Home Blog Page 372

भरधाव टिपरची कुझरला धडक एक ठार बारा जखमी

0

 

सुनील पवार नांदुरा. ता.प्र.

भरधाव वेगाने धावणाऱ्या टिपरने समोरुन येणारी कूझरला जोरदार धडक दिल्या ने कूझरमधिल एक जन ठार तर बारा जखमी झाल्या चि घटना दि.२५नोव्हेंबर रोजी५वाजता नांदुरा जळगाव रोडवरील येरळी जवळ घडली तुळसीराम सुरळकार वय६०रा.पलसोडा ता.नांदुरा असे मयताचे नाव आहे वु्त लिहेपंरत बचाव कार्य सुरू होते या घटनेची माहिती मीळताच आमदार राजेश भाऊ एकडे यांनी त्वरित प्रा.आ.केंद्र नांदुरा येथे जाऊन जखमी झालेल्या ची विचार पुस करुन गंभीर जखमी झालेल्या ना पुढील उपचारासाठी खामगाव येथे रवाना करनेकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली याबाबत प्राप्त माहिती अशी की नांदुरा तालुक्यातील पलसोडा येथील सुरडकार कुटुंबातील१२जन दहनासाठी टुनकी येथे एम.एच२८सी४१३६या.क़.गाडी मध्ये होते दरम्यान दुपारच्या वेळी परत येत असताना येरळी जवळ समोरुन गीटि घेऊन येणाऱ्या भरधाव टिप्परने कूझरला जोरदार धडक दिली यामध्ये एक जन ठार बारा जन जखमी झाले अपघातातिल जखमींना तातडीने येथील आरोग्य केंद्रात आनणेत आले व़ुत.लिहेपंरत बचाव कार्य.सुरु होते

जळालेल्या अवस्थेत आलेल्या बसंताबाई यांचे डॉक्टर राठोड यांनी वाचविले डोळे.

0

 

सुनील पवार नांदुरा

दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दृष्टी नेत्रालय नांदुरा येथे अचानक नांदुरा येथील संगीत शिक्षक वामनरावजी भगत धावत आले व नेत्रालया मध्ये येऊन घाबरत घाबरत एक जळालेला पेशंट येत आहे व उपचार करावे लागतात असे त्यांनी सांगितले.
पेशंट हे कोकणवाडी येथील बसंताबाई सिताराम सिंह राजपूत हे अगदी काही मिनिटातच 108 या रुग्णवाहिके मधून कोकलवाळी येथुन निघाले व काही वेळातच नेत्रालय समोर गाडी उभी राहिली व मी धावत पेशंट चे डोळे बघीतले बंसंताबाईचा चेहरा पुर्ण जळालेल्या अवस्थेमधे होता व डोळ्याच्या वेदना न सहन होनार्या होत्या व बंसताबाई यांना डोळ्यांनी काहीच दिसत नव्हते अशा स्थितीत नातेवाईकांनी पेशंटला अॅम्बुलन्स मधुन ताबडतोब दवाखान्यात घेतले व नेत्रालयाचे डॉक्टर राठोड यांनी या पेशंटला उपचार देणे सुरू केले दरम्यान रुग्णां सोबत चार-पाच लोकसुद्धा होते डॉक्‍टरांनी साधारण अर्धा ते पाऊण तास उपचार केला व जळालेल्या अवस्तेत आलेल्या बसंतीबाई ला थोळ्यावेळातच वेदना कमी झाल्या व चांगल्या स्थितीमध्ये आणून दिले.
सदर पेशंट च्या नातवाने पटाक्याचे झाळ चुलीमधे टाकले व बसंतीबाई स्वयंपाक करत असतांना झाळ फुटले व पुर्ण चेहरा भाजला व डोळे सुद्धा भाजले..
पन डाॅक्टर राठोड यांनी आपल्या अनुभवातुन जळालेल्या बसंताबाई चे डोळे वाचविले.
वरिल पहिला फोटो हा पेशंट *दृष्टी नेत्रलाय नांदुरा*
येथे उपचारा आधीचा आहे व दुसरा चा फोटो हा उपचार नंतरचा आहे..
आज बंसतीबाईंचे डोळे चांगल्यास्थीत असुन त्यांना चांगले दिसते.
जर पेशंट लवकर पोहचले नसते व योग्य उपचार झाला नसता तर जसा चेहरा भाजलेला दिसतो तसा डोळे सुद्धा खराब होउ शकले असते.
पन गाव वासिंयाचा जिवाळा असलेले वामनराव भगत सर व त्यांचे बंधु यांच्या सतर्कतेमुळे व डाॅक्टर राठोड यांच्या उपचारांमुळे आज बसंतीबाई यांचे डोळे वाचले….
👁 👁
या घटनेतुन एवढेच सांगायचे आहे की डोळा शरिराचा खुप नाजुक भाग असुन फटाके फोळतांना सावधगिरी बाळगली पाहिजे. व असे काही झालेच तर ताबडतोब दवाखान्यात उपचार करायला हवे…

शरद पाटील येरळीकर..
नेत्र चिकीत्सक तथा
व्यवस्थापक दृष्टी नेत्रालय नांदुरा…
📞8766032199.

घुग्घुस नगर परिषद कार्यालय स्थलांतरीत केल्यास तीव्र आंदोलन

0

 

भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा इशारा

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी असलेले घुग्घुस नगर परिषदेचे कार्यालय इतर इमारतीत स्थलांतरीत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी सध्या घुग्घुस नगर परिषदेच्या कार्यालयाची इमारत आहे. ग्रामपंचायतीच्या निर्मिती पासून ही इमारत तिथेच आहे. घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी बाजारात घुग्घुस नगर परिषद कार्यालयाची इमारत असल्याने कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना वयोवृद्धाना अतिशय सोयीस्कर आहे. या इमारतीशी घुग्घुस वासियांच्या भावना जुळलेल्या आहे.
हे कार्यालय स्थलांतरीत केल्यास नागरिकांना मोठया अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे सामान्य नागरिकांत आक्रोश निर्माण होईल. राजकीय हेतूने हे कार्यालय हलविण्याचा डाव रचल्या जात आहे तसेच अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा गावात चांगलीच रंगत आहे.
त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी हे कार्यालय स्थलांतरीत करू नये यासाठी घुग्घुस नगर परिषदेचे प्रशासक निलेश गौड व मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची कार्यालयात भेट घेऊन नगर परिषद कार्यालय स्थलांतरित झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, उत्तर भारतीय आघाडीचे रत्नेश सिंग, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप,राजेश मोरपाका, भाजपाचे सुरेंद्र जोगी, भारत साळवे, बबलू सातपुते उपस्थित होते.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) तर्फे हिवाळी परिक्षा ऑंन लाईन आणि ऑंफलाईन पद्धतिने घ्या अन्यथा विध्यापिठात आंदोलनचा ईशारा.

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

महाराष्ट्र स्टुडंट युनियन (मासु) हे महाराष्ट्रभर विद्यार्थ्याच्या हक्क आणि अधिकारासाठी लढा देण्याचा कार्य करतांना पाहिले आहे.
आज सुद्धा जिल्हा अध्यक्ष शेख मोबिन शेख रहेमान /संग्रामपूर तालुका अध्यक्ष मोहम्मद तौसीफ जमदार यांनी विद्यार्थ्यांसाठी लढण्याचे आवाहन केले आहे.त्यानी मेल द्वारे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु,तसेच गव्हर्नर ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री महोद्य़ उद्य़ सावंत यांना पाठवण्यात आला.त्यानी त्या मेल मध्ये स्पष्ट लिहले कि हिवाळी परिक्षा ऑंनलाईन आणि ऑंफ लाईन घेण्यात यावी.
गेल्या काहि वर्षि परिक्षा हे ऑन लाईन देन्यात आल्या.आता सुद्धा काहि ठिकानि सुरु आहेत.परंतु शासना ने २० ऑक्टोंबर पासुन महाविद्यालय ऑफलाईन पद्धतिने सुरु केले.
७५% ते ८०% अभ्यासक्रम हे ऑनलाईनच शिकवण्यात आले आहे.
संध्या महाराष्ट्रांत सुरु असलेल्या एस.टी.कामगारांचा संप,रेल्वे प्रवास बंद जर दळणवळणाची मुख्य व्यवस्थाच बंद आहे तर मग विद्यार्थी आँनलाइन शिकवून आँफलाइन परीक्षेसाठी कसे पोहचणार याचा विचार ना मंत्री महोदयांनी केला नाही विद्यापीठ स्तरावर केला जात आहे.

आमचा आँफलाइन शिक्षणाला विरोध नाही मुळात आमची ही सुरवातीपासूनचीच मागणी राहीलेली आहे की शिक्षण ऑफलाईन सुरु करा म्हणून. उन्हाळी सत्राच्या परीक्षा व तासिका आँफलाइन पद्धतीने घेण्यात यावे त्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक दृष्टया स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल व त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती देऊ शकता.

राज्यामधे ११ अकृषी विद्यापीठ आहे.त्यातून मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालय हिवाळी परीक्षा आँनलाइन पद्धतीने घेणार आहेत जर मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालये विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ शकतात तर आपण का नाही ?

मान.महोदय कोरोनाच्या काळात विद्यार्थी खुप त्रस्त होते अजूनही आहेत तरी आपण येणारी हिवाळी परीक्षा विद्यार्थ्यांना आँनलाइन व आँफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन द्यावेत हीच आमची माफक अपेक्षा अन्यथा आम्हाला लोकशाही अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्या विद्यापीठात आंदोलन उभरावे लागेल याची नोंद घ्यावी अशे मेल मध्ये सांगण्यात आले.

अखेर आरडव येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

0

 

लोणार (सतीश मुलंगे सह जगन मोरे)

 

तालुक्यातील आरडव येथील वादग्रस्त व ग्राहकांना अरेराची करणा-या दुकानदार आसाराम लक्ष्मण जायभाये यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश खंडारे यांनी एका आदेशाद्वारे निलंबित केला आहे.

याबाबत सविस्तर असे की आरडव येथील सदाशिव किसन जायभाये भिकाजी नामदेव नरवाडे पंढरी प्रहाद सरकटे व इतर ग्रामस्थांनी दिनांक १८/५/२० २१ रोजी लोणार तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संफान नदाफ

आसाराम लक्ष्मण जाग भावे ग्राहका ग्राहकाचे लिखित बयान घेत सोबत उद्घट पणाने वागणूक देत तहसीलदार सैफान नदाफ यांनी अरेरावी करत असल्याची व वतन योग्य व अचूक निलंबनाच्या अहवाल देता जादा दराने धान्य विक्री करतो जिल्हा पुरवठा अधिकारी बुलवाणा ग्राहकाने पावती यावत विचारणा यांच्याकडे उठवला जिल्हा पुरवठा केली असता पावती मिळणार नाही व अधिकारी रुपेश खंडारे यांनी स्वस्त जादा दराने पैसे लागतील असे म्हणत धान्य दुकानाचा जवाब चौकशी माझी कोणीही तक्रार करा मी धान्य अधिकारी यांनी केलेल्या चौकशी माझ्या मर्जीप्रमाणे वाटप करील असे अहवालाचे अवलोकन केले असता म्हणत अरेरावीची भाषा वापरायचा या सदर स्वस्त धान्य दुकानदार हा दोषी बाबत तक्रार केली होती

आवळल्याने महाराष्ट्र अनुसूचित

या तक्रारीची दखल लोणार वस्तू वितरणाचे विनियमण आदेश तहसील से कर्तव्यदक्ष तहसीलदार १९७५ राष्ट्रीय अन्न सुरक्षा सैपन नदाफ यांनी घेतली व तत्काळ अधिनियम २०१३ मधील अटी व तत्कालीन पुरवठा निरीक्षक आर आर शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे दुकानाचे कहाळे यांना आरडव येथे चौकशी प्रधिकरण पत्र सादर आदेशाद्वारे यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानदार कामी पाठविले तक्रारदाराचे बयान व निलंबित करण्यात आले आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी करणार मसलगा येथील आधुनिक उच्चतंत्रज्ञानाने बनविलेल्या पुलाच्या पाहणी

0

डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

निलंगा /मसलगा येथील भारतातील पहिला पुल विकसित करण्यात आल्याने त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.दरम्यान, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लि ; पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक रमेश गाढवे यांच्यासमावेत पुलाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत.
माझी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 752) सद्यस्थितीला पुर्णत्वाकडे आहे.मलेशियन डयुरा सिस्टिमने बनविलेल्या या पुलासाठी आधुनिक उच्चतंञज्ञानाच्या जोरावर हा पुल विकसित करण्यात आला आहे.लोदगा येथे 01:30 ते 02:00 (राखीव) त्यानंतर मसलगा ( सोळ ) नदीजवळील भारतातील पहिल्या पुलाची पाहणी करण्यासाठी दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी 03:30 ते 04:00 दरम्यान केंद्रिय मंञी नितीन गडकरी येणार आहेत.
प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर मसलगा येथील पुलाची पाहणी करुन प्रकल्प व्यवस्थापक रमेश गाढवे यांच्याशी संवाद साधून कामाचा आढावा घेतला आणि पुठील सूचनाही करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी रोहित पाटील,तानाजी बिराजदार,ज्ञानेश्वर चेवले,अशोक शिंदे,रमेश पाटील,विजयकुमार देशमुख, रूषी जावळे आदी जणांची उपस्थिती होती.

स्वाभिमानी किसान संघटना के नेता रविकांत तुपकर -और उपमुख्यमंत्री अजितदादा पवार की मुलाकात सफल…

0

 

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

सोयाबीन-कपास उत्पादकों के मामले में बड़ा फैसला..

स्वाभिमानी के नेता रविकांत तुपकर ने सोयाबीन और कपास उत्पादकों के लिए अन्न त्याग कर बड़ा आंदोलन शुरू किया था। तुपकर की तबीयत बिगड़ने से आंदोलन ने हिंसक रूप ले लिया। था उसके बाद राज्य सरकार ने उन्हें आज चर्चा के लिए बुलाया था. उपमुख्यमंत्री अजीत पवार की अध्यक्षता में आज सोयाबीन-कपास उत्पादकों के लिए एक जंबो बैठक हुई। इस बैठक में रविकांत तुपकर ने सोयाबीन और कपास उत्पादकों का जोरदार सर्मथन किया। ढाई घंटे तक चली बैठक में हर मुद्दे पर विस्तार से चर्चा की गई…खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबल, ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राउत, खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कृषि मंत्री दादा भूसे सहित कृषि, वित्त एवं योजना, सहकारी विपणन, ऊर्जा, राजस्व सहित विभिन्न विभागों के सचिव उपस्थित थे… उल्लेखनीय है कि स्वाभिमानी संघटना के अध्यक्ष राजू शेट्टी ने व्हि सी के माध्यम से इस बैठक में भाग लिया. था इस वक्त उन्होंने पिक विमा फसल के मुद्दे पर सरकार का ध्यान केंद्रित किया था

देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसनिमित्त ४०० रक्तदात्यांचे अमरावतीला महादान.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

कठीण काळातील अमूल्य योगदानासाठी धन्यवाद घुग्घुस – डॉ. आगरकर

मंगळवार, दि. २३ नोव्हेंबर
भाजपचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस जिल्हाभरात भव्य रक्तदान व सेवा शिबीरांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या १७५३ रक्तदात्यांनी रविवारी रक्तदान केले.
यामध्ये गेल्या सतरा वर्षापासुन रक्तदानाची अविरत परंपरा चालवणार्‍या घुग्घुस येथिल देवराव दादा भोंगळे मित्रपरिवाराने जिल्ह्यातील आजवरचे एकदिवसीय सर्वाधिक रक्तदान करण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या रक्तदानात शिबिरात घुग्घुसमधिल १०१९ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला.
स्थानिक गांधी चौकात सकाळी नऊ वाजतापासून रात्री नऊ वाजेपर्यंत रक्तदात्यांच्या गर्दिने परिसर गजबजून गेले होते. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी हजाराच्या संख्येत रक्तदान होण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
येथे झालेल्या एकूण रक्तदानापैकी ४०० रक्तपिशव्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाला देण्यात आल्या.

डॉ. उमेश आगरकर म्हणतात…
(जनसंपर्क अधिकारी, जि. सा. रुग्णालय रक्तपेढी अमरावती.)

⇨ लोकनेते आ. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून मानवतावादी कार्यासाठी नेहमी अग्रणी असणार्‍या देवराव दादा मित्रपरिवार घुग्घुस टीमचे कठिण काळातील अमूल्य मदतीसाठी मी आभार मानतो, कौतुक करतो.
कोविडमुळे रक्ताचा तुटवडा होताच, शिवाय आमच्या अमरावतीमध्ये हिंदू-मुस्लीम दंग्यामुळे कर्फ्यू लागले. त्यामुळे आमचे अनेक शिबीर रद्द झाल्याने रक्तसाठा अपुरा पडत चालला होता. अशा परिस्थितीत आम्ही रक्तासाठी अनेक जागी पायपीट केली. परंतू जिल्ह्यामध्ये मेळघाटसारख्या आदिवासी भागातील कुपोषित, सिकलसेलग्रस्त अशा अनेक रुग्णांना रक्ताची अधिक गरज होतीच, त्यामुळे आम्ही चंद्रपुरात डॉ. हजारे यांचेशी संपर्क करून दादांच्या शिबिराचे निमंत्रण स्विकारले. आणि इथे येऊन आम्हाला ४०० रक्तपिशव्या मिळाल्या, याचे खरंच आनंद आहे. याशिवाय आयोजकांबरोबरच घुग्घुस मधिल प्रत्येक रक्तदात्याची रक्तदानाबद्दलची जागरुकता व समर्पणवृती आम्हाला यानिमित्ताने पाहायला मिळाली.

नदीत उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली

0

 

हिंगणघाट दि.२३
स्थानिक विर भगतसिंग वार्ड येथील २२ वर्षीय तरुणी कु.आशु प्रविण मेंढे हिने आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताचे दरम्यान उघडकिस आली.पोलिसांनी शोध घेतला असता मृतक तरुणीचे शव राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पात्रात पोलिसांना शोध घेतांना मिळाले.
मृतक तरुणी शहरातील खाजगी दवाखाण्यात काम करीत होती,सदर तरुणी कालपासून घरुन बेपत्ता असल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांत नोंदविण्यात आली होती.
राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदीच्या पुलावर एका इसमाला काल सोमवारी सायंकाळी लेडीज बॅग पडून असल्याचे आढळून आले होते,सदर इसमाने याची माहिती वडनेर पोलिस ठाण्यात दिली. मात्र हे प्रकरण हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने वडनेर पोलिसांनी याची हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी वणा नदी पुलाजवळ जाऊन या प्रकरणाची शहनिशा केली असता लेडीज पर्स आढळून आली.सदर तरुणीने वणा नदी पात्राता उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशा संशयावरून आज मंगळवारी २३ नोव्हेंबरला पोलिसांनी वणा नदी परिसरात शोधकार्य सुरू केले असता उपरोक्त तरुणीचा मृतदेह मिळाला असून तिची मेंढे कुटुंबियातील मुलगी असल्याची ओळख पटली.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरिधर पेंदोर, सोमनाथ टापरे यांचेसह पोलीस कर्मचारी यांनी केली.

कृषी विद्यापीठातील सोयाबीन केंद्र अंतिम श्वास घेण्याच्या स्थितीत.

0

 

उषा पानसरे असदपूर (  कार्यकारी संपादक मो. 9921400542

राज्यपाल कोश्यारी शेतकरी समस्यांकडे लक्ष देतील का. – प्रदीप बाजड
— — —
अमरावती : महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही अमरावतीकर सज्ज आहोत. मात्र राज्यपाल दौऱ्यावर येत असतांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी नगदी पिकं म्हणून आधार असणाऱ्या पिकांकडे अधिक लक्ष देत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राची स्वतः पाहणी करून अंतिम श्वास घेत असलेल्या संशोधन केंद्राची अवस्था पाहावी, विशेष म्हणजे १५१ एकर शेत जमिनीपैकी २०-२५ एकर जमीन सोडली तर उर्वरित शेतजमीन पडीतात रूपांतरित झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर संशोधन केंद्रात असलेले अधिकारी-कर्मचारी व मजूर वर्ग निवृत्त झाल्याने सध्याच्या परिस्थितीत ५५ पैकी ७ मजूर कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढचं काय संशोधन केंद्राच्या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने असंख्य आजाराने अंतिम श्वास घेण्याच्या स्थितीत संशोधन केंद्र आले आहे. त्यामुळे राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत प्रादेशिक संशोधन केंद्रातील सर्व आवश्यक गरजा पूर्ण करीत केंद्राचे वैभव पूर्व पदावर आणून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कार्यरत करावे, प्रादेशिक संशोधन केंद्राबाबतची लेखी मागणी शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी दिनांक १२ ऑक्टोबर रोजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या मार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना केली होती.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्र (आर.आर.सी.) सन-१९६८ पासून कार्यरत आहे. हे केंद्र एकूण १५१ एकर क्षेत्राचे असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व गरजेचे आहे. या ठिकाणी गडीत पीक व तृणधान्य पिकांचे जास्त उत्पन देणाऱ्या रोगमुक्त बियाणांचे संशोधन तसेच आकस्मिक पिकांवर रोगांचे सावट आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांच्या शेतात जाऊन परीक्षण करून योग्य मार्गदर्शन करणे हि महत्वपूर्ण बाब निरंतर होत होती.

गत 2 हजार सालापासून अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्रात दिवसेंदिवस सोयाबीन पिकाच्या लागवडीचे क्षेत्र सतत वाढल्याने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुख्य सोयाबीन पिकांवर संशोधन व्हावे याहेतूने अमरावती येथे सन २००९ मध्ये केंद्राची स्थापना केली. परंतु हळू-हळू असंख्य संशोधक, सहाय्यक संशोधक व मजूर वर्ग या संशोधन केंद्रातून निवृत्त झाले असल्याने त्याचबरोबर कृषी विद्यापीठाचे दुर्लक्ष झाल्याने १५१ एकर जमिनीपैकी ३-४ एकर जमीन सोडून बाकी पडीत शेतात रुपांतर झाले आहे. जुने वैभव हरवून असंख्य समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळते, परिसराचे कुंपण शिकस्त झाल्याने मोकाट जनावरांचा सुळसुळाट, बियाणे साठविण्यासाठी अत्यंत आवश्यक गोडाऊन व ओपन शेड नसणे, दैनंदिन मजुरांचा मोठं अभाव, शेतकऱ्यांच्या तक्रारीचे पाहणी करण्यासाठी जाण्या-येण्यासाठी केंद्रावर वाहन नसणे, अत्यंत महत्वाचे म्हणजे रसायन शास्त्रज्ञ, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, वरिष्ठ संशोधक, सहाय्यक संशोधक, कृषी सहाय्यक, ग्रेट वन मजूर, कायम मजूर, ५५ पैकी केवळ ७, यंत्र सामुग्रीचा अभाव, विहिरीची व इमारतीची दुरुस्ती नसणे, या सर्व महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने असंख्य आजाराने अंतिम श्वास घेण्याच्या स्थितीत संशोधन केंद्र आले आहे.

राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी नगदी पिकं म्हणून आधार असणाऱ्या या महत्वपूर्ण सोयाबीन संशोधन केंद्राची स्वत: पाहणी करून स्थानिक सर्व आवश्यक गरजा पूर्ण करून या संशोधन केंद्राचे वैभव पूर्व पदावर आणून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कार्यरत करण्याची मागणी या पत्रकातून प्रदीप बाजड यांनी केली आहे.