Home Blog Page 417

पहुर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारल्यानंतर शेंदुर्णीस त्यांची ही पहिलीच व अनोखा भेट

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

पहुर पोलीस ठाण्यात नुकतेच हजर झालेले पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या अनोख्या अशा Talk With Morning Walk या उपक्रमाची सुरुवात आज शेंदुर्णी पासुन झाली असुन यात जनतेच्या समस्या समजावुन घ्यायच्या ,सर्वसामान्य माणसाची सुरक्षितता अबाधित ठेऊन पोलीस व जनता यांच्या मध्ये विश्वासाचे नातं अधिक दृढ व्हावे यासाठी हा अभिनव प्रयोग पो.नि.अरुण धनवडे हे सातत्याने राबवित असतात.
भल्या पहाटे आपल्या पोलीस स्टेशनच्या एका गावात एकट्यानेच पायी चालत जायचे,तेथे गेल्यानंतर जनतेच्या समस्या, अडचणी समजुन घ्यायच्या व तात्काळ त्यावर कायद्याच्या चौकटीत राहुन त्या समस्येवर मार्ग काढायचा असा पो.नि.अरुण धनवडे यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
आज पहुर ते शेंदुर्णी हे ११ कि.मी.अंतर पायी चालत जात ते पहाटे शेंदुर्णीत पोहचले ,पो.नि.अरुण धनवडे यांनी पहुर पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारल्यानंतर शेंदुर्णीस त्यांची ही पहिलीच व अनोखा भेट होती.यावेळी शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे भेट दिली. यावेळी शेंदुर्णीच्या पोलीस पाटील कु.ममता देविदास सुर्यवंशी यांनी व पोलीस बांधवांनी पो.नि.अरुण धनवडे यांचे स्वागत केले. यावेळी शेंदुर्णी पंचक्रोशीतील संवेदनशील गावांची माहिती घेत कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देत मार्गदर्शक सुचना केल्यात.
या अभिनव उपक्रमाचे सर्व स्थरातुन स्वागत होत असुन साहेब आपल्या गावात ही भावना सर्व सामान्य माणसाला अधिक भावनारी आहे.

माकपाच्या एल्गार सभेने राहुटी आंदोलनाची सांगता

0

 

प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांचे निवेदन न स्वीकारणाऱ्या मुख्यधिकारी यांचा केला निषेध

नांदगाव खंडेश्वर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी शहर कमिटी प्रधानमंत्री आवास योजना वापस लाभार्थी यांचे वतीने तीन दिवसीय राहुटी आंदोलनाची सांगता. एल्गार सभा घेऊन करण्यात आली. सभेला जिल्हा सचिव महादेव गारपवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सभेला तालुका सचिव श्याम शिंदे यांनी एल्गार सभेला संबोधित करताना. म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते तात्काळ मिळाले पाहिजे पण आवास योजनेची हप्ते घरात बसून मिळणार नाही. त्यासाठी जमिनीवरचा संघर्ष करावा लागेल. व त्याचे नेतृत्व लालबावटाच करेल. आणि येणाऱ्या पुढील काळात नगरपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पाई मार्च काढण्याचा एल्गार पुकारण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिल्या लाभार्थी यादीतील 110 लाभार्थ्यांचे घर बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनुदान वितरित केला, 400 लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर आहे. लाभार्थ्यांना अनुदान द्या, प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची लॉग इन साईड सुरु करा. वाढत्या मागणीनुसार 5 लाख रुपये घरकुल अनुदान द्या, राहुटी आंदोलनाचे नेतृत्व तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अब्दुल मोहसीन, प्रकाश मारोटकर, पुडलिक पुंड, गजानन मारोटकर, देविदास मारोटकर, विनोद गोलाईत, राजेंद्र शामसुंदर, यांनी केले, एलगार सभेला किसान सभेचे अध्यक्ष अनिल मारोटकर, तालुका सचिव दिलीप महल्ले, सुनील बावणे, राजू डोके, रामदास मते, ज्ञानेश्वर शिंदे, शहंशाह, आशिष रावेकर, काचन कटाने, लक्ष्मी सोळंके, अरुणा फुरसुगे, कातेश्वर पुंड, लक्ष्मण झिमटे, बबलू कठाने, राजेंद्र राऊत, दीपक अंबाडरे, रुस्तम भाई, बहादूरखान, वैद्य खा, शे युसूफ, कदीर भाई, बाबाराव वाघाडे, तसेच एल्गार सभेचे प्रास्ताविक राजगुरू शिंदे यांनी केले. व आंदोलनाची सांगता केली मुख्याधिकार्‍यांना राहुटी आंदोलकानी विनंती केली होती की शुक्रवारला सायंकाळी 5: वाजता निवेदन स्वीकारण्याकरीता यावे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नावे होते. त्यावर आवास योजनेच्या 150 लाभार्थ्यांचा सह्या घेऊन हे निवेदन संतत्त लाभार्थ्यांनी नगरपंचायतच्या गेटला चिटकवून निषेध केला. आंदोलकाचे निवेदन न स्वीकारणे ही लोकशाहीची चेष्टा आहे.
आमदार प्रताप अडसड यांनी साधला आंदोलकांशी फोनवरून संपर्क बोलताना म्हणाले की, राहुटी आंदोलनाची या विभागाचे आमदार असल्याने दखल घेतो. तुमाला शब्द देतो की. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रश्न त्वरित काली काली निकाली काढण्याचे फोनवरून बोलताना शब्द दिला. व खासदार साहेब याच्याशी संपर्क करून पाठपुरावा करण्यास सांगतो

जिगाव प्रकल्पास डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर नाव द्या करिता एक दिवसीय आंदोलन

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र

एक दिवसीय धरने आंदोलन जिगाव प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर हे नाव देण्यात यावे या मागनिकरीता आँल इंडिया पँथर सेना नांदुरा तालुकाचे वतिने आज दि.२७/८/२०२१रोजी एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले असून सर्व पदाधिकारी उपस्थित होते व युवा भीम सेना सामाजिक संघटना स.अधक्ष भाई वैभव वानखडे यांच्या कडुन आँल इंडिया पँथर सेनेला जाहीर पाठिंबा जिल्हा अधक्ष अशांत रनित यांच्या कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. युवा भिम सेना पदाधिकारी उपस्थित होते अमोल वाकोडे. राहुल रनीत. युवराज रनीत. आकाश धुंदाळे. शुभम तायडे इत्यादि कार्यकरते उपस्थित होते

पक्षकारांनी लोकअदालत मध्ये मध्यस्ती च्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करावे – न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे

0

 

प्रतिनिधी । यावल विकी वानखेडे

न्यायालयात दीर्घकाळ खटले चालवण्यापेक्षा लोक आदालत मध्ये मध्यस्थी करून आपसात तडजोड करीत तात्काळ प्रकरणांचा निपटारा केल्यास वादी व प्रतिवादी दोघांनाही समाधान मिळते व कोण हरलं कोण जिंकलं हे न होता दोघंच जिंकतात म्हणून अधिकाधिक प्रमाणावर पक्षकारांनी लोकअदालत मध्ये मध्यस्ती च्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी केले ते शुक्रवारी येथील न्यायालयामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
येथील न्यायालयामध्ये शुक्रवारी तालुका विधी सेवा समिती आणि स्थानिक वकील संघाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थानी प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एस. बनचरे होते तर शिबीराचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामध्ये न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की येत्या २५ सप्टेंबर रोजी यावल न्यायालयामध्ये लोकआदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी न्यायालयात न्याय प्रतीक्षेत दीर्घकाळ रेंगाळत असलेली प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला पाहिजे व मध्यस्ती च्या माध्यमातून तडजोड करीत समतोल निकाल लावून घेतला पाहिजे. कारण न्यायालयात खटला चालवतांना वादी किंवा प्रतिवादी यातील एक जिंकतो तर एकाचा पराभव होतो मात्र, जर तुम्ही मध्यस्ती च्या माध्यमातून तडजोड करीत प्रकरण निकाली काढले तर दोघांनाही विजय प्राप्त होतो. म्हणून ना कोई हारा, ना कोई जीता, दोघं जिंकले असा एक वेगळा समाधान असतो आणि आपल्याला न्याय निर्वाळा देखील मिळतो. तेव्हा पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. या कायदेविषयक शिबिरात न्यायधिश एम. एस.बनचरे सोबत सह दिवानी न्यायधिश व्ही.एस.डामरे, वकील संघाचे सचिव एड. निलेश मोरे, एड. एस. आर. लोंढे, एड. यु. सी. बडगुजर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी एस. एस. तडवी, ऍड. देवेंद्र बाविस्कर, सरकारी वकील फरीद शेख सह सर्व वकील संघाच्या सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. ए. आर. सुरडकर यांनी केले तर आभार न्यायालय कक्ष अधीक्षक एस. बी. शुक्ला यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी अधिक्षक एस. बी. शुक्ला, सी. एम. झोपे, के.के. लोंढे सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

हिंगणघाट शहरात कंपनी ठेकेदाराकडून कामगारांची पिळवणूक यांच्या समस्यांकडे कामगार अधिकारी यांचे दुर्लक्ष ?

0

 

हिंगणघाट  1)कंपनी नियमानुसार कोणतीही सुविधा जागेवर नाही.
2) कंपनी ठेकेदाराकडून कामगारांना दोन महिन्यापासून पगार नाही.
त्यामुळे कंपनी कामगारांनी काम बंद केले . याबाबत खुलासा करण्याकरिता भेट दिली असता जागेवर कंपनी च्या नावाचा बोर्ड नाही ? कंपनी कशाचे उत्पादन करते माहिती नाही ?
कंपनी मालक उदयसिंग विजयसिंग मोहता हे सांगितले परंतु ऑनलाइन पटवारी रेकॉर्ड तपासले असता या नावाने वनी शिवारात कुठेही शेत जमीन नव्हती तर या शिवारात गीमाटेक्स कंपनी, इंटिग्रेट टेक्स्टाईल पार्क या नावाने शेत जमिनी दाखवल्या त्यामुळे कंपनीबद्दल शंका निर्माण झाली . म्हणून आज ग्रामपंचायत वनी येथून माहिती घेतली असता ही कंपनी ब्रजलता विजय सिंग मोहता या नावाने आहे व आज येथील कामगारांना त्यांच्या कामाच्या हक्काचे पूर्ण पैसे मिळाल्याची माहिती मिळाली .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

भालशिव येथे झोक्यातुन पडुन डोक्यास गंभीर दुखापत होवुन उपचारा दरम्यान एक वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील भालशिव गावात एक वर्षाची लहान चिमकुलीचा झोक्यातुन पडुन मरण पावल्याची दुदैवी घटना घडली असुन , यावल पोलीसात या संदर्भात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील भालशिव या गावातील शिवारात शेतात राहणार गिरीष पारधी यांची एक वर्षाची राषी गिरीष पारधी नांवाची मुलगी ही झोपडी मधील बांधलेल्या झोक्यातुन पडल्याने तिला डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला जळगाव येथे उपचारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी ५, ३० वाजेच्या उपचारा दरम्यान सुमारास तिचा दुदैवी मृत्यु झाला असुन, या संदर्भात जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीकारी डॉ . रेणुका भंगाळे यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद वर्ग करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल अशोक जवरे हे करीत आहे .

अखेर त्या कुपोषणग्रस्त मरण पावलेल्या आठ महीन्याच्या आकाश पावराच्या मृत्युची नोंद यावल पोलीसात झाली

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

अखेर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागुन असलेल्या आसराबारी वस्तीवरील आठ महीन्याच्या बालकाचे कुपोषणामुळे जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याप्रकरणी यावल पोलीसात नोंद करण्यात आली आहे . या संदर्भातील पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की , आसराबारी तालुका यावल येथील राहणारे जवानसिंग पावरा यांच्या आठ महीन्याच्या आकाश पावरा या कुपोषणग्रस्त बाळाला उपचारा करीता जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान दिनांक ३१ जुलै रोजी दुदैवी मृत्यु झाला होता , दरम्यान मृत्युच्या जवळपास २६ दिवसानंतर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . सचिन अहिरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस स्टेशन मध्ये सिआरपीसी कलम१७४प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस हेड काँस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे .दरम्यान कुपोषणामुळे आठ महीन्याच्या बालकाचा झालेला दुदैवी मृत्यु घटनेला जवळपास एक महीना होत असुन तरी देखील प्रशासना कडुन निवळ कागदपत्रांची देवाण घेवाणच्या पलीकडे वरिष्ठ पातळीवर ठोस असे काहीही झाले नसल्याने कुपोषणग्रस्तांचे गंभीर प्रश्न हे राजकीय दबावाखाली दडपले जाणार तर नाही ना असे अनेक प्रश्न आदीवासी सामाजीक संघटनाच्या माध्यामातुन उपस्थित करण्यात येत आहे .

सर्वांना सोबत घेऊन पहुर परिसरातील गुन्हेगारी नष्ट करणार कार्यतत्पर पोलीस निरीक्षक – अरुण धनवडे

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी काल आपल्या पदभार स्वीकारला असुन यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी व सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना पहुर पोलीस ठाण्याचे हद्दीत कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य व गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची मदत घेणार असून त्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, पत्रकार व सामान्य नागरिक यांचे सहकार्य लाभणार आहे, सर्व सामन्य नागरिक , महिलांवर होणारे अन्याय,तसेच गुन्हेगारीवर पुर्णतः नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना संसर्गाच्या काळात केलेली कार्यवाही जिल्ह्यात लक्ष्णीय ठरली होती .

आत्महत्या करणारे बहुतांश लोकांना वाचविणारे श्री. चेतन कदम व विवेक सावंत यांचा धाडसी कार्यसाठी वरिष्ठांन कडुन सत्कार करण्यात आले

0

 

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

दि.०७/०८/२०२१ रोजी संध्याकाळी राजीव गांधी सागरी सेतूवर एक इसम आपल्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्यास आला होता, ही बातमी कंपनीतील स्टाफला समजताच कामावर रुजू असणारे कर्मचारी श्री. चेतन कदम आणि कु. विवेक सावंत यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन त्या इसमास वाचवण्यास यशस्वी ठरले. ही बाब कंपनीतील वरिष्ठांना समजली असता त्यांनी आज दोघांचाही सत्कार केला. या वेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री.उत्तम पवार साहेब, श्री. सुबोध गरुड साहेब ,श्री.सुनिल पवार साहेब आणि श्री. महेंद्र गोळे साहेब तसेच कंपनीतील सहकारी मित्र वर्ग यांच्या उपस्थित हा सत्कार करण्यात आला. श्री.चेतन कदम यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अशीच घटना २०१६ मध्ये सुद्धा घडली होती, माझी कामगिरी बजावली व त्या व्यक्तीस वाचविण्यास यश आले होते. त्या कार्ये साठी सुद्धा दिनांक १५/०८/२०१९ रोजी वरळी येथील जेष्ठ नागरिक लोकांनी देखील माझं सत्कार करुन व धनादेश देऊन गौरवण्यात आले होते. ह्या धाडसी कामाची दखल प्रसार माध्यमातून सुद्धा प्रसारित झाली होती.

असे बहादूर व धाडसी कार्याला महाराष्ट्र राज्य तर्फे पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानिता करण्यात आले पाहिजे. असे मत लोकांनी बातमी द्वारे व्यक्त केले.

भाजपा किसान मोर्चाचे सेलू तहसीलदारांना निवेदन

0

 

किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा दोन हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी त्रुटी निर्माण झाले असून या त्रुटीमुळे सेलू तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा लाभ मिळण्यासाठी सेलू तहसीलच्या चकरा माराव्या लागत आहे अनेक वेळा चकरा मारून अनेक वेळा त्रुटींची पूर्तता करून देखील सदरील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी च्या लाभ मिळालेला नाही त्यामुळे भाजपा किसान सेलू तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे सदरील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे सेलू तालुक्यातील बहुतांशी लाभधारक शेतकरी किसान सन्मान निधी च्या लाभापासून वंचित राहिले आहे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी सेलू तहसील मध्ये कागदपत्रांची पूर्तता करून देखील सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आज पर्यंत एक हप्ता मिळालेला नाही वेळोवेळी शेतकरी सेलू तहसील मध्ये चकरा मारतात तहसील मधून शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी पाठवले जाते तहसील कार्यालय आणि कृषी विभाग यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्याचा गोरगरीब शेतकऱ्यांना फटका बसत आहे त्यामुळे किसान सन्मान निधी च्या अनुदानाचा लाभ तात्काळ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी भाजपा किसान मोर्चा सेलू च्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये चकरा मारत असलेल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी चा लाभ मिळण्यासाठी सेलू तहसील दार यांनी तात्काळ लक्ष घालून सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रश्न तात्काळ सोडवावा आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर किसान सन्मान निधी चे लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावी अशी मागणी आज गुरुवार रोजी दिनांक 26 8 दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली आहे वरील मागणीचे लेखी निवेदन तहसीलदारांना भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस अभिजीत रोडगे गोविंद मगर गिरगाव चे सरपंच अंकुश काटे नारायण दुबे भाजपा तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड रामा शेवाळे तुकाराम धनवटे भागवत दळवे तिच्या कर ना कपिल फुलारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे