Home Blog Page 34

Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

0

 

शेगाव इस्माईल शेख

शेगाव .शहरातील विद्यानगर येथील कलामाई शाळेजवळ घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी एका आरोपीची ओळख पटली असून दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. ही घटना दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 ते 3 दरम्यान घडली.

Andolannews/ अन्नत्याग आंदोलनाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या दालनात ७ मे रोजी जिल्हाधिकारी सोबत शेतकरी मंडळाच्या बैठकीचे आयोजन

फिर्यादी कमलसिंग किरतसिंग परीहार (वय 32) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख अहेमद शेख समय (वय 36, रा. आरास लेआउट, बुलडाणा) व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घरासमोरील दरवाजाचे कुलूप तोडण्याचा तसेच शेजारी राहणाऱ्या देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीने शेगाव पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(A), 331(3), 62 व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Brekingnews :या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक निलेश गाडगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.पोलिसांकडून दुसऱ्या अनोळखी आरोपीचा शोध सुरूआहे.शेगावपोलिसांनीनागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Andolannews/ अन्नत्याग आंदोलनाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या दालनात ७ मे रोजी जिल्हाधिकारी सोबत शेतकरी मंडळाच्या बैठकीचे आयोजन

0

 

अकोला मूर्तिजापूर विलास सावळे

१ मे रोजी रखरखत्या उन्हात राष्ट्रीय महामार्गावर होणारे शेतकरी आंदोलन प्रशासनाने केलेल्या विनंतीवरून ८ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे व भारतीय किसान संघाचे राहुल राठी , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या सहमतीने दिली.
कुरूम, हातगाव, निंबा, जामठी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आले आहे.

सोबतच पिक विमा आजपर्यंतही मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अतिवृष्टीची मदत, पिक विमा ,त्वरित मिळावा याकरता पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना वेळोवेळी निवेदन देऊन मदतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली होती. यावर अनेक दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत जाहीर केल्या गेली नसल्यामुळे लोकशाहीने दिलेल्या अस्त्राचा उपयोग करून शेतकऱ्यांनी १ मे रोजी अन्न त्याग आंदोलनाची हाक दिली होती.

Yavalnews / यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची

आंदोलनाची धग लक्षात घेता तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मंडळांची सभा आज आयोजित केली होती. यावेळी वेगवेगळ्या गावातील ६० शेतकरी प्रतिनिधी हजर होते. या सभेमध्ये पिक विमा, पिकाचे टाकण्यात येत असलेले प्लॉट,पीक पाहणी व कापणी अहवाल त्याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करणे, न मिळालेली अतिवृष्टीची मदत, यावर सांगोपसांग चर्चा होवून यावेळी अनेक शेतकऱ्यांनी प्रश्नांची मांडणी केली.

शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता पीक कापणी अहवाल संबंधीची जून मध्ये कार्य शाळा आयोजन, पीक विम्याचे प्रश्न सोडवण्यासाठी दरमहा सभा, आदि निर्णय घेऊन यावर जातीने लक्ष ठेवण्याचे आश्वासन संदीप अपार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.या त्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे दालन उपलब्ध होणार आहे.

येत्या ७ मे रोजी अकोला येथील जिल्हाधिकारी यांच्या समवेत होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक निर्णय न झाल्यास ८ मे पासून राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्धार राजू वानखडे, राहुल राठी , कैलास साबळे व उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी जाहीर केला.

Andolannews :या वेळी सुभाष मोरे, छोटू पाटील बोंडे, प्रफुल्ल मालधूरे नंदकिशोर बबानिया, डॉ. संजय उमाळे, पंकज वानखडे, आनंद बांगड, विकी तिवारी,अजय गोरले, प्रीतम देशमुख, अक्षय देशमुख, गणेश भोसले, कमल किशोर जयस्वाल, पुरुषोत्तम धवक, अरुण गावंडे, ज्ञानेश्वर मोरे, प्रदीप भोयर, संदीप मोरे, अनिल राठोड,अरुण बोंडे उपस्थित होते.

Yavalnews / यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:तालुक्यातील मागील दोन महीन्यात मनवेल आणी डांमुर्णी या दोन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन चिमूकल्या बालकांचा बळी गेला होता, या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपयेप्रमाणे ५० लाख रूपयांचे धनादेश चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले .

यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिना निमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

Yavalnews /यावल तहसील कार्यालयात सावळा गोंधळ शिधापत्रीका धारकांची आर्थिक लुट व रेशनिंग धान्याची काळया बाजारात विक्री : आमदार चंद्रकांत सोनवणे झाले संत्पत

या तालुकास्तरिय आढावा बैठकीस यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ),पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्र्वनाथ धनके,यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी

जहॉंगीर तडवी यांच्यासह वनविभागाच्या पश्चीम क्षेत्राचे वनपाल विपुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मनवेल तालुका यावल येथे दिनांक ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात केशव बारेला या ७ वर्षीय बालकाला आपला जिव गमवावे लागले होते तर डांभुर्णी तालुका यावल या गाव शिवारात दिनांक १५ एप्रील रोजी मेढपालन करणाऱ्या ठेलारी कुटुंबातील रत्नाबाई या २ वर्षीय लहान चिमकुलीचा बिबट्याने बळी घेतला.

Yavalnews:होता,दरम्यान या मरण पावलेल्या दोघा बालकांच्या कुटुंबास शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळावी याकरीता चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे यांनी सातत्याने शासन दरबारी सर्वतोपरीने प्रयत्न करीत त्यांना आर्थिक मदत मिळून दिली .

Yavalnews /यावल तहसील कार्यालयात सावळा गोंधळ शिधापत्रीका धारकांची आर्थिक लुट व रेशनिंग धान्याची काळया बाजारात विक्री : आमदार चंद्रकांत सोनवणे झाले संत्पत

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:तहसील कार्यालयात दलालांच्या आर्थिक गोंधळामुळे सर्वसामान्याना मोफत मिळणारे रेशनकार्ड मिळवण्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतले जात असून, स्वस्त धान्य दूकानदार हे वितरणासाठी मिळालेल्या धान्यातुन अर्धापेक्षा अधिक धान्य साठवन करून काळया बाजारात विकत असल्याबाबतच्या तक्रारी असल्याची माहिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी यावल येथे सेवा हक्क दिना निमित्ताने संपन्न झालेल्या आढावा बैठकीत दिली .

यावल पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिना निमित्त आयोजित विविध शासकीय विभागाच्या कार्याचा आढावा घेण्यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानाहून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे बोलत होते . यावेळी यावल तहसीलच्या पुरवठा विभागाच्या कार्यपध्दती बाबत स्वस्त धान्य लाभार्थ्याच्या अनेक तक्रारी असल्याची माहीती खुद्द आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली .

Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन

दरम्यान अनेक श्रीमंतांकडे गरीबांच्या हक्काचे पिवळे कार्ड असुन ते तात्काळ चौकशी करून रद्द करण्यात यावेत तसेच तहसील कार्यालयात शिधापत्रिका मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन दोन हजार रूपयांची होणारी दलालांच्या माध्यमातुन होणारी आर्थिक लुट त्वरीत थांबवावी व स्वस्त धान्य दुकानदाराकडून काळया बाजारात विक्री जाणाऱ्या धान्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे यावल येथे नुकतेच रूजु झालेले तालुका पुरवठा अधिकारी अभिमन्यु चराटे यांना आदेश दिले आहे .

Yavalnews:या आढावा बैठकीस तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .सौ.मंजुश्री गायकवाड ( बोरसे ), आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आठवडे ,यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते .

Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

हिंगणघाट :- नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान व दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ९कोटी ५० रूपयांचे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते आज दी. २८/४/२४ ते ०२/०५/२०२५ पर्यंत सुरू राहणार असून यामध्ये शहरातील विविध विकासकामे होणार आहेत.

या भूमिपूजनाच्या पहिल्या टप्प्यात शितला माता मंदिर परिसरातील शासकीय जागेवरील संरक्षण भिंत बांधकाम किंमत ६० लक्ष येथून सुरूवात झाली असून याच जागेवर अग्निशमन दलाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण पार पडले.

Shivsena / शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हिंगणघाट नगरपालिकेच्या (MC) अग्निशमन दलात (Fire Brigade) आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे. आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन आपत्कालीन परिस्थितीत (Emergency Situation) मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा मोलाचा उपयोग होईल,हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरणासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते राज्य शासनाकडून हिंगणघाट नगरपालिका अग्निशमन दलाकरीता अत्याधुनिक सुविधा असलेले अग्निशमन वाहन उपलब्ध झाले आहेत वाहन आवश्यक सर्व साहित्याने सज्ज
आधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहन आपत्कालीन परिस्थितीत त्वरित घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. वाहनात प्राथमिक उपचार, स्ट्रेचर उपलब्ध आहेत. आगीवर जलद नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० लिटर पाण्याची व ५० लिटर फोमची क्षमता आहे.

इमारत कोसळल्यास किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत, अपघातस्थळी मदत कार्यासाठी, बचाव कार्यासाठी आपत्कालीन टूल बॉक्स, लाईफ जॅकेट, वूड कटर आदी साहित्य सामग्री उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल,

शहराचा विस्तार वाढत असल्याने अग्निशमन सेवा बळकट करण्याची गरज आहे. राज्य शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधल्यावर एक वाहन तत्काळ उपलब्ध केले आहे. सदर वाहन बाजार परिसरात किंवा अत्यंत अरुंद रस्त्यांवर घटनास्थळी पोहोचण्यासाठी उपयुक्त आहे,त्यामुळे अग्निशमन दलात वाहनांची संख्या वाढवण्यासाठी व अग्निशमन केंद्रांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Hingnghat :असे मनोगत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले या प्रसंगी त्यांनी वरील मनोगत व्यक्त केले या लोकार्पण सोहळाला माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, मुख्याधिकारी उरकुडे,शहराध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरसेवक धनंजय बकाणे, अर्चना कुबडे,देवा कुबडे, अमोल खंदार,भाष्कर शेंडे,दिपक चौधरी,राजू कामडी, अतुल नंदागवळी, अग्निशमन अधिकारी गौरव गाणार , नगर अभियंता जगदीश पटेल,नासरे, इंजिनिअर अली,गिरीश गंडाईत सुनील डोळस वैभव येनगंधलवार नितीन जंगले किशोर समर्थ व अग्निशमन विभागातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Shivsena / शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

0

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-दि. २७ एप्रिल २०२५
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी हिंगणघाट शहरातील शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

bjpnews/ भाजपमध्ये राहुल शिरसोले-संजय इंगळे यांचा जाहीर प्रवेश; जळगाव विधानसभा मतदारसंघातील नेतृत्वावर विश्वास”

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २७ एप्रिल २०२५ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने बंटी वाघमारे , गजानन फाले, बाळासाहेब भोयर, गणेश अंबुलकर, केशव देवलकर, शालिक सुरपाम, गणेश नांदे, सुभाष दाते, शरद नांदे, विजू आत्राम, सुरज आत्राम, शुभम कोसरे, विठ्ठल बावणे, आकाश आत्राम, प्रकाश टिपले, नारायण अवचट,

महादेव महाजन, अक्षय तितरे , सागर कोल्हे, सचिन सातघरे, अक्षय बाकडे, विकी आतराम , साहिल मन्ने , आकाश साठोणे, शुभम नैताम, मनोज हसतबांधे, विनोद सहस्त्रबुद्धे , विजय बोबडे, अनिकेत खडसे इत्यादी सह असंख्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश देण्यात आला.. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Brekingnews / हिंगणघाट नजीकच्या नांदगाव(बो.)येथील मालगोदामाला आग लागून लाखो रुपयांची सरकी आगीत भस्मसात झाली.

सदर कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांचे सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे , भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे ,भाजपा विधानसभा प्रमुख संजय डेहणे, डॉ. उमेश तुळसकर, भाजपा जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, भाजपा हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे, हिंगणघाट पंचायत समिती माजी

Shivsena :सभापती शारदा आंबटकर , समुद्रपूर पंचायत समिती माजी सभापती सुरेखा टिपले, ज्येष्ठ कार्यकर्ता वसंतराव पाल गुरुजी, रवी येनोरकर, ज्ञानेश्वर भागवते, माजी नगरसेवक धनंजय बकाने, रवी काटवले, माजी नगरसेवक देवा पडोळे, माजी नगरसेवक बंटी वाघमारे, अमोल खंदार ..
इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

bjpnews/ भाजपमध्ये राहुल शिरसोले-संजय इंगळे यांचा जाहीर प्रवेश; जळगाव विधानसभा मतदारसंघातील नेतृत्वावर विश्वास”

0

 

bjpnews/ संग्रामपूर तालुक्यातील युवा नेते राहुल संजय शिरसोले आणि संजय मुरलीधर इंगळे यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

भाजपच्या जळगाव जा.विधानसभा मतदारसंघाच्या दमदार आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत, या दोघांनी राजकीय जोडणी केल्याचं जाहीर करण्यात आलं.

Brekingnews / हिंगणघाट नजीकच्या नांदगाव(बो.)येथील मालगोदामाला आग लागून लाखो रुपयांची सरकी आगीत भस्मसात झाली.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विकासात्मक धोरणांना प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट केलं आहे.

वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हा संघटक राहुल शिरसोले, यांच्यासोबत प्रगतीशील शेतकरी नेते संजय इंगळे यांनी संग्रामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपाच्या वतीने सदस्यता स्वीकारली.

भाजप सरकारच्या जनहिताच्या योजना आणि मतदारसंघातील विकासकामांचा उल्लेख करत, शिरसोले म्हणाले, “भाजपची विकासाची दृष्टी युवांना प्रेरणा देते.” पक्षाच्या संघटन सभापती पांडुरंगजी इंगळे यांनी नवप्रवेशीयांच्या कार्यकर्तवृत्तीवर भर देत म्हटलं,

Pahalgam attack / मुर्तीजापुरातील दांपत्य थोडक्यात बचावले..!

“सहकारी चळवळीतील अनुभवी नेत्यांमुळे संग्रामपूरच्या विकासाचं धोरण सुटेल.”

bjpnews :या प्रसंगी संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील, संचालक उमेश टावरी, श्रीकांत मारोडे, तसेच प्रमुख कार्यकर्ते ओमप्रकाश धूत, रमेश चोपडे, जयराम इंगळे, प्रा. रमेश राजनकर यांसारख्यांनी सहभाग घेतला. राहुल शिरसोले यांच्या पक्षातील सामील होण्यामुळे भाजपच्या जिल्हा संघटनेत मजबुती येईल, अशी अपेक्षा पक्षकर्त्यांनी व्यक्त केली

Brekingnews / हिंगणघाट नजीकच्या नांदगाव(बो.)येथील मालगोदामाला आग लागून लाखो रुपयांची सरकी आगीत भस्मसात झाली.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Brekingnews:हिंगणघाट :- नांदगाव(बो.)येथील लक्ष्मीकांत डागा यांचे मालकीच्या भाड्याने घेतलेल्या शांती इंडस्ट्रीजच्या मालगोदामाला पहाटे ३ वाजताच्या दरम्यान गोडाऊनमध्ये ठेवलेल्या सरकीला आग लागल्याचे निदर्शनास आले, परंतु पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण गोडाऊन आगीच्या कवेत घेतले.

आग विझविण्याकरिता हिंगणघाट पालिकेच्या तसेच स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.

Hingnghat/ दहशतवाद्याच्या पुतळयाला जाळून हिंगणघाट मनसे कडून निषेध

या गोडाऊनमध्ये शांती इंडस्ट्रीजच्या विजय अग्रवाल यांचा लाखो रुपयाच्या सरकीचा मालाचा साठा करून ठेवण्यात आला होता.

गोडाऊन वरून उच्च दाबाची वीज वाहिनी जात असल्यामुळे यातून आग लागण्याची शक्यता अग्निशमन दलाचे प्रभारी गौरव गाणार यांनी वर्तवली आहे, परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग विझविण्याचे कार्य प्रगतीपथावर असून अजूनही आग आटोक्यात आली नाही,

या करिता जिल्ह्यातील आर्वी पुलगाव डिफेन्स,सिंदि(रेल्वे), देवळी येथील अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.

आज सकाळपासूनच आग आटोक्यात आणण्याकरीता युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेग्रिगेशन पद्धतीचा अवलंब करीत असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी गौरव गाणार यांनी दिली.

Brekingnews:अजूनही आग धुमसत असून आग नियंत्रणात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, यापुढे अजून ५-६ तास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणार असल्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळावर पोलीस विभाग तसेच महसूल विभागाचे अधिकारी पोचले असून तहसीलदार योगेश शिंदे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Hingnghat/ दहशतवाद्याच्या पुतळयाला जाळून हिंगणघाट मनसे कडून निषेध

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- काश्मिर येथील पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी भारतीय नागरिक यांना हिंदू धर्म विचारून दहशतवादी कडून गोळ्या मारण्यात आल्या.

त्या निषेदार्थ दी. 25/4/25 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाट विधानसभाच्या वतीने आंबेडकर चौक इथे पहलगाम दहशतवादी याचा फोटो व पुतळया ला जाळून मनसे कडून रोष दाखविण्यात आल्या.

Pahalgam attack / मुर्तीजापुरातील दांपत्य थोडक्यात बचावले..!

व या घटनेत मृत्यू झालेल्या हिंदू नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर मनसे अध्यक्ष केतन ता्यवाडे, जिल्हा सचिव राजू बोंबले , ता संघटक हरि महाजन स, ता सचिव संजू हिंगणे स,ता संघटक देवा काटकर,श सचिव योगेश नासरे श उपाध्यक्ष कामेश बावणे, रमेश राऊत, अजय खंदार, श सरचिटणीस

Hingnghat :केशव उमाटे श संघटक राम कांबळे, वी अध्यक्ष शरद खोंड,स अध्यक्ष वा सागर घवघवे स अध्यख ची रोशन जाधव, स अध्यक्ष खै अक्षय थुल, आकाश पोटफोडे कृष्णा काळे राहुल बावणे, विक्की खडसे, धीरज भालेकर,सारंग देशपांडे,मंगेश वरखेडे रिता बावणे, कांचन बावणे, सोनल ता्यवाडे,संध्या बावणे, दीपा बावणे, ज्वाला भाजीखाये, परी चवरे पिंकी भगत,

Pahalgam attack / मुर्तीजापुरातील दांपत्य थोडक्यात बचावले..!

0

 

अकोला मूर्तिजापूर विलास सावळे

Pahalgam attack:मूर्तिजापूर :-जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला, या हल्ल्याच्या दिवशीच मुर्तीजापुर येथील रहिवासी राकेश हुंदानी त्यांची पत्नी व दोन मुली यांच्या सह नातेवाईक असे ऐकून ८ जण पहलगाम येथे पोहचले.

परंतु दैव बलवत्तर म्हणून दहशतवादांच्या हल्ल्यातून हे दांपत्य बचावले. दि.२१ एप्रिल रोजी मूर्तिजापूर करिता राकेश हुंदानी, पत्नी सिमरन हुँदानी व दोन मूली दृष्टी हुँदानी, अनन्या हुँदानी व त्यांच्या नातेवाईकांनी जम्मू काश्मीरच्या सहलीकरिता आपली यात्रा प्रारंभ केली.

Hingnghat/ भानापूर येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण कार्यवाही करण्याची मागणी

व २२ एप्रिल रोजी हे दांपत्य आपल्या नातेवाईकांसह जम्मू काश्मीर च्या पहलगाम येथे पोहचले असता त्यांनी राहण्याकरता बुकिंग केल्या असलेल्या हॉटेल वर जात असतांनाचं अचानक काही अंतरावर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याचे वृत्त त्यांना भारतीय लष्कराच्या जवानांकडून समजले.

या दांपत्यांना व नातेवाईकांना काही हॉटेलच्या काही अंतरा पूर्वीच भारतीय लष्कराच्या जवानांनी अडवून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवल्या ने मुर्तीजापुर येथील राकेश हुंदानी त्यांची पत्नी ,दोन मुली व नातेवाईकांचे दैव बलवत्तर म्हणून बाल बाल बचावले.

विशेष महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री यांनी भेटून याना मुंबई कड़े रवाना केले.

Pahalgam attack:मूर्तिजापुर येथील समाज सेवक सुनील लक्षवाणी, लखन अरोरा, गोपाल दायमा मूर्तिजापुर मतदार संगतिल आमदार हरीश पिंपले व खासदार अनुप धोत्रे यांनी सपर्क करुण सुख रूप परत अन्याची आश्वासन देऊन मुंबई ला परत आणले.हुँदानी परिवार सहकार्य करणार च्या खुप खुप आभार मानत आहे.