Home Blog Page 367

भा.बौ.महासभा ता.नांदुरा च्या वतीने तक्षशिला सभागृहात सविधान दिवस साजरा

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र

भा.बौ.महासभा नांदुरा च्या वतीने तक्षशिला सभागृहात सविधान दिवस पंडित इंगळे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाला यामध्ये त्रिशरन पंचशील व धुपदिप प्रज्वलित करून कार्य करमाला सुरवात झाली यामध्ये तुकाराम रोकडे वि.स.अधक्ष. सर आर आर जवरे. जि.प.सचिव. के.शिक्षक भीमराव तायडे. कु.दिपाली इंगळे. यशवंत वाकोडे. अशोक इंगळे अशोक तायडे. समाधान रनित. गजानन जाधव. शिवराम इंगळे. रामचंद्र डोगरदिवे अमोल मेढे. नितिन जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला व सविधानावर रोकडे साहेब भिमराव तायडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आर आर जवरे साहेबांनी पुष्प अरपित केले संचालन व आभार निरंजन तायडे यांनी केले तर सविधानाचे प्रास्ताविक विशाल इंगळे जि.महिला सचिव यांनी केले शेवटी सरनतय गाथेने सांगता करण्यात आली

यावल पंचायत समितीमध्ये ‘भारतीय संविधान दिवस’ साजरा करण्यात आला.

0

 

यावल, (प्रतिनिधी) विकी वानखेडे

संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख डॉक्टर मंजुषा गायकवाड( बोरसे बीडीओ) मॅडम होते तर अध्यक्षस्थान किशोर सपकाळे एबीडीओ , यांनी भूषविले. प्रारंभी ‘भारतीय संविधान उद्देशिका’ याचे वाचन करण्यात आले त्यानंतर भारतीय संविधान दिवस साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. यांनी विचार व्यक्त केले की, संविधानाची श्रेष्ठता, मूल्यात्मता व उदार व्यापकता ही प्रत्येक नागरिकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज देशातील सर्व सामान्य माणूस केवळ संविधानामुळेच सुखी आहे. . डॉ. मंजुषा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमराबविण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिंधे साहेब यांनी केले तर आभार आर पी देशमुख वीजतंत्री यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , मिलिंद कुरकुरे घरकुल प्रोग्रामर,चेतन चौधरी तालुका व्यवस्थापक भारंबे साहेब सोपान तायडे कनिन्ट प्रशासन आधिकारी भुषन मढे वरिष्ठ सहा हेमराज सनंन्से कनिन्ट सह
लतेश नेमाडे व्यवस्थापक अक्षय
गट शिक्षण अधिकारी एन के शेख
अक्षय शिरसाळे एन के शेख आसिफ पिंजारी सलीम तडवी लोहारे मॅडम सोनवणे मॅडम किशोर कोळी समाधान बोरसे विशाल राऊत नितीन ढवळे उमेश मुंडकेगटशिक्षणाधिकारी अझरुददीन फारूकी ग्रामिणग्रह अभियंत हर्षल चौधरी जावेद तडवी रोनक तडवी किरण सपकाळ शुभमधांडेश्रीमती. भांदले मॅडम,राहुल बाऊस्करयांनी सहकार्य केले.

काँग्रेस कार्यलयात संविधान दिन उत्साहात संपन्न

0

 

भारतीय संविधान हे सर्वसमावेशक व अतुलनीय : राजूरेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधि
रमेश सुध्दाला

घुग्घुस : भारतीय संविधान हे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाच्या मेहनतीने तैयार करण्यात आला.
संविधान सभेचे प्रारूप समिती अध्यक्ष डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी निर्मित संविधान राष्ट्राला समर्पित केले.
26 जानेवारी 1949 पासून देशातील गणराज्य अंमलात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वी जयंती वर्षाच्या उपलक्ष्यात 26 नोव्हेंबर 2015 पासून संपूर्ण देशात संविधान दिन साजरा करण्यात येत आहे.
यापूर्वी हा दिवस कानून दिन म्हणून साजरा केला जात होता.
आज घुग्घुस शहर काँग्रेस कार्यलयाय संविधान दिन साजरा करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मालार्पण करण्यात आले
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी भारतीय संविधान हे लोकतंत्राचे प्राण असून हे सर्व समावेशक व अतुलनीय असल्याचे प्रतिपादन केले

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,विशाल मादर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे,बंडू झाडे, देव भंडारी,साहिल सैय्यद,सचिन कोंडावार,अंकुश सपाटे,सुनील पाटील,पोचम बासमपेलली,संजय कोवे,रंजित राखुंडे,अंकेश मडावी,प्रणय लिंगांपेलली,सुधाकर झुंगरे,बाबा जीवने,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यातील संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर हजर राहण्याचे आवाहन केले होते. यानुसार आज यावल आगारातील १०-१२ कर्मचारी पुन्हा कामावर येत बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र, या बसवर दगड फेक झाल्याने बस सेवा पुन्हा ठप्प झाली. तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बस सेवा सुरु करण्यास आडकाठी केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

0

 

 

यावल,( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सविस्तर वृत्त असे की, आज शुक्रवार हा यावलचा आठवडे बाजार दिवस आहे. याचे औचित्य साधून व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील १०-१२ कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होवून बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आगारातील बारा कामगारांनी आगार प्रमुख शांताराम भालेराव यांना, विभाग नियंत्रक यांच्या नोटिशीचा संदर्भ देत रुजू होण्याबाबत चे पत्र दिले. सायंकाळी चार वाजेपासून येथील आगारातून पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतराने जळगाव साठी तीन बसेस सोडण्यात आल्या. यातील यावल-इदगाव-जळगाव बस(एमएच २० बीएल ३४७१) यावलपासून चार किलोमीटर लांब वाढोरे या गावी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पोहचली असता काही अज्ञातांनी मोटर सायकलवर येऊन बसवर दगड फेक करत काचा फोडल्या. याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, यावल आगारप्रमुख व्ही.एस.भालेराव यांनी तात्काळ सदरची माहीती पोलीसांना कळविली. यानंतर यावल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यात रावेरची पोलीस निरीक्षक तथा यावल प्रभारी कैलास नागरे व यावलचे पोलीस उप निरीक्षक जितेंद्र खैरनार, विनोद खांडबहाले व पथकाचा समावेश आहे. त्यांनी पंचनामा करून गाडी यावल बस स्थानकात रवाना केली. सायंकाळी उशिरापर्यंत त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे चेतन अढळकर व कमलाकर घारू,सुमित घारु, जुगल श्रीनिवास पाटील, आकाश चोपडे यांनी बस स्थानकावर येवून जो पर्यंत एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलणीकरणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बस सेवा सुरु करू नये असा पवित्रा घेत एसटी बसेस अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा

0

 

डी एस पिंगळे निलंगा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ. येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संविधान दिन मोठ्या सन्मानाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व संविधान याच्या पूजनाने संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री डी एन सूर्यवंशी सर हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री एस बी कदम सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. मिथुन सूदेवाड सर उपस्थित होते यावेळी मंचावर श्री पाटील सर, श्री मुजावर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री शनिमे सर यांनी केले प्रा.सुदेवाड सर यांनी संविधान काळाची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. या शुभदिनी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री डी एन सूर्यवंशी सर यांच्यातर्फे संविधानाची एक प्रत प्राचार्य कदम सर यांच्या हस्ते शाळेला भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री काळे सर तर आभार श्री मुजावर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

मारूळ गावास तहसीलदार महेश पवार यांनी भेट दिली असता त्यांच्या उपस्थितीत गावात विविध प्रशासकीय उपक्रम राबविण्यात आलीत.

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

मारूळ ता.यावल येथील आयडियल हायस्कूल येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावाचे प्रथम नागरीक सरपंच असद सैय्यद यांनी तहसीलदार महेश पवार यांचे स्वागत केले. मतदार नोंदणी अभियानांतर्गत १८ वर्षांवरील युवकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, नांवात चुकीचे नाव दुरूस्ती करणे, नवीन विवाहितांनी नाव नोंदणी करणे ही मोहीम उस्फूर्तपणे व शिस्तबद्ध पध्दतीने कशी राबविली या विषयी मार्गदर्शनपर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. कोवीड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण याबाबत नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले.

मुस्लिम समाज्याच्या कब्रस्थानच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करून नवीन कब्रस्थानचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठीची मागणी केली. यावेळी म.प.सह.सोसायटीचे चेअरमन जिया-उल्-हक सैय्यद, आयडियल हायस्कूलचे प्राचार्य शेख अशपाक, व्हाईस चेअरमन मसरुर अली सैय्यद, ग्राम पंचायत सदस्य मतिउर रहेमान पिरजादे, कबीर मेंबर, साहेब अली सैय्यद, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवणाऱ्या शिक्षण संस्थेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मनसेने केली मागणी

0

 

भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील असलेल्या आसरा कॉमर्स आणि सायन्स कॉलेज येथील अनेक विद्यार्थ्यांच्या फसवणुकीचे प्रकार सुरू होते. फी घेऊन ऍडमिशन फक्त नावा पुरते करून सर्व फी घेतल्यानंतर त्यांना शेवटच्या वर्षाला तुमचे ऍडमिशन नाही झाले असे सांगणे , प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देणे, दर रोज नवनवीन कारणे देणे अश्या एक ना अनेक तक्रारी मनसे कडे विद्यार्थ्यांच्या मार्फत प्राप्त झाल्या होत्या.
त्या कॉलेज मधील स्टाफ अतिशय वाईट भाषेत विद्यार्थी व पालकांशी हुज्जत घालत होते. साधारण १८ विद्यार्थ्यांचे २ शैक्षणिक वर्ष वाया गेले असताना देखील कॉलेज कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. मागील वेळी मनसे शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष श्री परेश चौधरी यांनी कॉलेज ला दम दिल्यानंतर १८ पैकी १४ विद्यार्थ्यांचे तक्रारींचे निरसन केल्यानंतर देखील ४ विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॉलेजने केले नसल्याने त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान केले. त्यामुळे मनविसे तालुकाध्यक्ष श्री परेश चौधरी व ऍड. सुनील देवरे, श्री गिरीश देव ह्यांनी गणेशपुरी पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दाखल करत कॉलेजवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक फसवणूक केल्याबाबत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली..

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संविधान दिन साजरा.

0

 

बाबासाहेबांच्या संविधाना मुळेच देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शुक्रवार 26 नोव्हेंबर रोजी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे पुस्तक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलीत करून व माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व संविधानाचे वाचन करून शपथ घेण्यात आली तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विरांना श्रद्धांजली देण्यात आली.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले बाबासाहेबांच्या संविधाना मुळेच देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय सर्व नागरिकांना मिळाले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान दिले. हे पवित्र संविधान देशाला अर्पण केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन देशात साजरा करण्यासाठी शासकीय आदेश काढला त्यामुळे शासकीय, निम शासकीय कार्यालयात व देशभरात संविधान दिन साजरा केला जातो संविधाना प्रमाणे सर्वांनी मार्गक्रमण करावे मि संविधानाला व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो.
भारतीय गणराज्याचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी बनून तयार झाले. भारताचे संविधान 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसात लिहून देशाला समर्पित करण्यात आले व 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात अंमलात आले.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे रामचंद्र चंदनखेडे, अनिरुद्ध आवळे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा माजी सरपंच संतोष नुने, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, वैशाली ढवस, अनंता बहादे, मल्लेश बल्ला, सुरेंद्र जोगी, भारत साळवे, शरद गेडाम, बबलू सातपुते, सुनील राम, तुलसीदास ढवस, सुनील बाम, पांडुरंग थेरे, विनोद जंजर्ला, विकास बारसागडे, वमशी महाकाली, दत्ता साळवे, किशोर बोन्डे, असगर खान, सचिन वैरागडे उपस्थित होते.

26/11 शहिदांना काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पित

0

 

चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधि
रमेश सुध्दाला

घुग्घुस : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तान प्रेरित दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्यात मोठ्या संख्येने भारतीय व विदेशी निष्पाप नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले.

आतांकवाद्यांचा भ्याड हल्ला परतवून लावतांना मुंबई पोलीस दलाचे सैनिक, दहशतवादी प्रतिबंधक दलाचे जवान, भारतीय लष्कराचे जवान हे देशरक्षणार्थ शहीद झाले.
यात पो.कॉ.तुकाराम ओंबाळे, एटीएस चीफ हेमंत करकरे, विजय साळसकर,अशोक कामठे,मेजर संदीप उन्नकृष्णन, व अन्य शिपाही प्राणास मुकले

त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी घुग्घुस शहर काँग्रेस कमेटी तर्फे आज काँग्रेस कार्यलयात पुष्पहार अर्पण करून, मेनबत्ती वाहून, मौन ठेवून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
वीर जवान अमर रहे,शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आले याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, विशाल मादर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, सचिन कोंडावार,देव भंडारी,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे, संजय कोवे, सुनील पाटील,बंडू झाडे,प्रणय लिंगांपेलली,पोचम बासमपेलली,रंजित राखुंडे,अंकेश मडावी,बाबा जीवने,सुधाकर झुंगरे व अन्य पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

भरधाव टिपरची कुझरला धडक एक ठार बारा जखमी

0

 

सुनील पवार नांदुरा. ता.प्र.

भरधाव वेगाने धावणाऱ्या टिपरने समोरुन येणारी कूझरला जोरदार धडक दिल्या ने कूझरमधिल एक जन ठार तर बारा जखमी झाल्या चि घटना दि.२५नोव्हेंबर रोजी५वाजता नांदुरा जळगाव रोडवरील येरळी जवळ घडली तुळसीराम सुरळकार वय६०रा.पलसोडा ता.नांदुरा असे मयताचे नाव आहे वु्त लिहेपंरत बचाव कार्य सुरू होते या घटनेची माहिती मीळताच आमदार राजेश भाऊ एकडे यांनी त्वरित प्रा.आ.केंद्र नांदुरा येथे जाऊन जखमी झालेल्या ची विचार पुस करुन गंभीर जखमी झालेल्या ना पुढील उपचारासाठी खामगाव येथे रवाना करनेकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली याबाबत प्राप्त माहिती अशी की नांदुरा तालुक्यातील पलसोडा येथील सुरडकार कुटुंबातील१२जन दहनासाठी टुनकी येथे एम.एच२८सी४१३६या.क़.गाडी मध्ये होते दरम्यान दुपारच्या वेळी परत येत असताना येरळी जवळ समोरुन गीटि घेऊन येणाऱ्या भरधाव टिप्परने कूझरला जोरदार धडक दिली यामध्ये एक जन ठार बारा जन जखमी झाले अपघातातिल जखमींना तातडीने येथील आरोग्य केंद्रात आनणेत आले व़ुत.लिहेपंरत बचाव कार्य.सुरु होते