Home Blog Page 278

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य आज दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी हिंगणघाट शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने तिरंगा गौरव रॅली चे आयोजन करण्यात आले.

0

 

या निमित्याने हिंगणघाट काँग्रेस कमिटी तर्फे स्वातंत्रलढ्यात काँग्रेस पक्षाचे तसेच काँग्रेस च्या नेत्याचे असलेले योगदान स्मरण करून स्वातंत्रलढ्यात शाहिद झालेल्या सर्व विर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले तसेच यानिमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस उजाळा दिला.

गोकुलधाम मैदान, हिंगणघाट येथून ठीक सकाळी ठीक १० वाजता या रॅलीची सुरुवात झाली. मार्गात येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या पूतळ्याना अभिवादन करून मार्गक्रमण करीत ठीक दुपारी १.30 ला गोकुलधाम मैदान, हिंगणघाट येथे सदर रॅलीचा समारोप झाला.

याप्रसंगी अशोकभाऊ शिंदे, माजी राज्यमंत्री यांनीं सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पर समारोपीय भाषणातून संबोधित केले व या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

या रॅलीत मा पंढरीभाऊ कापसे, अध्यक्ष, हिंगणघाट शहर काँग्रेस, श्री. गंधारे गुरुजी, श्री. विनायकराव चौधरी माजी नगराध्यक्ष, श्री शालीकराव डेहणें, सुधाताई शिंदे माजी नगराध्यक्ष, श्री प्रशांत गहुकर, श्री अमित चाफले, श्री नरेंद्र चाफले, श्री ज्वलंत मून, श्री. विनीत श्रीवास, श्री नकुल भाईमारे , शेख सरफू, श्री चंदू पंडित, श्री गुणवंत कारवटकर, हुमायु बेग, श्री पुरुषोत्तम मून, श्री. गुणवंत वानखेडे, सय्यद मेराज, श्री प्रदीप मस्के, श्री. नागेश जीवनकार, श्री प्रमोद जुमडे, श्री सुरेश गायकवाड, श्री गुणवंत कोठेकर, श्री सुरेश गोहणे, श्री जनबंधु, श्री हिवंज , श्री बाळा जमुनकार, श्री वाटकर गुरुजी, श्री अंकुश ससाने, श्री भोला चव्हाण,अज्जू भाई, श्री सुखदेव कुबडे, श्री प्रमोद नौकारकर, , श्री अरविंद कुकडे, श्री अरविंद राऊत, श्री नारायणराव बैलमारे, सौ करूनाताई वाटकर, लताताई गणसाडे, हिवंज ताई, दीपाली ताई वरभे, प्रेमीला चाफले, नंदा चावरे, मीरा पाल इ.तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अनेक काँग्रेस प्रेमी व गांधीवादी जनतेची उपस्थिती होती.

शिव सेना ने दिली मुख्याअधिकारी ला निवेदन

0

 

हिंगणघाट,, मलक नईम

आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोज शुक्रवारला हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने, शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री. बाळाभाऊ राऊत यांच्या आदेशाने तथा विधानसभा संपर्कप्रमुख श्री. रुपेश जी कांबळे व जिल्हा प्रमुख श्री अनिलभाऊ देवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली व वर्धा हिंगणघाट जिल्हा समन्वयक डाॅ. उमेश भाऊ तुळसकर यांचे सूचनेप्रमाणे तथा श्री. राजेंद्र खुपसरे उपजिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट नगरपरिषद चे मुख्याधिकारी मा.श्री. हर्षल गायकवाड साहेब, यांना हिंगणघाट शहरातील विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात :- १)हिंगणघाट शहरात~ मागील एक महिन्यापासून अतिवृष्टी पडल्यामुळे काही भागात पूर दृश्य परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे शहरातील अनेक भागात तथा प्रभागात व मुख्य रस्त्यावर खड्डे तसेच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे .अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने चुरी किंवा मुरूम तात्काळ टाकण्यात यावा. २) तसेच अमृत योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम मागील पाच वर्षापासून रखडलेले आहे .या संदर्भात नगरपरिषद प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते .कारण तत्कालीन मुख्याधिकारी यांना शिवसेनेतर्फे निवेदन दिनांक :-4 एप्रिल 22 दिले त्यानंतर दिनांक:-8 ऑगस्ट 2022 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी सदर विषयावर स्वतःच्या दालण्यात बोलवल्या बैठकीत, या समस्येवर संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अभियंता श्री.तपासे यांच्यासोबत चर्चा करून पाणीपुरवठा दिनांक:- 30 जून 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे लेखी स्वरूपात आश्वासन सुद्धा दिले होते . असे पत्र सदर निवेदनासोबत जोडलेले आहे. परंतु या योजनेचे काम आज पर्यंत परिपूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरात व आमच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. ३) नगरपरिषदेने मागील वर्षी सर्वसाधारण सभेमध्ये एक ठराव घेतला होता. त्या ठरावांमध्ये नगरपरिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जी. बी. एम कनिष्ठ महाविद्यालयातील chemistry, physics, biology साठी प्रयोगशाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी चा सामना करावा लागत आहे म्हणून प्रयोगशाळे च्या करिता संबंधित ठेकेदाराकडून खोली बांधण्याबाबत मंजुरी दिली होती. आता महाविद्यालय सुरू झाले असून सुद्धा प्रयोगशाळा साठी लागणारी खोली तयार करण्यात आलेली नाही. यावर आपण लक्ष घालून तात्काळ प्रयोगशाळा तयार करावी. ४) नगर परिषदेच्या टॅक्स विभागामध्ये कमी जास्त दोन हजार प्रकरणे प्रलंबित आहे. त्यामध्ये दाखलखारीच, फेरफार, तसेच कर आकारणी ची प्रकरणे इत्यादी, याबाबत मोका चौकशी नगरपरिषद अभियंता, यांच्याकडून होत होती .परंतु नगरपरिषद ने अचानकपणे कुठल्या नियमाला धरून मोका चौकशीचे अधिकार कर विभागातील असलेले कर्मचारी यांच्याकडे दिले आहे. त्यांना तांत्रिक अनुभव नसताना हे काम त्यांना देऊन मालमत्ता धारकाचे चुकीचे अंकेक्षण करून आर्थिक व्यवहार होताना दिसून येते आहे. त्यामुळे मालमत्ता धारकाचे आर्थिक नुकसान होन्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे निर्णय रद्द करावा. ५) झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये तसेच वार्डा- वार्डात गाजर गवत तसेच इतर झाडीझुडपी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ,त्यातून उत्पन्न होणारे कीटक व मच्छर, यामुळे परिसरातील चिखल व घाण झाली असल्यामुळे रोगराई निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. यासाठी उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने तन नाशक फवारणी व कीटकनाशक फवारणी करावी. ६) शहरातील वार्डात नाले व नाली सफाई योग्य प्रकारे होत नसल्यामुळे मलेरिया, डेंगू,हिवताप इत्यादी सारखे आजार व रोगराई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे .याकरिता नगरपरिषदेच्या स्वस्थ विभागातर्फे डी .टी .टी. पावडर, तसेच नाले व नालीवर कीटकनाशक फवारणी, परिसरातील धूर फवारणी मशीन (Fog Machine)द्वारे काम तात्काळ करण्यात यावे. ७) तसेच शहरातील मोकाट गुरे -ढोरे, जनावरे तथा श्वान मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ते मुख्य रस्त्यावर किंवा वरडळीच्या ठिकाणी ठान मांडून बसतात. त्यामुळे नागरिकांना आपले वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघात सुद्धा झालेले आहे .आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोकाट जनावरे गुरे-ढोरे यांच्याकरिता कांजीवाडा सुरू करून त्यांना तात्काळ बंदिस्त करावे .तसेच श्वानाचे नसबंदी करून जेणेकरून त्याचा त्रास सर्व नागरिकांना होणार नाही. याची काळजी घ्यावी. ८) शहरातील विविध प्रभागात, नवीन विधुत खांबे लावण्यात आलेले आहे. जसे तुकडोजी वॉर्ड क्रं ६,५ ,ज्ञानेश्वर वॉर्ड क्रं ३,४,शास्त्री वॉर्ड क्रं १९, रामनगर, बिडकर, दत्त मंदिर वॉर्ड क्रं ७ या ठिकाणी लावन्यात आले. पंरतू नवीन LED लाईट लावण्यात आलेले नाही .त्यामुळे शहरातील काम करणारे व रोज मजुरी करणारे मिल कामगार, मजूर वर्ग यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. कारण त्यांना (ड्युटीमुळे) रात्रपाळी करून रात्री घरी यावे लागते, त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून सर्व नवीन विद्युत खांबावर लवकरात लवकर एलईडी लाईट लावण्यात यावे. वरील सर्व विषयावर आपण जातीने लक्ष घालून समस्याचे निराकरण करावे व कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना हिंगणघाट तर्फे शिवसेना स्टाईल ने जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामला नगर परिषद सर्वशी जवाबदार राहील.निवेदन देण्याकरिता शिवसेनेतर्फे माजी न.पा. अध्यक्ष चंद्रकांत घुसे, तालुका प्रमुख श्री. सतीश धोबे, शहर प्रमुख श्री सतीश ढोमणे ,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने , माजी नगरसेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, भास्कर ठवरे, शंकर मोहमारे, देवा पडोळे, कमलेश वाघमारे, उपशहर प्रमुख गजानन काटोले ,संजय पिंपळकर, विभाग प्रमुख रुपेश काटकर, मोहन तुमराम इ.शिवसैनिक उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसह मक्तेदार (भाडेतत्वावर) शेतकऱ्यांनाही आर्थिक अनुदान द्या.

0

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

हिंगणघाट :मलक नईम राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचा (एनडीआरएफ) निकषांच्या दुप्पट मदद देण्याची राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.परंतु ज्यांनी मक्तानी शेती केली त्याच काय ? जिल्ह्यात जवळपास २० ते ३० टक्के शेतकरी हे मक्तेदारीने ( भाडयानी ) शेती करतात. ते शेतकरी सुद्धा अतिवृष्टीग्रस्त असून त्यांना देखील नुकसान भरपाईची आर्थिक मदद मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. विशेषतः विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आले असता वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अतिवृष्टी भागाला भेट दिली तेथील शेतकऱ्यांचा व्यथा समजून घेतल्या व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदद देण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारांनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला. परंतु ही आर्थिक मदद ७/१२ ज्याचा नावावर आहे त्याना मिळत असून मक्तेदार (भाडेतत्त्वावर) शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदद देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, कामगार नेते आफताब खान, सभापती हिम्मतसिंग चतुर, अशोक वांदिले, उत्तमराव भोयर, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीश काळे, उपाध्यक्ष जितेंद्र शेजवळ, सचिन तुळणकर,पिटु बादले, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे,माजी नगरसेवक धनंजय बकाने, माजी नगरसेवक विनोद झाडे,राजू गधांरे, संजय चौहान,अमोल बोरकर, सुनील भुते, बालाजी गहलोत, जावेदभाई मिर्झा, गोविंद पुरोहित, गणेश वैरागडे, महिला शहराध्यक्ष सौ. मृनालीताई रिठे, सौ.मिनाक्षीताई ढाकणे, सौ. सुजाता जांबुलकर, सुरेश सायंकार, अमोल बोरकर, सुनील भुते, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, मारोती महाकाळकर, प्रल्हाद तुराळे, माणिक लांडगे, सचिन मुरार, नितेश नवरखेडे, हरिदासजी काटकर, सचिन पाराशर, पंकज पाके, पियुष जैस्वाल, संजय कातरे, अतुल पाहुणे, गजू पिसे,विजय तामगाडगे, सौरभ साळवे, उमेश नेवारे, परम बावणे, नरेश चिरकुटे पप्पू आष्टीकर, अमोल मुडे, अमित झामरे, सुभाष खैरे, प्रदीप बागेश्वर, आरिफ शेख, शाहरुख बक्ष, जयपाल तामगाडगे, प्रतीक वावरे, सागर बारई, राजू मुडे ,प्रशांत मेश्राम,सुशील घोडे, पंकज भट्ट, वैभव भुते, मनिष मुडे आदी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

देवरी चेक पोस्टवर ४० किलो गांजा जप्त; आरोपीस अटक

0

 

देवरी,दि.10:-राष्ट्रीय महामार्गावरील सीमा शुल्क तपासणी नाका शिरपूर/बांध येथे देवरी पोलिसांनी आज दुपारी ४ वाजता सुमारास रायपूर कडून नागपूर कडे जात असलेल्या सहा चाकी वाहनाची झळती घेतले असता त्या वाहनात ४७ किलो गांजा आढळून आल्याने तालुक्यातील ही मोठी कारवाई देवरी पोलिस स्टेशनच्या ठानेदारांनी केल्याची चर्चा सुरू असून अवैध धंधे करणा-यांचे या कारवाईमुळे मुस्के आवरणार असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर असे की, देवरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यानां सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारावर देवरीचे थानेदार व सहकारी शिरपूरबांध येथील सीमाशुल्क तपासणी नाक्याकडे रवाना झाले. पोलिसांनी वाहन तपासणीला सुरवात करताच सहाचाकी वाहन क्रमांक MH 04 KU 4068 या वाहनात ४७ किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत बाजारात अंदाचे ४ लाख ७० हजार रुपये सांगण्यात येत आहे. सदर आरोपीला देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास ठानेदार सिंगनजुडे करीत आहेत.

देवरी पोलिसांनी जप्त केलेला ४७ किलो गांजा किंमत ४ लाख ७० हजार रुपये, वाहन किंमत १५ लाख रुपये असा एकूण १९ लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मातोश्री महिला महाविद्यालय येथे सामूहिक राष्ट्रगीताने स्वराज्य महोत्सवाची सुरूवात

0

 

मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट व विद्या विकास उच्च प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट चे संयुक्त आयोजन,,

हिंगणघाट मलक नईम

मातोश्री कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक राष्ट्रगीताने स्वराज्य महोत्सवाची दिमाखात सुरूवात करण्यात आली प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे यांची उपस्थिती होती
क्रांती दिनाच्या पर्वावर स्वातंत्र्य योध्यांना मानवंदना देवून शासन आदेशानूसार सकाळी ठीक ११ वाजता राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला, प्रसंगी अतिथी नितेश रोडे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी आजच्या काळात बदलत्या परिस्थितीत स्वातंत्र्याचा अर्थ बदलतो आहे त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने वागून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणाऱ्या सर्वांच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वातंत्र्याचा स्वैराचार न होऊ देता आचरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली
संचालन प्रा अभय दांडेकर तर प्रास्तावीक प्रा सपना जयस्वाल तर आभार प्रा अजय बिरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय चे सर्व शिक्षक शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले

नवनियुक्त मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांची हिंगणघाट काँग्रेस तर्फे सदिच्छा भेट..

0

 

हिंगणघाट नगरपालिका येथे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांची सदिच्छा भेट हिंगणघाट काँग्रेस पार्टी तर्फे घेण्यात आली यात शहरातील खूप विषयावर सविस्तरपणे चर्चा सुद्धा झाली त्यामध्ये वना नदीच्या पुरामुळे झालेल्या घाणीची साफसफाई असो किंवा पावसामुळे शहरात जिकडे तिकडे गवत, झाडे झुडपी खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा खूप प्रमाणात झाडे गवत वाढले त्यावर ही उपाय करण्यात यावा शहरांमध्ये सगळीकडे रोगराई प्रतिबंधक फवारणी व साफसफाई करण्यात यावी शहरांमध्ये चौका चौकात मुके जनावराचा जमावळा असो अशा प्रकारच्या विविध समस्यावर तोडगा काढण्यासाठी माजी राज्यमंत्री अशोक भाऊ शिंदे व हिंगणघाट काँग्रेस कमिटी, अध्यक्ष, पंढरी भाऊ कापसे व त्यांचे सहकारी गुणवंत कारवटकर, सुरेश गायकवाड, पुरुषोत्तम मून, अखिल धाबरडे, मिराज भाई, ज्वलंत मून व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

क्रांती दिना निमित्त शैक्षणिक साहित्य राष्ट्रध्वजा चे वितरण.

0

 

हिंगणघाट -;; मलक नईम।

नारायण सेवा मित्र परिवार चे वतीने आजादी के अमृत महोत्सव , क्रांति दिना निमित्त “हर घर तिरंग”घर घर तिरंगा कार्यक्रम आगरकर विद्या भवन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी हिंगणघाट चे नवनियुक्त मुख्याधिकारी हर्षल गायकवाड,न.प. हिंगणघाट, प्रशासकिय अधिकारी निलेश शिंदे न.प.हिं., शिक्षण विभागधिकारी प्रविन काले, प्रा. डाँ. उषा साजापुरकर, श्रीमती अर्चना जोगलेकर, महेश दिक्षित, महेश अग्रवाल यांनी प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज,नोटबुक, पेन, चाकलेट के पाकिट ईत्यादि सामग्री प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय अमृत महोत्सव कार्यक्रम ची विस्तृत माहिती याप्रसंगी देण्यात आली. कार्यक्रम चे आयोजना करिता नारायण सेवा परिवार चे दुर्गाप्रसाद यादव , नेताजी लाजुरकर, मिलीन्द दिक्षित, अशोक शेंडे, विपीन खिवसरा,पराग मुडे, रुपचंद हेमनानी , राजेश कासवा, सुभाष शेंडे , मनोज सिंघवी, महेशजी अग्रवाल , कचंन खिवसरा, विरश्री मुडे, मंगला शेंडे, अरुणा हेमके, शुभांगी वैद्य, किरण अग्रवाल , दिपाली दिक्षित, मंगला शेंडे आदींनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविकासह संचालन दिपाली दीक्षित यांनी केले. उपस्थितांचे आभार पराग मुदे यांनी मानले.

आदिवासी ग्राम चारबनमध्ये अधिकाऱ्यांनी धरला फेर! तिरंगा यात्रेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरुवात

0

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम चारबन येथे ग्राम सभा घेऊन व गावात हर घर तिरंगा याची प्रचार यात्रा काढून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.यावेळी विद्यार्थी व गावकऱ्यांसमवेत अधिकारी वर्गाने आदिवासींच्या ढोलावर नृत्य करीत आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आदिवासींची परंपरागत वेशभूषा परिधान केली होती.या आनंदोत्सव प्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर,तसीलदार शीतल सोलाट, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, गटशिक्षणाधिकारी‌ एन.जे फाळके, पंचायत विस्तार अधिकारी संदीप मोरे , ग्रामसेवक अनिल अंबडकर यांच्यासह सन्मान परिवारचे प्रा.श्याम फाफट, केंद्रप्रमुख केशरसिंग राऊत,अध्यापक दीपक उमाळे, गोवर्धन दांडगे, ममता गावित, उदयसिंग पटेल उपस्थित होते.
भारत माता की जय व हर घर तिरंगा या घोषणांनी परिसर दणाणून गेला.प्रचार यात्रेची सांगता जिल्हा परिषद शाळा चारबन येथे झाली.
यावेळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचा विद्यार्थी , गावकरी व मान्यवरांनी आनंद घेतला.सूत्रसंचालन दिपक उमाळे यांनी तर ग्रामसेवक अनिल अंबडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

उपजिल्हा रुग्णालयात होत असलेला भोंगळ कारभार थांबवा…

0

 

हिंगणघाट मलक नईम

बचाव समितीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले… स्थानिक.. हिंगणघाट बचाव समिती तर्फे उपजिल्हा रुग्णालयचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढत असून येथील ग्रामीण व शहरातील मोठ्या प्रमाणात उपचारासाठी रुग्ण येत असून. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे कोणतेही डॉक्टर उपलब्ध राहत नसून रुग्णांना तासनतास डॉक्टरांची वाट पहावी लागत असते. उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी औषधी ची कमतरता व रुग्णालयामधील डॉक्टर लोकांची खाजगी दवाखाने चालवीत असल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंगणघाट बचाव समितीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनूले यांना निवेदन देऊन शासकीय यंत्रणा सोबत घेऊन सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करावे. अन्यथा उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला .. यावेळी हिंगणघाट बचाव समितीचे सुनील डोंगरे, अनिल मून, दिनेश वर्मा, रुपेश लाजूरकर, मनोज रुपारेल, गजु कुबडे, धनराज कुंभारे, अनिल भोंगाडे, मनोज वासेकर, श्याम इडपवार ,अमन काळे, संजय खत्री, मुजीब शेख, नारायण राखुंडे,दर्शन बाळापुरे,राजु रूपारेल,चंद्रकांत नंनदकर,साकीब शेख,दिपक माडे,राकेश झाडे,तुषार हवाईकर,महेश अग्रवाल व इतर सदस्य उपस्थित होते

समाजाच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र समाजाचे काम करणार……

0

 

प्रकाश भैय्या सोनसळे
(अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य)

बीड येथे शासकीय विश्रामगृह याठिकाणी धनगर समाज महाराष्ट्र राज्य व बीड जिल्हा यांच्या वतीने मा.प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक घेण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्ष रवींद्रजी गाडेकर (माजी सरपंच घुमरा पारगाव) प्रमुख पाहुणे सुदर्शन दादा भोंडवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उबाळे काका ,नारायण भोंडवे सरपंच डोंमरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या अडीअडचणीसाठी धावून जाण्यासाठी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवकांनी व समाज बांधवांनी मला सहकार्य करावे मला साथ द्यावी समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजाच्या हितासाठी अन्यायाच्या विरूद्ध लढण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे असे बोलताना सांगितले.
यामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला व समाजातील युवकांकडे काही जबाबदारी देण्यात आल्या.
यावेळी भारत गाडे,शितलताई मतकर जिल्हाध्यक्ष,अरुण काकडे ,अविनाश भरणे, बाजीराव शिंदे,दत्ता गाडेकर, संदिप गाडेकर, नवनाथ डफळ, ईश्वर भोंडवे,दादा जायभाये, नितीन निर्मळ, ओंकार काळे, गुरव सर,नितेश गांगुर्डे, अक्षय खोटे,यश भोसले, प्रशांत काकडे,करण भोंडवे, तांबे भैय्या ,आदी समाज बांधव उपस्थित होते.