Home Blog Page 305

पालकमंत्री यांचा मार्गदर्शनात व शिवानीताई वडेट्टीवार नेतृत्वात भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

कामगारांच्या असंख्य उपस्थितीत पार पडला विजयक्रांती कामगार संघटने मार्फत आयोजित कामगार मेळावा

कामगार बांधव हा औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे. औद्योगाची भूमिका हि नेहमी कामगार केंद्रित असायला पाहिजे- विजयभाऊ वडेट्टीवार

दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी नकोडा येथील फुले-शाहू-आंबेडकर रंगमंच नकोडा येथे विजयक्रांती कामगार संघटना मार्फत भव्य कामगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कामगार मेळावा मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजयभाऊ वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवक कॉंग्रेस तथा अध्यक्षा, विजयक्रांती कामगार संघटना कु. शिवानी ताई वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजित भव्य कामगार मेळावा प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या आगमनाकरिता पांढरकवडा-घुग्घुस-एसीसी मार्गे कामगाराची भव्य रैली सह मान्यवराचे स्वागत करण्यात आले. विजयक्रांती कामगार संघटना फलकाचे अनावरण मा.विजयभाऊ वडेट्टीवार व कु. शिवानीताई वडेट्टीवार यांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विजय क्रांती कामगार संघटनाच्या अध्यक्षांनी कामगारबांधवांना विजय क्रांती कामगार संघटना हि सर्वस्वी कामगाराच्या हितार्थ आहे. हि संघटना प्रत्येक कामगाराच्या सामाजिक उत्कर्षासाठी, नैतिक मुल्य जपण्यासाठी तसेच हित संबंध संरक्षण व संवर्धणासाठी कार्य करते. तसेच हि एकमेव संघटना आहे, जी कामगारचा कल्याणार्थ सातत्याने कार्यरत आहे. असे प्रतिपादन शिवानीताई वडेट्टीवार यांनी उपस्थितांना केले.
कामगार बांधव हा औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे. औद्योगाची भूमिका हि नेहमी कामगार केंद्रित असायला पाहिजे. तशी भूमिका ठेवणारा कुठलाही उद्योग अपेक्षित भरभराटी साधल्या शिवाय राहणार नाही. कामगार वर्गाला न्याय व त्यांच्या रास्त मागण्यासाठी मी देखील तुमच्या खांद्याला खांदा लाऊन तुमच्या सोबत असेल. असे प्रतिपादन पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी उपस्थिताना केले.
कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार न्यायिक स्वरुपात तसेच कार्यस्थळी सुव्यवस्था व सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने यामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कामगारामुळेच आज देश औद्योगिक व इतर क्षेत्रात अपेक्षित प्रगती करू शकला आहे.
आयोजित मेळाव्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष गडचिरोली मा. अड. राम मेश्राम , कामगार नेते विजयक्रांती कामगार संघटना विजय ठाकरे, कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी शहर कॉंग्रेसअध्यक्ष नंदू नागरकर यांची उपस्थिती होती. विजयक्रांती कामगार संघटनेचे कार्यध्यक्ष श्री. प्रवीणभाऊ लांडगे यांचा संकल्पना तथा मार्गदर्शना खाली भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विजयक्रांती कामगार संघटना एसीसी चांदा सिमेंट वर्कस् संघटनेचे महासचिव सतीश शेंडे, उपाध्यक्ष राज बावणे तसेच स्थायी संघटनेचे राजेश यंगलवार व उपाध्यक्ष नितीन पटेल, शिंदोला गोवारी माईन्स,चे उपाध्यक्ष सतिश जोगी व कंत्राटी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तू ठाकरे, अल्ट्राटेक सिमेंट,चे महासचिव सुनील ढवस व उपाध्यक्ष दशरथ राऊत, अंबुजा सिमेंट चे महासचिव बबन अत्राम व कार्याध्यक्ष सुधीर विधाते, पैनगंगा ओपन कास्ट,चे महासाचिव रोशन हरबडे व उपध्यक्ष जावेद खान,माणिकगड, दालमिया कंपनीचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

रोटरी उत्सव 2022

0

हिंगणघाट :- 28 मार्च पासून सुरुवात स्थानिक रोटरी क्लब चे वतीने हिंगणघाट येथील टाका ग्राउंडवर आजपासुन रोटरी उत्सवाला सुरुवात होत आहे.
मागिल दोन वर्षापासुन कोरोनाच्या संसर्गामुळे हिंगणघाट शहरात होणारा रोटरी उत्सव होऊ शकला नाही,त्यामुळे जनमाणसामधे मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. लोकांच्या आग्रहास्तव रोटरी उत्सव घेण्याचे ठरले.
या रोटरी उत्सवात क्लब दरवर्षी काही नाविन्यपुर्ण गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो.या वर्षीही महाराष्ट्र व राज्याबाहेरील आधुनिक वस्तुच्या 125 चे वर फुडस्टाल प्रदर्शनी स्टाल ऑटोमोबाईल्स धारकाला आमंत्रीत केले आहे.तसेन नवनवीन चविष्ट पदार्थाचे स्टाल धारक व सहकुटुबं येणार्‍या लहान मुलांसाठी आनंद देणारे भव्यदिव्य आकाश पाळणा,गाड्याची रेलचेल असेल तसेच 28 एप्रिल रोजी रो. माया मिहानी यांच्या मार्गदर्शनामधे ग्रुप डान्स , 29 एप्रिल रोजी रो. हितेश जोबनपुत्रा यांचे मार्गदर्शनत शालेय विद्यार्थ्यासाठी हिंगणघाट ॲायडॅाल ही गायन स्पर्धा होईल. 30 एप्रिल रोजी रो. प्रशांत मोहता यांचे मार्गदर्शनात क्या बोलती पब्लीक हा लाईव्ह शो , 1 मे रोजी रो. मुरली लाहोटी यांचे मार्गदर्शनात अखिल भारतीय कवी संम्मेलन होणार आहे. 2 मे रोजी रोटरी परिवार सदस्य द्वारा विविध कार्यक्रम प्रस्तुती राहील. असे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार,रो.उत्सवाचे चेअरमन पितांबरजी चंदानी, उपाध्यक्ष केदार जोगळेकर ,क्लब सचिव पुंडलिक बकाने , जितेंद्र वर्मा , उत्सव सचिव डा. सतीश डांगरे , शाकिर खान पठान , प्रा माया मिहानी , प्रा अशोक बोंगीरवार यांनी सांगितले.
रोटरी उत्सव हिंगणघाट शहर वासीयानसाठी मनोरंजची मेजवानी असतेच पण यावर्षी त्यापेक्षाही अधीक मनोरंजन देणारा राहिल अशा सुभेच्छाआमदार समिर कुणावार यांनी दिल्या . 28 मार्च गुरुवार पासुन सु्रु होणार्‍या रोटरी उत्सवाची तयारी करण्याकरीता डाॅ.अशोक मुखी, मुरलीभाऊ लाहोटी, मुकुंदजी मुँधड़ा , राजु गुलकरी , दिगांबर खांडरे ,पंकज देशपांडे, सुरेश चौधरी, हितेंद्र जोबनपुत्रा , ड़ा संदीप मुड़े , ड़ा रुपेश हिवरकर, उदय शेंडे , मंजूषा मूळे , शशांक खांडरे , वैभव पटेलिया , कृष्णा जोशी , धीरज मंडोत व सर्व रोटरी सदस्य सक्रियपने कार्य करीत आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

मंगळवारी यावल येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक संपन्न

0

 

 

यावल (प्रतिनिधी)निधी विकी वानखेडे

यावल : येथील तहसिल कार्यालयात मंगळवारी संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली समिती समोर १ हजार २६५ प्रकरण ठेवण्यात आले होते त्यातील ३१० प्रकरण मंजुर करण्यात आली आहे तर उवर्रित प्रकरणांची पडताळणी केल्या नंतर ते पुढील बैठकीत समिती समोर ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रकरणात त्रुट्या आढळल्या त्यांच्या त्रुट्यांची पुर्तता करण्याच्या सुचना समिती अध्यक्ष शेखर पाटील यांनी केल्या आहे.
मंगळवारी येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील होते या प्रसंगी समिती पुढे १ हजार २६५ प्रकरण ठेवण्यात आले होते या पैकी ३१० प्रकरण मंजुर करण्यात आले आहे. तर उवर्रित प्रकरणांची प्रशासकिय पातळीवर पडताळणी आणी छाणणी करण्याच्या सुचना आणी ज्या प्रकणारत त्रुट्या आढळून आल्या त्या प्रकरणातील संबधीत त्रुट्या दुर करण्या कामी अर्जदारांना सुचना करीत त्रुटयांची पुर्तता केली जावी अशा सुचना बैठकीत अध्यक्ष शेखर पाटील यांनी दिल्या आहे. बैठकीत समिती अध्यक्ष शेखर पाटील सह तहसिलदार महेश पवार, निवासी नायब तहसिलदार आर. के. पवार, संजय गांधी योजना समिती नायब तहसिलदार भाग्यश्री भुसावरे, इंगळे, आर. बी. मिस्तरी, योजना समितीचे मुन्ना पाटील, सदस्य सुभाष सोळुंके, सैय्यद जावेद अली, राजु तडवी, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, दिनकर पाटील, नितिन महाजन,संदिप सोनवणे, योगीता पाटील सह आदींची उपस्थिती होती

सावली ( वाघ ) येथे आग लागल्याने ५ झोपड्या जळाल्या.

0

 

हिंगणघाट दि.२७ एप्रिल
येथून जवळच असलेल्या सावली (वाघ) येथील आरोग्य उपकेंद्र जवळच्या परिसरात स्वयंपाकाचे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली असून यात ५ झोपड्या जळून खाक झाल्या.सकाळी १० वाजताचे सुमारास लागलेल्या आगित या गरीब झोपडपट्टीधारकांचे धान्य व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे,परंतु सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
आगित एक दुचाकी तसेच दिड लाख रुपये रोख रक्कमसुद्धा जळाली असल्याची माहिती आहे.
सदर आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.यावेळी हिंगणघाट येथील अग्निशमन सेवेला पाचारण करण्यात आले.सदर आग येथील गावकरी तुकाराम नांदे यांचे झोपडीवजा निवासस्थानात लागली असून इतर ४ झोपड्यासुद्धा जळाल्या.
हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे हे आपल्या चमुसह घटनास्थळी पोचले असून आगिच्या नुकसानीबद्दल माहिती घेत आहेत.
आगीत या परिसरात राहणाऱ्या तुकाराम नांदे,ऋषी मगर,मधुकर दोडके,आशा दोडके,तपन मागीपुर इत्यादिच्या झोपड्या जळून खाक झाल्याने सोबत सर्व धान्य व घरगुती साहित्य,आंथरुन,कपडेसुद्धा भस्मसात झाले.या आगित एका परिवाराचे सुमारे दिड लाख रुपये रोख रक्कम जळाल्याची माहिती असून एक दुचाकीसुद्धा भस्मसात झाली.
यात ५ परिवार उघड्यावर आले असून त्यांनी प्रशासनाकडे तत्काळ मदतीची मागणी केली. सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

भटक्या श्वानांची शुश्रुषा करते ‘ निसर्गसाथी फाउंडेशन ‘ची रेस्क्यु टिम .

0

 

हिंगणघाट २७ मार्च शहरात पशु ,पक्षी संवर्धनासाठी कार्यरत निसर्गसाथी फाउंडेशन शहारात भटक्या श्वानांची शुश्रुषा करते.भटक्या श्र्वान सध्या चर्मरोगानी ग्रस्त आहे . अंगावरील पुर्ण केस गळुन सारखे पायांनी अंगावर रक्त येईपर्यंत हे भटके श्र्वान शहरात फेरफटका मारताना सहज नजरेस पडतात.तद्वतच भटका श्र्वान म्हणजे सर्वांकडून दुर्लक्षित अशातच पोटाची भूक भागविण्यासाठी इकडे तिकडे वणवण भटकत असताना अनेकदा मारहाण करुन जखमी करणारे महाभाग श्वानांना लगंडे करून ,जखमी अवस्थेत व्हिवळत असणारे भटके श्र्वान शहरात कुठेतरी रस्त्याचे कडेला , दुकान, हॉटेल शेजारी पहुडलेले असतात खरे मात्र एरवी पाळीव विदेशी श्वानांची सग्यासोयरयापेक्षा जिवापाड काळजी घेणारे बिस्केट ,चाकलेट खाउ घालणारे महाभाग या भटक्या श्वानांकडे ढुंकूनही बघत नाही अशी सध्या ची गावरान देशी श्वानांची अवस्था गावशहरासह जिल्ह्यात राज्यात पहावयास मिळत आहे.
हे देशी गावरान श्वान भटक्या श्वानांत रुपांतरीत होते आहे .पुर्वी पाळीव कुत्रा म्हणजे हमखास देशी श्वान असायचा गावखेड्यात घरोघरी अंगणात ‘ घराचा रक्षक ‘ पाळलेला कुत्रा पहुडलेला पहावयास मिळायचा .दिवसभर मालकासोबत शेतात व संध्याकाळी मालकासोबतच घरी . पाळीव कुत्रा हा मालकांवर जीवापाड प्रेम करायचा मालकांवर ओढवलेल्या संकटात प्रसंगी प्राणाची बाजी लावून स्वत: समर्पीत झाल्याची उदाहरणे ऐकीवात आहे.
मात्र अलीकडे ८० चे दशकांनंतर विदेशी संस्कृती चे अतिक्रमणामुळे आपली संस्कृती गिळंकृत करण्यास प्रारंभ केला.त्यात देशी श्वान ही सुटले नाही .याचा परीणाम म्हणजे गाव शहरातील भटक्या श्वानांचे संख्येत वाढ झाली.राज्याती अनेक नगरपालिका, महानगरपालिका भटक्या कुत्र्यांच्यासंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवर लाखो रुपये खर्च करीत आहे.
हिंगणघाट शहरातील भटक्या चर्मरोगानी ग्रस्त, मारहाण, अपघातात जखमी श्वानां ,प्राणी ,पशु, पक्षी यांचेवर उपचार करण्यासाठी निसर्ग साथी फाउंडेशन हिंगणघाट ची रेस्क्यु निसर्गसाथी राकेश झाडे याचे नेतृत्वाखाली कार्यरत आहे.मागील‌ वर्षी पासुन आजतागायत जवळपास ५० भटक्या श्वांनांवर उपचार करुन त्यांना बरे केले.
@ देशी कुत्र्या चे वाण जपणे गरजेचे
प्रविण कडु
अध्यक्ष, निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट
निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट ची रेस्क्यु टिम सध्या शहरातील भटक्या श्वानांवर उपचार करुन त्यांना रोगमुक्त करीत आहे.सध्या स्थितीत गावशहरासह विदेशी पाळीव कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने देशी गावरान श्वानांचे भटक्या,लावारीस श्वानांत रुपांतरीत होत आहे . शहरात, जिल्ह्यात , राज्यात भटक्या श्वानांचे संख्येत नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे लाखो करोडो रुपये खर्च करून निर्बीजीकरण केले जात आहे.वास्तवीकता भारतीय कुत्रा प्रजाती परीहा ,जोनांगी हे पाळणण्यास सर्वोत्तम,कमी खर्चीक , ईमानदार असुनही लोकांचा कल विदेशी कुत्री पाळणा्याकडे वाढला परिणाम देशी कुत्र्या चे रूपांतर भटक्या होत आहे आणी ती प्रजाती कमी कमी होत आहे.अशानी भविष्यात भारतीय गावरान श्वानांचे देशी वाण नष्ट होणार आहे.हे कुठेतरी थांबायला हवे.या देशी कुत्र्या चे संरक्षण , संवर्धन करण्यासाठी निसर्ग साथी फाउंडेशन हिंगणघाट चे राकेश झाडे,स्वप्नील वाळके,करण विटाळे,दीपक जोशी,दिनेश वर्मा,सौरभ लामकासे,रोशन बालपांडे, ऋषिकेश जीवने, चांद जगताप , निधी जक्कनवार ,मिताली जक्कनवार यशस्वी मांडवकर इ कार्यरत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

यावलच्या कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठीची सैनिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कबचौ उमवि जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 एप्रिल सोमवार रोजी सैन्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन एन. मुक्टोचे माजी अध्यक्ष व धुळे येथील एल. एन. सरदार महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब डॉ. संजय श्रीराम सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यशाळेचे उद्घाटन भारत माता व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी उद्घाटक प्राचार्य दादासाहेब डॉ. संजय सोनवणे यांनी सैनिक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊन योग्य व सकारात्मक दिशा मिळून भारतमातेचे संरक्षण करण्याची संधी मिळते असे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी देशाच्या हिताला प्राधान्य देऊन राष्ट्राचा सन्मान राखला पाहिजे तसेच युवकांनी सैनिक प्रशिक्षण कार्यशाळेमधील विविध गुण व कौशल्य आत्मसात करून आकाशात चमकून दाखवायचे आहे, असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेत सकाळी 7.00 ते 10.00 मैदानी प्रशिक्षण होऊन दुपारी बौद्धिक मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
बौद्धिक चर्चा सत्रात फैजपूर येथील डी.एन‌ महाविद्यालयाचे एनसीसी लेफ्टनंट डॉ.आर. आर. राजपूत यांनी मार्गदर्शन केले की युवकांमध्ये नेतृत्व स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे व आपण भविष्यात काय करू शकतो याची क्षमता ओळखून ध्येय निश्चित केले पाहिजे. दुसऱ्या सत्रात ए. एस. आय. श्री महेंद्र पाटील यांनी विचार व्यक्त केले की सैन्य दलात विविध क्षेत्रात पदभरती केली जाते त्या पदांसंदर्भात माहिती प्राप्त करा. त्यासाठी लेखी परीक्षा व मैदाना वरील सराव महत्त्वाचा आहे. तसेच तिसऱ्या बौद्धिक व्याख्यानात जळगाव येथील नुतन मराठा महाविद्यालय चे एन. सी. सी. लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर जिद्द व चिकाटी धरून त्याग करून मेहनत करावी लागते त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो असे मार्गदर्शनपर भाषणात केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे, भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाचे प्रा. ई. जी.नेहते (अधिसभा सदस्य, कबचौ उमवि, जळगाव) व ऐनपूर महाविद्यालयाचे डॉ. के. जी. कोल्हे (अधिसभा सदस्य, कबचौ उमवि, जळगाव) उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. गौरी राणे यांनी युवकांनी स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता युवकांनी निर्धाराने सामोरे जावे असे मार्गदर्शन केले. तसेच अशा प्रकारची कार्यशाळा आयोजन करणे हा स्तुत्य उपक्रम असून तसेच ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रेरणा ज्योत जागवून मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. डॉ. के. जी. कोल्हे यांनी राष्ट्राचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रप्रेम प्रत्येकाला असले पाहिजे. राष्ट्रप्रेम प्रति समाजव्यवस्थेचे रक्षण करणे हेही महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. ई. जी. नेहते यांनी मार्गदर्शनात म्हटले की जर सैनिक प्रशिक्षण आपल्या राष्ट्रात अनिवार्य केले तर जगातली कोणतीही शक्ती देशाला हरवू शकत नाही. युवकांनी मानसिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे.
कार्यशाळा आयोजना बाबत प्रशिक अढायगे (वरणगाव महाविद्यालय) व दिक्षा अडकमोल (यावल महाविद्यालय) यांनी मनोगत व्यक्त केले
सदर कार्यशाळेत नुतन मराठा महाविद्यालय (जळगाव), डी. डी. एन. भोळे महाविद्यालय (भुसावळ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (वरणगाव) व आयोजक यावल महाविद्यालयातील असे एकूण 68 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचेआभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे यांनी तर समारोप कार्यक्रमाचे आभार कार्यशाळेचे संयोजक डॉ. एच. जी. भंगाळे यांनी मानले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा संजय पाटील, आय क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, श्री. मनोज पाटील, मुकेश येवले, श्री डी‌. एन.मोरे, एस. व्ही. चव्हाण, ई. आर. सावकार, श्री अरुण सोनवणे, प्रा. सुभाष कामडी, प्रा. मयूर सोनवणे, प्रा.एम. पी. मोरे, प्रा. नरेंद्र पाटील, मिलिंद बोरघडे, डी. डी. चौधरी, संतोष ठाकूर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

घुग्घुस शहरातील पाणी समस्या तात्ळीने दूर करा :काँग्रेसची मागणी

0

 

उद्योगांनी सुरू केले वॉटर टँकर राजु रेड्डी यांच्या मागणीला यश

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहरात सध्या सहा ही वॉर्डांत भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भीषण अश्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
मागील पाच सहा दिवसांपासून शहरातील अनेक वॉर्डांत नळा तून होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्याने पिण्याच्या पाण्यापासून ही नागरिक वंचित झाले आहे.
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी हे आपल्या दोन ते तीन खाजगी टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा करीत आहे.
पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश लक्षात घेत शहरातील उद्योगां तर्फे पाणी टँकर सुरू करावे अशी मागणी रेड्डी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांना केली होती. सदर मागणीला यश आले असून लॉयड्स मेटल्स, एसिसी कंपनी,वेकोली तर्फे एक-एक टँकर सुरू करण्यात आले आहे.
मात्र अजून ही शहराची पाणी समस्या दूर झाली नसल्याने आज काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने राजु रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांची भेट घेऊन पाणी समस्येवर चर्चा केली व समस्या निवारणसाठी कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दांतलवार, मोसिम शेख,इर्शाद कुरेशी, रोहित डाकुर,देव भंडारी, बालकिशन कुळसंगे,कपिल गोगला,सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अतुल वांदिले यांनी केले श्री राम मंदिर वार्ड येथे पाणी प्याऊ चे उद्घघाटन

0

 

हिंगणघाट :- राम मंदिर वार्ड येथे विनोद झाडे मित्र परिवार तर्फे उन्हाळ्यात जनतेला होणारा त्रास पिण्याचे पाण्याची गरज लक्षात घेता या परिसरात शाळा, बँक , दवाखाना कारंजा चौक , रहदारीचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच या ठिकाणी बाहेर गावावरून कामानिमित्य येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता व पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे माजी नगरसेवक विनोद झाडे यांनी प्रभागात प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी पाण्याची टाकी ची व्यवस्था करून प्रभागातील जनसामान्यांची पाण्याची समस्या सोडवली आहे. महाराष्ट्रात एक आपली वेगळी ओळख निर्माण केली. व त्यांच्या दूरदृष्टी विचारांमुळेच पाण्याची समस्या आज दिनांक 26 मार्चला अतुल वांदिले राष्ट्रवादी नेते, डॉ निरमेश कोठारी यांच्या हस्ते उद्घघाटन करून तहानलेला पिण्याकरिता उन्हाळ्यात थंड पाणी उपलब्ध करून दिले . या वेळी विनोद झाडे मित्र परिवार तर्फे मार्गदर्शक विनोद झाडे(माजी नगरसेवक), गोविंद पुरोहित, गोपाल पुरोहीत ,गिरीश तेजपाल, प्रकाश राऊत (माजी नगरसेवक) बबलू खेनवाल,हर्षल जगताप ,धर्मा धात्रक ,श्रीकांत कानोडे ,नितीन दहीवडे, विशाल खन्ना व मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता .
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट सम्यक बुद्ध विहाराचा दोन गटात वाद

0

 

हिंगणघाट :- सम्यक बुद्ध विहार,प्रबुद्ध नगर राम नगर वॉर्ड येथील वाद गेला हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये, तर एकाच जागेचे दोन नोंदणी क्रमांक कसे….?असा प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे.
तर दोन गट आमने सामने,२००५ मध्ये स्थापन केलेल्या नोंदणीकृत प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे सध्याचे अध्यक्ष मंगला पुरुषोत्तम थुल असुन २०१९ मध्ये स्थापन केलेल्या सम्यक बुद्ध विहार,बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष प्रलय भाऊराव तेलंग आहे

रामनगर वार्ड,प्रबुद्ध नगर येथील सम्यक बुद्ध विहाराचा वाद आता थेट हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे पोहोचला आहे मागील तीन ते साडेतीन वर्षापासून विहाराचा वाद सुरू असुन,दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे २००५ मध्ये नोंदणीकृत संस्था असून सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा येथे नोंदणी क्रमांक एफ ५५७० देण्यात आला होता.सदर संस्थेचे लोक वर्गणीतून सम्यक बुद्ध विहार रामनगर वार्ड,प्रबुद्ध नगर जिल्हा वर्धा यांचे बांधकाम केले असून २०११ ते २०१३ या कालावधीत विहाराचे बांधकाम पूर्ण झाले होते व त्यावेळी सम्यक बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती स्थापनेवेळी संगमवरी फलक बुद्धविहारात बसविण्यात आले होते.
परंतु सन २०१९ ला सम्यक बुद्ध विहार,बोद्ध पंचकमिटी या नावाने सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा येथे नोंदणी करण्यात आली तर नोंदनी क्र. ए.७३७ वर्धा असुन या बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष प्रलय भाउराव तेलंग,सचिव अमित देवानंद झांबरे असुन इतर सदस्यांनी बळजबरीने प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांना कोणातीही माहिती न होऊ देता संस्थेची स्थापना कली व विहारात लावलेल्या सदर फलकाची विटंबना केली या बाबत हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अशी लेखी तक्रार प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांच्यावतीने देण्यात आली असुन सदर प्रकरण चौकशी मध्ये घेण्यात आले आहे.
सम्यक बुध्द विहार बौद्ध पंचकमिटीने कोणतीही कल्पना दिली नाही व प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांना विश्वासात न घेता कोणताही ठराव संमत करून न घेता २०१९ मध्ये नव्याने सम्यक बुध्द विहार बौध्द पंचकमिटी नोंदणी क्र.ए.७३७ या नावाने सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा येथे या नावानी नोंदणी केल्या गेली असे २००५ नोंदणीकृत असलेल्या प्रबुद्ध नगर बहुद्देशीय महिला समिती यांच्या वतीने सांगण्यात येत आहे,तर आता एकाच विहाराच्या जागेचे दोन नोंदणी क्रमांक झाले असून एकाच जागेचे दोन नोंदणी क्रमांक कसे….?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे व कोणत्या आधारे सम्यक बुद्ध विहार बोद्ध पंचकमिटी नोंदणी क्र.ए.७३७ यांना देण्यात आला आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
२००५ मध्ये स्थापन केलेल्या नोंदणीकृत प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे सध्याचे अध्यक्ष मंगला पुरुषोत्तम थुल,सचिव शांता खेडकर व सहसचिव सिंधू दखणे असुन २०१९ मध्ये स्थापन केलेल्या सम्यक बुद्ध विहार,बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष प्रलय भाऊराव तेलंग असुन,सचिव अमित झांबरे आहे.
२००५ मधील नोंदणीकृत प्रबुद्ध नगर बहुद्देशीय महिला समिती यांने सम्यक बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती स्थापनेवेळी संगमवरी फलक बुद्धविहारात बसविण्यात आले परंतू ११ ते १३ एप्रिल २०२२ रोजी विहारामधील संगमवरी काळ्या फलकाला त्यावर नाव कोरून असलेल्या त्यावर पांढरा रंग फासून विटंबना केली या कृत्यामुळे प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे सभासद आणि समर्थकांचे भावना दुखावल्या गेल्या आहेत,सदर कृत्य वार्डातील दोन गटांमध्ये संघर्षास चिथावणी दिल्यासारखे आहे तरी आपण योग्यशीर कार्यवाही करून जसा पूर्वी फलक लावण्यात आला होता तसेच पूर्वीप्रमाणे करण्यात यावे आणि बुद्ध विहारा वरील नोंदणी क्र.मिटवून सम्यक बुद्ध विहार,बोद्ध पंचकमिटी च्या सर्व सदस्यांवर योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांच्या वतीने हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.
सूर्या मराठी न्यूज सचीन वाघे वर्धा

हिंगणघाट डीबी पथकाच्या कारवाईत गाडी चोरीचे प्रकरण उघडीस

0

 

हिंगणघाट :- दि. 17/09/2021 रोजी दुपारी 3.15 दरम्यान यातील फिर्यादी राजु माणीक चौधरी रा. चरुळ घारफळ, त. भद्रावती जि. चंद्रपूर यांनी त्यांची एक जुनी वापरती मोटार सायकल सि.डी. 110 ड्रिम होंडा कंपनीची काळे रंगाची व निळा पटटा असलेली जीचा क्रमांक एम.एच.34/बी.डब्लु/8264 किंमत 40,000/- रू. किंमतीची नंदोरी चौकात चाबी लावुन उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात ईसमाने मोटारसायकल चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेषन हिंगणघाट येथे अप. क्रमांक 858/2021 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
पो.स्टे. परीसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीसंबंधाने तसेच झालेल्या चोरीबाबतची कार्यपदधती हेरून पोलीस निरीक्षक श्री. संपत चव्हाण यांनी तात्काळ दखल घेवुन गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांचे पथकास योग्य मार्गदर्शन करून अनोळखी आरोपीचा शोध घेवुन मोटारसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुशंगाने पो.हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकाने पो.स्टे परीसरात कसोशीने प्रयत्न करत प्रभावी मुखबीर नेमुन व मागील दाखल गुन्हयांचा मार्ग काढत आरोपी आकाश अशोकराव वानखेडे वय 33 वर्षे रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यास निश्प्ण्ण केले. आरोपीचे ताब्यातुन 1) अप. क्रमांक 858/2021 कलम 379 भादवि मधील सि.डी. 110 ड्रिम होंडा कंपनीची काळे रंगाची व निळा पटटा असलेली जीचा क्रमांक एम.एच.34/बी.डब्लु/8264 किंमत 40,000/- रूपये
2) अप. क्रमांक 472/2022 कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेली एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एम.एच. 32/एन/7232 किंमत 20,000/- रूपये असा एकुण 60,000/- रू असा मुददेमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले. पुढील तपास नापोकाॅ प्रशांत वाटखेडे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडेे, उमेश बेले यांनी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा