Home Blog Page 395

वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात १४ ऑक्टोबर रोजी होणारे महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम कोवीड१९मुळे रद्द

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील वनोली येथील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या “श्री साईबाबा देवस्थान व नोली ” या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाली असून घटस्थापनेच्या नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही या वर्षी १४ऑक्टोबर २०२१ ऑक्टोबर रोजी गुरुवार येत असल्याने या दिवशी महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .यावर्षी कोरोना संसर्गाच्या महामारी संकट अद्याप कायम असल्याने महाप्रसादाचा कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला आहे. असे या मंदिराचे विश्वस्त यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी तसेच या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी कळविले आहे

यावल तालुक्यातील हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे व बामनोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असून याठिकाणी शंभू महादेवाचे पिंडी ची स्थापना व नंदादीप श्री साईबाबांच्या हस्ते लावण्यात आले होते ते आजही तेवत (जळत ) आहेत एकीकडे दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते दुष्काळ पडला होता साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी अक्षरशा साईबाबांनी दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला असे गावकरी सांगता ५६५ वर्षापासुन याठिकाणी हे नंदादीप आजही ही जळतांना दिसत आहे . अष्टमीच्या दिवशी दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह ह् महाराष्ट्रभरातून व देशातील कानाकोपऱ्यातील भाविक प्रसादासाठी याठिकाणी येतात हे त्यावेळी या आमदारांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले व खऱ्या अर्थाने निधी येण्यास सुरुवात झाली आतापर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून साईबाबा मंदिराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागला महाप्रसादासाठी व भाविकांसाठी थांबण्यासाठी आणि सभामंडपाचे काम तसेच बामनोद ते वनोली कोसगाव पाडळसा हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नव्हे तर मोर नदीच्या फुलांवर नदीला पूर आल्यामुळे भाविकांना येता येत नव्हते म्हणून कोसगाव वनोली येथे नद्यांमध्ये पूल बांधण्यात आले याठिकाणी पूर्वी गावांमध्ये हे महाप्रसादासाठी खूप गर्दी व्हायची त्यामुळे गावाच्या बाहेर जो विकास झालेला आहे तो युतीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने झालेला दिसतो भोजन कक्षासाठी टेकड्यांचे सपाटीकरण ,भक्तनिवास, चौफेर कंपाऊंड संरक्षण भिंत यासाठी करोडो रुपयांचा निधी खऱ्या अर्थानं यावल कृपा माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला . जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रीशेड साठी जिल्हा नियोजन मधून अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याबाबत तशी घोषणा ते करणार आहेत . याठिकाणी राजकारणविरहित काम चालतं सर्व गाव एकोप्याने अंगी कारतात सर्वपक्षीय कार्यकर्ते परिसरातील या ठिकाणी येतात व दानही देतात परमेश्वराच्या आराधनेने आपली मनोकामना पूर्ण होते अशी आख्यायिका आहे .
घटस्थापनेच्या दिवशी विधीवत पूजा करून घटस्थापनेपासून येथील परिसरातील नागरीक कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वतःला वाहून घेतात अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच आश्‍विन शुद्ध अष्टमी यावर्षी दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ गुरुवार रोजी येत असल्याने महापूजा करण्यात येणार आहे व covid-19 चे संकट लक्षात घेता यावर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी रात्री १५ आक्टोबर २o२१रोजी शुक्रवारी सकाळी देवकाठी नऊ वाजता संध्याकाळी १२ गाड्या ओढल्या जातील अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी वाजत गाजत भगत जुन्या साईबाबा मंदिरावर जातो तिथून आल्यानंतर पूजा झाल्यावर रात्री आठ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो तो रात्री एक ते दोन वाजे पावेतो सुरू असतो या महाप्रसादाचा मध्ये भाविकांना पोटभर प्रसाद दिला जातो त्यात पोळी खिर गंगा फळाची भाजी व उडदाचे डाळीचे वडे हे वीस ते पंचवीस हजार भाविकांसाठी पुरेल एवढा प्रसाद या ठिकाणी केला जातो
या कार्यक्रमास भाविकांनी दर्शन शिस्तीने रांगेत covid-19 चे काटेकोर नियम पाळून घ्यावे आणि संस्थांतर्फे यावेळी सॅनिटायझर वगैरे याचा वापर करण्यात येणार आहे भाविकांनी महाप्रसाद या वर्षी रद्द असल्यामुळे रात्री कोणीही गर्दी करू नये या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा मंदिराचे ट्रस्टी हिरालाल व्‍यंकट चौधरी व या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थ यांनी केले आहे

यावल नगर परिषदच्या नव्याने उभारण्यात आलेल्या साठवण तलाव भ्रष्टाचाराची संपुर्ण चौकशी होत नाही तो पर्यंत बांधकाम करू नये : भाजपाची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर परिषदच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या नविन साठवण तलावात लाखो रुपयांचा गैरव्यहार व भ्रष्ठाचार करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचे कडे दिनांक ३o/९/२०२१ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तक्रार करण्यात आली असुन त्याची संपूर्ण चौकशी होत नाही तो पर्यंत जुन्या व नव्या साठवण तलावाचे कोणतीही दुरुस्ती कामे व नवे काम करू नये बाबतची लिखित निवेदन आज यावल मुख्यधिकारी यांच्याकडे भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे .
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या माहीतीनुसार दिनांक ३०/०९/२०२१ रोजी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत, यांच्यासह ना .एकनाथ शिंदे , ( नगरविकास मंत्री ) महाराष्ट्र राज्य, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,
राज्याच्या विधान परिषदचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य प्रवीण दरेकर व महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री . तथा जिल्ह्यचे पालकमंत्री, ना.गुलाबराव पाटील, माजी जलसंपदामंत्री व आमदार गिरीश महाजन , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व आमदार सुरेश भोळे (राजू
मामा) यांचे कडे पक्षाच्या माध्यमातुन यावल नगर परिषदच्या साठवण तलावाच्या उभारणीत भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे .तरी सदर भ्रष्टाचार बाबत केलेल्या
तक्रारीचा वरिष्ठ पातळीवरती चौकशी होऊन योग्य ते निर्णय लागत नाही तो पर्यंत जुना साठवण तलाव व नवीन
साठवण तलावाचे कोणतेही प्रकारे डागडुगी दुरुस्ती किंवा नवीन प्रकारचे कोणतेही बांधकाम अथवा भराव करण्यात येऊ नये तसे झाल्यास यास नगर परिषदचे प्रशासन म्हणून आपण स्वतः मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी हे सर्वस्व जबाबदार
राहतील असे दिलेल्या लिखित तक्रार निवेदनात म्हटले असुन , यावेळी नगर परिषदेला देण्यात आलेल्या निवेदना प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , नगरसेवक तथा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉ . कुंदन फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे व अन्य पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते .

नागझरी गेटजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला, शेगांव शहर पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

0

 

अर्जुन कराळे शेगांव प्रतिनिधि

शेगाव: एका अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ट्रॅकमेंन नंदन मनोहर शेगोकार वय २४ वर्षे यांनी त्यांच्या सुपरवायजर राजेश मीना यांना सांगितल्यानुसार त्यांनी शेगांव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

फिर्यादीनुसार पोल नंबर ५५१ (२-४) डाऊन लाइन नागझरी गेट जवळील नालीमध्ये एक अनोळखी महिला मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता सुमारास पडलेली दिसून आली आणि त्या महिलेची कवटी फुटलेली आहे. सदर मृतावस्थेतील महिलेच्या अंगात ग्रे रंगाचे फूल बायाचे शर्ट त्याखाली जांभळे हाफ बायांचे टॉप त्याखाली पिवळ्या रंगाचे लॅगिन, उजव्याहाताच्या मधल्या बोटात पांढऱ्या धातूची अंगठी त्यावर आकाशी रंगाचा खडा, उंची अंदाजे ५ फुट ४ इंच, रंग गोरा, केस काळे अशा वर्णनाची महिला पडलेली आहे. अशा वर्णनावरून ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे.  शहर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले हे करीत आहेत.

चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0

 

घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला,

घुग्घुस येथील अनेक युवकांनी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांचे घुग्घुस शहरात आगमन होताच येथील राजीव रतन चौकात फटाक्यांची अतिशबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
घुग्घुस येथील काँग्रेसचे नेते शेखर तंगलापेल्ली यांच्या शिवा रेस्टॉरंटला चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी चंद्रपूर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शोभाताई ठाकरे, घुग्घुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी ,घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, शेखर तंगलापेल्ली, चंद्रपुर युवक कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सूरज कन्नूर, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तौफिक शेख, कामगार नेता सय्यद अनवर, तिरूपति महाकाली, गणेश उईके, अनिरुद्ध आवळे, कल्याण सोदारी, अजय उपाध्ये, पवन नागपुरे, निरंजन ढबारे, विजय माटला, शिवा तंगलापेल्ली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
युवक काँग्रेसचे नेते सिनु गुडला यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. घुग्घुस येथील सदानंद कलवेनी, तिरुपती गोडगू, मनोज चिकाटे, अजित गेडकर, संपत सेवनतुला, राजेश मल्लारप, सचिन दुर्वे, यशवंत तक्कला, अंजय्या इरगुराला, रवी सिंदोला, अशोक जंगम, निरंजन कोरकंटी, वृषभ नलभोगा, संजय कोटा, रंगनाथ शेट्टी, प्रेम गणगोनी, संकेत पाटील, गणेश कोटगीलवार, शंकर अटकापुरम, दिनू वर्मा, मुरलीकृष्ण गुडला, माणिकचंद तग्रपवार, सुभाष अरेल्ली, मन्नू शर्मा, ज्योती टूस्से, विजया गुडला, महेश्वरी शेट्टी, स्वरूपा भुसावेणी अश्या अनेक युवकांनी व महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांनी त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात स्वागत केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

डाॕ.आत्मारामजी मोहन जवादे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्राचे उद्घाटन संपन्न

0

 

 

हिँगणघाट
डाॕ.बी.आरआंबेडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष डाॕ. आत्माराम मोहनजी जवादे यांच्या नव्वदाव्या जंयती निमित्ताने डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयात डाॕ.आत्माराम मोहनजी जवादे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन संस्थेचे सचीव अनिलभाऊ जवादे यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रशांतभाऊ जवादे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांची उपस्थिती होती . उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम आपले ध्येय ठरवूनच मार्गक्रमण केले पाहिजे.आपला सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे आपली झोप.म्हणून झोप कमी करा आणि भरपूर वाचन करा.यशस्वी लोकांचे विचार एका.उद्या काय करायचे ते आजच ठरवून ते वेळीच पूर्ण करा.अपयशाने खचून जाऊ नका.
सकारात्मक विचार करून नकारात्मकतेला तिलांजली द्या.हाच खरा यशाचा मुलमंत्र आहे असे विचार व्यक्त करून अनेक यशस्वी व्यक्तीँचे उदाहरणे विद्यार्थ्यांना दिले. संस्था सचीव अनिल जवादे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा आहे.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावता येत नाही.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही .अशा विद्यार्थ्यांच्या योग्य मार्गदर्शनाची सोय व्हावी यासाठी डाॕ.आत्मारामजी मोहन जवादे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली असे ते म्हणाले.या मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षांविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मोफत मिळणार असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्या़ंनी विद्यार्थ्यांना यावेळी केले. प्राचार्य एस.एम.राऊत,संस्था सहसचीव अनुराधा जवादे ,संस्था कोषाध्यक्ष श्री.जी.एस.भगत , संचालक श्री.बी.एस.पाटील ,मुख्याध्यापकदिलीप देवतळे यांनीही आपल्या छोटेखानी भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतभाऊ जवादे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.यावेळी विचारमंचावर
संस्थेच्या उपाध्यक्षा मंदाकिनी जवादे,संस्थेचे संचालक चंद्रकांत नगराळे,जूही जवादे,पराग जवादे,अपुर्वा जवादे,प्रीयंका जवादे ,प्रायमरीचे मुख्याध्यापक दिलीप देवतळे ,उपप्राचार्य एच.पी.गुडदे यांची उपस्थिती होती.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमाने आपले करीअर करू पाहणाऱ्या गौरी वाडकर या युवतीनेही आपले विचार व्यक्त केले.संस्था संचालक डाॕ.चंद्रकांत नगराळे यांनी डाॕ.आत्मारमोहनजी जवादे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे संचालन गजानन भोँग यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत भटकर यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

कासारसिरसी येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक 2021संदर्भात बैठक संपन्न

0

 

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होत असलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या निलंगा सोसायटी मतदार संघातील उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा विद्यमान संचालक मा.अशोकराव पाटील निलंगेकर हे कासारसिरसी विभागात मतदारांशी व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय व निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन केले.या बैठकीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कासारसिरसी सोसायटीचे चेंअरमन श्री.शिवकुमार चिंचनसुरे हे होते.प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सभापती हालप्पा कोकणे, माधवराव पौळ, नागनाथ पाटील,राजकुमार चिंचनसुरे,प्रदीप नेलवाडे,प्रा.दयानंद चोपणे भीमराव पाटील,माधवराव सर्जे,शरणप्पा मुळे,कुमारे, गोविंदराव पाटील मदनसुरीकर,सर्व मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्तीत होते.

हिंगणघाटची आई

0

 

आई दुर्गा उत्सव, राम मंदिर वार्ड, हिंगणघाट या ठिकाणी राम मंदिर वार्ड येथे राहणारे गोलुभाऊ चव्हाण व त्यांचे मित्रमंडळ अक्षयभाऊ निकम, पिंटूभाऊ चव्हाण, अमन जाजू, प्रतीक ढबाले, तिलक जाजू, अभये दुबे, खुशाल सरकार, धर्मा जोशी, शाहिद शेख व इतर यांनी सर्वांनी दुर्गा मातेची अप्रतिम व खूप सुंदर मातेची प्रतिमा विराजमान केलेली आहे, तर सर्वांनी हिंगणघाटची आई चे दर्शनकरिता नक्की जावे.

अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. 9 दिवसांपर्यंत चालणाऱ्या नवरात्रोत्सवाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात. नवरात्रोत्सवात दुर्गा मातेला नऊ दिवसांमध्ये वेगवेगळी फूलं आणि भोग अर्पण केले जातात. जे दुर्गामातेला खूपच प्रिय आणि शुभ असतात. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळे रंग भोग आणि फूलांचा प्रयोग करुन दुर्गा मातेला प्रसन्न केले जाऊ शकते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

प्रभारी ग्रामसेवकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा-सरपंच व गावकऱ्यांची मागणी..

0

 

शेगाव: पंचायत समिती शेगाव अंतर्गत येणाऱ्या जवळा बुद्रुक येथील प्रभारी ग्रामसेवक एस एम दुबे यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा अशा मागणीचे निवेदन जवळा बुद्रुक ग्रामपंचायत चे सरपंच ग्रा.पं सदस्य व गावकऱ्यांनी शेगाव पंचायत समितीचे बिडिओ यांना देण्यात आले आहे. शेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रभारी ग्रामसेवक दुबे यांनी पंधराव्या वित्त आयोगातून सहा लाख रुपये परस्पर आरो प्लांट करिता देयक अदा केले. याच प्रमाणे ग्राम सभेची परवानगी न घेता खोटे कागदपत्र सादर करून ग्रामसेवक दुबे यांनी सरपंच व इतरांच्या खोट्या सह्या करून पंधराव्या वित्त आयोग विकास आराखड्यातून आरो प्लांट मशीन ची बिले काढली व फसवणूक केली .. आरो मशीन मागील तीन महिन्यापासून आणलेली असून ती निकृष्ट दर्जाची असल्याचाही आरोप या निवेदनात करण्यात आला आहे याप्रकरणी गंभीर दखल घेऊन ग्रामसेवक एस एम दुबे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर सरपंच करूणा सावदेकर, उपसरपंच मनीषा भटकर ग्रामपंचायत सदस्य गोपाल कानेरकर यांच्यासह गावकर यांच्या सह्या आहेत..
-आरो प्लांट साहित्य पुरवठा याचाच फक्त ठेका दिलेला होता साहित्य पुरवठा केल्याने नियमानुसार देयक अदा केले-ग्रामसेवक दुबे.
जवळा बुद्रुक ग्रामपंचायत चे प्रभारी ग्रामसेवक एस एम दुबे यांना त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले की मी कोणत्याही प्रकारे प्रकार केलेला नाही जवळा बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या ठरावानुसार केवळ आरो प्लांट चे साहित्य पुरवठा करण्याचा ठेका दिलेला होता सदर ठेकेदाराने सर्व साहित्य पुरवठा केलेला असून नियमानुसार व ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच यांच्या सही शिक्का निशी संबंधित ठेकेदाराची चे बिल अदा करण्यात आले. गावातील राजकारणामध्ये मला पडायचे नाही त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले

महाविकास आघाडीकडुन पुकारण्यात आलेल्या बंदला नांदगावमध्ये समिश्र प्रतिसाद

0

 

निलेश पगारे ( प्रतिनिधी नांदगाव तालुका)

नांदगाव दिनांक 11 ऑक्टोबर नांदगाव तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला
उत्तर प्रदेशमधील लखिंमपुर खेरी या गावी शेतकऱ्यांचे लोकशाही व सनदशील मार्गाने चालू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या अंगावर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या मुलाने आपली मोटर गाडी घालून चिरडण्याचा जो प्रकार घडवला त्यात निष्पाप शेतकरी मारले गेले त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील आघाडी सरकारने महाराष्ट्रात कडकडीत बंद पाळला त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील तीन्ही घटक पक्षाने एकत्र येऊन नांदगाव शहरासह ग्रामीण भागात कडक बंद पाळण्याचे आव्हान केले त्यास सर्व व्यापारी वर्गाने व जनतेने दिलखुलास पणे प्रतिसाद दिला आहे
नांदगाव शहरात बंद पाळण्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष किरण देवरे,भारतीय काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष समाधान पाटील,नगराध्यक्ष राजेश कवडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार राष्ट्रवादीचे शहर प्रमुख बाळकाका कलंत्री, संतोष अण्णा गुप्ता, बाळासाहेब देहाडराय,चेतन पाटील,राष्ट्रवादी नगरसेवक वाल्मीक टिळेकर ,जेष्ठ नागरिक सेल ता.अध्यक्ष पंडीत दादा सुर्यवंशी, सुनील जाधव, राजेंद्र लाठे,सागर आहेर,महेंद्र गायकवाड मुजम्मील शेख, भैय्या आहेर,मिलींद पवार, डॉ. प्रभाकर पवार, पवन खैरनार, प्रशांत शिंदे, आदींसह कार्यकर्त्यांनी शहरात फेरी काढुन बंदचे आव्हान केले.

यावल येथे महाविकास आघाडीच्या लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

येथे आज सोमवार रोजी राज्यातील महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी विरोधी केन्द्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या हाकेला व्यापारी व व्यसायीकांच्या वतीने समिश्न असा प्रतिसाद मिळाला आहे महाविकास आघाडीच्या वतीने दि. ११ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सरकार च्या मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून र्निदयीपणे मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चिड आणनारे आहे. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश असतांना या देशांमध्ये आपलेच शेतकरी गेली अनेक महिन्यापासुन केन्द्र शासनाने मंजुर केलेल्या काळया कायद्याच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करूण लोकशाही मार्गाने आपले म्हणने सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असतांना वेळो वेळी हे आंदोलन भारतीय जनता पक्षाचे केन्द्रातील सरकार च्या माध्यमातुन दाबण्याचा व आंदोलनास भरकटविनयाचा प्रयत्न करण्यात येत आहे.पंरतु या मध्ये भारतीय जनता पक्षाला पुर्णत:यश आलेले नाहीत.शेतकरी आंदोलन साम,दाम, दंड, भेद, वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आता भाजपा सरकारने चालविला आहे.अशा वेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाणे गरजेचे असून या निर्देयी कृतयााचा निषेध म्हणून दि. ११ ऑक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात याकरिता महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,व शिवसेना, यांच्या तर्फे बंदचे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे
गटनेता जिल्हा परिषद जळगांव तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस प्रा.मुकेश येवले सर(नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ),रविन्द्र सोनवणे तालुका प्रमुख शिवसेना , पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , कृउबाचे माजी संचालक दिनकर पाटील , रIष्ट्रवादीचे अॅड देवकांत पाटील, बोदडे नाना, हितेश गजरे , राहुल चौधरी , भैय्या पाटील , अॅड निवृत्ती पाटील , निवृत्ती धांडे , अय्युब रवान , नानासिंग बारेला, प्रमोद पाटील , डॉ . हेमंत येवले , गनी भाई , कामराज घारू, व्दारका पाटील , श्यामल भावसार , नरेन्द्र शिंदे , अ .करीम मन्यार, काँग्रेसच्या वतीने भगतसिंग पाटील , कदीर खान , हाजी गफ्फार शाह, अनिल जंजाळे , नईम शेख , विवेक सोनार , बशीर तडवी , विनोद पाटील , अमोल भिरूड , चंद्रकलाताई इंगळे, पुंडलीक बारी , हाजी अय्याज खान, सद्दाम शाह यांनी तर शिवसेनेच्या वतीने सेनेचे शहरमुख जगदीश कवडीवाले, सुनिल बारी , माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , संतोष खर्चे , पप्पु जोशी, अजहर खाटीक यांच्यासह महाविकास आघाडीतील आदी पदधीकाऱ्यानी यात सहभाग घेतता . यावेळी यावल शहरातुन महा विकास आघाडीने पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदच्या हाकेला तालुक्यातुन समिश्र प्रतिसाद मिळाला .