Home Blog Page 297

प्रेम उठाव हे कवी संमेलन एक अनोखे असे वेगळे कवी संमेलन म्हणून यादगारच राहणार आहे – नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन

0

 

(मुंबई/ ठाणे प्रतिनिधी )

दुःख पाहून. दुःख सोसून कलावंत अस्वस्थ होत असतो. कलावंत हा दुःखाच्या वेदना सोसून निर्माण होतो. वेदनेच्या कळा सहन करून कलावंत आपली कला – साहित्य निर्माण करतो. कविता लिहणे सोपे काम नाही. दुःखाचा समुद्र डोळ्यात दाटल्यावर टपटपतात टपोरे थेंब कविता होऊन कागदावर ! कविता अशी निर्माण होते. प्रेम उठाव कविसंमेलनाचा विषय प्रेमावरील कविता हाच आहे. मुळात प्रेम म्हणजे तिच्या आणि त्याच्या प्रेमाच्या कविता नसून प्रेमाचे विविध पदर आहेत. त्यात दुःख , अबोला ,विरह मिलन इ. येते. त्यात तो आणि ती यांचे प्रेम , कौटुंबिक प्रेम, समाजाप्रती प्रेम, देशाप्रती प्रेम, महामानवा विषयी प्रेम असे प्रेम विविध प्रकारचे आहे. त्याला विविध पदर आहेत. हृदय आणि जग प्रेमानेच जिंकता येते. त्यामुळे प्रेम उठाव हे कवी संमेलन एक अनोखे असे वेगळे कवी संमेलन म्हणून यादगारच राहणार आहे. या कविसंमेलनात सर्व कवींनी प्रेमा वरील कवितेच्या सादरीकरणाने प्रेमाचा पाऊस पाडला आहे. असे प्रतिपादन साहित्यिक नवनाथ रणखांबे लिखित प्रेम उठाव पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई आयोजित केलेल्या प्रेम उठाव कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून यावेळी बोलताना साहित्यिक नवनाथ रणखांबे यांनी प्रतिपादन केले.

कवी संमेलनासाठी यावेळी प्रमुख पाहुणे मान्यवर म्हणून शाहीर मास्टर राजरत्न राजगुरु, गजलकर कवी विजयकुमार भोईर , कवी कांतीलाल भडांगे, उपस्थित होते. कवयित्री मनीषा मेश्राम याही विचारपीठावर उपस्थित होत्या. हे कवी कविसंमेलन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या कवीं आणि कवयित्री यांनी कवी संमेलनात सहभाग घेतला होता. सर्वाना कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई यांच्याकडून सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
कवी नवनाथ रणखांबे, कवी विजयकुमार भोईर, मास्टर राजरत्न राजगुरु, कांतीलाल भडांगे, मनिषा मेश्राम, अनिल शिंदे, जगदेव भटू, अँड प्रज्ञेश सोनावणे, मिलिंद जाधव , शाम बैसाने, अमर नवघरे, विनोद गायकवाड, नरेश जाधव, संघरत्न घनघाव, अक्षय भोईर, प्रकाश दत्तू म्होळे, दीपक आंबटकर, शरद डोहके, रोहित जाधव, विनोद गायकवाड, प्रणिता खांबे, संतोष शीरवाल, शैलेश निवाते, विनोद घाणेकर, प्रकाश मोहले, प्रवीण खोलंबे, दीपक आंबटकर, शरद टोहके, संदीप कांबळे, मारुती कांबळे , सुरेखा गायकवाड, कामिनी धनगर,नरेश अहिरे आदी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या पन्नास कवी – कवयित्री यांनी सहभाग घेतला . रसिकांनी प्रेमावरील कवितांचा आनंद घेतला .
यावेळी कवी कट्टा ग्रुप कल्याण मुंबई तर्फे जीवन गौरव पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, साहित्य सेवा पुरस्कार आणि उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2021 -2022 विविध 32 मान्यवरांना देण्यात आला. सूत्रसंचालन कवी मिलिंद जाधव यांनी केले तर कवी संमेलनाचे सुत्रसंचालन कवी संघरत्न घनघाव, सुरेखा गायकवाड यांनी केले तर आभार अनिल शिंदे यांनी मानले .

लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ

0

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजपथ इन्फ्राकॉनचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”चा प्रयत्न.

110 तास, “नॉन स्टॉप” चालणार बिटुमिनस काँक्रिट रस्ता बांधकाम कार्य.

अमरावती/अकोला

अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लोणी ते मूर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील, चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बिटुमिनस काँक्रिटीकरणासह सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीच्या कामाला आज सकाळी प्रारंभ झाला. महामार्गावरील लोणी येथे ६ वाजतापासून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल आणि राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी यंत्र सामग्रीची पूजा केली. दरम्यान, गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्सचे समन्वयक मिलिंद वेर्लेकर यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर, सकाळी ७.२७ वाजतापासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ११८० रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचे काम करण्यात आले.

पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील, सुप्रसिद्ध आणि दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी सर्वत्र ओळखली जाते.राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्हयातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या सर्वात लांब रस्त्याची अखंड निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होईल.

राजपथ इन्फ्राकॉनचा हा प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होत आहे. तसेच NHAI (नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत सुरू आहे. त्यासाठी एकूण ७२८ मनुष्यबळ तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. या कामाची नोंद घेण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची संपूर्ण टीम दाखल झाली आहे.

राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सांगितले की, मागील वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय महामार्ग कामाची संधी मिळाली. जवळपास ९- १० वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास होत होता. या रस्त्याचे काम करताना, काहीतरी वेगळी कामगीरी करून दाखविण्यासाठी आम्ही संकल्प केला.यंदा देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहेत. यानिमित्त सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. म्हणून या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, अशी कामगिरी करता येईल का, याची चाचपणी केली. मागील चार महिन्यांपासून, गिनीज बुकसोबत संपर्क साधून उपक्रमाची माहिती दिली. यापूर्वी अशा प्रकारचा रेकॉर्ड कतार देशामध्ये दोहा येथे करण्यात आलेला आहे. हा विक्रम मोडून देशाला 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त, दोन लेनमध्ये,न थांबता, महामार्ग बांधकामाची अनोखी भेट देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार कंपनीने सूक्ष्म नियोजन केले. आज त्यास प्रारंभ झाला . 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सलग 110 तास काम करून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाईल, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला. हा विक्रम राष्ट्राला समर्पित केला जाईल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल यावेळी म्हणाले, अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. येत्या डिसेंबर 2022 पर्यंत 95 टक्के बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कंपनीकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. दोन लेनची रुंदी 9 मीटर राहणार असून, दोन्ही लेन मिळून विश्वविक्रमी रस्ता बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.

आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट
याप्रसंगी काम सुरू होताच धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी लोणी येथील महामार्गावर भेट देऊन विश्वविक्रमी कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी सदर महामार्ग कामाबद्दल आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.

साकळी शेतशिवारात हतनुर पाटचारी जवळ शेतकऱ्यांना वाघ सदृश्य जंगली प्राण्याचे दर्शन !

0

 

शेतकऱ्यांनी सतर्क राहावे
वनविभागाने लक्ष द्यावे

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातीत साकळी क्षेत्रातील हतनूर पाटाजवळील शेतशिवार भागात वाघ सदृश्य पट्टेदार जंगली प्राण्याचे दर्शन झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे.अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, साकळी-मनवेल रस्त्यालगतच्या साकळी शेतशिवारातील हतनुर पाटाजवळील भागात दि.२ जून रोजी सकाळी साडेसहा ते सात वाजे दरम्यान गावातील शेतकरी शेतात जात असतांना शरीराने धडधाकट असलेला पट्टेदार असा वाघ सदृश्य जंगली प्राणी अगदी रुबाबात फिरतांना दिसून आला.या शेतकऱ्याने अंदाजे पंचवीस ते तीस फुटावरून वाघ सदृष्य जंगली प्राणी बघितला तेव्हा तो शेतकरी खूप घाबरला.तो जंगली प्राणी जोपर्यंत दिसेनासा होत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याने काहीएक हालचाल न करता स्तब्ध उभे राहिले व त्यानंतर आपल्या घरचा रस्ता धरला. वाघ सदृश्य प्राण्यांचे दर्शन झाल्याची चर्चा गावात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन.या भागातून मनवेल – थोरगव्हाण कडे जाणारा मुख्य रहदारीचा व शेतकऱ्यांच्या वापरायचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दिवसभर ये जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते तसेच रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. दरम्यान वाघ सदृश्य प्राणी दिसल्याची चर्चा होतास प्रवासी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तरी या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने लक्ष देऊन सदर जंगली प्राण्याचा त्वरीत बंदोबस्त करावा तसेच शेतकरी वर्गाला सतर्क करण्यासाठी आपल्या पातळीवरून योग्य त्या सूचना कराव्यात. अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

आगामी जिल्हा परिषद. निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी कार्यक्रर्त्यांनी कामाला लागावे : माजी मंत्री मा.आ. गिरीष महाजन व खासदार श्रीमती रक्षाताईं खड़से यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची विस्तृत आढावा बैठक संपन्न…

0

 

 

यावल, ( प्रतीनिधी )विकी वानखेडे

आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, व पालिका निवडणुकीसाठी भाजपला पोषक वातावरण असून, केंद्र शासनाची विकासकामे व सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कामास लागावे असे आवाहन माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदार भाजपसाठी अनुकूल असून यावेळी आपल्या ५० पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा माजी मंत्री गिरीष महाजन यांनी येथे व्यक्त केला

येथील व्यास मंदिर परिसरात जळगांव जिल्ह्यातील आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात भाजपचा मेळावा घेण्यात आला. माजी मंत्री आमदार गिरीष महाजन व खासदार रक्षाताईं खड़से, यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी यावल तालुका व शहराची “विस्तृत आढावा बैठक” संपन्न झाली. सदर बैठकीत पक्ष संघटन, बुथ रचना व आगामी येणाऱ्या निवडणूका तसेच अनेक विवीध विषयांवर माजी मंत्री गिरीष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, व खासदार रक्षाताईं खड़से, आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांद्वारे उपस्थित भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार राजू मामा भोळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच तालुक्यात झालेल्या विकासोच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सभासदांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष सुरेश (राजूमामा) भोळे, खासदार रक्षाताई खडसे, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,प्रल्हाद महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन, जि.प. चे माजी सभापती रविंद्र पाटील, ओबिसी सेल प्रदेश सचिव भरत महाजन, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, ओबिसी सेल तालुकाध्यक्ष हेमराज फेगडे, यावल तालुकाध्यक्ष उमेश फ़ेगडे, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर,पं.स. च्या माजी सभापती पल्लवी चौधरी, पुरुजित चौधरी, माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे,
तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंह राजपुत, बाजार समिती उपाध्यक्ष उमेश पाटील, भाजयुमो जिल्हा सदस्य राकेश फ़ेगडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष सागर कोळी, नरेंद्र नारखेडे, सौ.कांचन फालक, डॉ.नरेंद्र कोल्हे, माजी जि.प.सदस्य सविता भालेराव, शहराध्यक्ष निलेश गडे, बबलू घारु, महिला आघाडी तालुकाध्यक्ष विद्या पाटील, वंदना पाटील, माजी प.स.सदस्य दीपक पाटील, फैज़पूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, प.स.सदस्य लक्ष्मी मोरे,विजय मोरे, प्रल्हाद केदारे, संदीप सावळे, रावेर तालुका उपाध्यक्ष वासू नरवाडे, रावेर तालुका सरचिटणीस महेश चौधरी,शुभम पाटील यांच्यासह भाजपा सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, भाजपा लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चुंचाळेसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा ! केळी पिकाचे नुकसान

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

दि.31 रोजी सायंकाळी झालेल्या वादळाचा व अवकाळी पावसाचा तडाखा चुंचाळे सह परिसराला बसलेला आहे. वादळादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सकल भागात पाणी वाहून निघाले. तर या वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली त्याच प्रमाणे कापणीवर आलेल्या आशाबाई नेमिदास वाणी,संजुसिंग राजपुत,संजय नेवे, यांच्या शेतात केळी पिकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.अनेक ठिकाणी तरी उभी केळी आडवी पडलेली आहे .
याबाबत सविस्तर असे की दि 31 रोजी चुंचाळे सह परिसरातील गावांमध्ये सायंकाळी 6 वाजेपासूनवादळाचा सुरुवात झाली तर जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळ सुरु होते यादरम्यान खूप जोराने सोसाट्याचा वारा सुरू होता. वाऱ्याने गावातील व परिसरातील झाडे अक्षरश: हेलकावे खात होती. वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळा दरम्यान सुदैवाने कोणासही काही इजा झाली नाही.या वादळामुळे परिसरातील शेतामधील केळी पिकांचेही नुकसान खुप मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. बऱ्याच ठिकाणी कापणी वर आलेली केळी चे झाडे अक्षरशा खाली जमिनीवर ऊन ऊन पडलेली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडक उन्हापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी पिकास कसेबसे वाचवले मात्र कालच्या वादळामुळे ही केळी जमीनदोस्त झालेली आहे. दरम्यान चुंचाळे सह परिसरात जवळपास अर्धा तो पाऊण तास मुसळधार पडलेल्या पावसाने रस्त्यावरून अक्षरशः पाणी वाहून निघाले तर मुख्य चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला असल्याचे जाणवत आहे मात्र अचानक झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते.

यावल येथे नायब तहसीलदार आर के पवार यांचा कौटुंबीक व भावनिक सेवापुर्ती निरोप सोहळा उत्साहात पार पडला

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवुन प्रशासकीय कामाची व कुटुंबाची यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळणारे महसुल प्रशासनातील सर्वाकृष्ठ एक उमदा असे अधिकारी म्हणुन ३८ वर्ष सेवा देणारे निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांचा सेवापुर्तीचा निरोप सोहळा अंत्यत भावनिक व कौटुंबीक अशा वातावरणात संपन्न झाला . यावल तहसील कार्यालयाच्या नाविन प्रशासकीय कार्यालयात पार पडलेल्या या सेवापुर्तीपर निरोप सोहळ्यात आर के पवार यांचा सपत्नीक प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन तहसीलदार महेश पवार , नायब तहसीलदार आर.डी .पाटील, संगोयो विभागाच्या नायब तहसीलदार सौ . भारती भुसावरे , समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष शेखर पाटील , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , शिवसेने शहरप्रमुख जगदीश कवडीवाले व सागर देवांग , यावलचे प्रथम माजी लोकलियुक्त नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे , भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी , उज्जैन सिंह राजपूत ,नवनिर्माण सेनेचे रावेर यावल क्षेत्र चे जिल्हा संघटक चेतन अढळकर, गौरव कोळी व अजय तायडे, कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , भगतसिंग पाटील, प्रहार जनशक्तीचे अलीम शेख व मुश्ताक खान यांच्यासह महसुल विभागाचे सर्व कर्मचारी व तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासह आर के पवार यांच्यावर प्रेम करणारा सर्व जातीधर्मातील मित्र परिवार या कार्यक्रमास मोठया संख्येत आवार्जृन उपस्थित होते . याप्रसंगी सेवापुर्ति केलेले निवासी नायब तहसीदार आर के पवार यांनी आपल्या सत्काराला उतर देतांना आपल्या कुटुंबाच्या संघर्षमय जिवनातील आठवणींना उजाळा देत प्रशासकीय सेवेचे कार्य अनुभव आपले मनोगत व्यक्त करतांना अंत्यत भावुक झाले , आपले कुटुंब हे शैक्षणीक व आर्थिक दृष्टया प्रगत करण्यासाठी काकांनी कुंटुब प्रमुख म्हणुन कर्तव्याची जाणं ठेवत पुतण्यांसाठी केलेले कार्य मोठया भावांने लहान भावांसाठी आणी वडीलांनी आपल्या कुंटुबातील मुलांसाठी केलेल्या परिश्रमाची व जबाबदारीच्या आठवणीवर बोलतांना संपुर्ण वातावरण भावनिक झाले व आर के पवार यांच्यासह या कौटुंबीक सेवापुर्तीच्या सोहळयास उपस्थित मान्यवरांचे ही डोळे अश्रुंनी पाणावले, या कार्यक्रमात प्रांत अधिकारी कैलास कडलग ,तहसीलदार महेश पवार ,किनगावचे मंडळ अधिकारी सचिन जगताप , डॉ .अक्षय पवार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाची प्रस्तावना तहसीलचे कुळकायदा अव्वल कारकून रविन्द्र माळी यांनी केली तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार तलाठी जर्नादन बंगाळे यांनी मानले .

यावलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांचा आज तहसील कार्यालयात सेवानिवृत्तीपर सोहळा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

आपल्या शासकीय सेवेच्या प्रति कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर सर्वसामान्यांच्या कार्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सेवा भावीवृत्तीने हसतमुखाने सदैव अग्रस्थानी राहणारे यावलच्या तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार हे आपल्या ३६ वर्षाच्या प्रर्दीघ शासकीय सेवेतुन आज दिनांक ३१ मे २०२२रोजी सेवानिवृत्त होत आहे . यावल तहसील कार्यालयात कार्यरत असलेले निवासी नायब तहसीलदार आर के पवार मुळ राहणारे आभोडे खु॥ तालुका रावेर यांचे प्राथमिक शिक्षण पाल आणी सरदार जी जी हायस्कुल रावेर व माध्यमिक शिक्षण जळगाव येथे नुतन मराठा कॉलेज व वसंतराव नाईक कॉलेज औरंगाबाद येथे झाले .दिनांक १ / १ / १९८६ वर्षात त्यांची तलाठी म्हणुन पाचोरा येथून सुरुवात झाली , त्या नंतर त्यांनी तलाठी म्हणुन १९८९ते १९९५पर्यंत खिरोदा तालुका रावेर , १९९५ते १९९७या वर्षात सावदा तालुका रावेर , १९९७ते २००१ निंबोल ता. रावेर , २००१ते २००२ मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी व २००३ते २००५पर्यंत सतत पाच वर्ष त्यांनी रावेर शहर तलाठी पदावर शासकीय सेवा बजावली याच कार्यकाळात त्यांना विजयकुमार गावीत जिल्ह्याचे हे पालकमंत्री असतांना त्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मान मिळाले , यानंतर ते २००८ते २०११या कालावधीत त्यांनी फैजपुर शहर तालुका यावल येथे तलाठी पदाचे कार्य सांभाळले , पुनश्च त्यांनी २०१२या वर्षात ऐनपुर तालुका रावेर येथे सेवा बजावली , २०१२याच वर्षात त्यांना मंडळ अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांनी २०१२ते १३या काळात नाडगाव तालुका मुक्ताईनगर येथे सेवा बजावली , २०१३ते १७या काळात त्यांनी खानापुर तालुका रावेर येथे सेवाकार्य केले . भुसावळ येथे २०१८ पर्यत पदोन्नतीवर त्यांनी तालुका करमणुककर अधिकारी म्हणुन सेवेत कार्य केले . यावल येथे श्री व्यास महाराज यांच्या तपोभुमीवर व मनुमातेच्या कशीत पदोन्नतीवर त्यांनी निवासी नायब तहसीलदार या पदावर दिनांक २०१९ते ३१ / ५ / २०२२पर्यंत त्यांनी चार वर्ष उत्कृष्ठ अशी प्रशासकीय सेवा बजावली असुन , शासकीय सेवापुर्ती नंतरचे आपले पुढील आयुष्य आपण आपल्या जन्मभुमीत असलेल्या आभोडे गावात शेती व कुटुंबा सोबत घालविणार असल्याचे त्यांनी सांगीतले .२०२०ते २१या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या अतिशय धोकादायक काळात नागरीकांची सेवा करणारे एक उत्कृष्ठ सेवाभावी अधिकारी म्हणुन आर के पवार यांनी लक्ष वेधणारे उल्लेखनिय कार्य करून नांवलौकीक मिळवले.

यावल तालुक्यात पाच वर्षाच्या तुलनेत प्रथमचं सर्वाधिक घरकूल,११६३ मंजुर तर ४१८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण

0

 

यावल तालुका( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल : तालुक्यात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत प्रथमचं सर्वाधिक घरकूलांना मंजुरी मिळाली आहे. यंदा ड यादीतील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण मध्ये १ हजार १६२ लाभार्थ्यांच्या घरकुलास मंजुरी देण्यात आली असुन त्यातील ४१८ लाभार्थ्यांना ६२ लाख ७० हजारांचा पहिला हप्ता वितरण झाला आहे तर उवर्रित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लाभ वितरणाची कार्यवाही सुरू आहे.या पुर्वी तालुक्यात सन २०१६- १७ मध्ये सर्वाधिक घरकुल लाभली होती.
यावल तालुक्यात यंदाच्या सन २०२१ – २०२२ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजने करीताचे उध्दीष्ट १ हजार ६३२ देण्यात आले होते. तेव्हा यातील १ हजार १६३ लाभार्थ्यांच्या घरकुलास मंजुरी देण्यात आली व त्यातील पहिल्या टप्प्यात ४१८ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार प्रमाणे पहिला हप्ता रक्कम एकुण ६२ लाख ७० हजार रूपये वितरण करण्यात आली आहे तर उवर्रित ७४५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाची कार्यवाही सुरू आहे. या करीता पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, घरकुल विभागाचे मिलींद कुरकूरे ऑनलाइनचे कामकाज पाहत आहे. तर यंदा पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक घरकुलांना मंजुरी मिळाली आहे या पुर्वी सन २०१६-१७ या वर्षी १ हजार ४८२ घरकुलांना मंजुरी मिळाली होती व त्यातील तब्बल १ हजार ३६२ घरकुल पुर्ण झाले होते. त्यानंतर मात्र, अल्प प्रमाणात घरकुल तालुक्यात लाभली होती तेव्हा यंदा चांगल्या प्रमाणात घरकुलांचा लाभ तालुक्यातील ग्रामिण भागात मिळाल्याने १ हजार १६३ गरजुंना हक्काचे घर मिळणार आहे.
असे झाले घरकुल.
सन २०१६ – १७ – १ हजार ४८२ घरकुलांना मंजुरी. १ हजार ३६२ घरे पुर्ण.
सन २०१७ – १८ – ५९१ घरकुलांना मंजुरी. ५६२ घरे पुर्ण.
सन २०१८ – १९ – ४८५ घरकुलांना मंजुरी. ४०८ घरे पुर्ण.
सन २०१९ – २० – ९५९ घरकुलांना मंजुरी. ६८१ घरे पुर्ण.
सन २०२० – २१ – ४३२ घरकुलांना मंजुरी. २२७ घरे पुर्ण.

राज्य सरकार कडील घरकुल.
गेल्या पाच वर्षात सन २०१६ पासुन ते आज पर्यंत राज्य सरकार कडून रमाई घरकुल योजनेत ८९७ घरकुलांना मंजुरी मिळाली होती व त्यातील ६५७ घरकुल पुर्ण झाली तर शबरी आवास योजनेत ५९२ घरकुलांना मंजुरी मिळाली व ५४९ घरकुल बांधली गेली तर यंदा रमाई योजनेत ३७५ व शबरी योजने ७४ घरकुल मंजुर आहे.
४ टप्प्यात निधी.
पहिला १५ हजार, दुसरा ४५ हजार, तीसरा ४० हजार व अंतिम २० हजार अस एकुण ४ टप्प्यात १ लाख २० हजार रूपये ग्रामिण करीता घरकुल करीता निधी मिळतो.

हिंगणघाट शहरातील शुक्रवार बाजार हा रस्त्यालगत मैदानात स्थलांतर करून वट्टे द्या- नगरसेवक सौरभ तिमांडे

0

 

नागरिकांना रहदारी करतांना होतो अतोनात त्रास.

भाजीविक्रेत्यान कडून नागरपरिषद द्वारे घेतले जाते कर परंतु सुविधा मात्र शुन्य.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मुख्याधिकारी कडे मागणी.

हिंगणघाट:- २६ मे २०२२
इंदिरागांधी वार्डतील प्रसिद्ध असा शुक्रवार बाजार रस्ता सोडून रस्त्या लगतच्या मैदानात स्थानांतरित करण्याबाबत नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून सविस्तर परिस्तीतीचा आढावा दिला तसेच निवेदन द्वारे मागणी करण्यात आली व त्यांच्या कडक सकारात्मक प्रतिसाद मिळाला.त्यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष युवराज माऊसकर,अक्षय भगत, हर्षल तपासे,ओम सावरकर,रेहान खान,आदर्श त्रिवेदी इत्यादी उपास्तीत होते.
गेल्या कित्येक वर्षापासून इंदिरागांधी वार्ड येथे शुक्रवार बाजार मोठ्या प्रमाणात भरत असते. येथे ताजी भाजी व फळ शेतकरी स्वतः आपल्या शेतातून येथे विक्री करिता घेऊन येतात त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरातील नागरिक येथे दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदीसाठी येतात तसेच येथे भाजीपाला,फळे, चिकन, मटण, मच्छी, कपडे, जोडे,चप्पल तसेच नासत्याच्या बंड्या असे दुकान सुध्दा मोठ्या प्रमाणात आपल्याला शुक्रवार बाजारामध्ये पाहायला मिळतात. काळा नुसार हा बाजार आणखी प्रसिद्ध होत चालला आणि येथे दुकानांची संख्या वाढत चालल्यामुळे येथील स्थानिक लोक ज्यांचा घरा समोरील रस्त्यावर हा बाजार भरत असतो त्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो कारण बाजारातील दुकानामुळे त्यांना स्वतःच्या घरामध्ये जायला
व घरून बाहेर निघायला अत्यंत त्रास होत असतो.
सुरुवातीला हा बाजार फक्त शुक्रवार बाजार रस्त्यावर भरत होता पण आता हा बाजार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०७ वर ही भरत असते तसेच राष्ट्रीय महामार्ग पासून सुरु होत डॉक्टर गुजर यांचा जुन्या क्लिनिकच्या रोड पासून संत कबीर वार्ड येथून सुरू होत असून इंदिरागांधी वार्ड पार करून हा बाजार काही दिवसांनी पाण्याची टाकी गोगाजी वार्ड पर्यंत पोहचत आहे.दिवसेन दिवस हा बाजार वाढत चालला आहे. ग्राहकांना त्यांचे वाहन पार्किंगसाठी सुध्दा खूप त्रास होतो ग्राहक आपले वाहन महामार्गावरील उड्डाणपूल तर पार्क करतात आणि रोड वर
बाजार भरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणत ट्रैफिक जाम होतो त्यासाठी दर शुक्रवारी पोलीस स्टेशन द्वारे दोन ट्राफिक पोलीसांची ड्युटी लावावी तसेच बाजार उठल्या नंतर खराब उरलेले चिकन,मटणाचे तुकडे तसेच गळलेला भाजीपाला व फळ यांची घाण रोड वर होते त्याचा देखील स्थानिक नागरिकांना खूप ज्यास्त प्रमाणात त्रास होत आहे छोट्या रोड वर हा बाजार भरत असून बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या बाजारात शहरातील महिला मोठ्या प्रमाणात येतात आणि याच संधीचा फायदा उचलत काही टवाळखोर मुले सुध्दा गर्दीत घुसून महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करतात आणि शहरातील पॅकेटमार देखील याच गर्दीचा फायदा उचलतात.
पट्टीच्या नावावर दुकानदारांकडून ४०-५० रुपये वसुलल्या जाते त्यानुसार त्यांची व्यवस्था काहीच नाही. शुक्रवार बाजाराला लागूनच खुल्या मैदानात आपण या बाजाराला स्थलांतर करून दुकानदारांना स्थायी वट्टे आपण त्यांना दिले तर बरोबर नियोजनानुसार फळ,भाजीपाला तसेच चिकन, मटण,मच्छी आणि कपडे, जोडे-चप्पल तसेच नासत्याची दुकान यांना सगळ्यांना वेगवेगळे विभाग आपण देऊ शकतो तसेच पार्किंगची सुध्दा व्यवस्था आपण याच मैदानात करू शकतो असे केल्यास नागरिकांना त्रास होणार नाही.या गंभीर समस्येचा लावकार्यत लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी नगरसेवक सौरभ तिमांडे यांना दिले.

राजकमल चौकातील सौंदर्यीकरण व विकास कामांना गती द्या

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक मो. 9921400542 अमरावती
दिनाक 27 मे अमरावती

आ. सौ .सुलभाताई खोडके यांची सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
मान्सूनपूर्व उपाययोजनांना घेऊन राजकमल चौक – ऑटोगल्ली परिसराची पाहणी

अमरावती २६ मे : शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात पावसाचे दिवसांमधे समस्या उद्भवत असल्याने स्थानिक नागरिक ,व्यापारी व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सदर बाब लक्षात घेता आ. सौ .सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने परिसरात रस्ते -नालीचे बांधकाम तसेच सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रगतीपथावर आहे. सदरची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक रित्या पूर्ण करून पावसाळ्यात चांगल्या सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी राजकमल चौक – रेल्वे पूल -अंबापेठ – ऑटोगल्ली परिसराची पाहणी केली . राजकमल चौक हा शहराच्या चार भागांना जोडल्या गेला असल्याने या चौकात नागरिकांची प्रचंड वर्दळ दिसून येते . मात्र पावसाचे दिवसात परिसरातील नाल्या चोक -अप होऊन सर्व पाणी चौकात येऊन साचत असल्याने नागरिकांना अवागमन करतांना अडचणी निर्माण होतात . याचा नाहक मनस्ताप वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना सुद्धा सहन करावा लागतो . या संदर्भात आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला . याची फलश्रुती म्हणून राजकमल चौक ते रेल्वे पुलापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथचे बांधकाम करणे तसेच सौंदर्यीकरणाचे कामाकरिता अर्थसंकल्पिय कामे शीर्षांतर्गत ६० लाख निधी मंजूर करून उपलब्ध करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सद्यास्थितीत करण्यात येत असलेले सदरचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा व हृद्यस्थळ म्हणून ओळखला जाणारा ब्रिटिश कालीन पुलाचे योग्य रित्या सौंदर्यीकरण करण्यात यावे , अशा सूचना आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी पाहणी दरम्यान दिल्या . तदनंतर अंबापेठ ते ऑटो गल्ली येथे प्रगतीत असलेल्या रस्ता व नालीचे बांधकामाची पाहणी करण्यात आली . मूलभूत सुविधांच्या विकास कामांच्या विशेष अनुदानातील ४६ लक्ष निधीतुन रस्ता व अंदाजे २६.७५ लक्ष निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर कामाची सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने पाहणी करण्यात आली . सदर काम दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक करण्यासह चांगल्या सुविधा निर्माण करण्याला घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व अमरावती महानगर पालिका यांच्या वतीने संयुक्तरित्या कार्यवाही करून तत्काळ पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे ,अशा सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे यांना देण्यात आल्या . या सोबतच परिसरातील ऑटोगल्ली येथे रस्त्याचे बांधकाम सुरु करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्यात आले. या सोबतच सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रगतीत असलेली कामे सुद्धा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित करावे , जेणेकरून करून परिसरात पाण्याचे डबके साचणार नाही ,नाली चोकअप होणार नाही , याबाबत आधीच उपाययोजना करण्याचे व त्याबाबत चे नियोजनासंदर्भात आपल्याला वेळोवेळी अवगत करण्यात यावे ,अशा सूचना सुद्धा आमदार महोदयांनी संबंधितांना दिल्या . दरम्यान स्थानिक नागरिक ,व्यापारी वर्गाशी सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी संवाद साधला . दरम्यान स्थानिकांनी आमदार महोदयां समक्ष काही समस्या कथन केल्या ,तसेच परिसरात विकास कामे व सौंदर्यीकरण्याची पूर्तता होत असल्याने आमदार महोदयांचे आभार मानीत अभिनंदन केले .
यावेळी वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ,प्रवक्ता ,तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके ,सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे ,शाखा अभियंता सुनील जाधव , माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी नगरसेवक-अविनाश मार्डीकर, निलेश शर्मा, प्रमोद महल्ले, योगेश सवई, दिलीप कडू, जितेंद्रसिंह ठाकूर, यश खोडके , बंडू निंभोरकर, किशोर भुयार, मनोज केवले, महेश साहू ,अमोल देशमुख, प्रा. डॉ. अजय बोंडे, भूषण बनसोड, कर्नलसिंग राहल, श्रीकांत झंवर, आनंद मिश्रा, प्रमोद सांगोले, सुयोग तायडे, सचिन दळवी,छोटू खंडारे, चेतन वाठोडकर, अनिल शुक्ला, शक्ती तिडके, संजय मळणकर, सचिन रहाटे, महेश साहू, भोजराज काळे, प्रशांत महल्ले, सनाउल्ला खान ठेकेदार, हबीब खान ठेकेदार, सय्यद साबीर, अबरार मोहम्मद साबिर, समिउल्लाह पठाण, नईम भाई चुडीवाले, दिलबर शाह, हाजी रफिकभाई, सादिक रजा, सनाउलला सर, फारूक भाई मंडपवाले, बंडू धोटे, शुभम पारोदे, महेंद्र किल्लेकर अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर