Home Blog Page 301

राजकमल चौकातील सौंदर्यीकरण व विकास कामांना गती द्या

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक मो. 9921400542 अमरावती
दिनाक 27 मे अमरावती

आ. सौ .सुलभाताई खोडके यांची सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
मान्सूनपूर्व उपाययोजनांना घेऊन राजकमल चौक – ऑटोगल्ली परिसराची पाहणी

अमरावती २६ मे : शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात पावसाचे दिवसांमधे समस्या उद्भवत असल्याने स्थानिक नागरिक ,व्यापारी व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सदर बाब लक्षात घेता आ. सौ .सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने परिसरात रस्ते -नालीचे बांधकाम तसेच सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रगतीपथावर आहे. सदरची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक रित्या पूर्ण करून पावसाळ्यात चांगल्या सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी राजकमल चौक – रेल्वे पूल -अंबापेठ – ऑटोगल्ली परिसराची पाहणी केली . राजकमल चौक हा शहराच्या चार भागांना जोडल्या गेला असल्याने या चौकात नागरिकांची प्रचंड वर्दळ दिसून येते . मात्र पावसाचे दिवसात परिसरातील नाल्या चोक -अप होऊन सर्व पाणी चौकात येऊन साचत असल्याने नागरिकांना अवागमन करतांना अडचणी निर्माण होतात . याचा नाहक मनस्ताप वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना सुद्धा सहन करावा लागतो . या संदर्भात आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला . याची फलश्रुती म्हणून राजकमल चौक ते रेल्वे पुलापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथचे बांधकाम करणे तसेच सौंदर्यीकरणाचे कामाकरिता अर्थसंकल्पिय कामे शीर्षांतर्गत ६० लाख निधी मंजूर करून उपलब्ध करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सद्यास्थितीत करण्यात येत असलेले सदरचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा व हृद्यस्थळ म्हणून ओळखला जाणारा ब्रिटिश कालीन पुलाचे योग्य रित्या सौंदर्यीकरण करण्यात यावे , अशा सूचना आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी पाहणी दरम्यान दिल्या . तदनंतर अंबापेठ ते ऑटो गल्ली येथे प्रगतीत असलेल्या रस्ता व नालीचे बांधकामाची पाहणी करण्यात आली . मूलभूत सुविधांच्या विकास कामांच्या विशेष अनुदानातील ४६ लक्ष निधीतुन रस्ता व अंदाजे २६.७५ लक्ष निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर कामाची सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने पाहणी करण्यात आली . सदर काम दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक करण्यासह चांगल्या सुविधा निर्माण करण्याला घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व अमरावती महानगर पालिका यांच्या वतीने संयुक्तरित्या कार्यवाही करून तत्काळ पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे ,अशा सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे यांना देण्यात आल्या . या सोबतच परिसरातील ऑटोगल्ली येथे रस्त्याचे बांधकाम सुरु करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्यात आले. या सोबतच सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रगतीत असलेली कामे सुद्धा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित करावे , जेणेकरून करून परिसरात पाण्याचे डबके साचणार नाही ,नाली चोकअप होणार नाही , याबाबत आधीच उपाययोजना करण्याचे व त्याबाबत चे नियोजनासंदर्भात आपल्याला वेळोवेळी अवगत करण्यात यावे ,अशा सूचना सुद्धा आमदार महोदयांनी संबंधितांना दिल्या . दरम्यान स्थानिक नागरिक ,व्यापारी वर्गाशी सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी संवाद साधला . दरम्यान स्थानिकांनी आमदार महोदयां समक्ष काही समस्या कथन केल्या ,तसेच परिसरात विकास कामे व सौंदर्यीकरण्याची पूर्तता होत असल्याने आमदार महोदयांचे आभार मानीत अभिनंदन केले .
यावेळी वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ,प्रवक्ता ,तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके ,सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे ,शाखा अभियंता सुनील जाधव , माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी नगरसेवक-अविनाश मार्डीकर, निलेश शर्मा, प्रमोद महल्ले, योगेश सवई, दिलीप कडू, जितेंद्रसिंह ठाकूर, यश खोडके , बंडू निंभोरकर, किशोर भुयार, मनोज केवले, महेश साहू ,अमोल देशमुख, प्रा. डॉ. अजय बोंडे, भूषण बनसोड, कर्नलसिंग राहल, श्रीकांत झंवर, आनंद मिश्रा, प्रमोद सांगोले, सुयोग तायडे, सचिन दळवी,छोटू खंडारे, चेतन वाठोडकर, अनिल शुक्ला, शक्ती तिडके, संजय मळणकर, सचिन रहाटे, महेश साहू, भोजराज काळे, प्रशांत महल्ले, सनाउल्ला खान ठेकेदार, हबीब खान ठेकेदार, सय्यद साबीर, अबरार मोहम्मद साबिर, समिउल्लाह पठाण, नईम भाई चुडीवाले, दिलबर शाह, हाजी रफिकभाई, सादिक रजा, सनाउलला सर, फारूक भाई मंडपवाले, बंडू धोटे, शुभम पारोदे, महेंद्र किल्लेकर अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू हे एक दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू हे
एक दिवसाच्या जिल्हा दौर्याजवर येणार असून यात येथे जाहीर सभा होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा राज्यमंत्री ना. बच्चू कडू हे २७ मे रोजी जिल्हा दौर्याशवर येत आहेत. या दौर्याेत ते यावल येथेही येणार असून त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी येथे नियोजनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पक्षाचे युवा पदाधिकारी धीरज चौधरी, अभिमन्यू चौधरी, शहराध्यक्ष तुकाराम बारी, हाजी हकीम खाटीक, दिलीप वाणी, आलीम शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष हाजी हकीम शेख, तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, गोकुळे कोळी, नितीन बारी यांच्यासह मोठ्या संख्येत प्रहार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. २७ मे रोजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थिततीत बोरावल गेटपासून रॅली निघणार आहे. यानंतर सुदर्शन सिनेमा टाँकीज यावल ६,३० वाजता सभा होणार आहे. याचे नियोजन करण्याचे या बैठकीत ठरले. अनिल चौधरी यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बच्चू कडू हे पहिल्यांदाच यावल येथे येणार असल्याने या दौर्या बाबत उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याच दौर्यासत ना. कडू यांच्या उपस्थितीत यावल तालुक्याती अकलूद आणि फैजपूर येथे देखील कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची करमाळा व माढा तालुका कार्यकारिणी जाहीर

0

 

उषा पानसरे मू.का, संपादक असदपुर मो. 9921400542
दिनांक 28 मे!

सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची करमाळा व माढा तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांच्या आदेशानुसार व पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करून नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी : बाळासाहेब भिसे, करमाळा तालुका कार्याध्यक्ष, आबासाहेब झिंजाडे, जेऊर शहर अध्यक्ष, शिंदे सर, करमाळा सह उपाध्यक्ष, खराडे सर, करमाळा तालुका संपर्कप्रमुख, , अक्षय वरकड करमाळा तालुका सह सचिव, क्रांतीदिप लोंढे टेंभूर्णी शहर अध्यक्ष, संजय चांदणे सदस्य, प्रदिप पवार सदस्य, श्रीमंत दिवटे सदस्य आदी पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथा सावंत यांनी केले तर आभार श्री. कुंदन वजाळे यांनी मानले यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य व उद्दिष्ट यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. माढा तालुका उपाध्यक्ष नाथा सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याची व संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हा महिला सचिव प्रमिला जाधव यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी संघटना कार्य करीत असल्याचे सांगितले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हा पदाधिकारी, करमाळा व माढा तालुका पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

हिंगणघाट व समद्रपुर तालुक्यात रेती घाटावर नियमांची पायमल्ली करून केला जात आहे उपसा.

0

 

कारवाईकडे दुर्लक्ष – नगरसेवक सौरभ तिमांडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मागणी.

ठेकेदाराला लोकप्रतीनिधीचे, महसूल अधिकारी व वाहतूक कर्मचारीचे पाठबळ.

सुप्रीम कोर्टाचे आदेशाचा सुद्धा अवमान महसूल विभाग मधील अधिकारी यांच्या कडून होत आहे.

हिंगणघाट:- २३ मे २०२२
वर्धा जिल्ह्यतील हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील महसूल विभागाच्या हद्दीमधील खर्डी-पारडी,खुनी,हळदगाव,मांडगाव,शेडगाव इत्यादी रेती घाटावरून अवैध रेती उत्खनन व लोडिंग रेतीची वाहतूक होत असल्याबाबत गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जिल्हा नियोजन समिती सदस्य वर्धा, नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच मुख्य अप्पर सचिव महसूल विभाग व उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन कारवाई करण्यासंबंधी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केली आहे.
तालुक्यात रेती घाटाचे काही ठिकाणी लिलाव झाले असून या लिलाव झालेल्या घाटावरून शासनाने नेमून दिलेल्या नियम निर्देशचे संबधित लिलाव ठेकेदरांकडून पायमल्ली होत असताना दिसत आहे. संबधित रेती उपसा करणाऱ्या ठेकेदाराला लोकप्रतीनिधीचे महसूल अधिकारी व वाहतूक कर्मचारी पाठबळ असल्याने ओव्हर लोड रेतीची वाहतूक शहरातून दिवसा ढवळ्या व रात्री बेधडक पने होत आहे. पण संबधित ओव्हर लोड रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यावर प्रशासन कडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने जनतेत संबधित प्रशासन विरोधात रोष निर्माण होत आहे. या मध्ये काही अवैध रेती तस्कर सुद्धा वाहत्या गंगेत हात धुणे या म्हणी प्रमाणे लिलाव न झालेल्या घाटावरून रेतीची चोरटी वाहतूक करीत आहे व शासनाच्या लाखो रुपयांचा महसूलची हानी करीत आहेत. संबधित रेती उत्खनन करणाऱ्या कडून शासन नियमाचे पालन न होत असल्याने व अवैध रेती उत्खनन करणाऱ्या तस्कराचे प्रमाण वाढून पर्यावरणास हानी पोहचत आहे. पर्यावरणाचा होत असलेले नुकसान बघून व अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती तस्काराच्या मुसक्या आवळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी पुढाकार घेऊन संबधित महसूल विभाग मधील अधिकारी यांची विभागीय चौकशीसाठी व रेती उत्खनन करणाऱ्या रेती तस्कर वर कारवाई साठी निवेदना देण्यात आले आहे.
हिंगणघाट तालुका जि.वर्धा मधील महसूल विभाग हिंगणघाट यांच्या हद्दीत येत असलेल्या खर्डी पारडी समुद्रपूर तालुक्यातील खुनी,हळदगाव,मांडगाव,शेडगाव इत्यादी या रेती घाटावरून पोकलेन व बोटी द्वारे अवैध रेतीचे उत्खनन केले जात आहे व रेतीचा उपसा शमतेपेक्षा जास्त टिप्परमध्ये भरणा करूज अवैध वाहतूक केली जात आहे. या अवैध रेती उत्खननमध्ये स्थानिक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी सामील असून लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे महसूल विभाग मधील कर्मचारी कोणतेही कारवाई करीत नाही.
सदर रेती तस्करी करणारे तस्कर हे बिनधास्त दिवसा ढवळ्या व रात्रीच्या सुमारास रेती वाहतूक करीत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना दिवस- रात्र वाहतुकीच्या रहदारीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठे होऊ शकत नाही. असे असताना रेती उत्खननकरणाऱ्या रेती तस्करान कडून पर्यावरणाचा नाश होत आहे. नदीमधुन पोकलेन व बोटी द्वारे रेतीचा उपसा केल्यामुळे मोठमोठे खड्डे सुद्धा पडले आहे व त्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये अनेक जीव सुद्धा गेले आहे अशा अनेक घटना नेहमी घडत असते. गावातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु दबावात असलेल्‍या महसूल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे व कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही या सर्वांवर कडक कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक महसूल अधिकारी यांनी रेती उत्खनन करणाऱ्या समोर लाचारी पत्करली असून रेती उत्खनन करणाऱ्या रेती तस्करा सोबत लागेबांधे असल्याने कायदा पायदळी तुडवत रेती तस्कर सर्रास पने रेती तस्करी करीत आहे. यामध्ये आर.टी.ओ,खनिकर्म अधिकारी यांच्या संगनमताने ही अवैध तस्करी सुरू आहे.
वेळीच या मोठ्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती तस्करच्या मुसक्या आवळणयासाठी आपण
आपल्या स्तरावरून योग्य कारवाई करावी. याबाबत सदर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक रेती घाटावर सी.सी.टीव्ही कॅमेरा बसविणे बंधनकारक असून या सी.सी.टीव्ही कॅमेराचे फुटेज खानिकर्म अधिकारी यांना दर महिन्याला सादर करणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे आदेशाचा सुधा अवमान महसूल विभाग मधील अधिकारी यांच्या कडून होत आहे. संबंधित महसूल विभाग अधिकारी यांची सी.सी.टीव्ही फुटेज बाबत विभागीय चौकशीची मागणी नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी निवेदना द्वारे केली आहे.सदर निवेदन वर योग्य व निःपक्ष कारवाई करावी.अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासना विरोधात जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

मावसभाऊचा मान पानाचा विषय नडला साकळी येथील अल्पवयीन मुलीचा होत असलेला विवाह प्रशासनाने रोखला

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील साकळी येथे लावण्यात येत असलेला बालविवाह प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी.अर्चना आटोले वेळीच दखल घेतल्याने तात्काळ थांबविण्यात आला , याबाबत वधु आणी वर पक्षांची पोलीस ठाण्यात समज दिल्यानंतर दोघ भावी पती पत्नी यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहिती अशी की आज दिनांक २३ मे रोजी साकळी तालुका यावल येथे मनिषा बुधा भालेराव वय १७ वर्ष६ महीने राहणार देवगाव तालुका चोपडा या अल्पवयीन मुलीचा विवाह गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे वय२७ वर्ष यांचा विवाह ठरलेल्या प्रमाणे होणार होता मात्र नवरीच्या मावस भाऊ रविन्द्र शालीक सोनवणे यांनी यावल येथे दिनांक २२ मे २०२२रोजी येथील महिला व बालविकास प्रकल्पच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या होत असलेल्या बालविवाह संदर्भात अर्ज दिल्याने या अर्जाची तात्काळ दखल घेत संबधीत विभागाच्या वतीने अर्चना आटोले यांच्या मार्गदर्शना कत्पना तायडे आणी मंगला नेवे यांनी साकळी येथील भवानी माता मंदीर हॉल लग्नास्थळी जावुन हा होणारा बालविवाह थांबविला . वधु आणी वर कडील मंडळींना महिला व बालविकास प्रभारी अधिकारी अर्चना आटोले, कल्पना तायडे पर्यवेक्षीका व साकळी अंगवाडीच्या सेविका मंगला नेवे यांच्या मदतीने यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी हा विवाह थांबविला व लग्न लावणाऱ्या दोघ कडील मंडळीला अखेर पोलीस ठाण्यात यावे लागले , या ठिकाणी पोलीसांच्या मदतीने महिला बालविकास अधिकारी अर्चना आटोले यांच्या मध्यस्थळीने मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदरचा विवाह लावता येणार नाही तसे झाल्यास आपल्या विरूद्ध गुन्हे दाखल होतील अशी माहीती वधु वराच्या मंडळींना पोलिसांकडुन मिळाल्याने अखेर हा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला या संदर्भात पोलीसांनी वधु आणी वर मडंळीचे जाब जबाब घेतल्याने दोघ लग्न लावणारी मंडळी ही आपआपल्या गावी निघुन गेली . मानापानाचा विषय नडला व वधुचा मावसभाऊ रविन्द्र शालीक सोनवणे याच्या अर्जाने हा विवाह रखडला, आपल्या बहीणीच्या विवाह व्हावा या साठी धावपळ करणाऱ्यांनीच महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सदरचा विवाहीतील नवरी ही अल्पवयीन असल्याचे दाखले व अर्ज दिनांक २२ मे२०२२ रोजी येथील कार्यालयात दिल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले .

महसूल विभागाकडून लेआऊट धारकाकडून कोणतीही व्यवस्था नसतांना प्लॉट विक्रीची परवानगी कशी ?

0

 

हिंगणघाट /समुद्रपूर तालुक्यात अनेक सामान्य लोकांनी हप्तेवारीवर प्लॉट घेतले आहे. परंतु त्याठिकाणी राहण्याजोगी व अकृषक प्लॉट साठी जे नियम आहे. आहे ते ले आऊट मालक यांच्याकडून पुर्ण करण्यात आले नाही तरीहि ले आऊट मधील प्लॉट ची विक्री होते ?
याबद्दल महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ले आऊट धारकांची तक्रार प्राप्त होताच ले आऊट मालकाला नोटीस बजावण्यात येईल व कार्यवाही करून प्लाट विक्री परवाना रद्द करण्यात येईल,
हिंगणघाट समुद्रपुर तालुक्यात अशी अनेक लेआऊट आहे त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नसताना प्लॉटची विक्री करण्यात येते हिंगणघाट/ समुद्रपूर तालुक्यात लेआऊट धारक यांची चौकशी करून महसूल अधिकारी यांनी कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ले आऊट मध्ये प्लॉट विक्रीची परवानगी रद्द करून राहण्याजोगी व्यवस्था झाल्यावर प्लॉट विक्रीची परवानगी देण्यात यावी . हिंगणघाट /समुद्रपूर तालुक्यात विक्री थांबवावी. अशी मागणी प्लॉट खरेदी केलेल्या ग्राहकाकडून होत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

यावल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शासकीय योजना , महीला अत्याचार कायदेविषयक शिबीर संपन्न

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या अंतर्गत यावल तालुका विधी सेवा समिती व्दारे आयोजीत करण्यात आलेले कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर यावल येथे न्या ..एम .एस .बनचरे तसेच विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. यावल येथील पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अंतर्गत यावल विधी सेवाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कायदेविषयक शिबीराच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे न्या .एम.एस .बनचरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणुन निवासी नायब तहसीलदार आर के पवार , पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) , यावल पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे , महीला व बालविकास कार्यालयाच्या प्रभारी अर्चना आटोले , संजय गांधी निराधार समिती विभागाच्या नायब तहसीलदार सौ .बबीता भुसावरे , अॅड .डी. आर . बाविस्कर , अॅड .अशोक सुरळकर यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते . यावेळी न्या. एम .एस .बनचरे यांनी गरजु लोकांना मोफत कायदेशीर मदत व सरकारी खर्चाने न्याय मिळवुन देणे , मध्यस्थता केन्द्रा मार्फत आप आपसातील वाद समोपचाराने सोडविणे , महीलांच्या विविध कायदेशीर अधिकारी व त्यांच्यावरील होणारे लैंगिक शोषण व गर्भलिंग निदान प्रतिबंधक्र कायद्याविषयी तसेच बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचे प्रसार प्रचार करणे आदी विषयाबाबत या शिबीराच्या माध्यमातुन जनजागृतीपर कायदेविषयक मार्गदर्शन केले . यावेळी निवासी नायब तहसीलदार आर के पवार , गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड , ग्राम पंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी उपस्थितांना शासकीय योजनेचा लाभ मिळवाया विषयी व पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड यांच्या सह आदी महत्वाच्या विषयांची सविस्तर माहीती दिली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी केले तर उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी मानले .

सि. एन.आय चर्च येथे राजू रेड्डी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे उदघाटन संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : येथील सेंट थॉमस चर्च
मध्ये 788,000 अंदाजित रक्कमेचा ट्रान्सफॉर्मर सहा विद्युत पोल व थ्री फेज कनेक्शन सह महावितरण तर्फे बसविण्यात आले.

सदर ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी व रेव्ह. पास्टर संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

चर्च मध्ये होणाऱ्या लोड एक्स्टेन्शन नियंत्रित करण्याकरिता पास्टरेट कमिटीने प्रस्ताव तयार करून महावितरण कार्यालयाला पाठविले सदर कार्याच्या मंजुरी करिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, रोशन दंतलवार, विशाल मादर यांनी सतत पाठपुरावा करून मंजूर करवून घेतले.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, जयराज तांड्रा, तिरुपती महाकाली,सुकुमार गुंडेटी,
अलीम शेख, मोसीम शेख, नूरुल सिद्दीकी, रफिक शेख,सुनील पाटील,अंकुश सपाटे, बालकीशन कुळसंगे, व मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते.

महामिनरल & मायनिंग ट्रान्सपोर्ट आंदोलनाला यश

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : येथील महामिनरल & माईनींग (गुप्ता वॉशरीज) मध्ये स्थानिक वाहतूक दारांच्या वाहतूक भाडेवाढी मध्ये पंचवीस टक्के वाढ, रस्ता दुरुस्तीकरण, इंधन दरवाढ व अन्य न्यायपुर्ण
मागण्या करिता दिनांक 20 मे दुपारी 03 वाजता पासून कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
सदर आंदोलन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, संघटना पदाधिकारी राकेश खोब्रागडे, श्रीनिवास गोस्कुला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

वॉशरीज परिसरात वाहनांच्या रांगाच – रांग लागल्या शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक बबनराव पुसाटे, उप – निरीक्षक मेघा गोखरे, यांनी पोलीस बंदोबस्त लावला व दंगा नियंत्रण तैनात केले.

21 मे रोजी सायंकाळी वॉशरिज च्या कार्यालयात कंपनी अधिकारी शशिकांत गुप्ता, सुयोग बिडलावार, संजय सरागे, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, राष्ट्रवादी चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, कामगार नेते सैय्यद अनवर, राकेश खोब्रागडे,श्रीनिवास गोसकुला, बंटी जैस्वाल, अंगद बिराम यांच्यात संयुक्त बैठक झाली यात कंपनीने वाहतूक भाड्यात पंचवीस रुपये वाढी सह सर्व मागण्या मान्य केल्याने

चालक मालक संघटनेने आनंद व्यक्त करीत आपल्या कामाला सुरुवात केली

राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक घुग्घुस येथे महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा शिवसेनेची मागणी.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस शहरातील शिवाजी महाराज नवीन बस स्टॉप शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना घुग्घुस व तालुका चंद्रपूर घ्या वतीने करण्यात आली. असे असून तसे निवेदन नगर परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली. असे असून हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे महाराष्ट्र भुजन जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकांसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून व त्यांची माहीति सदा सदैव चिरस्मरणात राहावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नवीन बस स्टॉप चौकात महाराजांच्या अश्वारूढ पुतळा प्रशासनाने उभारावा अशी मागणी शिवसेना घुग्घुस चा वतिने करण्यात आली. असे निवेदन देताना शिवसेना ऊप तालुका प्रमुख गणेश शेंडे घुग्घुस जिल्हा चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ उज्वलाताई नलगे व महिला आघाडी जिल्हा सघटिका कुसूम ताई, उदार सौ संजना ताई जगताप बाबु चिकन कार खूशाल बोंड शहंशाह शेख यमराज बावणे चेतन बोबडे व सर्व महिला शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.