Home Blog Page 366

अग्रसेन चौकात अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एक संशयित आरोपी ताब्यात

0

 

रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री २:३० वाजताच्या सुमारास शेगाव शहरातील अग्रसेन चौक परिसरातील दार्जिलिंग चहाच्या हॉटेलसमोरील पादचारी मार्गावर अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ,पोलीस उपनिरीक्षक गौतम इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कमलेश खंडारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र नारखेडे आणि अमोल परिहार यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला एका तासातच अटक केली आहे.
मृतक झालेला इसम मानसिक स्थिती ढासळलेला आणि भीक मागून उदरनिर्वाह करणारा होता अशी माहिती परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस पंचनामा करीत असून मृतक इसमाला सईबाई मोटे रुग्णालय येथील सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्या घटनेचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होणार आहे.

यावल येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला आहे. या प्रकरणी सायंकाळी पतीसह ८ जणांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

 

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसमाशेख मोहम्मद नदीम (वय-२९) राहणार वडाळा नाशिक नाशिक ह..मु. गंगानगर यावल यांचा विवाह नाशिक येथील मोहम्मद नदीम समसोद्दिन शेख यांच्याशी रीतिरिवाजानुसार २०१३ मध्ये झाला. लग्नाचे काही दिवस सुरवातीला चांगला गेल्यानंतर पती मोहम्मद नदीम याने विवाहितेला माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या आई-वडिलांनी पैसे दिले. त्यानंतर तोच प्लॅट गहाण ठेवून पती मोहम्मद नदीम याने पुन्हा भाड्याचे घर घेण्यासाठी वेळोवेळी त्याला पुन्हा पैशांची मागणी केली. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर पतीसह सासू सासरे नणंद, फुवा आणि चुलत दीर यांनी विवाहितेच्या यावल येथील घरी २३ नोव्हेंबर रोजी शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती मोहम्मद नदीम समसोद्दिन शेख, सासरे समसोद्दिन अल्लाउद्दीन शेख, सासू यास्मिनबी समसोद्दिन शेख, दिर आजीम शेख समसोद्दिन शेख, नणंद अंजुमनबी निसार शेख, फुवा मुक्तार शेख, शफिक शेख आणि चुलतदीर जुबेर शेख हुसेन खान सर्व रा. नाशिक यांच्याविरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान दिलावरखान करीत आहे.

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महात्मा फुले यांना अभिवादन

0

 

महात्मा फुले विषमता व वर्णव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणारे थोर समाजसुधारक- देवराव भोंगळे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सामाजिक अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा जोतिबा फुले यांची आज पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेसमोर द्विप प्रज्वलीत व माल्यार्पण करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष विनोद चौधरी यांनी अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले महात्मा जोतिबा फुले थोर समाज सुधारक होते. महात्मा जोतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण, सत्य, अहिंसा हे मूल्य समाजात रुजविण्यासाठी वेचले. समाजातील विषमता, वर्णव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करण्याचे कार्य केले. अस्पृश्य समाजाचा अनेक शतकात पासून होत असलेल्या शोषणाचा व सामाजिक गुलामगिरीचा त्यांनी कडाडून विरोध केला. अवघ्या 21 व्या वर्षी स्त्री शिक्षणासाठी मुलींन करिता पहिली शाळा पुण्यात सुरु केली. त्यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे झाले त्यांच्या स्मृतिदिनी मि अभिवादन करतो.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष विनोद चौधरी, ओम बेहरे, प्रणय काखले, सुरज मांडळकर, अविनाश मेश्राम, प्रतीक पिंपळकर, अवी कोराम, पराग धांडे, सहदेव भांडेकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, प्रिया नागभीडकर, स्वाती गंगाधरे, पायल मांदाडे, उमेश दडमल उपस्थित होते.

क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस तर्फे अभिवादन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : सत्यशोधक समाजाचे निर्माते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक,बालविवाहाचे विरोधक, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते ज्योतिराव गोविंदराव फुले यांची 28 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी निमित्त काँग्रेस कार्यालयात ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस मालार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
ज्योतिबांना मानवंदना देण्यात आले.

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण जीवन दिन दुबळ्या वंचित शोषितांच्या जीवनमान सुधारणे करिता खर्ची घातले एकोणविसाव्या शतकात मुलींना शिक्षण घेण्याची सक्ती असतांनी त्यांनी आपल्या धर्मपत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे देऊन देशातील पहिली कन्या शाळा पुण्यात शुरू केली.
व समाजाचा अतोनात छळ सहन करून सावित्रीबाई ह्या शिक्षिका बनल्या त्या केवळ ज्योतीबा मुळेच, जाती – जातीतील विभाजन हे ज्योतिबांना मान्य नव्हते त्यांनी दलित, शेतकरी,विधवा पुनर्विवाह करणे, बालविवाह थांबविणे असे अनेक समाज सुधारक कार्य केले.
ज्योतीबा फुलेंनी 1869 साली रायगडावर भग्नावस्थेत असलेली शिवसमाधी शोधून काढली व 1870 साली देशात प्रथम शिवजयंती साजरी केली.
ज्योतिबांनीच आधुनिक युगाचा शिव पोवाडा लिहिला अश्या या “महात्मा”स विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, विशाल मादर, रोशन दंतालवार,देव भंडारी, बालकिशन कुळसंगे,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,सुनील पाटील, सुरेश टेम्बुरने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संविधान दिवस समारोह संपन्न .

0

 

त्रिरत्न बोद्ध महासंघ व संभाजी ब्रिगेड शाखा कारंजा घाडगे यांच्या वतीने संविधान दिवस साजरा करून संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव वाळके बामसेफ वर्कर तसेच प्रमुख पाहुणे संगीता कामडी महिला अध्यक्ष कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती ,राजेश भाऊ दहिवडे ,ज्योती यावले कारंजा ,सदाशिव मनोहरे ,नागरी समस्या संघरसग समिती चे विनोद चापले ,विचार मंचावर उपस्थित होते .या सर्वांनी संविधाना बद्दल माहिती दिली .तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले ,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नागले कार्यवाह बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा , तसेच सूत्रसंचालन धम्ममित्र मंदा नागले यांनी केले ,व आभार प्रदर्शन गजानन बोरकर यांनी केले ,कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता धम्ममित्र जी .आर .गवई ,उमेश पाचपोहर ,पियुष रेवतकर,राजेंद्र इंगळे ,मनोज वानखेडे ,संगीता पाटील ,बबिता शेंडे ,शीला विगने ,रेखा गवई ,कांचन गजभिये ,झाडे ताई ,प्रेरणा गजभिये ,सुलोचना इंगळे , पाचपोहर ताई ,इंगळे ताई यांनी सहकार्य केले .

कारंजा येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .

0

 

कारंजा घाडगे /प्रतिनिधी —–थोर समाजसुधारक ,लेखक ,कवी ,क्रांतिसूर्य ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची 131 वी जयंती कारंजा येथे साजरी करण्यात आली .सर्व प्रथम ज्योतिबा फुले यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .सर्व उपस्थित असलेल्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्यां वर आणि संघर्ष वर चर्चा केली .या वेळी संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कारंजा चे माजी सरपंच शिरीष जी भांगे ,बामसेफ चे लक्ष्मण जी वाळके , माजी नगरसेवक संजय जी कदम ,प्रवीण भिसे ,राजेंद्र इंगळे ,रुपेश मस्के , डांगोरे सर ,गुड्डू भिलदारे ,राम मोटवाणी आदी कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जिल्हाकार्याध्यक्ष पदी गोविंद अंबुसकर

0

 

अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाकार्याध्यक्षपदी गोविंद रमेशराव अंबुसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तत्कालिन काळात शेगांव तालुकाध्यक्ष म्हणुन कार्यकाळ यशस्वी रित्या सांभाळुन संघटनात्मक बांधणी अधिक केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,केंद्रीय सचिव अशोकराव पवार यांचे मार्गदर्शनात अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबाप्पु देशमुख यांनी दि.26 नोव्हे. रोजी ही नियुक्ती जाहीर केली. विदर्भ अध्यक्ष संजय कदम व सचिव उमेश सिरसाट यांचे उपरोक्त नियुक्ती मध्ये महत्वाचे योगदान असुन भविष्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबुत करुन पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाकार्याध्यक्ष गोविंद अंबुसकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या नियुक्तीमुळे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

रिक्षाचालकांचा अनोखा झोल, नऊ रिक्षांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट; चौकशीनंतर पोलिसही चक्रावले- मोहन चौकेकर

0

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

बीड:-बनावट नंबर प्लेट तयार करून आरटीओचा महसूल बुडवण्याचा प्रकारात सध्या वाढ होताना दिसत आहे. हिगोंली जिल्ह्यातील आखाडा बळापूर परिसरात एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी धावत असल्याची माहिती समोर आली होती.

याप्रकरणी पोलिसांनी एका जणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील घटनेनं सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. या परिसरात एकाच नंबरच्या एक, दोन नव्हेतर चक्क नऊ रिक्षा रस्त्यावर धावत असल्याची माहिती मिळत आहे.याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कारवाई केली असून नऊ रिक्षा जप्त केल्या आहेत.तसेच या नंबरच्या आणखी रिक्षा असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

संबंधित रिक्षाचालकानं रिक्षा विकत घेतल्यानंतर सुरुवातीला तात्पुरती म्हणजे टेम्पररी पासिंग केली. मात्र, त्यानंतर पर्मनंट पासिंग करायला रिक्षाचालक आरटीओकडे गेलेच नाहीत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.एखादं वाहन खरेदी केल्यानंतर पर्मनंट पासिंग करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी लागतो. मात्र, या प्रकरणातील रिक्षा चालकांनी मागील चार-पाच वर्षांपासून आपल्या रिक्षाची पासिंग करून घेतली नाही. हेच रिक्षाचालक आता कधी आरटीओ साहेब नव्हते. तसेच कोरोनाचा काळ होता म्हणून पर्मनंट पासिंग करता आली नाही, अशी जुजबी कारणे देत आहेत.

या आठही रिक्षा गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. या एकाच नंबरच्या आठही रिक्षामालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ हे रिक्षाचालक दोषी आहेत का? एका शहरांमध्ये एकाच क्रमांकाच्या इतक्या रिक्षा फिरत असताना, बीड जिल्ह्यातील आरटीओ पोलीस काय करत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.*✍️ *मोहन चौकेकर*

चिखली येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न…

0

 

सतीश मुलंगे सह जगन मोरे लोणार

विधान परिषद निवडणुकीत विजय पताका फडकवणार; नेत्यांनी व्यक्त केला निर्धार.
मोताळा व संग्रामपूर नगरपंचायत महाविकास आघाडी आघाडीच्या नेतृत्वात लढणार.
आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदच्या निवडणुका एकत्रित लढण्याच्या मुद्यावर चर्चा.
राज्यात मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारी सारखा प्रश्न मोठ्या संयमाने, धीराने सांभाळत नैसर्गिक संकटातही चांगली कामगिरी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्रित लढविण्यासंदर्भात चर्चा करत अकोला, बुलढाणा व वाशीम या तीन जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून डिसेंबरमध्ये होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक ही एक हाती जिंकण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीची जिल्हा पातळीवरील संयुक्त बैठक आज २७ नोव्हेंबर रोजी चिखली येथे पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव,र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, बळीराम मापारी यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित होती.
या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्रित निवडणूक लढण्यास संदर्भात चर्चा करण्यात आली. सध्या अकोला,बुलढाणा, वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक लागली आहे. यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हे आमदार गोपीकिशन बाजोरिया असून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील मोताळा व संग्रामपूर या दोन नगर पंचायतीच्या निवडणुका देखील घोषित झाल्या आहेत. या निवडणुका महा विकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापाठोपाठ आगामी सर्व नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या,कृ उ बा स च्या निवडणुका महाविकास आघाडीत लढण्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.
त्याचबरोबर तालुका व जिल्हास्तरीय समित्या वाटप करण्याच्या बाबतही चर्चा करत निर्णय घेण्यात आले.
४ डिसेंबरला बुलडाणा येथे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आघाडीच्या मतदारांचा मेळावा…
आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत येत्या शनिवारी चार डिसेंबरला बुलढाणा येथे महाविकास आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषदेच्या जिल्ह्यातील मतदारांचा मेळावा दुपारी बारा वाजता आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.मेळाव्याचे स्थळ लवकरच निश्चित केले जाणार असून सर्व महा विकास आघाडीतील नेते आणि मतदारांची या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

कारंजा तहसील कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना घेऊन अक्षय भोणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आंदोलन

0

 

कारंजा घाडगे प्रतिनिधी पियुष रेवतकर …

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बस सेवा ही कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद आहे. या कामबंद आंदोलनामुळे याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसत आहे. आधीच कोरोणा काळात विद्यार्थ्याचे दोन वर्षाचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आज येवढ्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. खासगी वाहन चालक मोठ्या प्रमाणात भाडे आकारून विद्यार्थ्यांची व पालकांची आर्थिक लूट करीत आहे. त्यांना तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार यांनी आळा घालावा व विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी याकरिता तहसीलदार कारंजा घाडगे यांना निवेदन देण्याकरिता प्रहार चे अक्षय भोणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी तहसील कार्यालयावर धडकले असता तहसीलदार मात्र गैरहजर होते. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन आरंभ केले. शेवटी तहसीलदार कार्यालय न आल्याने नायब तहसीलदार राऊत यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. व चर्चा केली.. त्यावेळी तहसीलदार यांनी आम्ही लवकरच सदर प्रकरणी अँक्शन प्लॅन तयार करून विद्यार्थ्यांना या त्रासातून मुक्त करू असे आश्वासन दिले. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले..
यावेळी अक्षय भोने रोहित घागरे तुषार मस्की हिमांशू लहाबर योगेश घोडे सूरज बेलखळे कुंदन देवसे प्रितम पांचाळ गौरव गोरे अमोल चोपडे विलास चौधरी कैलास चोपडे यश डोगर रोहित किनकर सूरज चोपडे अमित चौधरी उदय चिकने लोकेश खवशी उज्वल घोडाम प्रहार कार्यकर्ते व कॉलेजमध्ले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते