Home Blog Page 360

मोबाइल चे चाइनीज खेळा पासुन दूर राहने करता विरावली गावतिल श्रीराम ग्रुप मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

मोबाईल चे चाईनीज खेळा पासून दूर राहने करता विरावली गावतिल श्री राम ग्रुप मार्फत क्रिकेट स्पर्धाचे आयोजन दिनांक 10/12/2021 पासुन म्हणजेच आज पासून विरावली येथे आयोजन केले आहे यात परिसरातिल यावल दहिगांव, सौखेदा, कोरपावली व गावातील टीम शामिल झाले आहेत व आयोजक यानी आवाहन केले आहे की आनखी हि ज्या टिम शामिल होऊ इच्छुक आहेत त्यान्नी सहभाग घ्यावा ही स्पर्धा 01 आठवडा चालानार आहे असे आवाहन आयोजक यान्नी कड़वले आहे। या स्पर्धा चे उटघाटन सैनिक सुरेश धनगर (सीआरपीएफ जवान) सैनिक महेंद्र पाटील (ग्वालियर हुन ऑनलाइन), पत्रकार शेखर पटेल, डेनिम चे संचालक स्वप्निल बोरसे, कार्तिक कलेक्शन चे संचालक नीलेश पाटिल, कोळवदकर व साई ज्वेलर्स चे संचालक प्रशांत रणधीरेे यांच्या हस्ते उद्या १०/१२/२१२१ ला सकाळी 10.30 मिं. विरावालि ला होनार आहे तरी सारे क्रिकेट प्रेमिनी खेळाळु ना प्रोत्साहन देने करता हजर रहावे
आपल्या आपल्या गावातिल टीम जरूर पाठवा आणि ज्या गरीब मुला कड़े इंट्री फी नसेल त्यानी कॉल करा टेंशन घेऊ नका फक्त मैदानी खेळ चे आयोजन झाले पाहिजे व (तसे मैदान खूप कमिच आहेत आजचा युगांत) आजचे युवकांचा मोबाईल गेम पासुन सुटकारा झाला पाहिजे हेच श्री रामराज्य ग्रुप व आम्हा यावल तालुका सैनिकांचे उद्दिष्ठ आहे चला लवकर आजच सहभाग नोंदवा

प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ आंदोलन स्वरुपी प्राथमिक आरोग्य केंद्र समोर

0

 

आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे

(चंद्रपूर घुग्घूस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घूस समोर मागील काही महिन्यांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहे. याची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा नगरपरिषद कार्यालय घुग्घूस, ए. सी. सी. सिमेंट कंपनी घुग्घूस, आय. वि.आर. सी. एल. टोल नाका चंद्रपूर यांना मागील ५ महिण्यान पासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा या खड्ड्यांची अजूनपर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. घुग्घूस शहरामध्ये येण्याचा हा मुख्य मार्ग असून प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरच मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना विशेषतः गरोदर मातांना या खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे परंतु आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा दिनांक २१/०७/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले होते परंतु यावर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक २४/११/२०२१ रोजी परत निवेदन देण्यात आले परंतु प्रशासनाला मात्र जाग आली नसल्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा प्रशासनाला जाग आणण्याकरिता दिनांक १६/१२/२०२१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घूस समोर आंदोलन स्वरुपी रांगोळी स्पर्धा आम आदमी पार्टी घुग्घूस शहर अध्यक्ष अमित बोरकर उपाध्यक्ष अभिषेक सपडी यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले असून घुग्घूस शहरातील समस्त नागरिकांना या आंदोलन स्वरुपी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी केले.

WCLकॉलनी दूषित पाण्याची समस्या निघाली : काँग्रेसच्या मागणीला यश

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : येथील सुभाष नगर, गांधी नगर, व परिसरातील वेकोली वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही नाल्यातून जात होती व फुटलेल्या पाईपलाईन मधून नागरिकांना दूषित व घाणेरडे पाणी प्यावे लागत होते.
यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवून अनेक जीवघेण्या आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत होते.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी नागरिकांसह वेकोलीवर धडक दिली होती.

यात घाणेरड्या पाण्याला घेवुन काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

त्याची दखल घेऊन वेकोलीने तीस लाख रुपयांची पाईपलाईन टेंडर मंजूर केले असून लवकरच त्याचे कार्य शुरू होणार आहे.

आज ऊर्जाग्राम ताडाळी वेकोली कार्यलयात झालेल्या बैठकीत हेच आर हेड बिनेज कुमार यांनी वेकोली संदर्भातील अन्य समस्यां ही तातळीने सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, सचिन कोंडावार, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

यंग चांदा ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता भ्रष्टाराविरोधात सैनिक म्हणून लढेल – आ. किशोर जोरगेवार

0

 

मनपा समोर यंग चांदा ब्रिगेडचे मनपातील सत्ताधारी भ्रष्टाचाऱ्यांना 5 स्टार पुरस्कार वितरण आंदोलन

(चंद्रपूर घुग्गुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

25 वर्षापासून पालिकेत भाजप सत्ता उपभोगत आहे. सत्ताधाऱ्यांना या 25 वर्षात साध पिण्याच पाणीसूध्दा चंद्रपूरकरांना नियमीत देता आले नाही. यातून त्यांची कार्यक्षमता लक्षात येते. आता अमृत कलश योजनेचा महाघोटाळा करत शहरातील सर्व रस्ते खोदून चंद्रपूर शहराला विद्रूप करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. महामारीच्या काळातही गरजुंच्या जेवणाच्या डब्यात घोटाळा करत मनपातील सत्ताधाऱ्यांनी घोटाळेबाजीत विक्रम नोंदविला आहे. मात्र आता या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असून यंग चांदा ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता भ्रष्टाचारा विरोधात सैनिक म्हणून लढेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यांसाठी त्यांना 5 स्टार देण्याचे अभिनव आंदोलन आज गुरुवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा समोर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सर्व प्रथम देशाचे संरक्षण दल प्रमूख जनरल बिपीन रावत यांच्यासह सर्व शहिद जवांनाना दोन मिनिटांचा मौण पाडून श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी प्रसंगी प्रतिकात्मक महापौर व उपमहापौर यांना 5 स्टार नामांकन देऊन गौरविण्यात आले. या आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, पंकज गुप्ता, श्याम हेडावु, सलिम शेख, राम जंगम, तिरुपती कलगुरुवार, अजय दुर्गे, करणसिंह बैस, तापूष डे, नितीन शहा, आनंद इंगळे, आनंद रनशूर, बबलू मेश्राम, हरमन जोसेफ, विलास वनकर, विलास सोमलवार, प्रतिक शिवणकर, रुपेश पांडे, प्रशांत रोहनकर, इमरान खान, प्रेम गंगाधरे, सय्यद अबरार, नकुल वासमवार, कालिदास धामणगे, देवा कुंटा, दुर्गा वैरागेडे, कल्पना शिंदे, विमल काटकर, भाग्यश्री हांडे, वैशाली मेश्राम, सविता दंडारे, आशा देशमूख, अस्मिता दोनारकर, संगीता विश्वोजवार, नायदा काजी, अनिता झाडे, शमा काजी, शांता धांडे, वैशाली रत्नपारखी, वंदना वाघमारे, आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, महानगर पालिकेतील सफाई कर्मचारी अपू-या वेतन व सुरक्षा साधनांच्या अभावत उत्तम सेवा देत आहे. त्यांच्या याच सेवेमूळे चंद्रपूर मनपाने स्वच्छ सर्वेक्षणात तिन स्टार नामांकन मिळवीले मात्र याचे सर्व श्रेय मनपातील भ्रष्टाचारी सत्ताधिकारी घेत असून शहरात होर्डींग्स लावून गवगवा करत आहे. मात्र त्यांच्या या खोट्या गवगव्याने त्यांनी केलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा लपणार नाही. त्यांनी जनतेच्या कराच्या पैशाची लुट केली आहे. असा आरोपही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. नागरिकांच्या करातून येणा-या पैश्याचे नियोजन मनपातील सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. परिणामी चंद्रपूर शहरातील नागरिकांना आजही मुलभुत सोयी सुविधांसाठी लढावे लागत आहे. पाणी कर अदा करुनही शहरातील अनेक भागात नियमीत पाणी पूरवठा केला जात नाही. मनपातील भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या या भोंगळ कारभाराला जनता कंटाळली आहे. आता त्यांना परिवर्तन हव असेही यावेळी ते बोलले. जटपूरा गेटच्या वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आपण वेळो-वेळी मनपा प्रशासनाला योग्य सुचना केल्यात मात्र नियोजन शुन्य कारभारामूळे हा प्रश्नही मनपा प्रशासनाने सोडविला नाही. हुकूमशाहीचे निर्णय घेत मनपाने चंद्रपूरकरांवर वारंवार अन्याय केला आहे. त्यांच्या याच धोरणांमूळे अनेक योजनांपासून चंद्रपूरकरांना वंचित राहावे लागत असल्याचा आरोपही यावेळी बोलतांना त्यांनी केला.
मनपातील भ्रष्टाचाऱ्यांनी मागील चार वर्षात अमृत कलश योजना घोटाळा, घनकचरा घोटाळा, कोविड घोटाळा, आझाद बाग घोटाळा, लेखापरिक्षणात कोट्यावधी रुपयांची अनियमितता यांसह अनेक घोटाळे करत राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट महानगरपालिका म्हणून स्व:ताची ओळख निर्माण केली आहे. आता या भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकविण्याचा संकल्प चंद्रपूरकरांनी केला असून हे आंदोलन याची सुरवात असल्याचेही ते यावेळी म्हणाले, दुपारी 2 वाजता यंग चांदा बिग्रेडच्या कार्यालयातून या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी मनपा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते महानगरपालिकेवर धडकले. येथे या आंदोलनाचे रुपांत्तर 5 स्टार पूरस्कार वितरण सोहळ्यात झाले. यावेळी प्रतिकात्मक महापौर आणि उपमहापौर यांना 5 स्टार नामांकन देत शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बुलढाणा जिल्ह्यात मतदानाची तयारी पूर्ण

0

 

अनिलसिंग चव्हाण सह अर्जुन कराळे

367 मतदार बजावणार हक्क

12 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान

राज्यात आज विधान परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत नागपूर आणि अकोल्यातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान पार पडणार असून अकोला बुलढाणा आणि वाशिम हे मतदान कार्यक्षेत्र असलेल्या एका जागेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 367 मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 169 महिला परीक्षा 198 पुरुष मतदारांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 11 ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी मतदानासाठी प्रशासनाने केलेल्या तयारी…

यावल तालुक्यातील ४ ग्राम पंचायत पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीसाठी ४ जागासाठी ७ उमेदवार रिंगणात तर तिन उमेदवार बिनविरोध

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागातील २५ सदस्य निवडीसाठी २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या वैध १३ उमेदवारी अर्जांपैकी गुरुवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी दोन, उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने ४ उमेदवार निवडीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत, पैकी पाडळसे , कासवे, व न्हावी प्र. यावल येथील प्रत्येकी एक असे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

तालुक्यातील म्हैसवाडी, पिळोदे, बुद्रुक ,पाडळसे, कासवे ,न्हावी प्र अडावद, शिरागड, गिरडगाव, दहिगाव, गाड-या, न्हावी प्र यावल , बोरावल बु, अश्या ११ ग्रामपंचायतीच्या १८ प्रभातील पंचवीस सदस्य निवडीसाठी २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक करिता केवळ सोळा उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यातील तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरल्याने व त्यातील गुरुवारी माघारीची अंतिम दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने ११ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले त्यातील न्हावी प्रभाग १ मध्ये १ उमेदवार ,पाडळसा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक४मधुन एक आणी कासवे ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक२मधील एक उमेदवार अशा ३ उमेदवार यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने त बिनविरोध निवडुन आले आहेत. पिळोदा बुद्रुक येथे अन. जाती, प्रवर्गातील एक सदस्य निवडीसाठी न्हावी प्र यावल येथे सर्वसाधारण स्त्री , प्रवर्गातील एका जागेसाठी व सर्वसाधारण प्रवर्गाच्या दोन जागेसाठी अशा न्हावी येथे दोन प्रभावी तीन जागेसाठी निवडणूक होत आहे.
११ ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांपैकी तीन प्रभागातील चार उमेदवार निवडीसाठी ही निवडणूक होत असून दहीगाव येथील नामाप्र स्त्री राखीव प्रभागातील निवडणूक स्थगित ठेवण्यात आली आहे तर सतरा जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज नसल्याने , त्या जागा रिक्तच राहणार आहेत .

जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून भष्ट्राचारात सहभागी असलेल्यांवर कार्यवाही करावी या मागणीकरिता तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरू करण्यात आले आहे.

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज गुरुवार, दिनांक ९ डिसेंबर रोजी यावल येथील तहसील कार्यालयासमोर यावल नगर परिषदच्या माध्यमातुन सुमारे १ कोटी ८० लाख रूपये निधीच्या खर्चातुन नवीन साठवण तलावाची उभारणी करण्यात आली आहे. या कामात मोठया प्रमाणावर भ्रष्ठाचार झालेला असून या संदर्भात सर्वप्रथम यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे.

भाजपच्या या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी सदर भ्रष्ठाचाराप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून ३० दिवसाच्या आत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहेत. तथापी नगर परिषद यांनी साठवण तलाव कामाचे बिल व डिपोजिट अदायगी केली असल्याचे कळाले असून या कामात अनियमितता करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला.

या कामाच्या चौकशी समितीने अदयाप नगर परिषदेला कोणतेच चौकशी कामी आदेश दिलेले नाहीत. भ्रष्ठाचारात सहभागी असणाऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे, भाजपाचे यावल शहराध्यक्ष निलेश गडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, भाजयुवा मोर्चाचे रितेश बारी, शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश चौधरी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राऊल बार , शहर सरचिटणीस परेश नाईक, अॅड गोविंद बारी, गोपाळसिंग पाटील, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे यांनी या साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे .

भक्तीभावाच्या समृद्ध परंपरेचा पिंपळखुट्याचा ‘दिपोत्सव’ :

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो.9921400542

आपला देशा आणि समाजाला येथील परंपरा, सण, उत्सव, चालीरिती यांनी पार समृद्ध करून सोडलंय. जागतिकीकरणातून होत असलेल्या शहरीकरणामूळं या लोकधारेचा प्रवाह काहीसा खंडीत झाल्याचं चित्रं अलिकडच्या काळात निर्माण झालं आहे. मात्र, हा समृद्ध वारसा आपल्या ग्रामीण भागातील गाव-खेड्यांनी अगदी प्राणपणाने जपला आहे. अशाच एका भक्ती परंपरेतून अध्यात्म अन आनंदाची अनुभूती देणा-या कार्यक्रमास मला उपस्थित राहता आलं.

पातूर तालूक्यातील जिल्ह्यातील शेवटचं गाव असलेल्या पिंपळखुटा गावानं गेल्या ४१ वर्षांपासून गावात एक वैभवशाली अध्यात्मिक परंपरा जपली आहे. ही परंपरा आहे नऊ दिवसांच्या ‘ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या’ची. नऊ दिवस या गावाचं अक्षरश: गोकूळ होऊन जातं. गावातील तरूण मंडळींचा हरिपाठ, उभं राहून भक्तीरसात बेभान होत खेळलेली ‘पाऊली’ पाहणं म्हणजे डोळ्यांची पारणं फेडणारा आनंद. अलिकडे गावाचं गावपण हरवत चाललं असतांना या गावानं ‘एकते’ची परंपरा कायम जपली. या कार्यक्रमात गावातील माता-भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं होतात. सर्व गाव यानिनित्तानं एक होऊन जातं. याच संस्कारातून या गावात व्यसनाधिनतेचं प्रमाणही अगदी नगण्य असल्यासारखं आहे.

पारायण सोहळ्याच्या समारोपाला मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. गावातील ‘श्री.ज्ञानराज माउली मंडळा’चे कार्यकर्ते आणि मित्र कपिलभाऊ खरप यांच्यामूळे या आनंद अन भक्तीच्या सोहोळ्याला हृदयात साठवता आलं. तब्बल चार तास कार्यक्रमाला बसूनही गावातील स्त्रिया, आबाल-वृद्धांचा उत्साह शब्दांपलिकडचा होता. हा कार्यक्रम, येथील ‘ते’ तीन तास सर्वार्थानं नवा आनंद, ऊर्जा आणि ताकद देवून गेले.

प्राथमिक उप आरोग्य केंद्र श्री क्षेत्र नागझरी हे मुख्य प्राचारिकेच्या प्रतीक्षेत

0

 

प्राथमिक उप आरोग्य केंद्र श्री क्षेत्र नागझरी, तालुका_ शेगाव,, जिल्हा_ बुलढाणा (महाराष्ट्र ) या ठिकाणी मुख्य परिचारिका कोगदे मैडम मुख्यालयात नसल्या बाबत, व गेल्या 5 ( पाच) ते 6 (सहा) वर्षापासून शासनाने लाखो रुपये खर्च करून जो प्रसूति गृह बांधलेला आहे त्या प्रसुति गृह मध्ये आतापर्यंत एक ही महिलाची प्रस्तुति झाली नाही,, श्री क्षेत्र नागझरी या ठिकाणी प्रसूति गृह हे केवळ शो ची वस्तु ओळखल्या जाते,, गावच्या जनतेला श्री क्षेत्र नागझरी या ठिकाणी प्रथमोपचार भेटत नाही, तसेच मागील दोन महिन्यांमध्ये गावांमध्ये डेंगू, टायफेड, मलेरिया या रोगाने थैमान घातले होते यामध्ये गावकर्‍यांना कोणीही मदत केली नाही त्यामुळे गावातल्या लोकांना खूप त्रास झाला.असल्या पुष्कळ समस्या श्री क्षेत्र नागझरी च्या उपकेंद्र मध्ये विद्यमान आहे करिता मा. तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांना गावकरी जनतेने तक्रार केली आहे..

 

प्राथमिक उप आरोग्य केंद्र श्री क्षेत्र नागझरी, तालुका_ शेगाव,, जिल्हा_ बुलढाणा (महाराष्ट्र ) या ठिकाणी मुख्य परिचारिका कोगदे मैडम मुख्यालयात नसल्या बाबत, व गेल्या 5 ( पाच) ते 6 (सहा) वर्षापासून शासनाने लाखो रुपये खर्च करून जो प्रसूति गृह बांधलेला आहे त्या प्रसुति गृह मध्ये आतापर्यंत एक ही महिलाची प्रस्तुति झाली नाही,, श्री क्षेत्र नागझरी या ठिकाणी प्रसूति गृह हे केवळ शो ची वस्तु ओळखल्या जाते,, गावच्या जनतेला श्री क्षेत्र नागझरी या ठिकाणी प्रथमोपचार भेटत नाही असल्या पुष्कळ समस्या श्री क्षेत्र नागझरी च्या उपकेंद्र मध्ये विद्यमान आहे करिता मा. तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांना गावकरी जनतेने तक्रार केली आहे..

भरधाव वाहनाच्या धडकेत तीन जखमी

0

 

बसस्थानक चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करा – विवेक बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

गुरवार 9 डिसेंबर रोजी सकाळी दरम्यान सिद्धार्थ मेश्राम (45) रा. लहुजी नगर, किशोर मंगर (38) रा. चिंचाडा व दुर्वास मुन ( 62) रा. घुग्घुस हे बसस्थानक चौकात नास्ता करून रस्त्याच्या कडेला उभे असतांना डस्टर क्रमांक एमएच 14 डीएन 7569 च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवत असतांना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभे असलेल्या तिघांना धडक दिली यात तिघेही जखमी झाले.

सिद्धार्थ मेश्राम व किशोर मंगर हे मजूर असून ते कामासाठी घुग्घुस येथे आले होते व दुर्वास मुन हे दिघेही सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास बसस्थानक चौकात एका चहा नाश्त्याच्या टपरी वर नास्ता करून उभे होते तितक्यात डस्टरच्या चालकाने आपले भरधाव वाहन चंद्रपूरच्या दिशेने घुग्घुसकडे घेऊन येत असतांना बसस्थानक चौकात उभे असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली यात सिद्धार्थ मेश्राम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर किशोर मंगर व दुर्वास मुन हे किरकोळ जखमी झाले.
जखमी अवस्थेत सिद्धार्थ मेश्राम व किशोर मंगर यांना प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले ही माहिती मिळताच भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, सुरेंद्र भोंगळे व तुलसीदास ढवस यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच प्रा. आ. केंद्रात जाऊन जखमी मजुरांची तात्काळ वैद्यकिय मदत मिळवण्यासाठी मदत केली. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले.

धडक देऊन वाहन चालकाने तिथून पळ काढला घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली तसेच पोहवा महेंद्र भुजाडे, प्रकाश करमे व मंगेश निरंजने यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त डस्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे जमा केले.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस येथील बसस्थानक चौकात वाहतूक वाढलेली आहे वारंवार अपघात घडत आहे त्यामुळे या चौकात प्रशासनाने पोलीस बूथ व वाहतूक पोलीस तैनात करावे अशी मागणी रेटून धरली.

घुग्घुस पोलिसांनी फरार चालक विरुद्ध कलम 279, 337, 338 गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध पोलीस घेत आहे.