Home Blog Page 394

तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरूध्दा उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. यावर १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत सरपंच अपात्र करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील यावल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. यासंदर्भात ७ जुन रोजी चुंचाळे ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलवून सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. गावात येत्या १८ ऑक्टोंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदान केले जाणार आहे. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी व पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज हे राहणार आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान होवून नागरीक सरपंच या पदावर राहतीला का नाही हे ठरविले जाईल. तालुक्यात लोकनियुक्त सरपंच यांच्याविरुद्ध अशाप्रकारे अविश्वास झाल्यानंतर ग्रामसभेतून अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासंदर्भातील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नांदगावची माऊली”संघर्ष गृप आयोजीत ‘ नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात आनंदात साजरा

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

नांदगाव शहरातील हमालवाडा येथील आराध्यदैवत म्हणुन समजली जाणारी ‘नांदगावची माऊली’ संघर्ष गृपतर्फे सालाबादाप्रमाणे स्थापन करण्यात आली.आज गुरुवारी युवासेना शहर अध्यक्ष मुज्जुभाई शेख, जनसेवा मंडळाचे पदधिकारी विक्रांत (नानु) कवडे,युवा समाजसेवक सिध्दार्थभाऊ पवार तसेच मंडळाचे सदस्य अजयभाऊ गोरे यांच्याहस्ते आज देवीची श्रीआरती करण्यात आली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश पगारे उपाध्यक्ष प्रमोद पगारे नागेश दराडे ,उल्हास कदम, आशिष साळुंखे ,हेमंत साळुंखे, अतुल देवरे,विकी कदम,संजयभाऊ साळुंखे,अँड सचिनजी साळवे,मयुर सुळ,विजय कळमकर तसेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

बोलोरो व मोटरसाइकिल मधे अमोरा समोर धड़क एक मृतु तर एक जख्मी

0

 

सुनील पवार नांदुरा

नांदुरा व जळगाव रोडवर व शिवनेरि होटेल जवळ अपघात बोलोरो व मोटरसाइकिल मधे अमोरा समोर जोरदार धड़क मधे दोन युवक एकाचा मृतु तर एक जख्मी ज़ख्मी युवकाला अम्बुलेंस मधे हॉस्पिटल मधे रवाना करण्यात आले आहे माहिती लिह पर्यंत कोणतेही प्रकारची पोलिस नोंद झाली नाही ,

पिकविमा वाटपात अन्याय झाल्याबद्द्ल व चालू खरिपातील नुकसानीबाबत जामोद सर्कल मधील नागरिकांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव दि 14: जामोद मंडळ सर्कल मधील नागरिकांच्या वतीने आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्यात नमूद करण्यात आले की सोयाबीन व इतर पिक उत्पादक शेतकरी असून आम्ही सन 2020 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत रिलायन्स जनरल इन्सुरंस कंपनीचा सोयाबीन पिकाचा पीकविमा काढला होता. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आमचे 100% सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानीचे प्रमाणानुसार आम्हाला 100% नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून मिळणे गरजेचे आहे. मात्र सदर विमा कंपनीने जामोद मंडळ सर्कल मधील विमा काढलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला असून एकरी 1200/- रुपये ते 1600/- इतकी तुटपुंजी रक्कम आमच्या खात्यावर नुकतीच जमा केली असून एक प्रकारे शेतकऱ्याची विमा कंपनीने थट्टाच केली आहे. वास्तविक जामोद मंडळ सर्कल ला लागुनच असलेल्या वडशिंगी सर्कलमध्ये पिक विम्याची रक्कम एकरी 10 ते 12 हजार रुपये दिली आहे. तसेच जामोद मंडळ सर्कल मधील यापुर्वी ऑनलाइन तक्रार करण्याऱ्या काही शेतकऱ्याच्या खात्यावर एकरी 6000 ते 8000 रुपये प्रमाणे विमा मिळाला आहे. अशा प्रकारे पीकविमा भरपाई रक्कम वाटप करतांना विमा कंपनीने नाहक भेदभाव केला आहे. यावरून आमच्या सोयाबीन पिकाच्या नुकसानी बाबतचा कृषी विभाग, महसूल विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी चुकीचा अहवाल सादर केला असावा. त्यामुळे केवळ जामोद मंडळ सर्कल मधील शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी पिकविमा नुकसानीची रक्कम मिळाली आहे.
तसेच सन 2021 मध्ये जामोद मंडळ सर्कल मध्ये पिक लागवडी चे वेळी हवामान बदलामुळे पावसाचा जवळपास एक ते दीड महिन्याचा खंड पडून सुद्धा जामोद मंडळ सर्कल मदतीपासून हेतू पुरस्पर वंचित ठेवण्यात आला. व सप्टेंबर 21 व ऑक्टो 21 मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने हेतु पुरस्पर आज पर्यंत केल्या गेले नाही. तरी या तक्रारींचे आपल्या कार्यालयामार्फत निदान करण्यात यावे अन्यथा आपला कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य सौ रुपाली काळपांडे, पंचायत समिती सभापती रामेश्वर राऊत ,उपसभापती महादेवराव धुर्डे, सरपंच रामेश्वर अंबडकार,गुणवंतकाका कपले,अशोक काळपांडे, सुरेश अंबळकर ,रमेश वंडाळे,पुंडलिक पाटील, विजय वंडाळे ,मोहन राजपूत ,विकास धुळे,व इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

रिलायन्स कंपनीकडून तुटपुंजा विमा देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव दि 14: जामोद मंडळ सर्कल मधील नागरिकांच्या वतीने आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्यात नमूद करण्यात आले की सोयाबीन व इतर पिक उत्पादक शेतकरी असून आम्ही सन 2020 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत रिलायन्स जनरल इन्सुरंस कंपनीचा सोयाबीन पिकाचा पीकविमा काढला होता. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आमचे 100% सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानीचे प्रमाणानुसार आम्हाला 100% नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून मिळणे गरजेचे आहे. मात्र सदर विमा कंपनीने जामोद मंडळ सर्कल मधील विमा काढलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला असून एकरी 1200/- रुपये ते 1600/- इतकी तुटपुंजी रक्कम आमच्या खात्यावर नुकतीच जमा केली असून एक प्रकारे शेतकऱ्याची विमा कंपनीने थट्टाच केली आहे. वास्तविक जामोद मंडळ सर्कल ला लागुनच असलेल्या वडशिंगी सर्कलमध्ये पिक विम्याची रक्कम एकरी 10 ते 12 हजार रुपये दिली आहे. तसेच जामोद मंडळ सर्कल मधील यापुर्वी ऑनलाइन तक्रार करण्याऱ्या काही शेतकऱ्याच्या खात्यावर एकरी 6000 ते 8000 रुपये प्रमाणे विमा मिळाला आहे. अशा प्रकारे पीकविमा भरपाई रक्कम वाटप करतांना विमा कंपनीने नाहक भेदभाव केला आहे. यावरून आमच्या सोयाबीन पिकाच्या नुकसानी बाबतचा कृषी विभाग, महसूल विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी चुकीचा अहवाल सादर केला असावा. त्यामुळे केवळ जामोद मंडळ सर्कल मधील शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी पिकविमा नुकसानीची रक्कम मिळाली आहे.

धम्मचक्र परिवर्तन दिनी परिवर्तन बौद्ध महिला मंडळाची स्थापना

0

 

घुग्घुस प्रतिनिधि
रमेश सुद्दाला,

नकोडा : येथील 14 ऑक्टोबर रोजी बौद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात पार पडला परमपूज्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भीम वंदनेचे गायन करण्यात आले.

सदर सोहळ्याचे आयोजन
परिवर्तन बौद्ध महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.रंजना आनंद झाडे, उपाध्यक्ष सौ. शोभा लिलेंद्र रंगारी
सचिव सौ.पुष्पांजली कातकर, कोषाध्यक्ष सौ. माधवी विजय भगत,सदस्य सौ. उज्वला ठमके
सौ. वंदना गौतम लोहकरे,सौ. भारती अरुण ठमके,सौ.पौर्णिमा अमोल झाडे, सौ. किरण प्रमोद कांबळे,सौ. संघरत्ना ठमके,सौ. उजवला पाटील यांनी केले.
सदर महिला संघटने तर्फे वयोवृद्ध निराधार महिला पुरुषा करिता निराधार गृह निर्माण करण्यात येणार आहे.
महिला करिता स्वयंरोजगाराचे गृह उद्योग निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती संस्था अध्यक्षाने दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घुग्घुस कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी, नकोडा येथील प्रतिष्ठित नागरिक शरीफ शेख, कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, छोटू शेख, जुबेर शेख,वस्सी शेख, व अन्य नागरिकगण उपस्थित होते.

आ.सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी त्या चिमुरड्यांना दिला मायेचा आधार

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

नांदगाव येथे रेल्वे अपघातात मुत्यू पावलेल्या स्वाती शिंदे यांच्या कुटुंबीयांची आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम सुहास कांदे यांनी सांत्वन पर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या.नांदगाव रेल्वे दुर्घटनेत स्वाती शिंदे यांची प्राणज्योत मावळली होती . त्यांना चार लहन मुली असून,या चिमुरड्यांच्या नावे आमदार सुहास कांदे आणि सौ.अंजुम कांदे यांनी प्रत्येक मुलीच्या नावे सुरक्षा ठेव रक्कम बँकेत जमा केली. त्याचे रीतसर कागदपत्र या वेळी त्या चिमुरड्यांच्या हाती सुपूर्द केले. तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याचे आश्वासन अंजुम कांदे यांनी या वेळी दिले.
नियतीच्या मनात आलं की होत्याचं नव्हतं होऊन जातं याही घटनेत तसच काही झालं आणि संपूर्ण नांदगाव शहर हादरून गेलं.स्वाती ताई शिंदे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि चार चिमुरड्यांच्या मातेचं छत्र हरपलं, ऐकायला ही अंतकरण पिळवटून टाकणारी ही घटना आहे.ही परिस्थिती त्या परिवाराला भविष्यात किती कष्टदायक असेल याचा विचार आपण करू शकतो.घरात आईचं नसणं हे किती क्लेशदायक असतं हे आपण समजू शकतो.पण नियती च्या पुढे आपलं काही चालत नाही आपल्या हातात आहे ते फक्त जे उरलंय त्याला जीव लावणं.आज त्या कुटुंबास आणि त्या चार निरागस मुलींच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. एक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी निभवतांना या गोष्टीचे भान ठेऊन आमदार सुहास आण्णा कांदे आणि सौ.अंजुम ताई कांदे यांनी चारही चिमुरड्यांच्या नावे सुरक्षा ठेव रक्कम बँकेत जमा केली आहे. निकिता रवी शिंदे,नंदिनी रवी शिंदे,साक्षी रवी शिंदे,स्वामींनी रवी शिंदे यांच्या प्रत्येकीच्या नावे जमा ठेविचे कागदपत्र त्यांच्या कडे सुपूर्द केले. सौ.अंजुम ताई कांदे यांनी रवी शिंदे यांच्या घरी सांत्वन पर भेट देऊन कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाल्या. या निरागस मुलींशी बोलतांना त्यांच्या शून्य नजरा आणि निशब्द चेहर्या कडे पाहून उपस्थित सर्वांनाच मायेचा कंठ दाटून आला. सर्वांना गहिवरून आले.या पुढे भविष्यात येणारी कोणतीही अडचण सांगण्यास मागे पुढे पाहू नका मला लगेच फोन करा असे ताईंनी मुलींना आवर्जून सांगितले.मुलींच्या शिक्षणात हातभार लावण्याचे आश्वासन ही दिले. झालेली घटना अतिशय वेदनादायी असली तरी आता भविष्यात आपल्या मतदारसंघाचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही सदैव उमच्या सोबत असल्याचा विश्वास अंजुमताई कांदे यांनी या कुटुंबीयांना दिला.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव,उज्वला खाडे, संगीता बागुल,ललिता राऊत,सरला घोगळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

नगरसेवक नितीन जाधव यांच्या मातोश्रींचे सोमवारी निधन झाले त्याप्रसंगी आमदार यांच्या सौ.अंजुम सुहास कांदे यांची या कुंटुबास सांत्वनपर भेट

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

नगरसेवक नितीन जाधव,नाना जाधव आणि बापू जाधव यांच्या मातोश्रींचे सोमवारी निधन झाले या अनुषंगाने अंजुम ताई सुहास कांदे यांनी या कुटुंबास सांत्वनपर भेट दिली.
या प्रसंगी चांडक प्लॉट परिसरातील महिलांनी अंजुम ताईंची भेट घेतली,पूरग्रस्त परिस्थितीने झालेली वाताहत आणि होत असलेल्या अडचणीं त्यांनी मांडल्या,आमदार सुहास कांदे यांच्यावर आमचा विश्वास आहे म्हणून च आम्ही एक महिला म्हणून आपल्याकडे आमच्या अडचणी मांडत आहोत आपण आमच्या अडचणी समजून घ्या आणि आपण त्या सोडवाल अशी अपेक्षा केली. आमदार सतत आपल्यासाठी काम करत आहेत,कायमस्वरूपी आपल्या अडचणी दूर होतील या साठी ते प्रयत्न करत आहे,शिवाय तातपुरत्या शहरात येण्या जाण्याची महत्वाची अडचण स्वखर्चातून त्वरित दूर करण्यात येतील, शासनाकडून मंजूर निधी आली की त्वरित ईतर कामही सुरू होईल असा अंजुमताईंनी महिलांना धीर दिला . या वेळी शिवसेना शहराध्यक्ष सुनील जाधव,संगीता बागुल,उज्वला ताई खाडे,लीला राऊत,सरला घोगले, नगरसेवक नितीन जाधव व ज्येष्ठ नागरिक ही उपस्थित होते.

शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

0

 

हिंगणघाट तालुक्यातील छोटी आर्वी येथील रहिवासी ३७ वर्षीय विवाहित रुपाली ज्ञानेश्वर ढोके हिने ११ आक्टोंबरला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली असता पाणी काढण्यासाठी विहीरवर गेली असता तीचा पाय घसरून विहिरीत पडून मुत्यू झाला.रुपाली ज्ञानेश्वर ढोके हि उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट येथिल मुत्य अवस्थेत दाखल करण्यात आले यावरून वडनेर पोलिसांनी आज १२ आक्टोंबरला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास वडनेर पोलिस करीत आहे.

तीने स्वताहून आत्महत्या केली नसून त्याच्या परीवारातील सदस्यांनी तिला मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याची तक्रार मुत्यक सुश्मिता ढोके हिचा भाऊ शंकर बोडे राहणार ऐकुर्ली तहसिल राळेगाव जिल्हा यवतमाळ याने आज १२ आक्टोंबरला वडनेर पोलिस ठाण्यात केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी वडनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा प्रशासन व यावर किसान प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील विरावली येथे नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा प्रशासन व यावर किसान प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालय आणि आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटी प्रांगणात ही साफसफाई करण्यात आली नागरिकांनी गावातील स्वच्छता कायम ठेवण्यासाठी आपला परिसर स्वतः शैक्षणिक सफाई ठेवावा आणि गावात रोगराई वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना पाटील व आर्मीतील जवान महेंद्र पाटील यांनी याप्रसंगी उपस्थितांना आणि ग्रामस्थांना आवाहन केले याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी सरपंच तुषार चंद्रसिंग पाटील उर्फ मुन्ना भाऊ माजी सरपंच विश्वनाथ पाटील भारतीय लष्करात कार्यरत असलेले सैनिक महेंद्र पाटील गावातील प्रतिष्ठित मेहबूब बलदार तडवी दामू अडकमोल ग्रामपंचायत सदस्य नथू अडकमोल धनराज पाटील राजेंद्र पाटील संजय मोतीराम पाटील मिलिंद अडकमोल नसिर नजीर तडवी उपसरपंच माजी सुभान तडवी दशरथ सखाराम धनगर भागवत भिमसिंग पाटील विरावली पोलीस पाटील चंद्रकांत पाटील कैलास राजधर पाटील गोपाळ पाटील दिनकर गोपाल पाटील हेमंत काशिनाथ पाटील प्रवीण ठाणसिंग पाटील रवींद्र दिगंबर पाटील मुकुंदा भालेराव गफार तुकडू तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते