Home Blog Page 418

स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात अंत्यविधीची तयारी

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधि

कनारखेड: कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुरुवारी एका वृद्धचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करायचे कोठे करायचे म्हनत ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत इमारत परिसरात तयारी केल्याने खळबळ उडाली आहे.
शेगाव तालुक्यातील कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही. गुरुवारी गावातील चंद्रभागाबाई मारुती वाकोडे या महिलेचा रात्री मृत्यू झाला. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ई क्लास किंवा शासनाची कुठलीही जमीन नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी बुलढाणा, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना निवेदन देऊन स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली आहे. गायगाव बु, गायगाव खुर्द, कनारखेड अशा तीन गावांची गट ग्रामपंचायत आहे. गायगाव गट ग्रामपंचायत ने सुद्धा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरता ठराव घेतला आहे. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या करमणूक केंद्र परिसरात लाकडे आणून अंत्यविधीसाठी तयारी सुरू केली.
बैलगाडीत लाकडे आणून करमणूक केंद्राचे परिसरात ग्रामस्थ ठाण मांडून बसले आहेत.
कनारखेड गावातील लोकांना अंतिम संस्कार कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. शासनाचा वारंवार गावकऱ्यांनी पाठपुरावा करूनही आज पर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.
त्यामुळे कणारखेड येथील रहिवाशांनी गावातील गट ग्रामपंचायत चे इमारत परिसरातील कार्यरत असलेले करमणुक केंद्र परिसरात परिसरात येऊन व अंतिम संस्कार च्या लाकडं आणून आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ग्रामपंचायत परिसरामध्ये आम्ही अंतिम संस्कार करू यासाठी ठाण मांडून येथील नागरिक शासनाविरोधात रोष व्यक्त करत होते.

किनगाव गावात रात्री एका तरुणाची आपल्या घरात दोरीने गळफास घेवुन आत्मह्त्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील राहणाऱ्या एका तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत यावल पोलीसात अवसमात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातीत किनगाव गावात दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ , १५ वाजेच्या सुमारास दगडु यादव धनगर या २६ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरातील मागच्या खोलीत रात्री २ वाजताच्या सुमारास झोपला असता घरातीत सुतळी पटयाने घराच्या छताला असलेल्या लाकडी दांडयाला बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . या घटनेची खबर सचिन रामकृष्ण धनगर वय३६ वर्ष राहणार किनगाव यांने दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . तरूण दगड्ड धनगर याने आत्महत्या केली याचा स्पष्ठ कारण कळाले नसले तरी काही दिवसांपासुन त्याचे मानसीक संतुलन बिघड्ल्याचे कळाले असुन यातच त्याने आत्महत्या केली असावी असा कयास आहें.
.

अट्रावल सांगवी शिवारातून बैल चोरणाऱ्यास रंगेहात पकडले; यावल पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधि) विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना किरण दिनकर कोळी रा. अट्रावल याला शेतकऱ्याने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी ४.३० वाजता यावल पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, चंद्रकांत विजय तावडे (वय-३५) रा. डोंगर सांगवी ता. यावल हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बैलजोडी आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचा २० हजार रूपये किंमतीचा बैल अट्रावल सांगवी शिवारातील शेतात बांधले होते. अट्रावल गावातील किरण दिनकर कोळी याने बांधलेला बैल चोरून नेत असतांना त्याला रंगेहात पकडले आहे. शेतकऱ्यांनी त्याला चांगला चोप देवून यावल पोलीसांच्या हवाली केले आहे. चंद्रकांत तावडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता अटक केली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक जवरे करीत आहे.

प्रभाग क्रमांक 06 रहिवासी व एकता प्रतिष्ठान चे कार्यकर्ते यांच्या कडून डेंगू रोग व प्रभागातील स्वच्छतेबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन

0

 

हिंगणघाट 24 ऑगस्ट

प्रभाग क्रमांक 06 येथे पावसाळा लागला तेव्हापासून कुठल्याही प्रकारे उचीत नियोजन व सोईसुविधा उपलब्ध नाहीत,
मागील काही दिवसांपासून डेंग्यू सारख्या जीवघेणा आजारांनी डोके वर काढले आहेत याचाच परिणाम म्हणून प्रभाग मध्ये प्रत्येक घरात डेंग्यू आणखी संसर्गजन्य रोगांमुळे नागरीक हतबल झाले आहेत, त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साचलेल्या पाण्यात फवारणी केली तर या रोगाला नक्किच आळा घालता येईल,
प्रभाग मध्ये घंटागाडी नियमीत येत नसल्यामुळे घरी जो कचरा साचतो त्याची वेळेवर विल्हेवाट लागत नाही. परीणामी साचलेल्या कचर्यात दुर्गंधी पसरुन अळी तयार होतात. ज्यामुळे रोगराई ला आमंत्रण स्वताच्याच घरुन मीळते. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रभागात दुर्लक्ष होत आहे. नगर पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर व्यवस्था
करावी दखल न घेतल्यास एकता प्रतिष्ठानकडून आंदोलन केले जाईल . निवेदन देताना
सुनिल दिवे,प्रवीण शंभरकर,
विनोद कुंभारे,चेतन घुसे,
संदेश थूल,,साहिल कांबळे,प्रज्वल मेंढे,अजित कांबळे,अमित कांबळे,वृषभ इंदुरकर,अखिल धाबर्डे,
इत्यादी उपस्थित होते
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

पेट्रोल पंप हटाव कृती समितीकडून धरणे आंदोलन

0

हिंगणघाट 24 ऑगस्ट

वर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोलपंप हटवून दुसरीकडे घेऊन जाण्याच्या मागणीसाठी आज पेट्रोल पंप हटाव कृती समिती च्या वतीने हिंगणघाट उपविभागीय कार्यालया समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.आजच्या धरणे आंदोलनात डॉ आंबेडकरी विचारांच्या 16 संघटना
1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
2) समता सैनिक दल
3) भीम आर्मी
4) निर्माण सोशल फोरम
5) बहुजन समाज पार्टी 6)भारतीय बौद्ध महासभा 7)भिम टायगर सेना
8) सबुद्ध महिला संघटना
9) वंचित बहुजन आघाडी 10)संभाजी बिग्रेड
11)झलकारी सेना
12) विदर्भ विकास आघाडी
13) भारत मुक्ती मोर्चा
14) आंबेडकर राईट इंजिनियर असोशियन
15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती
16) भारतीय संविधान जागृती अभियान सहभागी झालेल्या होत्या.
निवेदनातून या पुतळा परिसरात वर्षभर विविध सामाजिक,सांस्कृतिक,कार्यक्रम होतात.या परिसरात विविध शासकीय कार्यालये आहेत.हजारो नागरिक कामा निमित्ताने या ठिकाणी येतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून फटाक्यांची आतिषबाजी विविध कारणाने नेहमीच करण्यात येते. शिवाय या परिसरातील पोलीस मुख्यालया जवळ गॅस सिलेंडरचे गोडाऊन,स्फोटक दारूगोळ्यांचे गोदाम,मंगल कार्यालय आहे एवढे वर्दळीच्या ठिकाणी ज्वलनशील पेट्रोलपंप झाल्यास अपघात होऊन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.या मुळे हा नियोजित पेट्रोलपंप या ठिकाणाहून हलवून अन्यत्र सुरक्षित जागी करावा अशी या आंदोलकांची मागणी आहे.
आज सकाळी 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कृती समिती आंदोलक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर 11 ते 3 या वेळात शांततेत धरणे दिल्यानंतर कृती समितीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनले यांना निवेदनातून मागणी आपल्या स्तरावर पेट्रोल पंप हटविण्याच्या संदर्भात कारवाई करावी ही विनंती ,अन्यथा पेट्रोल पंप कृती समितीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील गावखेड्यात उग्र आंदोलन करण्यात येईल कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याची जबाबदारी शासन प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी मागणी संदर्भात एक निवेदन सादर केले.
आजच्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व वर्धेचे माजी नप अध्यक्ष नीरज गुजर, माजी नगरसेवक अशोक रामटेके,अनिल जवादे,शंकर मुंजेवार,गोरख भगत,गोकुल पाटील,विक्रात भगत, यांनी केले.
या धरणे आदोलनाच्या यशस्वीतेसाठी कुणाल वासेकर,, अनिल मून,मनोज वासेकर,रसपाल शेंदरे, सुहास जीवनकर,ललित धनविज,राजू मेश्राम, विजय तामगाडगे, प्रशांत मेश्राम, अजय डांगरे, पृथ्वीराज मेश्राम , सौ मंगला कांबळे,अनुला सोमकुंवर,सीमा मेश्राम,यांनी परिश्रम घेतले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा-भिकारमौशी ग्रामवासी तथा परिसरातील नागरिकांची उपवनसंरक्षक यांचेकडे मागणी.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-मागील काही दिवसांपासून परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.वाघाने अधिक उग्र स्वरूप धारण केले असून या परिसरातील दयाराम धरी धुंडेशिवनी,डंबाजी डोंगरे चुराचुरा,गोविंदा गावतुरे राजगाटा पुंडलिक भिकारमाथी वंदना जंगठे दिभना कल्पना चौधरी महादवाडी शोभा मेश्राम जेप्रा.संध्या चिलमवार इंदिरानगर,मंजुळाबाई चौधरी गोगाव,चापले बाई गोगाव अशा १० ते १५ शेतकरी व शेतमजुरांचा या वाघाने बळी घेतला आहे.५० ते ६० पाळीव जनावरे वाघाने आतापर्यंत फस्त केले आहेत.एवढे सगळे घडूनही वनविभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत एवढ्या दिवसात नरभक्षक वाघापासून शेतकरी व शेतमजुरांच्या स्वंरक्षणासाठी वनविभागाने कसल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही.या परिसरातील शेतकरी व शेतमजूर नरभक्षक वाघाच्या दहशतीत जीवन जगत आहेत. परिणामी ते आपल्या शेतावर जाऊ शकत नाहीत.अगोदरच पावसाने दडी मारली आहे आणि आता वाघाची दहशत अशा दुहेरी संकटात शेतकरी व शेतमजूर सापडला आहे.सद्या शेतीमध्ये निंदणी करणे,खत टाकणे,कीटकनाशके फवारणे, पिकांना पाणी देणे इत्यादी कामे करावयाची असूनही वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी ही कामे करू शकत नाही. परिणामी शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. आपल्याकडे कोसा (रेशीम) उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून तो कोसा उत्पादनासाठी जंगलावरच अवलंबून आहे. वाघाच्या दहशतीमुळे तीसुद्धा रेशीमशेती करू शकत नाही,असेच जर चालू राहिले तर शेतकरी व शेतमजुरांवर उपासमारीची वेळ येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार आपला वनविभाग असेल.
त्यामुळे पुढील दोन दिवसात या नरभक्षी वाघाला जेरबंद करून वाघाचा बंदोबस्त केला नाही तर जनतेच असंतोषाचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि या असंतोषाचे जे पडसाद उमटतील त्याला परिसरातील शेतकरी व शेतमजूर जबाबदार राहणार नाही.वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर या परिसरातील शेतकर आंदोलनाचा मार्ग अवलंबतील आणि याला सर्वस्वी वनविभागाच जबाबदार असेल,म्हणून महोदयांनी सदर प्रकरणामध्ये जाती लक्ष घालून नरभक्षी वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांची उपवनसंरक्षक यांचेकडे सादर केली आहे.

एसटी बस चा भीषण अपघात एक महिला ठार 25 जखमी ,

0

 

सिंदखेड राजा ।प्रतिनिधी ।

– जिल्ह्यातील देऊळगावराजा शहराजवळील बायपासवर एसटी बस आणि ट्रकचा समोरा-समोर अपघात झाल्याची घटना आज सोमवारी घडली. अपघातामध्ये एक वृद्ध महिला जागीच ठार झाली असून, बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 5 प्रवासी गंभीर जखमी झाले जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अपघात एवढा भीषण होता की, एसटी बसची डाव्या साईडची मागची बाजू फाडली आहे ,
जालना येथून यवतमाळकडे एसटी बस जात होती. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरातील बायपासजवळ जात असताना, ट्रक क्रॉस करत असताना एक साईड पूर्णपणे फाडत नेली. या अपघातात 1 वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, ड्रायव्हर साईडला बसलेले 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन या सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढले. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ट्रक पलटी झाल्याने 13 मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच परत हा एक मोठा अपघात घडला.

शहरात डेंग्यूचा वाढता प्रभाव पाहता प्रशासनाने उपाययोजना करा! मनसेने दिले 7 दिवसाची मुदत व इशारा

0

 

हिंगणघाट : – दि. २३ ऑगस्ट हिंगणघाट शहरात डेंग्यूचा वाढता प्रकोप पाहता झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनाला ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. शहरात मागील १ महिन्यापासून डेंग्यू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनाचे शहरावर दुर्लक्ष होत आहे. त्यातच शरातील संपूर्ण भागात अमृत योजने अंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम त्यात त्या गटाराचा चेंबर मध्ये डबक्यात पाणी साचून राहते पावसाचा पाण्यात हेच गटारे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी जाण्याकरिता जागाच राहिली नाही त्या पाण्याचे रूपांतर सांडपाण्याचा होत असल्याने त्यातूनच डेंग्यूचे माचार निर्माण होत आहे. या गटार योजनेच्या पाईप लाईन मुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यातून शहरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा

शिवाजीनगर येथील 45 वर्ष इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-

नांदुरा शहरातील शिवाजीनगर येथील 45 वर्षे इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली गजानन महादेव खेतकर वय 45 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
याबाबत विजय गजानन खेतकर यांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की,त्यांचे वडील गजानन महादेव खेतकर वय 45 वर्ष राहणार शिवाजीनगर यांना दारू पिण्याची सवय होती ते नेहमी दारू पीत असत.त्यांनी यापूर्वी दोन तीन वेळा विषारी औषध घेतले होते.त्यांनी आज सोमवारी सकाळी पाच वाजता च्या सुमारास राहत्या घरी टीनाच्या खाली लावलेल्या लाकडी बल्लीला साडी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी ते लटकलेल्या अवस्थेत दिसून आले अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून कलम 174 नुसार मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने सहाय्यक फौजदार गजानन सातव हे करीत असल्याचे नांदुरा पोलिसांनी सांगितले आहे.

जिगाव प्रकल्पाला भिमसागर नाव.द्या रिकिभाई सावळे

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील होऊ घातलेल्या महत्त्व कांक्षी जिगाव प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर प्रकल्प.जिगाव असे नामकरन करा अशा आशयाचे निवेदन आज सोववार दि.२३आँगषट रोजी जय भिम मित्र मंडळाचे रिकिभाई राजाभाऊ सावळे यांच्या नेतृत्वात म.ना.जयंतरावजी पाटील. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मारफत देण्यात आले जिगाव प्रकल्प.हा विदर्भातील सर्वात मोठा सीचन प्रकल्पआहे यामुळे परीसरातील विविध गावांना मोठ्या प्रमाणात सिंचनाचा लाभ होनार आहे सिंचन क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांचे सिचन क्षेत्रात अध्ययनाचे मार्गदर्शन घेण्यात येते त्यांच्या विचारावर अध्ययन केले जाते म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या प्रकल्पाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भिमसागर प्रकल्प.नाव देण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर गजानन ठोसर. सचिन डोंगरे. सुमेध नरवाडे यांच्या सह कार्य करते यांच्या सह्या.आहे