Home Blog Page 446

नवसंजीवनी अंतर्गत परसाडे व जामन्या आदिवासी व अति दुर्गम भागात कोविड लसीकरणास प्रारंभ

0

 

नवसंजीवनी अंतर्गत परसाडे व जामन्या येथे कोविड लसीकरणास प्रारंभ १८ ते ४५ वर्षे वरील १४० नागरीक यांना लसीकरण झाले प्रा.आ.केंद्र सावखेडासीम अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद व जामन्या अंतर्गत परसाडे जामन्या येथे दि.२८/०६/२०२१ सोमवार रोजी कोविड लसीकरणास प्रारंभ उपस्थित मान्यवर होते तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी डॉ. गौरव भोईटे, मानसेवी अधिकारी डॉ. प्रवीण ठाकरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी व डॉ.राहुल गजरे. आरोग्य सहाय्यीका शोभा चौधरी, आरोग्यसेविका महमुदा तडवी शाबजान तडवी, आशा पर्यवेक्षीका सरला तडवी आरोग्यसेवक अरविंद जाधव, भुषण पाटील उपस्थित मान्यवर मा.सरपंच श्रीमती बबिता महंमद तडवी, उपसरपंच श्री.रुस्तम तडवी, ग्रामपंचायत सदस्या रहीमत तडवी सदस्य हुसेन तडवी ग्रामसेवक मजीत अरमान तडवी जेष्ठ नागरिक रमेश सावळे, छ्ब्बीर तडवी,सुलेमान तडवी, स्वंयसेवक :-कमाल तडवी, बशीर तडवी,लतिब तडवी,राजू तडवी, सिताराम सोनवणे, पुंजो पाटील, अमृत पाटील, बाबासाहेब भालेराव, युनुस तडवी, जहाँगीर तडवी, दिपक पाटील समाधान भालेराव दिनेश बारेला यांनी परिक्षम घेतले. आशासेविका व अंगणवाडी सेविका हिरा तडवी, फरिदा तडवी,सायरा तडवी, शिवप्रताप घारू समीर तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन केले

शिवसेनेत 10 नगरसेवक प्रवेशा नंतर हिंगणघाट नगरपालिकेला शासनाकडून विशेष निधी !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२८ जून स्थानिक नगरपालिकेच्या १० नगरसेवकांनी नुकतेच शिवबंधन बांधले असून नुकताच मुंबई येथे शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत रीतसर प्रवेश केला आहे.
स्थानिक नगरपालिकेच्या भाजपाच्या ९ नगरसेवकांनी तसेच एका अपक्ष नगरसेवकाने सेनाप्रवेश केला यावरून शहरात मोठे वादंग माजले आहे. सत्तेच्या मोहापायी पक्षांतर केले असल्याचा चर्चाही शहरात सर्वत्र सुरू आहे.
आज दिनांक २८ जून रोजी शहरातील रिठे सभागृह येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी खासदार अनंत गुढे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्रवेशानंतर एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
सत्तेच्या लोभापायी या नगरसेवकांनी भाजपा नेतृत्व सोडून शिवसेना प्रवेश घेतल्याचे पत्रकारांनी आरोप केले असता अनंत गुढे यांनी या वक्तव्याचे खंडन करीत त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता हाती शिवबंधन बांधले असल्याचे सांगितले.
मात्र या नगरसेवकांच्या सेनाप्रवेशानंतर आता हिंगणघाट शहरातच नव्हे तर तालुक्यातसुद्धा येत्या पालिका निवडणुकांपुर्वी मोठा विशेष निधी देऊन विकासकामे करण्यात येणार असल्याची ग्वाही संपर्कप्रमुख अनंत गुढे यांनी दिली.
उपस्थित पत्रकारांनी नगरपालिके चे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे व इतरांनी सत्तेच्या लोभापोटीच अनेकदा पक्षबदल केल्याचा आरोप आमदार कुणावार यांनी लावला असल्याचे सांगताच उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांनी आरोप फेटाळून लावत भाजपाचे आमदार असलेले समिर कुणावार यांनीच अनेकदा पक्ष बदल केला असल्याने त्यांना आम्हाला दलबदलू म्हणण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे स्पष्टिकरण दिले. आतापर्यंत उपाध्यक्ष घुसे यांनी पद सोडले नाही शेवटी आता नगरपालिकेची पुढील निवडणूक जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून शिवसेनेत कोलांटउडी घेतली अशी विचारणा उपस्थित पत्रकारांनी घुसे यांना केली. पत्रकार परिषदेच्या वेळी शिवसेनेचे माजी आमदार तथा उपनेते अशोक शिंदे यांना या सर्व निर्णय प्रक्रियेत कुठे सामील न केल्याने पत्रकारांनी संपर्कप्रमुख गुढे यांना शिंदे यांच्या पक्षातील अस्तित्वाविषयी विचारणा केली, गुढे यांनी सदर प्रश्नाचे उत्तर टाळीत शिंदे शिवसेनेतच कार्यरत असल्याचे प्रतिपादन केले.
शिंदे यांना आजच्या पत्रकार परिषदेत मी स्वतः उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली होती परंतु ते उपस्थित राहू शकले नाही,शिंदे हे उपनेते असल्याने मी आदेश देऊ शकत नाही, पक्षनेतृत्व त्यांना आदेश देऊ शकते.मात्र शिवसेनाप्रमुखांनी मला २०१७ पासून जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असून पक्ष संघटनेचे काम मला दिल्याने वर्धा जिल्ह्यात पक्ष मजबुतीसाठी तसेच पक्षवाढीसाठी सतत कार्यरत असल्याचे सांगत पुढेही हे कार्य जोमाने सुरु ठेवणार असल्याचे गुढे यांनी सांगितले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक राजेंद्र खुपसरे हे अशोक शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जातात, आज तेही या कार्यक्रमात उपस्थित होते पत्रकारांनी त्यांना शिंदे यांच्यावर असलेल्या निष्ठाविषयी विचारले असता त्यांनी शिवसैनिक असून पक्षाचे आदेशच मान्य करील. अशोक शिंदे हे माझे वैयक्तिक मित्र असून त्यांचे आणि माझे भविष्यात देखील संबंध कायम राहतील असे उत्तर यावेळी त्यांनी पत्रकारांना दिले. पत्रकार परिषदेच्या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे यांचेसह जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, अनिल देवतारे,उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे,राजेन्द्र खुपसरे,न.प. गटनेते श्रीधर कोटकर,जिल्हा संघटिका वंदना भुते,जिल्हा युवा सेना प्रमुख अभिनंदन मुनोत,शहर प्रमुख सतीश ढोमणे तसेच १० नगरसेवकांसह प्रवेश घेणारे माजी नगरसेवक,शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

तिवसा येथे शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या आशीर्वाद बार जवळील घटना;चार आरोपी अटक

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानक जवळील आशिर्वाद वाईन बार समोर रात्री 10.15 वाजता शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली, या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे,अमोल पाटील यांच्यावर या पूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता तर त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्या बाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता,या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी पसार झाला आहे
अमोल जनार्दन पाटील वय 38 रा.तिवसा असे मृतकाचे नाव असून तो शिवसेना शहर प्रमुख होता,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अमोल पाटील हा आपल्या एका मित्रा सोबत बार मध्ये दारू पिण्यास आशीर्वाद बार मध्ये आला होता,दरम्यान आरोपींनी अमोल पाटील यांच्या हत्येचा आधीच कट रचला होता,सुरवातीला आरोपींना अमोल च्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले,दरम्यान घटनेविषयी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी वेगाने चक्र फिरवत काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली तर एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षण रिता उईके यांनी दिली,अटक केलेल्या आरोपी मध्ये संदीप रामदास ढोबाळे वय 42 वर्षे, प्रवीण रामदास ढोबाळे,प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे वय 30 वर्ष, रूपेश उर्फ अंकुश रमेश घागरे वय 22 वर्ष राहणार सर्व तिवसा तर एक आरोपी गुणवंत उमप वय 30 रा. कमळापूर हा पसार आहेत, आरोपी विरुद्ध 302,143,147,148,149,
120 (ब),34 नुसार गुन्हे दाखल केले आहे

नामदार नवाब मलीक विचार मंचच्या जळगाव जिल्हा कार्यध्यक्षपदी अन्वर खाटीक यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील फैजपुर येथील अल्पसंख्याक समाजातील युवा सामाजीक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदधिकारी अन्वर अजगर खाटीक यांची नामदार नवाब मलीक विचार मंचच्या जळगाव जिल्हा कार्याधक्षपदी निवड करण्यात आली आहे .पक्षाच्या माध्यमातुन विविध सामाजीक प्रश्न मांडणे व समाजहिताचे कार्य करणाऱ्या अन्वर खाटीक यांनी केलेल्या भरीव कामगीरीची दखल घेत नामदार नवाब मलीक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष रहेमान खान पठाण व प्रदेश अध्यक्षा सना मलीक यांनी त्यांची जळगाव जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड केली असुन , या निवडी बद्दल त्यांचे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना . नवाब मलिक , पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील , राष्ट्रवादीचे नेते माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे ,
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहीणीताई खडसे , अमळनेरचे आमदार अनिल पाटील , जिल्हा अध्यक्ष अॅड रवीन्द्र भैय्या पाटील , युवक माजी आमदार मानिष जैन , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , यावलचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल वसंत पाटील , माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते , बामणोदचे गुणवंत निळ , फैजपुरचे नगरसेवक रशीद तडवी , फैजपुर राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष विनोद कोल्हे ,महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ . वंदनाताई पाटील ,राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , यावल शहर राष्ट्रवादी अध्यक्ष अब्दुल करीम मन्यार , वसंत गजमल पाटील, राष्ट्रवादीचे नाना बोदडे , अॅड . निवृत्ती पाटील , ललित पाटील , अय्युब खान सर , गनी खान , हितेश गजरे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभीनंदन केले आहे .

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने बांधकामावरील सळाख चोरी करणाऱ्यास काही तासातच केली अटक

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि. 27.6.21
घटना दिनांक 25.6.21 रात्री च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने दीपक मारोतराव पाखे वय 55 वर्षे राहणार रंगारी वार्ड (शासकीय बांधकाम ठेकेदार )त्यांचे समशान भूमी रोडवरील रोडचे बाजूचे नालीचे बांधकाम करिता लोखंडी सळाख साईडवरील 10 एम. एम च्या 10 नग लोखंडी किमतीचे सळाख एकूण 70 किलो वजनाच्या किंमत 5000 हजार रुपयांच्या चोरुन नेल्याचा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास घेतला असता माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार विवेक बनसोड व त्यांचे पथकास प्रभारी ठाणेदार श्री प्रशांत पाटणकर यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार अवघ्या काही तासातच आरोपी शेख आसिफ उर्फ बकरी शेख वय 50 वर्ष राहणार निशानपुरा वार्ड हिंगणघाट यास निष्पन्न करून त्यास त्याचे घरूनच गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आरोपीस अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई श्री प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा श्री यशवंत साळुंखे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा श्री दिनेश कदम उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रशांत पाटणकर सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण यांचे पथकाचे पो. हवा विवेक बनसोड , नापोकॉ पंकज घोडे, सुहास चांदोरे, प्रशांत वाटखेडे यांनी केली आहे

रयत क्राती संघटना पळशी झाशी जिल्हा परिषद गटामध्ये यावेळी चौरंगी लढतीचे संकेत

0

 

संभाव्य जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी
थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी साठी
राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे
पळशी झाशी जिल्हा परिषद गटामध्ये यावेळी चौरंगी लढतीचे संकेत
जि. परिषद निवडणूक लढतात कि आपल्या मर्जीतील एखाद्या सामान्य कार्यकर्ता निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरवणार
हे एक मोठं गुढ रयत क्राती चे जि.प्रमुख नानाभाऊ पाटील एक मोठी खेळी नक्किच करणार!
सर्व लोकांचे परिचयाचे युवकांचे प्रेरणास्थान रयत क्राती संघटनेचे जि.संपर्क प्रमुख विठ्ठल पाटील याची सुद्धा इच्छा जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी मध्ये उडी मारण्याची दाट शक्यता आहे आपल्या साधी रहाणी उच्च विचारसरणी ते पळशी झाशी जिल्हा गटामध्ये च परिचित नसुन संग्रामपुर जळगाव जामोद तालुक्यातील कोणत्याही गावात त्यानी आपलं नेटवर्क स्थापण केलेलं आहे
विठ्ठलभाऊ पाटील एक शांत स्वभाव या उक्तीप्रमाणे मतदार संघात परिचित आहे !
एक युवा उमेदवार म्हणून मतदार त्यांना प्रथम पसंती देऊ शकतात !
खंदे समर्थक आणि पक्ष संघटनेत त्यानी खुप मोठी मेहनत घेतली आहे ते रयत क्राती संघटने चे जि.संपर्क प्रमुख सुद्धा आहेत त्याचा खुप मोठा दांडगा जनसंपर्क आहे बरीच जनसेवा त्यांनी केली आहेत,!

नायगाव येथील अल्पवयीन मुलाने केली गुरांच्या गोठयात गळफास घेवुन आत्महत्या अक्समात मृत्युची झाली नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील नायगाव येथे एका अल्पवयीन मुलांने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली असुन , यावल पोलीसात याबाबत अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सुजल रमण तडवी वय१६ वर्ष राहणार नायगाव तालुका यावल या अल्पवयीन मुलाने दिनांक २५ जुन रोजी दुपारी ४वाजेच्या सुमारास आपल्या गुरांच्या गोठयात (वाडयात)पत्रांच्या शेडच्या अँगलला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . या घटनेची खबर मयताचे वडील रमण रूबाब तडवी वय४३ वर्ष यांनी खबर दिल्याने पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . मयत सुजल तडवी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . अल्पयीन सुजल तडवी ने आत्महत्याका केली हे अद्याप स्पष्ठ झाले नसुन ,रागाच्या भरात ही त्यांने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे .

यावल येथे भाजपाच्या वतीने ओबीसी आरक्षणा सर्वाच्य न्यायालयात रद्द झाल्याने राज्य शासनाच्या निषेर्धात रास्ता रोको आंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या निषेर्धात सर्वाच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने आंदोलन करीत रास्ता रोको करण्यात आले . संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षल गोविंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , यावल पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरुजीत चौधरी , मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चे चेअरमन शरद जिवराम महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी , पंचायत समिती सदस्य दिपक अण्णा पाटील , सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरुजीत चौधरी , यावल नगर परिषदचे नगरसेवक डॉ . कुंदने फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणेश नेहते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील , उज्जैनसिंग राजपुत यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला . यावेळी राज्य शासनाच्या विरूद्ध भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनात भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्वक्ष हर्षल पाटील ,नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी , मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन यांनी आघाडी शासनाविरूद्ध चौफेर हल्ला चढविला .

यावल येथे काँग्रेस कमेटीच्या वतीने ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने केन्द्र शासन व तत्कालीन फडणवीस सरकारच्या विरूद्ध जनआंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथे तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने केन्द्रातील ओबीसी समाज आरक्षण रद्द करण्यामागे देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी व राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच जबाबदार असुन , देशाच्या सर्वाच्च न्यायालयाने केन्दातील भाजपाच्या सत्ताधारी शासनाकडुन ओ बी सी समाजाची आकडेवारी मागितली होती परन्तु ती आकडेवारीची माहीती देण्यास केन्द्र शासन अपयशी ठरल्याने देशातील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वाच्च न्यायालयाने रद्द केले असुन , या ओ वी सी समाजाच्या आरक्षण रद्द करण्यास महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणी केन्द्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असुन , दरम्यान आज यावल येथील बुरूज चौकात राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमित्ताने काँग्रेसच्या तालुका कमेटीच्या वतीने सामाजीक न्याय दिनाचे औचित्य साधुन ओबीसी समाजाच्या न्याय हक्क मिळावे या करीता सकाळी ११ वाजता केन्द्रातील भाजपा सरकारच्या निषेर्धात जनआंदोलन आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील व तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह , नगरसेवक मनोहर सोनवणे , पुंडलीक बारी , युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईम्रान पहेलवान, नदीम शेख मोमीन , अविनाश बारी , अजय रामकृष्ण बढे , राजु बारी नावरेचे माजी सरपंच समाधान पाटील , कॉंग्रेस आदीवासीआघाडीचे बशीर तडवी , कलीम खान , विक्की गजरे , उस्मान खान यांनी या आंदोलनात सहभाग घेतला .

ओबीसींचे आरक्षण परत मिळविण्यासाठी जळगांव जामोद येथे शहर व तालुका भाजपचे रास्ता रोको आंदोलन.

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:

दिनांक 26 जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसींचे राजकीय आरक्षण या सरकारने घालविल्य राज्यव्यापी रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन घोषित केले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता स्थानिक पेट्रोल पंपाजवळ शहर व तालुका जळगाव जामोद भारतीय जनता पार्टी तर्फे रवींद्रशेठ ढोकणे ओबीसी सेल बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी

उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो

महाभकास आघाडी सरकारचा निषेध असो

ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में

*ओबीसी का नेता कैसा हो डॉक्टर संजय कुटे जैसा हो

यासह इतर घोषणा देत रस्त्यावर ठिय्या देण्यात आला. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, डॉक्टर प्रकाश बगाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रवींद्र शेठ ढोकणे यांचे मार्गदर्शन मार्गदर्शनपर भाषणे झाली त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने स्थानबद्ध करून पोलीस स्टेशन मध्ये कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी आंदोलनस्थळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शेठ ढोकणे जळगाव जामोद जिल्हा सरचिटणीस नंदू भाऊ अग्रवाल जिल्हा सचिव रामदास बोंबटकार, गुणवंत राव कपले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा परिषद बुलढाणा विरोधीपक्षनेते बंडूभाऊ पाटील, नगरसेविका रत्नप्रभा खिरोडकर सविताताई कपले महिला शहराध्यक्ष शिल्पा भगत, ग्रा प सदस्या सारिका तुपकरी, शांताबाई तायडे, सुनीता म्हसाळ, नगरसेवक शैलेंद्र बोराडे आशिष सारसर, निलेश शर्मा, पस सदस्य एकनाथ वनारे, पस सभापती रामेश्वर राऊत, उपसभापती महादेव धुर्डे, अशोक काळपांडे, विजय तिवारी, भेलके टेलर, श्याम देवताळू, संजय पांडव, चंद्रकांत वाघ, मुरलीधर राऊत, राजेंद्र उमाळे, एम. आर. इंगळे, युवमोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे,शहर अध्यक्ष उमेश येउल, पंकज देशमुख, शाकीर खान, जमीर टेलर, आझम खान, अशपाक, गणेश शेजोळे, अंबादास निंबाळकर, संदीप तुपकरी, सुरेश इंगळे, अरुण खिरोडकार, भास्कर राऊत, खवले टेलर, डिगंबर हिवरकार यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.