Home Blog Page 32

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

0

 

Ladkibahinyojna:मुंबई – महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत करत आहे. आता या योजनेतील लाभार्थी महिलांना अधिक स्वावलंबी करण्यासाठी बँकांमार्फत 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे.Ajitpawar

या कर्जाचा हप्ता लाडकी बहिण योजनेतील महिना देयकातून भरला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली आहे.Ajitpawar

Fire News / जळगाव जामोद: राधे कोल्ड्रिंक्स दुकानात भीषण आग; दुकान खाक

लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण उद्योजकता वाढवण्यासाठी आणि भांडवलाचा तुटवडा भागवण्यासाठी या योजनेतून आता कर्ज देण्याचा विचार सुरू आहे.

अजित पवार म्हणाले की, जर बहिणींना 40-50 हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध झाले, तर त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकतील आणि कुटुंब आर्थिकदृष्ट्या सबळ होईल.

शासनाने ही योजना सुरू केली असून त्यासाठी 45 हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

योजनेला विरोधकांच्या अफवा असूनही तो चालूच राहणार असल्याची खात्री पवार यांनी दिली. याशिवाय, शेतकऱ्यांसाठी कृषी पंपावरील वीज बिल शासन भरण्याचा उपक्रमही सुरू असून त्यासाठी महिना 20 हजार कोटी रुपये खर्च होतो.

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

यामुळे दिवसा सुद्धा शेतकऱ्यांना वीज पुरवठा होईल असा सोलार पॅनेल लावण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ladkibahinyojna :याप्रकारे महाराष्ट्र सरकार महिलांच्या आर्थिक स्वावलंब्यासाठी लाडकी बहिण योजनेतून नव्या मार्गाने कर्ज देऊन व्यवसायाची संधी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Fire News / जळगाव जामोद: राधे कोल्ड्रिंक्स दुकानात भीषण आग; दुकान खाक

0

 

Fire News:जळगाव जामोदमध्ये 12 मे रोजी पहाटे पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील राधे कोल्ड्रिंक्स दुकानावर भीषण आग लागली.

या आगीमुळे लाखोंची नासाडी झाली आणि संपूर्ण दुकान जळून खाक झाले.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या या प्रतिष्ठानात आग लागल्याने पोलीस तात्काळ धावून आले आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आले. मात्र, टँकरमध्ये पाणी कमी असल्यामुळे आगीतला वेळ लागला.

Fire News / जळगाव जामोद: राधे कोल्ड्रिंक्स दुकानात भीषण आग; दुकान खाक

त्यानंतर शेगाव येथील अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली आणि सात वाजता आग विझवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. आगीदरम्यान दोन-तीन वेळा स्फोटही झाले,

Fire News:मात्र पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळ नसल्याने आगी इतरत्र पसरली नाही.

Drbabasahebambedkar / श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे वाढदिवसानिमित्त आर.ओ. फिल्टरचे उदघाटन

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Drbabasahebambedkar:दि 10 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन हृदयसम्राट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान दिवस म्हणून दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा होत असतो.

परंतु या वर्षी भारत देशात झालेल्या पहलगाम हल्यामुळे स्वतःहा आदरणीय बाळासाहेब यांनी सांगितल्या प्रमाणे यावर्षी वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता सर्व कार्यकर्त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हमल्यात शहीद झालेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त कराव्या व समाजातील गोर गरिबांची सेवा होईल असे उपक्रम राबवावे, त्या प्रमाणे ग्राम नायदेवी ता.खामगांव येथील सरपंच श्रीमती वत्सलाबाई तायडे यांचे पुढाकाराने गावातील सर्व जाती धर्मातील गावकऱ्यांसाठी आर.ओ. फिल्टर बसविण्यात आले जेणे करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

कार्यक्रमाच्या सुरवातीला पहलगाम येथील शाहिद झालेल्या भारतीय नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजरत्न तथा वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशचे साहेबराव तायडे व बुलढाणा जिल्हा नेते समाजभूषण प्रशांत वाघोदे, नागवंशी संघपाल पनाड मेहकर-लोणार विधानसभा नेते यांची होती.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष मोहितराजे दामोदर, बुलडाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, चिखली शहर अध्यक्ष बाळासाहेब भिसे, ता.अध्यक्ष संजय धुरंधर, महिला आघाडी मा.जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई इंगळे, अख्तर भाई, आमीर भाई सुलतानपूर, राज इंगळे, वकीलभाई, जिल्हा उपाध्यक्ष तथा नायदेवी उप सरपंच अरविंद खंडारे, भिमराव अवसरमोल, सागर तायडे महसुल विभाग, समर्पन ईंगळे,

सुनील खरात पोलिस पाटील, विद्यानंद कस्तुरे, संजय बगाडे माळीमहासंघ सत्यशोधक समिती सचिव, अतुल तायडे, विश्वदीप तायडे, प्रविण तायडे, विष्णू घनमोडे, दीपक धुरंधर, तंटामुक्त अध्यक्ष मानसिंग भाऊ सोळंके, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष तेजरावभाऊ तायडे हरिभाउ तायडे, सुर्यप्रकश तायडे, जिवन तायडे, सुमित पवार, निर्मलाबाई वाकोडे, देवानंद वाकोडे, सुनिल सोळंके, शिवा डाबेराव, भिमराव बोरकर,

काळेसर खामगाव, गायकी सर खामगाव, अणिल तायडे, दीनकर वानखेडे, अमर तायडे, गौतम सरदार, पंकज तायडे, प्रशिक मिसाळ, गवई परिवार, कडुबा तायडे, विनोद सावदेकर शेगाव जवळा, भगवान कोल्हे, पवन कोल्हे, संजु तोंडे, प्रल्हाद पाटेखेडे परिवार,अमोल डाबेराव, गुलाब देशमुख, साहेबराव

Drbabasahebambedkar:दौलत तायडे, साहेबराव बोरकर, संतोष तायडे, धम्माल तायडे, प्रविण प्रल्हाद तायडे, निरंजन खंडारे, प्रशांत तायडे, अमोल भा तायडे, मिलींद तायडे, आकाश तायडे, आमोल गौतम तायडे, ज्ञानू तायडे, प्रदीप हीवराळे, शैलेस राजेश तायडे, प्रमेश्वर वाकोडे, गणेश इंगळे इ तसेच गावातील महिला मंडळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

0

 

courtnews:(दि. ९ मे २०२५) माऊली फाटा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवणाऱ्या टिप्पर चालक सागर फुंडकर याच्या बेजबाबदारपणामुळे दोन निरागस बालकांचा मृत्यू झाला, तर दोन प्रौढ गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे, एवढ्या गंभीर प्रकरणातही आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असून त्यामुळे समाजातील विविध स्तरांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

RapeNews /  डॉ.गोयनका यांच्या विश्वत्रिवेणी टेक्सटाइलमध्ये किशोरवयीन मुलीवर बलात्कार..

प्रकाश महादेव खेडकर (वय 60) व साधना प्रकाश खेडकर (वय 55, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) हे मोटारसायकल वरून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत पार्थ अक्षय चोपडे (वय 6, रा. राजापेठ, अमरावती) व युवराज मोहन भागवत (वय 5, रा. जुनी वस्ती, बडनेरा, अमरावती) ही दोन बालके होती. अपघातात दोन्ही बालकांचा जागीच मृत्यू झाला.

सागर फुंडकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. या निर्णयामुळे मृतक बालकांचे नातेवाईक संतप्त झाले असून, त्यांनी आज जळगाव येथे जाऊन काही वकिलांची भेट घेतल्याची माहिती ‘दैनिक देशोन्नती’च्या जळगाव जामोद प्रतिनिधीस मिळाली आहे. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

courtnews:दरम्यान, या प्रकरणातील तपास अधिकारी शेंडगे मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन सतत नॉट रिचेबल येत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या संदेशांनाही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. पत्रकारांना माहिती न मिळाल्याने अधिकच संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे

RapeNews /  डॉ.गोयनका यांच्या विश्वत्रिवेणी टेक्सटाइलमध्ये किशोरवयीन मुलीवर बलात्कार..

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

RapeNews:हिंगणघाट तालुक्यातील वर्धा रोडवरील रायफुली येथील विश्वत्रिवेणी टेक्स्टाईल या कंपनीत काम करणाऱ्या एका अल्पवयीन किशोरीवरती जबरी बलात्कार केल्याची घटना आज शनीवारी उघडकीस आली.

याप्रकरणी सदर टेक्स्टाईल कंपनीचे व्यवस्थापक व अन्य एका इसमावरती पोस्को अंतर्गत नजीकच्या अल्लीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.

Operation sindoor / पाकिस्तानवर भारताचा प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराने दिला जबरदस्त प्रतिसाद

जी एम गुरुमूर्ती व मोबीन खान अशी या आरोपींची ओळख असून गुरुमुर्ती हा येथील व्यवस्थापक असल्याची माहिती आहे.

हिंगणघाट शहरातील प्रतिष्ठित समाजसेवी उद्योजक तथा वैद्यकीय व्यवसायी डॉ.मधुसुधन गोयनका हे या कंपनीचे संचालक आहे.
पीडिता ही आपल्या आईसोबत कंपनीचे परिसरातच राहत असल्याचे माहिती मिळाली असून अल्पवयीन असूनसुद्धा नियमबाह्यरित्या कंपनीत काम करीत असल्याची चर्चा आहे.

गेल्या दि.४ मे रोजी पीडिता ही पॅकिंग रूममध्ये काम करीत असताना आरोपी मोबिनखान याने पिडीतेच्या डोळ्यात काहीतरी पावडरसदृश पदार्थ टाकून तिला कॉम्प्रेसर रूम मध्ये फरफटत नेले तेथे आरोपी पैकी गुरुमूर्ती याने तिचे कपडे काढून जबरदस्तीने बलात्कार केला, या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास पिडीतेला कामावरून काढून टाकण्याची धमकीसुद्धा या नराधमांनी तिला दिली.

RapeNews / पिडीतेने घाबरलेल्या स्थितीत घटनेची तक्रार
आज दि.१० रोजी तालुक्यातील अल्लीपुर पोलिस ठाण्यात केली असून दोन्ही फरार आरोपींचा शोध अल्लीपुर पोलिस घेत आहेत.

Khamgaon / विदर्भ सत्संग सोहळा समितीच्या वतीने वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांना ‘राजमाता जिजाऊ सन्मान’ पुरस्कार जाहीर

0

 

खामगाव – विदर्भ सत्संग सोहळा समिती आयोजित परमपूज्य गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० मे २०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे भव्य राष्ट्रीय महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आला.

आहे. या कार्यक्रमात जागर स्त्री शक्तीचा-गजर राष्ट्रभक्तीचा निमित्ताने विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण व विशेष उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Operation sindoor / पाकिस्तानवर भारताचा प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराने दिला जबरदस्त प्रतिसाद

त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रबोधनकार, जेष्ठ समाजसेविका, साहित्यिका,समीक्षक,मा.शिक्षण विस्तार अधिकारी, “महाराष्ट्र शासन पुरस्कृत “राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त व ” श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार”

प्राप्त या पुरस्कारासह देश विदेशातील 221 पुरस्काराच्या मानकरी वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना ” राजमाता जिजाऊ सन्मान ” हा पुरस्कार कार्यक्रम समन्वयक, श्री स्वामी समर्थ,विदर्भ सत्संग सोहळा समिती दिंडोरी यांनी*
जाहीर केला आहे.

ऊर्मिलाताई यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,पर्यावरण आदि कार्यक्षेत्रात अत्युत्कृष्ट व प्रेरणादायी असे आदर्शवत, समाजाला नवीन दिशा, उर्जा व ऊर्मी देणारे कार्य आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनमानसात निर्माण केला आहे. त्यांनी केलेली जनसेवा, समर्पण आणि त्यांच्या कार्याची ऊर्जा ही समाजाला सदैव प्रेरणा देणारी आहे.

Khamgaon:ऊर्मिलाताई ठाकरे यांच्या या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल “राजमाता जिजाऊ सन्मान”पुरस्कार दिनांक 20 मे 2025 रोजी वेळ दुपारी 3.00 वाजता मातृतीर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे परमपूज्य गुरुमाऊली यांचे उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.

Operation sindoor / पाकिस्तानवर भारताचा प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराने दिला जबरदस्त प्रतिसाद

0

 

Operation sindoor/ पाकिस्तानच्या प्रदीर्घ संघर्षानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने पाकिस्तानातील विविध ठिकाणी हल्ले करून पाकिस्तानच्या हिताचा प्रत्युत्तर दिला. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सात ठिकाणांवर हल्ले केले.

ज्यामध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाली आहे. या हल्ल्यामुळे भारताच्या प्रतिसादामुळे पाकिस्तान सैन्यात खळखळाट उडाला आहे.

Brekingnews / राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी करीत पोलिसांनी मॅफेड्रानसह आरोपीस केली अटक..

पाकिस्तानचे एअरबेस आणि रडार बेस

भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे 5 एअरबेस ज्यात नूर खान, रहमियार खान, रफीकुई, मुरीद, आणि सियालकोट यांचा समावेश आहे, तसेच 2 रडार बेस पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

पाकिस्तानकडून करण्यात येणारे दावे भारताने फेटाळले आहे. त्यांनी भारताच्या S-400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या भंडाऱ्याची सुरक्षा ही पूर्णपणे पुख्ता असल्याचे सांगितले आहे.

 

पाकिस्तानातील नागरिकांनी सोशल मीडियावर भारताच्या हल्ल्याची फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केली.Operation sindoor

असून, त्यामध्ये भारतीय क्षेपणास्त्रांनी जमिनीत केलेल्या मोठ्या खड्ड्यांची छायाचित्रे दिसत आहेत. पाकिस्तानी सैन्याने हे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Operation sindoor / पाकिस्तानवर भारताचा प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराने दिला जबरदस्त प्रतिसाद

 

दोन्ही देशांमधील तणाव

पाकिस्तानकडून ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या सीमेवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. परंतु भारतीय सैन्याने त्याला परतवून लावले आहे.

Operation sindoor:पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल मारसूस सुरू केला आहे ज्याचा अर्थ “काचेसारखी मजबूत भिंत” असा आहे. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानने फतेह-1 क्षेपणास्त्र डागले आहे.

Brekingnews / राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी करीत पोलिसांनी मॅफेड्रानसह आरोपीस केली अटक..

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Brekingnews:हिंगणघाट,दि.९ मे.शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने मॅफेड्रान या अंमली पदार्थांची विक्री करतांना दोन आरोपींना ६.५५ ग्राम एमडीसह ताब्यात घेतले.

प्राप्त माहितीनुसार काल ८ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात रात्री गस्तीवर होते.

RevenueNews / वेळा शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर उपविभागीयअधिकारी पथकाची कारवाई:

या दरम्यान त्यांना शहरात एमडी या अंमली पदार्थाची अवैध वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील मोठा मारोती देवस्थानाजवळ नाकेबंदी करून दुचाकीवर जाम येथून सर्विस रोडने येताना दोन इसम आढळले.

सदर इसमांस ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्याची ओळख निखिल अशोक भोकरे(२०) व त्याचा मागे बसलेला मित्र आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे(३४)दोन्ही रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट अशी सांगीतली.

त्या दोघांची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये मोटरसायकल चालक निखिल अशोक भोकरे याच्या पॅन्टच्या खिशात एका प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ मिळाला.

या अंमली पदार्थांचे वजन वजन ६.५५ ग्रॅम किंमत १८,३९० रुपये व हिरो कंपनीची विना क्रमांकाची स्प्लेंडर प्लस किंमत ९० हजार रूपये असा एकुण १, लाख ८ हजार ३९० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायदयान्वये दोन्ही आरोपीतांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

Brekingnews:ही संपूर्ण कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, आशिष नेवारे,मंगेश वाघमारे, सायबर शाखा वर्धा येथील अनुप कावळे, गोविंद मुंडे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

RevenueNews / वेळा शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर उपविभागीयअधिकारी पथकाची कारवाई:

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

RevenueNews:हिंगणघाट :- उपविभागीय अधिकारी पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर वेळा शिवारात कारवाई करीत दोन टिप्पर व ६ ब्रास वाळू जप्त केल्याची माहिती ९ मे रोजी उपविभागीय अधिकारी पथकाने दिली आहे.

Accdent news/ रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परने दोन लहान मुलांना चिरडले; आजी-आजोबा गंभीर जखमी

प्राप्त माहितीनुसार उपविभाग अधिकारी आकाश अवतरे यांच्या पथकाला दारोडा व शेकापुर घाटातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने ८ मे रोजी रात्री ११ वाजता हिंगणघाट वर्धा रोड वरील वेळा शिवारात सापडा रचुन टिप्पर क्रमांक एम एच ३६ १६७० आणि टिप्पर क्रमांक एम एच ३१ सि.क्यू ०४३८ ला थांबवू पाहणी केली असता यामध्ये वाळू भरून आढळून आली.

 

यावेळी चालकांना वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे मिळून आले नाही वाळूसह दोन्ही टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

RevenueNews:हि कारवाई उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे यांच्या मार्गदर्शनात उपविभाग अधिकारी पथकाचे मंडळ अधिकारी देविदास हेमने, तलाठी सय्यद तलाठी लढी महसूल सेवक दिनेश कोहपरे यांनी केली आहे.

Accdent news/ रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परने दोन लहान मुलांना चिरडले; आजी-आजोबा गंभीर जखमी

0

 

Accdent news:बुलढाणा: माऊली फाटा हे ठिकाण आज ९ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका रौद्ररूप दुर्घटनेचा साक्षीदार ठरले.

भरधाव वेगाने अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या टिप्परने मागून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली.

operation sindoor / ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी जन्मलेल्या मुलीचे नाव सिंदुरी, कुटुंबाची देशभक्ती प्रेरणा

या अपघातात दोन लहान बालक जागीच ठार झाले तर त्यांच्या आजी आणि आजोबांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पळशी सुपो येथून शेगावकडे जात असलेल्या प्रकाश महादेव खेडकर व साधना प्रकाश खेडकर हे दांपत्य त्यांच्या दोन नातवंडांसह मोटरसायकलने प्रवास करत होते.

माऊली फाट्याजवळील भेंडवळाजवळ टिप्परने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत ६ वर्षीय पार्थ चोपडे (राजापेठ, अमरावती) आणि ५ वर्षीय युवराज मोहन भागवत (बडनेरा) यांच्या मृत्युची नोंद झाली. याशिवाय, त्यांच्या आजी-आजोबांना गंभीर जखम झाली असून ते सध्या उपचाराधीन आहेत.Accdent news

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस आणि खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.

Accdent news: स्थानिक नागरिकांनी गंभीर अपघातामुळे संताप व्यक्त करत टिप्परला आग लावून निषेध नोंदवला आहे.