Home Blog Page 311

.सुधीरभाऊ मुनगंटीवार हेच माझे जीवनदाते उदररोग ग्रस्त रुग्णाचे मनोगत

0

 

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात मोफत उपचार

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील संतोष विठोबा पोतराजे वय ३५ वर्षे हा रोज मजुरीचे काम करीत होता. परंतु जुनाट जठरांत्र मार्गाच्या रोगाने तो त्रस्त झाला, त्यामुळे त्याचा उदरात असह्य दुखणे सुरु झाले. तो खाजगी रुग्णालयात गेला असता त्याला डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले. जवळपास 4 लाख 50 हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी लागत असल्याने त्याचे कुटुंब आर्थिक विवंनचनेत सापडले. गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना मदतीसाठी भटकावे लागले. त्यांच्या नातेवाईकांनी संतोष पोतराजे यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट करून दिली, त्यांनी आपली समस्या दादांना सांगितली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून सर्वतोपरी मदत मिळणार अशी ग्वाही दिली. दुसऱ्याच दिवशी संतोष पोतराजे यांना शस्त्रक्रियेसाठी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तिथे भर्ती करण्यात आले व जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. संतोष पोतराजे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ते घरी परतले.घरी परतल्यानंतर स्वस्थ झाल्यावर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रास सहपरिवार भेट दिली व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली. मोफत उपचारासाठी मदत केल्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे आभार मानले. याप्रसंगी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरण बोढे, संतोष पोतराजे त्यांच्या पत्नी व नातेवाईक उपस्थित होते.

हिंगणघाट शहरातील पाणीटंचाई पाहता येथील वना नदी वरील अपुरा बंधारा पूर्ण करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0

 

हिंगणघाट:- १८ एप्रिल २०२२
महाराष्ट्र सुजल अभियाना अंतर्गत हिंगणघाट येथील वणा बांध-यावर के.टी.वेअर बांधणे, इंस्पेक्शन चेंबर बांधणे, ११00 मि.मि. व्यासाची कनेक्टींग मेन टाकणे,पुरामुळे नदीची माती थड वाहून गेल्याने निर्माण झालेली गॅप बुजविण्याकरीता रिटेलींग भिंत व स्टोन पिचींगच्या कामासाठी सुधारीत अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान करण्याबाबत तसेच अमृत योजने अंतर्गत निर्माण केलेल नविन ११ जलकुंभाला पाणी पुरवठा करण्यासाठी जुण्याच बंधा-यला नव्याने सुधारणा करून मंजुरी प्रदान करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी हिंगणघाट शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री शंकर गडाख, प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग व नगर विकास मंत्रालय मुंबई यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शासन निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सुनिअ २00१ प्र.क.५६ पापु २२ दि .१० जुलै २00१ व शासन निर्णय नगर विकास विभाग क. संकीर्ण२00८/१३३८/प्र.क. १७१/०८/ 0नवि-२० दि.मार्च २00१ .उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय १ व २ विषयांकीत बंधारा बांधकामास शासनाची मंजुरी प्राप्त झाली असुन त्यानुसार नगर परिषदेने बंधारा कामाची कार्यवाही केली असुन बंधारा बांधकामामध्ये काही बाबीमध्ये वाढ झाल्याने बंधा-यांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.
प्रकरणांत नगर पालिकेने कार्यालयीन पत्र क.नपाहि/मुअ/कावि-५२०/२०१६ दि.१५ .०१.२०१३ अन्वये मा. प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्ता विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे अहवाल सादर केलेला आहे. बंधा-याच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने मुख्य अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा, पुणे यांना विनंती केली असता संदर्भिय पत्र क.३ अन्वये सदर तपासणी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवण प्राधिकरण (गुणवत्ता परीक्षक पथक) यांनी संदर्भिय पत्र क. ४ अन्वये सदर तपासणी मुख्य अभियंता, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ पाटबंधारे विभाग,अमरावती यांचे
कडून.
त्यानुसार सदर प्रस्ताव तपासणी करता अमरावती येथे सादर केला असता त्यांचे विभागाकडून सदर कामाचे क्षेत्र वर्धा जिल्हा अंतर्गत येत असल्याने नागपुर परिमंडळ पाटबंधारे विभाग यांचेकडे देण्यात यावे असे सुचवले. त्यामुळे सदर प्रस्ताव संबंधित विभागाकडे नागपुर येथे प्रत्यक्ष देण्यात आला.परंतु संबंधित विभागाकडून सुध्दा कामाची तपासणी हया विभागाकडून करण्यात येणार नसल्याचे सांगीतले.
सदर प्रकरणी संबंधित सर्व अधिका-यासह मंत्रालयामध्ये बैठक लावून बंधारा बांधकामासंबंधी प्रकरण मार्गी लावण्यात यावे तसेच हिंगणघाट शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजने अंतर्गत ११ जलकुंभ बांधले असुन जुण्याच बंधा-याला नव्याने सुधारणा करून मंजुरी प्रदान करण्यात यावी.अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी हिंगणघाट शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पाणीपुरवठा मंत्री शंकर गडाख,प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग व नगर विकास मंत्रालय मुंबई यांना केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

24 तासाच्या आत गाडी चोराला अटक हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

0

 

अक्षय संजय थुल रा. उबदा यांनी त्याचे मालकीची होंडा एक्टीव्हा क्रमांक एम.एच. ३२ / ए.क्यु./०३९५ ग्रे रंगाची किंमत ५०,०००/- रूपये अशी दिनांक १७/०४/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता दरम्यान नंदोरी चौक हिंगणघाट येथे हॅन्डल लॉक नं करता रोडवर उभी करून नाश्ता करण्यास गेले. नाश्ता करून गाडी जवळ परत आले असता सदरची गाडी मिळुन आली नाही. परीसरात भरपुर शोध घेतला असता गाडी मिळुन नं आल्याने कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे मालकीची वरील गाडी चोरून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अप क्रमांक ४४८/ २०२२ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून . तपासात घेतला.

पो.स्टे. परीसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीसंबंधाने तसेच झालेल्या चोऱ्यांची कार्यपदधती हेरून पोलीस निरीक्षक श्री. संपत चव्हाण यांनी तात्काळ दखल घेवुन गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो हवा. विवेक बनसोड यांचे पथकास योग्य मार्गदर्शन करून अनोळखी आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुशंगाने पो हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकाने पो.स्टे परीसरात कसोशीने प्रयत्न करत व तात्काळ तपासचक्र फिरवुन संशयीत नामे अंगद राममिलन भारती वय ३० वर्षे रा. मुळपत्ता छपरा, पो.स्टे. धनकटा जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश ह.मु. पांडुरंग वेले यांचे घरी, संत कबीर वार्ड, हिंगणघाट यास निष्णण केले. त्याचे जवळुन गुन्हयात चोरीस गेलेली होंडा एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम. एच. ३२/ए.क्यु./०३९५ ग्रे रंगाची किंमत ५०,००० /- रूपये अशी जप्त केली. तसेच हिंगणघाट शहरातुनसुध्दा मोटारसायकली चोरीस गेल्या असल्याने आरोपीस पो.स्टे. परीसरात चोरीस गेलेल्या इतर मोटारसायकलींबाबत विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने काही दिवसांपूर्वी संत कबीर वार्ड हिंगणघाट येथील एका शाळे समोरील घराजवळ उभी केलेली मोटारसायकल सुध्दा चोरल्याचे सांगीतले वरून त्याचे जवळुन अप क्रमांक ४४५ / २०२२ कलम ३७९ भादवि मधील एक होंडा सि.बी हॉरनेट १६० सि.सि. मोटारसायकल क्रमांक एम. एच. ३२ / ए.एन / ४८४० किंमत ७०,००००/- रूपये अशी सुदधा जप्त करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन एकुण १,२०,००० /- रूपयांचा मुददेमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले. पुढील तपास नापोकॉ पंकज घोडे हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्षा श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले आणी आशिष गेडाम यांनी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी वाघे हिंगणघाट

अचलपू परतवाडा दोन्ही ही शहरात मध्ये कमल 144 संचारबंदी लागु!

0

 

उषा पानसरे मु.का. संपादक मो.9921400542 असदपुर

दिनाक 17 एप्रिल परतवाडा
अचलपूर परतवाडा येथे झेंडा काढल्या मूळे वाद विवाद झाला दगड बाजी अमोरा समोर दगड बाजी झाली या दगबाजीत एक पोलीस कर्मी सूध्दा घायल झाले रविवारी रात्री आठ च्या सूमारास ही घटना घडली मोठया संकेत पोलीस बल तैनात होते रात्रीचा स्थिती मधे ! गर्दी मधे रात्रीच्या अंधारा मध्ये काही दूकाणे वर दगड फेकण्यात आले काही वाहण ला दगड मारून तोड फोड केली अतिरिक्त पोलीस बालासह पोलीस अधिक्षक व आयजी साहेब अचलपूर घटना स्थळी रवाना रविवारी रात्री 11:30 अचलपूर परतवाडा शहर कांडली देवमाळी येथे समोरच्या आदेश निघे पर्यत्य कर्फ्यू लागला असून शहरा मधे शांतता
पोलीस निरिक्षक संतोष टाले पोलीस स्टेशन परतवाडा यांनी अचलपूर परतवाडा नागरिकांना विनंती करून शांतता बाळगा असी विनंती केली परतवाडा येथिल सर्व नागरिकांना विनंती केली कि कोणत्याही अफवावर विश्रास ठेवू नये अचलपूर शहरातमध्ये शांतंता ठेवावी परतवाडा अचलपूर दोन्ही शहरात संचारबंदी कलम 144 आदेश लागू झालेला आहे कोणीही बाहेर पडू नये निघाल्यास कार्यवाही करण्यात येईल पोलीस निरिक्षक संतोष टाले पोलीस स्टेशन परतवाडा यांनी म्हटले
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

मा.विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब शाखा घुग्घुस च्या माध्यमातुन भव्य रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

*दि. 15 एप्रिल 2022 रोजी मा.विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब शाखा घुग्घुस च्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम मा. प्रविणभाऊ लांडगे यांच्या उपस्थितीत पार पळण्यात आला व भव्य रांगोळी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक म्हणून कु.शारदा कांबळे,द्वितीय पारितोषिक कु.सेजल सरोज, तृतीय पारितोषिक कु. श्रेयश सरोज, व इतरांना विषेश बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन मोठ्या संख्येत उपस्थितीत दर्शवली कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब अध्यक्ष व विजय क्रांती कामगार संघटना कार्याअध्यक्ष मा. प्रविणभाऊ लांडगे, विजय क्रांती कामगार संघटना महासचिव मा. सतीशभाऊ शेंडे, विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब सदस्य किरण पुरेली, विजय क्रांती कामगार संघटना उपाध्यक्ष मा. राज बावणे, युथ कॉग्रेस घुग्घुस शहर अध्यक्ष तौफिक शेख, निखिल पुणगंटी, शेखर तंगन्नापेल्ली, रमेश रुद्रारप, सोनु गुडला, बबलू कुरेशी, कार्यक्रमाचे आयोजक सौ. शिल्पाताई गोहील, सौ. विभाताई सोनटक्के, सौ. आयशाताई शेख, श्री. ईश्वर बेले, श्री. फारूक शेख, इरफान पठाण, राकेश कातकर, व विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक विनोद बच्चलवार, यांनी केले*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एआयएमआयएम घुग्घुस तर्फे पाणी वाटप

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

गुरुवारी सायंकाळी घुग्घुस येथील एआयएमआयएम पार्टीतर्फे विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाणी वाटप करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीत सहभागी बांधवांना एआयएमआयएम पार्टीतर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येत बांधवांनी पाणी वाटपाचा लाभ घेलता तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी घुग्घुस एआयएमआयएमचे सानू सिद्दीकी, सोनू किंग, इसरार सिद्दीकी, इस्लाम खान, मुस्लिम खान, समीर शेख, हसनैन सिद्दीकी, फैजान शेख, एजाज खान, शहरुख शेख, मोसीम शेख, एचकेजीएन ग्रुप, खादीम शेख, अकबर बादशाह, जाऊद अन्सारी, छोटू शेख, मानू सिद्दीकी, जुबेर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या131 व्या जयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेड,घुग्घुस तर्फे शरबत वितरण

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सूध्दाला

घुग्घुस रामनगर येथील सारिपुत्र बुद्ध विहार येथे आईसक्रीम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर तहसील कार्यालय येथे शरबत वितरण करण्यात आले.यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,मुन्ना लोडे,स्वप्नील वाढई,नागेश तुरानकर,प्रितम भोंगळे,महेश कैथल,अमित बोबडे,सुमित कांबळे यंग चांदा ब्रिगेड आदिवासी महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ.उज्वला उईके,यंग चांदा ब्रिगेड बहुजन समाज महिला अध्यक्षा सौ.उषा आगदारी,नितु जैस्वाल,गीता बोबडे,स्मिता कांबळे,विना गुच्छईत,कामिनि देशकर,जोत्सना मस्के,यशोदरा पाझारे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आ. मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वाटप

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरवारी सायंकाळी शीतपेयाचे वाटप करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीत सहभागी बौद्ध समाज बांधवांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते शीतपेयाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येत बौद्ध समाज बांधवांनी शीतपेय वाटपाचा लाभ घेतला. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, लक्ष्मी नलभोगा, सुचिता लुटे, पूजा दुर्गम, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, भाजपा
नेते शाम आगदारी, श्रीकांत सावे, निरंजन डंभारे, भारत साळवे, विक्की सारसर, विनोद जंजर्ला, मनमोहन महाकाली, हेमंत पाझारे, असगर खान, शंकर सिद्दम उपस्थित होते.

उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम सुरक्षा दलाच्या व पोलीस पाटील यांचा किनगाव येथे सत्कार आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांनी केला

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

ग्रामसुरक्षा दलच्या व किनगाव बू चे पोलीस पाटील याच्या सतर्कतेमुळे किनगाव शिवरातील चोरीचा प्रयत्न फसला. … चोर पडण्यात यशस्वी…

किनगाव शिवरातील शेतमालाची चोरी होण्यापासुन वाचवल्याबद्दल किनगाव येथे ग्रामसुरक्षा दलाच्या
व पोलिस पाटलाच सत्कार यावल पो,स्टे चे पो निरीक्षण व (आयपीएस )अधिकारी आशित कांबळे ,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांचा

सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलीस पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला रवि कोळी ,संदीप पाटिल ,व सुरेश पो पाटिल ,

सरपंच सौ निर्मला संजय पाटिल,रेखा सचिन नायदे ,सरपंच पती संजय सयाजीराव पाटील
उपसरपंच लुकमान कलंदर तडवी छोटू आबा प.स उप सभापती व ग्रा प सदस्य व टीकाराम चौधरी सरपंच व गावांतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथील अचानक आलेल्या पावसामुळे झालेल्या मालाची नुकसान भरपाई कोण करणार ?

0

 

हिंगणघाट 13 एप्रिल संध्याकाळी निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात अचानक बदल होऊन पाण्यास सुरुवात झाली यामध्ये मार्केटमधील शेडच्या बाहेर असलेले व्यापारी व शेतकऱ्याचे मालाचे नुकसान झाले.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेडची व्यवस्था असतानासुद्धा नुकसान होते , याला काही प्रमाणात हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापक जबाबदार आहे हे लक्षात येते
शेतकऱ्या कडून व्यापारी माल खरेदी करते परंतु ते उचलण्यासाठी अनेक दिवस लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना धान्य विकण्याच्या सीजन मध्ये सुद्धा धान्य शेडच्या बाहेरच ठेवावा लागतो. यामध्ये व्यवस्थापन यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले (व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेले धान्य किती दिवसात उचलण्यात आले पाहिजे ?) यासाठी नियम असताना सुद्धा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होते व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व व्यापारी या वर्गांना नुकसान झाले हेच यावरून लक्षात येते .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा