Home Blog Page 415

तळागाळातील लोककलावंताच्या समस्या शासनदरबारी पोहचवून कलावंताना न्याय मिळवून देण्यास बांधील रहाणार ! – अॅड किरणराव सरनाईक .

0

 

” तळागाळातील लोककलावंताच्या समस्या शासन दरबारी पोहचवून कलावंताना न्याय मिळवून देण्यास बांधील रहाणार ! ” असे स्पष्ट व परखड आश्वासन लोककलावंत मेळाव्यात आपल्या उद्घाटनपर संभाषणातून बोलतांना, अमरावती विभागीय शिक्षक आमदार, अॅड . किरणराव सरनाईक यांनी दिले . . . . याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि.01 सप्टेंबर रोजी, स्थानिक श्री कामाक्षा माता मंदिर सभागृह, कारंजा . येथे अखिल भारतिय मराठी नाटय परिषद नियामक मंडळ मुंबईचे लोकनियुक्त सदस्य : नंदकिशोर कव्हळकर, कार्यक्रमाचे उदघाटक : अमरावती शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अॅड . किरणराव सरनाईक, मार्गदर्शक : संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष : हभप . श्रीकृष्ण महाराज राऊत, तरुण क्रांती मंच वाशिम जिल्हाध्यक्ष : पत्रकार निलेश सोमाणी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, गणेशराव बाबरे, जि प समाज कल्याण माजी सभापती, जयकिसनभाऊ राठोड, माजी नगराध्यक्ष : दत्तराजजी डहाके, अखिल भारतिय नाटय परिषद शाखा कारंजाच्या अध्यक्षा : सौ सुधाताई चवरे, स्वागताध्यक्ष : विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष : संजय कडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा साप्ताहिक करंजमहात्म्यच्या वतीने . भजनी लोककलावंताचा भव्य मेळावा घेण्यात आला . यावेळी सर्वप्रथम, कारंजेकरांची आद्यशक्ती श्री कामक्षा मातेचे पूजन शिक्षक आमदार अॅड .किरणराव सरनाईक यांनी केले तसेच क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उद्‌घाटन केले . त्यानंतर कार्यक्रमाचे उद्‌घाटक नव निर्वाचित शिक्षक आमदार अॅड . किरणराव सरनाईक यांचे कारंजा येथे प्रथम आगमनानिमित्त त्यांना कारंजेकरांचे आराध्य दैवत श्री नृसिह सरस्वती स्वामी ची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला . याप्रसंगी पंचक्रोशीतील भजनी मंडळानी व लोककलावंतानी सहभाग घेतला . यावेळी वडगाव इजारा येथील बंजारा महिला मंडळ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले . कार्यक्रमाचे आयोजन व संचालन स्वागताध्यक्ष संजय कडोळे यांनी केले . कार्यक्रमाला पांडूरंगजी माने, मोहित जोहरापूरकर, ओंकार मलवळकर ,विजय पाटील खंडार, डॉ . कुंदन श्यामसुंदर, देविदास नांदेकर, ज्ञानेश्वर खंडारे, रोहित महाजन, उमेश अनासाने, हिम्मत मोहकर, सुनिल गुंठेवार यांचे सहकार्य लाभले . संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात लोककलावंतानी आपल्या विविध लोककला सादर केल्या .समारोपाचा कार्यक्रम संत नागाबाबा संस्थान मनभा चे अध्यक्ष : व्यंकटराव कावरे यांचे अध्यक्षतेखाली भजनीमंडळी व लोककलावंताना सन्मानपत्र देऊन करण्यात आला .आभार प्रदर्शन उदय कव्हळकर, सूरज कव्हळकर यांनी केले .

ट्रॅक्टर टॉली चोरणारे आरोपी गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलीस यांचे ताब्यात

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

दिनांक २६/८/२०२१रोजी पोलीस स्टेशन लोणी हद्दीतील एक ट्रॅक्टर टॉली अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास चोरुन नेल्याची पोलीस स्टेशन लोणी येथे अपराध क्रमांक १८६/२१ कलम३७९ भांदवि चार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण करित असताना दिनांक ३१/८/२०२१रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शेख तस्लिम यांचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की चोरीस गेलेला ट्रॅक्टर हा मंगरूळ चव्हाळा येथे
राहणारा सलीम अ मज्जीद याने त्याच्या साथीदारासह चोरलेला असुन त्याने सदर ट्रॅक्टर
ओळखु न यावा याकरिता
ट्रॉलीचा रंग बदलवून तो भागचंद नगर धामणगाव रेल्वे येथे खुल्या जागेमध्ये उभा केला आहे अश्या मिळालेल्या खात्रीलायक माहिती वरुन मंगरुळ चव्हाळा येथे जाऊन सलीम अ मज्जीद याला शिताफीने ताब्यात घेऊन त्यास विचार पुस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले त्यास कौशल्यपुर्वक सखोल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने
त्यांचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेला ट्रॅक्टर व ट्राली किंमत अंदाजे २८५०००रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीसह पुढील कार्यवाही साठी कामी पोलीस स्टेशन लोणी यांचे ताब्यात देण्यात आले पुढील तपास ठाणेदार लोणी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री हरी बालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्री शाम घुगे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुळवंत ठाणेदार लोणी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तस्लिम शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर नापोका चंद्रशेखर खंडारे नापोकाॅ बळवंत दाभणे मंगेश तायडे नापोकाॅ उमेश वाकपाजंर सायबर सेल चे नापोकाॅ रितेश वानखडे महिला पोलिस कॉन्स्टेबल सरीता चौधरी चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन कळमकर लोणी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर सगने नापोकाॅ उमेश धंदर वाजीद शेख चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम यांनी हि कार्यवाही केली.

हिंगणघाट डीबी पथकाच्या कारवाईत 2 चोरीचे गुन्हे उघड व चोरांना अटक 106000 रुपयाचा माल जप्त

0

 

27 ऑगस्ट रोजी रात्री च्या दरम्यान दाभा गावाजवळील बंधार्‍यावरून बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट व दिनांक 30 ऑगस्ट पहाटे कुणावार कॉलनी शेवाळकर लेआऊट हिंगणघाट येथून सेंट्रींग प्लेट चोरी गेल्या बाबत पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे 1) अ.क्र 758 /2021 कलम 379 भादवी
2 )अ.क्रम759 /2021 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल केला.
सदर माहितीची पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो. हवा. शेखर डोंगरे यांचे डीबी पथकाला पो.नि. संपत चव्हाण यांनी माहिती देऊन रवाना केले सदरची माहिती मिळताच लगेच पोलीस हवालदार शेखर डोंगरे यांचे पथक हिंगणघाट परिसरात रवाना होऊन आरोपी व चोरीच्या मालाचा शोध घेत असतात त्यांच्या पथकांनी आपल्या नेटवर्क चा फायदा घेत सदर गुन्ह्यातील आरोपी 1) निलेश शंकरराव कुरील वय 29 वर्ष
2) नदीम नियाज मल्लस वय 30 वर्ष  3)गणेश बापूराव गुंजेकार वय 33 वर्ष
सर्व राहणार हिंगणघाट यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करून त्यांच्याकडून 2 गुन्ह्यात चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 106000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्यात आरोपीवर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे यापूर्वी गुन्हे दाखल असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत सदरची कामगिरी मा.श्री प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा मा.श्री यशवंत सोळंके अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा मा.श्री दिनेश कदम उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट ,पोलीस निरीक्षक श्री संपत चव्हाण पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे पो.हवा शेखर डोंगरे, नापोशी निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, समीर कामडी ,भूषण भोयर सचिन भारशंकर यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहराचा वाढता विस्तार पाहता नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याची  प्रहारची गृहमंत्र्यांकडे मागणी !

0

 

हिंगणघाट मागील काही वर्षात हिंगणघाट शहराचा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या दृष्टीने विस्तार झालेला आहे.त्याचप्रमाणे छोट्या छोट्या उद्योगाच्या वाढीने विविध प्रांतातून येणाऱ्या कामगारांच्या संख्येतही मोठया प्रमाणावर वाढ झालेली आहे.त्यामुळे व अन्य कारणाने गुन्हेगारीतही मागील काही वर्षात प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे.परंतु शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा मात्र आहे तेवढीच मागील 50 वर्षांपासून कार्यरत आहे,त्यामुळे या भागात दुसरे पोलीस स्टेशनची त्वरित निर्मिती करावी अशी मागणी प्रहारचे पूर्व विदर्भ विभाग प्रमुख रुग्णमित्र- गजु कुबडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचेकडे एका निवेदनातून केलेली आहे.
निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार,सद्य स्थितीत हिंगणघाट पोलीस ठाण्यात केवळ 135 कर्मचारी कार्यरत आहेत.शहराची लोकसंख्या ही लाखाच्या घरात गेलेली असून मागील काही वर्षात शहराच्या सीमारेषेतही बरीच मोठी वाढ झालेली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सद्यस्थितीत या पोलीस यंत्रणेवर शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा मोठा भार पडत आहे.त्यामुळे या ठिकाणी अजून एक वेगळे पोलीस स्टेशन ग्रामीण भागासाठी देण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे.
श्री कुबडे आपल्या निवेदनात पुढे म्हणतात की, मागील काही दिवसात सतत चोरी,घरफोडी,हत्त्या, हाणामारीच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अपुऱ्या पोलीस बळामुळे या गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे पोलिसांना दिवसेंदिवस अशक्यप्राNय होत आहे.त्यामुळे आपण या भागात दुसरे नवीन पोलीस स्टेशनला मान्यता द्यावी अशी मागणी प्रहारचे रुग्णमित्र- गजु कुबडे यांनी गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनेतून केलेली आहे.
सदर गृहमंत्री यांच्या नावाने लिहिलेले निवेदन आज दि 31 आगस्टला तहसीलदार श्रीराम मुंदडा याना देण्यात आले.या वेळी तालुका प्रमुख जगदीश तेलहांडे,माजी शहर प्रमुख अजय लढि,समुद्रपूर तालुका प्रमुख प्रमोद मैस्कार,सुरज कुबडे,अमित गोजे,मोहन पेरकुंडे,राजेश लाखाणी,अंकुश वाघमारे,राजरतन मानकर,चेतन काळे,विजय पडोळे,राजेश तांदूळकर,तबरेज पठाण,भूषण कुंभारे,संतोष जोशी,गोलू उजवणे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पार्क असे नामकरण प्रहार करणार !

0

 

हिंगणघाट :- शहरातील शिवाजी पार्कचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अस करण्याचा निर्णय प्रहार या संस्थेने घेतलेला असून याबाबत लवकरच नामंतरण फलक या उद्यान परिसरात लावण्यात येणार असल्याची माहिती प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख श्री गजानन कुबडे यांनी एका निवेदनातून दिलेली आहे.
निवेदनातून दिलेल्या वृत्तानुसार, शहरात मागील अनेक वर्षा पासून शिवाजी पार्क या नावाने उद्यान आहे.परंतु सदर पार्कचा हा एकेरी उल्लेख हा युगपुरुष छत्रपती शिवराय यांचा अपमान असून तो आम्ही यापुढे कधीही खपवून घेणार नाही.नप प्रशासनाने तीन दिवसात हा महाराजांचा एकेरी उल्लेख टाळणारा मजकूर काढून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसर असा फलक न लावल्यास प्रहारच्या वतीने हा फलक लावण्यात येईल असा इशारा गजानन कुबडे यांनी दिलेला आहे यावेळी तालुका प्रमुख जगदीश तेलहांडे,माजी शहर प्रमुख अजय लढि, समुद्रपूर तालुका प्रमुख प्रमोद मैस्कार,मोहन पेरकुंडे,अमित गोजे,सुरज कुबडे, अंकुश वाघमारे,राजेश लाखाणी,सतीश गलांडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

लाभार्थ्याचे शौचालय बांधकामाचे अनुदानाच्या पैशात भ्रष्टाचार कामागार नेते डाॅ उमेश वावरे यांनी केली चौकशीची मागणी

0

स्वच्छ महाराष्ट्र अभीयान अंतर्गत शौचालय बांधकामकरीता लाभार्थी विशाल सत्यपाल थुल रा. विर भगत सिंग वार्ड रहवाशी असुन मार्च 2018 मध्ये अर्ज केला असता.
जवळ जवळ 1 वर्ष हेलपाटा खाल्या नंतर संबंधित अधिकारी यांनी सागितले की अनुदानाची रक्कम खात्यावर ( युनियन बॅक आॅफ इंडिया) खाते क्र 671802010000704 जमा झाले . परंतु बॅक चौकशी केल्यावर ते अनुदान खात्यावर जमा झाले नाही .ही बाब लक्षात येता शौचालय बांधकाम कार्यालय याठिकाणी सांगितल्यावर सुद्धा ,बॅक स्टेटमेन्ट आन आणले असता त्या खात्यावर पैसे जमा झाले नाही करीता हे पैसे कुठे गेले याचा शोध घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कादेशीर कार्यवाही करण्यात यावी या प्रकारचे किती अजून लाभार्थी आहे ? या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी कामगार नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्व मा. मुख्यधिकारी नगर परिषद हिंगणघाट याना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके .प्रदिप कोल्हे. जिवन उरकुडे . विशाल थु ल. राजू ढाले.किशोर जावरे.किशोर लढे.अभय धोगडे. हे उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

डान्स ओपन ड्रीम अकॅडमी कडून कृष्ण जन्माष्टमी च्या निमित्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा व बक्षीस वितरण

0

 

हिंगणघाट येथे निनावे कॉम्प्लेक्स येथे जन्माष्टमी निमत्त फॅन्सी ड्रेस प्रतियोगिता ठेवण्यात आली होती.
या मधे मुलांनी बाळ गोपाळ बनून डान्स करून आपली कला सादर केली. कार्यक्रम नंतर विजेत्यांना प्रमुख उपस्थिती व आयोजकांचा हातून पुरस्कार वितरण करण्यात आले.
डान्स ओपन ऐ ड्रीम अकॅडमी यांनी याचे आयोजन केले होते . या मधे कृष्ण बनायचे थीम कॉम्पिटिशन आयोजकांनी ठेवले होते. प्रतियोगिता चे
आयोजक. मैडम स्नेहा पाटील व मयुर मरस्कोल्हे कोरिओग्राफर कोरिओग्राफर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून
युवा पत्रकार मोहसिन खान , व माधवीताई नरड सखी मंच सदस्य., समाज सेवक राकेश शर्मा ,सुरेश गायकवाड़ उपस्तित होते.
कृष्णा फॅन्सी थीम कॉम्पिटिशन मध्ये प्रथम पुरस्कार विजेते शौर्य गायकवाड हे ठरले,द्वितीय पारितोषिक यशोधन पिंपळशेंडे, तृतीय पारितोषिक प्रद्युम्न लांजेवार, चौथे पारितोषिक श्रदेव मुंजेवार, पाचवे पारितोषिक राम पेटले यांना मिळाले .
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

वरुन पोलीस स्टेशनची मोठी कार्यवाही, जबरी चोरी प्रकरणात फरार‌ आरोपी गजाआड……

0

हंसराज उके अमरावती

अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिनांक २६/८/२०२१रोजी फिर्यादी दिलीप शंकर खेरडे वय ४६वर्षे राहणार वरुड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरुड पोलीस स्टेशन येथे फंट्या
उर्फ दिपक अशोकराव कावनपुरे वय २२ वर्षे रा कडुचे गोठान वरुड यांचेवर अपराध क्रमांक ४८२/२०२१कलम ३९२ ,५०६ भादंवि अनन्वे गुन्हा नोंद होता सदर गुन्ह्यातील आरोपी फंट्या उर्फ दिपक अशोकराव कावनपुरे हा घटनेच्या दिवसा पासून फरार होता
फंट्या उर्फ दिपक हा सराईत गुन्हेगार असुन त्याची वरुड शहरामध्ये दहशत होती स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग मोर्शी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर मिळाली की फंट्या उर्फ दिपक अशोकराव कावनपुरे हा बेनोडा बस स्टॅण्ड येथे पानटपरी वर उभा आहे अशा मिळालेल्या माहीती वरुन
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने व शिताफीने त्यास ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही वरुड पोलीस स्टेशन यांच्या स्वाधीन करण्यात आले
सदर कार्यवाही मा.ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी
एन , अप्पर पोलीस अधीक्षक श्री शाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर, अंमलदार दिपक उईके, दिपक सोनळेकर, युवराज मानमोठे,अमित वानखडे, स्वप्निल तवंर, निलेश डागोर यांनी सदर आरोपी ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमेवर गांजाची तस्करी ४२कीलो गांजा सह,दोन आरोपींना अटक

0

 

हंसराज उके अमरावती

अमरावती : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश अशा दोन राज्याच्या सीमेवर वसलेल्या धारणी तालुक्यातून अमली पदार्थ मोठ्या शहरापर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. अशातच गुरुवारी अमरावती-बऱ्हाणपूर या आंतरराज्यीय महामार्गावर धारणी पोलिसांच्या पथकाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवलं. त्यानंतर केलेल्या तपासणीत या तरुणांकडे ४२ किलोग्रॅम गांजा सापडला आहे.

अर्पित संजय मालवीय ( २५ ) रा. कवडाझिरी, सय्यद अली सय्यद हासम ( ३० ) रा. दुबई मोहल्ला धारणी अशी या अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुण हे अमली व मादक पदार्थांच्या तस्करीत असून त्यांच्या अटकेनंतर गांजा व्यवसायातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डिबी स्कॉड प्रमुख पीएसआय मंगेश भोयर, अमलदार चंद्रशेखर पाठक, आशिष मीटनकर, जगन तेलगोटे, राहुल रेवस्कर, वंदना तायडे यांच्यासह चालक संजय मिश्रा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, धारणी पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध एन. डी. पी. एस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पोलीस दप्तरी कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते हे करत आहेत.

किनगाव पाठोपाठ शेजारच्या आडगाव गावात ही आपल्या घरात एका तरुणाची गळफास घेवुन आत्महत्या

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील आडगाव येथे एका शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने आपल्या गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या संदर्भात पोलीसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक ३० ऑगस्ट रोजी आडगाव तालुका यावल येथील रहीवासी अजय उर्फ भिमा उत्तम इंधाटे वय२२ वर्ष या शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने त्याची आई गावाला गेली असता सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपल्या राहात्या घरातील छताच्या लोखंडी हेंगलला दोरी बांधुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत धनराज गोंविंद बागुल वय३०वर्ष राहणार कळमगाव तालुका चोपडा यांने पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , घटनेचा तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहे . मयत अजय इंधाटे याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिळके यांनी शवविच्छेदन केले . तरूणाच्या आत्महत्याचे कारण मात्र स्पष्ट होवु शकले नाहीत. दरम्यान आजच आडगावच्या शेजारचे गाव किनगाव येथे ही एका अविवाहीत तरूणाने आत्मह्त्या केल्याची घटना घडली असुन , परिसरात एकाच दिवसी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटने बाबत परिसरात ग्रामस्थ हळहळ व्यक्त करण्यात येत होती .