Home Blog Page 274

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील छोट्याशा ऐणगाव गावामध्ये व्यापाऱ्यांनी केली सुरुवात आजचे कापसाचे भाव 21 हजार रुपये प्रतिक्विंटल

0

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर.

कापूस घरात येण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात आणि दरात तेजीची शक्यता आत्ताच भाव 21000 पार
मान्सून पूर्वी लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात पेठेत आला गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या खरेदीचा शुभारंभ

महाराष्ट्रातील बोदवड तालुक्या मधील गाव एनगाव या गावीसर्वात जास्त भाव देण्याचे व्यापारी अण्णा पाटील यांनी आज रोजी खरेदी भाव 21 हजार काडले

तसेच शेतकरी जितू पाटील कव्हर्सिंग पाटील प्रताप सिंग पाटील पप्पू अग्रवाल युवराज पाटील भगवान पाटील तुकाराम पाटील शंकर पाटील मीना महाजन योगेश लवंगे पुरुषोत्तम फिरके प्रभाकर खडसे समाधान झटकार मुकुंदा झटकार बाबुराव लवंगे गजानन लवंगे रमेश लवंगे दिलीप लवंगे बंटी लवंगी नितीन लवंगे पिंटू लवंगे गजानन सोनार योगेश सोनार रवींद्र किनगे योगेश झटका मनोहर झटका अमृत झटकार सुनील पाटील जितू पाटील सुजित पाटील शिवसिंग पाटील सतीश पाटील वासुदेव पाटील

बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे लम्पी हा आजारांवर 970 जनावरांना लसीकरण करण्यात आले

0

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर

हा आजार संसर्गजन्य असुन गोमाशा गोमिच लम्पी हा आजार उपचार मिळाल्यास लवकर आटोक्यात येतो
हा आजार संसर्गजन्य असुन गोमाशा गोमिच चावल्याने परस्पर स्पर्शाने होताे या आजाराची लक्षन अंगावर गाठा उठतात हा आजार झालेल्या जनावराना वेगळे बाधावे
बोदवड ता येवती व रेवती परिसरात लम्पी या संसर्गजन्य आजारांवर लसीकरण करण्यात आले पशुधनावर आला असुन शेतकर्यानी घाबरण्याची गरज नाही वेळेवर उपचार व लसीकरण करून घ्यावे बोदवड तालुक्यात येवती व रेवती येथे 970 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे बोदवड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डाँ दीपक साखरे यानी सागीतले काही पशुपालक लम्पी या बिमारीला घाबरुन दुध सुद्धा काढत नाही दुभत्या जनावराचे दुध न काढल्याने त्याच्या आरोग्यावर परिणाम होवु शकतो त्यामुळे दुभत्या जनावराचे दुध काढावे दुध ऊकडुन उपयोगात आनावे येवती व रेवती येथे नागरिकाने लसीकरणास भक्कम प्रतिसाद दिला आहे परिसरात सरपंच शांताराम वाघ व राजू शिंदे अनिल कचरे शेनफड वाघ गजानन बेलदार गजानन बावस्कर निलेश वाघ सागर धनगर भागवत धनगर सोपान चौधरी अशोक जैस्वाल डाँ संघरत्न तायडे डॉ हेमंत वाघोदे याच्या मार्गदर्शन खाली गुरांना चे लसीकरण करण्यात आले आहे लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे डॉ आमोल वाघ डॉ महेंद्र पाटील डॉ वैभव पाटील डॉ शेख सादिक लसिकण करीत आहेत

शिक्षक दिना निमित्ताने आमदार चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केला शिक्षकांचा सत्कार

0

 

 

बोदवड येथील जि. प. उर्दू मुलींची शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या पत्नी यामिनी पाटील यांनी शाळेतील शिक्षकांचा सत्कार केला व शिक्षक दिना निमित्ताने शाळेच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या हुमेरा वसीम खान मुख्याधिपिका, आलिया एजाज पर्यवेक्षक, तर शिक्षिका म्हणून अकसा तहेरीम शेख अकिल,शिज कौसर सै. लुकमान, अकसा कौसर सै. इमरान, ऐमन अमीन पटेल, आएशा सिद्धीका हाकीम पिंजारी,रेशमा नईम बागवान, बुशरा रहीम बागवान, रौशन जहाँ अमीर मणियार, या विद्यार्थिनींचा सत्कार केला व बक्षीस देऊन कौतुक केले.तर मुख्याध्यापक मोहम्मद ईकबाल फयाजोद्दीन शिक्षक वृंद सादिक अहमद सगीर अहमद, मिर्झा न्यामतूल्ला बैदुल्ला बेग,नजमा बी मेहबूब शाह, आसिफ खान रफिक खान, जाविद शाह हसन शाह, मझहर मियाँ मुखतार मियाँ, सै. जैनुल आबेदीन सै. रियाजोद्दीन ,मदहद फुरहान सै. शहाबोद्दीन ,इफत सुलताना खाजा सफिरोद्दीन. यांचा आमदार व त्यांच्या पत्नी यांनी सत्कार केला. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील ,नगरसेवक सईद बागवान, राजेश नानवाणी , नगरसेविका मनीषा बडगुजर, मीरा माळी, बेबीबाई माळी,शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा उपप्रमुख कलीम शेख,तालुका संघटक शांताराम कोळी, शहर प्रमुख राहुल शर्मा,गोलू बरडीया , हर्षल बडगुजर ,आतिष सारवान, तौसिफ पिंजारी, हाजी रहीम बागवान, लियाकत कुरेशी,मुस्तकीम शेख, शकिर पटवे, भास्कर गुरचळ, सुभाष देवकर, धनराज गंगतिरे,देवेंद्र खेवलकर, निलेश माळी, गोपाळ सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक नवयुवक गणेश मित्र मंडळाचे 34 वे वर्ष उत्साहात पार पाडले

0

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड :- येथे प्रभाग क्रमांक १६ मधील होळी मैदान माळी गल्ली या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गेल्या 34 वर्षात सार्वजनिक नवयुवक गणेश मित्र मंडळ हे सांस्कृतिक सामाजिक कार्य पद्धतीने लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा,सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे उपक्रम गेल्या 34 वरश्यापासून राबविले जातात.
लहान मुलांना शेवटच्या दिवशी शालेय उपक्रमाचे बक्षिसे वाटप करतात या वर्षी या मंडळाची गणेश मूर्ती आरास 12 फुटाची असून या वर्षा चे तालुक्यातील सर्वात उंच आरास म्हणून या मंडळाचा क्रमांक येतो या मंडळाच्या गणेश मूर्तीची महाआरती करण्यासाठी काल दिनांक ५ रोजी सकाळी १० वाजता आमदार चंद्रकांत पाटील व त्यांची पत्नी यामिनी पाटील या दोघांच्या हस्ते सपत्नीक महाआरती झाली या नंतर महाप्रसाद भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या मंडळाने छान सा देखावा केला तसेच मंडळाच्या माध्यमातून लहान मुलांना शारीरिक कवायती,उत्कृष्ट अशी तालीम देत कुस्त्यांचे शिक्षण दिले जातात पहेलवान दल म्हणून या मंडळाचे नाव चर्चेत आहे या मंडलचे स्वतःचे लेझीम पथक आहे आहे या मंडळाचे अध्यक्ष अजय माळी व उपाध्यक्ष बंटी सपकाळ सचिव आकाश माळी व सर्व मंडळाचे सदस्य यांच्या सहकार्याने दहा दिवस सामाजिक सलोखा जोपासून पार पाडतात अशी माहिती त्यांनी दिली

शेती माती संस्कृती’च्या वतीने पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

0

 

स्पर्धेत सहभागी होण्याचे हर्षल पाटील फदाट यांचे आवाहन

‘शेती,माती,संस्कृती’ आयोजित कार्यक्रम पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी असुन. स्पर्धेतील प्रवेश विनामूल्य असून रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. घरोघरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. दहा दिवस भक्तिमय वातावरण असते. गणेशोत्सवकाळात विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जागतिक पातळीवर पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठीश शेती माती संस्कृती,टिम प्रयत्न करणत असते. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून ,शेती,माती,संस्कृती टिमचं उदिदष्ट आहे.

शेती,माती,संस्कृती आयोजित कार्यक्रम,पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित केले आहे.स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ असे चार पारितोषिक देण्यात येणार आहेत. रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हर्षल पाटील फदाट यांनी केले आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, सुनील फदाट, सुनिल शिकारे, नारायण सोनुने, गजु निकम, राहुल पाटील, रवी फदाट,ऋषी वाकुडे, शकील शेख,व शेती माती संस्कृती टिम परिश्रम घेत आहे.

भारत विद्यालयाचा यश थुल याची जिल्हास्तरावर निवड पंचायत समिती हिंगणघाट यांच्या तर्फे विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा

0

 

हिंगणघाट येथे दिनांक 30 ऑगस्ट 2022 ला तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2022 अंतर्गत वर्ग 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्याकरिता भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारत विद्यालयाचा यश कमलाकर थुल वर्ग 10 याने ” शाश्वत विकासासाठी मुलभुत विज्ञान आव्हाने आणि शक्यता ” या विषयावर आपले सुदंर भाषण सादर करित हिंगणघाट तालुक्यातुन व्दितिय क्रमांक प्राप्ा्दं करित आपली निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेकरिता केली.या यशश्वी विद्यार्थ्याचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, सचिव रमेशजी धारकर , उपाध्यक्ष श्यामभाउ ‍भिमणवार , संस्थचे सर्व संचालक सदस्य ,मुख्याध्यापक बळीराम चव्हान , उपमुख्याध्यापक उदय भोकरे पर्यवे‍‍क्षिका प्रतिभा आगलावे , पर्यवेक्षिका सौ. बुरिले, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वं`द यानी अभिनंदन करून जिल्हा, विभाव राज्यस्तरावर यश संपादन करावे अश्या शुभेच्छा दिल्या.

नगरपरिषद हदितील बिना परवानगी/ अनाधिकृत बॅनर, बोर्ड, झेंडे, पताके लावण्यावर होणार कारवाई

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट नगर परिषद हहितील बिना परवानगी / अनाधिकृत बॅनर, बोर्ड, झेंडे, पताके लावित
असल्याचे नगर परिषदेच्या निर्देशनास आले आहे. त्यामुळे या नंतर नगर परिषदतर्फे सर्व नागरीक / राजकिय पक्ष यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, या नंतर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी बॅनर, बोर्ड, झेडे, पताके लावायची असल्यास मिळकत विभाग, नगर परिषद, हिंगणघाट यांचे कडून नियमानुसार परवानगी घेवूनच लावावे. बिना परवानगी शहरामध्ये बॅनर, बोर्ड, झेडे, पताकेछापणाऱ्या दुकानदारांनी सुध्दा बॅनर, बोर्ड, झंडे, पत्ताके छापण्यापूर्वी किंवा शहरामध्ये लावण्यापूर्वी त्यांनी नगर परिषदेची रितसर परवानगी घेतली किंवा नाही याची माहिती घेवून शहरामध्ये बॅनर, बोर्ड, झंडे, पताके लावावे. PIL १५५ अंतर्गत मा. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात येईल. व संबंधीत छपाई करणारे दुकान मालाकाचे परवाने सुध्दा रह करण्याची कारवाई या कार्यालयाकडून करण्यात येईल असे आवाहन श्री. हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी (निवड श्रेणी), नगर परिषद, हिंगणघाट, श्री. निलेश शिंदे, प्रशासकिय अधिकारी, नगर परिषद, हिंगणघाट व मिळकत विभाग श्री. वसंता रामटेके, श्री. राजु डुकरे, श्री. नंदकिशोर लांडगे यांचे द्वारे करण्यात येत आहे.

श्री गणेश विसर्जन काळात नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणारा : 36 हजार 550 रुपये किमतीचा 1120 किलो भेसळयुक्त गुलाल जप्त

0

 

प्रविण चव्हाण

नंदुरबार -: श्री गणेश विसर्जन काळात नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणारा 36 हजार 550 रुपये किमतीचा 1120 किलो भेसळयुक्त गुलाल जप्त करण्यात आला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि.31 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे यावर्षा पासून गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना विसर्जन मिरवणूकीचे वेळी मुख्य मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गणराया पुरस्कार देण्यात येणार आहे . त्यासाठी विविध निकषांचा विचार करण्यात येणार आहे . त्यात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे याचा देखील समावेश आहे . सण उत्सवात भेसळयुक्त गुलाल व रंग याचा अतिरेकी वापर यामुळे तक्रारी प्राप्त होत आहेत . त्याअनुषंगाने अशा प्रकारच्या कारवाया करण्याचे आदेश, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी दिले होते . दि. 05 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , एक इसम अॅपे रिक्षामध्ये भेसळयुक्त गुलालाच्या गोण्या भरून नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदर बातमी बाबत सविस्तर माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना त्यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन भेसळयुक्त गुलालाच्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले . मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने दि. 05 सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील हाट दरवाजा पोलीस चौकी जवळ सापळा रचला . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाहनांची तपासणी करीत असतांना नंदुरबार शहरातील गांधी पुतळ्याकडून हाट दरवाजाकडे येणारे एक ॲपे रिक्षा वाहन येतांना दिसुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून सदर अॅपे रिक्षा वाहन थांबविले . रिक्षा चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या अमलदारांनी आपली ओळख देवून चालकास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव इकबाल दाऊद कुरेशी वय -28 रा . गाझी नगर नंदुरबार असे सांगितले वाहन चालकास वाहनात काय आहे ? बाबत विचारपुस करता त्याने उड़वा उडवीची उत्तरे दिली म्हणून पथकाने दोन पंचासमक्ष वाहनाच्या मागील बाजूस पाहणी केली असता त्यात गुलालाच्या गोण्या भरलेल्या मिळून आल्या ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याचे अॅपे रिक्षामध्ये मिळून आलेल्या गुलालाच्या गोण्या कोठून व कोठे घेवून जात आहे ? याबाबत विचारपूस केली असता त्याने काही एक समाधानकारक उत्तरे दिली नाही . तसेच गुलाल विकत घेतले बाबत सदर इसमा कडे बिल पावती मागितली असता त्याच्याकडे कोणतीही बिल पावती नसल्याचे त्याने सांगितले . सदर अॅपे रिक्षा मध्ये 11,500 रुपये किमतीच्या 60 भेसळ युक्त गुलालाच्या गोण्या तसेच 25 हजार रुपये किमतीची एक अॅपे रिक्षा असा एकूण 36 हजार 500 / – रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे व त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे ची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे .
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक , नंदुरबार विजय पवार ,उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस हवालदार राकेश वसावे , जितेंद्र तांबोळी , पोलीस नाईक राकेश मोरे , पोलीस शिपाई अभय राजपुत , आनंदा मराठे , रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे .
नंदुरबार जिल्हा पोलीस दला तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , गुलालाचा वापर केल्यामुळे मानवी त्वचेवर व शरीरावर दुष्परिणाम होतात . तसेच गुलालमुळे वायु प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणावर होते . गुलालात विषारी रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यामुळे कर्करोग , फुफ्फसाचे विविध आजार होण्याची शक्यता असते . गुलाल डोळ्यात गेल्यास डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते . गुलालामुळे विविध प्रकारचे रक्तांचे आजार देखील होऊ शकतात .

त्यामुळे श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा . भेसळयुक्त गुलाला बाबत काही एक माहिती मिळाल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार 02564-210100 / – 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

(पी . आर . पाटील
पोलीस अधीक्षक , नंदुरबार

चुंचाळे गावात एका शेतमजूर तरुणांने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

यावल : तालुक्यातील चुंचाळे गावातील 35 वर्षीय शेतमजुराने साकळी शेतशिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सतीश शेनफडू पाटील (वय.35) असे मयताचे नाव आहे.

 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सतीश हा तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी साकळी शिवारातील उज्जैनसिंग राजपूत यांच्या शेत-शिवारात कामाला गेला होता. त्यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला त्याने ठिबक नळीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला व तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. मयत सतीश पाटील याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी योगेश कृष्णा पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सतीश पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.

फॉरेस्ट परिसरात घुसल्या मोजावी लागेल मोठी रक्कम , २५ शेळ्या आणि १४० मेंड्यासह १लाख ४० हजाराचा दंड ; वनपरिक्षेत्र अधिकारी ऍकेशन मोडवर मेंढपळणाचे धाबे दणाणले

0

 

___________________________
सोनाळा :सातपुडा पर्वतात अंबाबरवा अभयारण्य आहे .हे कोअरक्षेत्र आहे.या प्रतिबंधात्मक क्षेत्रात पिंगळी येथील मेंढपाळाच्या१४०मेंढ्या व २५बकऱ्या
अवैधरित्या चराई करित असतांना वन्यजीव विभागाने पकडल्या .ताब्यातील ४ मेंढपाळां कडून वन्यजीव विभागने १लाख४०हजारां चा दंड ४ सप्टेंबर रोजी वसुल केला आहे .यामूळे मेंढपाळांचे धाबे दणाणले आहे . डिएफओ नवलकिशोर रेड्डी व एसीएफ कमलेश पाटील यांच्या नेतृत्वात सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे व वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांनी ही धाडसी कार्यवाही केली आहे .महिनाभरात ही मेंढपाळावर दुसर्‍यांदा ही कार्यवाही करण्यात आली आहे .याबाबत अधिक असे की , अंबाबरवा अभयारण्याच्या सोनबर्डी वर्तुळातील पिंगळी बीट च्या खंड क्रमांक४५४ मध्य पीरबाबा परिसरात विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या गस्तीदरम्यान एसटीपीएफ कर्मचाऱ्यांना शेळ्या मेंढ्यांचे कळप अवैधरित्या चरत असल्याचे दिसून आले.वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात अवैद्यरित्या चरत असलेल्या १४० मेंढ्या २५ शेळ्यांना जप्त केले. सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयात या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे .
४ मेंढपाळ अनिल डोमाळे, गोपाल मोरे, सोनाजी डोमाळे, हरि डोमाळे सर्व रा. पिंगळी यांना ताब्यात घेण्यात येवून दंड भरण्याच्या अटीवर सोडून देण्यात आले . तदनंतर ४ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजता सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयात उपरोक्त दंड भरल्याने जप्त मेंढ्या वनपाळांना ताब्यात देण्यात आल्या . अशी माहिती आरएफओ वाकोडे यांनी दिली . यापुर्वीसूध्दा५ऑगस्टला वनविभागाने१५० मेंढ्या जप्त केल्या होत्या.उपरोक्त कारवाईत विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे१कर्मचारी,२वनपाल,१५ वनरक्षकां सह २५वनमजूरांचा समावेश होता ..तर जप्त केलेल्या मेंढ्या वनविभागाच्या ताब्यात असून मांगेरी नाक्यावर वनविभागाच्या ताब्यात होत्या ..