Home Blog Page 414

जामुनझिरा आदिवासी वस्तीवर अमृत आहार योजनेत वाटले अर्धवट बॉइल अंडे, आदीवासी नागरीकांची तक्रार.

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या आदिवासी वस्तीवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत वाटले अंडे हे
अर्धवट शिजवलेली असल्याची तक्रार नागरीकांनी केली व थेट अर्धवट कच्चे अंडे घेवुन त्यांनी यावल येथील महीला व बालविकास कार्यालय गाठत अर्धवट अंडी शिजवणाऱ्या सेविकेची लिखित तक्रार केली आहे.
येथील महीला व बालविकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत आदीवासी वस्तीवरील गरोदर मातांना शिजलेली अंडी अंगणवाडीच्या माध्यमातुन वितरण केली जातात तेव्हा यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या जामुनझिरा या आदीवासी वस्तीवर असलेल्या आंगणवाडी सेविकेने चक्क अर्धवट शिजलेले अर्थात अर्धवट बॉइल अंडे वितरण केले तेव्हा हा प्रकार नागरीकांच्या निदर्शनास येताच नागरीकांना अर्धवट बॉइल अंडी घेवुन थेट यावल येथील एकात्मिक महिला, बाल विकास कार्यालय गाठले व प्रकल्प अधिकारी यांना अंडी दाखवत सेविके विरूध्द तक्रार केली व अशा प्रकारे अर्धवट बॉइल केलेले अंडे वाटणाऱ्या सेविकेवर कारवाईची मागणी पोलिस पाटील हिरा पावरा, बिलारसिंग पावरा, भावसिंग पावरा, भाईराम पावरा, नरसिंग बारेला आदींनी केली आहे तेव्हा या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधीत आंगणवाडी सेविकेस नोटीस बजावण्यात आली असुन संर्दभात दोन दिवसात सदरील सेविके कडून लेखी खुलासा मांगवण्यात येईल यात ती दोषी आढळल्यास तिच्या विरूध्द कारवाई करण्यात येईल असे प्रसंगी महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी सांगीतले. दरम्यान सदरची पोषण आहार वितरण करणाऱ्या सेविके कडुन ही जबाबदारी काढुन घेण्यात यावे असे ही तक्रारकर्ते आदीवासी बांधव यांनी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याशी बोलतांना सांगीतले .

न्हावी ग्रामपंचायत भ्रष्ठाचार रुपी प्रश्नांची माहीती देण्यास प्रशासन टाळाटाळ माहीती न मिळाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन : भीमआर्मीचा इशारा

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या दलीत वस्ती सुधार योजने बोगस व निकृष्ठ कामे तसेच ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचारी कारभारातुन झालेल्या विविध विकास कामांची माहीती मिळावी या दृष्टीकोणातुन भिमआर्मीच्या वतीने मागील सात दिवसांपूर्वी म्हणजेच दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून निवेदन देण्यात आलेले होते, न्हावी तालुका यावल ग्रामपंचायतीला लाभलेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आजवर ६० लक्ष रुपयांच्या निधीतुन ग्रामस्तरावर यशवंत बोरोले यांच्या वाडयापासुन पवन मिस्त्री ( रोझोदा रोड ) यांच्या घरापर्यंत स्वच्छतेचा विचार करून वाढते घाणीचे साम्राज्य बघता ओतीव गटारीच्या झालेल्या कामांची माहीती तसेच महीला शौचालय , समाज मंदीर आदी कामांची सविस्तर माहिती तसेच ठरावीत झालेल्या कामांचे अंदाजपत्रक व आराखडा देऊन विविध प्रश्न घेऊन आम्ही आपल्या कडे निवेदन सादर केले परंतु सदर बाबी कडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ही सर्व जाणूनबुजून कानाडोळा करत आहे की असे आजवर दिसुन येत आहे . सदरची माहीतीची प्रशासन पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.
त्यामुळे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी व उपस्थित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट यांच्या वतीने न्हावी येथील ग्रामपंचायती समोर दि.१५ सप्टेंबर रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, याची प्रशासन स्तरावर आपण नोंद घ्यावी व तात्काळ मागणीची पूर्तता करण्यास कार्यवाही करावी अशी विनंती असे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . याप्रसंगी भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदाशिव, राज्यप्रवक्ता रमाकांत तायडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे, भीमआर्मीचे यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे , तालुका महासचिव प्रशांत तायडे, यावल येथील भीम आर्मीचे सदस्य मंथन महीरे, छोटू कोचुरे ,बाबु सुरवाडे आदी प्रमुख पदधीकारी व कार्यकर्त या प्रसंगी उपस्थित होते . दरम्यान न्हावी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवुन विकासकामे करण्यात आली असुन , माहीती प्राप्त झाल्यावर सत्य समोर येईल असा विश्वास भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदानशिव यांनी व्यक्त केले आहे .

फैजपूर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक अनिल महाजन एसीबीच्या जाळ्यात

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

दारूचा व्यवसाय नियमित सुरू ठेवावा यासाठी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक याला ५०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे दारू विक्रीचा व्यवसाय आहे. फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे दारू विक्रीचे दुकान आहे. दरम्यान दारू व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दर महिन्याला ५०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक अनिल महाजन यांनी तक्राराकडे केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागात जावून तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी ५०० रूपये घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

पोलीस स्टेशन अकोट शहर जिल्हा अकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 72 तासांच्या आत दरोड्याचे आरोपी केले गजाआड

0

 

दिनांक 31/8/ 2021रोजी बुधवार वेस अकोट येथे राहणारे अश्विन अमृतलाल सेजपाल वय 44 वर्ष हे त्यांचे कुटुंबासह खामगाव येथे त्यांच्या नातेवाईकांचे लग्न करता गेले असता त्यांच्या राहत्या घरी बुधवार वेस अकोट येथे त्यांचे वृद्ध आई-वडील एक मुलगी असे घरी हजर असताना दोन अनोळखी पुरुष व दोन महिला हे त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधून आपण कोरोना लस घेतलेली आहे का याबाबत विचारपूस करून आम्ही सर्वे करत आहोत असे सांगून फिर्यादीचे घरात जबरीने घुसून त्यांचे आई वडिलांचे व मुलीचे तोंडात कापसाचा बोळा घालून त्यांना मारहाण करून व त्यांचे हात-पाय बांधून घरातील नगदी 2700/- रुपये व एक मोबाईल किंमत अंदाजे 27000/- रुपये असा एकूण 29700/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे चार अनोळखी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 819/2021भादवि कलम 394,452, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक 3/9/ 2021 रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे *1)विठ्ठल नामदेव टवरे वय पन्नास वर्ष 2)सौ वैशाली विठ्ठल टवरे वय 45 वर्ष दोन्ही रा शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट, जिल्हा अकोला 3)संगम गणेशराव ठाकरे वय 32 वर्षे 4)सागर गणेशराव ठाकरे वय 30 वर्ष 5)अमृता संगम ठाकरे वय 25 वर्ष राहणार येवदा तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम रमुक्ताई संकुल, कबुतरी मैदान ,अकोट, जिल्हा अकोला 6)सीमा विजय निंबोकार वय 35 वर्षे राहणार नर्सिंग कॉलनी अकोट*
यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर साहेब आकोला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे अकोट शहर यांच्या नेतृत्वात डीबी स्कॉड चे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे पोहेका. उमेश सोळंके,उमेश पराये, राजेश वसे,सुलतान पठाण, गोपाल उघडते,गोपाल बुंदे, विजय चव्हाण, विजय सोळंके, दिलीप तायडे, वसीम शेख, अंकुश डोबाळे,विशाल दांदडे यांनी केली आहे*

खावटी अनुदान योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना खावटी किट वाटप

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधि

शेगाव तालुका अंतर्गत ग्राम श्री क्षेत्र नागझरी येथे चार गावांच्या लाभार्थ्यांना खावटी किट वाटप करण्यात आली.
जीवनाश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले यामध्ये श्री क्षेत्र नागझरी हिंगणा वैजनाथ ग्राम घुई उन्हाळखेड या गावातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळेस प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांचे अधिकारी बावणे साहेब व रोकडे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते तसेच गावचे सरपंच गणेश खरप उपसरपंच रमाताई सरदार संस्था तालुकाध्यक्ष संतोष पवार अंबादास पवार देविदास पवार महादेव डाबेराव आणि संस्थेचे सदस्य व समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते

संत विनायक भाऊ महाराज अनंतात विलीन

0

 

अर्जुन कराळे शेगाव

लासुरा फाट्यावर स्थित असलेल्या शांती आश्रम येथील संत विनायक महाराज यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले विनायक महाराज हे मूळचे संग्रामपूर तालुक्यातील उकळगाव मनाळीचे या गावचे रहिवासी आहेत महाराजांनी त्यांच्या जीवनात भरपूर सामाजिक व धार्मिक कार्यक्रम केले बरेचशा गावामध्ये मंदिराचे निर्माण केले आणि काही वर्षा पासून लासुरा फाटा येथील शांती आश्रमा मध्ये राहत होते
महाराजांच्या निधनामुळे त्यांच्या भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे
आज दुपारी शांती आश्रमाच्या प्रांगणात त्यांचा देह विसर्जनाचा कार्यक्रम ठेवला आहे

शहरातील एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत खावटी वाटप वितरण कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याची तक्रार यावल पंचायत समिती उपसभापती योगेश भंगाळे यांनी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांच्याकडे केली आहे.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

सविस्तर माहिती अशी की, रावेर आणि यावल तालुक्यातील आदीवासी क्षेत्रातील आदिवासी वस्ती, पाडयांवर मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी आदीवासी बांधवांना शासनाच्या वतीने मिळणारे खावटी कर्जवाटप करण्यात येते. मात्र खावटी वाटप कार्यक्रमात स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना एकात्मीक कार्यालयाच्या कुठलीही सुचना किंवा माहीती न देता कर्जवाटपाचे कार्यक्रम घेण्यात आला आहे. तसेच यावल पंचायत समितीच्या मागील मासिक सर्वसाधारण सभेत आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी हजर असतांना यावेळी पंचायत समितीच्या सन्मानिय सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती व सदस्यांनी त्यांना शासनाच्या नियमाविषयी जाणीव करून दिली व आपली नाराजी व्यक्त केली होत. दरम्यान उपसभापती योगेश दिलीप भंगाळे यांनी एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर आपली खंत व नाराजी व्यक्त केली आहे.

धावत्या टिप्परमधुन पडल्याने क्लीनर गंभीर जखमी झाल्याची घटना

0

 

2 सप्टेंबर समुद्रपूर चंद्रपूर-नागपूर रस्त्यावर गोविंदपुर शिवारात आज दि.२ रोजी सकाळी 7.30 वाजता घडली.
टिप्परचा क्लीनर जखमी संतोष जाचक गंभीररित्या जखमी झाला असून जाम महामार्ग पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेतुन समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात पोचविले.
.जखमी क्लीनर याची संतोष जाचक अशी ओळख असून तो हिंगणघाट येथील शास्त्री वार्ड,पुरपीडित कॉलनीतील रहिवासी आहे.
अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस घटनास्थळी पोचले असता
टिप्पर क्रमांक एमएच-३१ डीएस ०२ रोडच्या कडेला इंजिन चालू असलेल्या अवस्थेत दिसुन आला. जखमी क्लिनर संतोष हा टिप्पर मधून खाली पडल्याने गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता.तर टिप्परचालक रवी उईके हा वाहन जागीच सोडून पळून गेला.
सदरची कामगारी जाम महामार्ग पोलिस चौकी येथील कार्यरत सहायक पोलिस निरिक्षक स्नेहल राऊत , पो.हवा देवेंद्र पुरी पोना पंकज वैद्य , प्रदीप डोंगरे, गणेश पवार यांनी जखमीला समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहराची भाजयुमोची नवी कार्यकारिणी घोषित..

0

हिंगणघाट दि.२ सप्टेंबर
आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचे निर्देशानुसार शहर कार्यकारीणी घोषित करण्यात आली.
कार्यकारिणीचे घोषणेनंतर आमदार समिर कुणावार यांनी भाजयुमो शहर नवनियुक्त अध्यक्ष सोनु पांडे तसेच सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करीत त्यांना लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी, युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री अविनाशजी देव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वरूणजी पाठक ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नितीन मडावी, हिंगणघाट ग्रामीण तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे ,महिला भाजपा शहराध्यक्ष सौ. अनिता ताई माळवे, समाजसेवक सुनील डोंगरे, नगर परिषदेचे स्वास्थ सभापती सोनू गवळी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन सुभाषजी कुंटेवार यांनी केले तर भाजपा शहराध्यक्ष आशिष परबत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्थानिक आमदार जनसंपर्क कार्यालयात कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणी
सोनू पांडे (शहराध्यक्ष), गौरव तांबोळी (संघटन महामंत्री), स्वप्निल शर्मा (महामंत्री), अतुल नंदागवळी (महामंत्री), योगेश्वर जिकार (सोशल मिडीया प्रमुख), भुषन आष्टनकर (उपाध्यक्ष), मुकेश गुजराती (उपाध्यक्ष),
तुषार हवाईकर (उपाध्यक्ष), नितीन नांदे (उपाध्यक्ष), रितिक दांडेकर (सचिव),
निखील हिवंज (सचिव), अक्षय हारगोडे (सचिव), नीरज सैनी (सचिव), बाबू चौहान (सचिव), सुरज युवनाथे (संपर्क प्रमुख),
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

बोरगाव धांदे गाव हादरले”, एकाच दिवशी दोन माणसांचा संशयास्पद मृत्यू

0

 

धामणगाव तालुक्यात बोरगाव (धांदे) गावाला लागून असलेल्या वर्धा नदिच्या पात्रात आपटी शिवार हद्द पुलगाव वर्धा जिल्ह्यात येत असुन नदीच्या पाण्यावर तरंगत्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू आढळुन आले असुन मृत व्यक्तीचे नाव,नरेश हरिदास नैताम वय ३८च्या सुमारास व पंकज आनंदराव दंडागे वय २७ असे असुन दोन्ही इसम हे बोरगांव (धांदे) येथील असून.गावातील नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिस घटनास्थळी पोहचले. मृतदेह वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत होते मात्र काढता येत नसल्याने अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत येत असलेल्या बोरगांव धांदे गावातील वर्धा नदीच्या तीरावर काही नागरीकांच्या व मगरुळ दस्तगीर पोलीसचे ठाणेदार सुरज तलगोटे साहेब व टिमच्या मदतीने दोन्ही मृतदेह नदीच्या पात्रातून काढुन पुलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले व पीएम करिता ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे पाठविण्यात आले. हे करीत असतांना मृतांच्या नातेवाईकांच्या टाहो फुटला होता.कारण दोन्ही मृतदेह हे आदिवासी समाजाचे असल्याने कुटूंबातील लोकांचा व गावातील आदिवासी समाजातील लोकांच्या आक्रोशाला मगरुळ दस्तगीर पोलीसांना समोरे जावे लागले.पुलगाव पोलीस स्टेशन
येथे मृतांची नोंद झाली असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पुलगाव पोलिस घडलेल्या घटनेचा समोरील तपास करीत आहे.