Home Blog Page 371

यावल तालुक्यातील विमा पॉलीसीच्या नांवाखाली नागरिकांची फसवणुक करणारी टोळी सक्रीय : मनसेची एसपी कडे तक्रार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील नागरीकांची विमा पॉलिसी काढुन घेण्याच्या नांवाखाली काही दलालांच्या माध्यमातुन आर्थिक स्वार्थासाठी विमा उतरवुन विम्याचा लाभ मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली असुन अशा प्रकारे नागरीकांची फसवणुक करण्यात येत असुन तात्काळ या विषयाची चौकशी करून कारवाई करावी अशी लिखित तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या तक्रार नियेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील काही दलाल हे नागरीकांना मिळणाऱ्या विमा पॉलीसीच्या नागरिकांना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रसंगी विम्याची रक्कम ही स्वताः भरून पॉलीसीचे कागदपत्रे हे आपल्याकडे ठेवुन विमाधारकाचा मृत्यु झाल्यास त्याची पडताळणी हे त्यांच्या कंपनीचे मॅनेजर , डॉक्टर, बॅंकेचे अधिकारी हे संगनमताने करून संबंधीत नागरीकांची आर्थिक फसवणुकीचा कारभार करीत आहे . या योजने अतर्गत काढण्यात येत असलेली विमा योजनेची पॉलीसी स्वताःच्या नांवावर काढुन घेत असल्याचे गंभीर प्रकार घडत असुन या गोंधळामुळे खरे व पात्र लाभार्थी हे विम्याच्या माध्यमातुन मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासुन वंचीत राहावे लागत आहे . अशा प्रकारे तालुक्यात नागरीकांची विमा पॉलीसीच्या नांवाखाली फसवणुक करणारी मोठी टोळी यात काही परप्रांतीय देखील असुन ही टोळी सक्रीय असल्याची तक्रार करण्यात आली असुन, या आर्थिक स्वार्थाच्या गोंधळात नागरीकांची होणारी फसवणुक थांबवुन तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी एका लिखित तक्रारी व्दारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे . या निवेदनावर जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार , शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी , विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे यांच्या स्वाक्षरी आहे .

अखेर त्या एस टी कर्मचाऱ्यांची प्राणज्योत मालवली..

0

 

शेगाव तालुक्यातील माटरगांव येथे शोककळा
बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता
राज्यात एस टी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज १२ दिवस असून राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप पर्यंत कुठलाही तोडगा या संपाबाबत निघालेला नसताना आता कर्मचारी आत्महत्येच्या दिशेने वळत असल्याचे दिसून येत आहे. एसटी विभागाने कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे धोरण अवलंबत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले असताना आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी खामगाव एसटी आगारामध्ये सहाय्य्क मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबलकर नामक कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अकोला येथील रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री सदर कर्मचारी यांची प्राणज्योत मालवली

यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची या पहिल्या आत्महत्या मुळे जिल्ह्यातील आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे…. एस टी कर्मचारी आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 200 च्या जवळपास कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. कारवाईचे सत्र एस टी महामंडळाकडून सुरू असताना आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी असलेले खामगाव एसटी आगारातील सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबलकर नामक कर्मचाऱ्याने दोन दिवसापूर्वी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आपल्या घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांना सुरुवातीला खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर अकोला येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक बनलेली होती दरम्यान बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली यापूर्वी आपण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व राज्य शासन यासंदर्भात कुठलीही निर्णय घेत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे परिवारातील सदस्यांना सांगितले होते यामुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संतप्त आहेत गुरुवारी सकाळी अंबलकर यांचे मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आले. यानंतर जिल्हाभरातील एसटी कर्मचारी माटरगाव या गावात पोहोचले होते. राज्यभरात आतापर्यंत ४० च्या वर आत्महत्या झालेल्या असताना बुलढाणा जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांची ही आत्महत्या असल्याने आता आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

दोन भिन्न धर्मात तेढ निर्माण अक्षेपार्य स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई..

0

 

शेगाव: दोन भिन्न धर्मात तेढ निर्माण करणारे आक्षेप आर्य स्टेटस सोशल मीडियावर ठेवणाऱ्या दोघा तरुणाविरुद्ध जलंब पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे याबाबत जलम पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा येथे कथित घटनेच्या बाबतीत राज्यात ऱ्याच जागी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला असताना जलम पोलीस पेट्रोलिंग करीत असताना 16 नोव्हेंबर च्या रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी माटरगाव बुद्रुक येथे शेख इरफान शेख आश्रम वय 26 व आश्रम खान अफसर खान वय 18 दोघे राहणार माटरगाव बुद्रुक यांनी त्यांच्या मोबाईल अँड्रॉइड मध्ये दोन भिन्न धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन त्यांचे एकमेकाबद्दल द्वेषाची भावना निर्माण होतील व शांततेचा भंग होईल अशाप्रकारची आक्षेपार्य व्हिडिओ स्टोरी स्टेटस ठेवले याबाबत पोलीस हवालदार संजय पहूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरुद्ध कलम 153 अ, भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास जलंब पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटेकाडे करीत आहेत

धक्कादायक , पोलिसावर सात जणांनी केला “हल्ला”

0

 

SURYA MARATHI NEWS

पसार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर सात जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ही नगर तालुक्यातील कारगाव चौकात घडली आहे. व या हल्ल्यात नगर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी भरत बाजीराव धुमाळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर
याबाबत अधिक माहिती अशी कि, हवालदार धुमाळ हे पसार आरोपी रमेश भोसले याला अटक करण्यासाठी गेले होते. व त्यावेळी तेथे असलेल्या सात जणांनी धुमाळ यांना पकडून लाकडी दांडके, दगड,
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. व धुमाळ यांच्या दुचाकीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी जखमी धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले,
आत्मशा सावत्या भोसले, सावत्या भोसले, अविनाश ऊर्फ सुरशा भोसले, शेरीना रमेश भोसले व एक अनोळखी (सर्व रा. पिंपळगाव कौंडा ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सर्व प्रकारणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. Surya marathi news

लोणारच्या बसस्थानकामध्ये शुकशुकाट ! संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत हाल

0

 

जगणं मोरे सह सतीश मुलंगे लोणार- बुलढाणा

महामंडळाकडे विविध मागण्यांसाठी एसटी कामगार व कर्मचाऱ्यांनी अचानक दिवाळीत अगोदरपासून संप पुकारल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या संधीचा फायदा घेऊन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची दिवाळी मात्र जोरात होत आहे. अडचणीतच प्रवाशांकडून लूट केली जात आहे. अशातच मात्र पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणार येथील बसस्थानकात शुकशुकाट दिसत आहे.

एसटी कामगार कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतनात काम करावे लागत असल्यामुळे त्यांना कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह भागवणे अवघड झाले आहे. या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी निवेदन देऊन मागण्या करूनही, परिवहन
महामंडळाकडून या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे परिवहन महामंडळातील सर्व संघटना एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करावे, ही प्रमुख मागणी
दिवाळीच्या सणात काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे सर्वसामान्यांची मोठी कोंडी झाली आहे. लालपरीची वाहतूक थांबल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. आता यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “सत्कार निर्भीड पत्रकारांचा” कार्यक्रम संपन्न

0

पत्रकार हा समाजाचा आरसा- विवेक बोढे यांचे मनोगत

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “सत्कार निर्भीड पत्रकारांचा” कार्यक्रम घेऊन *घुग्घुस शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात* भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते करण्यात आला

घुग्घुस शहरातील जेष्ठ पत्रकार दया तिवारी, श्रीकांत माहुलकर, मनोज कनकम, सुरेश खडसे, संजय पडवेकर, हनीफ मोहम्मद, इम्तियाज रज्जाक, नौशाद शेख, प्रशांत चरडे, हसन शेख, विक्की गुप्ता, पंकज रामटेके, राहुल चौधरी, प्रणय बंडी, दशरथ आसपवार, हनीफ शेख, देवानंद ठाकरे, कल्याण सोदारी, सदन रेनकुंटला,रमेश सुध्दाला, करण कोलगुरी, राजेंद्र मेश्राम या पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले देशात दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय वृत्तपत्र दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय वृत्तपत्र दिवस आपल्या देशात स्वतंत्र व जबाबदारी चे प्रतीक आहे. हा दिवस देशभरात पत्रकार व भारतीय पत्र परिषदेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो जो विरुद्ध परिस्थितीत सत्य देशाच्या व समाजाच्या समोर आणतो. भारतात 4 जुलै 1966 रोजी पत्र परिषदेची स्थापना करण्यात आली व 16 नोव्हेंबर पासून या पत्र परिषदेने काम करणे सुरु केले. भारतीय पत्र परिषद विश्वासहर्ता अबाधित ठेवण्यासाठी सर्व पत्रकरिता गतीविधीवर नजर ठेवते. पत्रकारिता ही कोणाच्याही दबावाखाली व प्रभावाखाली असू नये ती निष्पक्ष असावी.

यावेळी माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे विनोद चौधरी, अमोल थेरे, सिनू इसारप, साजन गोहने, संजय भोंगळे, शरद गेडाम, श्रीकांत सावे, अनंता बहादे, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, मोमीन शेख, विवेक तिवारी, अजय आमटे, अनिल मंत्रिवार, भारत साळवे, सुरेंद्र भोंगळे, मानस सिंग, सुशील डांगे, पियुष भोंगळे, प्रणय बोकडे, उपस्थित होते.

चिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेशभाऊ पोपट यांची हत्या 

0

 

 

चिखली :- चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात दि. 16 नोव्हेंबरला रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेशभाऊ पोपट हत्या झाली आहे.या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहरात जोरदार खळबळ उडाली आहे व चिखली शहराच्या व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की आनंद इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे मालक यांनी रात्री 9:45 वाजता त्यांच्या दुकानाचे मेन शटर बंद केले व बाजुचे छोटे शटर उघडे ठेवले यावेळी एका दुचाकीवरून तीन दरोडेखोर दुकानासमोर आले त्यामधील दोन दरोडेखोर दुकानात सशस्त्र घुसले एका दरोडेखोरांजवळ बंदुक होती. ती बंदुक त्या दरोडेखोरांने दुकानाचे मालक कमलेशभाऊ पोपट यांच्यावर रोखली यावेळी कमलेशभाऊ पोपट व दरोडेखोरा यांच्यामध्ये बरीच झटापट झाली. कमलेशभाऊ घाबरून शटरकडे पळत असताना दरोडेखोरांनी त्यांना पकडले एका दरोडेखोराने कमलेशभाऊ पोपट यांचा गळा आवळून त्यांना रोखुन धरले तर दुसऱ्या दरोडेखोरांने त्यांच्यावर सपासप तलवारीने अनेकवेळा वार केले तलवार त्यांच्या पोटात देखील खुपसली तलवारीने केलेल्या या हल्यात ते जबर जख्मी होऊन खाली कोसळले. त्यानंतरही जाताना दरोडेखोरांनी तलवारीने पुन्हा त्यांच्या तोंडावर सपासप वार केले. त्यामुळे ते आणखी गंभीर झाले. त्यानंतर ते दोन्ही दरोडेखोर दुकानातील रोख रक्कम घेऊन फरार झाले. जखमी अवस्थेत देखील कमलेशभाऊ पुन्हा पोपट यांनी त्यांच्या मुलाला फोन केला परंतु तो कामात असल्याने त्याच्याशी त्यांचा संपर्क झाला नाही.परंतु त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या मुलाने त्यांना जखमी अवस्थेत पाहीले व त्याने कमलेशभाऊ पोपट यांच्या मोबाईलवरुन मुलाला फोन केला यावेळी मात्र त्यांच्या मुलाने फोन उचलला त्याला ही घटना सांगितली व ताबडतोब येन्यास सांगण्यात आले. मुलगा तेथे आल्यावर कमलेशभाऊ पोपट यांना जखमी अवस्थेत चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पुढील तपास पोलीस करीत आहे. रात्री तीन वाजता जालना येथुन श्वानपथक आले होते. परंतु दरोडेखोरांनी काही पुरावे मागे न ठेवल्यामुळे हे श्वानपथक वापस गेले. कमलेशभाऊ पोपट , अनिल भाऊ पोपट यांच्या सह संपूर्ण पोपट परीवार चिखली शहरात व चिखली तालुक्यात अतिशय धार्मिक व दानशूर म्हणुन ओळखल्या जातो. धार्मिक व सामाजिक कार्यात कमलेशभाऊ पोपट यांचा सक्रिय सहभाग असायचा. कमलेशभाऊ पोपट चिखली शहरातील अनेक गरजु व गरीब लोकांना देखील योग्य ती व आर्थिक मदत करत होते. चिखली शहरासह तालुक्यातील अनेक मंदिरांमध्ये कमलेशभाऊ पोपट यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, लाउसपीकर , सांउन्ड सिस्टीम आदी दान स्वरुपात दिली होती. एवढेंच नव्हे तर मंदिरासह विविध ठिकाणी होणाऱ्या भंडाऱ्यामध्ये ते दान देत असत. कमलेशभाऊ पोपट यांची हत्या होण्याच्या दोन तास अगोदर त्यांनी कोलारा येथील यात्रेनिमित्त होणाऱ्या भंडाऱ्याकरीता तेलाचा डबा दिला होता. त्याचप्रमाणे कमलेशभाऊ पोपट रोज नित्यनेमाने रोज गाय व कुत्र्याला काही ना काही खाऊ घालत होते व त्यांना पाणी पाजत होते. त्याचप्रमाणे कमलेशभाऊ यांनी आज देखील त्यांच्या हत्येच्या एक तास अगोदर गाईला व कुत्र्याला खाऊ घातले होते व त्यांना पाणी पाजले होते. अशारीतीने कमलेशभाऊ पोपट त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत दानधर्म व धार्मिक काम व पुण्यकर्म करतच होते. कमलेशभाऊ पोपट यांच्या हत्येने त्यांच्या मित्रमंडळी , नातेवाईकासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली आहे . कमलेशभाऊ पोपट यांच्या हत्येने चिखली शहरातील व्यापारी , व्यावसायिक वर्गासह नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमलेशभाऊ पोपट यांच्या हत्येच्या निषेधार्थ व कमलेशभाऊ पोपट यांना श्रद्धांजली म्हणून चिखली शहरातील सर्व दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे आवाहन डीपीरोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा यांनी केले आहे. ✍️ मोहन चौकेकर

यावल शहरातील नगरसेवक तथा आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्यातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्त आई हॉस्पिटल येथे मंगळवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

0

.

 

यावल नगर परिषदचे नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व आई हॉस्पीटलचे संचालक डॉ कुंदन फेगडे यांच्या परिवाराच्या वतीने आई हॉस्पीटल येथे जगातीक पत्रकार दिनानिमित्ताने तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे अनेक वर्षापासुन वृत्त लेखाणाचे निष्पक्ष :पणे कार्यकरणाऱ्या प्रतिनिधींचा सत्काराचा घेण्यात आला.

 

याप्रसंगी डॉ . कुंदन फेगडे यांच्याहस्ते जेष्ठ पत्रकार डी.बी. पाटील, पत्रकार राजु कवडीवाले, पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार शेखर पटेल, अरूण पाटील, सुनिल गावडे, ज्ञानदेव मराठे, पराग सराफ, तेजस यावलकर, शब्बीर खान, विक्की वानखेडे, , आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ . कुंदन फेगडे यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रात वृत्त लेखणीचे कार्य करीत असलेल्या पत्रकारांविषयी आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला. या गौरव सोहळ्या कार्यक्रमा प्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते परेश नाइक आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ . फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार यांनी मानले.

कड़ेकोट पोलिस बंदोबसतात निघाली मृतक निखिल ची अंतिम यात्रा

0

 

 

SURYA MARATHI NEWS

सोमवारी रात्रि 8 वाजताचे दरम्यान येथील महावीर चौकात घडलेल्या एका हत्याच्या घटनेत मरण पावलेल्या भजन गायक निखिल मंडले ची आज सकाळी 11वाजता पेंशनपुरा येथील त्याचे राहत्या घरुण अंतिम यात्रा काढण्यात आली या अंतिम यात्रेत सहभागि होण्या करिता त्याचे चाहतीची मोठी गर्दी पाहता पोलिस निरीक्षक संतोष टाले ने निखिल चे घरापासून तर हिन्दू श्मशाणभूमि पर्यन्त पोलिसचा तफा तैनात केला होता सदर अंतिम यात्रा निखिल चे घरुण निघतेवेली शेकड़ो महिलानी तहो फोड़ित मोठा वलाप करीत निखिल ला अंतिम विदाई दिली ही अंतिम यात्रा पेंशनपुरा, घटनास्थल महावीर चौक, नवाब मार्किट मार्ग, जगदम्बा चौक, मेंरोड़, जयस्तम्भ चौक, अचलपुर रोड वरुण हिन्दू मोक्षधाम पोहचली जेथे हजारों चाहत्यांनी निखिल ला अंतिम विदाई दिली
ज्या ज्या मार्गाने निखिलची अंतिम यात्रा निघाली त्य त्या मार्गवर पोलिसचा कड़ेकोट बंदोबस्तने शहरात छावनी चे स्वरूप आले होते

संपामुळे दीड कोटीचे नुकसान;संपाचा तोडगा अद्यापही कायम..!

0

 

डी. एस. पिंगळे निलंगा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करा या मागणीसाठी सुरू असलेला लालपरी कामगारांच्या संपाला 19 दिवस उलटूनही तोडगा अद्याप कायम असल्याने निलंगा आगाराचे जवळपास दीड कोटींचे नुकसान झाल्याची माहिती निलंगा आगाराचे आगारप्रमुख बी.एस.राठोड यांनी दिली आहे. लालपरीतील कामगारांच्या तुटपुंज्या पगारीवर जोखीम पत्करून प्रवाशांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. माञ लालपरी कामगारांना महाराष्ट्र राज्य परिवळन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करून सरकारी नौकरदारांच्या प्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. ऐन दिवाळीच्या सणात लालपरी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सद्यस्थितीला निलंगा आगारात मागील 19 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू असून यात 100 टक्के म्हणजे 159 चालक आणि 179 वाहक, 63 पैकी 52 मेकॅनिक, 42 पैकी 32 प्रशासकीय अधिकारी संपात सहभागी असल्याने निलंगा आगार पूर्णता लाॅकडाऊन झाल्याचे चिञ पाहायला मिळत आहे. निलंगा आगाराचे दैनंदिन उत्पन्न 7 ते 8 लाखांच्या घरात असल्याने जवळपास दीड कोटींचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने आतापर्यंत 8 चालक-वाहकांचे निलंबन केली तरी अद्याप कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. उलट दिवसेंदिवस आंदोलनाची दाहकता तीव्र होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी कामगारांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाबाळांसह आंदोलनात सहभाग घेतला होता. तर एका चालकाने आगाराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. तर आतापर्यंत भाजप, मनसे, शिक्षक समितीसह अन्य संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सेवानिवृृत्त कर्मचारी संघटनेचा पाठिंबा विलगीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनासाठी बसलेल्या लालपरी कामगारांना पी.एस.95 च्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. निवेदनात त्यांनी राज्य परिवहन विलीनीकरनाचा विषय हा महत्त्वाचा आणि कर्मचार्‍यांच्या हिताचा असून तो झालाच पाहिजे अशी भावना व्यक्त केली. निलंगा आगाराचे चालक आणि वाहक, कामगार यांचे वैद्यकीय बिले अद्यापही प्राप्त न झाल्याने कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यावर पडला आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन तात्काळ बिले अदा करावीत अशी मागणी कामगार करित आहेत.