Home Blog Page 446

नायगाव येथील ग्रामसेवकांचा मनमानी कारभार उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार

0

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

नायगाव ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक हे सरपंचांना हाताशी धरून संगनमताने मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार उपसरपंचासह सहा सदस्यांनी जळगाव जिल्हा परिषदेकडे केलेली आहे यात ग्रामपंचायत कार्यालयाचे कुठलेही काम करताना आम्हाला विश्वासात घेत नाही,मनमानी करून सर्व निर्णय ते स्वतः घेतात, मासिक सभेला सुद्धा वेळी हजर राहात नाही व नंतर येऊन सर्व विषय त्यांच्या मर्जीनुसार प्रोसिडिंग वर नमूद करतात, मासिक सभेमध्ये मागील विषय घेत नाही, त्यामुळे यात काहीतरी घोटाळा आहे असे स्पष्ट होते, याबाबत विचारणा केली असतांना संबंधितांकडून अरेरावीची उत्तरे मिळतात. अशा प्रकारची लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. दरम्यान तक्रारदारांनी सदर ग्रामसेवक व सरपंचांच्या कारभाराविषयी अनेकदा वरीष्ठांनकडे लेखी तक्रार अर्ज करूनही अद्यापही या कुठलीही कारवाई झालेली नाही तरी सदर ग्रामसेवकांवर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत लेखी निवेदनानुसार सविस्तर असे की नायगाव ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती विचारली असता, ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांचे कडून स्पष्ट नकार मिळतो. प्रत्येक प्रश्न हा लेखी अर्ज करूनच विचारावा असे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. तर मासिक सभेमध्ये झालेल्या खर्चाची बिले मागणी करूनही अवलोकनासाठी सभेपुढे ठेवत नाही. ग्रामपंचायतीचा कर- वसुली भरणा बँकेत केला जात नसून तो परस्पर खर्च केला जातो. त्यानुसार आम्ही सभेच्या अजेंड्यावर जमा-खर्च नमूद करण्याची मागणी केलेली आहे. ती सुद्धा मागणी अमलात आलेली नाही तसेच तसेच ग्रामपंचायतीच्या विविध विषयांची योग्य अशी माहिती मिळत नाही. कामापेक्षा जास्तीचा खर्च दाखवून बाकी रक्कम गहाळ केली जात आहे. ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहूनही दडपशाही ने कारभार करतात या गैरकारभाररास त्वरित आळा बसावा व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व बदली करण्यात यावी. या मागणीसाठी उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे.दि.३१ मे २०२१ रोजी सदर तक्रारी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (जळगाव) यांच्याकडे देण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे सदर ग्रामपंचायतीच्या गैरकारभार विषयी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दि.२९ जून २०२१रोजी तहसीलदार (यावल) यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रार अर्जात म्हटल्या,नुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची शेती गट क्रं.२६९ अशी मालमत्ता आहे सदर शेताच्या बांधावर ७० ते ८० झाडे होती ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतांना फक्त सदर झाडांच्या फांद्यांची छाटणी करायचे असे ठरले होते मात्र प्रत्यक्षात सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी संगणमत करून सदर शेताच्या बांधावरील सर्व झाडे कुठलीही परवानगी न घेता तोडून टाकली आहे.
त्याचप्रमाणे यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांना तब्बल तीन तक्रारअर्ज दिलेले आहे त्यात म्हटल्यानुसार असे की, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आदिवासी बारेला कुटुंबियांच्या नावे घरकुल योजनेअंतर्गत काही घरकुल मंजूर करुन बांधकाम सुरू आहे तथापि सदरील बारेला कुटुंब यांचे गावाच्या मतदार यादीत सुद्धा नाव नाही व त्यांचा साधा रहीवासही नाही अशा लोकांना घरकुल मंजूर करून गावातील पात्र लोकांना सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी घरकुल योजनेपासून वंचित ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे गावालगत निमछाव नावाची आदिवासी वस्ती उदयास आलेली असून या ठिकाणी बोगस घरकुलांची सर्रासपणे बांधकाम सुरू आहे तसेच पैशांची मोठ्या प्रमाणात देवाण- घेवाण सुद्धा झालेली असून याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी दि.२३ जून २०२१ रोजीच्या निवेदनात मागणी केलेली आहे. असे अजब व गज़ब व्यवहार सदर ग्रामपंचायतीत सुरू आहे अशी रितसर तक्रार दि.२९ जून २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध व उपसरपंच व सहा ग्रामपंचायत सदस्य यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. तरी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल अशी मागणी तक्रारदार पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
★ग्रा.पं.ची वरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी-संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील तसेच उत्तम सपकाळे, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, राजू तडवी, महेंद्र तडवी, अलिशानबाई तडवी या सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या लेखी तक्रारीवरून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील व तर अधिकार्‍यांच्या पथकाने चौकशीसाठी दि.५ रोजी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली मात्र चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही
कोट घेणे
★ शिपाई चालवतात मासिक सभा-सदर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहतात. यावेळी ते आपल्या गैरहजेरीत ग्रामपंचायत शिपाई यांना मासिक सभा घेण्यासंदर्भात सांगून जातात त्यानुसार सदर ग्रामपंचायतीची मासिक सभा शिपाई घेत असतात हे ग्रामपंचायतीचे फार मोठे दुर्दैव आहे. अशा या ग्रा.पं.च्या कारभाराकडून गावाच्या कुठल्या प्रकार सर्वांगिन विकासाची अपेक्षा करावी ? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. यासह ग्रामसेवक व सरपंच यांचे अनेक प्रकारचे गैरव्यवहार आम्ही लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठ प्रशासनाकडे कळविले आहे मात्र अद्याप यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही तथापि येत्या काळात सदर प्रकरणावर कुठलीही नि:पक्षपातीपणे कारवाई न झाल्यास आम्ही तक्रारदार सर्वजण जिल्हा परिषद ,जळगाव समोर आमरण उपोषण करू
असे उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील यांनी सांगितले आहे.

टिपर व दुचाकी अपघातात महिला जागीच ठार

0

 

सुनिल पवार. नांदुरा

नांदुरा जळगाव रोड महामार्गावरिल रेल्वे गेट नजिक टिपर व दुचाकी अपघातात दुचाकीवरिल महिला जागिच ठार झाल्या चि घटना८जुलै सकाळी१०वाजता घडली याबाबत सविस्तर असे कि ध्यानेश्वर वेरुळकर वय५५वषँ रा.येरळी. ता.नांदुरा हे.आपली पत्नी मंगलाबाई वेरुळकर वय४५यांचे सोबत दुचाकी ने.नांदुरा वरुन येरळी कडे जात असताना रेल्वे गेट जवळील गतिरोधक जवळ मागुन येनारे एम.एच.२८बी.बी.४१७७या.टीपरने दुचाकी ला जोरदार धडक दिली. यामध्ये मंगलाबाई वेरुळकर हि.महिला जागिच ठार झाली. अपघाताची वार्ता. कळताच नांदुरा पोलीस. पि.एस. आय.कीशोर घोडेस्वार. ओमसाई फा.चे विलास निबोळकर. पो.का.अमोल राऊत. सुनील गायकवाड यांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ धाव घेतली महिलेचा म्रुत्यदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला

जम्परोप असोशिएशन महाराष्ट्र चेअरमन पदी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ विठ्ठल जाधव यांची नियुक्ती

0

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] जन्मरोप असोसिएशन महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची झुम ॲपची बैठक संपन्न झाली झुम ॲपच्या बैठकीत (आय पी एस ) विशेष पोलीस महानिरिक्षक महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रीय एकात्मतता शांतता धार्मिक सलोख्यासाठी कार्यरत असलेल्या शांतीदुत परिवाराचे संस्थापक डॉ विठ्ठल जाधव यांची सर्वानुमते जम्परोप असोसिएशन संघटनेच्या चेअरमन पदी जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष मंदार पनवेलकर यांनी नियुक्ती पत्राव्दारे केली सेवा निवृत विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ विठ्ठल जाधव यांचे कौतुक होत असुन सर्व स्तरावरुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे

राधेश्याम फाउंडेशन चा चौथा वर्धापन दिन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्ये उत्साहात संपन्न झाला.

0

 

सिलोड प्रतिनिधी (सागर जैवाळ)

राधेश्याम फाउंडेशन चा चौथा वर्धापन दिन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी राधेश्याम फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष वैशालीताई चाकणकर यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट व महिलांना उद्योग कसे उभा करता येतील याची माहिती सांगितले . तसेच सर्व जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी आपली उपस्थिती ठेवली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा छायाताई घोरपडे, रोहिणीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष हनुमंत घाडगे पाटील, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संदीप कानडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिलीप वाघमारे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सागर जैवाळ, विशाल जगताप, सुनिल पवार, चंद्रकांत वाघुले, जयश्री आहेर, भावना हगवणे, शुभांगी गलांडे, रेश्मा शेख तसेच सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले . सर्व पदाधिकारी ने सांगितले की संस्थापक अध्यक्षा वैशाली ताई चाकणकर यांनी जबाबदारी दिलेली आम्ही समक्ष पार पाडून जनतेला व गोरगरिबांना न्याय व हक्कासाठी लढणार असे सांगितले .

बनकीन्होळा येथील गाव नदीवर सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा

0

 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

औरंगाबाद (आयुषी कुलकर्णी )

बनकीन्होळा ता. सिल्लोड येथील निल्लोड धरणाला जाणाऱ्या गाव नदीवर ब्रिज कम केटीवेअर या पद्धतीने सिंचन प्रकल्प तसेच सदरील नदीवर संरक्षण भीत उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
गुरुवार ( दि.8 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बनकीन्होळा गावात भेट दिली. यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना गावात बोलावून घेत सिंचन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने गावातील नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रस्ता व सिंचन कामसंबंधी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

यावेळी कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे, सिंचन शाखा अभियंता आर . के . दांडगे, श्री. गद्दीमे, सिंचन अभियंता व्ही.के. गायकवाड, सरपंच प्रल्हाद फरकाडे , उपसरपंच नंदू फरकाडे, माजी सरपंच शिवाजी फरकाडे ,अंकुश फरकाडे, विजय फरकाडे, पंडित फरकाडे आदिंची उपस्थिती होती.
बनकिन्होळा येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी गाव नदीतून जावे लागते. याठिकाणी पूर्वी असलेले सिंचन प्रकल्प मोडकळीस आलेले असून येथील नळकांडी पुलात कचरा अडकल्याने पाणी दुसऱ्या बाजूला वाहते यामुळे परिसरातील शेतांचे नुकसान होते. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते शिवाय नदीत पाणी असतांना स्मशानभूमी कडे तसेच या परिसरात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी सदरील जागेवर ब्रिज कम केटीवेअर, तसेच गाव हद्दीपर्यंत नदीवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी तात्काळ कारवाईचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावल सराफा दुकानात भरदिवसा दरोडा प्रकरण हे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी गांर्भीयाने घेतल्याचे सांगुन आरोपींचा शोध लागेल आ . चंद्रकांत पाटील

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील काल शहरातील सराफा दुकानात पडलेल्या दरोडया प्रकरणी आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दुकानास भेट दिली व दरोड्या प्रकरणी सराफा व्यापारी यांच्या कुटुंबांशी संवाद साधला व विविध विषयावर चर्चा केली. दरम्यान काल संपुर्ण यावल शहराला व तालुक्यास हादरून सोडणाऱ्या भरदिवसा पडलेल्या दरोडा व यातील लाखोंची लुट व या प्रकरणी घडलेले थरार या विषयाची आपण मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करीत असतांना यावल शहराचे शिवसेनाप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या मालकीच्या सराफा दुकानावर पडलेल्या दरोडया विषयी माननिय जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी त्वरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर हा विषय टाकण्यात आला असुन, स्व:ताहा मुख्यमंत्री यांनी या विषयास गांर्भीयाने घेतले असुन या विषयी वरिष्ठ अधिकारी यांना त्यांनी त्वरित चौकशी करून तात्काळ आरोपींच्या शोध घ्यावा असे आदेश दिल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगीतले व सराफा व्यवसायीक कवडीवाले यांच्या कुटुंबास धिर दिला व सोन्याचे दागीने गेली याचा दुखः आहे पण सुदैवाने सोन्यासारखी आपली माणसे वाचली याचा आपण विचार करावा तसेच ज्या युवकांनी सराईत गुन्हेगारांना पकडण्याचा जो धाडस दाखवले त्यांचे विशेष कौत्तुक मुक्ताईनगरचे आमदार चंदकांत पाटील यांनी यावेळी सांगीतले .

बिबट्याच्या दहशतीने त्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मा. आमदार विजयराज शिंदे यांनी गाठले उप वनसरंक्षण कार्यालय

0

 

अजहर शाह

मोताळा:- तालुक्यातील रोहिणखेड, उबाळखेड व अंत्री शिवारात मागील 15 ते 20 दिवसां पासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहे.वन विभाग या घटनां कडून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांत मोठी दहशत निर्माण झाली आहे.या दहशतीच्या त्रस्त व काही जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी आज 7 जुलै 2021 रोजी मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या कडे धाव घेऊन याबाबतची व्यथा मांडली.
यावेळी मा. आमदार विजयराज शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा करून योग्य कार्यवाही बाबत विचारणा केली मात्र समाधान कारक उत्तर न मिळाल्याने जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा उप वन संरक्षक श्री.गजभिये यांचे कार्यलय गाठून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
याबाबत बोलतांना विजयराज शिंदर यांनी सांगितले की,”पेरणी करून बसलेला शेतकरी पावसाची वाट बघत आहे त्यातच पीककर्ज,पीक विमा,कर्जमाफी अश्या अनेक समस्यानी शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे.त्यात वन्य प्राण्यांच्या अश्या त्रासाने या भागातील शेतकरी भयभीत झालेले आहे” वन विभागाचे अधिकारी या सर्व घटने कडे दुर्लक्ष करत असल्याची बाबही त्यांनी उप वन सरंक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमा प्रत्यक्ष पणे दाखविल्या.
त्यामुळे धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी आग्रही मागणी विजयराज शिंदे यांनी लेखी पत्राद्वारे उप वनसरंक्षण यांच्याकडे केली आहे.
उपवन संरक्षक यांची कार्य तत्परता
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून उप वन संरक्षक श्री.गजभिये यांनी तातडीने चार पाच दिवसांसाठी रोहिणखेड येथे “रेस्क्यू टीम” पाठविण्याच्या सूचना दिल्या असून कॅमेऱ्याने ट्रॅपिंग सुद्धा केले जाईल व लवकरात लवकर बिबट्याचा बंद केले जाईल असे सांगितले.त्याच प्रमाणे जखमींना सुद्धा लवकरच आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.
या आश्वासना नंतर दहशतीत असलेल्या असलेल्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत मा.आमदार विजयराज शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी डॉ वैभव इंगळे,प्रकाश आवटे,भूषण गुजर,सुशांत गुजर,संजय सरोदे,सुभाष बैरागी,गणेश मख, सादिक राऊफ,राजू सरोदे ई ची उपस्थिती होती.

यावल पोलीसांच्या कार्यपद्धतीमुळेच गुन्हेगारांना पावले दोन दिवसातील रस्तालुट व दरोड्याची घटना :गृहमत्र्यांकडे तक्रार करणार जलील पटेल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातोद रस्त्यावर काल भरदिवसा झालेली एका व्याक्तीची झालेली लुट व आज शहरात भर दुपारी सोन्या चांदीच्या दुकानात पडलेला दरोडा हे यावल पोलिसांचे अपयश असुन , स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अशा प्रकारच्या कार्यपद्धतीच्या विरूद्ध वारिष्ठ पातळीवर लक्ष केन्द्रीत व्हावे यासाठी आपण प्रसंगी आमरण उपोषण ही करू,,, असा ईशारा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे .
यावल शहरात भर दुपारी बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम सोन्या चांदीच्या दुकानात दरोडा पडतो आणि यावल पोलीस स्टेशन येथील काही अधिकारी हे फक्त सट्टा, पत्ता , देशी विदेशी हातभट्टी दारू विक्रीला समर्थन करून हफ्ते वसुलीच्या नादात मग्न असतात , पोलीसांच्या अशा प्रकाराच्या कार्यपद्धीती…मुळे गुन्हेगारांना व चोरट्यांना पाठबळ मिळत आहे कायदा आणि सुवेवस्था हाताळण्यात यावल पोलीस स्टेशनचे काही अधिकारी हे सपशेल अपयशी ठरत असून त्यांच्यावर योग्य ती चोकशी करून कठोर कार्यवाही करावी अन्यथा उपोषणाला बसू असा गंभीर इशारा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे माजी सरपंच जलील पटेल यांनी केली आहे .तसेच त्यांनी यावल पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून किरकोळ भाजीपाले विक्रतेसह इतर व्यावसायिकांना कायदाचा धाक दाखवुन त्रास देत असून अवैध धंदेवल्याना मात्र पाठीशी घालत असून, अशा पद्धतीचा भेदभावचा कारभार करत आहे तरी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अशा प्रकारच्या दूटप्पी भूमिका बाबत आपण तात्काळ लिखितपत्राद्वारे तक्रार मुखमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री ना . दिलीप वळसे पाटील तसेच काँग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष नानाजी पटोले यांच्याकडे करणार असल्याचे जलील पटेल यांनी संगीतले आहे .

यावल शहरातील सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा दरोडेखोरांनी बन्दुकीच्या धाकाने केली १२ते १३ लाख रुपयांच्या सोना दागीन्यांची लुट स्थानिक पोलीसांना दिले दरोडेखोरांनी आव्हान

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारात भरदिवसा एका सराफा दुकानात चार अज्ञात दरोडेखोरांनी देशी रिवॉल्वरचा धाक दाखवुन सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानातुन सुमारे १२ते १३ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने लुटल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात व परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले असुन सर्वत्र खळबळ उडाली असुन पोलीसांना मोठे आव्हानच चोरटयांनी उभे केले आहे . या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक ७ जुलै बुधवार रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास यावल शहरातील कोर्ट रोड मुख्य बाजारपेठेतील सराफ बाजारातील सराफा व्ववसायीक बाजीराव काशीदास कवडीवाले सराफ यांच्या दुकानात चार अज्ञात लुटारू एकाच पल्सर मोटरसायकलवर आलेत त्यापैक्की एक हा वस्तु घेण्याने बहाण्याने दुकानात शिरला त्यापाठोपाठ त्याच्या सोबत असलेले तिघ जणं ही दुकानात शिरले त्यापैक्की एकाने त्याच्या जवळील रिवॉल्वर काढुन दुकान मालकांचे चिरंजिव जगदीश कवडीवाले यांच्या छातीवर लावली आणी सोबतच्या दोघा चोरटयांनी दुकानाचे शटर बंद करून दुकानातील विक्री करीता असलेले सुमारे २४०ग्रॅम सोने किमत११ लाख रुपये व५५ हजार रुपये रोख काउन्टरच्या ड्राप मधुन काढले तसेच सोन्याचे दागिने असलेले सोगलांस फोडुन सर्व दागीने जमा करून बाहेर निघाले बाहेर सोबत असलेला एक चोरटा हा त्यांच्या येण्याची वाट बघत होता , दरोडेखोरांनी पाच मिनिटात ही सर्व लुटीचे प्रकार करून दुकानातुन बाहेर येवुन मोटरसायकलवर बसुन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता , दुकानदार जगदीश कवडीवाले यांनी चोर चोर अशी आरडाओरड करताच दुकानाच्या थोडया अंतरावर उभे असलेल्या राजु नामक नागरीकाने त्यांना धाडस दाखवुन पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी आपल्याकडील रिवॉत्वरने फायर करण्याचा प्रयत्न केला असता देशी रिवॉल्वर मध्ये गोळी अडकल्याने फायर होवु शकली नाही मात्र या झटापटीत त्या दरोडेखोरानी त्याच्या हातातील बन्दुक ही पकडणाऱ्यांना नागरीकाच्या दिशेने मारून फेकली यावेळी थोडयाच अंतरावर आयडीबीआय बँकेजवळ ऊभे असलेल्या तरुणांनी या दरोडेखोराना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच वेळी त्याच्या कडील एकाने पकडणाऱ्यांच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केले असता त्याच्या हातातुन ती रिवॉल्वर खाली पडली व ते दरोडेखोर मोटरसायकलीने मिळेल त्या मार्गाने पळवुन जाण्यात ते यशस्वी झालेत .घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसानी धाव घेतली मात्र शोधाशोध घेतली असता काहीही निष्पन्न झाले नाहीत . घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या चौकशी पथक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणी लुट झालेल्या सराफा दुकानांची पाहणी करून पोलीसांना कार्यवाही ची दिशा व मार्गदर्शन सुचना दिल्यात . दिनांक ६ जुलै रोजी यावल सातोद मार्गावर झालेली रस्तालुट व आज दुसऱ्या दिवसी झालेल्या सराफा दुकानावर पडलेला दरोडा या दोन्ही घटना दुपारी १२ते २ वाजेच्या दरम्यान घडल्या असुन सतत दोन दिवस झालेल्या या घटनेमुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत . या घटनांमुळे व्यापारी वर्ग आणी सर्वसामान्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . घटनास्थळावरून दरोडेखोरांनी वापरलेल्या दोघ रिवाल्वर पोलीसांनी जप्त केल्या आहेत

मारहाणीची घटनेचा व्हायरल व्हिडिओ व पत्राद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार उघड !

0

 

सचिन वाघे वर्धा

दिनांक 7.7.21हिंगणघाट :– दुय्यम निबंधक कार्यालयात 6 जुलैला वकील स्वप्निल धारकर हे सर्टीफाईड कॉपी घेण्यासाठी गेले असता त्यांना शिविगाळ करीत कैचीने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुय्यम निबंधक श्री.धार्मिक हे धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला. दुय्यम निबंधक श्री. धार्मिक यांना देखील जिवे मारण्याची धमकी शिपाई उमेश नवणागे नी दिली आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधक श्री धार्मिक अ‍ॅड. स्वप्नील धारकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शिपाई उमेश नवनागे याच्या विरोधात 294 ,324,504 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओ व पत्रामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आत मध्ये दलाल हे सक्रिय असतात या कार्यालयात वरिष्ठांकडून लक्ष देण्याची गरज आहे .