Home Blog Page 277

कोरपावली गावातील त्या मुन्नाभाई एमबीबीएसचे पुन्हा आगमन बोगस दवाखाना सुरू आरोग्य यंत्रणा कुचकामी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील आदीवासी गाव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कोरपावली गावात तो मुन्नाभाई एमबीबीएस बोगस डॉक्टर पुनश्च सक्रीय झाला असुन , उपचाराच्या नांवाखाली सुरू असलेल्या कारभारास गावातील काही तथा कथित पुढारी व स्थानिक आरोग्य प्रशासनाचे पाठबळ या बोगस डॉक्टरला मिळत असल्याची ग्रामस्थांनी ओरड असुन , वरिष्ठ पातळीवरील आरोग्य प्रशासनाने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवुन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे . यावल तालुक्यातील कोरपावली गाव हे आदीवासी गाव म्हणुन ओळखले जाते या गावात गेल्या काही दिवसा पासुन एका बिहारी बोगस डॉक्टराने गेल्या दोन वर्षा पासुन आपला उपचाराचा कारभार सुरू केला असून , उपचाराच्या नावाखाली ग्रामीण क्षेत्रातील गरजु रूग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जात असुन , या संदर्भात यावल तालुका डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातुन अशा बोगस व्यवसायीक डॉक्टरांबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ गफूर तडवी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातुन कार्यवाही करीत त्याच्या कडील असलेली कागदपत्रे चौकशी कामी जमा केली होती . त्या बोगस डॉक्टरास चौकशी अहवाल मिळे पर्यंत आपला दवाखाना बंद ठेवावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या . सदरच्या या बोगस डॉक्टरचा दवाखाना बंद पाडला होता , मात्र काही दिवस हा बोगस डॉक्टर बाहेरगावी निघुन गेल्यानंतर तो पुन्हा कोरपावली गावात दाखल झाला असुन , त्याने पुनश्च आपला दवाखाना सुरू केला असुन , अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येत असुन, अशा प्रकारे बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्दतीने रुग्णांच्या संदर्भात काही अप्रीय घटना घडल्यास व रुग्ण दगावल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न सुज्ञ ग्रामस्थामध्ये उपस्थित होत आहे . या संदर्भात सावखेडा सिम तालुका यावल प्राथमिक आरोग्य केन्द्र आणी ग्रामपंचायतीने तात्काळ संयुक्त कार्यवाही करून त्या बोगस डॉक्टरला पाठींबा देणाऱ्यांना समज देवुन त्या बोगस डॉक्टरचे दुकान कायमचे बंद करावीत अशी मागणी करण्यात येत आहे .

रायसोनी ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कडून फसवणूक केल्याचा आरोप ? चौकशीची मागणी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी
हिंगणघाट :- मोहम्मद वसीम मोहम्मद यासीम यास पैसे घेवून दुकान देण्याचे आमीष दाखवून फसवणूक केली . फसवणूक करणारे
में मृगनयनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड तर्फे 1) सौ. अल्पना अमोल वझरकर नागपुर
2) विवेक विजयकुमार कांबळे हिंगणघाट
3) मंगेश चरडे व सोबत असलेले 4 ते 5 गुंड यांना दुकानाच्या व्यवहारामुळे ओळखतो. मृगनयनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कडून नियुक्त केलेले विवेक कांबळे हिंगणघाट यांचे सोबत दुकानासंबंधीतचे आर्थिक व्यवहार व पैश्याची देवाण घेवाण केलेली आहे
श्रध्दा बिझीप्लेक्स या नावाने असलेल्या कॉप्लेक्स मध्ये दुकान क्र. एसएस ए व एसएस-7सी दूसरा माळावर असलेल्या दुकानाबाबतचे व्यवहार विवेक कांबळे याच्याशी केला . दुकानाची तोंडी स्वरुपाने बोलनी करून एकंदरीत रू. 9,00,000/- विवेक कांबळे हिंगणघाट यांच्याकडे सुपृत केली. विवेक कांबळे हिंगणघाट याने बोलनी केलेल्या दुकानाचे क्षेत्रफळ तसेच एकूण लागणारे रुपये एका कागदावरती लिहून कोणत्या तारखेला किती पैसे दिले त्याचे विवरण लिहून देवून त्यावर स्वताचे हस्ताक्षर करुन आम्हाला दायचा रुपयाची पावती मी तुम्हाला नंतर देण्याचे सांगून टाळाटाळ केली.
सर्व सुरळीत चालु असतांना दिनांक 09/08/2022 रोजी
मृगनयनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड तर्फे सौ. अल्पना अमोल नागपुर यांनी विवेक कांबळे हिंगणघाट यांना कामवरून बडतर्फ केल्याबाबतची सूचना लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित केली व त्याचा दिवशी मंगेश चरडे नागपूर चार पाच गुंडासह आमचा ताबा असलेल्या दुकानात आला व मला सांगितले कि, तुमच्या ताब्यात असलेल्या दुकानाबद्दल कुठलीही रक्कम मिळाली नाही. सांगून माझ्या ताब्यात असलेल्या दुकानाला सामानासह बळजबरीने धमकावून कुलूप लावले त्यास मी विरोध केला असता मंगेश चरडे नागपूर त्याच्यासोबत असलेल्या चार-पाच गुंडांनी मला शिवीगाळ करुन धक्का बुक्की करुन जबरदस्तीने दुकानाच्या बाहेर काढले व दुकानाला कुलूप लावले दुकानामध्ये माझा अंदाजे 8,00,000/- कॉस्मेटिकचा माल आहे.
हिंगणघाट पोलीस स्टेशन, मा. पोलीस अधीक्षक वर्धा, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांना निवेदनातून माहिती देण्यात आली संबंधित प्रकरणात चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा.

हिंगणघाट पोलीस निरीक्षक कैलास पुंडलिकर :- दुकान फसवणूक प्रकरणात कागदपत्रे व्यवहार तपासून सत्य परिस्थिती पाहून गुन्हा दाखल करू. सध्याच्या परिस्थितीत कोणावरही गुन्हे दाखल नाही.

विवेक कांबळे :- मला कोणतीही पूर्व माहिती नोटीस न देता माझ्याबद्दल पेपर मधून चुकीची माहिती देण्यात आली .मी सुपरवायझर पदावर आहे. माझ्या सोबत व्यवहार कसा होईल ? ग्राहकांच्या माझ्यावर विश्वास कसा बसेल ? त्यामुळे मी डॉ. रमेश रांका यांच्याकडे ग्राहकांना सोबत घेऊन दुकानाचे नगदी रुपये व चेक व्यवहार केला आहे. काही दुकानाची विक्री सुद्धा झाली आहे.डॉ. रमेश रांका म्हणत होते की नगदी रुपये व ग्राहकांना सोबत घेऊन आल्यास एखाद्या वेळेस समस्या निर्माण होऊ शकते ? याबद्दल कंपनी व्यवस्थापक कडून ही सांगण्यात आले की ग्राहकाकडून पैसे घेत जा व पैसे मिळाले कच्च्या चिट्टीवर रुपये सही देत जा , नगदी रुपये डॉ. रमेश रांका ला पोहोचून देत जा व तशी माहिती आम्हाला देत जा डॉ. रांका ते लिहून ठेवत जाईल. अशा अनेक विक्री या पद्धतीने झालेले आहे .. संबंधित नगदी स्वरूपाचे व्यवहार ऑफिस कार्यालय मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे रेकॉर्ड आहे कंपनीकडून नगदी रुपयाचा हिशोब कागदपत्रे दाखवल्या गेले नाही. खरेदी-विक्री व्यवहार तपासल्यास चेक व्यवहारात दाखवले परंतु ते चेक क्लिअर झाले नाही तपासल्यास हे सर्व लक्षात येईल. मला फसवण्याचा प्रयत्न होत आहे . संबंधित माहिती श्रद्धा बीझी कॉम्प्लेक्स मध्ये मृगनयनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय येथे पत्रकार यांच्यासमोर माहिती दिली .

अश्विन पांडे (रायसोनी मृगनयनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ) :– आम्ही दुकान ग्राहकांसोबत सर्व व्यवहार चेक नी केले सर्व दुकानाची विक्री चेक द्वारे झाली. विवेक कांबळे व ज्या दुकानदाराजवळ दुकानाचे विक्री पत्र नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई बाबत नागपूर – हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली चौकशीमध्ये सर्व समोर येईल .

डॉ. रमेश रांका :- विवेक कांबळे यानी नगदी रुपये , दुकान ग्राहकाला माझ्याजवळ आणले नाही कोणत्याही ग्राहकांनी मला पैसे दिले नाही सर्व खोटे आरोप करत आहे

15 ऑगस्ट अमृत महोत्सवच्या नावावर तहसील कार्यालयीन कामे 3 नंतर जनतेला मानसिक, शारीरिक ,आर्थिक त्रास

0

 

समुद्रपूर :- 17 ऑगस्ट
तहसील कार्यालय यांच्याकडून 15 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला अशी माहिती मिळाली त्यामुळे हा कार्यक्रम 17 ऑगस्ट रोज बुधवार ला घेण्यात आला . परंतु समुद्रपूर तहसील कार्यालय याला अपवाद ठरली या ठिकाणी बाहेर येणाऱ्यांना तहसील मधील कामासाठी तीन वाजेपर्यंत वाट पाहायला लागली यासाठी समुद्रपूर तहसील कार्यालयाला वेगळा आदेश होता का ?
तहसीलदार राजू गणवीर :- तहसील ऑफिस बंद नाही ऑफिसमध्ये आझादी महोत्सव कार्यक्रम असल्यामुळे दोन-तीन वाजता ऑफिस सुरू होईल.
शासन परिपत्रक :
“समूह राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० व स्वराज्य महोत्सव” अंतर्गत “समुह राष्ट्रगीत गायन” या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह
राष्ट्रगीत गायन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असेल.
३. सकाळी ठीक ११:०० वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११:०० ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

सरपंचाची निवड जनतेतूनच :- सभागृहात विधेयक मंजूर

0

 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. आता त्यात अजून एका निर्णयाची भर पडली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकार कडून सरपंचाची निवड ही जनतेतूनच करण्याचे विधेयक आज पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सरकारने जनतेतूनच सरपंचाची निवड करण्याचे विधेयक मंजूर करून घेतले. राज्याचे नवे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले आणि विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता संरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात सरपंच निवड हि थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा मोठा फायदाही काही ठिकाणी भाजपला झाला होता. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने तो निर्णय रद्द करून सरपंच निवड सदस्य करतील असा निर्णय घेतला होता. आता मात्र राज्यात पुन्हा एकदा सत्ताबदल झाल्यानंतर भाजपने आपला जुन्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

पिपंळडोळी येथे स्वातंत्र्यांच्या अमृत दिवसानिमित्त मिळाली 91लोकांना स्वतःची जागा

0

 

योगेश नागोलकार

राहेर:- पातूर तालुक्यांतील पिंपळडोळी येथील75वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला , माञ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना गावातील 91कुटुंबांना स्वतःची मालकीची राहायला जागा नव्हती.तोच गावांतील ज्या लोकांना स्वतची जागा नव्हती त्या लोकांना आमदार नितिन देशमुख यांच्या प्रयत्नातून आणि डॉ. रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी बाळापूर यांच्या आदेशाने गावांतील 91कुटुंबांना स्वतःची मालकीची जागा आठ वितरीत करण्यात आले. सचिव रमेश पोट पिंपळडोळी येथील 91 लाभार्थ्यांना प्रशांत देशमुख सरपंच यांच्या हस्ते नियमकुल जागेचे आठ सदर कार्यक्रमामध्ये वाटप करण्यात आले. रमेश पोटे सचिव प्रशांत देशमुख सरपंच अमित सबनीस मंडळ अधिकारी संजय चतरकर सदस्य यशवंत ताजने अंजनाबाई पारसकर कुसुंम बाई अंभोरे संदीप तायडे नारायान गवई ग्राम पंचायत कर्मचारी गवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भालोद गावात देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या पालकांचा माजी आमदार व माजी खासदार कृषी मित्र कै. हरिभाऊ जावळे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

0

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तसेच निवृत्त माजी सैनिक यांचा देखील सत्कार फैजपूर विभागाचे प्रांतधिकारी कैलास कडलक ,यावलचे तहसीलदार महेश पवार, फैजपुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, भालोद येथील सरपंच प्रदीप कोळी तसेच माजी आमदार व माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांच्या पत्नी कल्पना जावळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सैनिक प्रदीप दिलीप बडगुजर, अमित एकनाथ कुंभार, हर्षल दिनकर जावळे, धीरज दिनकर जावळे, भूषण विजय महाजन, अमोल विजय महाजन, कैलास संतोष इंगळे, विलास संतोष इंगळे, सचिन श्रावण इंगळे, सचिन दिलीप कोळी, राजेंद्र नरेंद्र बर्डे, दिलीप शामराव भालेराव, नरेंद्र ईश्वर भालेराव, सचिन शालिक भालेराव या सैनिकांच्या माता-पित्यांचा सत्कार शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व साडी देऊन करण्यात आला. तसेच माजी सैनिक संजय रूपचंद भालेराव, सुनील वसंत कुंभार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला, प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी सिमेवर राहुन देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिका बाबत विचार मांडले व त्यांच्या परिवारातील व त्यांची काही ही अडचणी ची दखल अगोदर घेतली जाईल व त्यांचे कामे लवकर मार्गी लावण्यात येतील असे सांगितले ते सीमेवर कर्तव्यदक्ष राहून आपले रक्षण करीत आहे त्यांच्यामुळेच आज आपण या देशात 75 अमृत महोत्सव बिनधास्तपणे पूर्ण भारतात साजरा करू शकत आहोत असे सांगितले या कार्यक्रमाला भालोद च्या गरिमा सेंटर मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून रंगत आणली.

कार्यक्रमाला अमोल जावळे, नारायण चौधरी, मनोज जावळे, अशोक महाजन, संजय डाके, मुरलीधर इंगळे, नारायण कुंभार, जितू कोळी, संजीव भालेराव, सचिन भालेराव, नितीन लहू चौधरी, हेमा इंगळे, मोहन जावळे, अमोल महाजन, प्रवीण परतणे, भास्कर पिंपळे, डी.व्ही, संजीव चौधरी, मनोज चौधरी, शरद जावळे, जाबीर खान, मुकेश चौधरी, शोभा भालेराव, कामिनी जावळे, विद्या चौधरी, दिलीप पाटील, देवेंद्र नेहेते, पोलीस पाटील लक्ष्मण लोखंडे, गिरीश महाजन, अनिल वानखेडे, दीपक महाजन, सुनील कोळीव गावातील असंख्य नागरिक उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच अरुण रामदास चौधरी यांनी केले व आभार हेमलता मुरलीधर इंगळे यांनी मानले.

15 ऑगस्ट निमित्य शालेय विद्यार्थ्यांना बुक, पेन्सिल, मिठाई वाटप करण्यात आली.

0

 

हिंगणघाट :- महात्मा ज्योतिबा फुले वार्ड येथील प्रशांत मेश्राम (समाजसेवक) मित्र परिवार तर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने शहरातील महात्मा फुले (चौक) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री. अतुल वांदिले , पृथ्वीराज मेश्राम (ज्येष्ठ आरपीआय नेते ) अमोल बोरकर राजू मुडे यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बुक,पेन्सिल व मिठाई वाटून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल मेश्राम , सुजाता जांभुळकर ,अमित रंगारी, दिपाली रंगारी,प्रवीण जनबंधू, यश म्हैसकर, कुणाल लोणारे, अमित मुळे, अक्रम शेख, ताहिल शेख, शुभम वावरे, चेतन लोणारे, साहिल लोणारे, बंटी रामटेके, मंगेश सातघरे, वैभव चाकोले, प्रशिक रामटेके, सुमित बागेश्वर,यांनी केले.

हिंगणघाट नगर परिषदेने दिला सफाई कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

0

 

हिंगणघाट – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्याने शासनाचे आदेशानुसार दिनांक १३-०८-२०२२ ते दिनांक १५-०८-२०२२ या कालावधीत सर्व शासकिय, निमशासकिय आस्थापना यांचेवर ध्वाजारोहण करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने हिंगणघाट नगर परिषदेमध्ये दिनांक १३-०८-२०२२ व दिनांक १४-०८-२०२२ रोजी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगर परिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्री. हर्षल गायकवाड यांनी दिनांक १४-०८-२०२२ रोजी ध्वजारोहणाचा मान शहराचा कणा असलेले तसेच कोव्हीड-१९ च्या काळात व पुरपरिस्थितीत स्वच्छतेचे काम अहोरात्र करणाऱ्या सफाई कर्मचान्यांना दिला. त्यावेळी सफाई कामगार प्रतिनिधी म्हणून श्री. राजु मोगरे, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान सफाई कर्मचाऱ्यांना देऊन खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

चोपडा हादरल प्रेमीयुगुलाचा खून… तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा दाबून खून

0

 

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

चोपडा : राज्यसह संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना चोपड्यात घडली आहे. चोपड्यात दोघांचा खून झाला आहे. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी स्वताहा
पोलीस स्थानकामध्ये हजर होऊन खून केल्याची कबुली चक्क
पोलिसांना दिली आहे. सविस्तर माहिती असे की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून
आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा.सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूरा
चोपडा) अशी मयत युगालाची नाव आहेत. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी
झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक रावले हे करीत आहेत.

जवाहर नवोदय विद्यालय घोटच्या वतीने घोट गावात हर घर तिरंगा रॅली….!

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक.

घोट:-दिनांक १३ आगष्ट,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव शुभ पर्वावर जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे विद्यालयाचे प्राचार्य राव,उपप्राचार्य राजन गजभिये, शिक्षक साईराम,अजय चांदेकर,चौबे,बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घोट गावातून एनसीसी चे विद्यार्थी,स्काऊट गाईड व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आले.
भारत माता की जय,तिरंगा की आण है अपनी शान,अशा घोषणा देऊन लोकांना प्रेरीत करण्यात आले.दरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक,महिलांनी रॅलीमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.