Home Blog Page 445

वर्धा जिल्हा दारूबंदी हटाव बैठकीत निवडणुकीत जाहीरनाम्याचा मुद्दा राहणार

0

 

सचिन वाघे वर्धा

वर्धा दि.11.7.21दारूबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलनाची दुसरी बैठक आज दिनांक ११ जुलै २०२१ ला शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र,या संदर्भात औपचारिक परवानगी घेतली नसल्याचे कारण सांगून प्रशासनाने बैठक घेऊ देण्यास नकार दिला.
अखेर दारूबंदी हटाव समर्थकांनी शासकीय विश्रामगृहा शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतच बैठक घेऊन कार्यक्रम संपन्न केला.

बैठकीला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थेट चंद्रपुरहून देखील काही जणांनी हजेरी लावली. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकदेखील बैठकीत सहभागी होते. सर्वांनी दारूबंदी हटविण्याच्या समर्थनात आपल्या तीव्र भावनांना मोकळी वाट करून दिली व आपले मनोगत व्यक्त केले.

दारूबंदीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अवघ्या ६ वर्षात चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली. जे निकष त्याकरिता वापरण्यात आलेत, ते जसेच्या तसे मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्याला लागू होतात. मात्र, लोकआंदोलनाचा रेटा नसल्याने आणि महिला मते जातील ह्या भीतीने राजकीय नेते आणि पक्ष हयाविषयी जाहीर चर्चा करत नाहीत. जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा फसव्या दारूबंदीला विरोध आहे. वर्धेतील दारूबंदी हटविण्यास सर्वात मोठा विरोध पोलिसांचा आहे कारण त्याने त्यांच्या अर्थशास्त्रावर मोठा परिणाम होणार आहे. दूसरा क्रमांक अवैध दारूविक्रेते आणि नंतरचा क्रमांक दारूबंदी हीच संसाराच्या अपयशाचे कारण समजणार्याो भ्रमित महिलांचा आहे. दारूबंदी हटल्याने दारू घरोघरी फुकटात पोहचवली जाणार नसून ज्याला हवी त्याला योग्य पैशात चांगल्या दर्जाची दारू प्यायला मिळणार आहे. विदर्भातीलच ३ जिल्ह्यात दारूबंदी लादून पश्चिम महाराष्ट्रीय नेत्यांनी विदर्भाचा आर्थिक विकास खुंटवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षापासून दारू निर्माण करून व विदेशात निर्यात करून तेथील जमीनदार शेतकरी श्रीमंत झालेत, मात्र वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर जिल्ह्यातील जंगलात विपुल प्रमाणात आढळणार्या् मोहफुलापासून दारूनिर्मितीवर शासनाने बंधन घालून मुख्यत्वे विदर्भातील आदिवासी बांधवांवर अन्याय केला आहे. अवैध दारूविक्री करणार्यांिना दारूबंदीने प्रचंड श्रीमंत बनविले असून त्या संपत्तीच्या आधारे त्यांनी राजकारणात मोठमोठी पदे बळकावण्याचा सपाटा लावल्याने लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. दारूबंदीने जनमानसात पोलिसांची भ्रष्ट अशी प्रतिमा निर्माण केली असून त्यामुळे जनतेत पोलिसांचा आदर व धाक कमी झाला आहे. दारूबंदीने मोठे उद्योग जिल्ह्यात येण्यास कचरत असून त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती बंद आहे. हलक्या दर्जाच्या, महाग दारूने असंख्य वर्धेकरांचा जीव घेतला असून अशी दारू पिणार्यां च्या आरोग्यावर त्यांच्या कुटुंबियांना मोठा खर्च करावा लागत असल्याने महागाईच्या काळात मोठा आर्थिक भार पडत आहे.

आंदोलनाचा प्रचार प्रसार गतीने व्हावा हयाकरिता समितीची स्थापना करण्यात आली. हयापुढील टप्प्यात तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिंनिधीना हयासंबंधी निवेदन देऊन समर्थन मागण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांच्या प्रस्तावित वर्धा जिल्हा दौर्या त त्यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन सादर करण्यात येईल. दारूबंदी आंदोलनाचा कुणालाही व्याक्तिगत फायदा होऊ द्यायचा नसल्याने आंदोलनाचे नेतृत्व सामूहिक ठेवण्याचे ठरले. आंदोलन करणार्यां ना राजकारण करायचे नाही, मात्र वर्धा जिल्ह्यातून दारूबंदी हटविणे हा सर्व राजकीय नेते व पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मुद्दा बनवायचा आहे. समितीच्या सदस्यांची नावे, संपर्क क्रमांक व पुढील वाटचाल लवकरच सार्वजनिक केली जातील. आंदोलनाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहू न शकणार्यांूनी मोठ्या प्रमाणात कॉल, मेसेज करून आंदोलकांचे मनोधैर्य उंचावले. पाठिंबा देणार्यांथचे आयोजकांनी आभार मानले आहेत. बैठकीला प्रामुख्याने सचिन म्हैसकर, राहुल करंडे, मनीष पुसाटे, अमित डांगे, श्यामभाऊ परसोडकर, सीतम मन्द्रेले, चन्द्रशेखर घाटे, राहुल पाटील, किरण पट्टेवार, राहुल ढोक, नितिन फुलझेले, आशीष ठाकरे, दिनेश लांडगे, सिद्धान्त कांबळे, नितिन यादव, रमेश हिराणी, सुशील साहुरकर, जितेंद्र झाडे, पवन काकडे, दिनेश वाणी, प्रवीण मुडे आदींची उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान सर्व कोरोंना नियमांचे पालन करण्याची विशेष खबरदारी घेण्यात आली. पोलिसांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवून बित्तंबातमी गोळा करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडले. हयापुढील काळात मोठ्या संख्येने समर्थकांच्या जुळण्याची शक्यता असल्याने दारूबंदी हटविण्याच्या मुद्द्याला मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचे समर्थन मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

देश भर में 1 करोड़ 20 लाख पौधे लगाने का संकल्प – दावते इस्लामी हिन्द

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट: दि.11.7.21 दावते इस्लामी हिन्द द्वारा देश मे पर्यावरण संरक्षण हेतु वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन भव्य पैमाने पर शुरू किया गया।
दावते इस्लामी देश के सभी राज्य और शहरो में धार्मिक व सामाजिक कार्य में अग्रसर है ।
पिछले साल सम्पूर्ण भारत भर में 1 करोड़ 20 लाख पौधे लगाने का संकल्प दावते इस्लामी द्वारा लिया गया था, जिसके चलते देश के अलग अलग राज्य, शहर और कस्बों में वृक्षारोपण की शुरूआत हुई।
जिसमे हिंगणघाट दावते इस्लामी द्वारा लाखो की संख्या तक आंकड़ा पहुंच चुका है और वे संकल्प आगे भी इसी तरह चल रहा है। पिछले साल लिया गया संकल्प पर्यावरण संरक्षण और ऑक्सीजन की कमी को मद्देनजर लीया गया था। जो इस बार भी देश भर में चल रहा है। उसी मिशन को आगे बढ़ाने हिंगणघाट दावते इस्लामी और मदरसा सदाक़तूल इस्लाम की और से जामा मस्जिद चौक पर कडू निम के पौधे लगाकर पर्यावरण बचाने, युवाओ ने बढ़चढ़कर हिस्सा लिया। और आगे भी इस मिशन को लेकर चलने का इरादा किया है। इस अवसर पर दावते इस्लामी हिंगणघाट ज़ोन, निगरान मोहम्मद बख्श कादरी, नदीम खान मामू, टाका मस्जिद सेक्रेटरी मक़सूद बावा, मदरसा सदाक़तूल इस्लाम के सेक्रेटरी आबिद रज़ा, अब्दुल कदीर बख्श, ज़मीर शेख, अल्ताफ भाई, अफ़रोज़ उर्फ सोनू भाई, आमीन मलनस, मुश्ताक़ भाई, इत्यादि उपस्थित थे।

गांजा वाहतूक करणार्‍यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई .

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.11.7. 2019  गुन्हे प्रकटीकरण पथक हवा बनसोड पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना खात्रीशीर माहिती मिळाली की दि.10 जुलै सायंकाळच्या दरम्यान अंकुश मेश्राम राहणार महात्मा फुले वार्ड हिंगणघाट हा मोटर सायकल ने गांजा घेऊन हिंगणघाट शहरात येत आहे अशा माहितीवरून श्री दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक श्री संपत चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत पाटणकर व पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल लगड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा विवेक बनसोड व त्यांचे पथकासह कलोडे चौक हिंगणघाट येथे नाकेबंदी केली असता अंकुश अरुण मेश्राम वय 28 वर्ष राहणार महात्मा फुले वार्ड हिंगणघाट हा मोटरसायकलने वाहतूक करीत असताना मिळून आला त्याच्या ताब्यातून एका पिवळ्या रंगाची पिशवी मध्ये 557 ग्रॅम गांजा किंमत 5570 रुपये 1 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक MH32 एम एम 8762 1 विवो कंपनीचा मोबाईल नगदी 950 रुपये असा एकूण 62520 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर कार्यवाही दरम्यान जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 586/2021 कलम 20 (ब) एन डी .पी. एस ॲक्ट सह कलम 3()1, 181, 130 / 177 मोवाका अन्वय गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि श्री प्रशांत पाटणकर करीत आहे सदर कारवाई पोउनि अमोल लगड पोहवा विवेक बनसोड ,पंकज घोडे ,सुहास चांदोरे,प्रशांत वानखेडे ,उमेश बेले, वीरेंद्र कांबळे, संदीप बदकी ,विजय काळे यांनी केली आहे

वाढत्या महागाईविरोधात जनजागृतीसाठी आज शहरात यावल तालुका काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली

0

 

यावल  :  (प्रतिनिधी )विकी वानखेडे

वाढत्या महागाईविरोधात जनजागृतीसाठी आज शहरात यावल तालुका काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली

देशात  सहा वर्षात नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्रातील सरकार हे सर्व पातळींवर निष्क्रीय ठरले आहे  घरगुती गॅस, पेट्रोल , डिझेलसह सर्वच जिवनावश्यक वस्तुच्या किमती गगनाला भिडल्या आहेत  नरेन्द्र मोदी यांनी सात वर्षापुर्वी सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखललेले अच्छे दिनचे स्वप्न हे बुरे दिन ठरले

देशातील नागरीकांना जगणे कठीन झाले  आहे  मोदी सरकारची चुकीच्या व  उद्योगपतीधार्जिण्या धोरणामुळेच सामान्य लोकांचे जगणे कठीन झाले आहे  या  गोंधळलेल्या  शासनाच्या निषेधार्थ आज यावल शहरात काँग्रेसच्यावतीने महागाईविरूद्ध केन्द्र शासनाचा निषेध करण्यासाठी जनजागृती सायकल रॅली  काढण्यात आली

यावल जिनिंग प्रेसींग सोसायटीच्या आवारातुन निघालेल्या या सायकल रॅलीचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार रमेश चौधरी , जिल्हा परिषद गटनेते तथा कौग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील यांनी केले

नगरसेवक मनोहर सोनवणे , नगरसेवक असलम शेख , नगरसेवक समीर शेख ,गुलाम रसुल दस्तगीर , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह, कोरपावलीचे  सरपंच विलास अडकमोल, दहिगावचे  सरपंच अजय अडकमोल, बामणोदचे सरपंच राहुल तायडे , ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुक्तार तडवी , नईम शेख , पुंडलीक बारी , अभय महाजन , उमेश जावळे , वढोदेचे  सरपंच संदीप सोनवणे , इम्रान पहेलवान यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये भाग घेतला  या सायकल रॅलीचा समारोप यावल पंचायत समितीच्या आवारात झाला .

सयुक्त कुष्टरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत असंसर्गजन्यरोग जागरुता अभियान

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडुन आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन सयुक्त कुष्टरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम अंतर्गत असंसर्गजन्यरोग जागरुता अभियान मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यात १ जुलै ते ३१ आँक्टोबंर २०२१ या कालावधीत त्वचारोग व कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रां अंतर्गत उप केद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संशयीत रुग्णांचे मोफत निदान व उपचार केले जातील, या मोहिमेचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमंत बर्हाटे व क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे stls ,मिलिंद राणे sts यानी केले.यानी सर्वत्र प्रशिक्षण घेतले

यात त्वचारोग व कृष्ठरोग शोध मोहिमेत ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांचे पथक प्रत्येक घरोघरी जाऊन कृष्ठरोगाबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करणार आहेत. सर्व्हेक्षणादरम्यान संशयीत रुग्ण आढळल्यास त्याचे मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन संपुर्ण कुटूंबाची तपासणी करण्यासाठी योगदान द्यावे. या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले असून ग्रामीण भागात पथकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक गावनिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वंयमसेविका व आरोग्य सेवक घरोघरी जावून घरातील सर्व सदस्यांची फिक्कट लालसर न खाजवणारा, न दुखणाऱ्या बधीर चट्टयाची तपासणी करणार आहेत. पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवणार असून बाधीत रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत .
त्वचारोग व कुष्ठरोगावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्यामुळे समाजामध्ये या रोगाविषयी असलेले समज गैरसमज बाजूला सारुन संशयीत रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेत तात्काळ निदान व उपचार घेतल्यास रोगप्रसाराला आळा बसू शकेल. तालुक्यातून अशा रोगांना हद्दपार करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेंमत बर्हाटे यांनी केले आहे.

जिगाव प्रकल्पला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसागर प्रकल्पअसे नाव द्या

0

 

सुनिल पवार नांदुरा

नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदिवर होऊ घातलेल्या जिगाव प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर असे नाव देने म्हणजे त्याचे कार्य चा गौरव करने आहे त्त्यानि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे शेती विशयक धोरन पाण्याचा प्रश्न असे मौलिक प्रश्न सोडविले आहे म्हणून या प्रकल्पाला डॉ बाबासाहेब आंबेडकर भिमसागर असे नाव देण्यात यावे या मागनिचे निवेदन प्रकल्प.ग्रस्थ.शैलेश वाकोडे. संतोष तायडे. किशोर ईगळे पुरुषोत्तम भातूरक. अमर पाटील. राहुल खंडेराव.सुनील पवार. दिलिप ईगळे. भिमराव वाघ. तुकाराम रोकडे. अरुन सुरवाडे यानि मानणिय तहसीलदार नांदुरा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे

आर्वी –तळेगांव महामार्ग येनार्या काही महिण्यात पुर्ण न झाल्यास स्थानिक जनप्रतिनीधीना येत्या निवडणूकीत त्यांची जागा दाखवुन देवु– आप चे अक्षय राऊत यांचा ईशारा

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी प्रज्वल यावले

आर्वी -आर्वी तळेगाव राष्ट्रीय महामार्गचे 3 ते 4 वर्षांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरु असून या राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून या महामार्गाच्या कामात भेसळ करीत आहे तरी सुद्धा स्थानिक प्रशासन या राष्ट्रीय महामार्गकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे येथील स्थानिक आमदार साहेब, स्थानिक खासदार साहेब, व वर्धा जिल्हा पालकमंत्री हे जाणून बुजून या परिसरातील नागरिकांना महामार्गवर जाणे येणे करताना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे व स्थानिक प्रतिनिधी आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची दिशाभूल करीत आहे तरी सुद्धा या सर्व प्रकाराचे फोटो व विडिओ ्यासोबत पाठवीत आहे या नंतर जर या सर्व प्रकाराची दखल जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, व राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी न घेतल्यास आम आदमी पार्टी आर्वी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व स्थानिक नागरिक रस्ता रोको आंदोलन करणार व येणाऱ्या नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणूक मध्ये काँग्रेस व भाजप ला त्यांची जागा दाखविणार तुम्ही या प्रकरणाची दखल घेऊन स्थानिक नागरिक यांना न्याय मिळवून दयावा.
अशी माहिती आम आदमी पार्टी चे जिल्हा सदस्य अक्षय राऊत यांनी पत्रकारद्वारे जाहीर केले.

डांभुर्णीत आत्या भाऊ फुई भाऊंच्या दारुच्या नशेत झालेल्या हाणामारीत तान्या बारेलाचा लाकडी दांडयाने खुन

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील डांभूर्णी येथील आदीवाशी पावरा वस्तीत रहीवाशी असलेले तान्या लोटन बारेला वय ५०वर्ष व त्याचा आतेभाऊ अखिलेश बळीराम बारेला वय ३६वर्ष यांच्यात घरगुती बोलचाल झाली असता त्याचे रुपांतर वादात झाले व संशयित आरोपी अखिलेश बळीराम बारेला राहणार पिपल झपा एम.पी  याने लाकडी दाडुक्याचा वापर करुन तान्या लोटन बारेला याला मारहाण केली असता तो मृत झाला.ही घटना आज दि.९रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली .या घटनेची माहीती पोलिस  पाटील यांनी पोलिसांना कळवताच यावल पोलीस  स्टेशनचे पोलिसनिरिक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उप निरिक्षक जितेंद्र खैरनार सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व त्यांचे सहकारी गणेश ढाकणे,सतीष भोई,विजय परदेशी,हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन तान्या बारेलाचा मृतदेह पीएम साठी रूग्णालयात पाठवण्यात आला पुढील तपास करतांना संशयीत आरोपी अखीलेश बारेला यास दारुच्या नशेत घरातुन पकडून यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तान्या बारेला हा रोजनदारी करुन आपला ऊदरनिर्वाह भागवत होता याचे पश्चात पत्नी,मुलगा१,मुली पाच व पाच जावाई असा परीवार आहे.
डांभुर्णी गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .

आदिवासीला जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

 

गजानन सोनटक्के जळगाव

तालुक्यातील चाळीस टापरी येथील रहिवासी-सखाराम ग्यानसिंग मूजाल्दा वय 26 वर्ष , हा सूरेश गमा सोळंकी याचे सोबत दिनांक 6 जुलै 2021 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन तक्रार दिली की मी व सुरेश जळगाव येथे स्विट किराना दूकानावर सामान घेण्यास आला असता आरोपी सागर दिलीप राठी सूनगाव याने त्याला दूकानाबाहेर बोलावले मी सागर दिलीप राठी याचे जवळ गेल्यावर त्याने फिर्यादीस साले लगोटे आदीवाशी तूम्ही जास्त माजले तूम्ही माझे कषी केंद्राचे दूकानाची बदनामी करता असे म्हणुन रागात फिर्यादी चे खिशातील ओपो मोबाइल 9730913649 क्रमाकाचे सिम असलेला रोडवर फेकून दिला व फि म्हणाला कि क्रूषी अधिकारी यांचे कडे चाल म्हणून फिर्यादी त्याचे मागे मागे दूर्गा चौकातील पूजा सेंटर जवळ मेन रोडवर आला असता आरोपी याने फि हा आदीवासी समाजाचा असल्याचे माहीत असतांना देखील फिर्यादीला तूम्ही लंगोटे आदीवासी सूधारणार नाही अशी जातीवाचक शिवीगाळ करून त्याने त्याचे पायातील चप्पल काढून फिर्यादी चे डावे गालावर मारली व फिर्यादी स अपमानीत केले तसेच तूम्ही आदीवासी जसे लंगोट वर होते तसेच लंगोटवर आणनार अशी धमकी दिली . त्यानंतर आम्ही घरी निघून गेलो व आज रोजी शाळा सोडल्याचा दाखला घेवून पो स्टे रिपोर्ट देण्यास आलो .अश्या फिर्यादी चे तोंडी रीपोर्ट वरुन पोलिसांनी आपला नंबर 561/ 2021 कलम 323,506 भादवि सहकलम 3 ( 1 ) ( 1 ) ( S ) , 3 ( 2 ) ( va ) अ तपास यांचेकडे देण्यात आला .

मृद व जलसंधारण विभागाच्या निविदेत गौडबंगाल!

0

 

173 कोटीचा घोटाळा असल्याचा
जितेंद्र एन. जैन यांचा आरोप

अजहर शाह

बुलढाणा:-मृद व जलसंधारण विभागाने सन 2020 – 2021 या आर्थिक वर्षात काढलेली 173 कोटींची निविदा शासनाच्या धोरणाशी पूर्णपणे विसंगत आहे.मोठ्या कंत्राटदारांना हाताशी धरुन मलिदा लाटण्यासाठी या विभागातील अधिकारी वर्गाने शासनाच्या परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा नेते जितेंद्र एन. जैन यांनी केला आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या निविदेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जैन यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, मृद व जलसंधारण विभागाने 149 कामांना एकत्रित करुन केवळ 25 कामांची 173 कोटी रुपयांची निविदा काढली. लहान कंत्राटदाराना सदर कामे मिळू नये यासाठी या विभागाने वेगवेगळ्या गावातील व तालुक्यातील कामे एकत्र करून एकच मोठ्या रकमेची निविदा काढली आहे. केवळ मॅनेज केलेल्या मोठ्या कंत्राटदाराना काम मिळावे यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांने ही चुकीची प्रक्रीया शासनाची फसवणूक करून राबवली असल्याचा आरोप निवेदनकर्ते जितेंद्र एन. जैन यांनी केला आहे. लहान लहान, वेगळीवेगळी तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता घेऊन कामे काढली असती तर शेकडो कंत्राटदारांना रोजगार मिळाला असता.. परंतु शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांने सर्वांना मूर्ख बनवण्याचा प्रकार केला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोरोना आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे शासकीय निधी अभावी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व विभागाची कामे कमी करण्यात आली आहेत..कित्येक जिल्ह्यात निधीअभावी निविदा सूचना प्रकाशित न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. परंतु बुलढाणा जिल्ह्यात मात्र कोट्यवधी रुपयांच्या निविदा सूचना काढून मलिदा लाटण्याचा प्रकार केला जात असल्याचा गंभीर आरोप जैन यांनी केला आहे. आजरोजी सगळीकडे बुलढाणा जिल्ह्यात व महाराष्ट्रात सर्व विभागाची कामे10 ते 35 टक्के कमी दराने कंत्राटदार निविदा भरत असताना या निविदा एवढ्या उच्च दरात कशा आल्या असा सवालही जैन यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सदर 173 कोटींची निविदा प्रक्रिया व इतर निविदा प्रक्रियांची सखोल चौकशी करण्यात यावी, सदर प्रकरण 100 कोटीच्या वरचे असल्याने सी बी आय, एन आय किंवा ईडी मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या निविदा प्रक्रियेच्या काळात ज्या कंत्राटदारांनी या निविदा भरल्या, कामे घेतली त्या कंत्राटदारांचे कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे, अधीक्षक अभियंता अमरावती, मुख्य अभियंता नागपूर तसेच मंत्रालयीन कर्मचारी व मंत्री यांच्यासह त्यांच्या सर्व स्विय सहाय्यक यांच्या मोबाईल चे सी डी आर व्हाट्सअप मेसेज ची चौकशी करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व कामे स्थगित करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा नेते जितेंद्र जैन यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

*चौकशी न झाल्यास E D कडे स्वतः तक्रार करणार- जितेंद्र एन. जैन*

कोरोना संसर्ग आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे सामान्य माणसासह सरकारही हतबल झाले असतांना मृद व जलसंधारण विभागात कोट्यवधीच्या शासकीय निधीचा चुकीच्या पद्धतीने अपव्यय केला जातोय. लहान कंत्राटदारांना कामापासून वंचित ठेवून केवळ काही विशिष्ट कंत्राटदारांना फायदा मिळवून देऊन स्वतःचे खिसे भरण्यासाठी मृद व जलसंधारण
विभागातील अधिकारी वर्ग चुकीच्या पद्धतीने काम करतोय.. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तशी मागणी केली आहे.. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, मृद व जलसंधारण मंत्री यांनाही सदर निवेदन/ तक्रार पाठवली आहे. सदर प्रकरणाची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारकडून चौकशी लावली गेली नाही तर आपण स्वतः ईडी कडे तक्रार करणार असल्याचे जितेंद्र एन जैन यांनी म्हटले आहे.