Home Blog Page 304

स्वताःचे करु दिले नाही कन्यादान मी दानाची वस्तू नाही बाबा तूमची मूलगी आहे !

0

 

उषा पानसरे मूख्य का. सपादक मो 9921400542 असदपूर

दिनाक 4 मे अमरावती

स्वताःचे करू दिले नाही कन्यादान तपस्याने ! नरसिंगपूर एका महिला आय एएस अधिकारी व आय एफ एस अधिकार्‍याचे लग्नाच्या चर्चत आले आहे तपस्या परिहार हे महीला अधिकारीचे नाव असून त्यानी कन्यादान विधीला नकार दिल्यामूळे या विवाहाची सर्वीकडे चर्चा चालू आहे मी दानाची वस्तू नाही मी मूलगी आहे असे सांगून तिने वडीलाना कन्यादान करण्यास नकार दिला तपस्या परिहार यांनी यूपी एससी परिक्षेत 23 वे स्थान मिळवले होते त्या 2018 च्या तूकडीतील अधिकारी आहेत त्यानी पूण्यातून कायदयाने शिक्षण पूर्ण केले त्याचा विवाह गर्वित गंगाधर यांच्या सोबत झाला विवाहात वडीलांना तपस्याने कन्यादान विधीला नकार दिला विवाहत कन्यादान विधीला विशेष महत्व असते मात्र तपस्या परिहार यांनी सांगितले कि मला प्रश्व पडला माझे कोणी कसे काय दान करू शकतो? तसे शक्य असेल तर उदाला कोणीही माझया ईच्छेविरूध्द मर्जी खिलाप माझे दान करू शकेल ! बाबा मी तूमची मूलगी आहे दानाची वस्तू नाही ?
तपस्या च्या पतीने त्याचा विचाराचा मान ठेवला?
तपस्या चे विचार अगदी बरोबर आहे वडील मूलीला लहानण्याचे मोठे करतो व एक दिवस तिला कन्यादान करूण दान करतो जसे तिचे आई वडीलाचा माहेरच संपले ?

दारू व जुगार च्या आहाराने युवकांन मध्ये चोरी करण्याचे प्रमाण वाढत आहे

0

 

हिंगणघाट :- सौ. सोनाबाई ज्ञानेश्वर मुसळे वय 51 वर्षे रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट यांनी पो.स्टे. ला रिपोर्ट दिली की, दि. 2 मार्च रोजी घरी भिमनगर वार्ड हिंगणघाट येथे हजर नसतांना कोणीतरी अज्ञात ईसमाने घरातील मागच्या बाजुस असलेल्या बाथरूमच्या वरून घरात प्रवेश करून घरातील मागील दार उघडुन किचन रूम मधील लोखंडी कपाटाच्या लाॅकर मध्ये ठेवलेले नगदी व सोन्या चांदीचे दागीने असा एकुण 2,63,480/- रू चा माल चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वर पो.स्टे. हिंगणघाट येथे अप. क्रमांक 1022/2021 कलम 454, 380 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात ठाणेदार श्री. संपत चव्हाण यांनी पोलीस उप निरीक्षक सोमनाथ टापरे यांना गुन्हयाची उकल करण्याचेसंबंधाने महत्वपुर्ण मार्गदर्शन करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुशंगाने पो.उप.नि. सोमनाथ टापरे व त्यांचे पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे भरीव व गुणवत्तापुर्ण तांत्रीक तपासावरून आरोपी नामे विकास अरूण वडे वय 29 वर्शे रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट यास निश्प्ण्ण करून त्याचे त्याब्यातुन दोन मोबाईल किंमत 11,000/- रूपये, आणी नगदी 2) 5000/- रूपये असा एकुण 16,000/- रू चा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. आरोपीस दारू व जुगाराचे जास्त व्यसन असल्याने त्याने सदरचा गुन्हा केल्याचे व रक्कम हरल्याचे कबुल केले आहे. पुढील तपास पोउपनि सोमनाथ टापरे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार पोउपनि सोमनाथ टापरे यांचे सह गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडेे, उमेश बेले, संग्राम मुंढे यांनी केली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत बलात्कार चार जणांविरुध्द गुन्हा

0

 

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल : तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तरूणाने अपहरण केले व तिला आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने नासिक येथे घेवून गेला आणी आपल्या नातेवाईक दाम्पत्याच्या घरी तिच्यावर लैगीक अत्याचार केला तेव्हा चार दिवसात सदर पिडीता घरी परतली व रविवारी दिनांक १ मे रोजी चार जणांविरूध्द बालकांचे लैगीक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातुन १६ वर्षीय तरूणीचे दिनांक २७ एप्रिल २०२२ रोजी पहाटे गावातील तरूण चंद्रकांत उर्फ भुषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने महेंद्र कोळी आसोदा ता.जळगाव याच्या मदतीने अपहरण केले व त्या अल्पवयीन मुलीस नासिक येथील नातेवाईक दिपाली जितेंद्र कोळी व जितेंद्र कोळी यांच्या घरी घेवुन गेला आणी ठिकाणी मुलीवर लैगीक अत्याचार केले चार दिवस अल्पवयीन नासिकला होती व रविवारी ती घरी परतली आणी घडलेली घटना कुटुंबास सांगीतली तर या पुर्वी या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा यावल पोलिसात दाखल होता तेव्हा अल्पवयीन मुलगी घरी पतल्याचे समजताच पोलिसांनी अल्पवयीन व चंद्रकांत उर्फ भुषण सोनवणे (कोळी) याच्या ताब्यात घेतले व अल्पवयीन मुलीचे महेंद्र कोळी आसोदा ता. जळगाव याच्या मदतीने अपहरण केले व नासिकच्या जितेंद्र व दिपाली कोळी या दाम्पत्याच्या घरी लैगीक अत्याचार केला म्हणुन चौघांविरूध्द यावल पोलिसात बालकांचे लैगीक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व उर्फ भुषण सोनवणे (कोळी) यास अटक करण्यात आली आहे तर इतर तीघांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे पुढील तपास यावलचे पोलिस निरिक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात कामगारांचा सत्कार

0

 

कामगार हेच देशाचे गौरव- विवेक बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 1 मे रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात कामगारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कामगारांचे पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. कामगार हेच देशाचे गौरव आहे. जागतिक स्तरावर कामगार चळवळ सुरु झाली तेव्हा कामगारांची मुख्य मागणी दिवसात आठ तास काम करण्याची होती. कामगारांच्या प्रयत्नांचे व कार्याचे प्रतिक म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. पूर्वी कामगारांचे मोठया प्रमाणात शोषण केले जात होते. दिवस भरात पंधरा तास कामगारांना काम करावे लागत होते. या अन्यायाच्या विरुद्ध कामगार एकत्र आले व आपल्या हक्कासाठी आवाज उठवीला. 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, कामगार अंकुश सोदारी, धनराज झूरमुरे, अशोक भोयर, सुरेश पेंदोर, अशोक मांझी, भाजपाचे नितीन काळे, अजय लेंडे, उपस्थित होते.

7 वर्षीय अलिना ने ठेवला मोठा रोजा

0

 

ईस्लाम धर्मात पवित्र माहे रमजान मध्ये प्रत्येक सज्ञान व्यक्तीस स्त्री पुरुषाना उपवास (रोजा) ठेवणे अनिवार्य असल्याने मध्यरात्री खान पान करून सुर्य मावळल्यानंतर उपवास सोडावे लागते १ महिणाभर उपवास ठेवणे अनिवार्य असल्याने सज्ञान स्त्री पुरुष वृद्ध दैनदिन महिणाभर उपवास ठेवतात २६ वा उपवास सर्वात मोठा असल्याने अन्यसाधारण महत्व आहे याच दिवशी संपुर्ण रात्र प्रेषीत यांच्या शिकवणी प्रमाणे एकेश्वर समोर नतमस्तक होऊन ईश्वर कडे झोकुन रात्रभर मस्जीद मध्ये प्रार्थना करतात.
तालुक्यातील वरवट बकाल येथील पत्रकार शेख अनिस यांची 7 वर्षीय अलिना सहेर या चिमुकली ने आज दि. 29 एप्रिल रोजी 26 वा रोजा (उपवास) ठेवला.
मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना हा पवित्र महिना मानला जातो. दर वर्षी 10 ते 12 दिवस आधी म्हणजे मागच्या वर्षीच्या 12 दिवस आधी हा महिना येत असून या वर्षी 3 एप्रिलला पहिला उपवास आला. या वर्षीचे तापमान 42 अंशाच्या वर असून या रखरखत्या उन्हात 7 वर्षीय अलिना ने पहाटे 4:30 वाजता सहेरी करून सायंकाळी 6:50 वाजता उपवास सोडला असून एकूण 14 तासाचा उपवास अलिना ने ठेवला आहे. अलिना सहेर शेख अनिस याचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

काँग्रेस कार्यालयात राष्ट्रसंत तकडोजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

0

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचारांनेच हा देश समृद्ध होईल : काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गुस : राष्ट्रसंत तूकडोजी महाराज यांनी देशाच्या स्वातत्र्यलढ्यात भारत छोडो आंदोलनात सहभागी होवून नागपूर व रायपूर येथे तुरुंगवास भोगला स्वातंत्र्य प्राप्ती नंतर महाराजांनी ग्रामीण भागाच्या विकासावर कडे लक्ष केंद्रित करून अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून जात – पात – धर्म विरहित जीवनाची हाक दिली.
महाराजांनी ग्रामगीतेचे लेखन करून
“सबके लिये खुला है
मंदिर ये हमारा”अशी शिकवण दिली
आज दिनांक 30 एप्रिल रोजी घुग्गुस काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रसंताच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज देशात जाती धर्मात सातत्याने द्वेश वाढविण्याचा प्रयत्न होत असून देशाची एकता अखंडता अबाधित राखण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांची अत्यंत आश्यकता असल्याचे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राजूरेडडी यांनी केले
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन
दांतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,रफिक शेख,सुनील पाटील,कपिल गोगला,अंकुश सपाटे,रंजीत राखुंडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

घुग्घुस रामनगर wclवेकोली कॉलनीत ट्रान्सफॉर्मरला आग लागली.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस मध्ये जसजसा उष्णता वाढत आहे, तसतशी आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत आगीच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. आज शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वेकोलि कॉलनी, रामनगर येथे अचानक ट्रान्सफॉर्मरला आग लागली. काही वेळातच ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीने दुहा निघत होता .काही वेळातच
ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने रस्त्यावर लोक एकत्रीत झाले .माहिती मिळताच घुग्घुस नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
कोणताही प्रकारची हनी झाली नाही.

यावल येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी मंडळाधिकारी आणि तलाठी यांची आढावा बैठक पार पडली

0

 

तहसीलदार महेश पवार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिल्या सूचना

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

प्रत्येक मंडळाधिकारी व तलाठ्याने आपल्या कडील पोट खराब जमिनीचे क्षेत्र लागवड योग्य क्षेत्रात समाविष्ट करणे बाबतचा प्रस्ताव गावनिहाय तयार करावा आणि शेतकऱ्यांना देखील या संदर्भात माहिती देऊन शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मांगवून घेत त्यांना क्षेत्र दुरूस्तीचा लाभ घ्यावा अशा सूचना तहसीलदार महेश पवार यांनी केल्या ते शुक्रवारी येथील तहसील कार्यालयामध्ये मंडळ अधिकारी,तलाठी यांच्या बैठकीत बोलत होते
येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी मंडळाधिकारी आणि तलाठी यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातील पोट खराब जमिनीचे क्षेत्र लागवड योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासंदर्भात शासनस्तरावर सुरू असलेल्या मोहिमेत प्रत्येक मंडळाधिकारी व तलाठी यांनी आप आपल्या कार्यक्षेत्रातील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या क्षेत्र दुरूस्ती मोहिम सुरू असुन याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला पाहिजे या उद्देशाने तहसिलदारांनी सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना सूचना केल्या. त्याचप्रमाणे या बैठकीत तलाठी रेकॉर्ड तपासणी अहवाल, अंतर्गत लेखा वसूली संदर्भात माहिती, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय जागा मागणीचा प्रस्ताव, अक्षरी भूमापन क्रमांक असलेल्या गट दुरुस्ती करून अहवाल तपासणी, प्रलंबित फेरफार संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकारी स्तरावरील माहिती या बैठकीत घेण्यात आली तसेच डी एस डी गट शंभर टक्के पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून चावडी वाचन ची तयारी आप आपल्या स्तरावर प्रत्येकाने करावी अशा सूचना या बैठकीत तहसीलदार महेश पवार यांनी केल्या. या बैठकीत तहसीलदार महेश पवार सह निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, मंडळ अधिकारी सचिन जगताप, शेखर तडवी, पी.ए. कडनोर, एम.एच. तडवी, बबीता चौधरी, सह सर्व तलाठी उपस्थित होते.
आजवर ५०८ प्रस्ताव.
यावल तालुक्यातुन आजवर एकुण ५०८ पोटखराब क्षेत्र दुरूस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे व त्यांच्या अधिकृती नोंदी करीत सदरील प्रस्ताव भूमिअभिलेख विभागात सादर करण्यात आले आहे.
पोट खराब क्षेत्र दुरूस्तीचा लाभ घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी आपल्या सातबारावरील पोट खराब क्षेत्राला लागवड योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून सुरू असलेल्या मोहिमेत सहभाग घेत क्षेत्र दुरूस्त करून घ्यावे. पोटखराब क्षेत्र दुरूस्त केल्यावर त्याचा पिक कर्ज, शेतातील लोगवडक्षेत्र सह विविध कामी होतो तेव्हा या मोहिमेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यावा.
महेश पवार, तहसिलदार यावल.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती जिल्हा स्तरिय चर्चा सत्र (डी एल सी)…..

0

 

उषा पानसरे असदपूर
दिनाक 29 एप्रिल अमरावती

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 देशामध्ये परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने देशपातळीवर व राज्यांमध्ये (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा/ राज्य अभ्यासक्रम आराखडा) निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.अभ्यासक्रम निर्मितीप्रक्रियाच्या अनुषंगाने राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अमरावती व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना प्राप्त झालेली आहे.
राज्याचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा(एन सी एफ)/ राज्य अभ्यासक्रम आराखडा(एस सी एफ) मध्ये समावेश करण्यात येणाऱ्या बाबींच्या पूर्ततेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(डाएट) अमरावती च्या वतीने दिनांक 22 एप्रिल, 2022 ला संस्थेत एक दिवसीय जिल्हास्तरिय चर्चासत्र (डी एल सी) संपन्न झाले. सदर डी एल सी चे समन्वयन व मार्गदर्शन एन सी ई आर टी नवी दिल्ली येथून श्री. विशाल पाजणकर, सहाय्यक प्राध्यापक व आर आई इ भोपाळ येथील श्री. संजय पंडागळे सहाय्यक प्राध्यापक यांनी केले. एन ई पी 2020 मध्ये निश्चीत केलेल्या इ सी सी इ , शालेय शिक्षण I & II , शिक्षक शिक्षण, प्रौढ शिक्षण या डोमेन प्रमाणे 5 गटात विभागणी करण्यात आली होती. यात एकूण 80 सहभागींनी सक्रीय प्रतिसाद नोंदविला.
प्रत्येक डोमेन मध्ये अंतर्भूत प्रश्नांचा सखोल व विविध संदर्भाने चिंतन करून डोमेनमधील प्रश्नांच्या परिणामकारक पूर्ततेसाठी लिखित स्वरूपात मते मांडून प्रश्न निहाय अपेक्षित उत्तरांचा समावेश करण्यात आला. डोमेन निहाय निश्चित केलेल्या गटांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती मधील ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, अध्यापक विद्यालय प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विषय साधन व्यक्ती,पालक,अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका,विद्यार्थी, शिक्षण तज्ञ व शिक्षण प्रेमी इत्यादी अभ्यास व चिंतन असणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. यासोबतच संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, प्रशांत डवरे,पवन मानकर अधिव्याख्याता यासह संस्थेतील विषय सहायक सहाय्यक,कैवल्य फौंडेशनचे समन्वयक स्वप्नील बनसोड आणि ज्योत्स्ना मेहकरे आणि फेलो व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहभागी घेतला.

आयएमए चंद्रपूर व सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसच्या माध्यमातून कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी शिबिराचे आयोजन – देवराव भोंगळे

घुग्घुस येथील प्रयास सभागृहात आयएमए चंद्रपूर व सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे अस्थायी कामगारांच्या आरोग्य तपासणीचे शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अमोल पोद्दार, सचिव डॉ. नगीना नायडू, कोषाध्यक्ष डॉ. अमित देवईकर, डॉ. पुनम नगराळे, डॉ. करुणा रामटेके, डॉ. राकेश संगत, रियांशु तावाडे, सत्यजित पोद्दार, प्रशांत रामटेके भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, जेष्ठ नागरिक प्रेमलाल पारधी, गजानन जांभुलकर, भारत गाताडे, वसंता गोनेवार, अरविंद गाताडे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. उन्हात काम करतांना कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. प्रदूषणामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो, कामगारांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना कामगारांसाठी काढल्या आहेत. प्रत्येक कामगारांनी ई-श्रम कार्ड काढावे तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काढावी.
डॉ. अमल पोद्दार यांनी उपस्थित कामगारांना काम करत असतांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजीबद्दल सविस्तर माहिती दिली.
डॉ. नागिना नायडू यांनी संबोधन करतांना कामगारांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, बिमारी अंगावर काढू नये तसेच गरज भासल्यास सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.
मोठया संख्येत उपस्थित कामगारांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांमार्फत करण्यात आली व मोफत औषधं वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपाचे स्वप्नील इंगोले, शरद गेडाम, सिनू इसारप, श्रीकांत सावे, दिलीप कांबळे, असगर खान व मोठया संख्येत कामगार उपस्थित होते.
संचालन वाहतूक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी यांनी तर आभार अजगर खान यांनी मानले.