Home Blog Page 299

वेकोली सब – एरिया कार्यलयात संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा एक तास ठिय्या

0

 

शास्त्री नगर, शिव नगर पाणी व रस्ता समस्या तात्ळीने सोडवा :राजू रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : वेकोलीच्या सब एरिया कार्यालयात आज 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री नगर,शिव नगर येथील पिण्याचे पाणी व खराब रस्त्यांच्या समस्येला घेवून संतप्त नागरिकांनी सब एरिया मॅनेजर फूल्लारे यांच्या कार्यालयात तब्बल एक तास ठीय्या आंदोलन केल्याने वेकोली परिसरात फार गोंधळ उडाला.

शेवटी सब एरिया मॅनेजर यांनी पाणी समस्या व रस्ता दुरुस्तीचे कामे आठ दिवसात करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यंसह नागरिकांनी कार्यालय सोडले.

वेंकोली वसाहतीतील शास्त्री नगर तसेच वेकोलिने पुनर्वसित शिवनगर वस्तीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याचा पाण्या करिता वॉटर टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.
चार दिवसा नंतर एकदा पिण्याचा पाणी मिळतो, रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे

सदर समस्या निवारणासाठी काँग्रेस तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस नेत्या सौ. पुष्पा कणकम, अविनाश गोगुर्ल,रोशन दंतलवार, रोहित डाकुर,सुकुमार गुंडेटी,देव भंडारी, नूरुल सिद्दीकी,इर्शाद कुरेशी, कपिल गोगला, बालकीशन कुळसंगे, सुनील पाटील,अंकुश सपाटे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गुरुवारी रात्री सावखेडासिम रस्त्यावर अवैद्य गौण खनिज वाहतुक करणारे ट्रक्टर महसुल पथकाने पकडले

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

यावल : तालुक्यातील सावखेडासिम रस्त्यावर अवैद्य गौण खनिज वाहतुक करणारे ट्रक्टर महसुल पथकाने पकडले ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली असुन या कारवाई मुळे अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
येथील तहसिलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसुलच्या गस्ती पथकाने गुरूवारी रात्री नायगाव ते सावखेडासिम रस्त्यावर गस्ती दरम्यान एक विना क्रमांकाचे अवैद्य रित्या वाळु वाहतुक करणारे ट्रक्टर पकडले सदर ट्रक्टर हे वासुदेव संपत तायडे रा. कोळन्हावी यांच्या मालकीचे असुन विना परवानगी त्यातुन वाळु वाहतुक केली जात होती ही कारवाई मंडळाधिकारी सचिन जगताप, मिलींद देवरे, तलाठी टेंभरसिंग बारेला, वसीम तडवी या पथकाने केली असुन ट्रक्टर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे तर मालकास दंडा संर्दभातील नोटीस बजावण्यात आली आहे या कारवाई मुळे रात्री चोरट्या मार्गाने अवैद्य वाळु वाहतुक करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

महावितरणाच्या भोंगळ कारभारा विरोधात काँग्रेसचा आक्रोश

0

 

विजेचा लपंडाव बंद न झाल्यास कार्यालयाला कुलूप मारू : राजूरेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : राज्यात सर्वात जास्त प्रदूषित व उष्ण तापमान असलेल्या शहरात सध्या नागरिक विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेले आहे.
नागरिकांना होत असलेला जीवघेणा त्रास लक्षात घेता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी पदाधिकाऱ्यांन सह महावितरण कार्यालयावर धडक दिली व उपस्थित अधिकारी यांची चांगलीच कान उघाडणी केली येत्या आठ दिवसात शहरातील वीज समस्या निकाली काढण्यात आल्या नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकू असा सज्जड दम रेड्डी यांनी दिला.

काँग्रेस अध्यक्षाचा रौद्ररूप बघून महावितरण अधिकारी डी. वाय.अनिल पेंदोर यांनी शक्य तितक्या लवकर विज समस्या निकाली काढण्यात येईल.
व नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल विजेचा लपंडाव शक्य तितक्या लवकर नियंत्रित करण्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेस नेत्यांनी कार्यालयातून माघार घेतली.
सदर कार्यालयात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

शहरात सध्या उन्हाचा पारा 45 ते 47 डिग्री इतका वाढला असून या भीषण गर्मीत एसी कूलर शिवाय जगणे कठीण जाहे

दिवसभरात अनेक वेळा विज येत जात असल्याने व्यापाऱ्यांचे कामे रखडतात व रात्री तर हमखास अनेक वेळा विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिकांची झोप होत नसल्याने नागरिकांना चीड – चीड डोकं दुःखी सारखे अनेक आजार होत आहे.

महावितरण विज बिला साठी नागरिकांना त्रास देत असते
मात्र विज पुरवठया कडे लक्ष दिल्या जात नाही.

यामुळे संतप्त काँग्रेस पदाधिकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी,रोहित डाकुर, मोसिंम शेख,नुरूल सिद्दीकी,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी, देव भंडारी,साहिल सैय्यद,रफिक शेख,कपिल गोगला, बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील, अंकुश सपाटे, रंजीत राखुंडे ,आरिफ शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

समुद्रपूर येथे तहसील कार्यालय समोर महा ई सेवा केंद्राकडून ग्राहकांची लूट

0

 

समुद्रपूर :- तहसील येथे भुमी अभिलेख कार्यालयात शेतीचा रीनंबररिंग पर्ची काढण्याकरता दर्शन मुंजेवार गेले असता भुमिअभिलेख कार्यालयातून महा-ई-सेवा केंद्र प्रो. संदीप दरेकर यांच्याकडे चालान साठी पाठविले त्यांना चालान भरायचे आहे सांगितले त्यांनी माझ्याकडून चालान
भरण्याचे 200 रुपये मागितले मी फोन पे द्वारे पैसे दिले चालान रसीद वर 40 रुपये होते. 200 रुपये कसे घेतले ? आम्ही प्रत्येकाकडून इतकेच रुपये घेतो असे सांगितले. तुम्ही चाळीस रुपये चालान चे भरले मग दोनशे रुपये कसे घेतले यावरून वाद झाला तहसीलदार कडे सांगतो असे सांगितले असता ? जा सांग काही होत नाही असे उत्तर दिले ? तहसीलदार राजू गणवीर यांच्याकडे गेलो व त्यांना घडलेली हकीकत सांगितले त्यांनी नायब तहसीलदार सयाम साहेब यांना सोबत पाठवले . या ठिकाणी महा ई सेवा केंद्र या ठिकाणी जागेवर पंचनामा करताना
1)महा ई सेवा केंद्रा कडून कोणती सुविधा पुरवण्यात येते
,कोणत्या कामाचे किती रुपये घेण्यात येते याचा फलक नाही
या ठिकाणी महा इ सेवा केंद्र सेंटर दुसरी कडले व ठिकाण वेगळे, लायसन दुसऱ्याचे महा ई सेवा केंद्र चालवत आहे दुसरा . ग्राहकाकडून मनमर्जी नुसार पैसे घेतात , चार पट जास्त पैसे घेण्यात येत आहे . याप्रकरणात वरिष्ठांकडून महा ई सेवा केंद्र यांची चौकशी करुन कारवाई करायला पाहिजे . सध्या समुद्रपूर येथे महा-ई-सेवा केंद्र नाहीतर महालुट केंद्र सुरू आहे.
सुर्या मराठी न्यू साठी सचिन वाघे वर्धा

काँग्रेसच्या दणक्याने *काँग्रेसच्या दणक्याने घुग्घुस – म्हातारदेवी रस्त्याचे खड्डे भरण्यास सुरुवात

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गुस : शहरातील राजीव रतन चौकात आर.के. मथानी या कंपनी तर्फे उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आलेले आहे.

मात्र या कंपनीच्या बोगसपणे व ढिसाळ नियोजनामुळे राजीव रतन चौक हा अपघाताचा हॉट स्पॉट ठरला आहे.
कंपनी तर्फे पर्यायी रस्ता,रुग्णवाहिका,वॉटर टँकर, स्वच्छता कर्मी, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसेच वेस्ट सिमेंट काँक्रिट मटेरियल घुग्गुस – म्हातारदेवी रस्त्यावर टाकण्यात यावे या करिता घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कार्यालयावर कार्यकर्त्या सह धडकले होते.

एका आठवड्यात जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर कंपनीचे काम बंद पाडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्षाने केले होता.

त्या मागणीची दखल घेत कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजिण्याचे कार्य सुरू केले असून सदर कार्य हे नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे. – म्हातारदेवी रस्त्याचे खड्डे भरण्यास सुरुवात*

चंद्रपूर

घुग्गुस : शहरातील राजीव रतन चौकात आर.के. मथानी या कंपनी तर्फे उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आलेले आहे.

मात्र या कंपनीच्या बोगसपणे व ढिसाळ नियोजनामुळे राजीव रतन चौक हा अपघाताचा हॉट स्पॉट ठरला आहे.
कंपनी तर्फे पर्यायी रस्ता,रुग्णवाहिका,वॉटर टँकर, स्वच्छता कर्मी, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसेच वेस्ट सिमेंट काँक्रिट मटेरियल घुग्गुस – म्हातारदेवी रस्त्यावर टाकण्यात यावे या करिता घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कार्यालयावर कार्यकर्त्या सह धडकले होते.

एका आठवड्यात जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर कंपनीचे काम बंद पाडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्षाने केले होता.

त्या मागणीची दखल घेत कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजिण्याचे कार्य सुरू केले असून सदर कार्य हे नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे.

रेती साठा कडे महसूल विभागाचे दुर्लक्ष

0

 

हिंगणघाट तहसिल कार्यालय तर्फे तालुक्यामध्ये व शहरामध्ये होणा-या रेती याचा अवैध साठा रोखण्याकरीता अवैध मार्गाने विना रॉयल्टी रेतीसाठा धारकांवर कारवाई का नाही ? रेतीची नियमानुसार जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार महसूल अधिकारी यांच्याकडून कारवाई का नाही होत ?
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

धर्मानंत्तर केले आरक्षण गेले यावल येथे आदीवासी समाजाचा डी -लिस्टिंग संदर्भातील जिल्हा संमेलन संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

जनजाति सुरक्षा मंच, जळगावच्या वतीने मंगळवारी येथील धनश्री चित्र मंदिरात धर्मांतरित जनजाति डी-लिस्टींग जिल्हा संमेलन पार पडले .संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष चैत्राम पवार होते तर प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम महाराष्ट्र जनजाती सुरक्षा मंचचे सहसंयोजक एडवोकेट किरण गबाले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवपंथी कलीम महाराज , श्रीमती सुनिता राणे, गंगुबाई बारेला व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमापूर्वी आदिवासींच्या बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत व पारंपरिक वाद्याच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत धर्मांतर केले-आरक्षण गेले यासह विविध धर्मांतरीत आदिवासी विरोधात घोषणा देण्यात आल्यात.

धर्मांतरित आदिवासी शासनाच्या विविध योजनेसह त्या त्या धर्माचे लाभ घेत असल्याने धर्मांतरित झालेली व्यक्ती ही जनजातीचा दुहेरी लाभ घेत असल्याने, संविधानामध्ये संशोधन करून अनुसूचित जनजाति आदेश 1950 मध्ये( डी-लिस्टींग) जनजाति सूचीतून हटवण्याचा कायदा करावा यासाठी जनजाती सुरक्षा मंच च्या वतीने उच्चस्तरिय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे मंच चे सहसंयोजक एडवोकेट किरण गबाले यांनी येथील धनश्री चित्र मंदिरात जिल्ह्यातील जनजाति प्रवर्गाच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना सांगितले. एडवोकेट गबाले यांनी पुढे बोलताना सांगितले की अनुसूचित जमातीच्या काही कुटुंबीयांनी धर्मांतर केले मात्र धर्मांतरित केल्यानंतरही त्यांचे दुहेरी लाभ सुरू आहेत शासकीय योजनेच्या लाभासह ते त्यांच्या धर्मातील लाभ घेत असल्याने जनजाती प्रवर्गातील लाभ शासनाने त्वरित बंद करावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही आमिषाला बळी न पडता आदिवासी बांधवांनी धर्मांतर करू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. चैत्राम पवार यांनीही आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगीतले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक काशीराम बारेला यांनी केले तर सूत्रसंचालन दिलावर तडवी यांनी केले कार्यक्रमास जामन्याचे पोलीस पाटील भरत बारेला, साहिल तडवी यासह मंच चे सदस्य , अमळनेरचे प्रमोद पवार, चोपड्याचे रामलाल बारेला, जामसिंग बारेला, रूपसिंग बारेला, जामनेर चे विमलताई मोरे, हिंगोली चे कलीम बारेला, बोदवड चे दीपक तोरे, एरंडोल चे भाईदास सोनवणे, एडवोकेट जास्वंती भंडारी, प्रदीप कुलकर्णी , किशोर कुळकर्णी, यांचेसह यावल , रावेर , चोपडा, मुक्ताईनगर ,जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात दारिद्रयरेषेखालील जिवन जगणाऱ्या आदीवासी कुटुंबातील तरुणांनी मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते करन ज्ञानसिंग बारेला , प्रल्हाद दुरसिंग बारेला, कुशाल बारेला आणी मुत्रीकार कमलेश बारेला यांचा व त्यांचा कुटुंबाचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आले .

सूनगाव ग्रामपंचायत लिपिकाचा हलगर्जी पणा

0

 

दहा महिन्यापासून केली नाही नोंद

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून येथे दहा ते बारा कर्मचारी कार्यरत आहेत परंतु लोकांची कामे जसे की नोंद व मिळणारे दाखले किंवा गाव विकास संबंधी घेतलेले ठराव यांची अंमलबजावणी इतरत्र कागदपत्रे यांची वेळेवर मासिक मिटिंग मध्ये ठराव पास झाल्यानंतर व खरेदीखत नोंदीचा ठराव घेतल्या नंतर ही लोकांच्या खरेदीखता नुसार नोंदी होत नाहीत व घेतलेल्या ठरावावर संबंधित कार्यालयाला कोणत्याच प्रकारचे पत्र दिल्या जात नाहीत हे ठराव जसेच्या तसेच धूळखात पडून राहतात व लोकांची खरेदीखते नोंदणी जसेच्या तसेच पडून राहत असलेले आढळत आहेत असाच प्रकार सूनगाव येथील अनिल पांडुरंग हागे व विजय पांडुरंग हागे यांनी आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या जागेची दोन्ही भावाच्या नावे खरेदी खता द्वारे वाटणी केली होती व त्यानुसार खरेदी खताचे दस्तऐवज ग्रामपंचायतला 8 /1 /2021 रोजी दिलेली आहे व त्यानुसार ग्रामपंचायतीने त्यांना खरेदी खत नोंदी ची चारशे रुपयाची पावती सुद्धा दिलेली आहे परंतु सुनगाव ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले लिपिक गजानन धुळे कर्मचारी मासिक सभेमध्ये झालेले ठराव व खरेदी नोंदी व लोकांची कागदपत्राची कामे वेळेवर न करता तसेच पडून राहत आहेत जसे की अनिल हागे यांचे खरेदीखत बाबत नोंद ही दहा महिन्यापासून जशीच्या तशीच पडून आहे या लिपिकाच्या हलगर्जी पणामुळे सर्व सामान्य लोकांना त्रास होत आहे मासिक सभेत झालेले ठराव व असलेल्या नोंदी ह्या वेळेवर तयार करून त्याचे उतारे तयार करून त्यावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या सही घेण्याचे काम हे लिपिकाचे आहे परंतु लिपिक हा कोणालाही न जुमानता हे ठराव जसेच्या तसे पडून ठेवत आहे तरी या लिपिकाच्या मनमानी कारभारा मुळे सूनगाव येथील नागरिकांना बराच त्रास होत आहे तरी सरपंच व ग्रामसेवक व वरिष्ठ पंचायत समिती अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत

शहरातील उद्योगाने मुला – मुलीच्या कला गुणांना वाव देण्याकरिता समर कॅम्प आयोजित करावे : राजूरेड्डी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहर हा औद्योगिक शहर असून प्रदूषणात हा शहर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आलेला असून येथील नागरिकांचे आयुष्यमान दिवसागणिक कमी होत आहे.

येणाऱ्या भावी पिढीला या जीवघेण्या प्रदूषणा सोबत लढण्याचे बळ देण्याकरिता त्यांना शारीरिक रित्या सशक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आता शाळांना सुट्ट्या लागल्या असून 05 ते 15 वर्ष वयोगटातील मुला – मुलींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी
उद्योगाने समर कॅम्प आयोजित करावे
या करिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी एसिसी सिमेंट, लॉयड्स मेटल्स,गुप्ता वॉशरीज,वेकोलीला निवेदनातून मागणी केलेली आहे.

ग्रामपंचायतील पाण्याची समस्या घेऊन . गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य महिलेचा विनयभंग झाल्याची घटना

0

 

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतील पाण्याची समस्या घेऊन . गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली .याप्रकरणी शनिवारी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील एका गावात ३०,वर्षीय विवाहित ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे ३ मे २०२२. रोजी १२.३० वाजेच्या सुमारास पीडित महिला ग्रामपंचायत मध्ये पाण्याची समस्या घेऊन गेली होती, यावेळी ग्रामपंचायत मध्ये हजर असलेले १) नितीन व्यंकट चौधरी 2) ,देविदास हिरामण कोळी ३) ,शिपाई धनराज मुरलीधर चौधरी, ४) लिपिक मोहन भीमराव बाविस्कर ५) विशाल सुद्धा तायडे , ६) सुभाष बाबुराव तायडे, ,७) विजय चंद्रकांत चौधरी, ८) संदेश यशवंत पाटील, यांनी पाण्याची समस्या ऐकून न घेता महिलेची छोडछानी करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
, तसेच पुढील तपास

पोलीस निरीक्षक(आयपीएस) अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उप निरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत