Home Blog Page 275

श्री सिंध गणेश मंडळाला बदनाम केल्या प्रकरणी मंडळ पदाधिकारी आक्रमक

0

 

हिंगणघाट पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली कारवाई करण्याची मागणी

हिंगणघाट:- मलक नईम

शहरातील गुरुनानक वार्ड येथील सुप्रसिद्ध श्री सिंध गणेश मंडळ मागील १६ वर्षा पासून सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे मात्र दोन दिवसा अगोदर या मंडळात हुक्का पार्टी सुरू असल्याची दुसऱ्या जागेवरील व्हिडिओ या मंडळाशी जोडून खोटी बातमी पसरवल्याने सदर मंडळाची बदनामी केल्याचा आरोप करीत मंडळाचे पदाधिकारी तसेच बजरंग दल समवेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट चे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे चुकीची बातमी पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुकेश उदासी,उपाध्यक्ष विक्की तकतानी,लखन पाखरानी,राहुल मोटवानी,बजरंग दलचे तालुका अध्यक्ष दीपक शर्मा,उपाध्यक्ष प्रशांत तिवारी,सामाजिक कार्यकर्ते दिनेश वर्मा,संजय माडे,नगरसेवक सोनू गवळी समवेत मंडळाचे आदी सदस्य उपस्थित होते.

जळगाव (जा) तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर “सहाय्यक परिचारिका मिडवाइफरी” (ANM) ची पदे तात्काळ भरा…

0

 

आदिवासी दुर्गम बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणारा जळगाव (जा) तालुका मुख्यत्वे करून या भागातील नागरिक जास्तीत जास्त शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्या अभावी रुग्णांनाची हेळसांड होत असून
प्रा.आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये.

गेले कित्येक वर्षापासून पिंपळगाव काळे प्रा.आ.केंद्र, जामोद प्रा.आ.केंद्र, मडाखेड प्रा.आ.केंद्र ह्या तीन केंद्रांवर “सहाय्यक परिचारिका मिडवाइफरी”(ANM) ची पदे रिक्त आहेत.

खलील प्रमाणे रिक्त असलेली (ANM) पदे

पिंपळगाव काळे प्रा.आ.केंद्र
एकूण पदे-6
भरलेली पदे-1
रिक्त पदे – 5

जामोद प्रा.आ.केंद्र
एकूण पदे-6
भरलेली पदे-1
रिक्त पदे – 5

मडाखेड प्रा.आ.केंद्र
एकूण पदे-6
भरलेली पदे-2
रिक्त पदे – 4

रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी
या करिता जळगाव (जा) तालुका वैद्यकीय अधिकारी “सौ श्रीमती पाटील मॅडम” यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले…

-आपला सेवक
-प्रकाश विठ्ठलराव भिसे
-संस्थापक अध्यक्ष-सारथी फाउंडेशन

भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडून उपविभागीय अधिाऱ्यांना निवेदन खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी

0

 

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका येथील मोळा मोळी या गावी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ तसेच निरपराध लोकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे; तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीपभाऊ गवई यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साहेब मेहकर यांना निवेदन !

तालुक्यातील मोळा मोळी येथे पोळ्याच्या सणाच्या दिवशी बौद्ध बांधवांवर सवर्ण समाजातील काही लोकांनी तोरणाखाली बैल का आला म्हणून त्यांना जबर मारहाण केली होती,जखमी झालेल्या बौद्ध समाजातील लोकांनी तात्काळ जानेफळ येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना तेथील पोलिसांनी ताटकळत दोन ते तीन तास बसवले, त्यानंतर आरोपीवर अनुसूचित जाती कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले तसेच बौद्ध बांधवांवर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, वास्तविक पाहता बौद्ध बांधवांचा यामध्ये काडीचाही गुन्हा नाही परंतु त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले या घटनेचा निषेध म्हणून मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीपभाऊ गवई यांचे नेतृत्वामध्ये दिनांक 03/09/2022 रोजी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये असे म्हटले आहे की बौद्ध बांधवावरील जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे,तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी,

यावेळी निवेदन देताना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई,गौतम नरवाडे,संदिप राऊत,नागेश म्हस्के,राधेश्याम खरात,व तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व मेहकर येथील समाज बांधव उपस्थित होते.

बेपत्ता असलेल्या युवकाचे प्रेत सापडले शहरालगतच्या शेत तळ्यात मिळाला शव

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

नातेवाईकांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात असलेल्या इदगाह परिसरातील एक 28 वर्षे युवक गणपती आगमनाच्या दिवशी पासून बेपत्ता होता आज सदर इसमाचा मृतदेह हा शेगाव शहरा तील सुरभी नगरला लागून असलेल्या एका शेततळ्यामध्ये मिळून आला. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून मृतकाच्या नातेवाईकांनीही शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार नोंदवली आहे.
नजीरउल्ला भुरेखा वय 28 राहणार गड्डा परिसर शेगाव हा युवक मागील चार दिवसांपासून अचानकपणे बेपत्ता झालेला होता. दरम्यान त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना शहरातील सुरभी नगर भागात लगत असलेल्या शेतातील शेततळ्यामध्ये त्याचा मृतदेह आज तरंगताना काही नागरिकांना दिसून आला. याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनला देण्यात आल्यावरून पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन क्षवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान सदर युवकासोबत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलेला असून तशी तक्रार शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.या संदर्भात शहर पोलीस पुढील तपास करीत आहे.

संग्रामपूर तालुक्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्यात यावे वैद्यकीय अधिकारी संग्रामपूर यांना निवेदन

0

 

आज दिनांक 02/09/2022 रोजी संग्रामपुर तालुक्यातील बोगस पॅथॉलॉजी जिल्ह्यात व अनधिकृत प्यारा वैद्यकीय परिषद ची नोंदणी केलेल्या क्लिनिकल लॅब संचालक विरुद्ध कारवाई करण्यात यावी व पॅथॉलॉजी लॅबला सील ठोकण्यात यावे अशी मागणी संग्रामपूर तालुका लॅब लॅब असोसिएशन च्या वतीने करण्यात आलेली आहे संग्रामपूर तालुक्यातील लॅब असोसिएशन सदस्य ने संग्रामपूर तालुक्यातील टी एच ओ, तहसीलदार व ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र पॅरा वैद्यकीय परिषद अनधिक अधिनियम 2011 (2016 चा महा.6) चे कलम 26 अन्वय लॅब टेक्निशियन नोंदणीकृत होणे अनिवार्य आहे. तरी अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येत अनधिकृत टेक्निशन अवैधरित्या आपली लॅबची दुकाने चालवत आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यामध्ये अनेक प्रयोगशाळा तंत्रज्ञान कडून आदिवासी विभागातील रुग्णांची आर्थिक व मानसिक लूट होत आहे.
तरी संग्रामपूर तालुक्यातील सर्व लॅब धारकांची शहानिशा करून दोषी प्रयोगशाळा तंत्रज्ञान वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील लॅब असोसिएशन च्या वतीने करण्यात येत आहे असे निवेदन देण्यात आले यावेळी संग्रामपूर तालुक्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ निवेदन देण्याकरिता हजारो होते. निवेदन देण्याकरिता संग्रामपूर मधील प्रशांत इंगळे, राहुल गावंडे ,विजय रहाटे, अशोक वानरे ,सय्यद वसीम, शेख किस्मत ,देवानंद तायडे ,निखिल शेळके व इतर सदस्य हजर होते.

यावल गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ चौधरी यांनी स्वीकारला पदभार

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल : यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ त्र्यंबक चौधरी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. गेल्या काही दिवसापासून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद हे रिक्त होते व प्रभारी पदभार डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या कडे होता. मात्र आता यावल पंचायत समितीला प्रभारी गट विकास अधिकारी पदभार स्वीकारले आहे. शुक्रवारी सकाळीच एकनाथ चौधरी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आगामी काळात पंचायत समिती स्तरावरील विविध कामे वेळत पुर्ण होण्यासाठी आपले प्राध्यान्य असे असे प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगीतले. आहे

हिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर ( डीएससी ) चे ई -टेंडरचा गैरवापर

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

तालुक्यातील हिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर ( डीएससी ) चे ई -टेंडरचा गैरवापर करून आदीवासी महिला सरपंच यांना धमकी देत मानसिक छळ करून खंडणी मागणाऱ्यांवर आदीवासी विशेष कायद्या अंतर्गत चौकशी करून संबधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे तक्रार संदर्भातील निवेदन आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच, महाराष्ट्रच्या वतीने राज्याचे अध्यक्ष एम बी तडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना देण्यात आले आहे . या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी यांनी म्हटले आहे की हिंगोणा तालुका यावल या ग्रामपंचायतीवर आदीवासी तडवी समाजाची महीला सौ रूखसाना फिरोज तडवी या सरपंचपदाचा कारभार सांभाळत आहेत . ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील विकास कामे ही पारदर्शी व्हावी याची जबाबदारी सरपंच आणी ग्रामसेवक यांची असते परंतु हिंगोणा गांवातील विकासकामे ही ठराविक किंवा ठरलेल्या एकच व मर्जीतील ठेकेदार यांच्या वतीने होत असल्याचे सरपंच सौ .रूखसाना तडवी यांचे म्हणणे असुन , संबधीत कामांच्या कार्यपद्धती बद्दल सरपंच यांनी ग्रामसेवक यांना डीएससी गैरवापर होत असल्याबाबत च्या सुचना दिल्या असतांना ग्रामसेवक आर टी बाविस्कर यांनी या गंभीर विषयाकडे टाळाटाळ करीत दुर्लक्ष केते . हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्ती योजनेची कामे मंजुर असुन ,या कामांची ई – टेंडर प्रक्रीया करणे करिता सरपंच यांची डीएससी ची आवश्वता असते , असे असतांना ग्रामसेवक यांनी टेंडर प्रक्रीयेत घोळ करून बेकाद्याशिररित्या ठरावीक किंवा ठरलेल्या एकच ठेकेदारास लाखो रुपयांची बांधकाम भ्रष्ठाचार करण्याच्या हेतुने दिली आहे . असा प्रकारची लाखो रुपयांची बेकाद्याशीर कामे करून सरपंच यांच्यावर डीएससी मिळवण्यासाठी वरिष्ठांकडे खोटया तक्रारी करून तसेच काही गुन्हेगार वृत्तीची ठेकेदार मंडळी यांनी या आधीच ईतर ग्रामपंचायतींच्या घेतलेल्या कामांची विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातुन चौकशी करण्यात यावी असे तक्रार निवेदनात म्हटले असुन , महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे दिनांक २७ मे२०१५ रोजीचे शासन निर्णय क्रं. निविदा २०१४ / प्र . क्र .२६० / परा-७नुसार ई – निविदा प्रणाली नियमानुसार ग्रामसेवक आर टी बाविस्कर हे ई – टेंडर करीत नसुन बेवसाईटवर बांधकामाची निविदा प्रक्रीया करण्यासाठी ग्रामसेवक हा सरपंच यांची डीएससीचा बेकायद्याशीर पद्धतीने गैरवापर करून बांधकाम टेंडर हे शासनच्या ई – टेंडर बेवसाईटवर काही वेळेसाठी फ्लेस करतात व त्यानंतर हिड करतात व ते काम असे करीत असतांना सदरचे काम बद्दलची माहिती ऑनलाईन ईतरांना दिसत नसल्याने ईतर ठेकेदारांना टेंडर भरता येत नाही अशा प्रकारे ग्रामसेवक यांच्या व काही स्वार्थी मंडळींच्या संगनमतांने हा सर्व घोळ आपल्या मर्जीतील ठेकेदाराच्या पदरात बांधकाम पाडत असतात , या सर्व प्रकारामुळे ईतर होतकरू सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांना संधी मिळत नसत्याचे चित्र निर्माण झाले आहे . या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करण्यात येवुन कायद्या दुरुपयोग करून आदीवासी समाजातील महिला सरपंच यांना आर्थिक स्वार्थासाठी धमकी देवुन मानसिक छड करणारे शासकीय अधिकारी व या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष सरदार बलदार तडवी व आदीवासी समाजातील असंख्प महीलांच्या वतीने देण्यात आले असुन तसे न झाल्यास संघटनेच्या वतीने तिव्र आदोंलन छेडले जाईल असा ईशारा देण्यात आला आहे .

हिंगणघाट पोलीस स्टेशन दूरध्वनी नंबर बंद, जनतेने संपर्क कुठे साधायचा ?

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट पोलीस स्टेशन संपर्क दूरध्वनी नंबर हा अनेक दिवसापासून बंद आहे. अनेकदा फोन लावून सुद्धा फोन लागत नाही अशी जनसामान्यातून माहिती मिळाली. सध्या पोळा, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, धम्म चक्र परिवर्तन ,दशहरा असे अनेक कार्यक्रम हिंगणघाट व ग्रामीण भागात होत असतात. अशा वेळेस काही घटना घडल्यास जनतेने संपर्क कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे ?
कोणतीही घटना घडल्यास सर्वप्रथम पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करण्यात येतो, परंतु सध्या हिंगणघाट पोलीस स्टेशन चा नंबर हा बंद आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशन दूरध्वनी नंबर हा अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे कदाचित बिल भरले नसल्यामुळे कनेक्शन बंद करण्यात तर आले नाही ? वरिष्ठांकडून याकडे लक्ष देण्याची गरज आहे .

नगरपरिषद हद्दितील बिना परवानगी झाडे / वृक्ष तोडल्यास होणार कारवाई!

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट नगर परिषद हद्दितील झाडे / वृक्ष धोकादायक स्थितीत असल्यास किंवा धोकादायक झाडाच्या फांदया तोडावयाच्या असल्यास नागरीकांनी तसा रितसर अर्ज / झाडांचा फोटो सह नगर परिषद कार्यालयात सादर करावा. आपण सादर केलेला अर्ज महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये हिंगणघाट नगर परिषदेमध्ये नियुक्त वृक्ष प्राधिकरण समितीची सभेसमोर ठेवण्यात येईल. वृक्ष प्राधिकरण समितीच्या मान्यतेनंतर त्वरीत निर्णय घेवुन निकाली काढणे तसेच अवैध वृक्ष तोडीवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील तरतूदीनुसार दंड आकारण्यात येईल. याबाबत कडक कारवाई करण्यात येईल.
शहरातील वृक्ष संवर्धनाकरीता असलेल्या सामाजिक संस्था यांचा शहर हिरवेगार करण्याकरीता तसेच पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्याकरीता सहभाग घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात येत आहे.

विदर्भाची पंढरी भाविकांच्या भक्तीत दुमदुमली शेकडो पालख्या आणि विविध कार्यक्रमात श्रींचा ११२ वा पुण्यतिथी ऋषीपंचमी उत्सव साजरा

0

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणारे संत नगरी शेगाव श्री गजानन महाराज संस्थान मध्ये आज श्रींचा ११२ वा ऋषीपंचमी उत्सव साजरा करण्यात आला या निमित्त विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून भकांच्या पैदल दिंड्यांचे संत नगरीत आगमन झाले असून २८ तारखे पासून श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने कार्यक्रम आणि महायज्ञ सुरू होते.

आज शहरातून राजवैभवात दुपारी २ वाजता गज अश्व मेना टाळमृदंग गजरात नगर परीक्रमा निघाली या वेळी शहरात विविध ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तर येणाऱ्या सर्व पलख्यांची संस्थांचे वतीने वेवस्ता करण्यात येत असते ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे कोरोणा नंतर या वर्षी भाविकांमध्ये उत्साह असल्याचे दिसते