Home Blog Page 361

अवैध शस्त्र विक्री करिता आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त…

0

 

अनिलसिंग चव्हाण सह गजानन सोनटक्के जळगाव जा

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा आणि गुन्हे शाखा बुलढाणा ची धडाकेबाज कारवाई.संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वसाडी येथून अवैध शस्त्र विक्री करीता आलेल्या दोन व्यक्तींना तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसांसह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा ला यश आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र विरुद्ध कारवाई कामी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले याकरिता बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना सदरचे आदेश दिले. दिनांक आठ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक बळीराम गीते स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे की मध्यप्रदेश राज्यातील पाचोरी या गावातून दोन व्यक्ती हे गावठी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथे येत आहेत अशा गोपनीय व खात्रीलायक माहितीवरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बळीराम गीते यांनी या कारवाई कामी एक पथक ग्राम वसाडी येथे पाठविण्यात आले होते. पथकाने सापळा रचून प्राप्त माहिती प्रमाणे मध्यप्रदेशातील दोन व्यक्ती त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्ती मिळुन आले असता पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता कमरेला लावलेले तीन गावठी पिस्टल किंमत अंदाजे 75 हजार रुपये व सहा जिवंत काढतुस किंमत सहाशे रुपये व एक मोबाईल पाचशे रुपये असा एकूण 76 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या जोडून ताब्यात घेण्यात आला सदरची कारवाई पोलिस अधीक्षक बुलढाणा अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनात बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना मिळालेल्या माहितीवरून सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव,पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार सुभाष काळे,जयंत बोचे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यासह सोनाळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके पोलीस अंमलदार सय्यद मोईउद्दिन यांनी सदरची कारवाई पार पाडली.या कारवाईमुळे सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध रित्या शस्त्र तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गट साधन केंद्र चामोर्शी अंतर्गत ‘जागतिक अपंग सप्ताह’ निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन…!

0

 

अनिलसिंग  चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-समग्र शिक्षा,गट साधन केंद्र पंचायत समिती चामोर्शी च्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३ डिसेंबर ते दिनांक ९ डिसेंबर-२०२१ पर्यंत दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये रांगोळी स्पर्धा,संगित खुर्ची स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,एकलनृत्य,समुहनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.शुन्य ते अठरा वयोगटातील तालुक्यातील जवळपास ७६३ विद्यार्थी असून सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के,विशेषतज्ञ सुशील गजघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोधी केंद्राची धुरा संसाधन शिक्षक जीवन शेट्टे यांनी पार पाडली.लखमापूर बोरी केंद्राची धुरा संसाधन शिक्षक हिमदेव पिपरे,भेंडाळा केंद्राची धुरा संसाधन शिक्षक रवी खेवले, यांनी पार पाडली.चामोर्शी केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी संसाधन शिक्षक उमेश पोहाणे, येणापूर केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी कु मेघा कोहपरे,कुनघाडा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी कु रिता चव्हाण व आमगाव केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी दशरथ गहाने यांनी काम केले.
सहभागी विद्यार्थ्यांना व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी बाटल,पेन व वही देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने तळोधी केंद्राचे केंद्र प्रमुख गौतम मेश्राम,लखमापूर बोरी केंद्राचे केंद्र प्रमुख मोरेश्वर रामटेके,भेंडाळा केंद्राचे केंद्र प्रमुख पुरूषोत्तम पंचफुलीवार,चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व विषय साधनव्यक्ती,संसाधन शिक्षक यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व विषय साधनव्यक्ती,संसाधन शिक्षक यांनी सहकार्य केले.

रविकांत तुपकरांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयलांची दिल्लीत भेट…

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

सोयाबीन-कापसाच्या विषयावर दिल्लीत चर्चा…

सोयापेंड आयात करणार नाही मंत्री पियुष गोयलांचे रविकांत तुपकरांना आश्वासन… पण याबाबत लेखी आदेश काढा तुपकरांची आग्रही मागणी…

‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पियूष गोयल यांची आज दिल्ली येथील त्यांच्या संसदेतील कार्यालयात भेट घेतली. सोयापेंड आयातीचा घातकी निर्णय घेवू नका, अशी मागणी तुपकरांनी गोयलांना केली. यासोबतच सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या महत्वपूर्ण मागण्यांवर दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली. यावर सोयापेंड आयातीचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे पियूष गोयल यांनी स्पष्ट केले पण यासंदर्भात लेखी आदेश काढावा, अशी आग्रही मागणी तुपकरांनी केली. जेणेकरून पोल्ट्री असोसिएशनच्या अफवांमुळे बाजारातील सोयाबीनच्या दरात घसरण होणार नाही.

पामतेल व खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवा सोयाबीनवरील 5% GST रद्द करा कापसावर निर्यातबंदी लावू नका  कापसावरील आयातशुल्क कमी करू नका ह्याही महत्वपूर्ण मागण्या आज रविकांत तुपकरांनी पियुष गोयल यांच्यासमोर ठेवल्या. यामागण्यांसंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन श्री.गोयल यांनी दिले.

पोल्ट्री असोसिएशनच्या व साऊथच्या टेक्सटाईल लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकारने चुकीचे निर्णय घेवू नये व लाखो सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा,अशी मागणी जोरकसपणे तुपकरांनी लावून धरली…

शिवसेना व युवासेनेच्या वतीने लसीकरण अभियान

0

 

डी.एस.पिंगळे निलंगा तालुका प्रतिनिधी

आज निलंगा शहरात शिवाजी नगरप्रभाग क्रमांक.4
येथे 102 जणांना कोरीना लसीकरण करण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन_महाराज रेशमे,निराधार कमिटी सदस्य व्यंकट पांचाळ,युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे,
तालुका प्रमुख प्रशांत वांजरवाडे,शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर काळे सर, जाधव मॅडम, कलबोने सिस्टर, दीपक कुलकर्णी, युवा सैनिक विष्णुपंत राठोडे, सतिश रुपणर, लखन जाधव, बाळु दिगंबरे, सोनु वाघमोडे, किशोर स्वामी, सादिक पठाण, सतिश खांडेकर, खंडू बिराजदार, जावेद शेख गोली लांडगे अजय वावरे सागर रुपणर उपस्थित होते.

चेन्नई आज कुन्नुर परिसरात झालेल्या हेलीकॉप्टर अपघातामध्ये हेलीकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े प्रतिनिधि

झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या हेलीकॉप्टरमध्ये चीफ ऑफ आर्मी स्टॉफ म्हणजेच लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत हे देखील स्वार होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची सरकारतर्फे अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज लष्कराचे हेलीकॉप्टर कोसळले. यात लष्करप्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाला आहे. यांच्यासह ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग,जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा आणि हवालदार सतपाल वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार खराब हवामानामुळे हेलीकॉप्टर डोंगराळ परिसरात कोसळले. परिसरातील लोकांनी धाव घेऊन मदतकार्य केले. मात्र हा अपघात इतका भीषण होता की यात संपूर्ण १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह छिन्नावस्थेत असल्यामुळे डीएनए चाचणीच्या आधारे मृतदेहांची ओळख पटविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात मंत्रीमंडळाला माहिती दिली. संरक्षण मंत्री सिंह यांनी रावत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कन्येला या अपघाताबाबत माहिती दिली. संरक्षण मंत्री सिंह यांनी रावत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कन्येला या अपघाताबाबत माहिती दिली. दरम्यान, यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा देखील या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे.

बिपीन रावत यांची तेजस्वी कारकिर्द

बिपिन रावत हे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. अर्थात भूदल, नौदल आणि हवाई दलाचे ते संयुक्त प्रमुख असून या तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम ते करत होते.

बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस. रावत हेदेखील लष्करात होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

यानंतर भारतात परतल्यानंतर गोरखा ११ रायफल्सच्या ५व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं. रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले होते. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले. त्यांची भारतातील पहिली सीडीएस अधिकारी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

रक्तदान केल्या शिवाय वाढदिवस साजरा झाला असे वाटत नाही.- अभयसिंह

0

 

मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ०५ डिसेंबर ला खामगाव उपजिल्हा रुग्णालयात न चुकता रक्तदान करतच असतो.मात्र यावर्षी ०५ डिसेंबर ला रविवार आल्याने व मधातच काही कामे निघत गेल्याने माझं यावर्षीच रक्तदान राहूनच गेलं होते. आणि रक्तदान नाही तर केलं तर वाढदिवस साजरा केल्या सारख वाटत नाही.
म्हणूनच मी आज आज सर्व काम बाजूला सारून खामगाव येथिल उपजिल्हा रुग्णालयात माझे ६५ वे रक्तदान केलं. तेथील रक्तपेढी विभागांतील पाटील मॅडम ,देशमुख मॅडम व इतरही सर्वांशी दिलखुलास चर्चा करता आली.मग रक्तदान करतांनाच तेथे नांदुरा येथील कुणाल वाघोडे हा युवक पण रक्तदान करतांना दिसला आणखी काही बरीच तरुण मंडळी येथे भेटली.त्यांच्या सोबत रक्तदान हीच खरी देशभक्ती आहे यावर बऱ्याच गप्पा मारल्या. तरुणाचं रक्त राजकारणात धर्म जातीच्या दंगलीत सांडल्या पेक्षा किंवा भरधाव वेगाने मोटरसायकल(बापाच्या पैशाच्या)च्या एक्सीडेंट मध्यें रोडवर सांडल्या पेक्षा ते रक्त दान करून आपण जाती धर्माच्या भिंती नक्कीच तोडून हा देश एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून उभा करू शकतो असे सांगून त्यांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले.
मित्रांनो रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक महत्वाच दान आहे.आणि तसेही खामगाव उपजिल्हा रुग्णालयात “o”+ve, “B”+ve रक्त अगदी नसल्या सारखेच आहे.शक्य झाल्यास त्यांना कशी मदत करता येईल यावर पण लक्ष द्यावे.

इन्कलाब जिंदाबाद

अभयसिंह
9423761908

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादीका मो. 9921400542

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हाध्यक्ष विक्रांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारिणी गठीत करण्यासाठी पत्रकार भवन, धुळे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समता समाज संघ धुळे जिल्हा अध्यक्ष किरण आण्णा गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत जगताप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ प्रशांत साळवे, अशोक गवळी, मनोज तिसे, डॉ कैलास पाटील, संजय पवार, निलेश शिंदे, गणेश गवळी, सचिन बिऱ्हाडे, रविंद्र बोरसे, महेंद्र चांदणे आदि पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून लवकरच या सर्व पत्रकारांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा कार्यकारिणीवरील पदे दिली जाणार आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रवीण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

दिव्यांग दिनी अंध महिला व पुरुषांना ब्लँकेट वाटप

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो. 9921400542

— जिजाऊ ब्रिगेड चा उपक्रम
अमरावती—- नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र रिझनल युनिट अमरावती मधील अंध महिला व पुरुषांना जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष प्रतिभा ढोक यांच्या संकल्पनेतून ब्लँकेटचे वाटप करून विकलांग दिन हा त्यांचा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला. जिजाऊ प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मनाली तायडे, शहराध्यक्ष प्रतिभा ढोक, लेखिका कांचन मुरके,सुषमा बर्वे, भारती मोहोकार, सचिव अमृता देशमुख, रूपाली वडतकर यांच्या हस्ते करून जिजाऊ वंदनेने करण्यात आली.
या वेळी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र रिझनल अध्यक्ष अनिल बोरकर, सुरेश मुंधडा, सूर्यकांत वाघमारे, महासचिव गजानन राठोड, कोषाध्यक्ष दत्तात्रेय डावरे, उपाध्यक्ष विजय सुरे, कार्यकारी सभासद एकनाथ अमझरे, कविता बिराजदार, वर्षा कांबळे यांच्यासह समस्त पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी तुळसा तायडे,पूजा सोनार, सुनिता भटकर,शोभा चव्हाण,रवींद्र इंगळे, विकूर पापडकर, संतोष शिंदे,प्रकाश गोळे, देविदास नारनवरे, प्रमोद शिगोटे, विशाल राऊत यांच्यासह अनेकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन गजानन राठोड प्रास्ताविक कांचन मुरके तर आभार प्रदर्शन प्रतिभा ढोक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उत्कर्षा ढोक, प्रतिमा बोरकर, प्रियांशू इंगोले, श्रेयश बोरकर यांनी परिश्रम घेतले.

किनगाव येथील ‘त्या’ विवाहित तरूणाच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिस घेणार एक्सपर्ट अडव्हाईज पतीच्या मृत्यूचा निरोप देवून ही पत्नीची अंतविधी कडे पाठ,

0

 

प्रतिपिधी । यावल विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील आत्महत्या केलेल्या ‘ त्या’ विवाहित तरूणाच्या कुंटुंबींयाचे बुधवारी जाब जवाब घेण्यात आले यात कशा प्रकारे मयत तुषार राणे यांची पत्नी विविध संघटनांच्या पदाधिकारींना सोबत घेवुन धमकावत होती या बाबत सांगीतले तर पतीने आत्महत्या केली अंतविधीसाठी ये असा निरोप देवुन देखील ती आली नाही अशी माहिती देत तिने व तिच्या कुटुंब आणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीचं त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सांगीतले तेव्हा हा संपुर्ण प्रकरणी एक्सपर्ट अडव्हाईज घेवुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले
किनगाव ता. यावल येथील तुषार गोपाळ राणे वय ३२ या तरूणाच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबातील आई आशाबाई राणे, भाऊ बाळु राणे, बहिण ज्योती सह काही जणांचे जाब जवाब घेण्यात आले यात मयत तुषार राणे यांची पत्नी रत्ना तुषार राणे यांच्यातील वाद व तिच्या कडून न्यायालयात करण्यात आलेल्या केसेस आणी ती सतत किनगावात येवुन सोबत विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांकडून मयत तुषार राणे यास धमकावत होती आणी यातुन प्रचंड तणावात तुषार होता असे आई, भाऊ,सह बहिण यांनी आपल्या जबाबत म्हटले आहे तर यावल पोलिसांकडून सदरील जाब जवाब घेवुन ते पोलिस प्रशासनाच्या एक्सपर्ट कडे पाठवण्यात येणार असुन त्या एक्सपर्ट कडून रिपोर्ट प्राप्त झाल्यावर या प्रकरणी कशा प्रकारे पुढे गुन्हा दाखल करावा या संर्दभात निर्णय घेतला जाईल असे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सांगीतले आहे. तर पतीने आत्महत्या केली व त्याच्यावर मंगळवारी दुपारी अंतविधी केला जाईल अशी माहिती मयत तुषार यांच्या पत्नी रत्ना व तिच्या कुटुंबांस देण्यात आली होती मात्र, पतीच्या अंतयात्रा व अंतिम दर्शनासाठी देखील पत्नी रत्ना आली नाही असे राणे कुटुंबीयांनी सांगीतले

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एकाला यावल पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आई बाजारात भाजीपाला विक्रीचे काम करते. यासाठी अल्पवयीन मुलगीदेखील आईला भाजीपाला विक्री करण्यास मदत करते.

मंगळवारी ७ डिसेंबर रेाजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास आईसोबत भाजीपाला विक्री करत असतांना गावातील राहूल बाळू पवार हा मुलीसमोर येवून ‘माझा नंबर घे आणि तूझा मोबाईल नंबर दे’ असे सांगितले. त्यावर मुलीने त्याला हटकले असता संशयित आरोपी राहूल पवार याने विनयभंग केला.
मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील नागरीकांनी त्याला पकडून यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहूल पवार याच्याविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जितेंद्र खैरनार करीत आहे.