Home Blog Page 300

हिगणघाट बचाव समिती कडून गोवंश तस्करी करणाऱ्यावर कारवाई करावी

0

 

हिंगणघाट :- उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन नॅशनल हाईवे नागपुर ते हैदराबाद रोड वर मोठ्या प्रमाणात गौ वंश तस्करी होत असून हिंगणघाट शहर याचे केंद्रबिंदू बनले आहे. इतर राज्यातून व आपल्या महाराष्ट्र मधील अनेक जिल्हा मधून गौ तस्कर या मार्गावरून दररोज शेकडो जीवत गौ वंश यांना हैदराबाद इथे गौ माँस विक्री करीता घेऊन जातात या मार्गवर दुर्दैवी रित्या ट्रक व इतर गाड्या च्या माध्यमातून यांना घेऊन जात असतांना जे गौ वंश मृत होतात त्यांना हे कवडघाट इथे असलेले पूला वरून खाली फेकून देतात ज्या मुळे हे गौ वंश अनेकदिवस इथे सडून ,गळून अस्त व्यस्त अवस्थेत याठिकाणी असतात दुर्गन्ध व गंभीर रोग पसरवत राहतात. तसेच या या रोडवर कंपनी असल्यामुळे या रोडवर लोकांची गर्दी असते याचा लोकांना त्रास होत आहे.
अनेक धर्मात गौ वंश यांना पूज्यनीय मानत असून अनेकांची या गौ तस्करी मुळे अनेक गौ वंश चे क्षतविक्षत शव रस्त्याच्या बाजूला पडून राहतात ज्या मुळे हिंगणघाट शहरातील व ग्रामीण भागातील जनतेच्या मनात चीड निर्माण होत आहे , धार्मिक तेढ देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी आपल्यास विनंती आहे की आपने समुद्रपुर तहसील मधील जाम पासून तर वडनेर पर्यन्त हाईवे वर पोलीस चौकी करावी ज्या मुळे हे गौ वंश तस्करी पूर्ण पने बंद होईल व् या गौ वंश तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करावी . यावेळी हिंगणघाट बचाव समितीचे अध्यक्ष सुनील डोंगरे,, दिनेश वर्मा, राकेश झाडे, अमित देवढे उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

घुग्घुस शहरात एआयएमआयएम पक्षातर्फे पाणपोई

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

दि.१४ मे शनिवार रोजी ९:३० वा. सकाळी वणी-म्हातारदेवी,घुग्घुस ये जा नागरिकांना व परिसरातील
सर्वात जास्त पाण्याची गरज रेल्वे क्रॉसिंगजवळ आहे, तेथील रेल्वे फाटक बंद केल्याने नागरिकांना बरेच तास भर उन्हात उभे राहावे लागत आहे, मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,
आणि जिथे अडचण आहे तिथे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी एआयएमआयएम पक्षातर्फे ऑफिस समोर घुग्घुस येथे पाणपोई सुरू करण्यात आले.
तहानलेल्यांना पाणी देणे हे सर्वात मोलाचे काम आहे, पाणी हे जीवनसत्व आहे असे सांगण्यात आले.
यावेळी घुग्घुस एआयएमआयएम अध्यक्ष साजिद सिद्दीकी (सानु) ,अली खान,कौशर अली ,नोशाद कुरेशी,इमरान शेख ,मानु सिद्दीकी,माशूक सिद्दीकी,फैज़ान शेख,एजाज शेख,अख्तर भाई,सोनू किंग व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मनसेच्या चोपडा रावेर विधानसभा क्षेत्राच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संजय नन्नवरे यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील युवा कार्यकर्ते संजय नन्नवरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चोपडा रावेर च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विनय भोईटे यांच्या हस्ते व जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड जमील देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल येथील मनसेचे निष्ठावान युवा कार्यकर्ते संजय तोताराम नन्नवरे यांच्या कार्याची दखल घेत पक्षासाठी चोपडा रावेर या लोकसभा क्षेत्रात प्रचार प्रसार व संघटन बांधणीसाठी मोठी जबाबदारी म्हणुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने चोपडा रावेर या विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . संजय नन्नवरे यांच्या या निवडीचे संपर्क प्रमुख विनय भोईटे, जिल्हाध्यक्ष अॅड जमील देशपांडे , चोपडा यावल विधानसभा क्षेत्राचे जिल्हा अध्यक्ष कमलाकर घारू, तालुका अध्यक्ष जुगल पाटील , आकाश चोपडे आदींनी स्वागत केले आहे .

उड्डाणपूल निर्माण करणाऱ्या कंपनीवर काँग्रेसची धडक

0

 

एका आठवड्यात रुग्णवाहिका व अन्य सुविधा उपलब्ध करा : राजूरेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहरातील सर्वात मोठी वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडणुकीसाठी राजीव रतन चौकात असलेल्या रेल्वे गेट वर आर.के. गोधानी कंपनी तर्फे उड्डाण पुलाचे कार्य सुरू करण्यात आले असून चंद्रपूर – यवतमाळ – पुणे हा राज्य महामार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने पुलाचे कार्य सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक होते.
मात्र पुल निर्माण करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजी व ढिसाळ व्यवस्थापनाने हा मार्ग अपघाताचा हॉट स्पॉट ठरला आहे.
यामुळे संतप्त काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी सहकार्या सह कंपनीचे कार्यालय गाठून कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
या मार्गावरील अपघात ग्रस्त नागरिकांना तात्ळीने रुग्णालयात नेण्यासाठी चोवीस तास रुग्णवाहिकेची व्यवस्था करा वाहतूक नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकाची संख्या वाढवा

खोद कामातून निघणारी वेस्ट मटेरियल उदा. माती सिमेंट क्रोंकिट व इतर साहित्यांचा वापर घुग्गुस महाताररदेवी रोडवरील खड्डे बुजिण्यासाठी करावा तसेच उर्वरित वेस्ट मटेरियल शहरातील सामाजिक अथवा धार्मिक परिसरातील दुरुस्ती करिता करावा तसेच रस्त्यावरील धूळ नियंत्रणासाठी स्वचछताकर्मीची नियुक्ती करावी.
रस्त्यावर वॉटर टँकरने पाण्याचा छीळकाव करावा व या मागण्या आठ दिवसात सोडवा अन्यथा कंपनीचा काम बंदचा इशारा रेड्डी यांनी दिला आहे

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार, नुरुल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी, रोहित डाकुर, रफिक शेख, बालकिशन कुलसंगे,देव भंडारी,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे, सुनील पाटील,कपिल गोगला,प्रदीप आसेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गॅस सिलेंडर अपघात रोखण्यासाठी शेगडी, टुयुब, रेगुलेटर यांची तपासणी मोहीम राबवा : काँग्रेसची मागणी

0

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहरा लागत असलेल्या नकोडा गावात 29 एप्रिल रोजी इंडेन गॅसच्या स्फोटात सोडोनी आसाम व अनिता आसम या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली असून सदर घटनेची परत पुनरावृत्ती होवू नये याकरिता 14 मे रोजी काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिषटमंडळाने शहरातील देवनील इंडेन गॅस एजेंसी, तसेच एच .पी. गॅस एजन्सीला भेट देवून गॅस सिलेंडरची पाहणी केली व निवेदनाद्वारे घुग्गूस – नकोडा शहरातील व गावातील प्रत्येक घरातील गॅस शेगडी, टुयुब रेगुलेटर याची तपासणी प्रत्येक दोन वर्षात एकदा आवश्यक आहे.

याकरिता तातडीने सदर तपासणी करण्यात यावी सध्या शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून गॅस अपघाताने मोठी वित्त व जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करिता कडक उपाययोजना व अंमलबजावणी करावी व नागरिकांनी ही आपल्या कुटुंबा जीव रक्षणा करिता गॅस एजन्सी तर्फे करण्यात येणाऱ्या तपासणीला सहकार्य करावे अशी विनंती केली.
शिष्टमंडळात कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,सुकमार गुंडेटी,अनुप भंडारी, रोहित डाकुर, रफिक कुरैशी, सुनील पाटील,प्रदीप आसेकर,अंकुश सपाटे, बालकीशन कुळसंगे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

2022 मध्ये पक्ष पाहून नाही तर लोकप्रतिनिधी हिशोब घेणारा निवडा ! गरीब करतात ते अतिक्रमण व श्रीमंत करतात ते डेकोरेशन

0

 

हिंगणघाट :- बस स्टँड समोर चर्च ला लागून असलेले कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण दुकान काढणे हे महत्त्वाचं होत इतर अतिक्रमणशी काही ही हिंगणघाट नगरपालिकेला संबंध नाही का ? कागदावर सांगितले एक प्रत्यक्षात कारवाई केली एक नगरपालिकेला अतिक्रमणशी काही घेणे देणे नाही फक्त कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण दुकान महत्त्वाचं होतं.
नंदोरी चौकातील, आठवडी बाजारातील मुख्य रोडवर भाजीविक्रेता विक्रेत्यांचे अतिक्रमण दिसत नाही. कारंजा चौकातील हनुमान मंदिर समोरील नवीन पक्के बांधलेले दुकान यांचे अतिक्रमण आहे हे नगरपालिकेला दिसत नाही .
परवानगी नाही . बँकेची पार्किंग कुठे आहे ? पार्किंग नाही हे नगरपालिकेला दिसत नाही का ?
याला सर्व हिंगणघाट शहरवासी जबाबदार आहे हिंगणघाट शहर वाशी हिशोब घेणारे नगरसेवक नाही तर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून निवडून येणारे नगरसेवकांना संधी देते.

जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया 25 हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

दि 14: जळगाव जामोद वनपरिक्षेत्र नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते,आता येथे कार्यरत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारिया यांना 25 हजारांची लाच स्वीकारताना बुलडाणा एसीबीच्या पथकाने दिनांक 13 मेच्या सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडले आहे. सदर एसीबीच्या कारवाईमुळे संपूर्ण वन विभाग हादरुन गेला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी भगतराम द्वारकादास कटारिया वय 47 वर्ष यांच्याविरोधात पंचगव्हाण येथील 32 वर्षीय इसमाने लाचेची मागणी केल्याची तक्रार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली यातील तक्रारदार यांच्या मालकीचे टाटा 709 वाहन दि 10 मे रोजी लाकुड वाहतूक करताना मिळून आल्याने वनविभागाचे कर्मचारी देवकर यांनी वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय जळगाव जामोद येथे जमा केले होते. तक्रारदार यांनी वाहन सोडविण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी कटारीया यांची भेट घेतली असता कटारिया यांनी स्वतःसाठी 7 हजार रुपये व इतरांना 12 हजार व दंडाची रक्कम 6 हजार अशी एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी दरम्यान लाच मागणी बाबत खात्री करण्यात आली सापळा कारवाईदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी कटारीया यांना लाचेची रक्कम 19000 व दंड सहा हजार एकूण पंचवीस हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती, देविदास घेवारे, अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती ,यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई, एस एन चौधरी पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे, पोलीस नाईक मोहम्मद रिजवान, रवींद्र दळवी, प्रवीण बैरागी, पोलीस शिपाई अझरूद्दिन काझी,चालक अर्शद शेख यांनी ही कारवाई यशस्वी रित्या पूर्ण केली. सदर आरोपी कटारिया यांना जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

चुंचाळ्यात गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा हजारो भाविकांनी घेतले समाधीस्थळाचे दर्शन

0

 

२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चुंचाळे हे गाव श्री संमर्थ सुखनाथ बाबा यांची तपोभुमी व रघुनाथ बाबा यांची जन्मभुमी तसेच श्री संमर्थ वासुदेव बाबा यांची कर्मभुमी या पावन भुमीत दि १३ रोजी गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिरात ७ क्विंटल च्या पुरणपोळी व आंब्याच्या रसाचे आयोजन शिष्यगणानी व ग्रामस्थानी केले होते बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकासाठी चुंचाळे फाटा ते चुंचाळे पंर्यन्त दरबारातील गाडी मोफत सेवा पुरवीण्यात आली होती यावेळी भाविकानी मानलेले नवस फेडण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी व संध्या जाणवत आसलेले संकट पाणी या साठी होमहवन करुण वरुण राजाला साकडे घालण्यात आले हजारो भाविकांनी घेतले समाधीस्थळाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ
२१ जणांनी केले रक्तदान

 


भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ यांनी ठेवलेल्या रक्तदान शिबीरात घडले सामाजिक एकतेचे दर्शन २१ पैकी १० जण रक्तदान करणारे हे तडवी बांधव होते
असा झाला कार्यक्रम सकाळी सहाला समाधी स्थान सातला मारोती स्थान आठ पासुन ते दुपारी १२ ते १ आरती ची वेळ सोडून भजन व भारुडे होतात दुपारी १ ते रात्री ७ पर्यत महाप्रसादाची वाटप करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संमर्थ वासुदेव बाबा शिष्य व चुंचाळे येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले

घुग्घुस एआयएमआयएम पक्षातर्फे फळ,फ्रुट्रस वाटप

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दवाखान्यात फळ, फ्रुट्रस वाटप करण्यात आले.

ऑल इंडिया मजलीश-ए-इत्तेहादुल मुसलमीन एआयएमआयएम घुग्घुस यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस च्या शासकीय रुग्णालय, ड्रॉ. कोल्हे यांच्या दवाखान्यात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, भारतातील दलित, मुस्लिम, ओबिसी, आदिवासी, समाज आणि तमाम जनता, बुलंद आवाज खासदार, संविधान रक्षक, संसद रत्न बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, आज आपण रुग्ण आणि दवाखान्यातील लोकांना फळे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आले.यावेळी उपस्थित घुग्घुस शहर अध्यक्ष, सानू सिद्दीकी, सोनू किंग, इम्रान शेख, छोटू सिद्दीकी, निखिल, फैजान शेख, एजाज शेख, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपतर्फे साखरवाहीजवळ ताडाळी-घुग्घुस रेल्वेलाईनवर रेल्वे रोको आंदोलन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

आज सकाळी चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही येथील शेतपरिसरात स्थानिक शेतकरीबांधवांच्या रास्त मागण्या घेवून भाजपतर्फे रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.
साखरवाहीजवळील विमला सायडींग परिसरातील शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी पर्यायी एकचं रस्ता उपलब्ध होता, परंतु तो रस्ता मागील महिन्यात झालेल्या ट्रॅक्टर अपघातामुळे रेल्वेने बंद केला. त्यामुळे तो रस्ता तात्काळ सुरू करावा. या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे फाटक उभारून तेथे एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. तसेच याठिकाणी कायमची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने विमला सायडींगजवळ आणि मुरसा शिव धुऱ्याजवळ असे दोन अंडरपास निर्माण करण्यात यावे. यासोबतच अपघाताने क्षतिग्रस्त झालेल्या ट्रॅक्टरच्या मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा महत्त्वपूर्ण मागण्यांना घेऊन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले.

सकाळीच सुरू झालेल्या या आंदोलनास रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला विरोध दर्शविला. परंतू शेतकर्‍यांनी विशेषतः महिलाभगिनींनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रेल्वे प्रशासनाला नरमाईची भूमिका घेऊन सहकार्य करावे लागले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेशी चर्चा करून आंदोलनाच्या मागण्यांसंदर्भात अनुकुलता दाखवत रेल्वे प्रशासनाने तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने बंद केलेला शेतमार्ग पूर्ववत केला. तसेच येत्या काही दिवसांत सक्षम अधिकार्‍यांशी बैठक घेऊन सदरहू अंडरपासच्या कामासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासनही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
यावेळी रेल्वे विभागाचे नागदेवते, आरपीएफचे कृष्णा रॉय, वासनिक, पाटील, मांजी यांसह अन्य रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, की या ताडाळी ते घुग्‍गुस रेल्वे मार्गाला लागूनचं साखरवाही परिसरातील शेत्या असल्याने रेल्‍वे मार्गावरून शेतकऱ्यांना ये-जा करण्याकरिता अंडरपास (बोगदा) किंवा रेल्वे फाटक करून देण्यासंदर्भात महामंत्री नामदेव डाहूले यांनी गेल्या दोन वर्षांपासून पत्रव्यवहार केला. परंतू रेल्वे प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्ष केले. त्यामुळे गेल्या ११ मे रोजी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा विषय लावून धरल्या गेला. यावेळी रेल्वेने स्पष्ट भूमिका न कळविल्याने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे आंदोलन पार पडले.

पुढे बोलताना, याआधी जाण्‍यायेण्‍यासाठी याठिकाणी रस्‍ता होता, परंतु एक महिन्यापूर्वी येथून जाणाऱ्या एका ट्रॅक्‍टरला रेल्वेने धडक दिल्याने त्‍या ट्रॅक्‍टरचे दोन तुकडे झाले. त्‍यावर कुठलीही उपाययोजना न करता रेल्‍वेने त्‍या ट्रॅक्टर मालकालाचं नोटीस पाठविली आणि पलिकडे जाण्‍याचा रस्‍ता पूर्णपणे बंद केला. रेल्‍वे फाटकाच्या दुसऱ्या बाजूने हजार ते दिड हजार एकर शेती असल्याने शेतकऱ्यांना पलीकडे शेतशिवारात जाण्यासाठी या शेतमार्गाशिवाय पर्याय नाही. करिता हा रेल्वेमार्ग ओलांडून जाणे भाग आहे. अशा वेळेला मागील दोन वर्षापासून मागणी करूनही याठिकाणी ना फाटक बसविले ना अंडरपास बांधला. आणि आता ऐण मान्सूनच्या तोंडावर शेतीकडे जाणारा रस्ता रेल्वेने बंद केल्याने शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला. आजच्या या आंदोलनामुळे शेतरस्त्याचे काम जेसीबीने पुर्ण करण्यात आले. तसेच येत्या काही दिवसांत अंडरपासचेही काम सूरू करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यावर आम्ही आंदोलनाची सांगता करत आहोत. असेही ते म्हणाले.

या आंदोलनाला, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, रूषी कोवे, विनोद खेवले, भारत रोहणे, माजी जि. प. सदस्य सुरेखा पाटील, रंजित सोयाम, महिला आघाडीच्या प्रियाताई ढवस, सौ. दुर्गाताई बावणे, सौ. अनुताई ठेंगणे, सौ. संगीताताई डाहुले, सौ. ढुमणेताई, विनोद ढापणे, भाऊराव चार्लेकर, भाऊराव कुळमेथे, रामभाऊ कडुकर, बंडूभाऊ ऊरकूडे, शुद्धोधन वानखेडे, मुबारक शेख, भीमराज आईलवार, युसुफ शेख, योगेश कडुकर, अजय चार्लेकर, सुशांत शर्मा, आशिष वाढई, राकेश बोमनवार, अमित निरंजने, पवन शेरकी, सुजय निर्मल, पियूष मेश्राम, आदिंसह मोठ्या संख्येने साखरवाही ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.