  व श्री झाडे यांनी वंदना सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सयाम यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून विद्याभारती च्या कार्याची माहिती दिली तसेच तालुका कार्यकारणीची कार्य व जबाबदारी स्पष्ट केली यावेळी नवयुक्त तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. सौ मद्दलवार यांनी तालुका कार्यकारणीतील विविध जबाबदाऱ्यांची माहिती तालुका पदाधिकाऱ्यांना दिली.बैठकीत संस्था, शाळा ,विद्यार्थी सलग्नता व संस्कृती ज्ञान परीक्षा तसेच शैक्षणिक सत्र 2022 23 मधील कार्यक्रम व उपक्रम यावर चर्चा करण्यात आली यावेळी श्री सुपारे यांनी संस्कृती ज्ञान परीक्षेबाबत माहिती उपस्थितांना दिले श्री चव्हाण सर यांनी विद्याभारती अंतर्गत चालणाऱ्या सर्व शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती देऊन ते राबवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धारकर सर यांनी विद्याभारतीच्या कार्याची माहिती देऊन विद्याभारतीचे कार्य प्रत्येक शाळा प्रत्येक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान उपस्थित कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, संस्कृत ज्ञान परीक्षा प्रमुख, सहप्रमुख,संपर्कप्रमुख व कार्यकर्ता बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री बुलदेव यांनी तर  आभार श्री खडतकर यांनी मानले कार्यक्रमाचा शेवट शांती मंत्राने झाला.

2022 मध्ये नगरसेवक निवडताना विचार जरूर करा ?

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट शहरात सर्वच प्रभागात अवैध धंदे सुरू आहे. याला तुम्ही आम्ही जबाबदार आहे. अवैध्य धंदे बंद करायचे असेल तर प्रामाणिक व दूरदृष्टी असलेला नगरसेवककाला संधी मिळायला पाहिजे. कारण आज शासनात अवैध धंदे करणाऱ्यांचा बोलबाला आहे त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही झाली तर थातूरमातूर कारवाई होते. त्यामुळे जनता त्यांच्या विरोधात जात नाही. जर आपल्याला खरोखरच वार्डातील अवैध धंदे बंद करायचे असते तर प्रामाणिक कार्य करणारा नगरसेवकाला संधी ?
सध्या हिंगणघाट शहराला हर्षल गायकवाड यांच्या रूपाने चांगला मुख्याधिकारी लाभलेला आहे त्यांनी आल्याबरोबरच हिंगणघाट शहरातील बॅनर फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावायचे असल्यास नगरपालिका परवानगी असणे आवश्यक आहे हा धाडसी निर्णय घेतला यामुळे हिंगणघाट नगरपालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. दुसरा निर्णय सार्वजनिक ठिकाणी मोकाट असलेले जनावर यांना कांजी मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली. परंतु ही व्यवस्था करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली परंतु याबद्दल कर्मचारी यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही कारण यांना कोणतेही सहकार्य लोकप्रतिनिधी कडून मिळत नाही कारण हे सर्व अवैध धंदे करणारे लोकप्रतिनिधी यांच्या संपर्कातील असल्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार आज अशीच परिस्थिती सर्वीकडे आहे कोणीही अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात धाडस करत नाही कारण आज शासन करते हेच अवैध धंदेचे निर्माते आहे. पत्रकार सुद्धा खरं बोलणारे नाही जे खरं बोलतात त्यांच्यावर आरोप होतात. पत्रकारच आज पार्टीची प्रवक्ते आहे .

आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर..

0

 

बोदवड:- सतिष बावस्कर

बोदवड तालुक्यातील जलचक्र बुद्रुक येथे आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतिबिंदु तपासणी शिबिर पार पडले. यावेळी 117 लोकांची तपासणी झाली. यात मोतिबिंदुचे 21 रुग्ण , पडद्याचे 6 रुग्ण , नासुरचे 4 असे एकूण 31 रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथे पुढील उपचार होणार आहेत.
14 सप्टेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटिल यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून साजरा होत असतो. यावेळी आमदार चंद्रकांत पाटिल यांनी शिबिराचा व्हिडिओ काॅलद्वारे आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटिल , माजी जि.प.सदस्य डाॅ ऊद्धव पाटिल , नगरसेवक सुनिल बोरसे , गोपाळ पाटिल यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे आयोजन आमीन मुलतानी ,जिलानी मुलतानी सोमेश्वर (बंटि) पाटिल , नितीन पाटील यांनी केले असून जिलानी मुलातानी , धनराज पाटील, अमोल (गोलु) पाटील, नितीन ईंगळे, मयुर पाटील, विजय सपकाळ, अक्षय पाटील, प्रतीक पाटील, संदिप पाटील, चेतन पाटील, गजानन राऊत, रमजान मुलतानी, फिरोज मुलतानी,जिवन पाटील, ईश्वर शळके, पंडित घुले, योगेश पाटील, अरुन गोसावी, संतोष खरे, उमेश पाटील आदींचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

पंचायत समिती यावलच्या सभागृहामध्ये ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांची व सरपंच यांची संदर्भातील संयुक्त आढावा बैठक पार पडली .

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील पंचायत समिती यावलच्या सभागृहामध्ये ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांची व सरपंच यांची तालुका पातळीवरील नरेगा विकासात्मक रोजगार सेवकांच्या विविध प्रश्ना संदर्भातील संयुक्त आढावा बैठक पार पडली .
या महत्वपुर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावेर यावल मतदार संघाचे आ. शिरीष मधुकराव चौधरी हे होते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे ,माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद जावेद अली पंचायत समितीवे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी ,सहाध्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षण अधिकारी नईम ए .शेख, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे यावल तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे उपाध्यक्ष असंद सय्यद ,महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळू तायडे, राज्य संघटक खुशाल पाटील, ग्रामसेवक संघटना यावल तालुका अध्यक्ष रुबाब तडवी हे उपस्थित होते
बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी केते तर सुत्रसंचालन ग्रामरोजगार सेवक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळू तायडे यांनी केले तसेच आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर मनोगतात आमदार शिरीष चौधरी यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 264 योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी, ग्रामसेवक , नरेगा विभाग ग्राम रोजगार सेवक बांधवांनी जलद व पारदर्शकपणे यशस्वी रीतीने राबवून गाव तालुका जिल्हा व राज्याचा विकास साधावा व शेतकरी अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर व व गावातील मजूर यांच्या वैयक्तिक कामाच्या योजना राबविण्यात याव्या तसेच वैयक्तिक गाव विकासाच्या योजना कशा साध्य करता येतील विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यासाठी तत्परतेने आपापले कार्य सर्वांनी केले तरच आपण खऱ्या अर्थाने विकास साध्य करू शकू यासाठी मी एक सेवक म्हणून आपल्या सोबत आहे व आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे यावल रावेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी लागणारा अँड्रॉइड मोबाईल मी वैयक्तिकरित्या ग्रामरोजगार सेवकांना आर्थिक मदत करून मिळवून देणार असल्याचे आश्वासन व अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली , गावापासून दोन्ही तालुक्याचा विकास करण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक या सर्वांनी हातभार लावावा असे मनोगत व्यक्त केले या मनोगतात विशेष त्यांनी रोजगार सेवकांच्या समस्या या विषयावर सुद्धा लक्ष केंद्रित केले व ग्रामरोजगार सेवकांना स्थानिक पातळीवर व तालुकास्तरावर येणाऱ्या अडचणी लवकरच सोडून रोजगार सेवकांच्या समस्या बाबत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची ग्वाही व आश्वासन दिले, याप्रसंगी प्रभाकर अप्पा सोनवणे , शेखर पाटील , गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कृष्णवंदन शेतकरी उत्पादक कंपनी बेटावद बु।।ची वार्षिक सभा सम्पन्न

0

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर.

बेटावद बु येथिल शेतकरी गटाने स्थापित केलेल्या कृष्णवंदन शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिं ६सप्टेंबर२२ रोजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची साठवून व प्रक्रिया करुन अधिक नफा मिळवून शेतकरी सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापित केलेली ही कंपनी यशस्वी होईल अशी वाटचाल करीत आहे. परीसरासाठी शेतकऱ्यांना पोखराच्या विविध योजने विषयी डायरेक्ट कुरबान तडवी व सौ अल्पना शिंदे यांनी माहिती दिली.
कापसावरील किड तिची ओळख व व्यवस्थापन या विषयी दिनेश पाटील कृषीसहाय्यक चोपडा यांनी सखोल माहिती दिली. मिश्रपीक पध्दती चे महत्व जैविक शेती व त्याला अधुनिकते ची जोड कशी द्यावी या विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन अनिल भोकरे उपसंचालक कृषी विभाग यांनी केले.
कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी अभिमन्यु चोपडे, कृषी पर्यवेक्षक संतोष चिमनकर, या समुहाचे जनक स्वप्निल पाटील, विजय चौधरी, जेष्ठ मार्गदर्शक मांगीलाल गील, माजी जि प सदस्य नामदेव मंगरुळे, अंबादास चौधरी, भगवान महाजन, अशोक सत्रे, सुभाष बिंदवाल व कंपनीचे सदस्य, महिला व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी स्थापन केलेली शेतकरी कंपनी बेटावद बु।।

जीवन यशस्वीतेसाठी ध्येय निश्चित करा इ 10वी /12वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात आ. एकनाथराव खडसे यांचे आव्हान

0

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश बावस्कर

” ध्येयाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केल्यास कोणतेही असाध्य ध्येय सहज प्राप्त होऊ शकते,त्यासाठी मनात जिद्द ठेवून काम करत रहा. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर जे काही तुम्ही ध्येय ठरवाल त्यात टॉप करा संपत्ती चोरीला जाऊ शकते पण ज्ञान असे भांडार आहे की ज्यावर कोणीही दरोडा टाकू शकत नाही, कोणीही चोरून नेऊ शकत नाही. जीवनातील परिवर्तनासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे शिक्षण घेत असताना संस्काराला संस्कृतीची जोड द्या त्याशिवाय समाज जिवंत राहणार नाही” असे आवाहन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले, सर्व गुणवंत मुला मुलींना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन संवेदना फाउंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले.
सौ रोहिणी ताई खडसेंमार्फत संवेदना फाउंडेशन तर्फे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील इ. 10वी /12वी तील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते.यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीरजी तांबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा तथा संवेदना फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर ,माफदा अध्यक्ष विनोद तराळ , राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस डॉ जगदीश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
यावेळी नगराध्यक्षा मनिषाताई पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील,माजी सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर,राजु भाऊ माळी, . भरत अप्पा पाटील,ज्ञानेश्वर महाजन
जि प सदस्य निलेश पाटील, रामदासभाऊ पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते एस ए भोई सर,रामभाऊ पाटील,शिवा पाटील,भरत अप्पा पाटील,सुधीर तराळ,विकास पाटील,प्रदिप साळुंखे, रवींद्र दांडगे,प्रविणपाटील, बापू ससाणे,बबलू सापधरे,बाळाभाऊ भालशंकर,रविंद्र पाटील, अमोलभाऊ महाजन, नंदकिशोर हिरोळे,मुन्ना बोडे,नईम खान,संदिपभाऊ जावळे, विनोद काटे,चेतन राजपुत
संस्थाचालक मिठुलाल अग्रवाल,व्ही एस वराडे,बोडे,माणिकराव पाटील, भास्करराव पाटील, अंकुश चौधरी, सुधीर भाऊ तराळ, दिनेश पाटील,डॉ. दिलीप पानपाटील,डॉ रियाज पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक सुद्धा उपस्थित होते, प्राचार्य आरपी पाटील मुक्ताईनगर,व्ही के वळस्कर मुक्ताईनगर,मधुकर महाजन उचंदा,मिलिंद संग्रामपूरकर घोडसगाव,प्रवीण धुंदले,खिर्डी, विजय लोंढे निमखेडी,प्रकाश बावस्कर अंतुर्ली,विजय चौधरी चांगदेव, श्री दाणे सर सुकळी इत्यादीचा समावेश होता.
प्रसंगी बोलताना आमदार खडसे यांनी मतदारसंघातील सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संवेदना फाउंडेशनच्या रोहिणीताईंचे कौतुक केले.सत्कार हे केवळ निमित्तमात्र असतात, पण या सत्कारातून मिळालेली प्रेरणा मुलांच्या पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप मुला-मुलींना यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या नशीबी अधिक संघर्ष असल्याचे सांगून आज मुक्ताईनगर मतदारसंघातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ -मोठ्या पदांवर सेवेत असल्याबद्दल आमदार खडसेनी स्पष्ट केले. यावेळी आजच्या कार्यक्रमाला शाळांसह विद्यार्थी व पालकांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले,यावेळी आमदार खडसे यांनी विधान परिषद सभागृहात शिक्षकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या आमदार सुधीर तांबे यांचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार तांबे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सर्वप्रथम, “मी सुद्धा नाथाभाऊंचा फॅन असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे ते सभागृहात अनेकांचे मार्गदर्शक आहेत.” असे स्पष्ट केले . प्रसंगी मतदारसंघातील प्रत्येक शाळेतून पहिल्या पाच गुणवंतांना संवेदना फाउंडेशन तर्फे गौरवण्यात आल्याबद्दल, आयोजक सौ रोहिणी खडसें यांचे विशेष अभिनंदन केले यावेळी भारतीय मुले प्रचंड बुद्धिवान असल्याचे जगाच्या पाठीवर सिद्ध झाल्याचे विविध उदाहरणे देऊन आमदार तांबे यांनी स्पष्ट केले,प्रसंगी राज्यातील शाळांमध्ये असलेली अपूर्ण शिक्षक संख्या, विनाअनुदानित शाळा यामुळे हाल अपेष्टात जगणारा बहुसंख्य शिक्षकवर्ग…. या सदोष शिक्षण व्यवस्थेबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शेती आणि शिक्षण देशाला समर्थ व बलवान बनवतात. दर्जेदार शिक्षण मिळाल्यास जगात भारताचे नाव अग्रक्रमावर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आधी भैय्यासाहेबांनी व्यासपीठावरील दोन्ही आमदार श्री एकनाथराव खडसे व आ. सुधीर तांबे यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल?यासाठी दोघे पोट तिडकीने बाजू मांडत असल्याचे सांगितले.जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल रोहिणीताईंचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ रोहिणीताईंनी प्रास्ताविक केले दहावी -बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे असून भविष्यात यशाने हुरळून न जाता कधीकधी अपयशसुद्धा पचवता आले पाहिजे, असे सांगून अपयश ही सुद्धा यशाची पहिली पायरी असल्याचे स्पष्ट केले.या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक बळ मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोणतीच गोष्ट फुकट आणि सहज मिळत नाही असे सांगून संघर्षातून मिळालेली यशाचे मोल किती तरी पटीने अधिक असून जितका संघर्ष मोठा तितके यश अधिक असते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशात गुरुजनांसह आई-वडिलांचाही सहभाग अधिक असल्याचे सांगून गुणी विद्यार्थ्यांचा समाजाला अभिमान असल्याचे स्पष्ट केले मोठेपणी तुमच्या कर्तुत्वाने तुमच्या नावावरून आई वडिलांची ओळख समाजाला होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कार्यक्रमाप्रसंगी कुमारी स्नेहा शरद अवसरमल, ऐनपुर हिने मनोगत व्यक्त केले. “मी नाथाभाऊंची फॅन असून नाथाभाऊंसारखा चाणाक्ष आणि सर्व क्षेत्राची जाण असलेला अभ्यासू नेता होणे नाही “अशा शब्दात नाथाभाऊंची महती वर्णीली.या सत्कार सोहळ्यात सत्कार केल्याबद्दल ऋणी राहून भविष्यात कुटुंबीयांचे नाव रोशन करेल असा विश्वास तिने व्यक्त केला,तर प्रज्ञा ज्ञानेश्वर चव्हाण मुक्ताईनगर हिने सुद्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कवितेचे वाचन करून रात्रंदिवस परिश्रम घेऊन प्रगती साधण्याचा मंत्र उपस्थित मुला-मुलींना दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यात सौ मनीषा कचोरे मनुर बु ता. बोदवड, रामराव मुरकटे खिरोदा ता. रावेर, विजय चौधरी पिंप्री नांदू ता. मुक्ताईनगर यांचा समावेश होता, या सर्वाना आ एकनाथराव खडसेंच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साळवे,प्रा. विजय डांगे प्रा. प्रतिभा ढाके यांनी केले.

हिंगणघाट नगर परिषद कडून गणेश मूर्ती विसर्जन कृत्रिम कुंड ची व्यवस्था

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट नगर परिषदे द्वारा तयार करण्यात येणार ५ ठिकाणी कुत्रिम विसर्जन कुंड.
कोविड संकटामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सव भाविकांना साधेपणाने साजरा करावा लागला या वेळी निर्बंध नसल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, हिंगणघाट शहरातील सर्व गणेश भक्तांना सुविधा व्हावी या करिता नगर परिषद प्रशासना मार्फत ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत शहरातील एकूण ५ ठिकाणी कुत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.संभाव्य प्रदूषणाला आळा बसून पर्यावरणपूरक पद्धतीने श्री गणेश मूर्तींचे विसर्जन व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्व विसर्जन ठिकाणी निर्माल्य जमा करण्याकरिता निर्माल्य कुंडाची व्यवस्था नगर परिषदे मार्फत केली असून सर्व भाविकांनी या कुंडा मध्येच निर्माल्य देण्याचे आवाहन नगर प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.नगर परिषद प्रशासना मार्फत खालील ठिकाणी विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
१) गोकुळधाम मैदान,तहसील कार्यालया जवळ, २) संत गजानन महाराज मंदिर परिसर,तुकडोजी वार्ड
३) हनुमान मंदिर परिसर,इंदिरा गांधी वार्ड,ए.पी.एम.सी.मार्केट यार्ड जवळ, ४) पटवारी कॉलनी,सांबरे यांचे घर समोरच्या मोकळ्या जागेवर, ५) सेन्ट्रल वार्ड,चेपे चौक जवळ
वरील सर्व विसर्जन ठिकाणी भाविकांना सुविधा देणे साठी नगर परिषदेचे प्रत्येकी ३ कर्मचारी सेवा देणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने आपल्या घरीच किवा नगर परिषदेने तयार केलेल्या कुत्रिम विसर्जन कुंडामध्ये करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.हर्शल गायकवाड यांनी केले आहे.

भुसावळचे रणजितसिंग राजपूत ह्यांची केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाचे अँबेसिडर भुसावळ सतिष बावस्कर

0

 

केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राबविले जाणारे फिट इंडिया अभियान तळागाळापर्यंत पोहचावे तसेच आरोग्य विषयी जनजागृती व्हावी व देशभरात फिट इंडिया उपक्रमात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम जसे फिट इंडिया फ्रीडम रण, फिट इंडिया प्लॉगिंग रण, ‘फिट इंडिया सायकलाथॉन, फिट इंडिया क्विझ ह्यांसारख्या उपक्रमांमध्ये जास्तीतजास्त युवकांना सहभागी करून घेत तळागाळातील युवकांमध्ये फिटनेस च्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रणजितसिंग राजपूत ह्यांची फिट इंडिया अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे

केंद्र सरकारने फिट इंडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया व स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई)” च्या वतीने देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून काही तरुण व तरुणींची निवड केलेली आहे. रणजितसिंग राजपूत ह्यांना एकता विश्नोई भा.रा.से.(फिट इंडिया मिशन निदेशक, भारत सरकार) ह्यांच्या वतीने फिट इंडिया अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाल्याच्या पत्र प्राप्त झाले.

रणजितसिंग राजपूत ह्यांनी युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीने राज्य निदेशक प्रकाश मनुरे व जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली फिट इंडिया अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध उपक्रम घेऊन जिल्हा स्तरावर कार्य केले आहे त्यात प्रामुख्याने भुसावळ शहरात आयोजित केलेला जिल्हास्तरीय ‘चेतक रण’ हा विशेष उल्लेखनीय ठरला तसेच भुसावळ शहरात ऑलम्पियन मनोज कुमार ह्यांना बोलावून युवकांमध्ये फिटनेस च्या बाबतीत जनजागृती घडवून आणली ह्याच प्रकारे केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेत त्यांची नियुक्ती फिट इंडिया अभियानासाठी केली आहे. ह्यापूर्वी रणजितसिंग राजपूत ह्यांना युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा युवक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ मिळलेला आहे व ह्या अगोदर ते स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचे सुद्धा ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या विविध योजनांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन फिट इंडिया मोहिमेची घोषणा केली तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही संकल्पना केंद्र सरकार मार्फत कार्यान्वित केली आहे दैनंदिन दैनंदिन जीवनात खेळ व व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकांनी स्वतःला आरोग्य संपन्न ठेवावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे या राष्ट्रीय मोहिमेत कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे मी केंद्र सरकारचा आभारी आहे.

रणजितसिंग राजपूत
राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी तथा फिट इंडिया अँबेसिडर