Home Blog Page 302

सावखेडा सिम येथे आदीवासी समाज बांधवांचा सामुहिक विवाह सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडा सिम येथे आदीवासी बांधवांचा सामूहीक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला , या विवाह सोहळ्यात सहा आदीवासी विवाह ईच्छुकांचे शुभमंगल संपन्न झाले. यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील आदीवासी तरुणांच्या माध्यमातुन दिनांक ७ मे २०२२ शनीवार रोजी आयोजीत सामुहिक विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता . या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा आदीवासी जोडप्यांचे धर्म व पारंपारिक पद्धतीने विवाह लावण्यात आला यावेळी आमदार शिरीष चौधरी , रमेश चौधरी , शेखर पाटील , प्रभाकर सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते वधुवरांना संसार उपयोगी भांडी व वस्तु भेट देण्यात आली . याप्रसंगी वधु वरांना शुभ आर्शिवाद देण्यासाठी यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी ,काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव . माजी पंचायत समितीच्या सदस्या मिना राजु तडवी , यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहाँगीर तडवी , ग्राम पंचायतच्या सदस्या नसिबा तडवी, माजी ग्राम पंचायत सदस्य उस्मान तडवी , फैजपुर मंडळ अधिकारी हानिफ तडवी, आदीवासी समाजाचे सामाजीक कार्यकर्ते सचिन तडवी यांच्यासह मोठया संख्येत समाजबांधव या सामुहिक विवाह सोहळ्यास उपस्थित होते . या सामुहिक विवाह सोहळयास यशस्वी करण्यासाठी ईगल ग्रुप, तडवी किंग ग्रुप, इंदीरा नगर बॉईज , सुखवस्ती ग्रुप , गुलाब नगर ग्रुप , पिएमसी क्रिकेट क्लब , लव किंग ग्रुप , मायकल वॉर्न क्रिकेट क्लब व सावखेडा सिम व परिसरातील आदीवासी तरूणांनी महत्वाचे परिश्नम घेतले .

अपघातग्रस्त सफाईकर्मीला काँग्रेस तर्फे आर्थिक मदद

0

 

राजूरेड्डी यांनी घडविले माणूसकीचे दर्शन

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गुस : येथील तिलक नगर निवासी अशोक कामपल्ली वय – 30 वर्ष हे नगर परिषदेत कंत्राटी पद्धतीने सफाईकर्मी म्हणुन कार्यरत आहे.

गेल्या चार – पाच दिवसांपूर्वी राजीव रतन चौक कडून सायकलने जात असता ट्रक खाली येवून अपघात घडला या अपघातात कांमपेल्ली यांचा एका पायाचा पूर्ण चुराडाच झाला
अपघातग्रस्त सफाईकर्मीला तातडीने सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले मात्र रुग्णाची परिस्तिथी अत्यंत गंभीर असल्याने ट्रक मालकाने रुग्णाला डॉ. चेपुरकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
रुग्ण हा सिकलसेल रुग्ण असल्याने त्यांच्या शरीरात रक्ताचा तूटवडा झाल्याने त्याला अती दक्षता विभागात ठेवण्यात आले.
गेल्या तीन चार दिवसात जवळपास एक लाख रुपये खर्च झाल्याने यापुढे आपण आर्थिक मदद देवु शकत नसल्याचे ट्रक मालकाने सांगितल्यावर कामपेल्ली कुटुंब संकटात सापडला.

सदर माहिती मिळताच राजुरेड्डी यांनी रुग्णालयात जावून रुग्णाची भेट घेतली व डॉक्टर कडून पूर्ण अंदाजित खर्चाचा आढावा घेतला असता दोन ते तीन लाख रुपये खर्च येणार असल्याचे माहिती मिळाली सदर कुटुंब अगदी गरीब असल्याने घरात खायलाच नाही तर उपचार कसा करायचा असा प्रश्न कांमपेल्ली यांच्या पत्नीला पडला असता काँग्रेस अध्यक्षाने कुटुंबाच्या सहमतीने सदर रुग्णाला दत्ता मेघे वर्धा येथे हलविण्याचा निर्णय घेतला चेपुरवार रुग्णालयाचे उपचार खर्च फेडून रुग्णवाहिका बोलवून रुग्णाच्या पत्नीला वीस हजार रुपये आर्थिक मदद दिली.

रेड्डी यांच्या सहयोगाने पीडित कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू तरांगले आपल्या मददतीला देवदूतच धावून आल्याचे समाधान कामपेल्ली कुटुंबाने व्यक्त केले.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर व बालकिशन कुळसंगे उपस्थित होते.

भुसावळ येथे भगवान बुध्द जयंती निमीत्त ३ दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

0

 

राजेश तायडे (प्रतिनिधी) भुसावळ

भुसावळ – रेल्वे उत्तर वार्ड रेल्वे दवाखान्याच्या मागे आंबेडकर नगर भगवान बुध्द टेकडी भिक्खु कुटी बुध्द विहार तापी नदी काठी रविवार दिनांक १५ मे ते १७ मे २०२२ रोजी विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या वैशाख पौर्णीमा जयंती निमीत्त पु. भंदत नापावल पय्यातीस्स महास्थविर श्रीलंका यांच्या अध्यक्षतेखाली तिन दिवशीयन धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमात भारत भरातुन पु.भन्ते सुगतवसं महास्थवीर, जळगांव (श्रीलंका), पु.भन्ते धम्मांकुर महास्थविर नागपुर, पु.भन्ते सधक स्थाविर, सुमठाणा भद्रावती, पु.भन्ते प्रज्ञानंद स्थविर, अकोला, पु.भन्ते आनंदबोधी स्थविर डवरगाव अमरावती, पु.भन्ते संघरत्न स्थवीर मुंबई, पु.भन्ते पथिक श्रेष्ठी गुजरात, पु.भन्ते वंगित स्थविर औरंगाबाद, पु.भन्ते धम्मबोधी स्थवीर औरगाबाद, पु.भन्ते सुदत्तबोधी स्थवीर औरंगाबाद, पु.भन्ते अनिरुध्द औरंगाबाद, पु.भन्ते संघरत्न ग्वालियर म.प्र., पु.भन्ते यशोदिप औरंगाबाद, पु.भन्ते धम्मानंद औरंगाबाद, पु.भन्ते मंगलबोधी औरंगाबाद, पु.भन्ते धम्मरतन औरंगाबाद, पु.भन्ते भिक्खुनी उप्पलवना थेरी भंडारा, पु.भन्ते भिक्खुनी संघमित्रा औरंगाबाद, पु.भन्ते भिक्खुनी संघमित्रा चंद्रपुर यादी भन्ते गण उपस्थित राहणार आहे. तिन दिवस चालणाऱ्या धम्म परिषदेची रूप-रेषा खालील प्रमाणे :- रविवार दि. १५ मे रोजी सकाळी ६ वाजता पुजा वंदना, सकाळी ७ वाजता धम्म ध्वजारोहण, सकाळी ७.३० वाजता, उपसंघाला अल्पोहार सकाळी ९ ते ११ भिक्खु संघाची धम्मदेसना सकाळी ११ वाजता भिक्षु संघाला भोजनदान दुपारी १२ ते सायं. ५ वाजे पर्यंत अति उष्णतेमुळे विश्राम सायं. ५ ते रात्री १० पर्यंत भिक्खु संघाची धम्मदेसना, सोमवार दि. १६ मे रोजी सकाळी ६ ते सायं. ५. वाजे पर्यंत उपोसथ शिल शिबीर त्यात उपासकांना सुचना आपल्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे, पांढरे वस्त्रामध्येच येणे, दाग-दागिने घालून येवू नये, अष्टशिल धारण करण्याऱ्या लोकांची सामुहिक भोजन व्यवस्था कार्यक्रमा स्थळी राहिल. सध्या. ७ वाजता पुजा वंदना, १६ मे २०२२ रात्री ८ ते सकाळी ६ वाजे पर्यंत भिक्खु संघाच्या माध्यमातुन सर्वांच्या कल्याण्यासाठी महापरित्राणपाठ मंगळवार दि. १७ मे सायं. ५ ते रात्री १० पर्यंत त्रिशरण पंचशिल, भिक्खु संघाचे स्वागत, निमंत्रत पाहुण्याचे स्वागत भिक्खु संघाची धम्मदेसना, भिक्षु संघाला संघदान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. सदर कार्यक्रम हा प्रमुख पाहुणे मा.एकनाथरावजी खडसे मा.मंत्री महसुल पाटबंधारे, मा.संतोषभाऊ चौधरी मा.आमदार, मा.संजयभाऊ सावकारे आमदार, मा.अभिजीत राऊतसाहेब जिल्हाधिकारी जळगांव, मा.दिपक ढिवरे साहेब तहसीलदार भुसावळ, मा. नविन पाटील साहेब ADRM मा.बी.एस.रामटेके साहेब APO, मा.शशिकांत इंगळे नायब तहसीलदार भुसावळ, मा.राजेशभाऊ झाल्टे, मा.राजुभाऊ सुर्यवंशी जिल्हा अध्यक्ष आर.पी.आय., मा. उल्हासभाऊ पगारे नगरसेवक, प्रा.डॉ. राहुल निकम समाजकार्य महाविद्यालय चोपडा, मा.अॅड.मनोहर खैरनार जिल्हा नियोजिन समिती सदस्य मुक्ताईनगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमास धम्म परिषदेस भोजन, पाणी, फळ, अर्थ, औषध, परिस्कार, अष्टपरिस्कार इ. तन, मन, धनाने दान देऊन धम्म परिषदेस सहकार्य करुन आशिर्वाद संपादन करावे तसेच सर्व उपासक उपासिकींनी पांढरे वस्त्र परिधान करुन उपस्थित रहावे असे आव्हान मुख्य आयोजन पु. भदंत सुमनतिस्स स्थवीर यांच्या आदेशाने प्रसिध्दी सहकारी उपासक राजेश तायडे यांनी केले आहे.

राजू रेड्डी यांनी नागरिकांन सोबत घेतली भेट जाणून घेतल्या समस्या

0

 

घुग्घुस काँग्रेस तर्फे जन समस्यांचा आढावा

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहरातील पारा सध्या 47 डिग्रीच्या जवळपास असून वाढत्या तापमानाने व भीषण उन्हामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत.

असे असताना शहरात सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजे मध्ये कूलरचा हा सर्वात महत्वपूर्ण घटक झालेला आहे.

या जीवघेण्या परिस्थितीत शहरात सर्वत्र पाणी टंचाई झाली असून नागरिकांना पिण्याचा पाणी ही मिळेनासा झाला आहे.

नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आज दिनांक 07 मे रोजी
काँग्रेस अध्यक्ष राजूरेडडी कामगार नेते सैय्यद अनवर यांनी शास्त्री नगर भागाची पाहणी केली नागरिकांन तर्फे समस्या जाणून घेतल्या व समस्या निवारणासाठी वेकोलि अधिकाऱ्याला वॉर्डांत बोलावून संपूर्ण परिसरात फिरवून
समस्येशी अवगत करण्यात आले
व तातळीने समस्या निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आले.

व नागरिकांना तत्काळ वॉटर टँकर द्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले

याप्रसंगी सौ. पुष्पा कणकम, अविनाश गोगुर्ले, बालकिशन कुळसंगे, व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

रोजगारासाठी उद्योग महत्वाचे मात्र नागरिकांच्या जीवनापेक्षा नाही:राजू रेड्डी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहर हा प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त झाला आहे
येथील वायू पूर्णतः विषारी झाली असून मानवा सह पशू – पक्षी यांचे जीवन ही धोक्यात आलेले आहे.

एकीकडे शहर प्रदूषणाने त्रस्त असताना लॉयड्स मेटल्स कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पाची दिनांक 06 मे 2022 रोजी कंपनी परिसरात जनसुनावणी घेण्यात आली.

यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका घेत शहर अध्यक्ष राजूरेडडी यांनी
येवू घातलेल्या कंपनीत स्थानिक युवक व युवतीं सह विधवा परित्यक्ता महिलांची सरळ भर्ती घेवून रोजगार उपलब्ध करून द्यावे.

प्रदूषण नियंत्रणासाठी कडक अंमलबजावणी करण्यात यावी
सामाजिक उत्तरदयित्व निधीतून शहराचा विकास करण्यात यावा अशी मागणी केली.

स्थानिक युवकांना रोजगार व शहरातील प्रदूषण नियंत्रण हे आपल्या साठी सर्वातपरी आहे.
आमचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडडेटीवार व खासदार बाळू धानोरकर यांनी सात किलो मिटर आतील स्थानिक बेरोजगारांना रोजगार व प्रदूषण नियंत्रनाचे काटेकोरपणे पालन करण्याचे सूचना दिल्या आहेत.
जर उद्योगाने नागरिकांच्या जीवन रक्षणाला प्राधान्य नाही दिल्यास काँग्रेस पक्ष ही कंपनी चालू देणार नाही असा इशारा रेड्डी यांनी दिला आहे.

नेत्ररुग्नांची बारावी तुकडी सेवाग्राम येथे रवाना सुधीरभाऊ लाखो रुग्णांचे दृष्टिदाता – विवेक बोढे

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र घुग्घुस तर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा मुलगा चि. शौर्य बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार ७ मे रोजी घुग्घुस परिसरातील जेष्ठ नागरिकांची तुकडी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीबिंदूच्या उच्चस्तरीय तपासणी करिता एक तुकडी पाठविण्यात आली.
याप्रसंगी रुग्णांना चादर, पाणी बॉटल, पिशवी व मिठाईचे वाटप करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे लाखो रुग्णांचे दृष्टीदाते आहे. घुग्घुस परिसरात अनेक वर्षापासुन उच्चस्तरीय तपासणी करिता जेष्ठ नागरिकांच्या अनेक तुकड्या सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्या आहे तसेच अनेक वर्षांपासून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून घुग्घुस परिसरातील गोर, गरीब, गरजू व जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे, हे रुग्णसेवेचे पवित्र कार्य निरंतर पणे सुरु आहे. कोणत्याही गरजू रुग्णाला आरोग्यविषयक मदत लागल्यास घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.

यावेळी भाजपा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे सिनू इसारप, साजन गोहने, अमोल थेरे, श्रीकांत सावे, सुभाष मशाखेत्री, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, शौर्य बोढे, सुनंदा लिहीतकर, लता आवारी, अजय लेंडे, उमेश दडमल, खुशबू मेश्राम व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने लातूरच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादक मो.9921400542
दिनाक 8 मे अमरावती

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन यथोचित सन्मान केला व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांच्या कुटुंबियांना शैक्षणिक व आरोग्य सुविधा पुरविणार असून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थामध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडीत हणमंते, संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, लातूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक संजय राजुळे तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका सचिव हर्षवर्धन गाडे, रमेश हणमंते, उत्तम फड, उषाताई भालेराव, प्रतिक्षा पिटले, आबासाहेब झिंजारे, सुरज मद्देवाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लहुकुमार शिंदे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा कार्याकरिणीने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उलगडा केला. राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांनी माझ्या माहेरच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथे सासरी येऊन सन्मान केला. हा सन्मान मी विसरू शकणार नाही असे प्रतिपादन केले. दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडित हणमंते यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट कार्य करीत असून संघटनेच्या सर्व बातम्या दैनिक साहित्य सम्राटमधून कायम प्रसिद्ध करणार असल्याचा विश्वास दिला. सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक महिला पत्रकार संघटनेत येण्यास इच्छुक असून वर्षभर विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. तर लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांच्या कल्याणार्थ कायम लढणार असल्याचे सांगून उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर व सोलापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

यावल येथे प्रेम प्रकरणातुन एका तरुणावर तिन जणांकडुन तिक्ष्ण हत्याराने जिवघेणा हल्ला तरूणाची प्रकृत्ती गंभीर

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहरातील काजीपुरा वस्तीतील 21 वर्षीय तरुणावर तीन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री येथील भुसावल रस्त्यावरील पीर बाबा दर्ग्याजवळ घडली आहे. हा हल्ला त्याच परिसरात राहणाऱ्या एका विवाहीत महीलेशी असलेल्या प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे

यावल शहरातील काजीपुरा वस्तीतील रहिवासी जावेद युनुस पटेल(वय२१ ) याचे एका विवाहित महिलेशी प्रेम संबंध होते दरम्यान फैजपूर येथील तीन जणांनी गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जावेद पटेल यास गोड बोलुन दुचाकीवर बसवून येथील भुसावल रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ आणत त्याचेवर तीन जणांनी चाकूने सपासप वार करून जिवघेणा हल्ला करीत त्यास गंभीर जखमी केले आहे. घटनास्थळावरून तीनही संशयित आरोपी फरार झाले दरम्यान मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काही आदिवासींना जावेद जखमी अवस्थेत रस्त्यावर, पडलेला दिसून आल्याने त्यांनी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल केले हा जिवघेणा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा त्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलिस अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे जखमीस रात्री जळगाव येथे सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या वेळी जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे .

यश संपादित करण्यासाठी कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो.. कु दिपाली फासे

0

 

माणसाला जिवनात यश संपादित करण्यासाठी कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो असे दिपाली फासे स्वतःचे आलेले कठीण प्रसंगाचे अनुभव सांगितले.
खेड्यापाड्यात दुर्गम भागात शहरा सारख्या सुखसुविधा नसलेल्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुला मुलींना याची जाणीव असते.आई वडील शेत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असताना मुलांच्या शिक्षणा कडे फारसं लक्ष दिलं जात नाही तरीही काही मुले मुली जिद्द चिकाटी व मेहनत करून यश संपादित करतात.अशाच छोट्याशा खेड्या गावातील शेतकरी कुटुंबातील कु दिपाली शत्रघुन फासे रा दादुलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलडाणा या लहान खेड्यातील राहणारी आपल्या परिसरातील एकमेव मुलगी सशस्त्र सिमा सुरक्षा बल कॉन्स्टेबल जी डी या पदावर बिहार मध्ये श्रीनगर जिल्ह्यात रुजू झाली याबद्दल धनगर समाज युवा मल्हार सेना पदाधिकारी यांनी दिपाली फासे पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
दिपाली फासे ची ट्रेनिंगसुरू असताना वडीलाचे कोरोना काळात अकस्मात निधन झाले. तरिही अशा कठीण परिस्थितीत तिने ट्रेनिंग पुर्ण केले.अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिने जिद्द चिकाटी आणि मेहनत करून यश मिळविले या बद्दल दिपाली फासे चे सर्व परिसरात कौतुक केलं जात आहे .३मे मंगळवार रोजी खंडोबा मंदिर दादुलगाव येथे धनगर समाज युवा मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष मा श्री मनोज सिराम ,सौ सुजाताताई मनोज सिराम व जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भिवटे यांनी कु दिपाली फासे चा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कु दिपाली फासे ची आई, भाऊ मंगेश फासे, काका गजानन फासे, रामभाऊ फासे, एकनाथ भिवटे जिल्हा सचिव,प्रमोद तितरे प्रशासक कृ उ बाजार समिती जळगाव जामोद, अजय तितरे जिल्हा उपाध्यक्ष, गोपाल पातुर्डे तालुकाध्यक्ष नांदुरा, भगवान तितरे, संजय फासे, शिवाजी तितरे, राजु फासे,राजु गाडगे, रोशन तितरे व उपस्थित धनगर समाज युवा मल्हार सेना पदाधिकारी व गावातील बंधु भगिनींनी उपस्थित होते

विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेला भारतीय सेवा रत्न बेस्ट एन जी ओ अवार्ड प्रदान

0

 

 

ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा भारतीय सेवा रत्न बेस्ट एन जी ओ अवार्ड या वर्षी विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेला पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे यांना सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याच्या निमित्ताने विशेषत्वाने विदर्भा सारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये सात हजार परिसर पोषण बाग तयार करून हि संकल्पना सर्वत्र राबवण्यात येत आहे. या संकल्पनेतून महिलांना लघु उद्योगासाठी सहकार्य व मार्गदर्शन संस्था करत आहे. बुलढाणा, अमरावती येथील शेतकरी यांना शेतीची अवजारे आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व महिला बचत गटांना शेळी पालन व्यवसाय उभे करण्यास वेगवेगळ्या देणगीदार यांच्या कडून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले.बुलढाणा मधील मेहकर शेगाव संग्रामपूर जळगाव सारख्या तालुक्यामध्ये पाण्याच्या दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणी वाटप करून गावकऱ्यांची तहान भागविली, तसेच मेहकर मधील डोंगरिभागात ३री ते ५वि च्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण वर्ग चालवून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवले, धारणी येथील डोमा या गावातील आरोग्य केंद्र दुरुस्त करून दिले. शेतीच्या नव नवीन संकल्पनेतून शेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित करून त्यांचे प्रशिक्षण व मातीची तपासणी करून पाचशे शेतकऱ्यांना निसर्ग शेती करण्यास मदत केली. या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारतातील जम्मू कश्मीर, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बेंगळूरु, पच्छिम बंगाल,पंजाब, हरियाना या राज्या मधून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था प्रतिनिधी, प्रत्रकार व लेखक मंडळीनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.